01-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, स्वता:वरती पूर्णपणे नजर ठेवा, कोणती ही बेकायदा चलन चालू नका, श्रीमताचे उल्लंघन केल्यामुळे विकारात जाल.

प्रश्न:-
पद्मापदमपती बनण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे?

उत्तर:-
नेहमी लक्षात ठेवा,जसे कर्म मी करेल,मला पाहून दुसरे पण करतील.कोणत्याही गोष्टीचा खोटा अहंकार यायला नको.मुरली कधी चुकवू नका.मनसा वाचा कर्मणा,आपली सांभाळ करा.हे डोळे धोका द्यायला नको,तर करोडची कमाई जमा करू शकता,यासाठी अंतर्मुखी होऊन बाबांची आठवण करा आणि विकर्मा पासून सुरक्षित रहा.

ओम शांती।
आत्मिक मुलांना बाबा समजाव्त आहेत,येथे तुम्हा मुलांना या विचारात जरूर बसायचे आहे,बाबा पिता पण आहेत शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत.याची पण जाणीव आहे,बाबांची आठवण करत करत पवित्र पवित्रधाम मध्ये पोहचू.बाबांनी समजवले आहे, पवित्रधाम मधुन खाली उतरत आलेले आहात. त्याचे नावच आहे पवित्र धाम.सतोप्रधान पासुन सतो,रजो,तमो इत्यादी,आता तुम्ही समजता आम्ही विकाराच्या वश झालेले आहोत अर्थात वेश्यालय मध्ये आहोत.जरी तुम्ही संगमयुगा वरती आहात परंतु ज्ञानाद्वारे जाणता आम्ही किनारा केलेला आहे,परत जर आम्ही शिवबाच्या आठवणी मध्ये राहिलो तर शिवालय दूर नाही.शिव बाबांची आठवण करत नाही तर शिवालय खूपच दूर आहे परत सजा पण खूप खावी लागेल आणि खूप दूर जाल.तर बाबा मुलांना काही जास्त कष्ट देत नाहीत.पवित्र राहायचे आहे,हे डोळे पण खूपच धोका देतात.यांची संभाळ करायची आहे.बाबांनी समजवले आहे ध्यान आणि योग वेगळे आहेत. योग म्हणजे आठवण.डोळे उघडे ठेवून पण तुम्ही आठवण करू शकता.ध्यानाला काही आठवण म्हटले जात नाही.भोग पण घेऊन जातात तर कायद्यानुसार जायचे आहे,यामध्ये पण माया खूप येते.माया अशी आहे जी एकदम नाकामध्ये दम करते,खूपच बलवान आहे.जसे बाबा बलवान आहेत तसेच माया पण बलवान आहे.इतकी बलवान आहे,जी साऱ्या दुनियेला वेश्यालय मध्ये ढकलुन देते,म्हणून खूपच खबरदारी ठेवायचे आहे. बाबांची आठवण पण कायद्यानुसारच पाहिजे. बेकायदा कोणते काम केले तर विकारांमध्ये जाल. ध्यान किंवा साक्षात्कार ची कोणतीच इच्छा ठेवायची नाही.इच्छा मात्र मात्रम अविद्या बनायचे आहे.बाबा तुमच्या सर्व इच्छा न मागताच पूर्ण करतात,जर बाबांच्या आज्ञा वरती चालले तर.जर बाबांच्या आज्ञा मानली नाही,उल्टा रास्ता पकडला तर होऊ शकते स्वर्गाच्या ऐवजी नरकामध्ये जाल. गायन पण आहे हत्तीला मगरीने पकडले.अनेकांना ज्ञान देणारे,भोग लावणारे आज नाहीत,कारण बेकायदा चलन द्वारे पूर्णपणे मायावी बनतात. देवी-देवता बनता बनता आसुर बनतात.बाबा जाणतात जे देवता बनणारे होते ते आसुर बणुन आसुरा सोबत राहतात,निंदक बनतात.बाबांचे बणुन स्वता:वरती नजर ठेवायची आहे.श्रीमताचे उल्लंघन केले तर विकारांमध्ये जाल.माहिती पण होणार नाही.बाबा तर मुलांना खूप सावधान करतात,अशी कोणती चलन चालायला नको ज्यामुळे तुम्ही रसातळा मध्ये जाल.काल पण बाबांनी समजावले होते,अनेक गोप आहेत जे आप आपसात कमिटी बनवतात,जे काय करतात, श्रिमता शिवाय,तर सेवेमध्ये विघ्न आणतात.श्रीमता शिवाय केले तर विकारात जातात.बाबांनी सुरुवातीला मातांची कमिटी बनवली होती कारण मातावरती कलश ठेवलेला आहे.वंदे मातरम पण गायन आहे.जर भाऊ लोक कमिटी बनवतात, तर गायन वंदे गोप तर नाही ना.श्रीमता वरती चालले नाही तर मायेच्या जाळ्यात अडकू शकतात. बाबांनी मातांची कमिटी बनवली,त्यांच्या हवाली सर्व काही केले.पुरुष कधी कधी दिवाऴ काढतात, स्त्रिया नाही.तर बाबा कलष मातावरती ठेवतात.या ज्ञानमार्गत कधीकधी माता पण दिवाळ काढतात पद्मापदम भाग्यशाली जे बनणारे आहेत, ते मायेशी हार खाऊन आसुर बनू शकतात. यामध्ये स्त्री-पुरुष दोन्ही दिवाऴ काढू शकतात. अनेक हार खाऊन चालले गेले ना.बाबा समजतात भारतवासींनी पूर्णपणे दिवाऴ काढलेले आहे. माया खूपच जबरदस्त आहे,समजू पण शकत नाही आम्ही कुठे होतो,एकदमच खाली येऊन पडलो. यथे पण उंच चढत चढत,परत श्रीमताला विसरून आपल्या मनमता वरती चालतात, तर दिवाऴ काढतात.ते लोक तर दिवाऴ काढतात तर पाच सात वर्षानंतर परत उभे राहतात.येथे तर ८४ जन्माचे दिवाऴ काढतात,ज्यामुळे श्रेष्ठपद मिळू शकत नाही.दिवाऴ काढतच राहतात.बाबांच्या कडे फोटो असते तर सांगितले असते.तुम्ही म्हणाल बाबा तर बरोबर समजवत आहेत.असे पण महारथी होते,अनेकांना ज्ञान देत होते,ते आज नाहीत,दिवाऴ काढले आहे. बाबा घडीघडी मुलांना सावधान करतात.आपल्या मतावर कमिटी बनवणे त्यामध्ये काहीच ठेवलं नाही.आप आपसा मध्ये मिळून व्यर्थ चिंतन करत राहतात,हा असा करतो,अमका असे करतो इत्यादी दिवस भर हेच करत राहतात.बाबांशी बुद्धी लावल्यामुळे सतोप्रधान बनू शकतात.बाबांचे बनले आणि बाबांशी योग नाही, तर घडीघडी तुम्ही विकारा मध्ये पडतात.बाबांशी संबंध राहत नाही.बाबांशी योग राहिला नाही तरी घाबरायला नाही पाहिजे.आम्हाला माया इतकी तंग का करते,प्रयत्न करून बाबा सोबत संबंध जोडायला पाहिजेत,नाहीतर बॅटरी चार्ज कशी होईल.विर्कम झाल्यामुळेच बॅटरी डिस्चार्ज होते.यज्ञाच्या सुरुवातीला अनेक मुलं बाबांचे बनले,भट्टीमध्ये आले,परत आज कुठे आहेत?विकारात गेले कारण जुन्या दुनियेची आठवण आली.आता बाबा म्हणतात मी तुम्हाला बेहदचे वैराग्य देतो,तुम्ही या विकारी दुनिया मध्ये मन लावू नका.मन स्वर्गा मध्ये लावा.जर असे लक्ष्मीनारायण सारखे बनवायचे आहे तर,कष्ट पण घ्यावे लागतील.बुद्धी योग एक बाबांच्या सोबतच पाहिजे.जुन्या दुनिये पासून वैराग्य.सुखधाम आणि शांतीधाम ची आठवण करा.जेवढे शक्य होईल उठता बसता,चालता-फिरता आठवण करा. हे तर खूपच सहज आहे.तुम्ही इथे आलेले आहात नरा पासून नारायण बनण्यासाठी.सर्वांना सांगा आता सतोप्रधान बनवायचे आहे कारण परतीचा प्रवास आहे.विश्वाच्या इतिहास आणि भूगोला ची पुनरावृत्ती म्हणजेच नरकापासून स्वर्ग,परत स्वर्गा पासुन नर्क हे चक्र फिरत राहते.

बाबा म्हणतात जेव्हा येथे बसता स्वदर्शन चक्रधारी होऊन बसा.याच आठवणीमध्ये राहा,आम्ही किती वेळेस चक्र लावले.आता परत आम्ही देवता बनत आहोत.दुनिया मध्ये कोणी पण या रस्त्याला जाणत नाहीत.हे ज्ञान देवता त्यामध्ये पण नाही.ते तर पवित्र आहेत,त्यांच्यामध्ये ज्ञानच नाही,जे शंक वाजवतील.ते पवित्र आहेत त्यांना हे अलंकार द्यायची आवश्यकता नाही.तुम्हाला पण हे अलंकार देऊ शकत नाहीत कारण तुम्ही आज देवता बनतात परत उद्या असुर बनतात. बाबा देवता बनवतात परत माया असुर बनवते.बाबा जेव्हा समजवतात तेव्हाच माहित होते की आमची खरोखर अवस्था चांगली नाही.अनेक बिचारी मुलं शिवबांच्या खजाना मध्ये जमा करतात,परत माघारी घेऊन असुर बनतात.यामध्ये योगाची कमी आहे. योगाद्वारे पवित्र बनायचे आहे.तुम्ही बोलवता पण बाबा या आणि आम्हाला पतीत पासून पावन बनवा,ज्यामुळे आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकू. आठवणीची यात्रा आहेच पावन बणुन उच्च पद घेण्यासाठी.जे ज्ञान सोडून जातात,परत जे ऐकले आहे तर शिवालय मध्ये येतील जरूर.परत पद कसे पण मिळेल.एका वेळेस आठवण केली तरी स्वर्गामध्ये येतील जरूर बाकी श्रेष्ठ पद मिळू शकणार नाही.स्वर्गाचे नाव ऐकून खुश व्हायला पाहिजे.नापास होऊन पाई पैशाचे पद मिळाले तर यामध्ये खुश व्हायचे नाही.स्वर्गा मध्ये जाणीव तर होते ना, मी नोकर आहे अंतकाळात तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील की,आम्ही काय बनू.माझ्या द्वारे हे विर्कम झाले,ज्यामुळे अशी परिस्थिती झाली. मी महाराणी का नाही बनणार? पाऊलो पाऊली खबरदारी घेतल्यामुळे,तुम्ही पद्मापदमपती बनू शकतात.मंदिरांमध्ये देवतांचे अलंकार दाखवतात,दर्जामध्ये तर फरक असतो ना. आजच्या राजाचा पण खूप दबदबा राहतो,तेही अल्प काळासाठी.सदा काळचे राजे तर बनू शकत नाहीत.तर आत्ता बाबा म्हणतात तुम्हाला लक्ष्मीनारायण सारखे बनायचे असेल तर पुरुषार्थ पण असच करा. तपासून पहा किती आम्ही अनेकांचे कल्याण करतो,अंतर्मुखी होऊन किती वेळ बाबांच्या आठवणी मध्ये राहतो.आता आम्ही जात आहोत आपल्या गोड घरी,परत सुखधाम मध्ये येऊ. या ज्ञानाचे मंथन चालायला पाहिजे. बाबा मध्ये ज्ञान आणि योग दोन्ही आहे, तसेच तुमच्यामध्ये पण व्हायला पाहिजे.तुम्ही जाणता आम्हाला बाबा शिकवत आहेत,ज्ञान पण आहे आणि आठवण पण आहे.ज्ञान आणि योग दोन्ही सोबत पाहिजे.असे नाही योगा मध्ये बसलो, बाबांची आठवण करत आहे आणि ज्ञान विसरलो. बाबा योग शिकवतात तर ज्ञान विसरतात का? सर्व ज्ञान त्यांच्यामध्ये राहते,तुम्हा मुलांमध्ये पण हे सर्व ज्ञान राहायला पाहिजे,असे शिकायला पाहिजे. जसे कर्म मी करेल, मला पाहून दुसरे पण करतील. मी मुरली वाचणार नाही तर दुसरे पण वाचणार नाहीत.खोटा अहंकार येतो,तर लगेच माया आघात करते.पाऊलो पावली बाबांकडून श्रीमत घेत राहायचे आहे,नाहीतर काहीना काही विकर्म होत राहतात.अनेक मुलं चुका करून पण बाबांना सांगत नाहीत, तर आपलाच सत्यानाश करतात. गफलत केल्यामुळे माया चापट मारते,कवडी तुल्य बनवते.अहंकारा मध्ये आल्यामुळे माया खूप विकर्म करवते.बाबांनी असे थोडेच म्हणले आहे, अशाप्रकारे भाऊ लोकांची कमिटी बनवा? कमिटीमध्ये एक-दोन समजदार, हुशार मुली पण पाहिजेत,ज्यांच्या मतावर ते काम चालेल.तसे तर लक्ष्मी वरती ज्ञानाचा कलश ठेवला आहे ना.गायन पण आहे अमृत पीत होते आणि यज्ञांमध्ये विघ्न पण घालत होते.अनेक प्रकारचे विघ्ने घालणारे, स दिवसभर व्यर्थ चिंतन करत राहतात.हे खूपच खराब आहे.अशी कोणती गोष्ट असेल तर बाबांना सांगायला पाहिजे.सुधारणारे तर एकच बाबा आहेत,तुम्ही आपल्या हातामध्ये कायदा घेऊ नका. तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये रहा,सर्वांना बाबांचा परिचय देत राहा,तेव्हाच असे बनू शकाल.माया खूपच खडक आहे,कोणालाच सोडत नाही.नेहमी बाबांना समाचार लिहित रहा,सूचना घेत रहा.तसे तर मुरली द्वारे सूचना मिळत राहतात.मुलं समजतात बाबांनी या विषयावर समजावले आहे, बाबा अन्तर्यामी आहेत.बाबा म्हणतात मी अंन्तर्यामी नाही,मी तर ज्ञान शिकवतो,यामध्ये अन्तर्यामी ची गोष्ट नाही.होय हे जाणतो,सर्व माझी मुल आहेत.प्रत्येक शरीरा मध्ये आत्मा आहे,बाकी असे नाही सर्व मुलांच्या मध्ये बाबा विराजमान आहेत.मनुष्य तर उलटे समजतात.बाबा म्हणतात मी जाणतो सर्वांच्या भ्रकूटी मध्ये आत्म विराजमान आहे. या तर खूपच सहज गोष्टी आहेत.सर्व चैतन्य आत्मे आपापल्या आसनावर भ्रकुटी मध्ये बसले आहेत,तरीही परमात्माला सर्वव्यापी म्हणतात. एकच मोठी चूक आहे,या कारणामुळेच भारताची अधोगती झालेली आहे.बाबा म्हणतात तुम्ही माझी खूप निंदा केली आहे.विश्वाचे मालक बनवणाऱ्या बाबांची तुम्ही निंदा केली आहे, म्हणून बाबा म्हणतात यदा यदा हि धर्मस्य... परदेशी लोक पण हे सर्वव्यापीचे ज्ञान भारतवासी कडून शिकले आहेत.जसे भारतवासी त्यांच्याकडून कला शिकतात,परत हे उलटे ज्ञान शिकले आहेत. तुम्हाला तर एकाच बाबांच्या आठवणीत राहायचे आहे आणि बाबांचा परिचय पण सर्वांना द्यायचा आहे.तुम्ही अंधांची काठी आहात.काठी द्वारे रस्ता दाखवतात ना.
अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबांच्या आज्ञेनुसार प्रत्येक कार्य करायचे आहे,कधीच श्रीमताचे उल्लंघन करायचे नाही.तेव्हाच सर्व इच्छा,न मागता पूर्ण होतील.साक्षात्काराची इच्छा ठेवायची नाही. इच्छा मात्र अविद्या बनायचे आहे.

2. आप आपसामध्ये मिळून व्यर्थ चिंतन करायचे नाही.अंतर्मुख होऊन स्वतःला तपासायचे आहे, आम्हाला बाबांची किती वेळ आठवण राहते. ज्ञानाचे मंथन चालते का?

वरदान:-
बिंदू रुपा मध्ये स्थिर राहून,दुसर्यांना पण अविनाशी नाटकाच्या बिंदूची स्मृति देणारे विघ्नविनाशक भव.

जे मुलं कोणत्या ही गोष्टीमध्ये प्रश्नचिन्ह करत नाहीत,ती नेहमी बिंदू रूपामध्ये स्थिर राहून प्रत्येक कार्या मध्ये दुसऱ्यांना पण नाटकाच्या बिंदूची स्मृति देतात,त्यांना विघ्नविनाशक म्हटले जाते.दुसऱ्यांना पण समर्थ बणवुन सफलते च्या लक्षात पर्यंत घेऊन जातात.ते सिमित सफलता च्या प्राप्ती ला पाहून खुश होत नाहीत परंतु बेहदचे सफलता मूर्त असतात. सदा एकरस श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थिर राहतात. ते आपल्या सफलतेच्या स्व-स्थिती द्वारे असफलतेला पण परिवर्तन करतात.

बोधवाक्य:-
आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद द्या तर, खूपच लवकर मायाजीत बणुन जाल.