01-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला पावन दुनिया मध्ये जायचे आहे,म्हणून काम महाशत्रूला जिंकायचे आहे, कामजीत जगजीत बनायचे आहे"

प्रश्न:-
प्रत्येक जण आपापल्या कार्य व्यवहारा द्वारे कोणता साक्षात्कार सर्वांना करू शकतात?

उत्तर:-
मी हंस आहे की बगळा आहे? हे प्रत्येक जण आपल्या कार्यव्यहाराद्वारे सर्वांना साक्षात्कार करू शकतात,कारण हंस कधीच कोणाला दुःख देत नाहीत.बगळेच दुःख देतात,कारण ते विकारी असतात.तुम्ही मुलं आता बगळ्या पासून हंस बनत आहात.तुम्हा पारस बुद्धी बनणाऱ्या मुलांचे कर्तव्य आहे, सर्वांना पारस बुद्धी बनवणे.

ओम शांती।
जेव्हा ओम शांती म्हटले जाते,तर आपला स्वधर्म आठवणीत राहतो.घराची पण आठवण येते, परंतु घरामध्ये बसून तर राहायचे नाही.बाबांची मुलं आहेत,तर जरूर आपल्या स्वर्गाची पण आठवण करावी लागेल.

ओम शांती.ओम शांती म्हटल्यामुळे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये येते की, मी शांत स्वरुप आहे आणि शांतीचे सागर शिव पित्याचा मुलगा आहे.जे बाबा स्वर्गाची स्थापना करतात,ते बाबाच आम्हाला पवित्र शांत स्वरुप बनवतात.मुख्य गोष्ट पवित्रतेची आहे.दुनियाच पवित्र आणि अपवित्र बनते.पवित्र दुनियेमध्ये एक पण विकारी नाही.अपवित्र दुनियेमध्ये पाच विकार आहेत, म्हणून विकारी दुनिया म्हटले जाते. ती निर्विकारी दुनिया आहे.निर्विकार दुनियेपासून उतरत उतरत परत खाली विकारी दुनिया मध्ये येतात.ती पावन दुनिया आणि ही पतित दुनिया आहे.तो दिवस आहे,सुख आहे.ही भटकण्याची रात्र आहे.तसे तर रात्री मध्ये कोणी भटकत नाही परंतु भक्तीला भटकणे म्हटले जाते.

तुम्ही मुलं सदगती प्राप्त करण्यासाठी आले आहात.तुमच्या आत्म्यामध्ये सर्व पाप होते,पाच विकार होते,त्यांच्यामध्ये पण मुख्य कामविकार आहे,ज्याद्वारे मनुष्य पाप आत्मा बनतात. हे तर प्रत्येक जण जाणतात की,आम्ही पतित आहोत आणि पाप आत्मा पण आहोत.एका काम विकारामुळे सर्व चरित्रहिन बनतात म्हणून बाबा म्हणतात काम विकाराला जिंका, तर तुम्ही जगजीत म्हणजेच नवीन विश्वाचे मालक बनाल.तर मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे.मनुष्य पतित बनतात तर काहीच समजत नाहीत.बाबा म्हणतात कोणताही विकार असायला नको.मुख्य काम विकार आहे यामुळेच खूप गोंधळ होतो, घराघरांमध्ये खूप अशांती होते.यावेळेस दुनिया मध्ये खूप हाहाकर का आहे? कारण पाप आत्मे आहेत. विकारामुळे असुर म्हटले जाते.तुम्ही समजता यावेळेस दुनिया मध्ये, कोणतीही गोष्ट कामाची नाही.या दुनियेला,भंभोरला आग लागणार आहे.जे काही या डोळ्याने पाहता सर्वांना आग लागणार आहे.आत्म्याला तर आग लागू शकत नाही.आत्म्याचा तर नेहमीच जसे विमा काढलेला आहे, नेहमी जिवंत राहते.आत्म्याचा कधी विमा करतात का? शरीराचा विमा केला जातो,आत्मा तर अविनाशी आहे.मुलांना समजवले आहे, हा खेळ आहे.आत्मा तर वरती राहणारी आहे,ती पाच तत्वापासून बिलकुल वेगळी आहे.पाच तत्वा पासुनच सर्व दुनियाची सामग्री बनते.आत्मा तर बनत नाही.आत्मा तर नेहमीच आहे,फक्त पुण्य आत्मा,पाप आत्मा बनते.आत्म्यावरतीच नाव पडते,पुण्य आत्मा,पाप आत्मा. पाच विकारामुळे मनुष्य खूप खराब बनतात.आता बाबाच विकारापासून सोडवण्यासाठी आले आहेत. विकारामुळेच सर्व चरित्रहीन बनतात.चरित्र कशाला म्हटले जाते हे पण समजत नाहीत.हे उच्च ते उच्च आत्मिक शासन आहे.पांडव शासन न म्हणता,तुम्हाला ईश्वरीय शासन म्हणू शकता.तुम्ही समजता आम्ही ईश्वरीय शासन आहोत.ईश्वरीय शासन काय करते? आत्म्याला पवित्र बनवून देवता बनवते,नाहीतर देवता कुठून आले?

हे पण कोणी जाणत नाहीत.हे पण मनुष्यच आहेत परंतु देवता कसे होते,कोणी बनवले?देवता तर स्वर्गामध्ये असतात,तर त्यांना स्वर्गवासी कोणी बनवले? स्वर्गवासीच परत नर्कवासी जरूर बनतात,परत स्वर्गवासी बनतात.हे पण तुम्ही जाणत नव्हते,तर दुसरे कसे जाणतील.आता तुम्ही समजता की,हे वैश्विक नाटक बनलेले आहे. इतके सर्व कलाकार आहेत,या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये असायला पाहिजेत.तर हे राजयोगाचे शिक्षण बुद्धीमध्ये असायला पाहिजे आणि पवित्र पण जरूर बनायला पाहिजे. पतित बनणे तर खूपच खराब गोष्ट आहे.आत्माच पतित बनते.एक दोघांमध्ये पतित बनतात.पतितांना

पावन बनवणे हा तुमचा धंदा आहे. पावन बना तर पवन दुनिया मध्ये चालले जाणार,हे आत्माच समजते. आत्मा नसेल तर शरीर उभा पण राहू शकणार नाही,प्रतिसाद मिळू शकणार नाही.आत्मा जाणते आम्ही वास्तवामध्ये पावन दुनियाचे रहिवासी आहोत.आता बाबांनी समजवले आहे,तुम्ही बिलकूलच

बेसमज होते म्हणून पतित दुनियाचे लायक बनले आहात.आता जोपर्यंत पावन बनत नाहीत,तोपर्यंत स्वर्गाच्या लायक बनू शकत नाहीत. स्वर्गाची तुलना पण संगमयुगाशी केली जाते.स्वर्गा मध्ये थोडीच भेट करू शकतील.या संगम युगामध्येच तुम्हाला सर्व ज्ञान मिळते,पवित्र बनण्याचे हत्यार मिळते.एकालाच पतित-पावन म्हटले जाते,बाबा आम्हाला पावन बनवा.हे स्वर्गाचे मालक आहेत ना.तुम्ही जाणता आम्हीच स्वर्गाचे मालक होतो,

परत ८४ जन्म घेऊन पतित बनलो.श्रीकृष्णाचे नाव श्याम आणि सुंदर ठेवले आहे.कृष्णा चे चित्र सावळे बनवतात परंतु अर्थ थोडेच समजतात.कृष्णाचे पण तुम्हाला खूप स्पष्ट ज्ञान मिळते.याच दुनियेत दोन दुनिया केल्या आहेत.वास्तव मध्ये दोन दुनिया नाहीत.दुनिया एकच आहे,तीच नवीन आणि जुनी होते.प्रथम लहान मुलं असतात परत मोठे बनून वृद्ध होतात.तर तुम्ही ज्ञान समजवण्यासाठी खूप कष्ट करतात.तुम्ही आपली राजधानी स्थापन करत आहात ना. लक्ष्मी-नारायणने हे ज्ञान समजवले आहे ना, याद्वारे खूप खूप गोड बनले आहेत.कोणी बनवले? भगवंताने.लढाई इत्यादीची गोष्टच नाही.भगवान खूप समजदार, ज्ञानाचे सागर आहेत,खूप पवित्र आहेत.शिवलिंगाच्या पुढे, सर्व मनुष्य जाऊन नमन करतात, परंतु ते कोण आहेत,काय करतात हे कोणी जाणत नाहीत.शिव काशी विश्वनाथ गंगा बस म्हणत राहतात, अर्थ काहीच जाणत नाहीत.तुम्ही समजावून सांगा,तर म्हणतात तुम्ही काय आम्हाला समजावून सांगणार? आम्ही तर वेदशास्त्र इत्यादी सर्वांचा अभ्यास केला आहे, परंतु राम राज्य कोणाला म्हणतात हे पण कोणी जाणत नाहीत. रामराज्य सतयुगी दुनियेला म्हटले जाते.तुमच्यामध्ये पण क्रमानुसार आहेत,ज्यांना धारणा होते. काही तर विसरतात,कारण दगडबुद्धी आहेत.तर आता जे पारस बुद्धी बनले आहेत,त्यांचे काम आहे दुसऱ्यांना पण पारसबुध्दी बनवणे.दगडबुध्दीचे कार्य तसेच चालत राहते,कारण हंस आणि बगळे एकत्र राहतात ना.हंस कधी कोणाला दुःख देत नाहीत,बगळेच दुःख देतात.काहीजण असे आहेत, ज्यांची चाल बगळ्यासारखी असते, त्यांच्यामध्ये सर्व विकार असतात. इथे पण असे खूप विकारी येतात, ज्यांना आसुर म्हटले जाते.ओळख राहत नाही.अनेक सेवा केंद्रावरती विकारी येतात,काहीतरी कारण बनवतात,आम्ही ब्राह्मण आहोत, परंतु आहे खोटे,याला म्हटले जाते खोटी दुनिया.ती नविन दुनिया,खरी दुनिया आहे. आता संगम आहे.खूप फरक राहतो.जे खोटे बोलणारे आहेत,खोटे काम करणारे आहेत,ते तिसऱ्या दर्जाचे बनतात.प्रथम वर्ग, दुसरा वर्गाचे तर असतात.

बाबा म्हणतात,पवित्रतेचा पूर्ण पुरावा द्या.काही जण म्हणतात, पती-पत्नी दोन्ही एकत्र राहून,पवित्र राहतात, हे तर अशक्य आहे.तर मुलांना समजून सांगायचे आहे.योगबळ नसल्यामुळे इतकी सहज गोष्ट पण समजू शकत नाहीत.त्यांना ही गोष्ट कोणी समजवत नाहीत की, आम्हाला भगवान शिकवत आहेत.ते म्हणतात,पवित्र बनल्यामुळे तुम्ही २१ जन्म स्वर्गाचे मालक बनाल.ती पवित्र दुनिया आहे.पवित्र दुनियेत कोणी पतित होऊ शकत नाही. पाच विकारच नाहीत,ती निर्विकारी दुनिया आहे, ही विकारी दुनिया आहे.आम्हाला सतयुगाची बादशाही मिळते,तर आम्ही २१जन्मासाठी का नाही पवित्र बनणार? आम्हाला जबरदस्त लॉटरी मिळते, तर खुशी होते ना.देवी देवता पवित्र आहेत ना.अपवित्र पासून पण पवित्र पण, बाबाच बनवतात.तर समजावून सांगायला पाहिजे,आम्हाला हे प्रलोभन आहे.बाबाच असे बनवतात,बाबा शिवाय,नवीन दुनिया कोणी बनवू शकत नाहीत.मनुष्या पासून देवता बनवण्यासाठी भगवानच येतात, त्यांच्याच शिवरात्रीचे गायन केले आहे. हे पण समजवले आहे, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. ज्ञान आणि भक्ती अर्धे-अर्धे आहे.भक्तीच्या नंतर वैराग्य आहे.आता घरी जायचे आहे, हे शरीर रुपी वस्त्र सोडायचे आहे.या शी-शी दुनिया मध्ये राहायचे नाही.८४चे चक्र आता पूर्ण होत आहे.आता स्वर्गामध्ये व्हाया शांतीधाम जायचे आहे.प्रथम आत्म्याची गोष्ट विसरायची नाही.हे पण मुलं जाणतात, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.बाबा नवीन दुनियाची स्थापना करतात.बाबा अनेक वेळेस स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आले आहेत.नर्क खूप मोठा आहे,स्वर्ग खूपच लहान आहे.नविन दुनिया मध्ये एकच धर्म असतो,येथे अनेक धर्म आहेत. एक धर्म कोणी स्थापन केला?ब्रह्माने तर केलं नाही केला.ब्रह्माच पतित, परत ब्रह्माच पावन बनतात.माझ्यासाठी तर पतित-पावन म्हणनार नाहीत.पावन आहेत,तर लक्ष्मीनारायण नाव आहे. ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र. हे प्रजापिता आहेत ना.शिवबाबांना अनादी रचनाकार म्हटले जाते. अनादी अक्षर बाबासाठी आहे. बाबा अनादि आहेत,तर आत्मे पण अनादी आहेत.हे पूर्वनियोजित नाटक आहे. स्व आत्म्याला सृष्टी चक्राच्या आदी-मध्य-अंत च्या कालावधीचे ज्ञान मिळाले आहे. हे कोणी दिले? बाबांनी.तुम्ही २१ जन्मासाठी धनीचे बनतात,परत रावण राज्यांमध्ये विनाधनीचे बनतात.विकारामुळे येथूनच चरित्र बिघडायला सुरुवात होते.बाकी दोन दुनिया नाहीत.मनुष्य तर समजतात,स्वर्ग नरक सर्व एकत्रच चालतात.आत्ता तुम्हा मुलांना खूप स्पष्ट समजवले जाते.आत्ता तुम्ही गुप्त आहात.ग्रंथामध्ये तर काय-काय लिहिले आहे.सुत खुपच एकमेकांत गुंतले आहे.बाबांशिवाय कोणी सरळ करु शकत नाहीत. त्यांनाच बोलवतात,की आम्ही काहीच कामाचे राहिलो नाहीत, तुम्ही येऊन पावन बनवून चारित्र्य सुधारा.तुमचे चरित्र खुप सुधारते. काही-काही तर सुधारण्याऐवजी बिघडतात.चलनद्वारे माहिती होते. आज महारथी हंस म्हणतात, उद्या परत बगळे बनण्यासाठी उशीर करत नाहीत.माया पण गुप्त आहे ना. कोणामध्ये क्रोध पाहण्यामध्ये येत नाही,भौ-भौ करतात,तर दिसून येतो.परत आश्चर्यवत ऐकतात, दुसऱ्याला ज्ञान देतात आणि स्वतः ज्ञान सोडून जातात. खूप विकारी बनतात, एकदम दगडासारखे बनतात. इंद्रप्रस्थ ची गोष्ट पण आहे ना, माहिती तर होते ना.अशा विकारींना,परत सभेमध्ये यायला नाही पाहिजे.थोडेफार ज्ञान ऐकले तरीही स्वर्गामध्ये येतील, ज्ञानाचा विनाश होऊ शकत नाही.आता बाबा म्हणतात,तुम्हाला पुरुषार्थ करून उच्च पद मिळवायचे आहे. जर विकारांमध्ये गेले तर पदभ्रष्ट होईल.सूर्यवंशी चंद्रवंशी बनाल, परत वैश्यवंशी शुद्रवंशी बनाल. आता तुम्ही समजता हे चक्र कसे फिरत राहते.ते तर कलियुगाचे आयुष्य चाळीस हजार वर्षे म्हणतात.शिडी तर खाली उतरायची आहे ना.चाळीस हजार वर्ष कालावधी झाला तर मनुष्य पण असंख्य होतील.पाच हजार वर्षांमध्येच इतके मनुष्य होतात, ज्यामुळे खाण्यासाठी मिळत नाही, तर इतक्या हजार वर्षांमध्ये किती वृद्धी होईल.तर बाबा येऊन धैर्य देतात.पतित मनुष्यांना तर लढाई करायचीच आहे,त्यांची बुद्धी इकडे येऊ शकत नाही.आता तुमची बुद्धी किती बदलली आहे, तरीही माया धोका जरूर देते.इच्छामात्रम अविद्या.कोणती इच्छा केली तर, माया कोणत्या ना कोणत्या प्रकारे धोका देत राहते.ते परत वरती चढू शकत नाहीत. पित्याच्या हृदयावर चढू शकत नाहीत.काहीजण तर पित्याला पण मारून टाकतात. परिवाराला नष्ट करतात.ते महान पाप आत्मे आहेत.रावण काय करवतो,खूप खराब दुनिया आहे.या दुनियेशी कधी मन लावायचे नाही.पवित्र बनण्यामध्ये खूप हिम्मत पाहिजे.विश्वाच्या बादशाहीचे बक्षीस घेण्यासाठी,पवित्रता मुख्य आहे,म्हणून बाबांना म्हणतात येऊन पावन बनवा.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मायेच्या धोक्यापासून वाचण्यासाठी इच्छा मात्रम अविद्या बनायचे आहे. या खराब दुनियेशी मन लावायचे नाही.
(२) पवित्रतेचा पूर्णपणे पुरावा द्यायचा आहे.सर्वात उच्च चरित्र पवित्रता आहे.स्वतःला सुधारण्यासाठी पवित्र बनवायचे आहे.

वरदान:-
आपल्या एकाग्र स्वरूपा द्वारे सूक्ष्म शक्तीच्या लीलांचा अनुभव करणारे, अंतर्मुखी भव

एकाग्रताचा आधार आंतरमुखता आहे.जे आंतरमुखी आहेत,ते मनामध्ये सूक्ष्म शक्तीचा अनुभव करत राहतात.आत्म्याचे आवाहन करणे, आत्म्यांशी संवाद करणे, आत्म्याच्या स्वभाव संस्काराला परिवर्तन करणे,बाबांशी त्यांचा संबंध जोडणे, असे आत्म्याच्या दुनियेमध्ये आत्मिक सेवा करण्यासाठी एकाग्रतेच्या शक्ती'मध्ये वृद्धी करा. यामध्ये सर्व प्रकारचे विघ्न स्वतःच समाप्त होतील.

बोधवाक्य:-
सर्व प्राप्तींना स्वतःमध्ये धारण करून,विश्वाच्या रंगमंचावरी प्रत्यक्ष होणेच,प्रत्यक्षतेचा आधार आहे.


विशेष नोट:- हा जानेवारी महिना गोड गोड साकार बाबांच्या स्मृती चा महिना आहे.,यामध्ये स्वतःला समर्थ बनवण्यासाठी विशेष अंतर्मुखी बनून सूक्ष्म शक्तींच्या लीलांचा अनुभव करायचा आहे. पूर्ण महिना आपल्या अव्यक्त अस्थेमध्ये राहायचे आहे. मन आणि मुखाचे मौन ठेवायचे आहे.