01-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,प्राणाचे रक्षण करणारे प्राणेश्वर बाबा आले आहेत,तुम्हा मुलांना ज्ञानाची गोड मुरली ऐकवून प्राणाचे रक्षण करण्यासाठी"

प्रश्न:-
कोणता निश्चय भाग्यवान मुलांनाच होतो?

उत्तर:-
आमचे श्रेष्ठ भाग्य बनवण्यासाठी स्वतः बाबा आले आहेत,बाबांपासून आम्हाला भक्तीचे फळ मिळत आहे.मायेने पंख कापले आहेत,ते पंखा देण्यासाठी आणि आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी बाबा आले आहेत.हा निश्चय भाग्यवान मुलांनाच होतो.

गीत:-
हे कोण आले,आज सकाळी सकाळी.

ओम शांती।
सकाळी सकाळी येऊन कोण मुरली सांगतात.दुनिया तर अगदीच अज्ञान अंधारात आहे.तुम्ही आता ज्ञानसागर पतित-पावन प्राणेश्वर बाबांकडून मुरली ऐकत आहात.ते प्राणाचे रक्षण करणारे ईश्वर आहेत.असे म्हणतात ना,हे ईश्वर, या दुःखा पासून सोडवा.ते हद्यची मदत मागतात.आत्ता तुम्हा मुलांना बेहद्दची मदत मिळत आहे, कारण बेहद्दचे बाबा आहेत ना.तुम्ही जाणतात,आत्मा गुप्त आहे.बाबा पण गुप्त आहेत.जेव्हा मुलांचे शरीर प्रत्यक्ष आहे,तर बाबा पण प्रत्यक्ष आहेत.आत्मा गुप्त आहे तर,बाबा पण गुप्त आहेत.तुम्ही जाणतात, आम्हाला बेहद्दचा वारसा देण्यासाठी बाबा आले आहेत.त्यांचेच श्रीमत आहे.सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता प्रसिद्ध आहे,फक्त गितादाताचे नाव बदलले आहे.आता तुम्ही जाणतात, श्रीमत भगवानुवाच आहे ना.हे पण समजवले जाते,भ्रष्टाचारीला श्रेष्टाचारी बनवणारे एकच बाबा आहेत,तेच नराला नारायण बनवतात.कथा पण सत्यनारायणाची आहे.गायन केले जाते अमर कथा, अमरपुरी चे मालक बनण्यासाठी किंवा नरापासून नारायण बनण्याची कथा.गोष्ट एकच आहे.हा मृत्युलोक आहे,भारत अमरपुरी होता, हे कोणालाच माहीत नाही.येथे पण अमर बाबा भारतवासी मुलांना अमर कथा ऐकवत आहेत.एक पार्वती किंवा एक द्रौपदीची गोष्ट नाही.हे तर अनेक मुलं ऐकत आहेत.शिवबाबा ब्रह्मा द्वारे ऐकवत आहेत. बाबा म्हणतात,ब्रह्मा द्वारे तुम्हा गोड गोड आत्म्यांना समजावत आहे.मुलांना आत्म अभिमानी जरूर बनायचे आहे.दुनियेमध्ये एक पण माणूस मात्र नाही,ज्याला आत्म्याचे संपूर्ण ज्ञान आहे.आत्म्याचे ज्ञान नाही,तर परमपिता परमात्मा चे ज्ञान कसे होऊ शकेल? ते म्हणतात आत्माच परमात्मा आहे,खूप मोठ्या संभ्रमात दुनिया फसलेली आहे.या वेळेत मनुष्याची बुद्धी काहीच कामाची नाही.आपल्याच विनाशासाठी तयारी करत आहेत.तुम्हा मुलांसाठी ही काही नवीन गोष्ट नाही.तुम्ही जाणतात आविनाश नाटकानुसार त्यांची भूमिका आहे.अविनाशी, पुर्वनियोजीत नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेले आहेत.आजकल दुनिये मध्ये तर खूप गोंधळ आहे.आता तुम्हा मुलांची विनाशकाळात प्रित बुद्धि आहे.जे बाबा पासून विपरीत बुद्धी आहेत,त्यांच्यासाठी विनाश निश्चित आहे.आता या दुनियेचे परिवर्तन होणार आहे.हे पण तुम्ही जाणतात, बरोबर महाभारत लढाई लागली होती.बाबांनी राजयोग शिकवला होता.ग्रंथांमध्ये तर संपूर्ण विनाश दाखवला आहे परंतु संपूर्ण विनाश तर होत नाही,परत तर प्रलय होईल.मनुष्यच राहिले नाहीत तर फक्त पाच तत्वच राहतील,असे तर होऊ शकत नाही.प्रलय होईल तर परत मनुष्य कुठून येतील.असे दाखवतात,कृष्ण अंगठा चोखत, समुद्रामधुन,पिंपळाच्या पानावरती बसून आला.आत्ता लहान मुलगा असे कसे येऊ शकतो? ग्रंथांमध्ये अशा गोष्टी लिहल्या आहेत,तुम्ही विचारू नका.आत्ता तुम्हा कुमारी द्वारे,या विद्वान,भीष्मपितामाह इत्यादींना ज्ञान मिळणार आहे.ते पण पुढे चालून ज्ञान घेतील.जितकी तुम्ही सेवा करत रहाल,बाबांचा परिचय सर्वांना देत राहाल,तेवढा तुमचा प्रभाव होईल.होय, विघ्न पन पडतील.हे पण गायन आहे,आसुरी संप्रदायाचे यज्ञामध्ये खूप विघ्न पडतील.तुम्ही तर राजयोग शिकवू शकत नाहीत,राजयोग तर बाबाच शिकवतात.सद्गती दाता तर एकच बाबा आहेत,तेच पतितांना पावन बनवतात.तर जरूर पतितांनाच ज्ञान देतील ना.बाबांना कधी सर्वव्यापी म्हणले जाऊ शकत नाही.तुम्ही मुलं समजतात,आम्ही पारसबुद्धी बनून पारसनाथ बनत आहोत.मनुष्यांनी तर अनेक मंदीरं बनवले आहेत परंतु ते कोण आहेत? काय करून गेले? काहीच समजत नाहीत.पारसनाथचे मंदिर पण आहे.भारत पारस पुरी होता.सोन्या,हिरे-रत्नांचे महल होते, कालचीच गोष्ट आहे.ते तर फक्त सतयुगालाच लाखो वर्षे म्हणतात आणि बाबा म्हणतात सर्व वैश्विक नाटकच पाच हजार वर्षाचे आहे, म्हणून म्हटले जाते,आज भारत काय आहे आणि उद्या काय असेल.लाखो वर्षाची तर गोष्ट कोणाच्या आठवणीत राहू शकत नाही.तुम्हा मुलांना आत्ता स्मृती आली आहे. तुम्ही जाणतात पाच हजार वर्षाची गोष्ट आहे.बाबा म्हणतात,योगामध्ये बसा,स्वतःला आत्म समजा आणि बाबांची आठवण करा.हे ज्ञान झाले ना.ते तर हटयोगी आहेत,एका पायावर दूसरा पाय ठेवून बसतात, काय काय करत राहतात.तुम्ही माता तर असे करू शकत नाही,असे बसू पण शकणार नाहीत.भक्तिमार्गात अनेक चित्र आहेत.बाबा म्हणतात, गोड मुलांनो हे काहीच करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही.शाळेमध्ये विद्यार्थी तर कायदेशीर बसतात ना. बाबा तर तसे पण म्हणत नाहीत. तुम्हाला जसे पाहिजे तसे बसा.तुम्ही योगा मध्ये बसून थकले तर तुम्ही झोपून बाबांची झोपून आठवण करू शकता.हे तर अगदी सहज समजण्याची गोष्ट आहे.यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत.कितीही आजारी असतील,होऊ शकते ऐकत- ऐकत शिव बाबांच्या आठवणीमध्ये प्राण तना मधून निघून जातील.असे गायन पण आहे ना, गंगाजल मुखामध्ये हवे,तेव्हा प्राण तनामधून निघावेत.त्या सर्व भक्तिमार्गाच गोष्टी आहेत.वास्तव मध्ये यातर ज्ञानामृताच्या गोष्टी आहेत.तुम्ही जाणतात खरोखर असेच प्राण तनामधून निघणार आहेत.तुम्ही मुलं येतात तर आम्हाला सोडून जातात.बाबा म्हणतात मी तर तुम्हाला सोबत घेऊन जाईल.मी तुम्हा मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे.तुम्हाला ना आपल्या घराची माहिती आहे,ना आत्म्याची माहिती आहे.मायेने अगदीच पंख तोडले आहेत म्हणून आता उडू शकत नाही,कारण तमोप्रधान आहे. जोपर्यंत सतोप्रधान बनू शकत नाही तोपर्यंत शांतीधाम मध्ये कसे जाऊ शकेल.हे पण जाणतात पूर्वनियोजित नाटकानुसार सर्वांना तमोप्रधान बनायचेच आहे.या वेळेत सर्व झाड जड जडीभुत झाले आहे. येथे कोणाची सतोप्रधान अवस्था होऊ शकणार नाही.आत्मा पवित्र बनेल,परत येथे थांबू पण शकणार नाही,एकदम पळून जाईल.सर्व भक्ती करतात मुक्तीसाठी परंतु कोणीही परत जाऊ शकत नाहीत, कायदाच नाही.बाबा सर्व रहस्य समजावून सांगतात,धारणा,आचरण करण्यासाठी बाबांची आठवण करणे आणि स्वदर्शन चक्रधारी बनणे हीच मुख्य गोष्ट आहे.बीजाची आठवण केल्यामुळे सर्व गोष्ट बुद्धीमध्ये येते. तुम्ही एका सेकंदामध्ये सर्वच जाणतात.दुनियेमध्ये कोणालाच माहित नाही,म्हणून सृष्टीचे बीजरूप, सर्वांचे एकच पिता आहेत.कृष्ण भगवान नाहीत,कृष्णालाच शामसुंदर म्हणतात.असे पण नाही की,कोणत्या तक्षक सापाने डसले, तेव्हा काळे बनले.हे तर काम चिता वरती चढून मनुष्य काळे झाले आहेत.तर रामाला पण सावळे दाखवतात,त्यांना कोण डसले? काहीही समजत नाहीत.तरीही ज्यांचे भाग्य आहे,निश्चय आहे,तर जरूर बाबा पासून वारसा घेतील.निश्चय नसेल तर कधीच समजणार नाहीत. भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ पण करणार नाहीत.भाग्या मध्ये नाही, तर बसतात पण असे,जसे काहीच समजत नाहीत.इतका पण निश्चय नाही,की बाबा बेहद्दचा वारसा देण्यासाठी आले आहेत.कोणता नवीन विद्यार्थी,वैद्यकीय महाविद्यालया मध्ये जाऊन बसेल, तर काहीच समजणार नाही.येथे पण असेच येऊन बसतात.या अविनाशी ज्ञानाचा विनाश कधी होत नाही.ते परत काय येऊन शिकतील.राजधानी स्थापन होत आहे,तर नौकर-चाकर, प्रजाचे पण नौकर-चाकर,सर्व पाहिजेत ना.पुढे चालून ज्ञान-योग घेण्याचा प्रयत्न करतील परंतु कठीण आहे,कारण त्या वेळेत गोंधळ खूप असेल,दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत जाते.इतकी सेवा केंद्र आहेत,कोणी येऊन चांगल्या रीतीने समजतील.हे पण लिहिले आहे, ब्रह्मा द्वारे स्थापना.विनाश पण समोर आहे,विनाश तर होणारच आहे.ते म्हणतात लोकसंख्या कमी व्हावी,परंतु झाडांची वृध्दी तर होणारच आहे.जोपर्यंत बाबा आहेत, तोपर्यंत सर्व धर्मांच्या आत्म्यांना इथे यायचेच आहे.जेव्हा जाण्याची वेळ होईल,तेव्हा आत्म्याचे येणे बंद होईल.आता तर सर्वांना यायचेच आहे,परंतु या गोष्टी कोणी समजत नाहीत.असे म्हणतात भक्तांचे रक्षक भगवान आहेत,तर जरूर भक्तावरती कोणते संकट आले असेल ना. रावण राज्यामध्ये अगदी सर्व पाप आत्मा बनले आहेत.रावण राज्य कलियुगाच्या अंतमध्ये आहे आणि राम राज्य सतयुगाच्या सुरूवातीला आहे.यावेळी सर्व आसुरी संप्रदाय आहेत ना.अमका स्वर्गवासी झाला असे म्हणतात परंतु याचा अर्थ,हा नर्क आहे ना.स्वर्गवासी झाले, हे तर चांगले आहे ना.येथे परत काय होते? जरूर नर्कवासी होते.हे पण समजत नाहीत,की आम्ही नरकवासी आहोत. आता तुम्ही समजता,बाबाच येऊन स्वर्गवासी बनवतील.गायन पण आहे स्वर्गीय ईश्वरीय पिता.तेच येऊन स्वर्गाची स्थापना करतील.सर्व गात राहतात पतित पावन सीताराम. आम्ही पतित आहोत,पावन बनवणारे आपण आहात.शिवपिताच राम आहेत,कोणाला सरळ सांगता,तर ते मानणार नाहीत.रामाला बोलवत राहतात. आत्ता तुम्हा मुलांना बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे.तुम्ही जसे की वेगळ्या दुनियाचे झाले.

बाबा समजवतात,त्या सर्वांना तमोप्रधान पण जरुर बनायचे आहे, तेव्हा तर बाबा येऊन सतोप्रधान बनवतील.बाबा खूप चांगल्या प्रकारे समोर बसून समजवतात.ते म्हणतात तुम्ही मुलं सेवा स्वतःची करतात, फक्त एक गोष्ट आठवणीत ठेवा, बाबांची आठवण करत सतोप्रधान बनण्यासाठी दुसरे कोणीही रस्ता दाखवू शकत नाही.सर्वांचे आत्मिक डॉक्टर, सर्जन एकच आहेत,तेच येऊन आत्म्याला ज्ञानाचे इंजेक्शन देतात,कारण आत्माच तमोप्रधान बनली आहे.बाबांनाच अविनाशी डॉक्टर, सर्जन म्हटले जाते.आत्मा अविनाशी आहे,परमात्मा पिता पण अविनाशी आहेत.आत्ता आत्मा सतोप्रधान पासून तमोप्रधान बनली आहे,त्यास ज्ञानाचे इंजेक्शन पाहिजे.बाबा म्हणतात,मुलांनो स्वतःला आत्मा निश्चय करा आणि आपल्या पित्याची आठवण करा. बुध्दीयोग वरती लावा,तर गोड घरी चालले जाल.तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आता आम्ही आपल्या गोड शांतीधाम मध्ये जायचे आहे,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ज्ञान आणि योगाद्वारे बुद्धीला पारस बनवायचे आहे.कितीही आजारी असाल,कष्ट असतील,तरीही एक बाबाची आठवण राहावी.

(२) आपले श्रेष्ठ भाग्य बनवण्यासाठी पूर्ण निश्चय बुद्धी बनायचे आहे.बुध्दी योग आपल्या गोड शांतीधाम घरी लावायचा आहे.

वरदान:-
नेहमी एकत्रित स्वरूपाच्या स्मृती द्वारे,कठीण कार्याला सहज बनवणारे एकदम हलके भव.

जी मुलं नेहमी आठवणी मध्ये राहतात,ती नेहमी बाबांच्या सोबती चा अनुभव करतात,त्यांच्यासमोर कोणतीही समस्या येईल तर स्वतःला एकत्रित अनुभव करतील.ते घाबरणार नाहीत.ही एकत्रित स्वरुपाची स्मृती,कोणत्याही कठीण कार्याला सहज बनवते.त्यांच्या समोर कधी कोणती मोठी समस्या येईल, तर स्वतःचे ओझे बाबाना देऊन स्वतः एकदम हलके बनतील.तर फरिश्ता सारखे दिवस-रात्र आनंदामध्ये नाचत राहाल.

बोधवाक्य:-
कोणत्याही कारणाचे निवारण करून संतुष्ट राहणे आणि करणारेच संतुष्टमणी आहेत.


मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य:- ज्ञान आणि योगामधील फरक:-

योग आणि ज्ञान दोन शब्द आहेत, परमात्म्याची आठवण करणे,यालाच योग म्हणले जाते.कोणत्याही आठवणीच्या संबंधांमध्ये योग शब्द येत नाही.गुरु लोक जे पण शिकवतात,ते पण परमात्म्याच्या कडेच आकर्षित करतात परंतु त्यांना परमात्मा चा पूर्ण परिचय नाही, म्हणून योगाची पूर्ण सिद्धी मिळत नाही.योग आणि ज्ञान दोघांचे बळ आहे,या दोघांच्या पुरुषार्थद्वारे शक्ती मिळते आणि आपण विकर्माजीत बनून श्रेष्ठ जीवन बनते.योग अक्षर तर सर्व म्हणतात परंतु ज्यांच्याशी योग लावला जातो,त्यांचा प्रथम परिचय तर पाहिजे.आत्ता हा परमात्मा चा परिचय पण आम्हाला परमात्मा द्वारेच मिळाला आहे.त्या परिचय द्वारे योग लावल्यामुळेच पूर्ण सिद्धी मिळते.योगाद्वारे आम्ही भूतकाळातील विकर्म भस्म करतो आणि ज्ञानाद्वारे माहिती होते की पुढील कार्यासाठी आम्हाला कोणते कर्म करायचे आणि का?जीवनाचा पाया,संस्कार आहे,आत्मा पण आनंदी संस्कार पासून बनलेली आहेत परंतु कर्माद्वारे ते संस्कार बदलत राहतात.योग आणि ज्ञानाद्वारे कर्मामध्ये श्रेष्ठता येते आणि जीवनामध्ये बळ येते,परंतु या दोन्ही गोष्टी परमात्मा द्वारे मिळतात.कर्म बंधनापासून मुक्त होण्याचा रस्ता पण आम्हाला परमात्मा द्वारे प्राप्त होतो.आम्ही जे विकर्मा द्वारे कर्मबंधन बनवले आहेत,त्याद्वारे मुक्ती होते आणि पुढच्यासाठी आमचे कर्म, विकर्म बनणार नाहीत. या दोन्हीसाठी बळ परमात्म्याच्या शिवाय कोणी देऊ शकत नाही. योग आणि ज्ञान दोन्ही गोष्टी परमात्मा घेऊन येतात.योग अग्नी द्वारे केलेले विकर्म भस्म करवतात आणि ज्ञानाद्वारे भविष्यासाठी कर्म शिकवतात,ज्याद्वारे कर्म अकर्म होतात,तेव्हा तर परमात्मा ने म्हटले आहे,कर्म,अकर्म, विकर्माची गती खूप रहस्ययुक्त आहे.आत्ता तर आम्हा आत्म्यांना प्रत्यक्षात परमात्म्याचे बळ पाहिजे, ग्रंथाद्वारे योग आणि ज्ञानाचे बळ मिळू शकत नाही परंतु त्या सर्वशक्तिमान बलवान,द्वारेच बळ मिळते.आत्ता आम्हाला आपल्या जीवनाचे संस्कार असे बनवायचे आहेत,ज्याद्वारे जीवनामध्ये सुख मिळेल.तर परमात्मा येऊन जीवनाच्या पाया मध्ये शुद्ध संस्काराचे बीज पेरतात. ज्या शुध्द संस्काराच्या आधाराने आम्ही अर्ध्या कल्पासाठी जीवनमुक्त बनतो,अच्छा.