02-02-2020    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.11.1985   ओम शान्ति   मधुबन


भगवंताच्या भाग्यवान मुलांची लक्षणे


बाप दादा सर्व मुलांच्या मस्तका वरती भाग्याची रेषा पाहत आहेत.प्रत्येक मुलांच्या मस्तका वरती भाग्याच्या रेषा आहे परंतु कोणत्या कोणत्या मुलांची रेषा स्पष्ट आहे आणि कोणत्या कोणत्या मुलांची अस्पष्ट रेषा आहे.ज्या वेळे पासून भगवंत पित्याचे बनले,भगवान म्हणजेच भाग्यविधाता. भगवान म्हणजे दाता विधाता,म्हणून मुलं बनल्यानंतर भाग्याचा अधिकार अर्थात वारसा सर्व मुलांना अवश्य प्राप्त होतो. परंतु त्या मिळालेल्या वारस्याला जीवनामध्ये धारण करणे आणि सेवे मध्ये लावून श्रेष्ठ बनवणे,स्पष्ट बनणे यामध्ये नंबरा नुसार आहेत. कारण हे भाग्य जितके स्वतः प्रति किंवा सेवा प्रती प्रत्येक कार्यामध्ये लावतात तर तेवढेच वाढते,म्हणजे रेषा स्पष्ट होते. बाबा एक आहेत आणि देतात पण सर्वांना एक सारखेच. बाबा नंबरा नुसार भाग्य वाटत नाहीत परंतु भाग्यवान बनणारे इतक्या मोठ्या भाग्याला प्राप्त करण्यामध्ये यथाशक्ति झाल्यामुळे नंबरा नुसार बनतात, म्हणून कोणाची रेषा स्पष्ट आहे कोणाची अस्पष्ट रेषा आहे.स्पष्ट रेषा असणारे स्वतः प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला भाग्यवान अनुभव करतात.सोबतच त्यांच्या चेहऱ्याद्वारे आणि चलनाद्वारे भाग्याचा दुसऱ्यांना पण अनुभव होतो.दुसरे पण अशा भाग्यवान मुलांना पाहून विचार करतात आणि म्हणतात हे आत्मे खूपच भाग्यवान आहेत,यांचे भाग्य खूप श्रेष्ठ आहे.तर स्वतःला विचारा,प्रत्येक कर्मामध्ये भगवंताची मुलं बणुन भाग्यवान अनुभव करता का?भाग्य तुमचा वारसा आहे. वारसा कधी प्राप्त होणार नाही,असे होऊ शकत नाही.भाग्याला वारस्याच्या रुपामध्ये अनुभव करता का?की कष्ट करावे लागतात.वारसा सहज प्राप्त होतो,कष्ट नाहीत.लौकिक मध्ये पण पित्याच्या खजान्या वरती,वारशा वरती मुलांचा स्वतः अधिकार असतो आणि नशा पण राहतो, पित्याचा वारसा मिळाला आहे.असा भाग्याचा नशा आहे? की चढतो आणि उतरत राहतो.अविनाश वारसा आहे तर किती नशा राहायला पाहिजे.एक जन्म तर काय अनेक जन्माचे भाग्य,जन्मसिद्ध अधिकार आहे.असे नशे द्वारे वर्णन करत राहतात.नेहमी भाग्याची झलक प्रत्यक्ष रूपामध्ये दुसऱ्यांना दिसून यायला पाहिजे. फलक आणि झलक दोन्ही पाहिजेत.कायम आहे की तात्पुरते आहे? भाग्यवान आत्म्याची लक्षणे,भाग्यवान आत्म्याचे नेहमी पालन-पोषण होत राहते,गालिच्या वरती चालतील, झोक्या मध्ये झोके घेत राहतील,माती मध्ये पाय ठेवणार नाहीत,कधीच पाय घाण करणार नाहीत. दुसरे लोक तर गालिच्या वरती चालतात आणि तुम्ही बुद्धी रूपी पाय नेहमी जमिनीच्या ऐवजी फरिश्ताच्या दुनिये मध्ये राहतात.या मातीच्या दुनिये मध्ये पाय ठेवत नाहीत अर्थात बुद्धी खराब करत नाहीत.भाग्यवान मातीच्या खेळण्या बरोबर खेळत नाहीत.नेहमी रत्ना बरोबर खेळतात.भाग्यवान नेहमी संपन्न राहतात म्हणून इच्छा मात्र अविद्या, या स्थितीमध्ये राहतात.भाग्यवान आत्मा नेहमी महादानी पुण्यात्मा बणुन दुसऱ्यांचे पण भाग्य बनवत राहतात.भाग्यवान आत्मा नेहमी,ताज,सिंहासन,तिलकधारी असतात. भाग्यवान आत्मा जेवढे अधिकारी तेवढेच, त्यागधारी आत्मा पण असतात.भाग्याची लक्षणे त्याग आहे.त्याग भाग्याला स्पष्ट करतत.भाग्यवान आत्मा नेहमी भगवान समान निराकारी, निरंहकारी आणि निर्विकारी,या तिन विशेषता द्वारे भरपूर राहते.ही सर्व लक्षणे स्वतःमध्ये अनुभव करता का?भाग्यवान च्या यादीमध्ये तर आलेत ना परंतु यथाशक्ती आहात की सर्वशक्तीमान आहात? मास्टर तर आहात ना? बाबांच्या महिमा मध्ये कधी यथाशक्ती किंवा नंबरा नुसार म्हटले जात नाही,नेहमी सर्वशक्तिमान आहात?मास्टर तर आहात ना? बाबांच्या महिमा मध्ये कधी यथा शक्तिवान किंवा नंबरा नुसार म्हटले जात नाही,नेहमी सर्वशक्तिमान म्हणतात.मास्टर सर्वशक्तिमान परत यथाशक्तिवान का? तुम्ही तर नेहमी शक्तिवान आहात.यथा शब्दाला बदलून सदा शक्तिवान बना आणि बनवा, समजले.

कोणता झोन आलेला आहे? सर्व वरदान भूमीमध्ये वरदाना द्वारे झोळी भरत आहात ना. वरदान भूमीच्या एक-एक चरित्रामध्ये,कर्मामध्ये विशेष वरदान भरलेले आहे.यज्ञभूमी मध्ये येऊन तुम्ही जरी भाजी निवडतात,धान्य स्वच्छ करतात,हे पण यज्ञ सेवेचे वरदान आहे. जसे यात्रला जातात,तर मंदिराची स्वच्छता करणे हे पण पुण्य समजतात.या महा तीर्था वरती किंवा वरदान भूमी वरती,प्रत्येक कर्मामध्ये,प्रत्येक पाउला मध्ये वरदानच, वरदान भरलेले आहेत.किती झोळी भरलेली आहे?पूर्ण झोळी भरून जाणार की यथाशक्ती जाणार?जे पण जेथून आले, मेळा करण्यासाठी आले आहेत.मधुबन मध्ये एक पण संकल्प,एक पण सेकंद व्यर्थ जायला नको.समर्थ बनण्याचा अभ्यास,आपल्या स्थानाला पण उपयोगी पडेल.अभ्यास आणि परिवार,अभ्यासाचा पण लाभ घ्यायचा आणि परिवाराचा पण विशेष अनुभव करायचा,समजले. बापदादा सर्व झोन वाल्यांना सदा वरदानी,महादानी बनण्याच्या शुभेच्छा देत आहेत.त्या लोकांचा उत्सव समाप्त झाला परंतु तुमचा उत्सव तर नेहमीच आहे. नेहमी मोठा दिवस आहे,म्हणून प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा च शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र नेहमी,महान बणुन, महान बनण्याच्या वरदाना झोळी भरणारे आहेत.कर्नाटक निवासी नेहमी आपल्या हर्षित मुखाद्वारे,स्वतः पण नेहमी हर्षित, आणि दुसर्यांना पण सदा हर्षित बनवतात, झोळी भरत राहतात.उत्तर प्रदेश वाले काय करतील?नेहमी शितल नदीसारखे शितल तेचे,वरदान देऊन शितल देवी बणुन शितल देवी बनवतात.शीतलता द्वारे सर्वांना,सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर करा.असे वरदाना द्वारे भरत राहा.अच्छा.

नेहमी श्रेष्ठ भाग्याचे स्पष्ट रेषाधारी,सदा बाप समान सर्व शक्तिसंपन्न, संपूर्ण स्थितीमध्ये स्थित राहणारे,सदा ईश्वरीय झलक आणि भाग्याच्या फलक मध्ये राहणारे,प्रत्येक कर्मा द्वारे भाग्यवान बणुन भाग्याचा वारसा देणारे,असे मास्टर भगवान,श्रेष्ठ भाग्यवान मुलांना प्रेम पूर्ण आठवण आणि नमस्ते.

मोठ्या दादीं सोबत अव्यक्त बापदादांचा वार्तालाप:-यज्ञाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे पण प्रत्येक कार्यामध्ये सोबत आहेत,त्यांची विशेषता हीच आहे,जसे ब्रह्मा बाबा प्रत्येक पाऊला मध्ये अनुभवी बणुन अनुभवाच्या अधिकारा द्वारे विश्वाचे राज्याधिकार घेतात.तसेच तुम्ही अनेक वर्षापासून प्रत्येक प्रकारच्या अनुभवाच्या अधिकारामुळे अनेक वर्षाच्या,राज्य अधिकारांमध्ये सोबत राहणारे आहात.ज्यांनी सुरुवातीपासून संकल्प केला,जिथे बसवाला,जशाप्रकारे चालवाल,तसेच चालत सोबत राहू.तर सोबत चालण्याचा पहिला वायदा बापदादांना निभावा लागेल. ब्रह्मा बाबांच्या सोबत पण राहणारे आहात.राज्यांमध्ये पण सोबत राहल आणि भक्तीमध्ये पण सोबत राहाल.जितके आत्ता बुद्धी द्वारे नेहमी सोबत राहाल त्याच हिशोबा द्वारे राज्यांमध्ये पण नेहमी सोबत राहाल.जर आत्ता थोडे पण दूर राहिले,तर तर काही जन्मांमध्ये दूर राहावे लागेल,कोणत्या जन्म मध्ये जवळ जाल परंतु जे नेहमी बुद्धी द्वारे सोबत राहतात,ते नेहमीच सोबत राहतील. साकार मध्ये तुम्ही सर्व १४ वर्ष सोबत राहिले.संगम युगाचे १४ वर्ष अनेक वर्षाच्या समान झाले.संगम युगाचा इतका वेळ साकार स्वरूप,साकार रूपामध्ये सोबत राहिले,हे पण फार मोठे भाग्य आहे.बुद्धी द्वारे पण सोबत आहात,घरांमध्ये पण सोबत असाल,राज्यामध्ये पण सोबत रहाल.जरी सिंहासना वरती थोडेच असतात परंतु श्रेष्ठ परिवाराच्या जवळच्या संबंधा मध्ये संपूर्ण दिवस त्यांच्यामध्ये सोबत राहण्याची भूमिका जरूर वठवतील.तर हा सुरुवाती पासून सोबत राहण्याचा वायदा संपूर्ण कल्प चालत राहतो.भक्तीमध्ये खूप वेळ सोबत राहिले,या अंत काळातील जन्मां मध्ये थोडेसे दूर,काही जवळ परंतु तरीही संपूर्ण कल्प कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सोबत राहाल.असा वायदा आहे ना,म्हणून तुम्हा लोकांना सर्व कोणत्या दृष्टीने पाहतात,बाबांच्या रूपात.यालाच भक्तीमध्ये म्हणतात सर्व भगवंताची च रूपे आहेत,कारण बाप समान बनतात ना. तुमच्या रुपा द्वारे बाबा दिसून येतील म्हणून बाबांचे रूप म्हणतात.जे बाबांच्या सोबत राहणारे विशेष असतील,त्यांना पाहून बाबांची आठवण येईल,त्यांची आठवण करणार नाहीत परंतु बाबाची आठवण करतील.त्यांच्याद्वारे बाबांचे चरित्र,बाबांची दृष्टी,बाबांचे सर्व अनुभव होतील.ते स्वतः दिसणार नाहीत परंतु त्यांच्याद्वारे बाबांचे कर्म किंवा दृष्टी अनुभव होईल.हीच विशेषता असाधारण बाप समान मुलांची आहे.सर्व तुमच्यामध्ये तर फसत नाहीत, हे तर म्हणत नाहीत अमकी दादी फार चांगली आहे,नाही.बाबांनी यांना चांगले बनवले आहे.बाबांची दृष्टी, बाबांची पालना यांच्याद्वारे मिळते.बाबांचे महावाक्य यांच्याद्वारे ऐकतो,हीच विशेषता आहे, याला म्हटले जाते प्रेमळ आणि अनासक्त. सर्वांचे प्रिय खुशाल बना परंतु फसवणारे बनवू नका.बाबांच्या ऐवजी तुमची आठवण करायला नको.बाबांचे शक्ती घेण्याऐवजी, बाबांचे महावाक्य ऐकण्या ऐवजी तुमची आठवण करायला नको,याला म्हटले जाते प्रेमळ आणि अनासक्त पण.असा ग्रुप आहे ना.काही तर विशेषतः असेल ना,ज्यामुळे साकारची पालना घेतली.विशेषता तर असेल ना. तुमच्याजवळ अनेक मुलं येतात, तर काय विचारतात,बाबा काय करत होते, कसे चालत होते.हीच आठवण येईल ना.असे विशेष आत्मे आहात.याला म्हटले जाते श्रेष्ठ एकता.दिव्यत्वाची स्मृति देऊन दिव्य श्रेष्ठ बनवायचे आहे.पन्नास वर्ष अविनाशी राहिले,तर अविनाश भव च्या शुभेच्छा आहेत.अनेक आले,आणि अनेक चक्र लावून गेले.तुम्ही लोक तर अनादी अविनाशी आहात.आपण तर अनादी मध्ये पण सोबत आहात,आदी मध्ये पण सोबत आहात.वतन मध्ये सोबत रहाल,तर सेवा कशी कराल.तुम्ही तर थोडासा आराम पण करतात.बाबांना तर आराम करण्याची आवश्यकता नाही.बापदादा यापासून मुक्त झाले.अव्यक्तला आराम करण्याची आवश्यकता नाही,व्यक्तला आवश्यकता आहे.यामध्ये आपल्या सारखे बनवले तर काम पूर्ण होईल.तरीही जेव्हा कोणती सेवेची संधी मिळेल,तर बाप समान अथक बनतात,परत थकत नाहीत,अच्छा.

दादीजी सोबत वार्तालाप :- लहान पणा पासून बाबांनी नेता बनवले आहे.येताच सेवेच्या जवाबदारीचा ताज दिला आणि वेळेप्रमाणे जी पण भूमिका चालली,मग ती बेगरी पार्ट मध्ये असेल किंवा आनंदाच्या दिवसांमध्ये असेल,सर्व भूमिके मध्ये अविनाशी नाटका नुसार धारण करत आले आहात,म्हणुन अव्यक्त भूमिकेमध्ये पण ताजधारी निमित्त बनले. तर ही विशेष सुरुवातीची पासुन भुमिका आहे.नेहमीच जवाबदारी निभावणारे आहात.जसे बाबा जवाबदार आहेत,तर जवाबदारीचे ताजधारी बनण्याची विशेष भुमिका आहे,म्हणून अंतच्या काळात पण दृष्टि द्वारे सर्व देऊन गेले,म्हणून तुमचे यादगार ताज जरुर असतो.जसे श्रीकृष्णाला लहान पणा पासूनच ताज दाखवतात. तर यादगार मध्ये लहान पणा पासून ताजधारी रूपात पूजन होते.सर्व सोबत साथी आहात परंतु तुम्ही ताजधारी आहात.सोबत तर सर्वच निभावतात परंतु समान रूपामध्ये सोबत निभावणे यामध्ये अंतर आहे.

अव्यक्त बापदादा ची पार्टीसोबत वार्तालाप

कुमारांस सोबत :- कुमार अर्थात निर्बधन.सर्वात मोठे बंधन मनाच्या व्यर्थ संकल्पाच आहे.यामध्ये पण निर्बंधन. कधी कधी हे बंधन तर बांधत नाहीत ना. कारण संकल्पशक्ती प्रत्येक पाऊला मध्ये कमाईचा आधार आहे.आठवणीची यात्रा कोणत्या आधारा द्वारे करतात. संकल्प शक्तीच्या आधारेद्वारे बाबांजवळ पोहोचतात,अशरीरी बनतात.तर मनाची शक्ती विशेष आहे.व्यर्थ संकल्प मनाच्या शक्तीला कमजोर करतात म्हणून या बंधना द्वारे मुक्त.कुमार म्हणजे नेहमी तीव्र पुरुषार्थी करणारे.जे निर्बंधन असतील त्यांची गती स्वतः तीव्र होईल.ओझे घेऊन चालणारा नेहमी सावकाश चालेल.हलका नेहमी तीव्र गतीने चालेल,प्रगती करेल. आत्ता वेळे प्रमाणे पुरुषार्थाची वेळ गेली. आता तीव्र पुरुषार्थी बणुन लक्षा पर्यंत पोहोचायचे आहे.

(२) कुमारांनी जुन्या व्यर्थ चे खाते समाप्त केले आहे ना.नवीन समर्थ चे खाते आहे. जुने खाते व्यर्थ आहे,तर जुने खाते नष्ट झाले ना.तसे पण पहा व्यवहारांमध्ये कधी जुने खात ठेवत नाहीत.जुन्याला नष्ट करून नवीन खाते सुरू करतात.तर येथे पण जुने खाते समाप्त करून नेहमी,नवीन ते नवीन प्रत्येक पाऊल समर्थ हवे.प्रत्येक संकल्प समर्थ हवा.जसे पिता तशीच मुलं.बाबा समर्थ आहेत,तर बाबांचे अनुकरण करून मूलं पण समर्थ बनतात.

माता बरोबर वार्तालाप :- माता कोणत्या गुणा मध्ये विशेष अनुभवी आहेत? तो विशेष गुण कोणता? त्याग आणि सहनशीलता.आणखी कोणते गुण आहेत? मातांचे स्वरूप विशेष दयाचे असते.माता दयाळू असतात.तुम्हा बेहदच्या मातांना,बेहदच्या आत्म्या प्रती दया येते ना.जेव्हा दया येते तर काय करतात.जे दयाळू असतात ते,सेवे शिवाय राहू शकत नाहीत.जेव्हा दयाळू बनतात तर अनेक आत्म्याचे कल्याण होते,म्हणून मातांना कल्याणी म्हणतात.कल्याणी म्हणजेच कल्याण करणारी.जसे बाबा विश्व कल्याणकारी आहेत,तसेच मातांना पण विशेष बाप समान कल्याणा ची पदवी मिळालेली आहे.असा उमंग उत्साह येतो ना.किती श्रेष्ठ बनले आहात.स्व परिवर्तना द्वारे दुसऱ्यांना पण उमंग उत्साह येतो.हद आणि सेवेचे संतुलन आहे?त्या सेवा द्वारे ही कर्मभोग चुक्त होतो.ती सीमित सेवा आहे.तुम्ही तर बेहदचे सेवाधारी आहात. जितका सेवेचा उमंग उत्साह,स्वता: मध्ये असेल तेवढी सफलता होईल.

(२) माता आपल्या त्याग, तपस्याद्वारे विश्वाचे कल्याण करण्यासाठी निमित्त बनल्या आहेत.मातांमध्ये त्याग आणि तपस्या ची विशेषता आहे.या दोन विशेषता द्वारा सेवेच्या निमित्त बणुन दुसऱ्यांना पण बाबाचे बनवणे यामध्येच व्यस्त राहता ना. संगम युगी ब्राह्मणाचे काम आहे सेवा करणे.ब्राह्मण सेवे बिना राहू शकत नाहीत. जसे नामधारी ब्राह्मण कथा जरूर करतील, तर येथे पण कथा करणे म्हणजे सेवा करणे.तर जगत माता बनून जगत साठी विचार करा.बेहदच्या मुलां प्रती विचार करा. फक्त घरी बसू नका.सेवाधारी बणुन नेहमी प्रगती करत रहा,पुढे जात रहा.हद मध्ये ६३ जन्म घालवले,आता बेहद सेवे मध्ये पुढे जात रहा.

निरोप घेते वेळी सर्व मुलांना बाबांनी याद प्यार दिला :- चोहो बाजूच्या स्नेही सहयोगी मुलांना बाप दादांचा विशेष स्नेह संपन्न याद प्यार स्वीकार करा.सर्व मुलांना निर्विघ्न बणुन, विघ्न विनाशक बणुन, विश्वाला निर्विघ्न बनवण्यासाठी, शुभेच्छा देत आहेत. प्रत्येक मुलगा हाच संकल्प करतो की, सेवेमध्ये नेहमी पुढे जात राहावे. हाच श्रेष्ठ संकल्प सेवे मध्ये नेहमी पुढे घेऊन जात आहे,आणि जात राहिल.सेवेच्या सोबत स्व प्रगती आणि सेवेच्या प्रगतीचे संतुलन ठेवत पुढे जात चला.तर बाप दादा आणि सर्व आत्म्या द्वारा ज्यांच्या निमित्त बनतात, त्यांचे मनापासून आशीर्वाद प्राप्त होत राहतील.तर नेहमी संतुलन द्वारे आशीर्वाद घेत पुढे जात चला.स्व प्रगती आणि सेवा ची प्रगती दोन्ही सोबत सोबत राहिल्यामुळे नेहमी सहज सफलता स्वरूप बनाल.सर्व आप आपल्या नावा द्वारे विशेष प्रेम पूर्ण आठवण स्वीकार करा,अच्छा. ओम शांती.

वरदान:-
सर्वांना खुशखबरी ऐकवणारे , खुशीच्या खजान्या द्वारे भरपूर भंडार भव .

नेहमी आपल्या स्वरूपाला समोर ठेवा कि,आम्ही खुशीच्या खजाने द्वारे भरपूर भांडार आहे.जे पण अगणित आणि अविनाशी खजाने मिळाले आहेत,त्या खजान्याला आठवणीमध्ये आणा. खजान्याला स्मृती मध्ये आणल्यामुळे खुशी होईल आणि जिथे खुशी आहे तेथे नेहमीसाठी दुःख दूर होतात.खजान्यां च्या स्मृती द्वारे आत्मा समर्थ बनते,व्यर्थ समाप्त होते.भरपूर आत्मा कधी हलचल मध्ये येत नाही.ती स्वतः खुश राहते आणि दुसर्यांना पण आनंदाच्या गोष्टी ऐकवत राहते.

सुविचार:-
योग्य बनायचे आहे तर कर्म आणि योगाचे संतुलन ठेवा.