01-05-22    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   13.12.90  ओम शान्ति   मधुबन


तपस्याचा आधार बेहद्दचे वैराग्य


आज बापदादा सर्व प्रेमळ मुलांना, प्रेमाची फुलं अर्पण करताना पाहत आहेत. बापदादा, देश-विदेशातील तमाम मुलांच्या हृदयापासून प्रेमाच्या फुलांचा वर्षाव पाहत आहेत. प्रत्येक मुलांच्या मनाचे वाद्य किंवा गाणे ऐकत आहेत. एकच गाणे आहे -"माझे बाबा". चहूजूबाजूला भेटीच्या, मंगलमय आशेचे दिवे उजळून निघाले आहेत. हे दिव्य दर्शन बापदादा आणि मुलांशिवाय संपूर्ण कल्पात दिसू शकत नाही. प्रेमाची ही अनोखी फुलं, या जुन्या जगातील कोहनूर हिऱ्यापेक्षाही अनमोल आहे. हे हृदयापासूनचे गीत मुलांशिवाय कोणीही गाऊ शकत नाही. अशी दिपमाळ कोणीही साजरी करू शकत नाही. सर्व मुलं बापदादासमोर आहेत. प्रत्येकजण या स्थूल ठिकाणी बसू शकत नाही. पण बापदादांच ह्रदय खुप विशाल आहे, म्हणूनच प्रत्येकाला स्पष्ट रूपात पाहत आहेत. सर्वांचे ओतप्रोत भरलेले प्रेम आणि आपुलकीचे, अधिकाराचे शब्द ऐकत आहेत आणि त्या बदल्यात प्रत्येक मुलाला अधिकाधिक प्रेम देत आहेत. मुलं अधिकाराने सांगतात, आम्ही सर्वजण साकार स्वरूपात भेटू. पित्याला पण हवं असतं, मुलांनाही हवं असतं. तरीही, ब्रह्मा पिता अव्यक्त देवदूताच्या, फरिश्ताच्या रूपात, साकार स्वरुपा पेक्षा अनेक पटीने, तीव्र गतीने सेवा करत, मुलांना आपल्यासारखं घडवत आहेत. फक्त एक-दोन वर्षेच नाही तर, अनेक वर्षे अव्यक्त मिलन, अव्यक्त स्वरूपातील सेवेचा अनुभव करवला, आणि करवत आहेत. तर ब्रह्माबाबांनी अव्यक्त असूनही व्यक्त मध्ये भुमिका का केली ? समान बनवण्यासाठी. ब्रह्माबाबा अव्यक्त मधून व्यक्त मध्ये आले, मग तुम्हा मुलांनी त्या बदल्यात काय करायला पाहिजे ? व्यक्त पासून अव्यक्त व्हायचे आहे. वेळे प्रमाण, अव्यक्त मिलन, अव्यक्त स्वरूपाची सेवा, आता खूप आवश्यक आहे. यामुळे वेळोवेळी बापदादा अव्यक्त मिलन अनुभवाचे संकेत देत राहतात. यासाठी तुम्ही तपस्या वर्षही साजरे करत आहात ना? बापदादांना आनंद आहे की, बहुसंख्य मुलांचा उमंग उत्साह चांगला आहे. बहुसंख्यांना असे वाटते की, कार्यक्रम प्रमाणे करणे आवश्यक आहे. एक म्हणजे तो कार्यक्रमा प्रमाणे करणे आणि दुसरे म्हणजे मनापासून उमंग उत्साहाने करणे. प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे - मी कशामध्ये आहे? वेळेच्या परिस्थिती प्रमाणे, स्वतःच्या प्रगती प्रमाणे, जलद सेवेच्या गती प्रमाणे, बापदादांच्या प्रेमाच्या मोबदल्यात तपस्या अती आवश्यक आहे. प्रेम करणे खूप सोपे आहे आणि प्रत्येकजण करतो, हे बाबांनाही माहीत आहे, परंतू परताव्याच्या रुपात तुम्हाला बापदादा सारखे बनायचे आहे. यावेळी बापदादांना हे पाहु इच्छितात. यामधून कोणी ना कोणी निघतील. प्रत्येकाची इच्छा आहे परंतू इच्छा असणारे आणि करणारे यांच्यात फरक आहे, कारण तपस्याचा शाश्वत आणि सोपा आधार बेहद्दची वैराग्य वृत्ती आहे. बेहद्दची वैराग्य वृत्ती म्हणजे सर्व किनारे सोडून देणे कारण तुम्ही किनाऱ्याला आधार बनवले आहे. वेळेनुसार प्रेमळ बनणे आणि श्रीमतावर आधारीत निमित्त बनलेल्या आत्म्याच्या इशाऱ्या प्रमाण बुद्धी प्रेमळ पासून अलिप्त बनणे, हे घडत नाही. जितक्या लवकर तुम्ही प्रिय बनता, तितके तुम्ही अलिप्त बनत नाहीत. प्रेमळ बनण्यात हुशार आहेत, अलिप्त बनण्यासाठी विचार करतात, यामध्ये हिम्मत आवश्यक आहे. अलिप्त होणे म्हणजे किनारा सोडणे आणि किनारा सोडणे म्हणजे बेहद्दची वैराग्य वृत्ती. किनाऱ्याला आधार बनवणे येते पण सोडण्यासाठी काय करतात? तुम्ही लांबलचक प्रश्नचिन्ह लावतात. सेवेची जबाबदारी घेणे खूप चांगले आहे, परंतु त्याबरोबरच स्वतःची आणि इतरांची बॅटरी चार्ज करणे कठीण आहे, यामुळे सध्याच्या काळात तपस्याद्वारे वैराग्य वृत्तीची नितांत गरज आहे. तपस्याच्या यशासाठी विशेष आधार किंवा सोपे साधन म्हणजे -तुम्ही एक शब्दाचा पाठ पक्का करा. दोन-तीन लिहिणे अवघड आहे, एक लिहिणे खूप सोपे आहे. तपस्या म्हणजे एक होणे. ज्याला बापदादा एकनामी म्हणतात. तपस्या म्हणजे मन आणि बुद्धी एकाग्र करणे, तपस्या म्हणजे एकांत प्रिय असणे, तपस्या म्हणजे स्थितीला एकरस ठेवणे, तपस्या म्हणजे मिळालेल्या सर्व खजिना वाचवणे म्हणजे बचत करणे. तर एकाचा पाठ पक्का केला ना, एकाचा धडा अवघड आहे की सोपा? तसे तर सोपे आहे, परंतू तुम्ही अशी भाषा बोलणार तर नाही ना. खूप भाग्यवान आहात. अनेक प्रकारच्या कष्टाला मुकले. जगातील लोकांना वेळ सक्तीने करुन घेईल आणि वेळेनुसार सक्तीने करतील. बाबा मुलांना वेळेआधी तयार करतात आणि तुम्ही पित्याच्या प्रेमाने ते करता. जर प्रेमाने केले नाही किंवा थोडे केले तर काय होईल. बेहद्दचे वैराग्य धारण करावेच लागेल, परंतु बळजबरीने ते केल्याने फळ मिळत नाही. प्रेमाचे प्रत्यक्ष फळ भविष्यात फळ मिळते आणि मजबुरीने केलेल्यांना सजा खावी लागेल, क्रॉस करावे लागेल. हे देखील क्रॉसवर चढण्यासारखे, म्हणजे सुळावर चढण्यासारखे आहे. तर तुम्हाला काय आवडते? प्रेमाने करणार ना. बापदादा कधीतरी किनाऱ्यावरील मुलांची यादी सांगतील. तसे तर जाणून घेण्यामध्ये हुशार आहात. तुमची उजळणी करवतात कारण बापदादा त्यांना पाहिजे तेव्हा, मुलांची दिनचर्या पाहू शकतात. ते एकमेकांना पाहण्यासाठी दिवसभर वेळ काढावा लागत नाही. साकार ब्रह्माबाबांना पाहिले, त्यांची नजर स्वतः च कुठे जात होती? मग तुमचे पत्र असो, दिनचर्या असो, कोणाची चाल चलन असो, आठ पानांचे पत्र असो, पण बाबाची नजर कुठे पडत होती ? जिथे गरज असेल तिथे, जिथे सुचना द्यायच्या आहेत. बापदादा सर्वांना पाहतात, पण पाहून पण पाहत नाहीत. जाणतात आणि जाणत पण नाहीत. जे आवश्यक नाही, ते पाहत ही नाहीत आणि जाणत पण नाहीत. खेळ तर खुप चांगला पाहतात, ते पुन्हा कधीतरी सांगतील. अच्छा. तपश्चर्या करणे सोपे आहे, बेहद्दच्या वैराग्य वृत्तीमध्ये राहणे सहज आहे ना. किनाऱ्याला सोडणे कठिण आहे का? परंतू तुम्हालाच बनणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक कल्पाच्या प्राप्तीसाठी पात्र झाला आहात आणि तुम्ही निश्चितपणे बनाल, अच्छा. या वर्षी पूर्वीच्या अनेक कल्पातील मुलांना आणि या कल्पातील नवीन मुलांना संधी मिळाली आहे. त्यामुळे संधी मिळाल्याचा आनंद आहे, नाही का? बहुसंख्य नवीन आहेत, शिक्षक जुने आहेत. मग शिक्षक काय करणार? वैराग्य वृत्ती धारण करणार ना? किनारा सोडणार ना ? त्या वेळी म्हणनार तर नाही की, करायचं तर होते, परंतू कसे करायचे? तुम्ही करुन दाखवणारे आहात की, फक्त सांगणारे आहात? जे पण चहूबाजूचे मुलं आले आहेत, त्यांना साकार रूपात पाहून बापदादा प्रसन्न होतात. तुम्ही हिंमत ठेवली आणि बाबांची मदत नेहमीच आहे, म्हणून नेहमी धैर्य ठेवून, मदतीचा अधिकार अनुभवत, सहज उड्डाण करत राहा, प्रगती करत राहा. बाबा मदत करतात, पण घेणारा पण घ्यायला पाहिजे. दाता देतात परंतू घेणारे यथाशक्ती बनतात. म्हणून यथाशक्ती बनू नका. नेहमी सर्वशक्तिमान राहा. तर उशिरा येणारे पण नंबर पुढे घेतील. समजले. सर्वशक्तिमानच्या अधिकाराचा पुरेपूर फायदा घ्या, अच्छा. चहूबाजूच्या सर्वस्नेही आत्म्यांना, नेहमी पित्याच्या प्रेमाची परतफेड करणाऱ्या अद्वितीय आत्म्यांना, सदैव तपस्वी मुर्त अवस्थेत राहणाऱ्या आत्म्यांना, पित्याच्या जवळच्या आत्म्यांना, नेहमी पित्याच्या समान बनण्याचे ध्येय ठेऊन लक्षण धारण करणाऱ्या आत्म्यांना, अशा देश आणि परदेशातील दिलारामच्या सर्व मुलांना, दिलाराम बाबांच्या हृदयापासून मनापासून, सिक आणि प्रेमाने आठवण आणि नमस्ते. अव्यक्त बापदादांची दादांशी वार्तालाप:- अष्ठ-शक्तीधारी, इष्ट आणि अष्ठ आहात ना, नाही का? तुम्हाला माहित आहे का, अष्ठ ची लक्षणं काय आहेत ? प्रत्येक कृतीत वेळे प्रमाण, परिस्थितीचा प्रमाण, प्रत्येक शक्तीला कृतीत आणनारे असतात. अष्ठ शक्ती इष्ठ बनवतात आणि अष्ठ पण बनवतात. तुम्ही आठ शक्तींचे धारक आहात आणि म्हणूनच तुम्ही अष्ठ आहात. विशेष आठ शक्ती आहेत. तसे तर अनेक आहेत, पण आठमध्ये बहुसंख्य शक्ती येतात. विशेष शक्तीना वेळेवर कार्यान्वित करणे आवश्यक आहे. जशी वेळ, तशी परिस्थिती, तशीच स्थितीयालाच अष्ट किंवा इष्ट म्हणतात. तर असा ग्रुप तयार आहे, ना ? परदेशात किती तयार आहेत? अष्ठ मध्ये येणारे आहेत ना? अच्छा. (सकाळी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी संतरी दादीने देह सोडला- १३/१२/९० ) हे चांगले आहे, प्रत्येकाला जावे तर लागेल ना. तुम्ही तयार आहात की, लक्षात येईल माझे केंद्र, आता विद्यार्थ्यांचे काय होईल ? माझे माझे तर आठवणीत येत नाही ना? प्रत्येकाला जावे लागेल, परंतु प्रत्येकाचे स्वतःचे खाते आहे. हिशेब चुक्तू केल्याशिवाय कोणीही जाऊ शकत नाही, म्हणून सर्वांनी आनंदानी सुट्टी दिली. सगळ्यांना आवडले ना, असे जाणे चांगले नाही का? तर तुम्हीही तयार होऊन जायचे आहे. अव्यक्त बापदादांची ग्रुप सोबत वार्तालाप:-1. दिल्ली आणि पंजाब दोन्ही सेवेची मूळ ठिकाणे आहेत. स्थापनेची ठिकाणे नेहमीच महत्त्वाच्या पद्धतीने पाहिली जातात आणि गायली जातात. सेवेत जसे आदी स्थान आहे, त्याचप्रमाणे स्थितीमध्ये आदि रत्ने आहात का? स्थळाबरोबरच स्थितीची स्तुती पण आहे. आदि रत्न म्हणजे प्रत्येक श्रीमत जीवनात आणण्यासाठी सुरुवात करणारे, फक्त ऐकणारे आणि ऐकवणारे नसतात, कारण ऐकणारे आणि कथन करणारे अनेक आहेत, परंतु करणारे करोडो मधून काहीच आहेत. त्यामुळे नशा राहतो की आपण करोडो मधून काही आहोत? हा आध्यात्मिक नशा, मायेच्या नशेतून मुक्त करतो. हा आध्यात्मिक नशा सुरक्षिततेचे साधन आहे. कोणताही मायेची नशा, परिधान करने, खाण्याचा, किंवा पाहण्याचा आपल्याकडे आकर्षित करु शकत नाही. तुम्ही असे नशेमध्ये राहता की, माया हळूहळू आकर्षित करते? आत्ता समजदार बनले आहात ना? मायेलाही समज आहे. समजदार कधीही फसत नाहीत, धोखा खात नाहीत. जर समजदार माणसाने कधी, धोका खाल्ला तर सगळे त्याला काय म्हणतील? समजदार आणि धोखा खाल्ला !धोखा खाणे म्हणजे दु:खाला आवाहन करणे. जेव्हा धोखा खातात तेव्हा, दु:ख होते ना. तर दु:ख कोणाला घ्यायला आवडते का? म्हणूनच नेहमी आदी रत्न आहात, म्हणजेच श्रीमताचे जीवनात पालन करणारे. तुम्ही असे आहात ना? की तुम्ही पाहतात - प्रथम दुसऱ्यांनी करावे, नंतर आम्ही करू? यांनी नाही केले तर, आम्ही ते कसे करणार? करण्यामध्ये प्रथम मी. दुसरा बदलल्या नंतर मी बदलणार, . . . असे नाही. जो करेल त्याला मिळेल. आणि तुम्हाला किती मिळेल? एकाचे पदमगुणा. त्यामुळे करायला मजा येते ना. एक करा आणि पद्म मिळवा. यामध्ये तर प्राप्तीच प्राप्ती आहे, म्हणून प्रत्यक्षात श्रीमताचे आचरण करण्यात प्रथम मी. मायेच्या अधिपत्याखाली प्रथम मी नाही, परंतु पुरुषार्थ करण्यात, प्रथम मी, तेव्हाच प्रत्येक पावलावर यश मिळेल. यश मिळालेच आहे. फक्त तुम्ही थोडासा मार्ग बदलता, बदली करण्यामुळे गंतव्य स्थान बदलून, दूर जातात, वेळ लागतो. जर कोणी चुकीच्या मार्गावर गेला असेल तर, गंतव्यस्थान म्हणजे लक्ष्य दूर जाते. जेव्हा तुम्हाला परिश्रम करावे लागतात, तेव्हा प्रेमाचे प्रमाण हलके होते. जर प्रेम असेल तर, तुम्हाला कधीही कष्ट करावे लागत नाहीत कारण बाबा तुम्हाला अनेक हातांनी मदत करेल. तो आपल्या हातांनी काही सेकंदात कार्य यशस्वी करेल. तुम्ही नेहमी पुरुषार्थामध्ये उडत राहाल. पंजाबचे लोक उडतात की घाबरतात? तुम्ही पक्के अनुभवी आहात ना? कोणी घाबरणारे तर नाहीत ना? काय होईल, कसे होईल. . ! नाही. त्यांनाही शांतीची भेट देणारे तुम्हीच आहात. जो कोणी येऊन शांती घेईल, कोणीही रिकाम्या हाताने जाऊ नये. तुम्ही ज्ञान दिले नाही तरी, शांततेची स्पंदने शांत करतात. अच्छा. २) चहूबाजूंनी आलेले श्रेष्ठ आत्मे सर्व ब्राह्मण आहात, ना की राजस्थानी, ना महाराष्ट्रीय, ना मध्यप्रदेशी. . . सर्व एकच आहात. यावेळी सर्वजण मधुबन निवासी आहेत. ब्राह्मणांचे मूळ ठिकाण मधुबन आहे. सेवेसाठी तुम्ही वेग-वेगळ्या भागात गेला आहात. जर एका जागी बसून राहिले तर सगळीकडे सेवा कशी होईल? त्यामुळे विविध ठिकाणी सेवेसाठी गेले आहात. परत तुम्ही लौकिक मध्ये व्यापारी असोत किंवा सरकारी नोकर असोत किंवा कारखान्यात कामगार असा. . . पण मूळ व्यवसाय ईश्वरीय सेवाधारी आहात. माताही घरी राहून ईश्वरीय सेवधारी आहेत. ज्ञान कोणी ऐकत असो वा, न ऐकत असो, तरीही ते चांगल्या-भावनेच्या आणि चांगल्या-इच्छेच्या प्रकंपनानी बदलतात. वाणीची सेवा ही केवळ सेवा नसून, चांगली भावना ठेवणे ही देखील सेवा आहे. तर तुम्हाला दोन्ही सेवा करायला येतात ना ? तुम्हाला कोणी शिवीगाळ केली तरी, तुमच्या चांगल्या भावना आणि शुभेच्छा सोडू नका. ब्राह्मणांचे काम आहे, काही ना काही देणे. तर ही चांगली भावना आणि शुभेच्छा ठेवणे हेही शिक्षण देणे आहे. बोलण्याने सगळेच बदलत नाहीत. ते कसेही असो, पण काहीतरी नक्कीच द्या. भले पक्के रावण असो. अनेक माता सांगतात की, आमचे नातलग पक्के रावण आहेत, ते बदलणार नाहीत, तुम्ही अशा आत्म्यांना पण तुमच्या खजिन्यातून, चांगल्या भावना, शुभेच्छा द्या. कुणी शिवी दिली तरी, तोंडातून काय निघतं? ह्या ब्रह्माकुमारी आहेत. . . ते ब्रह्मा पित्याची तर आठवण करतात ना, जरी त्यांनी तुम्हाला शिवी दिली, तरी ते ब्रह्मा तर म्हणतात. तरीही ते पित्याचे नाव घेतात ना? परत त्यांना बाबांचा परिचय असो वा नसो, तरीही तुम्ही त्यांना काही न काही द्या. असे तुम्ही करता की, जे ऐकत नाही त्याला सोडून देतात ? सोडू नका, नाहीतर अंतकाळी तुमचे कान पकडतील, तक्रार करतील -आम्ही तर मूर्ख होतो, तुम्ही का नाही दिले? तर कान धरतील ना. तुम्ही देत जावा, कोणी घेईल किंवा नाही घेतील. बापदादा मुलांना रोज एवढा खजिना देतात, काही ते संपूर्ण घेतात, काही यथाशक्ती घेतात. तरीही बापदादा कधी म्हणतात का, मी देणार नाही? का घेत नाहीत? तर दाताची मुले आहात ना, देणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे, नाही का? ते चांगले म्हणतील, परत तुम्ही देणार, हे तर घेणारे झाले. लेवता, घेणारे कधीच दाताची मुले होऊ शकत नाहीत आणि ते देवता बनू शकत नाहीत. तुम्ही तर देवता बनणारे आहात ना? देवताई कपडे तर तयार आहे ना? का ते शिवणे, धुणे किंवा इस्त्री करणे चालू आहे? देवताई शरीर समोर दिसले पाहिजे. आज फरिश्ता म्हणजे देवदूत, उद्या देवता. तुम्ही किती वेळा देवता झाला आहात? म्हणून तुम्ही नेहमी दाताची मुलं आणि देवता बनणार आहात - हे लक्षात ठेवा. दात्याची मुले घेऊन देत नाहीत. मान मिळाला, आदर दिला तर, मी पण देईल, असे नको. नेहमी दाताची मुलं, देणारे. असा नशा कायमच राहतो का? की कधी कमी, कधी जास्त होतो ? तुम्ही अजून मायेला निरोप दिला नाही का? हळूहळू देऊ नका, तेवढा वेळ नाही. एक तर तुम्ही उशीरा आलात आणि नंतर हळू हळू प्रयत्न केले, तर तुम्ही पोहोचू शकणार नाही. निश्चय झाला, नशा चढला आणि उडाले. आता तिव्र गतीच्या पुरुषार्थाची वेळ आहे. उड्डाण करणे तिव्र आहे, नाही का? तुम्ही भाग्यवान आहात - तुम्ही उड्डाण करण्यासाठी वेळेवर आला आहात. म्हणून नेहमी स्वतःला असेच अनुभवा, की आम्ही खूप भाग्यवान आहोत. संपूर्ण कल्पात असे भाग्य पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून देणाऱ्याची मुले व्हा, घेण्याचा विचारही करू नका. पैसे द्यावेत, कपडे द्यावेत, अन्न द्यावे, दात्याच्या मुलाला सर्व काही आपोआप प्राप्त होते. मागणाऱ्यांना मिळत नाही. दाता बना आणि तुम्हाला ते मिळत राहील. अच्छा.

वरदान:-
अर्थ सहित आठवणी द्वारे सर्व शक्ती संपन्न बनणारे, नेहमी शस्त्रधारी, कर्मयोगी भव. अचूक स्मरण करण्याचा अर्थ आहे, सर्व शक्तींनी परिपूर्ण राहणे. परिस्थिती रुपी शत्रू आले आणि शस्त्रे कामी नाही आले, तर त्यांना शस्त्रधारी म्हणणार नाहीत. प्रत्येक कर्म करताना बाबांची आठवण करा, तर यश मिळेल. ज्याप्रमाणे मनुष्य कृतीशिवाय एक सेकंदही जगू शकत नाही, त्याचप्रमाणे योगाशिवाय कोणतीही कृती होऊ शकत नाही, त्यामुळे कर्मयोगी, शस्त्रास्त्रधारी बना आणि वेळेवर सर्व शक्तींना आदेशाप्रमाणे वापरा -तरच खरे योगी म्हणू शकाल.

सुविचार:-
ज्यांचे विचार आणि कर्म श्रेष्ठ आहेत, तेच सर्वशक्तिमान आहेत.