01-11-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   11.04.86  ओम शान्ति   मधुबन


श्रेष्ठ भाग्याचे चित्र बनवण्याची युक्ती


आज भाग्य बनवणारे बापदादा, सर्व मुलांच्या श्रेष्ठ भाग्याचे चित्र पाहत आहेत. भाग्यवान सर्व बनले आहेत परंतु प्रत्येकाच्या भाग्याच्या चित्राची चमक आपापली आहे. जसे कोणी चित्रकार, चित्र बनवतात तर, काही चित्र हजारो रुपयाचे किमती, अमूल्य असते, काही साधारण पण असतात. येथे बापदादा द्वारा मिळालेल्या भाग्याला, चित्रांमध्ये बनवणे म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करणे. यामध्ये अंतर होते. भाग्य बनवणाऱ्यांनी एकाच वेळेत, एकानेच सर्वांचे भाग्य बनवले परंतु चित्रांमध्ये आणणारे, प्रत्यक्षात वापरणारे आत्मे, वेगवेगळे असल्यामुळे, जे चित्र बनवले आहे, त्यामध्ये क्रमानुसार दिसून येतात. कोणत्याही चित्राची विशेषता, त्याचे डोळे आणि चेहऱ्याच्या प्रफुल्लते वरती आधारीत असते. या दोन विशेषते मुळे, चित्राची किंमत ठरते. तर येथे पण भाग्याचे चित्र याच दोन विशेषता मुळे आहेत. डोळे म्हणजे आत्मिक विश्व कल्याणी, दयाळू आणि परोपकारी दृष्टी. जर दृष्टी मध्ये हे वैशिष्ट्य आहे, तर भाग्याचे चित्र श्रेष्ठ आहे. मुख्य गोष्ट आहे दृष्टी आणि हर्षितमुखता, चेहऱ्याची चमक. हे आहे नेहमी संतुष्ट राहण्याची संतुष्टता, प्रसन्नतेची चमक आहे. याच विशेषता द्वारे नेहमीच चेहऱ्यावरती आत्मिक हास्य अनुभव होते. या दोन विशेषताच, चित्राची किंमत वाढवतात. तर आज हे पाहत होते. भाग्याचे चित्र सर्वांनी बनवले आहे. चित्र बनवण्याचे कलम बाबांनी सर्वांना दिले आहे. ते कलम आहे, श्रेष्ठ स्मृती आणि श्रेष्ठ कर्माचे ज्ञान. श्रेष्ठ कर्म आणि श्रेष्ठ संकल्प म्हणजे स्मृती. या ज्ञानाच्या कलमद्वारे प्रत्येक आत्मा आपल्या भाग्याचे चित्र बनवत आहे आणि बनवले पण आहे. भाग्य तर बनले आहे. डोळे, रूप पण बनले आहे. आत्ता शेवटचा हात म्हणजे संपूर्णतेचा आहे, बाप समान बनण्याचा आहे. दुहेरी परदेशी चित्र बनवणे जास्त पसंत करतात ना. तर बापदादा सर्वांचे भाग्य पाहत होते. प्रत्येक जण आपले भाग्य पाहू शकतात ना, चित्र किती मूल्यवान, किमती बनले आहे. नेहमी आपल्या आत्मिक चित्राला पाहून यामध्ये संपूर्णता आणत चला. विश्वातील आत्म्या पेक्षा, तर श्रेष्ठ भाग्यवान, कोटी मधून काही आणि काही मध्ये पण काही, अमूल्य आणि श्रेष्ठ भाग्यवंत तर आहातच परंतु एक आहेत श्रेष्ठ आणि दुसरे श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत. तर श्रेष्ठ बनले आहेत की, श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनले आहात, हे तपासून पाहायचे आहे. अच्छा.

आता दुहेरी परदेशी स्पर्धा करतील ना, पुढे नंबर घ्यायचा आहे, जे अग्रक्रमांका मध्ये आहेत त्यांना पाहून खुश व्हायचे आहे. दुसऱ्यांना पाहून आनंदित होणे पण आवश्यक आहे परंतु स्वतः पाठीमागे राहून पाहू नका‌, सोबत असताना दुसऱ्यांना पाहून आनंदित होत चला. स्वतः पण पुढे चला आणि पाठीमागे असणाऱ्यांना पण पुढे घेत चला, यालाच पर उपकारी म्हणतात. हे परोपकारी बनणे, याची विशेषता आहे, स्वार्थ भावापासून नेहमी मुक्त राहणे. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये सहयोगी, संघटनांमध्ये जितके निस्वार्थ पणा असेल, तेवढेच परोपकारी बनाल. नेहमी स्वतःला भरपूर अनुभव करतील, नेहमी प्राप्ती स्वरूपाच्या स्थितीमध्ये असतील, तेव्हा परोपकारीच्या अंतिम स्थिती चा अनुभव करून, दुसऱ्यांना पण करवू शकतील‌. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, अंतिम वेळेतील स्थिती, उपराम आणि परोपकारी, या विशेषतः नेहमी पहिल्या. स्वतःच्या प्रती काहीच स्वीकार केले नाही. न महिमाचा स्वीकार केला, न वस्तू स्वीकार केल्या, न राहण्याचे स्थान स्वीकार केले. स्थुल आणि सुक्ष्म मध्ये, "प्रथम मुलं" यालाच परोपकारी म्हणतात. हेच संपूर्णतेच्या संपन्नताची लक्षणं आहेत, समजले.

मुरली तर पुष्कळ ऐकल्या आहेत, आता मुरलीधर बनून, नेहमी नाचत राहा, आणि नाचवत राहायचे आहे, म्हणजे आनंदीत राहायचे आहे. मुरली द्वारे सापाच्या विषाला पण समाप्त करतात. तर असे मुरलीधर आहात, जे कोणाचा कितीही कडवा स्वभाव संस्कार असेल, त्याला पण वश करून, म्हणजे त्यापासून मुक्त करून त्यांना पण आनंदीत बनवा. आत्ता परिणाम पाहतील की, कोण कोण असे, योग्य मुरलीधर बनले आहेत‌. मुरली विषयी प्रेम आहे, तर मुरलीधर सोबत पण प्रेम आहे परंतु प्रेमाचा पुरावा आहे, जे मुरलीधरची प्रत्येक मुलांप्रति शुभ इच्छा आहे, प्रत्यक्षामध्ये दाखवायचे आहे. प्रेमाची लक्षणं आहेत, जे म्हटले ते, करून दाखवायचे आहे‌. असे मास्टर मुरलीधर आहात ना. बनायचे आहेच, आता नाही बनणार, तर कधी बनणार. नंतर बनू हा विचार पण करू नका, करायचे आहेच. प्रत्येकानी हा विचार करायचा की, आम्ही करणार नाही तर, कोण करेल. आम्हालाच करायचे आहे, बनायचे आहे‌च. कल्पाची बाजी जिंकायची आहे. पूर्ण कल्पाची गोष्ट आहे. तर प्रथम वर्गामध्ये यायचे आहे, ही दृढता धारण करायची आहे, कोणती नवीन गोष्ट करत आहात काय? अनेक वेळेस केलेली गोष्ट, फक्त रेषेच्या वरती रेषा ओढत आहात. अविनाशी नाटकाची रेषा ओढलेली आहे. नवीन रेषा पण मारत नाहीत. जे विचार करतात की माहित नाही, सरळ होईल की नाही. कल्प कल्प बनवलेल्या भाग्याला फक्त बनवतात, कारण कर्माच्या फळाच्या हिशोब आहे. बाकी नविन काय आहे? ही तर खूप जुनी गोष्ट आहे, झालेली आहे. हा अटळ निश्चय आहे, याला दृढता म्हणतात, तपस्वी मूर्त पण म्हणतात. प्रत्येक संकल्पा मध्ये दृढता म्हणजे तपास्या, अच्छा.

बाबा सर्वोच्च आयोजक पण आहेत आणि स्वर्णिम पाहुणे पण आहेत. आयोजक म्हणून भेटत पण आहेत आणि पाहुणे बनून पण येतात, परंतु स्वर्णिम पाहुणे आहेत. चमकणारे आहेत ना. पाहुणे तर खूप पाहिले आहेत परंतु स्वर्णिम पाहुणे पाहिले नाहीत. जसे प्रमुख पाहुण्यांना बोलतात तर त्यांना धन्यवाद देतात. तर ब्रह्मा बाबांनी पण आयोजक म्हणून इशारे दिले आहेत आणि पाहुणे बनून सर्वांचे अभिनंदन करत आहेत, शुभेच्छा देत आहेत‌. ज्यांनी पूर्ण मौसम मध्ये सेवा केली, त्या सर्वांना स्वर्णिम पाहुण्याच्या रूपामध्ये शुभेच्छा देत आहेत. सर्वप्रथम शुभेच्छा कोणाला देतात? निमित्त दादीजींना. बापदादा शुभेच्छा देत आहेत. मधुबन निवासींना निर्विघ्न हर्षित बनून पाहुणचार केल्याबद्दल विशेष शुभेच्छा देत आहेत. भगवान पण पाहुणे बनून आले आणि मुलं पण. ज्यांच्या घरांमध्ये भगवान पाहुणे बनून येतील तर ते किती भाग्यशाली आहेत. रथाचे पण अभिनंदन आहेत, कारण ही भूमिका वठेवणे काही कमी गोष्ट नाही, इतक्या शक्तीला इतका वेळ प्रवेश केल्यावर धारण करणे, ही पण विशेष भूमिका आहे. परंतु या सामावण्याच्या शक्तीचे फळ तुम्हा सर्वांना मिळत आहे. तर सामावण्याच्या शक्तीच्या विशेषते मुळे, बापदादाच्या शक्तीला सामवणे, ही पण विशेष भूमिका आहे किंवा गुण आहे. तर सर्व सेवाधारी मध्ये, ही पण सेवेची विशेष भूमिका वठवणारी निर्विघ्न राहिले. यासाठी शुभेच्छा आणि पद्मापदम धन्यवाद. दुहेरी परदेशींना पण दोनदा धन्यवाद, कारण दुहेरी परदेशींने मधुबन ची शोभा खूप वाढवली आहे. ब्राह्मण परिवाराचा शृंगार दुहेरी परदेशी आहेत. ब्राह्मण परिवारामध्ये देशवासीं सोबतच परदेशी पण आहेत, तर पुरुषार्थाच्या पण शुभेच्छा आणि ब्राह्मण परिवाराच्या श्रृगांरा साठी पण शुभेच्छा देत आहेत. मधुबन परिवाराची विशेष विशेष भेट आहात, म्हणून दुहेरी परदेशींना दोनदा शुभेच्छा देत आहेत. परत ते कुठे पण असतील. समोर तर थोडे आहेत परंतु चहूबाजूच्या भारतवासी मुलांना आणि दुहेरी परदेशी मुलांना मोठ्या मनाने शुभेच्छा देत आहेत. प्रत्येकाने खूप चांगली भूमिका वठवली आहे. आता फक्त एकच गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे समान आणि संपूर्ण बनणे. दादी पण खूप चांगले कष्ट घेत आहेत. बापदादा, दोघांची भूमिका साकार मध्ये वठवत आहेत, म्हणून बापदादा मनापासून स्नेहाने शुभेच्छा देत आहेत. सर्वांनी खूप चांगली भूमिका वठवली आहे. सर्वांगीन भुमिका करणारे सेवाधारी, त्यासोबत लहान साधारण सेवा आहे, परंतु ती पण महान आहे. प्रत्येकाने आपले भाग्य जमा केले आणि पुण्य पण केले. सर्व देश, परदेशाची मुलं मधुबनला पोहचले, याची पण विशेषता अभिनंदन योग्य आहे. सर्व महारथींने मिळून सेवेचा श्रेष्ठ संकल्प प्रत्यक्षामध्ये आणला आणि आणत राहतील. सेवेमध्ये जे निमित्त आहेत, त्यांना पण कष्ट द्यायचे नाहीत. आपल्या आळसामुळे कोणाकडून कष्ट घ्यायला नकोत. आपल्या वस्तूंना सांभाळणे हे पण ज्ञान आहे. तुम्हाला आठवते का ब्रह्मा बाबा काय म्हणत होते? एखादा हातरुमाल हरवला, परत कधी स्वतःला पण हारवू शकतील. प्रत्येक धर्मामध्ये श्रेष्ठ आणि सफल राहणे, यालाच ज्ञानसंपन्न म्हणतात. शरीराचे पण ज्ञान, आत्म्याचे पण ज्ञान आहे. दोन्ही ज्ञान प्रत्येक कर्मामध्ये पाहिजे‌. शरीराच्या आजारपणाचे पण ज्ञान पाहिजे‌ माझे शरीर कोणत्या विधीद्वारे ठिक चालू शकते. असे पण नाही, आत्मा तर शक्तिशाली आहे, परत शरीर कसेही असू द्या? शरीर ठीक नसेल तर योग पण लागणार नाही. परत शरीर आपल्याकडे आकर्षित करते, त्यामुळे ज्ञानसंपन्न आत्म्यामध्ये हे सर्व ज्ञान येते, अच्छा.

काही कुमारींचा समर्पण समारोह, बापदादांच्या समोर सपंन्न झाला.

बापदादा सर्व विशेष आत्म्यांना खूप सुंदर, शृंगारीत केलेले पाहत आहेत. दैवी गुणांचा शृंगार खूप सुंदर आणि सर्वांना शोभनिक बनवत आहेत. प्रकाशाचा मुकुट खूप सुंदर चमकत आहे. बापदादा अविनाशी श्रृगांरीत चेहऱ्यांना पाहत आहेत. बापदादांना मुलांचा, उमंग उत्साहाचा संकल्प पाहूनआनंद होत आहे. बापदादानी सर्वांना नेहमीसाठी पसंत केले आहे. तुम्ही पण चांगल्या प्रकारे पसंत केले आहे ना. दृढ संकल्पाचा हाथियाला बांधला आहे ना. बापदादांच्या जवळ प्रत्येकाच्या मनाचा स्नेहाचा संकल्प फार लवकर पोहोचतो. आता संकल्पा मध्ये पण हे श्रेष्ठ बंधन दिले ढिल्ले व्हायला नको. इतके पक्के बांधलेले आहे ना. किती जन्मांचा वायदा केला आहे. ब्रह्मा बाबांच्या सोबत नेहमी संबंधांमध्ये येण्याचा पक्का वायदा आहे आणि खात्री पण आहे की, नेहमी वेगवेगळ्या नाव रूप, सबंधांमध्ये २१ जन्मापर्यंत सोबत राहू. तर किती आनंद आहे. हिशोब करू शकतात? याचा हिशोब काढणारे कोणीही नाहीत. आता असेच नेहमी शृंगारीत राहा, नेहमी मुकुटधारी राहणे आणि नेहमी आनंदामध्ये हसत गात आत्मिक मौज मध्ये राहायचे आहे. सर्वांनी दृढ संकल्प केला आहे की, पाऊल, पाऊलावर ठेवणारे बनू. ते तर स्थूल पाऊल, पावलावरती ठेवतात परंतु तुम्ही सर्व संकल्परुपी पावलावर, पाऊल ठेवणारे आहात ना. जो बाबांचा संकल्प, तो मुलांचा संकल्प. असा संकल्प केला आहे? एक पाऊल पण बाबांच्या पावला शिवाय येथे-तेथे ठेवायचे नाही. प्रत्येक संकल्प समर्थ करणे म्हणजेच, बाबांच्या सारखे पावलावर पाऊल ठेवणे आहे, अच्छा.

दुहेरी परदेशी भाऊ- बहिणीसोबत वार्तालाप:-

जसे विमानामध्ये उडत उडत आले, तसेच बुध्दीरुपी विमान पण इतकेच तिव्र गतीने उडत राहते ना, कारण ते विमान परिस्थिती प्रमाण, जरी मिळाले नाही परंतु बुद्धी रुपी विमान नेहमी सोबत आहे आणि नेहमी शक्तिशाली आहे. तर सेकंदांमध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचू शकतात. तरी या विमानाचे मालक आहात ना. नेहमी हे बुद्धीचे विमान तयार राहावे, म्हणजे बुद्धीची लाईन नेहमी स्पष्ट हवी. बुद्धी नेहमीच बाबांच्या सोबत शक्तिशाली हवी, तेव्हाच जेथे पाहिजे तेथे सेकंदामध्ये पोहोचू शकाल. ज्याच्या बुद्धीचे विमान पोहोचते, त्याचे ते विमान पण चालत राहते. बुध्दीचे विमान ठीक नाही, तर ते विमान पण चालू शकत नाही.

पार्टीसोबत वार्तालाप:

१) नेहमी स्वतःला राजयोगी श्रेष्ठ आत्मा अनुभव करता ना. राजयोगी म्हणजे सर्व कर्म इंद्रियांचे राजा. राजा बनून सर्व कर्मेंद्रियांना चालवणारे, ना की कर्म इंद्रियांच्या वश होऊन चालणारे. जे कर्म इंद्रियाच्या वश होऊन चालणारे आहेत, त्यांना प्रजायोगी म्हणाल, ना की राजयोगी. जेव्हा ज्ञान मिळाले की, या कर्मेंद्रिया माझ्या कर्मचारी आहेत, मी मालक आहे, तर मालक कधी सेवाधारी होऊ शकत नाहीत. कोणी कितीही प्रयत्न केले परंतु राजयोगी आत्मे नेहमी श्रेष्ठ राहतील. नेहमी राज्य करण्याचे संस्कार आत्ता

राजयोगी जीवनामध्ये भरायचे आहेत. काही होऊदे, हे स्वमान नेहमी आठवणीत ठेवा की, मी राजयोगी आहे. सर्व शक्तिमान ची शक्ती आहे. सर्वशक्तीवानचे बळ आहे, भरोसा आहे तर सफलता अधिकाराच्या रुपामध्ये मिळत राहते. अधिकार सहज प्राप्त होतो, कठीण वाटत नाही. सर्व शक्तीच्या आधारा द्वारे, प्रत्येक कार्य सफल झालेलेच आहे. नेहमी नशा राहावा की, मी ह्रदयासीन आत्मा आहे‌. हा नशा अनेक चिंता पासून मुक्त करतो. नशा नाही तर चिंताच चिंता आहे. तर नेहमी स्वमान मध्ये राहत, वरदानी बनून वरदान देत चला. स्वतः संपन्न बनून दुसऱ्यांनाही संपन्न बनवायचे आहे. दुसऱ्यांना संपन्न बनवणे म्हणजे स्वर्गाच्या आसनाचे प्रमाणपत्र देणे, कागदाचे प्रमाणपत्र नाही, अधिकाराचे, अच्छा.

२) प्रत्येक पाऊला मध्ये पदमाची कमाई जमा करणारे, अखुट खजान्याचे मालक बनले ना. असा आनंदाचा अनुभव करतात ना, कारण आजकालची दुनियाच धोकेबाज आहे. धोकेबाज दुनिया पासून किनारा केला. धोका देणाऱ्या दुनियेचे आकर्षण तर नाही ना. सेवा अर्थ संबंध, दुसरी गोष्ट आहे परंतु मनाचे आकर्षण नको. तर नेहमी स्वतःला श्रेष्ठ आत्मा, नेहमी बाबांचे प्रिय आहोत, याच नशेमध्‍ये राहा. जसे बाबा तसाच मुलगा, पावलावर पाऊल ठेवत म्हणजेच अनुकरण करत चला, तर

बाप समान बनाल. समान बनणे म्हणजे संपन्न बनणे. ब्राह्मण जीवनाचे हे तर कार्य आहे.

३) नेहमी स्वतःला बाबांच्या आत्मिक बागेतील, आत्मिक गुलाब समजता ना. सर्वात सुगंधित पुष्प गुलाबाचे असते. गुलाबजल अनेक कार्यामध्ये लावतात, रंग रूपामध्ये गुलाब सर्वात प्रिय आहे. तर तुम्ही सर्व आत्मिक गुलाब आहात. तुमचा आत्मिक सुगंध दुसऱ्यांना पण स्वतःच आकर्षित करतो. कोठेही सुगंधाची गोष्ट असते, तर सर्वांचे लक्ष स्वतःच जाते. तर तुम्हा आत्मिक गुलाबाचा सुगंध विश्वाला आकर्षित करणारा आहे, कारण विश्वाला या आत्मिक सुगंधाची आवश्यकता आहे, म्हणून नेहमी स्मृतीमध्ये ठेवा की, मी अविनाशी बागेतील अविनाश गुलाब आहे‌‌ कधी कोमेजणार नाही, नेहमी उमललेले फूल आहे. असे उमललेले गुलाब नेहमी सेवेमध्ये स्वतः निमित्त बनतात. आठवणीचा, शक्तीचा, गुणांचा सर्व सुगंध सर्वांना देत रहा. स्वतः बाबांनी येऊन मुलांना तयार केले आहे आणि फार वर्षांनी भेटलेले, प्रेमळ आहात, अच्छा‌.

वरदान:-
अनासक्त आणि प्रिय बनण्याचे रहस्य जाणून, आनंदित राहणारे, राज़युक्त भव.

जे मुलं प्रवृत्ती मध्ये राहताना अनासक्त्त आणि प्रिय बनण्याचे रहस्य जाणतात, ते नेहमी स्वतः पण स्वतःशी आनंदी राहतात, प्रवृत्तीला पण आनंदी ठेवतात. सोबतच खरे मन असल्यामुळे, साहेब पण नेहमी त्यांच्यावर ती खुश राहतात. असे आनंदित राहणारे रहस्य युक्त मुलांना, आपल्या प्रती व दुसऱ्यांच्या प्रती कोणाला काजी बनवण्याची आवश्यकता राहत नाही. कारण ते आपला निर्णय स्वतः करतात म्हणून त्यांना कोणाला काजी, वकील किंवा न्यायाधीश बनवण्याची आवश्यकता राहत नाही.

सुविचार:-
सेवेमध्ये जे आशीर्वाद मिळतात, ते आर्शिवादच निरोगी बनण्याचा आधार आहे.