01-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला राजयोगाच्या शिक्षणाद्वारे आपली कर्मातीत अवस्था बनवायची आहे,त्यासोबत पतितापासून पावन बनण्याचा मार्ग पण दाखवायचा आहे,आत्मिक सेवा करायची आहे"

प्रश्न:-
कोणता मंत्र आठवणीत ठेवा तर,पाप करण्यापासून सुरक्षित राहाल?

उत्तर:-
बाबांनी मंत्र दिला आहे,वाईट ऐकू नका,वाईट पाहू नका,वाईट बोलू नका,हाच मंत्र आठवणी मध्ये ठेवा. तुम्हाला आपल्या कर्मेंद्रिया द्वारे कोणतेही पाप करायचे नाही. सर्वांकडून पापकर्मच होतात म्हणून बाबा युक्ती सांगतात,पवित्रतेचा गुण धारण करा.क्रमांक एकचा गुण पवित्रता आहे.
 

ओम शांती।
मुलं कोणाच्या समोर बसले आहात? बुद्धीमध्ये चालत असेल,आम्ही पतितपावन,सर्वांचे सद्गती दाता,आपल्या बेहद्द पित्याच्या समोर बसले आहात.जरी ब्रह्माच्या तनामध्ये आहेत,तरीही त्यांचीच आठवण करायची आहे.मनुष्य काही सर्वांचे सद्गती करू शकत नाहीत. मनुष्यांना पतितपावन पण म्हटले जात नाही.मुलांनी स्वतःला आत्मा समजायचे आहे.आम्हा सर्व आत्म्यांचे पिता ते आहेत.ते पिता आम्हाला स्वर्गाचे मालक बनवत आहेत. मुलांनी जाणायला पाहिजे आणि परत खुशी पण व्हायला पाहिजे.हे पण मुलं जाणतात,आम्हाला नर्कवासी पासून स्वर्गवासी बनायचे आहे.हा मार्ग खूप सहज मिळाला आहे.स्वतःला तपासायचे आहे. नारदा चे उदाहरण आहे ना.हे सर्व उदाहरणं, ज्ञानसागर बाबांनी दिले आहेत.जे पण संन्यासी इत्यादी उदाहरण देतात,हे सर्व बाबांनी दिलेले आहेत.भक्तिमार्गा मध्ये फक्त गायन करतात.कासवाचे,सापाचे,भ्रमरीचे उदाहरण देतात परंतु स्वता: काहीच करू शकत नाहीत.बाबांनी दिलेले उदाहरण भक्ती मार्गात,परत त्याची पुर्नावृत्ती करत राहतात.भक्ती मार्ग भुतकाळातील आहे.या वेळेत जे काही प्रत्यक्षात होते,त्याचे परत गायन होते.जरी देवतांचा जन्मदिवस,भगवंताचा जन्मदिवस साजरा करतात,परंतू जाणत काहीच नाहीत.आता तुम्ही समजत जातात. बाबा पासून ज्ञान घेऊन पावन पण बनायचे आहे आणि पतितांना पावन बनण्याचा मार्गपण दाखवायचा आहे.ही तुमचे मुख्य आत्मिक सेवा आहे.प्रथम कोणालाही आत्म्याचे ज्ञान द्यायचे आहे.तुम्ही आत्मा आहात.आत्म्याचे ज्ञान कोणालाही नाही.आत्मा अविनाशी आहे.जेव्हा वेळ येते,तेव्हा आत्मा शरीरांमध्ये येऊन प्रवेश करते.तर स्वतःला सारखे-सारखे आत्मा समजायचे आहे.आम्हा आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा आहेत,परम शिक्षक पण आहेत.हे पण नेहमी मुलांनी आठवणीत ठेवायला पाहिजे, हे विसरायचे नाही.तुम्ही जाणतात आता परत घरी जायचे आहे.विनाश समोर उभा आहे.सतयुगामध्ये दैवी परिवार खूप लहान असतो. कलियुगामध्ये तर असंख्य मनुष्य आहेत.अनेक धर्म,अनेक मतं आहेत. सतयुगामध्ये असे काही होत नाही.मुलांना सर्व दिवस बुद्धीमध्ये या गोष्टी ठेवायच्या आहेत.हे शिक्षण आहे ना.त्या शिक्षणामध्ये खूप पुस्तकं इत्यादी असतात.प्रत्येक वर्गामध्ये नवीन नवीन पुस्तक खरेदी करावे लागतात.येथे कोणत्याही पुस्तक किंवा ग्रंथाची गोष्टच नाही. यामध्ये एकच गोष्ट आहे,एकच शिक्षण आहे.येथे जेव्हा इंग्रजांचे शासन होते,राजांचे राज्य होते, तर राजा-राणी शिवाय दुसऱ्या कोणाचे फोटो छापत नव्हते.आजकाल तर पहा,जे भक्त इ.होऊन गेले आहेत त्यांचे पण पोस्टाचे तिकीट छापत राहतात.या लक्ष्मी-नारायणचे राज्य असेल तर चित्र पण महाराज महाराणीचे चित्र असेल.असे पण नाही जे भूतकाळात देवता होऊन गेले आहेत,त्यांचे चित्र नष्ट झाले आहेत,नाही.प्राचीन चित्र खूप प्रेमाने पाहतात,शिवबाबांच्या नंतर देवता आहेत.या सर्व गोष्टी तुम्ही मुलं धारण करतात,दुसऱ्यंना मार्ग दाखवण्यासाठी.हे अगदी नवीन शिक्षण आहे.तुम्हीच ऐकले होते आणि पद मिळवले होते,दुसरे कोणी जाणत नाहीत.महाभारत लढाई पण प्रसिद्ध आहे.काय होईल,तुम्ही पुढे जाऊन पाहाल.कोणी काय करतात, कोणी काय म्हणतात,दिवसें-दिवस मनुष्याला हे ज्ञात होत जाईल.असे पण म्हणतात वैश्विक युद्ध लागेल, त्यापूर्वी तुम्हा मुलांना आपल्या शिक्षणाद्वारे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे.बाकी आसूर आणि देवतांची लढाई लागत नाही. तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात,परत दैवी संप्रदाय बनाल म्हणून या जन्मा मध्ये दैवी गुण धारण करायचे आहेत. पवित्रतेचा क्रमांक एकचा दैवी गुण आहे.तुम्ही या शरीराद्वारे खूप पाप करत आले आहात.आत्म्यालाच पाप आत्मा म्हटले जाते.आत्मा या कर्मेंद्रिया द्वारे खूप पाप करत राहते. आता वाईट ऐकायचे नाही,वाईट बोलायचे नाही.असे म्हटले जाते आत्माच कानाद्वारे ऐकते.बाबांनी तुम्हा मुलांना स्मृती दिली आहे की,तुम्हीच देवता धर्माचे होते,परत तुम्हीच चक्र लावून आले आहात,परत तसे बनायचे आहे.ही गोड स्मृति आल्यामुळेच पवित्र बनण्यासाठी हिम्मत येते.तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही, कशाप्रकारे ८४ जन्माची भूमिका वठवली.प्रथम आम्ही असे श्रेष्ठ होतो.ही एक कहाणी आहे ना. बुद्धीमध्ये यायला पाहिजे,पाच हजार वर्षांपूर्वी आम्हीच देवता होतो.आम्ही आत्मा मुळवतन मध्ये राहणारे आहोत.यापुर्वी थोडा पण विचार नव्हता,आम्हा आत्म्यांचे ते घर आहे. तेथून आम्ही भूमिका वठवण्यासाठी येतो.आम्ही सूर्यवंशी चंद्रवंशी इत्यादी बनतो.आता तुम्ही ब्रह्माची संतान ब्राह्मण आहात.ईश्वर सन्मुख तुम्हाला ज्ञान देत आहेत.हे सर्वोच्च पिता,सर्वाच्च शिक्षक,सर्वोच्च गुरु आहेत.आम्ही त्यांच्या मतानुसार,सर्व मनुष्यांना श्रेष्ठ बनवत आहोत.मुक्ती- जीवनमुक्ती दोन्ही श्रेष्ट आहेत.आम्ही आपल्या घरी जाऊ,परत पवित्र आत्मा येऊन राज्य करतील.हे चक्र आहे ना,याला स्वदर्शन चक्र म्हटले जाते.या ज्ञानाच्या गोष्टी आहेत.बाबा म्हणतात तुमचे हे स्वदर्शन चक्र बुध्दी मध्ये सतत फिरायला पाहिजे.हे फिरत राहिल्यामुळेच विकर्म विनाश होतील.तुम्ही रावणावर विजय मिळवाल.पाप नष्ट होतील.आता आठवण करण्यासाठी स्मृति आली आहे.असे पण नाही,माळ जपत राहायची आहे.आत्म्यामध्ये ज्ञान आहे,जे तुम्हा मुलांना इतर भाऊ-बहिणीला पण द्यायचे आहे.मुलंच मदतगार बनतील ना. तुम्हा मुलांनाच स्वदर्शन चक्रधारी बनवतो. हे ज्ञान माझ्यामध्ये आहे म्हणून मला ज्ञानाचे सागर,मनुष्य सृष्टीचे बीजरूप म्हणतात.त्यांना बागवान पण म्हटले जाते. देवी-देवता धर्माचे बीज बाबांनीच लावले आहे.आता तुम्ही देवी-देवता बनत आहात.हे सर्व दिवस आठवणीत राहिले तर तुमचे खूप कल्याण होईल.दैवी गुणांची धारणा पण करायची आहे,त्यासोबत पवित्र पण बनवायचे आहे .स्त्री-पुरुष दोघेही एकत्र रहात पवित्र बनायचे आहे.असा दुसरा धर्म होत नाही. निवृत्तीमार्गा मध्ये तर फक्त पुरुष पवित्र बनतात.असे म्हणतात स्त्री पुरुष दोघे एकत्र राहून पवित्र राहू शकत नाहीत, खूप कठीण आहे. सतयुगा मध्ये तर पवित्र होते ना. लक्ष्मीनारायणची महिमा पण गायन करतात.

आता तुम्ही जाणतात,बाबा आम्हाला शूद्रा पासून ब्राह्मण बनवून परत देवता बनवतात.आम्हीच पुजारी पासून पुज्य बनू,परत जेव्हा वाममार्गा मध्ये जाल तर,शिवाचे मंदिर बनवून पूजा कराल.तुम्हा मुलांना आपल्या ८४ जन्माचे ज्ञान आहे.बाबा म्हणतात,तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाहीत,मीच सांगतो. असे दुसरे कोणी मनुष्य म्हणू शकत नाही.तुम्हाला आता बाबा स्वदर्शन चक्रधारी बनवतात.तुम्ही आत्मा पवित्र बनत आहात.शरीर तर येथे पवित्र मिळू शकत नाही.आत्मा पवित्र बनते,परत अपवित्र शरीराला सोडावे लागते.सर्व आत्म्यांना पवित्र होऊन जायचे आहे.पवित्र दुनियेची स्थापना होत आहे,बाकी सर्व गोड घरांमध्ये जातील.हे आठवणीत ठेवायला पाहिजे.बाबाच्या आठवणी सोबत घराची पण आठवण जरूर पाहिजे कारण आता घरी जायचे आहे.घरामध्येच बाबाची आठवण करायची आहे.परमधाम घरामध्येच आठवण करायची आहे.जरी तुम्ही जाणतात,बाबा या तनामध्ये येऊन आम्हाला ऐकवत आहेत परंतु बुध्दी परमधाम गोड घरांमधून निघायला नको.शिक्षक तुम्हाला शिकवण्यासाठी,घर सोडून येतात. बाबा शिकवून परत खूप दूर चालले जातात.सेकंदांमध्ये कुठे पण जाऊ शकतात.आत्मा खूप छोटी बिंदी आहे,आश्चर्य वाटायला पाहिजे. बाबांनी आत्म्याचे ज्ञान दिले आहे.हे तुम्ही जाणतात,स्वर्गामध्ये कोणतीही खराब गोष्ट नसते,ज्यामुळे हात-पाय कपडे इत्यादी खराब होतील.देवतांचे वस्त्रे खूप सुंदर असतात.चांगल्या प्रकारचे कपडे असतात,त्याला धुण्याची पण आवश्यकता नाही. यांना पाहून खूप खुशी व्हायला पाहिजे.आत्मा जाणते भविष्य २१ जन्म,आम्ही असे बनू,बस पाहत राहायला पाहिजे.हे चित्र सर्वा जवळ असायला पाहिजे.खूप खुशी राहायला पाहिजे.आम्हाला बाबा असे श्रेष्ठ बनवत आहेत.अशा बाबांची आम्ही मुलं,परत का रडतो?आम्हाला कोणती काळजी असायला नको. देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन महिमा करतात,तुम्ही सर्वगुणसंपन्न,अचतम केशवम इत्यादी अनेक नावांनी बोलवत राहतात.या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये लिहिल्या आहेत,ज्या आठवण करतात.ग्रंथ कोणी लिहिले, व्यास ने, किंवा कोणी नवीन पण बनवत राहतात.ग्रंथ आगोदर खूप लहान होते,हाताने लिहिलेले होते. आता तर खूप मोठे बनवले आहेत. जरूर त्याच्यात अधिक लिहिले असेल.आता गुरुनानक तर येतात,धर्माची स्थापना करण्यासाठी. ज्ञान देणारे तर एकच आहेत.ख्रिस्त पण फक्त धर्माची स्थापना करण्यासाठी येतात.जेव्हा सर्व येतात, तेव्हा तर घरी जातील.घरी पाठवणारे कोण? काय ख्रिस्त,नाही.ते तर वेगवेगळ्या रूपांमध्ये तमोप्रधान अवस्थेमध्ये आहेत.सतो रजो तमो मध्ये येतात ना.यावेळेत सर्वच तमोप्रधान आहेत.सर्वांची जडजडीभूत अवस्था आहे ना.पुनर्जन्म घेत घेत,यावेळेत सर्व धर्माचे तमोप्रधान बनले आहेत. आता सर्वांना परत जायचे आहे,परत चक्र फिरायला पाहिजे.प्रथम नवीन धर्म पाहिजे,जो सतयुगामध्ये होता. बाबा आदी सनातन धर्माची स्थापना करतात,परत विनाश पण होतो. स्थापना विनाश आणि पालना होते. सतयुगा मध्ये एकच धर्म असेल.हे स्मृतीमध्ये येते ना.सर्व चक्र स्मृती मध्ये यायला पाहिजे.आता आम्ही ८४चे चक्र पूर्ण करून,परत घरी जाऊ.तुम्ही चालता बोलता स्वदर्शन चक्रधारी आहात.ते परत म्हणतात, कृष्णाला स्वदर्शन चक्र होते,ज्याद्वारे सर्वांना मारले.अकासूर बकासुर इत्यादी असुरांचे चित्र दाखवले आहेत,परंतु अशी कोणती गोष्ट नाही. तुम्हा मुलांना आता स्वदर्शन चक्रधारी बनून राहायचे आहे कारण स्वदर्शन चक्रा द्वारे तुमचे पाप नष्ट होतात, आसूरीपणा नष्ट होतो. देवता आणि आसुराची लढाई होऊ शकत नाही.आसुर कलियुगामध्ये,तर देवता सतयुगामध्ये असतात,त्यामध्ये संगमयुग आहे.हे ग्रंथ भक्तिमार्गाचे आहेत,त्यामध्ये ज्ञानाचे नाव लक्षणं नाहीत.ज्ञानसागर एक बाबाच सर्वांसाठी आहेत.बाबां शिवाय कोणतीही आत्मा,पवित्र बनून परत जाऊ शकत नाही.भूमिका तर जरूर वठवायची आहे.तर आता आपल्या ८४ च्या चक्राची पण आठवण करायची आहे.आम्ही आता सतयुगी नवीन जन्ममध्ये जात आहोत.असा जन्म परत कधी मिळत नाही. शिवबाबा,त्यांच्यानंतर ब्रह्माबाबा आहेत. लौकिक पारलौकिक आणि हे अलौकिक बाबा आहेत.या वेळेतील गोष्टी आहेत.यांनाच अलौकिक म्हटले जाते.तुम्ही मुलं त्या शिवबाबांची आठवण करतात,ब्रह्माची नाही.जरी ब्रह्माच्या मंदिरामध्ये जाऊन पुजा करतात,ते पण तेव्हाच पूजा करतात जेव्हा,सूक्ष्मतनमध्ये संपुर्ण अव्यक्त मुर्त आहेत.हे शरीरधारी तर पूजा साठी लायक नाहीत.ते तर मनुष्य आहेत ना.मनुष्याची पूजा होत नाही. ब्रह्माला दाढी दाखवतात,त्यामुळे माहिती होते,हे येथील आहेत. देवतांना दाढी नसते,या सर्व गोष्टी मुलांना समजावल्या आहेत. तुमचे नाव प्रसिद्ध आहे म्हणून तुमचे मंदिर पण बनलेले आहेत.सोमनाथ मंदिर खूप उच्च ते उच्च आहे. सोमरस दिला होता ना,परत काय झाले? येथे दिलवाडा मंदिर आहे,ते मंदिर हुबेहूब यादगार बनलेले आहे. खाली तुम्ही तपस्या करत आहात, वरती स्वर्ग आहे.त्यामुळे मनुष्य समजतात,स्वर्ग कुठे वरती असेल. मंदिरामध्ये खाली स्वर्ग कसा दाखवतील?तर वरती छता मध्ये दाखवला आहे.मंदिर बनवणारे तर काहीच समजत नाहीत.मोठ-मोठे करोडपती आहेत,त्यांना पण समजावयाचे आहे.तुम्हाला आत्ता ज्ञान मिळाले आहे,तर तुम्ही अनेकांना देऊ शकतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मनातून असुरी पणाला समाप्त करण्यासाठी चालता-फिरता, स्वदर्शन चक्रधारी बनून राहायचे आहे.सर्व चक्र स्मृतीमध्ये आणायचे आहे.

(२) बाबाच्या आठवणी सोबतच बुद्धी परमधाम घरांमध्ये पण लावायची आहे.बाबांनी ज्या स्मृति दिल्या आहेत,त्यांची आठवण करून आपले कल्याण करायचे आहे.

वरदान:-
संपूर्ण आहुती द्वारा परिवर्तन उत्सव साजरे करणारे दृढ संकल्पधारी भव.

जशी म्हण आहे,"धरत परीये धर्म न छोडीये( म्हणजे काही झाले तरी आपला स्वर्धम सोडू नका) कोणतीही परिस्थिती येईल,मायेचे महावीर रुप समोर येईल परंतु धारणा सुटायला नकोत.संकल्प द्वारा त्याग केलेल्या बेकार वस्तू,संकल्पा मध्ये पण स्वीकार करु नका.नेहमी आपल्या श्रेष्ठ स्वमान,श्रेष्ठ स्मृती आणि श्रेष्ठ जीवनाच्या समर्थ स्वरूप द्वारा,श्रेष्ठ कलाकार बनून श्रेष्ठतेचा खेळ करत चला.कमजोरी चे सर्व खेळ समाप्त व्हायला पाहिजेत.जेव्हा अशा संपूर्ण आहुतीचा संकल्प, दृढ होईल, तेव्हाच परिवर्तन समारोह म्हणजे उत्सव होईल.या समारोहाची तारीख संघटित रूपामध्ये निश्चित करा.

बोधवाक्य:-
खरा हिरा बनून आपल्या प्रकंपनाची चमक विश्वामध्ये पसरवा.