01-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,मोठ्या मोठ्या स्‍थानावरती,मोठे मोठे दुकान म्हणजे सेवा केंद्र उघडा,सेवा वाढवण्यासाठी नियोजन करा,मीटिंग करा,विचार करा"

प्रश्न:-
जगातील ८आश्चर्य तर सर्व जाणतात,परंतु सर्वात मोठे आश्चर्य कोणते आहे,ज्याला तुम्ही मुलंच जाणतात?

उत्तर:-
सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की,जे सर्वांचे सद्गती दाता बाबा, स्वतः येऊन शिकवतात.ही आश्चर्यकारक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला आपआपल्या दुकानाचा भपका,दिखावा करावा लागतो कारण मनुष्य दिखावा पाहून आत येतात.तर सर्वात चांगले आणि मोठे दुकान राजधानीमध्ये असायला हवे.तेव्हाच सर्व येऊन ज्ञान घेतील.

गीत:-
मरायचे तुझ्या गल्लीमध्ये, जगायचे तुझ्याच गल्लीमध्ये

ओम शांती।
शिव भगवानुवाच.रुद्र भगवानुवाच पण म्हटले जाऊ शकते कारण शिव माळेचे गायन केले जात नाही.जी माळ मनुष्य भक्तिमार्गा मध्ये खूप जपत राहतात.त्याचे नाव ठेवले आहे रुद्रमाळ.गोष्ट एकच आहे परंतु वास्तविक मध्ये शिवबाबा शिकवत आहेत,त्यांचे नाव व्हायला पाहिजे परंतु रुद्र नाव चालत येते.हे पण समजायला पाहिजे,शिव आणि रुद्र मध्ये काहीच फरक नाही. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आम्ही चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून बाबांच्या माळेच्या जवळ येऊ.हे उदाहरण दिले जाते,जसे मुलं स्पर्धेमध्ये एका ठिकाणी जाऊन परत येतात आणि शिक्षकाच्या जवळ उभे राहतात.तुम्ही मुलं पण जाणतात आम्ही ८४ चक्र लावले.आता प्रथम जाऊन माळेमध्ये गुंफले जाणार आहोत.ती विद्यार्थ्यांची स्पर्धा असते, ही आत्मिक स्पर्धा आहे.ती धावण्याची स्पर्धा तुम्ही करू शकत नाही.ही आत्म्यांची गोष्ट आहे.आत्मा वृद्ध जवान किंवा लहान-मोठी होत नाही.आत्मा तर एकच आहे.आत्म्यालाच आपल्या पित्याची आठवण करायची आहे.यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत.जरी

अभ्यासामध्ये ढिले झाले परंतु यामध्ये काहीच कष्ट नाहीत.सर्व आत्मे भाऊ बहीण आहेत.त्या स्पर्धेमध्ये जवान पळू शकतील.येथे ती गोष्ट नाही. तुम्हा मुलांची स्पर्धा,रुद्र माळेमध्ये येण्याची आहे.बुद्धीमध्ये आहे,आम्हा आत्म्याचे झाड आहे.ती शिवबाबांची सर्व मनुष्यमात्राची माळ आहे.असे नाही की फक्त,१०८ किंवा १६१०८ ची माळ आहे,नाही.जे पण मनुष्य मात्र आहेत,सर्वांची माळ आहे.मुलं समजतात,क्रमानुसार प्रत्येक जण आपापल्या धर्मामध्ये जाऊन विराजमान होतील,जे परत कल्प कल्प त्याच जागेवर येतील.हे पण आश्चर्य आहे.दूनिया या गोष्टीला जाणत नाही,तुमच्यामध्ये पण जे विशाल बुद्धी आहेत,ते यागोष्टीला समजू शकतात.मुलांच्या बुद्धीमध्ये हाच विचार राहायला पाहिजे की, सर्वांना रस्ता कसा दाखवायचा?ही विष्णूची माळ आहे.सुरुवातीपासून सिजरा सुरू होतो,पाने फांद्या सर्व आहेत ना.तेथे पण छोटे-छोटे आत्मे राहतात.येथे मनुष्य आहेत,परत सर्व आत्मे आपल्या जागेवरती बिनचूक जाऊन राहतील.या आश्चर्यकारक गोष्टी आहेत.मनुष्य दुनियातील आठ आश्चर्य पाहतात परंतु ते काहीच नाहीत,हे खूप आश्चर्य आहे,जे सर्वांचे सद्गती दाता परमपिता परमात्मा येऊन शिकवतात.कृष्णाला सर्वांचे सद्गती दाता थोडेच म्हणनार.तुम्हाला या ज्ञानाच्या गोष्टी धारण करायच्या आहेत.मुख्य गोष्ट हीच आहे की, गीतेचे भगवान कोण आहेत? यावरती तुम्ही जिंकलात तर, बस. गीता सर्व शास्त्रमई शिरोमणी भगवंतांनी गायन केलेली आहे.प्रथम तर हे प्रयत्न करायचे आहेत. आजकाल तर खूप भपका पाहिजे. ज्या दुकानांमध्ये खूप भपका असतो, तेथे मनुष्य खरेदीसाठी जातात.ते समजतात येथे चांगल्या वस्तू असतील.मुलं घाबरतात इतके मोठे सेवा केंद्र उघडले तर,लाख-दोन लाख द्यावे लागतील,तेव्हा मनपसंद इमारत बनेल.एकच मोठे दुकान म्हणजे सेवा केंद्र पाहिजे.मोठी दुकानं मोठ्या मोठ्या शहरांमध्येच असतात. तुमचे सर्वात मोठे दुकान राजधानीमध्ये पाहिजे.मुलांना विचार सागर मंथन करायला पाहिजे की, सेवेची वृद्ध कशी होईल?मोठे सेवा केंद्र उघडले तर मोठे-मोठे मनुष्य येतील.मोठ्या मनुष्याचा आवाज लगेच पसरतो.प्रथम तर हे प्रयत्न करायला पाहिजेत.सेवेसाठी मोठ्यात मोठे सेवास्थान अशा जागेवर बनवायला पाहिजे,जेणेकरुन मोठे-मोठे मनुष्य येउन आश्चर्य खातील,परत तेथे समजवणारे पण हुशार पाहिजेत.कोणी एक पण साधारण ब्रह्मकुमार-कुमारी समजवतात तर,कदाचित ते समजतील येथे सर्व जण असेच आहेत, म्हणून दुकानावरती विक्रेता पण चांगला हुशार,समजदार पाहिजे.हा पण धंदा आहे ना.बाबा म्हणतात,हिम्मत मुलांची मदत बाबांची.ते विनाशी धन तर काही कामाला येणार नाही.आम्हाला तर आपली अविनाशी कमाई करायची आहे,यामध्ये अनेकांचे कल्याण होईल.जसे ब्रह्माने केले परत कोणी उपाशी थोडेच मरतात.तुम्ही पण भोजन खातात,हे पण खातात.येथे जे भोजन मिळते,ते दुसरीकडे मिळत नाही.हे सर्व काही मुलांचेच आहे ना. मुलांना आपली राजाई स्थापन करायची आहे.यामध्ये खूप मोठी विशाल बुद्धी पाहिजे.राजधानी मध्ये नांव निघाले तर सर्वजण समजतील.ते म्हणतील,बरोबर हे सत्यच सांगतात.विश्वाचे मालक तर भगवानच बनवतील.मनुष्य मनुष्याला विश्वाचे मालक थोडेच बनवतील. बाबा सेवेच्या वृद्धीसाठी मत देत राहतात.सेवेची वृद्धि तेव्हाच होईल जेव्हा मुलं उदार बनून सेवा करतील. जे पण कार्य करा,ते मनापासून करा. कोणतेही शुभकार्य स्वतःहून करणे खूप चांगले आहे.असे म्हटले जाते स्वतःहून करतील ते देवता आहेत, सांगितल्यानंतर करतील ते मनुष्य, सांगून पण करत नाही ते. बाबा तर दाता आहेत.बाबा थोडेच कोणाला म्हणतील हे करा,या कार्यामध्ये इतके लावा,नाही.बाबांनी समजवले आहे, मोठ्या मोठ्या राजाचा हात बंद राहत नाही म्हणजे राजे हमेशा दाता असतात.बाबा मत देतात काय काय सेवा करायला पाहिजे. खबरदारी पण खूप पाहिजे.मायेला जिंकायचे आहे.पद पण खूप उच्च आहे,शेवटी परिणाम दिसून येईल,परत जे जास्त गुणांने पास होतील त्यांना खुशी पण राहील.अंत काळामध्ये सर्वांना साक्षात्कार होतो परंतु त्या वेळेत काय करू शकणार? भाग्यामध्ये जे आहे तेच मिळेल. पुरुषार्थाची गोष्ट वेगळी आहे.बाबा समजवतात,मुलांनो विशाल बुद्धि बना.आता तुम्ही धर्मात्मा बनत आहात.दुनिये मध्ये धर्मात्मा,तर अनेक होऊन गेले आहेत.अनेकांचे नाव प्रसिध्द होते.अमका खुप धर्मात्मा होता.काही काही तर पैसे जमा करून अचानक मरतात,परत त्याचे न्यास(ट्रस्ट) बनवतात.कोणाचा मुलगा नालायक असेल तर,विश्वस्थ (ट्रस्टी) बनवतात.यावेळेत तर ही पापाची दुनिया आहे.मोठ्या मोठ्या गुरू इत्यादीना दान करतात.जसे काश्मीरचे महाराजा होते,ते आर्यसमाजींना सर्व काही देऊन गेले, त्यांचा धर्म वृध्दी करण्यासाठी.आता तुम्हाला काय करायचे आहे? कोणत्या धर्माची वृध्दी करायची आहे.आदी सनातन देवी देवता धर्मच आहे.हे कोणालाही माहिती नाही. आता तुम्ही परत त्याची स्थापना करत आहात,ब्रह्माद्वारा स्थापना. आता तुम्हा मुलांना एकाच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.तुम्ही आठवणीच्या शक्तीद्वारे साऱ्या सृष्टीला पवित्र बनवतात कारण तुमच्यासाठी पवित्र सृष्टी पाहिजे.या दुनियेला आग लागल्यामुळे पवित्र बनते.खराब गोष्टी अग्नीमध्ये पवित्र बनतात.यामध्ये सर्व अपवित्र वस्तू पडून परत चांगल्या होऊन निघतील. तुम्ही जाणता ही खूप छी-छी तमोप्रधान दुनिया आहे, परतसतोप्रधान होणार आहे.हा ज्ञान यज्ञ आहे ना.तुम्ही ब्राह्मण आहात.हे पण तुम्ही जाणतात,ग्रंथांमध्ये तर अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.यज्ञाचे नाव दक्ष प्रजापिता ठेवले आहे परत रुद्र ज्ञान यज्ञ कोठे गेले?यासाठी पण अनेक कहाण्या बसून लिहिल्या आहेत.यज्ञाचे कायदेशीर वर्णन नाही. बाबा येऊन सर्वकाही समजावतात. आता तुम्हा मुलांनी ज्ञान यज्ञ श्रीमताद्वारे स्थापन केला आहे.हा ज्ञान यज्ञ आहे आणि परत विद्यालय पण होते.ज्ञान आणि यज्ञ दोन्ही अक्षर वेगवेगळे आहेत.यज्ञामध्ये आहुती द्यायची आहे.ज्ञानसागर बाबाच यज्ञ स्थापन करतात.हा खूप मोठा यज्ञ आहे,ज्यामध्ये सर्व जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. तर मुलांना सेवेचे नियोजन करायचे आहे.खुशाल गावांमध्ये जाऊन सेवा करा.तुम्हाला अनेक जण म्हणतात, गरिबासाठी हे ज्ञान द्यायला पाहिजे,फक्त मत देत राहतात.स्वतः काहीच काम करत नाहीत,सेवा करत नाहीत फक्त मत देतात की,अशाप्रकारे करा.खूप चांगले आहे परंतु आम्हाला वेळ नाही. ज्ञान तर खूप चांगले आहे सर्वांना हे ज्ञान मिळायला पाहिजे. स्वतःला मोठे मनुष्य, तुम्हाला लहान मनुष्य समजतात.तुम्हाला खूप खबरदार राहायचे आहे.त्या शिक्षणासोबत हे ज्ञान योगाचे शिक्षण पण मिळत राहील.शिक्षणाद्वारे बोलण्याची अक्कल येते.चलन पण चांगली पाहिजे.अशिक्षित असतील,तर कोणत्या मनुष्याशी कसे बोलायला पाहिजे,याची अक्कल येत नाही.मोठ्या मनुष्याला नेहमी आपण-आपण अशा गोष्टी करायला पाहिजेत.काही काही तर असे आहेत जे पतिला पण तुम्ही तुम्ही म्हणत राहतात.आपण अक्षर श्रेष्ठ आहे. मोठ्या मनुष्याला आपण करा,असे म्हणणार.तर बाबा प्रथम मत देतात,की दिल्ली जी परिस्थान होती, तिला परत परिस्थान बनवायचे आहे. तर दिल्लीमध्ये सर्वांना संदेश द्यायला पाहिजे.जाहीरात खूप चांगली करायची आहे.ज्ञानाचे विषय पण सांगत राहतात,विषयाची यादी बनवा आणि परत सविस्तर लिहा. विश्वामध्ये शांती कशी स्थापन होईल,हे येऊन समजून घ्या.२१ जन्मासाठी निरोगी कसे बनू शकतात,येवून समजून घ्या.अशा खुशी च्या गोष्टी लिहल्या पाहिजेत. २१ जन्मासाठी निरोगी दुहेरी मुकुटधारी येऊन बना.सतयुगी अक्षर तर सर्वांमध्ये लिहा.सुंदर सुंदर अक्षर असतील तर मनुष्य पाहून खूश होतील.घरांमध्ये पण असे चित्र इत्यादी लागले पाहिजेत.आपला धंदा खुशाल करत रहा,त्यासोबत सेवा पण करत रहा.धंद्या मध्ये सर्व दिवस थोडेच करावे लागते.फक्त देखभाल करायची आहे,बाकी काम तर सहाय्यक व्यवस्थापक करतात.काही शेठ लोक खूप उदार मनाचे असतात, ते मुनीमला चांगला पगार देऊन गादीवर बसवतात.ही तर बेहद्दची सेवा आहे,बाकी सर्व हद्दची सेवा आहे.या बेहद्द च्या सेवेमध्ये खूप विशाल बुद्धी असायला पाहिजे. आम्ही विश्वा वरती विजय मिळवतो. काळा वरती पण आम्ही विजय मिळतो,अमर बनतो.अशा गोष्टी लिहायला पाहिजेत,आणि परत समजून घेण्यासाठी प्रयत्न करतील. अमरलोकचे मालक तुम्ही कसे बनू शकता,ते येऊन समजून घ्या.अनेक विषय निघू शकतात.तुम्ही कोणालाही विश्वाचे मालक बनवू शकता.तेथे दुःखाचे नाव रूप नसते. तर मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे.बाबा आम्हाला परत,खूप श्रेष्ठ बनवण्यासाठी आले आहेत.मुलं जाणतात,जुन्या सृष्टी पासून नवीन बनणार आहे.विनाश समोर उभा आहे.तुम्ही पाहता लढाई लागत राहते.मोठी लढाई लागली तर खेळ खलास होईल.तुम्ही तर चांगल्या रीतीने जाणतात,बाबा खूप प्रेमाने म्हणतात, गोड मुलांनो विश्वाची बादशाही तुमच्यासाठी आहे.तुम्ही विश्वाचे मालक होते,भारतामध्ये तुम्ही खूप सुख पाहिले आहे.तेथे रावण राज्यच नसते,तर खूप खुश राहायला पाहिजे.मुलांना अआपसा मध्ये भेटून विचार करायला पाहिजे. पेपर मध्ये पण ज्ञानाच्या गोष्टी द्यायला पाहिजेत. दिल्लीमध्ये विमानाद्वारे पत्रक द्या. निमंत्रण देतात,तर खर्च थोडाफार होतो.मोठे अधिकारी समजतील,तर मोफत पण करू शकतात.बाबा मत देतात,जसे कलकत्ता आहे, चौरंगी मध्ये मोठे,चांगले दुकान हवे,तर गिऱ्हाईक खुप येतील.चेन्नई,मुंबई या सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठे दुकान हवे.बाबा व्यापारी पण आहेत ना.तुमच्या पासून पाई पैसे घेऊन,त्या मोबदल्यात खूप देतात, म्हणून दयावान म्हटले जाते.कवडी पासून हिऱ्या सारखे बनवणारे, मनुष्याला देवता बनवणारे आहेत.महिमा तर एका बाबांची आहे. बाबा नसते तर तुमची काहीच महिमा झाली नसती.तुम्हा मुलांना नशा राहायला पाहिजे कि,भगवान स्वतः आम्हाला शिकवत आहेत.मुख्य उद्देश नगरपासून नारायण बनणे समोर आहे.प्रथम ज्यांनी अव्यभिचारी भक्ती सुरू केली,तेच येऊन उच्चपद घेण्याचा पुरुषार्थ करतील.बाबा खूप चांगले चांगले मुद्दे समजवतात.तरीही मुलं विसरून जातात,तेव्हा बाबा म्हणतात,ज्ञानाच्या गोष्टी लिहून घ्या त्यामधून विषय काढा.डॉक्टर लोकं पण पुस्तकं वाचत राहतात. तुम्ही मास्टर आत्मिक सर्जन आहात. तुम्हाला इंजेक्शन कसे लावायचे हे शिकवतात.हे ज्ञानाचे इंजेक्शन आहे. यामध्ये सुई इत्यादीची तर कोणतीच गोष्ट नाही.बाबा अविनाश सजन आहेत,आत्म्यांना येऊन शिकवतात. आत्माच अपवित्र बनली आहे.हे तर खूप सोपे आहे,बाबा आम्हाला विश्वा चे मालक बनवतात,त्यांची आम्ही आठवण करू शकत नाही.मायेचा खूप विरोध आहे म्हणून बाबा म्हणतात दिनचर्या लिहा आणि सेवेसाठी विचार सागर मंथन करा,तर खूप खुशी राहील. किती पण चांगली मुरली चालवतात परंतु योग नाही.बाबां सोबत खरे राहणे खूप कठीण आहे.जर समजतात,आम्ही खूप हुशार आहोत,तर बाबांची आठवण करून दिनचर्या लिहून पाठवा,तर बाबा समजतील किती खरे आहे आणि किती खोटे आहे.अच्छा मुलांना समजले आहे, अविनाश रत्नांचे विक्रेता बनायचे आहे,अच्छा.

गोड-गोड,फार-फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मुख्य उद्देश समोर ठेवून आत्मिक नशेमध्ये राहायचे आहे.मास्टर आत्मिक सर्जन बनून सर्वांना ज्ञान इंजेक्शन द्यायचे आहे.सेवेच्या सोबतच आठवण किती केली हे लिहायचे आहे,तर खुशी राहील.

(२) दुसऱ्यां सोबत गोष्टी करण्यासाठी चांगली वागणुक पाहिजे. आपण आपण म्हणून गोष्टी करायच्या आहेत.प्रत्येक कार्य उदार बनून करायचे आहे.

वरदान:-
स्व कल्याणाच्या प्रत्यक्ष प्रमाण द्वारे विश्वकल्याणाच्या सेवेमध्ये नेहमी सफलता मुर्त भव.

जसे आजकाल शारीरिक रोग हृदयविकाराचे, प्रमाण जास्त आहे, तसेच अध्यात्मिक प्रगतीमध्ये दिलशिकस्त बनण्याचा रोग जास्त आहे.अशा दिलशिकस्त आत्म्यांमध्ये प्रत्यक्ष परिवर्तन पाहिल्यामुळे हिम्मत किंवा शक्ती येऊ शकते.ऐकले खुप आहे,आता परिवर्तन पाहू इच्छितात, प्रमाण द्वारा परिवर्तन पाहू इच्छितात. तर विश्वकल्याणासाठी स्व कल्याण, प्रथम उदाहरण रूपामध्ये दाखवा. विश्वकल्याणाच्या सेवेमध्ये सफलता मूर्त बनण्याचे साधन आहेच प्रत्यक्ष प्रमाण.याद्वारेच बाबांची प्रत्यक्षता होईल.जे बोलतात ते आपल्या स्वरूपा द्वारे प्रत्यक्षात दिसून येईल, तेव्हाच मानतील.

बोधवाक्य:-
दुसऱ्यांच्या विचाराला आपल्या विचाराशी मिळवून घेणे हेच आदर देणे आहे.