02-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,ज्ञान सागर बाबा आले आहेत-तुम्हा मुलांच्या सन्मुख ज्ञान डान्स करण्यासाठी,तुम्ही हुशार सेवाधारी बना,तर ज्ञानाचा डान्स पण चांगला होईल"

प्रश्न:-
संगमयुगामध्ये तुम्ही मुलं आपल्या मध्ये कोणती सवय लावतात?

उत्तर:-
आठवण्यामध्ये राहण्याची. हीच आत्मिक सवय आहे.या सवयी सोबतच तुम्हाला दिव्य आणि अलौकिक कर्म पण करायचे आहेत.तुम्ही ब्राह्मण आहात,तुम्हाला खरीखुरी कथा जरूर ऐकवायची आहे. सेवा करण्याचा छंद तुम्हा मुलांमध्ये असायला हवा.

गीत:-

हे मना धैर्य धर..

ओम शांती।
जसे कोणी दवाखान्यात आजारी असतात,तर रोगी दु:खापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवतात.डॉक्टरना विचारातात की,कशी तब्येत आहे,कधी या रोगापासून मुक्त होऊ?त्या तर सर्व हद्दच्या गोष्टी आहेत.या बेहद्दच्या गोष्टी आहेत.बाबा येऊन मुलांना श्रीमत देतात.हे तर मुलं जाणतात की,बरोबर सुख आणि दुःखाचा खेळ आहे.तसे तर तुम्हा मुलांना सतयुगा मध्ये जाण्या पेक्षा जास्त फायदा येथेच आहे,कारण जाणतात या वेळेत,आम्ही ईश्वरीय गोद मध्ये आहोत,ईश्वर संतान आहोत.या वेळेत आमची खूप उच्च ते उच्च, गुप्त महिमा आहे.मनुष्यमात्र पित्याला शिव, ईश्वर, भगवान म्हणतात परंतु जाणत नाहीत.असेच बोलवत राहतात.वैश्विक नाटका नुसारच असे झाले आहे.ज्ञान आणि अज्ञान, दिवस आणि रात्र.गायन पण करतात परंतु तमोप्रधान बुद्धी असे बनले आहेत,जे स्वतःला तमोप्रधान समजतच नाहीत.कोणाच्या भाग्या मध्ये बाबांचा वारसा असेल तर, बुद्धीमध्ये बसू शकेल.मुलं जाणतात आम्ही अगदीच घोर अंधारामध्ये होतो.आता बाबा आले आहेत,तर खूप प्रकाश मिळाला आहे.बाबा जे ज्ञान समजवतात,ते कोणत्याही वेद ग्रंथ इत्यादी मध्ये नाही.ते पण बाबा स्पष्ट करून सांगतात.तुम्हा मुलांना रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतचा प्रकाश देतो.तो परत प्रायलोप होतो.माझ्याशिवाय कोणाला हे ज्ञान मिळू शकत नाही, परत हे ज्ञान प्रायलोप होते.हे समजून येते,आता कलियुग झाले, परत पाच हजार वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती होईल.या नवीन गोष्टी आहेत,या तर ग्रंथांमध्ये नाहीत.

बाबा तर हे ज्ञान सर्वांना एक सारखे शिकवतात परंतु आचरण करण्यामध्ये क्रमानुसार आहेत. कोणी चांगले सेवाधारी मुलं आहेत, तर बाबांचा पण ज्ञानाचा डान्स असा चालतो.डान्सिंग गर्ल म्हणजे डान्स करणाऱ्या मुलींच्या पुढे जर शौकीन बसलेले असतात,तर ती पण खुशीने खूप चांगला डान्स करते.थोडेच बसले असतील,तर साधारण रीतीने थोडाफार डान्स करेल.वाहवा करणारे जर खूप असतील,तर त्यांचा पण उल्हास वाढतो.तर येथे पण असेच आहे,मुरली सर्व मुले ऐकतात, परंतु सन्मुख ऐकण्याची गोष्टच वेगळी आहे ना.असे पण दाखवतात कृष्ण डान्स करत होते,डान्स काही तो नाही.वास्तव मध्ये हा ज्ञानाचा डान्स आहे.शिवबाबा सुद्धा सांगतात की,मी ज्ञानाचा डान्स करण्यासाठी येतो.मी ज्ञानाचा सागर आहे,तर चांगले चांगले ज्ञानाचे मुद्दे निघतात. ही ज्ञानाची मुरली आहे,बांबूची मुरली नाही.पतीत पावन बाबा सहज राजयोग शिकवतील की,बांबूची मुरली वाजवतील.हे कोणाच्या विचारांमध्ये नाही की, बाबा येऊन कसे राजयोग शिकवतात.आता तुम्ही जाणतात, बाकी कोणत्याही मनुष्य मात्रांच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाही, येणाऱ्याना पण क्रमानुसार पद मिळते.जसे कल्पपूर्व पुरुषार्थ केला आहे,तसाच पुरुषार्थ करत राहतात. तुम्ही जाणतात,बाबा कल्पा पूर्वीसारखेच येऊन मुलांना सर्व रहस्य सांगतात.ते म्हणतात की मी पण बंधनामध्ये बांधलेला आहे. प्रत्येक जण या अविनाशी नाटकाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे.हे जे काय सतयुगामध्ये झाले होते,ते परत होईल.अनेक प्रकारच्या योनी आहेत.सतयुगा मध्ये इतक्या योनी थोड्याच असतील.तेथे तर थोड्याच प्रकारच्या योनी असतात. परत वृद्धी होत राहते.जसे धर्म पण वाढत जातात ना, सतयुगामध्ये नसतात.जे सतयुगामध्ये झाले होते,परत सतयुगामध्येच पहाल.सतयुगामध्ये कोणत्याही खराब करणाऱ्या गोष्टी नसतात.त्या देवी-देवतांना भगवान भगवती म्हणतात.दुसऱ्या कोणत्या खंडामध्ये कधी कोणाला ईश्वर,भगवान- भगवती म्हणू शकत नाहीत.ते देवता जरूर स्वर्गामध्ये राज्य करत होते, त्यांचे पहा किती गायन आहे.

तुम्हा मुलांना आत्ता धैर्य आले आहे. तुम्ही जाणतात,आमचे पद खूप श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे.आम्ही इतक्या गुणांनी पास होऊ.प्रत्येकजण स्वतःला समजू शकतात की,अमका चांगली सेवा करत आहे.होय चालता-चालता वादळ पण येतात. बाबा तर म्हणतात की,मुलांना कोणती ग्रहचारी इत्यादी यायला नको.माया चांगल्या चांगल्या मुलांना पण विकारांमध्ये घेऊन जाते.तर बाबा धैर्य देतात,बाकी थोडा वेळ आहे.तुम्हाला सेवा पण करायची आहे.स्थापना झाली परत जायचे आहे.यामध्ये एक सेकंद पण पुढे-मागे होऊ शकत नाही.हे रहस्य मुलंच समजू शकतात.आम्ही अविनाशी नाटकाचे कलाकार आहोत,यामध्ये आमची मुख्य भूमिका आहे.भारतावरतीच हारणे आणि जिंकण्याचा खेळ बनलेला आहे.भारतच पावन होता,खूप शांती, पवित्रता होती.ही काल-परवाची गोष्ट आहे.काल आम्हीच भूमिका वठवली होती.पाच हजार वर्षापूर्वीची सर्व भूमिका नोंदलेली आहे.आम्ही चक्र लावून आलो आहोत,आता परत बाबांशी योग लावत आहोत. याद्वारेच अशुद्धता निघून जाईल,बाबांची आठवण येईल,तर वारसा पण जरुर आठवणीत येईल. प्रथम अल्लाह म्हणजे ईश्वराला जाणायचे आहे.बाबा तर म्हणतात,तुम्ही मला जाणल्यामुळे,माझ्या द्वारे सर्व काही जाणाल.ज्ञान तर खूप सहज आहे,फक्त एक सेकंदाचे आहे,तरीही समजावत राहतात.ज्ञानाचे अनेक मुद्दे स्पष्ट करत राहतात.मुख्य मुद्दा मनमनाभव आहे,यामध्येच विघ्न पडतात.देह अभिमामानामध्ये आल्यामुळे अनेक प्रकारचे संशय येतात,परत योगामध्ये राहू देत नाहीत.जसे भक्तिमार्गा मध्ये कृष्णाच्या आठवणीत बसतात, तर बुद्धी कुठे कुठे भटकते.भक्तीचा अनुभव तर सर्वांना आहे.या जन्माची गोष्ट आहे.या जन्माला जाणल्या मुळेच,काही ना काही पूर्व जन्माला पण समजू शकतात.मुलांना बाबांची आठवण करण्याचा छंद आहे. आठवणीत राहाल तेवढा आनंद वाढत जाईल,सोबत दिव्य अलौकिक कर्म पण करायचे आहेत.तुम्ही ब्राह्मण आहात,तुम्ही सत्यनारायणाची कथा,अमर कथा ऐकवतात.मुख्य गोष्ट एकच आहे, ज्यामध्ये सर्व काही येते.आठवणी द्वारे विकर्म विनाश होतात.हा एकच छंद,आत्मिक आहे.बाबा समजवतात ज्ञान तर खूप सहज आहे.कन्यांच्या नावाचे गायन आहे.अधर कुमारी, कुमारी कन्या.कन्याचे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे,त्यांना कोणते बंधन नाहीत.ते पती तर विकारी बनवतात.हे बाबा तर स्वर्गा मध्ये घेऊन जाण्यासाठी शृंगार करतात. गोड सागरामध्ये घेऊन जातात.बाबा म्हणतात,या जुन्या दुनियेला,जुन्या देहा सहित विसरून जावा.आत्मा म्हणते आम्ही८४ जन्म पूर्णपणे घेतले.आता परत बाबा पासून पूर्ण वारसा घेऊ,हिम्मत ठेवतात,तरीही मायेशी लढाई आहे ना.पुढे तर हे बाबा आहेत.माया चे वादळ जास्त यांच्याजवळ येतात.अनेक जण येऊन विचारतात की,बाबा आम्हाला असे होते.बाबा म्हणतात,मुलांनो होय हे मायचे वादळ तर जरुर येतील. प्रथम तर माझ्या जवळ येतात.अंत काळात सर्व कर्मातीत अवस्था प्राप्त करतील. या काही नवीन गोष्टी नाहीत,कल्पा पूर्वी पण झाल्या होत्या.अविनाशी नाटकांमध्ये भूमिका वठवली होती,आता परत घरी जात आहोत.मुलं जाणतात,ही जुनी दुनिया नरक आहे.असे म्हणतात हे लक्ष्मी-नारायण क्षिरसागर मध्ये राहत होते,यांचे मंदिर खूप चांगले चांगले बनवतात.प्रथम मंदिर बनवले असेल,तर त्यामध्ये दुधाचा तलाव बनवून विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असेल.खूप चांगले चांगले चित्र बनवून पूजा करत होते.त्यावेळेस तर सर्व काही खूप स्वस्त होते.बाबानी सर्व पाहिले आहे(ब्रह्मा बाबांनी) बरोबर हा भारत खूप पवित्र,क्षीर सागर होता.दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या,ही तर महिमा केली आहे. स्वर्गाचे नाव घेताच तोंडामध्ये पाणी येते.तुम्हा मुलांना आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे.तर बुद्धीमध्ये समज आली आहे.बुद्धी चालली जाते आपल्या घरी,परत स्वर्गामध्ये येतील.तेथे सर्व काही नवीनच असेल.बाबा श्री नारायणची मूर्ती पाहून खूप खुश होत होते,खूप प्रेमाने ठेवत होते.हे समजत नव्हते की,आम्हीच असे बनू.हे ज्ञान तर आता बाबा पासून मिळाले आहे.तुम्हाला ब्रह्मांड आणि सृष्टिचक्राच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आहे.तुम्ही जाणता आम्ही कसे चक्र लावले.बाबा आम्हाला राज योग शिकवत आहेत.तुम्हा मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे.बाकी थोडा वेळ आहे.शरीराला काही ना काही होत राहते.तुमचा हा अंतिम जन्म आहे.वैश्विक नाटकानुसार आता तुमच्या सुखाचे दिवस येत आहेत. तुम्ही पाहतात विनाश समोर उभा आहे.तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे.मुलवतन,सूक्ष्मवतन, स्थुलवतनला तर चांगल्या प्रकारे जाणतात.हे स्वदर्शन चक्र तुमच्या बुद्धीमध्ये फिरत राहते,आनंद होतो. या वेळेस आम्हाला बेहद्दचे पिता, शिक्षक बनवून शिकवत आहेत परंतु नवीन गोष्ट असल्यामुळे मुलं सारखे- सारखे विसरतात,नाहीतर बाबा म्हणल्या नंतर लगेच आनंदाचा पारा चढायला पाहिजे.रामतीर्थ श्रीकृष्णाचे भक्त होते,तर कृष्णाच्या दर्शनासाठी खूप प्रयत्न करत होते. त्यांना साक्षात्कार झाला आणि खूप आनंद झाला परंतु त्याद्वारे काय मिळाले?काहीच नाही.येथे तर तुम्हा मुलांना आनंद आहे,कारण जाणतात,२१ जन्मासाठी आम्ही इतके उच्च पद मिळवू शकू. तुम्ही तीन हिस्से सुखी राहतात.जर अर्धे अर्धे असेल तर फायदा काहीच नाही.तुम्ही तीन हिस्से सुखामध्ये राहतात. तुमच्या सारखे सुख कोणी पाहू शकत नाहीत.तुमच्यासाठी तर सुख अपार आहे.महान सुखामध्ये दुःखाची माहिती होत नाही.संगम युगामध्ये तुम्ही दोघांना जाणू शकता की,आत्ता आम्ही दुःखापासून सुखामध्ये जात आहोत.तोंड दिवसा कडे आणि लात रात्री कडे आहे.या दुनियेला लात मारायची आहे, म्हणजेच बुद्धी द्वारे विसरायचे आहे. आत्मा जाणते की आता परत घरी जायचे आहे,खूप भूमिका वठवली. अशा गोष्टी आपल्या सोबत करायच्या आहेत.आता जितकी बाबाची आठवण कराल तेवढीच गंज निघत जाईल.जितके बाबांच्या सेवा मध्ये राहुन आपल्या सारखे बनवाल,तेवढेच बाबांना प्रत्यक्ष करू शकाल.बुद्धीमध्ये आहे की आता घरी जायचे आहे,तर घराची आठवण करायला पाहिजे.जुने घर पडत राहते.आत्ता कोठे नवीन घर,कुठे जुने घर,रात्रंदिवसाचा फरक आहे.हे तर हुबहू विषय वैतरणी नदी आहे. एक दोघांना मारत,भांडत राहतात. बाकी बाबा आले आहेत,तर खूप लढाई सुरू झाली आहे.जर स्त्री पवित्र राहते,तर खूप तंग करतात. खूप माथा मारत राहतात.कल्पा पूर्वी पण अत्याचार झाले होते.ती आत्ताची गोष्ट आहे.तुम्ही पाहता खूप बोलवत राहतात.तीच अविनाशी नाटकाची भूमिका होत आहे.हे बाबा जाणतात आणि मुलं जाणतात,दुसरे कोणी जाणत नाहीत.पुढे चालून सर्वांना समजून येईल.गायन पण आहे की,पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता शिवपिता आहेत.तुम्ही कोणालाही समजावू शकता की, भारत स्वर्ग आणि नर्क कसा बनतो? या तर आम्ही तुम्हाला संपूर्ण विश्वाचा इतिहास भूगोल समजावून सांगतो. हा बेहद्दचा इतिहास भूगोल ईश्वर जाणतात आणि ईश्वराची तुम्ही मुलं जाणतात.पवित्रता सुख शांती ची स्थापना कसे होते,या इतिहास भूगोलास जाणल्यामुळे तुम्ही सर्व काही जाणतात.बेहद्दच्या बाबा पासून तुम्ही जरूर बेहद्दचा वारसा कसा घ्यायचा,हे समजून घ्या.विषय तर खूप आहेत.तुम्हा मुलांची बुद्धी आता भरपूर झाली आहे,तर खुशीचा पारा चढायला पाहिजे.हे सर्व ज्ञान तुमच्याजवळ आहे.ज्ञानाच्या सागरा कडून ज्ञान मिळत आहे,परत आम्ही जाऊन लक्ष्मीनारायण बनू.तेथे परत हे ज्ञान काहीच राहणार नाही.अनेक रहस्य युक्त गोष्टी समजण्याच्या आहेत.मुलं शिडीला चांगल्या रीतीने समजले आहेत ना.तर हे चक्र ८४ जन्माचे आहे.आत्ता मनुष्यांना पण स्पष्ट करुन सांगायचे आहे.याला आत्ता स्वर्ग किंवा पावन दुनिया थोडेच म्हणणार.सतयुग वेगळे आहे, कलियुग वेगळी गोष्ट आहे.हे चक्र कसे फिरते,हे समजून सांगण्यासाठी सहज आहे.हे ज्ञान खूप चांगले वाटते परंतु पुरुषार्थ करून आठवणीच्या यात्रेमध्ये राहावे लागते. हे अनेकांकडून होऊ शकत नाही, अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) हा जुना देह आणि दुनियेला बुद्धी द्वारे विसरून, बाबा आणि घराची आठवण करायची आहे.नेहमी याच आनंदामध्ये राहायचे आहे की,आता आमचे सुखाचे दिवस आले की आले.

(२) ज्ञानसागर बाबा कडून जे ज्ञान मिळत आहे,त्याचे स्मरण करून बुध्दीला भरपूर ठेवायचे आहे.देह अभिमाना मध्ये येऊन कोणत्याही प्रकारचा संशय घ्यायचं नाही.

वरदान:-
ईश्वरीय भाग्या मध्ये प्रकाशाचा ताज मिळवणारे सर्व प्राप्ती स्वरूप भव.

दुनिया मध्ये भाग्याची लक्षणे राजाई असते आणि राजाईची लक्षणं मुकुट असतो.असेच ईश्वरीय भाग्याची लक्षणं, प्रकाशाचा मुकुट आहे,आणि या मुकुट प्राप्तीचा आधार पवित्रता आहे.संपूर्ण पवित्र आत्मे प्रकाशाचे मुकुटधारी असल्यामुळे,सोबतच सर्व प्राप्ती द्वारे संपन्न असतात.जर कोणत्याही प्राप्तीची कमी आहे,तर प्रकाशाचा ताज दिसून येत नाही.

बोधवाक्य:-
आपल्या आत्मिक स्थितीमध्ये स्थिर राहणारेच मनसा महादानी आहेत.