01-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही खूप उच्च जातीचे आहात,तुम्हाला ब्राह्मणापासून देवता बनायचे आहे म्हणून,खराब विकारी सवयींना नष्ट करायचे आहे"

प्रश्न:-
कोणत्या गोष्टीचे सबंध या शिक्षणाशी नाही?

उत्तर:-
ड्रेस इत्यादीचा सबंध अभ्यासाशी नाही,यामध्ये काही ड्रेस बदलण्याची आवश्यकता नाही. बाबा तर आत्म्यांना शिकवतात. आत्म जाणते,हे जुने पतित शरीर आहे,याला कसाही हलका कपडा इत्यादी घाला,काही हरकत नाही. शरीर आणि आत्मा दोन्ही काळे आहेत.बाबा काळा-गोरा बनवतात.

ओम शांती।
आत्मिक पित्याच्यासमोर,आत्मिक शाळेमध्ये आत्मिक मुलं बसले आहेत.ही शारीरिक शाळा नाही.आत्मिक शाळेमध्ये,आत्मिक पिता बसून राजयोग शिकवत आहेत.तुम्ही मुलं जाणता, आम्ही परत नरापासून नारायण किंवा देवी-देवता पद प्राप्त करण्यासाठी आत्मिक पित्याजवळ बसलो आहोत.या नवीन गोष्टी आहेत,तुम्ही पण जाणता लक्ष्मीनारायणचे राज्य होते,ते दुहेरी मुकुटधारी होते.प्रकाशाचा ताज आणि रत्नजडित ताज दोन्ही होते. प्रथम तर प्रकाशचे ताजधारी होऊन गेले आहेत,त्यांना सफेद प्रकाशाचे वलय दाखवतात.ही पवित्रतेची खूण आहे.अपवित्र असणाऱ्याला कधीच प्रकाशाचे वलय दाखवत नाहीत. तुमचा फोटो काढतात,प्रकाशाचे वलय दाखवू शकत नाहीत,ही पवित्रतेची लक्षणं आहेत.अपवित्रता असणाऱ्याला कधीही प्रकाशाचे वलय दाखवत नाहीत.तुमचा फोटो इत्यादी मध्ये प्रकाश देऊ शकत नाहीत.ही पवित्रताची लक्षणं दाखवतात.प्रकाश आणि अंधार. ब्रह्माचा दिवस प्रकाश,ब्रह्माची रात्र अंधार.डार्क म्हणजे अंधार,त्यावरती प्रकाशाचे वलय दाखवत नाहीत. तुम्ही मुलं जाणता,बाबाच येऊन इतकेक्षजे पतित आहेत म्हणजेच अंधारामध्ये आहेत,त्यांना पावन बनवतात.आत्ता तर पवित्र राजधानी नाही.गंमत होती इयत्ता राजा राणी तथा प्रजा सर्व पवित्र होते.सतयुगा मध्ये तर पवित्र राजधानी नाही.सतयुगा मध्ये यथा राजरानी तथा प्रजा सर्व पवित्र होते.या लक्ष्मीनारायणचे राज्य होते.या चित्रावरती तुम्हाल खूप चांगल्या प्रकारे समजून सांगायचे आहे.हे तुमचे मुख्य लक्ष आहे,समजून सांगण्यासाठी आणखी पण चांगले चित्र आहेत,म्हणून इतके चित्र ठेवले जातात.मनुष्य तर लगेच समजत नाहीत की,आम्ही आठवणीच्या यात्रे द्वारे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनतील परत मुक्ती किंवा जीवनमुक्ती मध्ये चालले जातील.या दुनिये मध्ये कोणालाच माहीत नाही की,जीवन मुक्ती कशाला म्हटले जाते.लक्ष्मीनारायण चे राज्य कधी होते,हे पण कोणाला माहित नाही. आता तुम्ही जाणता आम्ही बाबा कडून पवित्रतेचे दैवी स्वराज्य घेत आहोत.चित्रावर तुम्ही चांगल्या रीतीने समजावू शकता. भारतामध्येच दुहेरी ताजधारी देवतांची पूजा करतात.असे चित्र शिडीमध्ये पण आहे.तो ताज आहे परंतु प्रकाशाचा ताज नाही. पवित्रतेची पूजा होते,लाईट पण पवित्रतेचे लक्षणं आहेत.बाकी असे नाही की कोणी सिंहासना वरती बसतात,तर प्रकाशाची किरणे निघत राहतात,नाही. ही तर पवित्रतेची लक्षणं आहेत.तुम्ही आता पुरुषार्थी आहात म्हणून तुम्हाला प्रकाशाचे वलय दाखवू शकत नाही. देवी-देवतांचे आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत.येथे तर कोणाचे पवित्र शरीरच नाही म्हणून प्रकाश देऊ शकत नाहीत.तुमच्या मध्ये कोणी पूर्ण पवित्र राहत नाहीत, कोणी परत अर्धे पवित्र राहतात. मायचे वादळ खूप येतात म्हणून त्यांना अर्धपवित्र म्हटले जाते.काही तर एकदम पतित बनतात,स्वतः पण समजतात,मी पतित बनलो आहे. आत्माच पतित बनते,त्यांना प्रकाशाचे वलय दाखवू शकत नाही. तुम्हा मुलांना,हे विसरायचे नाही की आम्ही उच्च ते उच्च पित्याची मुलं आहोत,तर खूप चांगल्या प्रकारे राहायचे आहे.समजा कोणी मेहतर आहेत,ते आमदार किंवा खासदार बनतात किंवा शिक्षणाद्वारे कोणते उच्चपद घेतात,तर खूप चांगल्या प्रकारे राहतात.असे खूप आहेत. तीच जात इत्यादी आहे परंतु पद मिळाल्यामुळे नशा चढतो,परत कपडे इत्यादी पण चांगले चांगले घालतात.तसेच आत्ता तुम्ही पतित पासून पावन बनण्यासाठी शिकत आहात.शिक्षणाद्वारे तर कोणी डॉक्टर,वकील बनतात परंतु पतित तर व्हायचेच आहे ना,कारण त्या शिक्षणाद्वारे कोणी पावन बनत नाहीत.तुम्ही जाणता आम्ही भविष्यामध्ये पवित्र देवी-देवता बनतो,तर शूद्र पणाच्या सवयी नष्ट व्हायला पाहिजेत.हा नशा राहायला पाहिजे की,आम्हाला परमपिता परमात्मा दुहेरी मुकुटधारी बनवतात,आम्ही शूद्र पासून ब्राह्मण बनून,देवता बनतो तर खराब सवयी नष्ट होतात.आसुरी सर्व गोष्टी सोडायला पाहिजेत.मेहतर पासून खासदार बनतात,तर राहणे वागणे सर्व चांगल्या प्रकारे बनतात,त्यांचे तर थोड्या वेळासाठी आहे.तुम्ही जाणतात आम्ही भविष्यामध्ये खूप श्रेष्ठ बनणार आहोत.स्वत: सोबत अशाप्रकारे गोष्टी करायला पाहिजेत. आम्ही काय होतो आणि आम्ही काय बनत आहोत.तुम्ही शूद्र जातीचे होते, आत्ता विश्वाचे मालक बनतो.जेव्हा कोणी उच्च पद मिळवतात,तर परत नशा राहतो.तुम्ही पण शुद्र जातीचे होते,पतित होते.आत्ता तर तुम्हाला भगवान शिकवून विश्वाचे मालक बनवत आहे.हे पण तुम्ही समजता, परमपिता परमात्मा जरूर येथेच येऊन राजयोग शिकवतील.मुळवतन किंवा सूक्ष्मवतन मध्ये तर शिकवणार नाहीत.दूर देशाचे राहणारे,तुम्ही सर्व आत्मे,येथे भूमिका वठवता.८४ जन्माची भूमिका वठवायची आहे.ते तर म्हणतात,८४ लाख योनी आहेत, खूप अज्ञान अंधकार आहे.आत्ता तुम्ही समजता,पाच हजार वर्षांपूर्वी आम्ही देवी-देवता होतो,आता तर पतित बनलो आहोत.गायन पण करतात,पतित पावन या आणि आम्हाला पावन बनवा,परंतू समजत नाहीत.आता बाबा स्वतः पावन बनवण्यासाठी आले आहेत,राजयोग शिकवत आहेत.राजयोगाच्या शिक्षणाशिवाय कोणी उच्च पद मिळवू शकत नाहीत.तुम्ही जाणतात,बाबा आम्हाला शिकून नरापासून नारायण बनवत आहेत. मुख्य लक्ष समोर आहे.प्रजा पद काही मुख्य लक्षण नाही.चित्र लक्ष्मीनारायणाचे आहे,असे समोर चित्र ठेवून,कोणी शिकवत नसतील. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे, आम्ही ८४ जन्म घेऊन पतित बनलो आहोत.शिडीचे चित्र खूप चांगले आहे.ही पतित दुनिया आहे ना. यामध्ये साधुसंत सर्व येतात.ते स्वत: गायन करत राहतात,पतित पावन या.पतित दुनियेलख पावन दुनिया म्हणू शकणार नाही.नवीन दुनिया पावन दुनिया आहे.जुन्या पतित दुनिये मध्ये कोणी पावन राहू शकत नाही.तर तुम्हा मुलांना खूप नशा राहायला पाहिजे,आम्ही ईश्वर पित्याचे विद्यार्थी आहोत,ईश्वर स्वतः आम्हाला शिकवत आहेत. गरिबांनाच बाबा येऊन शिकवतात. गरिबांचे कपडे इत्यादी अस्वच्छ असतात ना.तुमची आत्मा शिकत आहे.हे जुने शरीर आहे,याला हलके कपडे घातले तरी काही हरकत नाही.यामध्ये कपडे इत्यादी बदलण्याची व देखावा करण्याची आवश्यकता नाही.या शिक्षणाचा ड्रेस सोबत काही संबंध नाही.बाबा तर आत्म्याने शिकवत आहेत.शरीर तर पतित आहे ना.याला कितीही चांगला कपडा घाला परंतु आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत ना. कृष्णाला शाम दाखवतात,त्यांचे आत्मा आणि शरीर दोन्ही सावळे होते.गावातील मुलगा होता,तुम्ही सर्व गावातील मुलं होते.दुनिये मध्ये मनुष्यमात्र विनाधनीचे आहेत.शिव पित्याला जाणत नाहीत,हद्दचे पिता तर सर्वांचे आहेत.बेहद्दचे पिता तुम्हा ब्राह्मणालाच मिळाले आहेत.आता शिव पिता तुम्हाला राजयोग शिकवत आहेत.भक्ती आणि ज्ञान.भक्तीचा जवा अंत होईल,तेव्हाच बाबा येऊन ज्ञान देतात.आत्ता अंत आहे.सतयुगा मध्ये असे काही होत नाही.आता जुन्या दुनियेचा विनाश जवळ आलेला आहे.पावन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते.चित्रांमध्ये खूप स्पष्ट समजावले जाते.राधा-कृष्णच परत लक्ष्मीनारायण बनतात,हे पण कोणाला माहित नाही.तुम्ही जाणता दोन्ही वेगवेगळ्या राजधानीचे होते. तुम्ही स्वर्गामधील स्वयंवर पण पाहिले आहे.पाकिस्तानमध्ये तुम्हा मुलांच्या आनंदासाठी हे सर्व साक्षात्कार इत्यादि होत होते.

आता तुम्ही जाणता,आम्ही राजयोग शिकत आहोत.हे कधी विसरायला नाही पाहिजे.जरी कोणी स्वयंपाक बनवतात किंवा भांडी घासतात परंतु सर्वांची आत्म्याच शिकत आहे ना. येथे सर्व प्रकारचे,गरिब इत्यादी येऊन बसतात,म्हणून मोठ मोठे मनुष्य येत नाहीत,समजतात तेथे तर सर्व गरीब आहेत,म्हणून लाज वाटते.ते आहेतच गरीब निवाज. काही सेवा केंद्रावर मेहतर पण येतात,कोणी मुसलमान येतात.बाबा म्हणतात,देहाचे सर्व धर्म सोडा. आम्ही गुजरात आहोत,अमका आहोत,हा सर्व देहाचा धर्म आहे.येथे तर आत्म्याला परमात्मा शिकवत आहेत.बाबा म्हणतात,मी साधारण तना मध्ये आलो आहे,तर साधारण मनुष्या जवळ,साधारणच येतील ना. हे तर समजतात,हे ब्रह्मा हिऱ्यांच व्यापारी होते.बाबा आठवण करून देतात, कल्पापूर्वी पण मी म्हटले होते की, मी साधारण वृद्ध तना मध्ये,अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये,मी प्रवेश करतो. म्हटले जाते तुम्ही स्वतःचे जन्माला जाणत नाही फक्त एक अर्जुनच्या घोडा गाडीच्या रथामध्ये बसून ज्ञान दिले नव्हते,त्याला पाठशाला म्हणता येणार नाही,न युद्धाचे मैदान आहे.हे तर शिक्षण आहे,मुलांना राजयोगा वरती खूप लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला पूर्ण पणे शिकून दुहेरी मुकुटधारी बनायचे आहे.आता तर कोणता ताज नाही,भविष्यामध्ये दुहेरी मुकुटधारी बनायचे आहे.द्वापर पासून प्रकाशाचे वलय जाते म्हणजे पवित्रता राहत नाही,परत ते एकेरी मुकुटधारी बनतात.एकेरी मुकुटधारी, दुहेरी मुकुटधाऱ्यांची पूजा करतात. ही पण लक्षणं जरूर पाहिजेत.बाबा चित्रांसाठी सूचना देत राहतात,तर चित्र बनवणाऱ्यांनी मुरली वरती खूप लक्ष द्यायला पाहिजे.चित्रावरती कोणालाही समजावून सांगणे खूप सहज आहे.जसे महाविद्यालयांमध्ये नकाशा इत्यादी दाखवतात तर बुद्धीमध्ये येते,युरोप तिकडे आहे, लंडन इकडे आहे.नकाशा पाहिला नसेल तर त्यांना काय माहित होइल की, युरोप कुठे आहे.नकाशा पाहिल्यामुळे लगेच बुद्धीमध्ये येते. आता तुम्ही जाणता वरती पूज्य दुहेरी मुकुटधारी देवी देवता आहेत, परत खाली येतात तर पुजारी बनतात.शिडी उतरतात ना,शिडी तर खूप सहज आहे,जे कोणीही समजू शकतात.परंतु कोणाकोणाच्या बुद्धीमध्ये काहीच बसत नाही, भाग्यच असे आहे.शाळेमध्ये पास नापास तर होतात ना.भाग्या मध्ये नाही,तर पुरुषार्थ पण करत नाहीत, आजारी पडतात,पूर्णपणे शिकू शकत नाहीत.काही जण तर पुर्णपणे शिकतात.तरीही ते शारीरिक शिक्षण आहे,हे आत्मिक शिक्षण आहे. यासाठी सोन्यासारखी बुद्धी पाहिजे. बाबा जे सोन्यासारखे एकदम पवित्र आहेत,त्यांच्या आठवणी द्वारेच तुमची आत्मा सोन्यासारखे बनते. असे म्हटले जाते,हे तर दगडासारख्या बुद्धीचे आहेत.तेथे असे म्हणणार नाही,तो तर स्वर्ग होता.आता हे विसरले आहेत,भारत स्वर्ग होता.हे पण प्रदर्शनीमध्ये समजावू शकता,परत त्याची पुनरावृत्ती करू शकता.प्रोजेक्टर द्वारे हे होऊ शकत नाही.प्रथम तर त्रिमूर्ती,लक्ष्मीनारायण आणि शिडीचे चित्र खूप आवश्यक आहेत.या लक्ष्मीनारायणच्या चित्रा मध्ये ८४ जन्माचे ज्ञान येते.मुलांचे सर्व दिवस चिंतन चालले पाहिजे.प्रत्येक सेवा केंद्रावरती मुख्य चित्र जरूर ठेवायची आहेत.चित्रावरती चांगल्या प्रकारे समजावू शकतात.ब्रह्मा द्वारे राजधानी स्थापन होत आहे.आम्ही प्रजापिता ब्रह्माची मुलं ब्रह्मकुमार- कुमारी आहोत.अगोदर आम्ही शूद्र वर्णाचे होतो,आता मी ब्राह्मण वर्णाचे बनलो आहोत,परत देवता बनायचे आहे.शिवबाबा आम्हाला शूद्रा पासून ब्राह्मण बनवत आहेत.आपले मुख्य लक्ष्य समोर आहे.लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक होते,परत हे शिडी कसे उतरले.श्रेष्ठ पासून कसे कनिष्ठ बनतात,एकदम जसे बुद्ध बनतात.हे लक्ष्मीनारायण भारतामध्ये राज्य करत होते.भारतवासींना हे माहिती व्हायला पाहिजे ना,परत काय झाले? कुठे गेले? काय यांच्यावरती कोणी विजय मिळवला?यांनी लढाईमध्ये कोणाला हरवले? न कोणा द्वारे जिंकले ना हरले.ही तर सर्व माये ची गोष्ट आहे.रावण राज्य कधी सुरू झाले आणि पाच विकारांमध्ये मुळे राजाई गमावली, परत पाच विकाराला जिंकल्यामुळे, श्रेष्ठ बनतात.आता रावण राज्याचा देखावा आहे.आम्ही गुप्तपणे आपली राजधानी स्थापन करत आहोत. तुम्ही खूप साधारण आहात, शिकवणारे खूप उच्च ते उच्च आहेत आणि निराकार पिता,साकार शरीरामध्ये येऊन मुलांना असे लक्ष्मीनारायण सारखे बनवतात.दूर देशामधुन पतित दुनियेमध्ये पतित शरीरांमध्ये येतात.तेही स्वत:ला लक्ष्मीनारायण बनवत नाही, तुम्हा मुलांना बनवतात परंतु श्रेष्ठ बनण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करत नाहीत.दिवस-रात्र अभ्यास करायचे आणि शिकवायचे आहे.बाबा दिवसेंदिवस खूप सहज युक्ती समजावत राहतात. लक्ष्मीनारायणच्या चित्रा पासून सुरू करायला पाहिजे,त्यांनी ८४ जन्म कसे घेतले,परत अंतिम जन्मांमध्ये शिकत आहेत,परत त्यांचे राजघराने बनते. खूप समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत.चित्रासाठी बाबा सूचना देत राहतात.कोणी चित्र तयार केले,तर लगेच बाबा जवळ यायला पाहिजे,बाबा सूचना देऊन सुधारणा करतील.

बाबा म्हणतात मी सावलशाह आहे, भंडारी भरून जाईल.कोणत्या गोष्टीची काळजी नाही.इतकी सर्व मुलं बसले आहेत.बाबा जाणतात, कोणा द्वारे भंडारी भरू शकते. बाबांचा विचार आहे,जयपूरला खूप जोरात सेवा करायचे आहे.तेथेच हठयोगींचे संग्रहालय आहे.तुमचे परत राजयोगाचे संग्रहालय खूप चांगल्या प्रकारे बनले पाहिजे,जे अनेक लोक येऊन पाहतील.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) पवित्र ज्ञानाला बुद्धीमध्ये धारण करण्यासाठी आपल्या बुद्धीरुपी भांड्याला सोन्याचे भांडे बनवायचे आहे.आठवणी द्वारेच भांडे सोन्याचे होईल.

(२) आता ब्राह्मण बनलो आहोत, म्हणून शुद्रपणाच्या सर्व सवयी नष्ट करायचे आहेत. खूप चांगल्या प्रकारे राहायच्या आहेआम्ही विश्वाचे मालक बनत आहोत,या नशेत राहायचे आहे.

वरदान:-
आपली दृष्टी आणि वृत्तीच्या परिवर्तन द्वारे,सृष्टीला परिवर्तन करणारे साक्षात्कार मूर्त भव.

आपल्या वृत्तीच्या परिवर्तन द्वारे दृष्टीला दिव्य बनवा,तर दृष्टीद्वारे अनेक आत्मे,आपले यथार्थ रुप, यर्थात घर किंवा राजधानीला पाहतील. असे यर्थात साक्षात्कार करण्यासाठी,वृत्तीमध्ये जरापण देह-अभिमानची चंचलता असायला नको.तर वृत्तीला सुधारुन दिव्य दृष्टी बनेल,तेव्हाच सृष्टी परिवर्तन होईल. पाहणारे अनुभव करतील की,यांचे डोळे नाहीत परंतु एक जादूची डब्बी आहे.हे डोळे साक्षात्कार करण्याचे साधन बनतील.

बोधवाक्य:-
सेवेच्या उमंग उसाहाच्या सोबत,बेहद्द वैराग्य वृत्तीच सफलतेचा आधार आहे.