01-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला देवता बनायचे आहे, म्हणून मायेच्या अवगुणांचा त्याग करा,क्रोध करणे,मारणे,तंग करणे,खराब काम करणे,चोरी इ करणे हे सर्व महापाप आहेत"

प्रश्न:-
या ज्ञाना मध्ये कोणती मुलं तीव्र पुरुषार्थ करु शकतात? नुकसान कोणाचे होऊ शकते?

उत्तर:-
जे आपली दिनचर्या लिहतात,ते ज्ञानामध्ये पुढे जाऊ शकतात.नुकसान त्यांचे होते,जे देहीअभिमानी राहू शकत नाहीत. बाबा म्हणतात,व्यापारी लोकांना लेखाजोखा,हिशोब ठेवण्याची सवय असते,ते या ज्ञानामध्ये पण पुढे जाऊ शकतात.

गीत:-
हे प्राणी,तू आपला चेहरा, मन रुपी आरशात मध्ये पहा..

ओम शांती।
आत्मिक भूमिका करणाऱ्या मुलांना बाबा समजवतात, कारण आत्माच बेहद्दच्या नाटकांमध्ये अभिनय करत आहे.मुलं या वेळेत पुरुषार्थ करत आहेत.जरी वेद उपनिषद वाचतात, शिवाची पुजा करतात, परंतु बाबा म्हणतात,या द्वारे मला कोणी भेटू शकत नाहीत,कारण भक्ती म्हणजे उतरती कला आहे.ज्ञानाद्वारे सद्गती होते,जरूर कोणा द्वारे अधोगती पण होत असेल.हा पण एक खेळ आहे,ज्याला कोणीच जाणत नाहीत.शिवलिंगाची सर्व पूजा करतात,त्यांना ब्रह्म पण म्हणनार नाही.तर ते कोण आहेत,ज्याची पूजा करतात.त्यांनाही ईश्वर समजून पूजा करतात.तुम्ही जेव्हा भक्ती सुरू केली,तर शिवलिंग हिऱ्याचे बनवत होते.आता तर गरीब बनले आहेत म्हणून दगडाचे लिंग बनवतात.हिऱ्याचे लिंग त्यावेळेस फक्त ४-५ हजार रुपयाला असेल.सद्या तर त्याची किंमत ५-७ लाख रुपये असू शकेल.असे हिरे पण,आता मिळत नाहीत.दगडा सारखे बनले आहेत, तर पुजा पण दगडाचीच करतात. ज्ञानाशिवाय पूजा करत राहतात. जेव्हा ज्ञान आहे,तर तुम्ही पूजा करत नाही,चैतन्य सन्मुख मध्ये आहेत,त्यांचीच तुम्ही आठवण करतात.तुम्ही जाणतात आठवणी द्वारेच विक्रम विनाश होतात. गितामध्ये पण म्हणतात की,हे मुलांनो, प्राणी आत्म्याला म्हटले जाते.प्राण निघून जातो,तर शरीर जसे मृत होते.आत्मा निघून जाते. आत्मा तर अविनाशी आहे ना. आत्मा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करते,तेव्हा चैतन्य येते.बाबा म्हणतात स्वतःला तपासा की,दैवी गुणांची धारणा किती झाली आहे? कोणता विकार तर नाही?चोरी इत्यादी करण्याचा कोणता आसुरी गुण तर नाही ना? आसुरी कर्तव्य केल्यामुळे खाली उतरत राहतात, विकारात जातात,परत श्रेष्ठ पद मिळू शकत नाही.खराब सवयींना जरूर नष्ट करायचे आहे.देवता कधी कोणावर रागवत नाहीत.येथे तर आसुराद्वारे किती मार खातात,कारण तुम्ही दैवी संप्रदाय बनतात,तर माया दुश्मन बनते.मायेचे अवगुण काम करतात. मारणे,तंग करणे,खराब काम करणे हे सर्व पाप आहे.तुम्हा मुलांना तर खूप स्वच्छ बनवायचे आहे.चोरी इत्यादी करणे तर महापाप आहे. तुम्ही प्रतिज्ञा करत आले आहात, बाबा माझे तर तुम्हीच आहात,दुसरे कोणी नाही.आम्ही आपलीच आठवण करु.भक्ती मार्गामध्ये जरी गायन करतात परंतु त्यांना माहीत नाही की,आठवणी द्वारे काय होते? ते तर बाबांना जाणतच नाहीत. एकीकडे म्हणतात नावारूपा पेक्षा वेगळे आहेत,तर दुसरीकडे परत लिंगाची पूजा करतात.तुम्हाला चांगल्या रीतीने समजून परत समजावून सांगायचे आहे.बाबा म्हणतात हा पण निर्णय करा की, महान आत्मा कोणाला म्हटले जाते?श्रीकृष्ण जो लहान मुलगा,जो स्वर्गाचा राजकुमार आहे, तो महात्मा आहे की,आज- कालचे कलयुगी मनुष्य महात्मा आहेत.त्यांचा जन्म विकाराद्वारे होत नाही.ती दुनियाच निर्विकारी आहे, ही विकारी दुनिया आहे. निर्विकारीला खूप पदव्या देऊ शकतात.विकारी मनुष्यांची काय पदवी असेल?श्रेष्ठचारी तर एक बाबाच बनवतात,तेच सर्वात उच्च ते उच्च आहेत,बाकी सर्व मनुष्य भुमिका करतात, तर जरूर अभिनय करावा लागेल. सतयुग श्रेष्ठ मनुष्यांची दुनिया आहे, तेथील जनावरं इत्यादी पण श्रेष्ठ आहेत. तेथे माया रावणच नाही.तेथे असे कोणी तमोगुणी जनावरं नसतात. तुम्हाला माहितआहे,मोर-मोरणींच्या मुलांचा जन्म कधी विकाराद्वारे होत नाही. मोराचे अश्रू खाली पडतात, त्याला मोरणी टिपते.मोराला राष्ट्रीय प्राणी म्हटले जाते.सतयुगा मध्ये विकाराचे नाव राहत नाही.मोराचा पंख,प्रथम क्रमांक जे विश्वाचे राजकुमार कृष्ण आहेत,त्यांच्या कपाळावरती लावतात.काहीतरी रहस्य असेल ना.तर या सर्व गोष्टी, बाबाच स्पष्ट करून समजवतात. स्वर्गामध्ये मुलं कशी होतात,ते पण तुम्ही जाणतात,तेथे विकार नसतात.बाबा म्हणतात,तुम्हाला देवता बनवतो तर, पूर्णपणे तपासायचे आहे.कष्टाशिवाय कोणी विश्वाचे मालक थोडेच बनू शकतात.

जसे तुमची आत्मा सूक्ष्म बिंदू आहे,तसेच बाबा पण बिंदूच आहेत.यामध्ये संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही.काही जण म्हणतात आम्ही आत्म्याला पाहू इच्छितो.बाबा म्हणतात,जे दिसू शकतात,त्यांची तर तुम्ही खूप पूजा केली.याद्वारे काहीच फायदा झाला नाही.आत्ता अर्थसहित तुम्हाला समजवत आहे.माझ्यामध्ये सर्व अभिनय भरलेला आहे.सर्वश्रेष्ठ आत्मा आहे ना,सर्वोच्च पिता आहेत.कोणताही मुलगा,स्वतःच्या लौकिक पित्याला असे म्हणू शकत नाही.एकालाच म्हटले जाते. संन्याशांना तर मुलंच नाहीत,जे पिता म्हणू शकतील.हे तर सर्व आत्म्याचे पिता आहेत,जे वारसा देतात.त्यांचा काही गृहस्थाश्रम तर होत नाही.बाबा सन्मुख समजवतात,तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत.प्रथम तुम्ही सतोप्रधान होते, परत खाली उतरत आले आहात. आता कोणी स्वतःला सर्वोच्च थोडेच म्हणू शकतात,आता तर स्वतःला कनिष्ठ समजतात.बाबा नेहमी समजवत राहतात की,मुख्य गोष्ट स्वतःला पहा की,माझ्या मध्ये कोणता विकार तर नाही? रोज रात्री आपला लेखाजोखा म्हणजे दिनचर्या तपासा.व्यापारी लोक नेहमी,लेखाजोखा पाहतात. शासकीय नोकर लेखाजोखा ठेवत नाहीत,त्यांना तर कायमस्वरूपी पगार मिळतो.या ज्ञान मार्गामध्ये व्यापारी पुढे जाऊ शकतात.जे जास्त शिकलेले,अधिकारी आहेत,ते इतके पुढे जाऊ शकत नाहीत. व्यापारामध्ये तर आज पन्नास रुपये कमावले,उद्या साठ रुपये कमावतात,कधी नुकसान पण होते. शासकीय नौकरांचा पगार तर कायम स्वरूपी असतो. या कामांमध्ये पण जर देही-अभिमानी राहिले नाही,तर नुकसान होते.माता तर व्यापार करत नाहीत, त्यांच्यासाठी आणखी सहज आहे. कन्यांसाठी पण खूप सहज आहे कारण मातां सारखी शिडी उतरावी लागत नाही.त्यांचेच भाग्य आहे,जे जास्त कष्ट करतात.कन्या तर विकारांमध्ये गेलीच नाही,तर काय सोडणार?पुरुषांना तर कष्ट करावे लागतात,कुटुंब-परिवाराचे पालन-पोषण करावे लागते.शिडी जे चढले आहेत,त्यांना उतरावी पण लागते.माया सारखीच चापट मारते आणि विकारांमध्ये ढकलते.आता तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी बनले आहात.कुमारी तर पवित्रच असते, सर्वात जास्त पतीचे प्रेम असते. तुम्हाला तर पतींचे-पती परमात्मा ची आठवण करायची आहे आणि सर्वांना विसरायचे आहे. आई-वडिलांचा मुलांमध्ये मोह असतो.मुलं तर अज्ञानी असतात. लग्नाच्या नंतर मोह सुरू होतो. प्रथम पत्नी प्रिय वाटते,परत विकारांमध्ये गेल्याने शिडी उतरण्यासाठी सुरू करतात.कुमारी आहे तर निर्विकारी आहे,म्हणून पूजा करतात.तुमचे नाव ब्रह्मकुमार कुमारी आहे.तुम्ही महिमा योग्य बनून परत पूज्य बनतात.बाबा तुमचे शिक्षक पण आहेत.तर तुम्हा मुलांना खूप नशा राहिला पाहिजे, आम्ही विद्यार्थी आहोत.भगवान जरूर भगवान भगवतीच बनवतील. असे समजले जाते की,भगवान तर एकच आहेत,बाकी सर्व भाऊ-भाऊ आहेत,दुसरा कोणता संबंध नाही. प्रजापिता ब्रह्मा द्वारे रचना होते, परत वृद्धी होत जाते आत्म्याची वृद्धी म्हणणार नाही.वृध्दी तर मनुष्यांची होते.आत्म्यांचे तर मर्यादित क्रमांक आहेत.अनेकजण येत राहतात,जोपर्यंत परमधाम मध्ये आहेत,तोपर्यंत येत राहतात. झाडाची वृध्दी होत राहते, असे नाही सुखून जाईल.याची भेट वडाच्या झाडा बरोबर केली जाते. खोड नाही बाकी सर्व झाड पारंब्या वरती उभे आहे.तुमचे पण असेच आहे,पाया नाही,काही ना काही लक्षणं आहेत.आतापर्यंत मंदिरं बनवत राहतात.मनुष्यांना थोडेच माहिती आहे की,देवतांचे राज्य कधी होते,परत कुठे गेले?हे ज्ञान तुम्हा ब्राह्मणांला च आहे. मनुष्यालाही हे माहित नाही की, परमात्मा बिंदी स्वरूप आहे. गीतेमध्ये लिहिले आहे की,ते अखंड ज्योति स्वरूप आहेत.अगोदर अनेकांना भावना अनुसार साक्षात्कार होत होता.खूप लाल-लाल होत होते. बस मी सहन करू शकत नाही.आता तो तर साक्षात्कार होता.बाबा म्हणतात, साक्षात्काराद्वारे कोणाचे कल्याण होऊ शकत नाही.ही तरआठवणीची यात्राच मुख्य आहे.जसा पारा मऊ असल्यामुळे हातामधून निसटतो, तशी आठवण पण सारखी सारखी विसरते.खूप इच्छा ठेवतात,बाबांची आठवण करू,परत दुसरे-दुसरे विचार येतात. यामध्ये तुमची स्पर्धा आहे.असे नाही की लगेच पाप नष्ट होतील, वेळ तर लागतोच ना. कर्मातीत अवस्था झाल्यानंतर,शरीर पण राहणार नाही,परंतू आजतागायत कोणी कर्मातीत अवस्थेला प्राप्त झाले नाहीत.परत त्यांना सतयुगी शरीर पण पाहिजे.तर आत्ता तुम्हा मुलांना बाबांची आठवण करायची आहे.स्वतःला पाहत राहा,माझ्या द्वारे कोणते खराब काम तर नाही होत? दिनचर्या जरूर लिहायची आहे.असे व्यापारी लगेच सावकार बनू शकतात.

बाबांच्या जवळ जे ज्ञान आहे, ते देत आहेत.बाबा म्हणतात, माझ्यामध्ये हे ज्ञान नोंदलेले आहे.हुबेहुब तुम्हाला तेच बोलतील, जे तुम्हाला कल्पापूर्वी ज्ञान दिले होते.मुलांनाच समजवतात, बाकी दुसरे काय जाणतील?तुम्ही सृष्टिचक्र जाणतात,यामध्ये सर्व कलाकारांची भूमिका नोंदलेली आहे,बदलु शकत नाही.न कोणी यामधून मुक्त होऊ शकतात.होय, बाकी वेळेत मुक्ती मिळू शकते. तुम्ही तर सर्वांगीण भूमिका करणारे आहात.बाकी सर्व आपल्या घरांमध्येच असतील,परत अंत काळात येतील,मोक्ष मिळण्याची इच्छा ठेवणारे येणार नाहीत.ते परत अंत काळात येतील.ज्ञान कधी ऐकणार नाहीत.मच्छरा सारखे येतील आणि जातील.तुम्ही तर वैश्विक नाटका नुसार राजयोग शिकत आहात.तुम्ही जाणतात, बाबांनी पाच हजार वर्षांपूर्वी पण अशाप्रकारे राजयोग शिकवला होता.तुम्ही परत दुसऱ्यांना समजवत राहतात की,शिवबाबा असे म्हणतात.आता तुम्ही जाणतात आम्ही खूप उच्च होतो,आता खूप कनिष्ठ बनलो आहोत.परत बाबा उच्च बनवतात,तर असा पुरुषार्थ पण करायला पाहिजे ना.येथे तुम्ही ताजेतवाने होण्यासाठी,म्हणजे आत्म्या मध्ये शक्ती भरण्यासाठी येतात.याचे नावच मधुबन आहे. तुमच्या कलकत्ता किंवा मुंबईमध्ये थोडेच मुरली चालवतात.मधुबन मध्येच मुरली वाजते.मुरली ऐकण्यासाठी,ताजेतवाने आणि शक्ती भरण्यासाठी बाबांच्या जवळ यावेच लागते.ज्ञानाचे नवीन नवीन मुद्दे निघत राहतात. मधुबन मध्ये सन्मुख मुरली ऐकल्यामुळे खूप फरक पडतो. तुम्ही पुढे चालून पाहत राहाल. बाबा जर अगोदरच सर्व ऐकवतील, तर त्यातली मजा निघून जाईल, हळूहळू सर्व स्पष्ट होत जाईल.एक सेकंद दुसऱ्याशी मिळू शकत नाही. बाबा मुलांची आत्मिक सेवा करण्यासाठी आले आहेत,तर मुलांचे पण कर्तव्य आहे, आत्मिक सेवा करणे.कमीत कमी हे तर सांगा की,बाबांची आठवण करा आणि पवित्र बना.पवित्रते मध्येच नापास होतात,कारण आठवण करत नाहीत.तर तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.आम्ही बेहद्द पित्याच्या सन्मुख बसलो आहोत, ज्याला कोणीही जाणू शकत नाहीत.ज्ञानाचे सागर तर शिव बाबाच आहेत. देहधाऱ्याशी बुद्धी योगकाढून टाकायचा आहे. शिवबाबांचा हा रथ आहे,यांचा आदर ठेवला नाही तर, धर्मराज द्वारे खूप सजा खावी लागेल.मोठ्यांचा आदर तर करायचा आहे.आदी देवाचा खूप आदर करतात.जड चित्रांचा इतका आदर करतात,तर चैतन्याचा किती करायला पाहिजे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वतःच स्वतःला तपासून दैवी गुण धारण करायचे आहेत.खराब सवयी काढून टाकायच्या आहेत.बाबा आम्ही कधीच खराब काम करणार नाही,अशी प्रतिज्ञा करायची आहे.

(२) कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी आठवणीची स्पर्धा करायची आहे.आत्मिक सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे.मोठ्यांचा आदर ठेवायचा आहे.

वरदान:-
सर्व खजान्याला स्वतःच्या प्रति आणि दुसऱ्यांच्या प्रति वापरणारे अखंड महादानी भव

जसे बाबांचा भंडारा नेहमीच चालत राहतो,रोज देत राहतात,तसेच तुमचा पण लंगर नेहमीच चालत राहावा,कारण तुमच्या जवळ ज्ञानाचा, शक्तीचा,खुशीचा भरपूर भंडारा आहे.याला सोबत ठेवल्यामुळे किंवा वापरल्या मुळे काहीच धोका नाही.हा भंडारा उघडा राहिला तरी,चोर येणार नाहीत.बंद ठेवाल तर चोर येतील म्हणून,रोज आपल्याला मिळालेला खजाना पहा,तो खजाना स्वतःच्या प्रति आणि दुसऱ्याच्या प्रति वापरत राहा,तर अखंड महादानी बनाल.

बोधवाक्य:-
ज्ञानाच्या ऐकलेल्या गोष्टीचे मनन करा,त्यामुळेच शक्तिशाली बनाल.