02-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, शांती हा तुमच्या गळ्यातला हार आहे, तो आत्म्याचा स्धधर्म आहे, त्यामुळे शांतीसाठी भटकण्याची गरज नाही, तुम्ही आपल्या स्वधर्मात स्थिर व्हा. "

प्रश्न:- 
कोणती ही गोष्ट शुद्ध करण्यासाठी मानव कोणती युक्ती वापरतो आणि पित्याने कोणती युक्ती आखली आहे?

उत्तर:-
मनुष्य, कोणतीही वस्तू अग्नीमध्ये टाकून ती शुद्ध करतात. यज्ञही स्थापन करतात, त्यामध्ये पण अग्नी प्रज्वलीत करतात. इथेही पित्याने रुद्र यज्ञ निर्माण केला आहे, पण हा ज्ञानाचा यज्ञ आहे आणि त्यात सर्वाची आहुती पडणार आहे. तुम्ही मुले यामध्ये शरीरासहीत, सर्व काही स्वाह करतात. तुम्हाला योग करावा लागेल. योगाची च शर्यत आहे. याद्वारे तुम्ही प्रथम रुद्राच्या गळ्यातील माळ बनून नंतर विष्णूच्या गळ्यातील माळेमध्ये गुंफले जाल.

गीत:-
ओम नमो शिवाय.

ओम शांती।
ही महिमा कोणाची ऐकली ? पारलौकिक परमपिता, परम आत्म्याची, म्हणजेच परमात्मा ची. सर्व भक्त किंवा साधना करणारे त्यांचे स्मरण करतात. त्याचे नाव पतित पावन पण आहे. तुम्हा मुलांना माहीत आहे की, भारत पावन होता. लक्ष्मी नारायण इत्यादींचा पवित्र प्रवृत्ती मार्गाचा धर्म होता, त्याला आदी सनातन देवी देवता धर्म म्हणतात. भारतात पवित्रता, सुख, शांती आणि संपत्ती, हे सर्व काही होते. जर पवित्रता नसेल, तर न शांती, न सुख आहे. शांततेसाठी भटकत राहतात. जंगलात भटकत राहतात. कोणालाच शांती नाही, कारण न, ते पित्याला ओळखतात, न स्वतःला आत्मा समजतात की, मी आत्मा आहे आणि हे माझे शरीर आहे. कर्म करावेच लागते. माझा स्वतःचा धर्म शांतता प्रिय आहे. हे शरीराचे अवयव आहेत. आत्म्याला हे पण माहित नाही की, आपण निर्वाणधाम वा परमधामचे निवासी आहोत. या कार्यक्षेत्रावर, आपण शरीराचा आधार घेतो आणि आपली भुमिका वठवतो. शांततेचा हार गळ्यात आहे आणि तुम्ही बाहेर धक्के खात राहतात. मनुष्य विचारतात ना, मनःशांती कशी मिळेल? मन आणि बुद्धी सोबत आत्मा असतो, हे त्यांना कळत नाही. आत्मे, परमपिता, परमात्माची मुलं आहेत. ते शांतीचे महासागर आहेत, आपण त्यांची मुलं आहोत. आता संपूर्ण जगात, अशांतता पसरली आहे, नाही का? सगळे म्हणतात शांती हवी आहे. आत्ता सर्व जगाचा स्वामी तर तोच आहे, ज्याला शिवाय नमः म्हणतात. उंच ते उंच भगवान, शिव कोण आहेत ? हे कोणत्याही मानवाला माहीत नाही. पूजा पण करतात, काहीजण तर स्वतःला शिवोहम् म्हणतात. अरे शिव तर एकच पिता आहेत ना? मानवाने स्वतःला शिव म्हणवून घेणे, हे तर महापाप झाले ना. फक्त शिवालाच पतित पावन म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, शंकर किंवा कोणत्याही मानवाला, कोणीही पतित पावन म्हणू शकत नाही. पतित पावन सद्गती दाता तर एकच आहेत. मनुष्याला पावन करू शकत नाही, कारण संपूर्ण जगाचा प्रश्न आहे, नाही का? बाबा सांगतात जेव्हा सुवर्णकाळ होता, तेव्हा भारत पावन होता आणि आता अपवित्र आहे. म्हणून जे सर्व जगाला पावन करतात, त्यांचेच स्मरण करावे लागेल ना. बाकी हे अपवित्र जग आहे. जे म्हणतात महान आत्मा, तर येथे कोणी महान नाहीत. पारलौकिक पित्याला तर ओळखत नाहीत. शिवजयंती भारतात च गायली जाते, तर पतित लोकांना पावन बनवण्यासाठी नक्कीच भारतात आले असतील. मी संगमयुगात येतो, यालाच कुंभ असे म्हणतात. सागर आणि पाण्याच्या नद्यांचा कुंभ नाही. कुंभ तर याला म्हणतात, जेव्हा ज्ञान सागर, पतित पावन पिता, येऊन सर्व आत्म्यांना पावन बनवतात. तुम्हाला हेही माहीत आहे की, जेव्हा भारत स्वर्ग होता, तेव्हा एकच धर्म होता. सुवर्णयुगात सूर्यवंशींचे राज्य होते, नंतर त्रेतामध्ये चंद्रवंशी होते, ज्याची महिमा रामराजा, राम प्रजा. त्रेतायुगाची इतकी महिमा होती तर सतयुगाची तर त्यापेक्षा अधिक असेल ना. भारत स्वर्ग होता, पवित्र जीव आत्मा होते, बाकी सर्व धर्मांचे आत्मा निर्वाणभूमीत होते. आत्मा काय आहे आणि ईश्वर काय आहे, हे मानवाला माहीत नाही. आत्मा इतका लहान बिंदू आहे, त्यामध्ये ८४ जन्मांची भुमिका भरलेली आहे. ८४ लाख जन्म तर होऊ शकत नाहीत. ८४ लाख जन्मामधून कल्प-कल्पातंर फिरत राहू, असे होऊ शकत नाही. हे ८४ जन्मांचे चक्र आहे, तरीही प्रत्येकाचे नाही. जे आधी होते, ते आता मागे पडले आहेत, परत ते आधी जातील. नंतर येणारे सर्व आत्मे निर्वाणभूमीत राहतात. बाबा या सर्व गोष्टी समजावून सांगतात. त्यांनाच जागतिक सर्वशक्तिमान अधिकारी म्हणतात. बाबा म्हणतात, मी येऊन ब्रह्माद्वारे सर्व वेद, शास्त्र, गीता इत्यादींचे सार समजावून सांगतो. हे सर्व भक्तीमार्गाच्या कर्मकांडाची ग्रंथ आहेत. मी येऊन यज्ञ कसा केला, या गोष्टी शास्त्रात म्हणजे ग्रंथात नाहीत. त्याचे नाव राजस्व अश्वमेध रुद्र ज्ञान यज्ञ आहे. रुद्र हा शिव आहे, यामध्ये प्रत्येकाने स्वाह होणे आवश्यक आहे. बाबा म्हणतात, देहासहित, सर्व मित्र-संबंधीना विसरून जावा. फक्त एका पित्याचे स्मरण करा. मी संन्यासी आहे, उदासी आहे, मी ख्रिश्चन आहे. . . हे सर्व देहाचे धर्म आहेत, त्यांना विसरून फक्त माझीच आठवण करा. निराकार पिता आलेतर नक्कीच शरीरामध्ये येतील ना. बाबा म्हणतात की, मला प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. मीच येऊन, या शरीराद्वारे नवीन जगाची स्थापना करतो. जुन्या जगाचा विनाश तुमच्यासमोर उभा आहे. प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना केली, असे देखील गायन केले जाते. सुक्ष्मवतन म्हणजे फरिश्ताचे जग, तेथे हाडामांसाचे शरीर नसते. तेथे भूतांसारखे पांढरे शुभ्र सूक्ष्म शरीर असते. ज्याला शरीर मिळत नाही तो आत्मा भटकत राहतो. सावली सारख्या रूपात एक शरीर दिसून येते, ते पकडले जाऊ शकत नाही. आता बाबा म्हणतात मुलांनो, हे लक्षात ठेवा, आठवणी द्वारेच तुमचे पाप कर्म नष्ट होतील. खूप काही गेले, थोडं राहिलं. . . आता थोडा वेळ उरला आहे, असंही गायलं जाते. शक्य तितके बाबाचे स्मरण करा म्हणजे, तुमची अंत मती सो गती होईल. गीतेत एक-दोन अक्षरे बरोबर लिहिली आहेत. पिठात मीठा प्रमाणे काही अक्षरे बरोबर आहेत. सर्वप्रथम हे जाणले पाहिजे की ईश्वर निराकार आहे. परत तो निराकार ईश्वर कसे बोलतात? सामान्य ब्रह्माच्या तनामध्ये प्रवेश करून मी तुम्हाला राजयोग शिकवतो. मुलांनो, माझी आठवण करा. मी नेहमी एका धर्माची स्थापना करण्यासाठी आणि इतर सर्व धर्मांचा नाश करण्यासाठी येतो. आत्ता तर अनेक धर्म आहेत. ५००० वर्षांपूर्वी, सुवर्णयुगात एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता. सर्व आत्मे आपापले हिशेब चुक्तू करुन जातात, याला प्रलयकाळ म्हणतात. प्रत्येकाच्या दु:खाचा हिशोब चुकता होतो. दु:ख हे पापांमुळेच मिळते. पापाचा हिशेब चुकता झाल्यानंतर, पुण्य सुरू होते. सर्व काही शुद्ध बनवण्यासाठी अग्नी पेटवला जातो. यज्ञ स्थापन करतात आणि त्यातही अग्नी जाळतात. हा तर भौतिक यज्ञ नाही. हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे. कृष्ण ज्ञान यज्ञ असे म्हटले जात नाही. कृष्णा ने काही यज्ञ स्थापन केला नाही. कृष्ण तर राजकुमार होता. यज्ञ तर संकटाच्या वेळी स्थापित करतात. या वेळेत सर्वत्र संकट आहेत. अनेक मानवही रुद्र यज्ञ निर्माण करतात. रुद्र ज्ञान यज्ञ निर्माण करत नाही. केवळ रुद्र परमपिता परमात्मा येतात आणि ज्ञान यज्ञाची स्थापना करतात. हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे, त्यात सर्वांचा आहुती होईल, असे सांगितले जाते. बाबा आले आणि यज्ञाची पण स्थापना झाली, जोपर्यंत राजाई स्थापन होत नाही आणि प्रत्येकजण पावन बनेल. सर्व तर लगेच पावन बनतत नाहीत. योग शेवटपर्यंत करत राहा. ही योगाची शर्यत आहे, जितके तुम्ही बाबाचे स्मरण कराल, तितकेच तुम्ही रुद्राच्या गळ्यात माळ बनाल. परत विष्णूच्या गळ्यातील हार बनाल. प्रथम रुद्राची माळ नंतर विष्णूची माळ. प्रथम बाबा सर्वांना घरी घेऊन जातात, जे जितका पुरुषार्थ करतात, ते नरापासून नारायण आणि नारीपासून लक्ष्मी बनून राज्य करतात. गोया आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे. बाबा तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. जसे तुम्हाला ५००० वर्षांपूर्वी शिकवले होते, तसेच परत कल्पानंतर शिकवायला आले आहेत. शिवजयंती किंवा शिवरात्री देखील साजरी केली जाते. रात्र म्हणजे कलियुगाच्या जुन्या जगाचा अंत, नवीन दुनियाची सुरुवात. सतयुग त्रेता दिवस, द्वापर कलियुग म्हणजे रात्र, ब्रह्माचा बेहद्दचा दिवस, परत ब्रह्माची बेहद्दची रात्र. कृष्णाचे रात्रंदिवस गायले जात नाहीत. कृष्णाला हे ज्ञान नाही. ब्रह्माला पण शिवबाबांकडून ज्ञान मिळते. मग तुम्हा मुलांना पण प्राप्त होते, शिवबाबा तुम्हाला ब्रह्मा तनाद्वारे ज्ञान देत आहेत. ते तुम्हाला त्रिकालदर्शी बनवतात. मानवी जगात एकही त्रिकालदर्शी असू शकत नाही. तुमच्याकडे असेल तर ज्ञान द्या. हे सृष्टी चक्र कसे फिरते? तुम्हाला कोणीही, कधीही ज्ञान देऊ शकत नाही. भगवान तर सर्वांसाठी एक आहे. प्रत्येकजण कृष्णाला थोडेच भगवान मानतील. तो तर राजपुत्र आहे, राजकुमार भगवान असतो का? जर त्याने राज्य केले, तर त्याला हार पत्करावी लागेल. बाबा म्हणतात तुम्हाला जगाचा स्वामी बनवून मी निर्वाणभूमीत जाऊन राहतो. मग दु:ख सुरू झालं की, माझी भुमिकाही सुरू होते. मी सुनवाई करतो, मला दयावान देखील म्हणतात, हे दयाळू आत्मा. सर्व प्रथम, भक्ती पण सुरुवातीला अव्यभिचारी एका शिवाची करतात, नंतर देवतांची पूजा करू लागतात. आत्ता तर भक्ती व्यभिचारी झाली आहे. पुजा कधीपासून सुरू होते, हे पुजाऱ्यांनाही कळत नाही. शिव किंवा सोमनाथ ही एकच गोष्ट आहे. शिव निराकार आहे. त्याला सोमनाथ का म्हणतात? कारण पिता सोमनाथांनी तुम्हा मुलांना अमृत ज्ञान दिले आहे. अनेक नावे आहेत, त्यांना बाबुलनाथ असेही म्हणतात, कारण ज्याने बाबळीच्या काट्यां सारख्याना पण फुले बनवले आणि सर्वांसाठी सद्गती दाता तो पिताच आहे. त्याला पुन्हा सर्वव्यापी म्हणणे. . हा पित्याचा अपमान आहे. जेव्हा संगमाची वेळ येते तेव्हा मी एकदाच येतो, तेव्हाच भक्ती पूर्ण होते. हा नियम आहे. मी फक्त एकदाच येतो. पिता एक आहे आणि अवतार देखील एकच आहे. मी एकदा येतो आणि सर्वांना पावन राजयोगी बनवतो. तुमचा राजयोग आहे, तो संन्यासींसाठी हठयोग आहे, ते राजयोग शिकवू शकत नाहीत. भारताला अपवित्रेते पासून वाचवण्यासाठी हठयोगींचा धर्म आहे. पवित्रता तर हवी आहे ना. भारत हा १००% पावन होता, तो आत्ता पतित झाला आहे, म्हणून या आणि पावन बनवा असे म्हणतात. सुवर्णयुग म्हणजे पावन जीव आत्म्यांची दुनिया. सध्या तर गृहस्थ धर्म अपवित्र आहे. सुवर्णकाळात गृहस्थ धर्म पावन होता. आता पुन्हा तोच पवित्र गृहस्थ धर्म प्रस्थापित होत आहे. एकच पिता सर्वांसाठी मुक्ती आणि जीवनमुक्ती देणारा आहे. मनुष्य मनुष्याला मुक्ती, जीवनाती देऊ शकत नाही. तुम्ही ज्ञानसागर पित्याची मुलं आहात. तुम्ही ब्राह्मण खऱ्या अर्थाने यात्रा करववतात. बाकी सर्व खोट्या यात्रा आहेत. तुम्ही दुहेरी अहिंसक आहात. तुम्ही कोणतीही हिंसा करत नाही, तुम्ही भांडत ही नाही, तुम्ही कोणतीही काम कटारी चालवत नाही. काम विकाराला जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. दुर्गुणांवर विजय मिळवावा लागतो. तुम्ही ब्रह्माकुमार आणि कुमारी शिवबाबांकडून तुमचा वारसा घेत आहात. तुम्ही आपसात भाऊ-बहीण झाले. आपण आता निराकार भगवंताची मुले आहोत आणि आपण आपापसात भाऊ भाऊ आहोत आणि परत आपण ब्रह्माबाबांची मुलं आहोत, म्हणून आपण निश्चितपणे निर्विकारी बनायला पाहिजे, म्हणजेच आपल्याला जगाचे सार्वभौमत्व, बादशाही मिळते. हा अनेक जन्मांच्या अंताचा जन्म आहे. कमळाच्या फुलासारखे पावन बना, परत तुम्हाला उच्च पद मिळेल. आता तुम्ही बाबाद्वारे खूप बुद्धिमान बनत आहात. जगाचे ज्ञान तुमच्या बुद्धीत आहे. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात. स्व आत्म्याला दर्शन होते, म्हणजेच परमपिता परमात्म्या कडून ज्ञान प्राप्त होते, ज्यांना ज्ञानसंपन्न म्हणतात. मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत, चैतन्य आहेत. आता तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आले आहात. एकच बीज आहे, हे देखील तुम्हाला माहीत आहे. बीजातून झाड कसे निघते, हे उलटे झाड आहे. बीज वर आहे. प्रथम, एक दैवी वृक्ष उदयास येते, नंतर इस्लामिक, बौद्धी. . . वाढतच जाते. तुम्हाला आता हे ज्ञान मिळाले आहे आणि ते कोणीही देऊ शकत नाही. जे काही तुम्ही ऐकता, ते तुमच्या बुद्धीत राहते. सुवर्णयुगाच्या सुरुवातीला ग्रंथ नसतात. ५००० वर्षांची कथा किती सोपी आहे? अच्छा.

गोड गोड खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता, बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) वेळ कमी आहे, खुप वेळ गेला आहे, म्हणून जो काही श्वास राहिला आहे, तो पित्याच्या स्मरणातच सफल करायचा आहे. जुन्या पापाचा हिशेब चुक्त करायचा आहे .

२) शांतीच्या आत्मधर्मात प्रस्थापित होण्यासाठी तुम्हाला निश्चितच पवित्र बनायला हवे. जिथे पवित्रता आहे तिथे शांतता आहे. माझा धर्म शांती आहे. मी शांतीच्या सागराची संतान आहे, हे अनुभव करायचे आहे.

वरदान:-
निर्मात्याच्या वैशिष्ट्याद्वारे सहज यश मिळविणारे, सर्वांचे माननीय भव.

सर्वांकडून आदर मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे निर्माण बनणे होय. जे आत्मे निर्मंचिताच्या विशेषतेने सतत चालतात, त्यांना सहज यश मिळते. नम्र बनणे च स्वमान आहे. नम्र होणे म्हणजे झुकणे नव्हे, तर आपल्या विशेषतेने आणि प्रेमाने सर्वांना आपले करणे होय. वर्तमान वेळ ही सार्वकालिन आणि सहज यश मिळविण्यासाठी मुळ आधार आहे. प्रत्येक कृती, नातेसंबंध आणि संपर्कात जे निर्माण बनतात, तेच विजयी रत्न बनतात.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- ज्ञानाची शक्ती आत्मसात करा, तर विघ्न आघात करण्याऐवजी पराभव खातील.