01-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हाला कर्म, अकर्म, विकर्माचे रहस्य ऐकवण्यासाठी, जेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत तर कर्म अकर्म होतात, पतित झाल्यामुळे विकर्म होतात.

प्रश्न:-
आत्म्यावरती गंज चढण्याचे कारण काय आहे?गंज चढला असेल तर त्याची लक्षणं काय असतील?

उत्तर:-
गंज चढण्याचे कारण विकार आहेत. पतित बनल्यामुळेच गंज चढतो. जर आत्ता पर्यंत गंज चढलेला आहे, तर त्यांना जुन्या दुनियेचे आकर्षण होत राहील. बुध्दी विकाराकडे जात राहील. ते आठवणी मध्ये राहू शकणार नाहीत.

ओम शांती।
मुलांनी याचा अर्थ तर समजला आहे. ओम शांती म्हटल्या मुळे हा निश्चय होतो की, आम्ही येथील रहिवासी नाहीत. आम्ही तर शांतीधामचे रहिवासी आहोत. आमचा स्वधर्म शांत आहे, जेव्हा घरामध्ये राहतो, परत येऊन भूमिका वठवतो, कारण शरीराच्या सोबत कर्म करावे लागतात. कर्म एक चांगले असतात, दुसरे वाईट कर्म असतात. रावणाच्या राज्यामध्ये कर्म खराब होतात. रावण राज्यांमध्ये सर्वांचे कर्म विकर्म बनले आहेत. एक पण मनुष्य नाही, ज्यांच्याद्वारे विकर्म होत नाहीत. मनुष्य तर समजतात साधू-संन्यासी इत्यादी कडून विकर्म होऊ शकत नाहीत, कारण ते पवित्र राहतात, संन्यास केलेला आहे. वास्तव मध्ये पवित्र कोणाला म्हटले जाते, हे बिल्कुल जाणत नाहीत. आम्ही पतित आहोत असे म्हणतात, त्यामुळे पतित पावनला बोलवतात, जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत दुनिया पावन बनू शकत नाही. येथे पतित जुनी दुनिया आहे, त्यामुळे पावन दुनियेची आठवण करतात. पावन दुनियेमध्ये जेव्हा जाल, तेव्हा पतित दुनियाची आठवण करणार नाहीत. ती दुनियाच वेगळी आहे. प्रत्येक गोष्ट नविन, परत जुनी होते. नविन दुनियेत एक पण पतित होऊ शकत नाही. नविन दुनियेचे रचनाकार परमपिता आहेत, तेच पतित पावन आहेत. त्यांची रचना जरूर पावन असायला हवी. पतित पासून पावन, पावन पासून पतित, या गोष्टी कोणाच्या बुध्दीमध्ये बसू शकत नाहीत. कल्प कल्प बाबाच येऊन समजवतात. तुम्हा मुलां मध्येपण काही निश्चय बुध्दी बनून परत संशयबुध्दी बनतात. माया एकदम हप करते. तुम्ही महारथी आहात ना. महारथींनाच भाषणासाठी बोलवतात. महाराजांना पण समजावयाचे आहे. तुम्हीच प्रथम पावन पुज्य होते, आत्ता तर ही पतित दुनिया आहे. पावन दुनिये मध्ये भारतवासीच होते. तुम्ही भारतवासी आदी सनातन देवी देवता धर्माचे दुहेरी ताजधारी, संपुर्ण निर्विकारी होते. महारथींना तर अशाप्रकारे समजावे लागेल. या नशे मध्ये समजावयाला पाहिजे. भगवानुवाच कामचितावर बसल्याने सावळे बनतात. आता जे पण समजवतात, ते काम चितावरती बसू शकत नाहीत परंतु असे पण आहेत दुसऱ्यांना समजावत-समजावत, स्वत:च काम चितावरती बसतात. आज समजवतात, उद्या विकारांमध्ये जातात. माया खूप जबरदस्त आहे, तुम्ही विचारू नका. दुसऱ्यांना समजून सांगणारे स्वतः काम चितावरती बसतात, परत पश्चाताप करतात, हे काय झाले? बॉक्सिंग आहे ना. स्त्रीला पाहिले आणि आकर्षण झाले, काळे तोंड केले. माया खूपच दुष्ट आहे, प्रतिज्ञा करून परत विकारांमध्ये जातात, तर शंभर पटीने दंड मिळतो. ते जसे शुद्रासारखे पतित झाले. असे गायन पण आहे, अमृत पिऊन, परत बाहेर जाऊन दुसऱ्यांना त्रास देत होते, खराब काम करतात. टाळी दोन हाताने वाजते, एका हाताने वाजू शकत नाही. दोन्ही खराब होतात, परत काहीतर समचार देतात, काही तर लाज वाटल्यामुळे समजतात, ब्राह्मण कुळामध्ये नाव बदनाम व्हायला नको. युध्दामध्ये कोणाचा पराजय होतो, तर हाहाकार होतो. अरे इतका मोठा पैलवान पण विकारांमध्ये गेला. असे अनेक अपघात होतात. माया चापट मारते, खूप मोठे लक्ष आहे.

आता तुम्ही मुलं समजतात, जे सतोप्रधान गोरे होते, तेच कामचिता वरती बसल्यामुळे तमोप्रधान बनले आहेत. रामाला पण काळे बनवतात. चित्र तर अनेकांचे काळे बनवतात, परंतु एकाचे उदाहरण दिले जाते. येथेपण रामचंद्राचे काळे चित्र आहे, त्यांना विचारायला पाहिजे, यांना काळे का बनवले आहे? तर ते म्हणतील ही ईश्वराची भावी आहे. हे तर चालत येते. का होते, कसे होते, हे काहीच समजत नाहीत. आत्ता तुम्हाला बाबा समजवतात, काम चितावर बसल्यामुळे पतित दु:खी कवडीतुल्य झाले आहेत. ती निर्विकारी दुनिया आहे आणि ही विकारी दुनिया आहे. तर अशाप्रकारे समजावयाला पाहिजे. हे सूर्यवंशी, हे चंद्रवंशी परत वैश्यवंशी बनायचे आहे. विकारात गेल्यामुळे परत देवता म्हणू शकत नाहीत. जगत नाथच्या मंदिरा मध्ये वरती देवताचे कुळ दाखवतात. वस्त्र देवतांचे आहेत, त्यांचे चित्र खूप खराब दाखवतात. बाबा ज्या गोष्टी वरती लक्ष द्यायला सांगतात, तर ते काळजीपूर्वक करायला पाहिजे. मंदिरांमध्ये खूप सेवा होऊ शकते. श्रीनाथ मंदिरांमध्ये पण तुम्ही समजावू शकता, त्यांना विचारायला पाहिजे, यांना काळे का बनवले आहे? हे समजवणे तर फार चांगले आहे. ते सुवर्ण युग, हे लोहयुग आहे. गंज चढत जातो ना. आता तुमचा गंज उतरत आहे. जे आठवण करत नाहीत, त्यांचा गंज पण उतरत नाही. खूप गंज चढला असेल तर, त्यांना जुन्या दुनियेचे आकर्षण होत राहील. विकारामुळे जास्त गंज चढतो. पतित पण त्याद्वारेच बनतात. स्वतःला तपासायचे आहे माझी बुद्धी विकाराकडे तर जात नाही? चांगली चांगली मुलं पण नापास होतात. आता तुम्हा मुलांना ही समज मिळाली आहे. पवित्रतेची मुख्य गोष्ट आहे. यज्ञाच्या सुरुवातीपासून या गोष्टीवरतीच भांडण होत आले आहे. बाबांनीच ही युक्ती रचली आहे, सर्वजण म्हणत होते, आम्ही ज्ञानामृत पिण्यासाठी जात आहोत. ज्ञानामृत ज्ञानाच्या सागरा जवळच आहे. ग्रंथ इत्यादी वाचल्यामुळे कोणी पतितापासून पावन बनू शकत नाही. पावन बनून परत पावन दुनिये मध्ये जायचे आहे. येथे पावन बनून परत कुठे जाल? लोक समजतात अमक्याला मोक्ष मिळाला. त्यांना काय माहिती, जर मोक्ष मिळाला, परत त्यांचे क्रियाकर्म इत्यादी पण करू शकत नाहीत. येथे ज्योत इत्यादी तेवत ठेवतात, की त्यांना कोणते कष्ट व्हायला नको, अंधारामध्ये ठेच खायला नको. आत्मा तर एक शरीर सोडून दुसरे घेते, एका सेकंदाची गोष्ट आहे, परत अंधार कोठून आला?ही परंपरा चालत येते, तुम्ही पण करत होते, आत्ता काहीच करत नाहीत. तुम्ही जाणतात शरीर तर मातीत मिळते. स्वर्गामध्ये असे रीतीरिवाज नसतात. आज-काल रिद्धी-सिद्धीच्या गोष्टींमध्ये काही ठेवले नाही. समजा कोणाला पंख येतात, उडायला लागतात, परत काय?त्याद्वारे काय फायदा होईल?बाबा तर म्हणतात माझी आठवण करा तर, विकर्म विनाश होतील. ही योग अग्नी आहे, ज्याद्वारे पतितापासून पावन बनतात. योगाद्वारे सदानिरोगी पवित्र, तर ज्ञानाद्वारे संपत्ती व धनवान बनतात. योगीचे नेहमी दीर्घायुष्य असते, भोगीचे अल्प आयुष्य असते. कृष्णाला योगेश्वर म्हणतात. ईश्वराच्या आठवणी द्वारे कृष्ण बनले आहेत, त्यांना स्वर्गामध्ये योगेश्वर म्हणत नाहीत. ते तर राजकुमार आहेत. भूत काळामध्ये असे काम केले आहे, त्यामुळे इतके श्रेष्ठ बनले आहेत. कर्म, अकर्म विकर्माची गती पण बाबांनी समजवली आहे. अर्धाकल्प रामराज्य आहे आणि अर्धाकल्प रावण राज्य आहे. विकारामध्ये जाणे हे सर्वात मोठे पाप आहे. सर्व भाऊ-बहिण आहेत ना. आत्मे सर्व भाऊ-भाऊ आहेत. भगवंताची झाल्यानंतर विकारी कसे बनू शकतो?आम्ही ब्रह्मकुमार-कुमारी विकारांमध्ये जाऊ शकत नाही. या युक्ती द्वारे पवित्र राहू शकतात. तुम्ही जाणता आत्ता रावण राज्य नष्ट होत आहे, परत प्रत्येक आत्मा पवित्र बनते. त्याला म्हटले जाते, घराघरांमध्ये प्रकाश. तुमची ज्योत जागृत झाली आहे, ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. सतयुगा मधे सर्व पवित्र राहतात. हे पण तुम्ही आत्ता समजतात. मुलांमध्ये दुसऱ्याला समजवण्यात क्रमानुसार ताकत राहते, तसेच क्रमानुसार आठवणी मध्ये राहतात. राजधानीची स्थापन कशी होते, हे कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. तुम्हीच सेना आहात ना. तुम्ही जाणतात आठवणीच्या शक्तीद्वारे पवित्र बनून, आम्ही राजाराणी बनत आहोत, परत दुसऱ्या जन्मा मध्ये सोन्याचा चमचा मुखामध्ये असेल. मोठी परीक्षा पास करणाऱ्यांचे पद पण चांगले होते, फर्क तर होतो ना. जितके शिक्षण जास्त, तेवढे जास्त सुख मिळते. येथे तर स्वतः भगवान शिकवत आहेत, हा नशा चढलेला पाहिजे. हा ज्ञानाचा खुराक मिळतो. भगवंता शिवाय भगवान भगवती कोण बनवतील?तुम्ही आता पतितापासून पावन बनत आहात, परत जन्मजन्मातंर साठी सुखी बनाल. श्रेष्ठ पद मिळेल. काही तर ज्ञान घेत-घेत परत खराब बनतात. माया खूपच जबरदस्त आहे. देहाभिमाना मध्ये आल्यामुळे, ज्ञानाचा तिसरा नेत्र बंद होतो. माया खूप जबरदस्त आहे बाबा स्वतः म्हणतात, खूप कष्ट आहेत. मी किती कष्ट करतो, ब्रह्माच्या तनामध्ये येऊन, मी खूप कष्ट करतो. काही तर समजून, परत म्हणतात, असे थोडेच होऊ शकते, शिवबाबा येऊन शिकवतात, आम्ही माणत नाही. ही चालाकी आहे. असे पण बोलत राहतात. राजाई स्थापन तर होणारच आहे. असे म्हणतात खऱ्याची नाव हलते परंतु बुडु शकत नाही. अनेक विघ्नं पडत राहतात. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या डोळ्यातील ताऱ्यांना, शाम पासून सुंदर बनणाऱ्या आत्म्यांप्रती मात-पिता बापदादाचे दिल व जान, सिक व प्रेमा द्वारे, प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) योगाच्या अग्नीद्वारे विकाराचा गंज उतरायचा आहे. स्वतःला तपासायचे आहे, माझी बुद्धी विकाराकडे तर जात नाही ना?

२) निश्चय बुद्धी बनल्यानंतर परत कोणत्याही गोष्टींमध्ये संशय घ्यायचं नाही. विकर्मा पासून सुरक्षित राहण्यासाठी, कोणतेही कर्म आपल्या स्वधर्मा मध्ये स्थिर राहून, बाबांच्या आठवणीमध्ये करायचे आहे.

वरदान:-
सर्व प्राप्तीच्या अनुभवाद्वारे शक्तिशाली बनणारे, नेहमी सफलता मूर्त भव.

जे सर्व प्राप्तीचे अनुभवी मूर्त आहेत, तेच शक्तिशाली आहेत, असे शक्तिशाली सर्व प्राप्तीचे अनुभवी आत्मेच सफलतामूर्त बनू शकतात, कारण आता सर्व आत्मे शोधतील की सुख शांतीचे मास्टर दाता कुठे आहेत?तर जेव्हा तुमच्याजवळ सर्व शक्तींचे भांडार असेल तर, तुम्ही सर्वांना संतुष्ट करू शकता. जसे आज-काल एकाच दुकानामध्ये सर्व गोष्टी मिळतात, असेच तुम्हालापण बनायचे आहे. असे नाही सहनशक्ती आहे, सामना करण्याची शक्ती नाही. सर्व शक्तीचा भांडार पाहिजे, तेव्हाच सफलतामुर्त बनू शकतो.

बोधवाक्य:-
मर्यादाच ब्राह्मण जीवनाचे पाऊल आहे, पाऊलावर पाऊल ठेवणे म्हणजेच लक्षाच्या जवळ पोहोचणे.


मातेश्वरीजीं चे अनमोल महावाक्य:- पुरुषार्थ आणि प्रारब्धचे बनलेले, वैश्विक नाटक.

मातेश्वरी:- पुरुषार्थ आणि प्रारब्ध दोन गोष्टी आहेत, पुरुषार्थ द्वारे प्रारब्ध बनते. हे अनादी सृष्टीचे चक्र फिरत राहते, जे आदी सनातन भारतवासी पुज्य होते, तेच परत पुजारी बनतात, परत तेच पुजारी पुरुषार्थ करून पूज्य बनतात. उतरणे आणि चढणे अनादी वैश्विक नाटकाचा खेळ बनला आहे.

जिज्ञासु:-मातेश्वरी मला प्रश्न येतो की, जेव्हा हे वैश्विक नाटक बनलेले आहे, तर परत वरती चढायचे असेल तर आपोआप चढतील, परत पुरुषार्थ करण्याचा फायदा काय आहे?जे चढतील परत उतरायचे असेल, तर इतका पुरुषार्थ का करायचा? मातेश्वरी:- आपले म्हणणे आहे की, या वैश्विक नाटकाची हुबेहुब पुनरावृत्ती होते, तर काय सर्वशक्तिमान परमात्मा, नेहमी असाच खेळ करून स्वतः थकत नाहीत का? जसे चार ऋतूमध्ये हिवाळा उन्हाळा इत्यादीचा फरक पडतो, तर काय या खेळामध्ये फरक पडत नाही?

मातेश्वरी:- बस हीच तर या वैश्विक नाटकाची युक्ती आहे, जे पुनरावृत्ती होत राहते आणि या वैश्विक नाटकांमध्ये ही पण कला आहे, ज्याची पुनरावृत्ती होत असताना, पण दररोज नवीन वाटते. प्रथम तर आपल्याला हे ज्ञान नव्हते परंतु जेव्हा ज्ञान मिळाले की, जे पण सेकंद सेकंद चालतो, तो कल्प पूर्वीप्रमाणे चालत आहे. जेव्हा त्यांना साक्षी समजून पाहाल तर नित्य नवीन वाटते. आता सुख आणि दुःख दोघांची ओळख मिळाली आहे. जर नापास व्हायचे असेल तर परत शिकायचेच का? मातेश्शवरी:-नाही. भोजन मिळायचे असेल तर आपोआप मिळेल, परत इतके कष्ट करून कमवायची काय आवश्यकता?परत असे पण समजतील. तसे आम्ही पण पाहत आहोत, आत्ताच प्राप्ती करण्याची वेळ आहे. त्याच देवता घराण्याची स्थापना होत आहे, तर का नाही आत्ताच ते सुख मिळवावे. जसे पाहा कोणाची न्यायाधीश होण्याची इच्छा असते, तर जेव्हा पुरुषार्थ करतील तेव्हाच ती पदवी मिळू शकेल ना. जर त्यामध्ये नापास झाले तर कष्ट फुकट जातील परंतु या अविनाशी ज्ञानामध्ये तसे होत नाही. जरा पण या अविनाशी ज्ञानाचा विनाश होत नाही. जरी अशा प्रकारे पुरुषार्थ करुन, दैवी घराण्यामध्ये येणार नाहीत, परंतु जर कमी पुरुषार्थ केला तरी, ते सतयुगी दैवी प्रजामध्ये येऊ शकतात. यासाठी पुरुषार्थ करणे आवश्यक आहे, कारण पुरुषार्था द्वारे प्रारब्ध बनते. पुरुषार्थाचे गायन आहे.

हे ईश्वरी ज्ञान सर्व मनुष्यासाठी आहे:- प्रथम तर एका ज्ञानाच्या मुद्द्याचा विचार आवश्य ठेवायचा आहे. जेव्हा मनुष्य सृष्टीच्या झाडाचे बीज परमात्मा आहेत, तर त्या परमात्मा द्वारे ज्ञान प्राप्त होते, ते सर्व मनुष्यासाठी आवश्यक आहे. सर्व धर्माच्या मनुष्यांना, हे ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. जरी प्रत्येक धर्माचे ज्ञान आप-आपले आहे, प्रत्येकाचे धर्मशास्त्र आप-आपले आहे, प्रत्येकाचे मत आप-आपले आहे, प्रत्येकाचे संस्कार आप-आपले आहेत परंतु हे ज्ञान सर्वांसाठी आहे. जरी ते या ज्ञानाला घेऊ शकले नाहीत, आपल्या घराण्यात येऊ शकणार नाहीत परंतु सर्वांचे पिता असल्यामुळे त्यांच्याशी योग लावल्यामुळे, तरीही पवित्र अवश्य बनतील. या पवित्रतेमुळे आपल्या विभागामध्ये श्रेष्ठ पद आवश्य मिळवतील कारण योगाला तर सर्व मनुष्य मानतात. अनेक मनुष्य असे म्हणतात, आम्हाला मुक्ती पाहिजे परंतु सजा पासून सुटून, मुक्त होण्याची शक्ती पण योगाद्वारेच मिळू शकते, अच्छा.