02-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आता वापस घरी जायचे आहे,म्हणून देह सहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून,एक बाबांची आठवण करा, हेच खरे गीताचे रहस्य आहे"

प्रश्न:-
तुम्हा मुलांचा सहज पुरुषात कोणता आहे?

उत्तर:-
बाबा म्हणतात तुम्ही बिलकुल शांत रहा.शांत राहिल्यामुळे बाबा कडुन वारसा घेऊ शकाल.बाबांची आठवण करायची आहे परत बुद्धीमध्ये सृष्टिचक्र फिरवायचे आहे.बाबाच्या आठवणीमुळे तुमचे विर्कम विनाश होतील,आयुष्यवान बनाल आणि चक्राला जाण्यामुळे चक्रवर्ती राजा बनाल. हाच सहज पुरुषार्थ आहे.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलां प्रती आत्मिक पिता समजावत आहेत,रोज रोज समजतात.मुलं समजतात बरोबर आम्ही गिता ज्ञान शिकत आहोत,तेही कल्पापूर्वी प्रमाणेच.कृष्ण हे गीता ज्ञान शिकवत नाहीत,परमपिता परमात्मा आम्हाला शिकवतात.तेच आम्हाला परत राजयोग शिकवत आहेत.तुम्ही आता प्रत्यक्ष भगवंता कडून हे ज्ञान ऐकत आहात.भारत वासींचा मुख्य आधार गीताच आहे.गिते मध्ये लिहिले आहे,रुद्र ज्ञान यज्ञा ची स्थापना केली.हा यज्ञ पण पाठशाला आहे ना.बाबा जेव्हा खरी गीता ऐकतात,त्याद्वारे आम्हाला सदगती मिळते.मनुष्य हे समजत नाहीत बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत,त्यांचीच आठवण करायची आहे.जरी गीता वाचत आले परंतु रचनाकार आणि रचनेला न जाणल्यामुळे,आम्हाला माहीत नाही, माहीत नाही,असे करत आले.खरी गीता तर एक बाबाच येऊन ऐकवतात.या विचार सागर मंथन करण्याच्या गोष्टी आहेत.जे सेवे मध्ये तत्पर राहतील त्यांचे चांगल्या प्रकारे लक्ष जाईल.बाबाने म्हटले आहे, चित्रांमध्ये असे लिहा ज्ञानसागर पतित-पावन,गीता ज्ञानदाता,परमप्रिय परमपिता परम शिक्षक,परमसद्गुरु शिव भगवानुवाच.हे अक्षर तर जरूर लिहा,ज्यामुळे मनुष्य समजतील त्रिमूर्ती शिव परमात्मा गीतेचे भगवान आहेत,ना की श्रीकृष्ण.अनेकांचे मत या गोष्टीवर लिहून घ्यायचे आहे.आपली मुख्य गीता आहे.बाबा दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्टी शिकवत राहतात.असे मनात यायला नाही पाहिजे की बाबांनी हे ज्ञान अगोदर का सांगितले नाही?अगोदर सांगणे या नाटकांमध्ये नव्हते.बाबाच्या मुरली द्वारे नवीन नवीन गोष्टी काढायला पाहिजेत.प्रगती आणि अधोगती असे लिहतात.हिंदीमध्ये असे म्हणतात भारताची प्रगती आणि भारताची अधोगती.प्रगती म्हणजे दैवी घराण्याची स्थापना,जिथे 100% पवित्रता शांती संपत्ती ची स्थापना होते,परत अर्ध्या कल्पा नंतर अधोगतीस सुरुवात होते.आसुरी राज्याची अधोगती,यासोबत विनाश पण लिहायचा आहे.

तुमचे सर्व गीते वरती आधारित आहे.बाबाच येऊन खरी गिता ऐकवतात. बाबा रोज याच्या वरतीच समजवतात.मुलं तर आत्मेच आहेत.बाबा म्हणतात या देहाचा सर्व विस्तार विसरुन,स्वतःला आत्मा समजा.आत्मा शरीरा पासुन वेगळी होते,तर सर्व संबंध विसरून जाते.बाबा म्हणतात देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजून,मज पित्याची आठवण करा,आता घरी जायचे आहे ना.अर्धाकल्प घरी जाण्यासाठीच खूप भक्ती इत्यादी केली आहे.सतयुगा मध्ये तर कोणी परत जाऊ शकत नाही कारण तेथे सुखच सुख आहे.गायन पण आहे दुःखामध्ये स्मरण सर्व करतात,सुखा मध्ये कोणीच करत नाहीत परंतु सुख कधी आहे दुःख कधी होते हे समजत नाहीत.आपल्या सर्व गोष्टी गुप्त आहेत.आम्ही पण आत्मिक सैनिक आहोत ना.शिव बाबांची शक्ती सेना आहोत,याचा अर्थ पण कोणी समजत नाहीत.देवींची पूजा होते परंतु त्यांचे चरित्र कोणीही जाणत नाहीत.ज्यांची पूजा करतात त्यांच्या चरित्राला तर जाणायला पाहिजे ना.उच्च ते उच्च शिवाची पूजा आहे,परत ब्रह्मा विष्णू शंकर,परत लक्ष्मी नारायण, राधे कृष्णाचे मंदिर बनवतात.दुसरे तर कोणी नाहीत.एकाच शिवबाबा वरती अनेक नावे ठेवून मंदिरं बनवले आहेत.आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व चक्र आहे.विनाशी नाटकामध्ये मुख्य कलाकार असतात ना,ते हदचे नाटक आहे.हे बेहदचे अविनाश नाटक आहे.त्यामध्ये मुख्य कोण कोण आहेत हे, तुम्ही जाणतात.मनुष्य तर म्हणतात रामजी संसार बनलेलाच नाही. या वरती पण एक ग्रंथ बनलेला आहे,अर्थ काहीच समजत नाहीत.

बाबांनी तुम्हा मुलांना खूप सहज पुरुषार्थ शिकवला आहे,सर्वात सहज पुरुषार्थ आहे, तुम्ही बिलकुल शांत रहा.शांत राहिल्या मुळेच बाबा पासून वारसा घेऊ शकाल.बाबांची आठवण करायची आहे आणि सृष्टिचक्रा ची आठवण करायची आहे.बाबाच्या आठवणी द्वारे तुमचे विर्कम विनाश होतील,तुम्ही निरोगी बनाल आणि आयुष्यमान पण बनाल.चक्राला जाणल्या मुळे चक्रवर्ती राजा बनाल.आत्ता नरकाचे मालक आहात परत स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्गाचे मालक तर सर्वच बनतात, त्यामध्ये अनेक पद आहेत.जितके आपल्या सारखे बनवाल तेवढे उच्चपद मिळेल.अविनाशी ज्ञान रत्नाचे दान करणार नाहीतर मोबदल्यात काय मिळेल?कोणी सावकार बनतात तर म्हटले जाते,यांनी पूर्वजन्मात चांगले दान पुण्य केले असेल.आता मुलं जाणतात रावण राज्यांमध्ये सर्व पापच करत राहतात.सर्वात पुण्यवान तर लक्ष्मीनारायण आहेत.होय,ब्राह्मणां ला पण उच्च म्हणाल,जे सर्वांना उच्च बनवतात.ते प्रारब्ध आहे.हे ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण श्रीमता नुसार,हे श्रेष्ठ कर्तव्य करत आहेत.ब्रह्मा चे नाव मुख्य आहे. त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात ना.आता तर तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये,त्रिमूर्ती शिव म्हणावे लागेल.ब्रह्मा द्वारा स्थापना,शंकरा द्वारे विनाश,हे तर गायन आहे ना.विराट रूप पण बनवतात परंतु त्यामध्ये न शिवाला दाखवतात,न ब्राह्मणांना दाखवतात.हे पण तुम्हा मुलांना समजावून सांगायचे आहे.तुमच्यामध्ये पण यर्थात पणे,मुश्कील कोणाच्या बुद्धीमध्ये बसते. अनेक ज्ञानाच्या गोष्टी आहेत,ज्यांना ज्ञानाचे विषय म्हटले जाते.अनेक विषय मिळतात. खरी गीता भगवंताच्या द्वारे ऐकल्यामुळे मनुष्या पासून देवता,विश्वाचे मालक बनतात.हा विषय खूपच चांगला आहे परंतु समजून सांगण्यासाठी पण अक्कल पाहिजे. ही गोष्ट स्पष्ट लिहायला पाहिजे,ज्यामुळे मनुष्य समजतील आणि विचारतील.खूपच सहज आहे.एकेक ज्ञानाच्या गोष्टी लाखो-करोडो रुपयाच्या आहेत,ज्याद्वारे तुम्ही खूपच श्रेष्ट बनतात. तुमच्या पावला पावला मध्ये पदम आहेत, करोड आहेत,यामुळे देवतांना कमळाचे फूल दाखवतात.तुम्हा ब्राह्मा मुख वंशावली ब्राह्मणांचे नाव गायब केले आहे.ते ब्राह्मण लोक तर गीतेचा आधार घेतात.आता तुम्ही खरे ब्राह्मण,तुमच्या बुद्धीमध्ये सत्य आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये गिता आहे.तर तुम्हा मुलांना नशा चढायला पाहिजे.आम्ही तर श्रीमता वरती स्वर्ग बनवत आहोत. बाबा राजयोग शिकवत आहेत.तुमच्या जवळ कोणते पुस्तक नाही परंतु हा साधारण बैजच तुमची खरी गीता आहे.यामध्ये त्रिमूर्ती चे पण चित्र आहे.तर सर्व गीता यामध्ये येते.सेकंदां मध्ये सर्व गीता समजावली जाते. या बैज द्वारे तुम्ही सेकंदा मध्ये कोणालाही समजावू शकतात.हे तुमचे पिता आहेत यांची आठवण केल्यामुळे तुमचे पाप विनाश होतील.रेल्वे मध्ये जाता, चालता फिरता,कोणी पण तुम्हाला भेटतात,तर त्यांना चांगल्या रीतीने समजावून सांगा.कृष्णपुरी मध्ये तर सर्वांना जायची इच्छा असते ना.या राजयोगाच्या अभ्यासामुळे तुम्ही असे श्रेष्ठ बनू शकता.या शिक्षणामुळे राजाई स्थापन होते.दुसरे धर्म संस्थापक कोणी राजाई ची स्थापना करत नाहीत.तुम्ही जाणता आम्ही २१ जन्मासाठी राजयोग शिकत आहोत.खूपच चांगले शिक्षण आहे,फक्त रोज एक तास शिकायचे आहे,बस.ते शिक्षण तर दर रोज चार-पाच तास घ्यावे लागते.येथे तर एक तास पण खूप आहे,ते ही सकाळची वेळ तर सर्वां कडे असतो.बाकी कुणी बंधन युक्त आहेत,सकाळी येऊ शकत नाहीत, तर दुसरी वेळ पण ठेवू शकता.तुम्ही बैज लावून कुठे पण जावा आणि बाबांचा संदेश देत रहा.वर्तमान पत्र मध्ये बैज छापू शकत नाही,एका बाजूचा छापू शकता.मनुष्य तर समजू शकणार नाहीत,जोपर्यंत तुम्ही त्यांना ज्ञान स्पष्ट करत नाहीत.तसे तर खूपच सहज आहे.हा आत्मिक धंदा कोणीही करू शकतो.अच्छा, स्वतः करत नाहीत,दुसऱ्यांना पण आठवण देऊ शकता,हे पण चांगले आहे.दुसऱ्यांना म्हणा देहाभिमानी बना आणि स्वतः देह अभिमानी रहाल तर काहीना काही विकर्म होत जातील.प्रथम मनामध्ये वादळ येतात परत कर्मा मध्ये येतात.मनामध्ये खूप वादळ येतात परत बुद्धीने काम करायचे आहे. वाईट कार्य कधीच करायचे नाही. चांगले कर्म करायचे आहेत.विचार पण चांगले करत राहायचे आहेत,वाईट संकल्प पण येत राहतात.तुम्हाला नेहमीच राईट काम करायचे आहेत.चांगल्या पुरुषार्थ द्वारे नेहमी काम पण चांगलेच होते.बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगत राहतात. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) हे एक एक अविनाशी ज्ञानाचे रत्न लाखो करोडो रुपयांचे आहेत,यांचे दान करून पावलो पावली करोडो रुपयांची कमाई करायची आहे.आपल्या सारखे बनवून उच्चपद मिळवायचे आहे.

(२) विकर्मा पासुन वाचण्यासाठी देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.मना मध्ये कधी वाईट संकल्प आले तर त्यांना थांबवायचे आहेत.चांगले विचार करायचे आहेत.कर्मेंद्रिया द्वारे कधीच कोणते उलटे कर्म करायचे नाहीत.

वरदान:-
सेवा द्वारे योग युक्त स्थितीचा अनुभव करणारे आत्मिक सेवाधारी भव.
 

ब्राह्मण जीवन सेवेचे जीवन आहे.माया पासून सुरक्षित राहण्याचे श्रेष्ठ साधन सेवा आहे.सेवा योग युक्त बनवते परंतु फक्त मुखाद्वारे सेवा नाही. मुरली द्वारे ऐकलेले मधुर बोल,त्याचे स्वरूप बणुन सेवा करणे,निस्वार्थ सेवा करणे,त्याग तपस्या स्वरूपा द्वारे सेवा करणे,हदच्या इच्छे पासून निष्काम सेवा करणे, याला म्हटले जाते ईश्वरीय किंवा आत्मिक सेवा.मुखाच्या सोबत मनाद्वारे सेवा करणे म्हणजे मनमनाभव स्थितीमध्ये स्थित होणे.

बोधवाक्य:-
आकृतीला न पाहता निराकार बाबांना पहा,तर आकर्षण मूर्त बनाल.


मातेश्वरी चे अनमोल महावाक्य.
कर्मबंधन तोडण्याचा पुरुषार्थ:- अनेक मनुष्य प्रश्न विचारतात आम्हाला काय करायचे आहे?आम्ही कर्म बंधनापासून कसे मुक्त होऊ? आता प्रत्येकाची जन्मपत्री तर बाबा जाणतातच. मुलांचे काम आहे खऱ्या ह्रदया द्वारे बाबांपुढे समर्पित होणे.आपली जबाबदारी त्यांच्या हातामध्ये देणे,परत बाबा त्याना पाहून मत देतील की,तुम्हाला काय करायचे आहे.बाबांचा आधार पण प्रत्यक्षात घ्यायचा आहे, बाकी असे नाही फक्त ऐकत रहा आणि आपल्याच मतावर चालत राहा.बाबा साकार मध्ये आहेत तर मुलांना पण प्रत्यक्षा मध्ये पिता, गुरु, शिक्षकाचा आधार घ्यायचा आहे.असे पण नाही आज्ञा मिळाली आणि पालन केले नाही तर आणखीनच अकल्याण होईल.तर आदेशाचे पालन करण्यासाठी पण हिम्मत पाहिजे.चालवणारे तर रमजबाज आहेत.ते जाणतात,कल्याण कशामध्ये आहे. तर तशी श्रीमत देतील की,अशाप्रकारे बंधनापासून मुक्त होऊ शकता,परत कोणाला विचार यायला नाही पाहिजे की, मुलं इत्यादीचे काय हाल होईल?यामध्ये तर घरदार सोडण्याची गोष्टच नाही.हा तर थोड्या मुलांची, या अविनाश नाटकांमध्ये भूमिका होती.जर त्यांनी त्याग केला नसता तर,आत्ता तुमची जी सेवा होत आहे,ती कोणी केली असते? तर सोडण्याची गोष्टच नाही परंतु परमात्म्याला जाणायचे आहे, घाबरायचे नाही,हिम्मत ठेवा.बाकी जे घाबरतात,ते न स्वतः खुशी मध्ये राहतात,न बाबांचे मदतगार बनतात.येथे बाबांचे पूर्ण मदतगार बनायचे आहे.जेव्हा जिवंतपणी मराल तेव्हाच मदतगार बनू शकतात.कुठे पण अटकले असतील,तरी बाबा मदत देऊन त्यांना पण त्याच्यापासून मुक्त करतील.बाबांच्या सोबत मनसा वाचा,मदतगार बनायचे आहे.यामध्ये जरा पण मोहाची रग असेल तर ती प्रगती करू देणार नाही.तर हिम्मत ठेवून पुढे चला.कुठे हिम्मत कमजोर असेल तर संभ्रमित होतात म्हणून आपल्या बुद्धीला बिलकुल पवित्र बनवायचे आहे.विकाराचा जरा पण अंश नको.लक्ष फार मोठे नाही परंतु रस्ता थोडा वेडावाकडा आहे.समर्थ बाबांचा आधार आहे,तर न भय आहे,ना थकावट आहे,अच्छा.