02-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला आता भविष्य २१जन्मासाठी येथेचराजयोगाचे शिक्षण घ्यायचे आहे, काट्या पासून सुगंधित फुल बनायचे आहे,दैवी गुण धारण करायचे आणि करावयाचे आहेत"

प्रश्न:-
कोणत्या मुलांचे बुद्धीचे कुलुप क्रमानुसार उघडत जाते?

उत्तर:-
जे श्रीमतावरती चालत राहतात,पतित-पावन बाबांच्या आठवणीमध्ये राहतात.ज्यांचा शिकवणाऱ्यांच्या सोबत योग आहे,त्यांचे बुद्धीचे कुलूप उघडत जाते.बाबा म्हणतात मुलांनो, अभ्यास करा आम्ही आत्मा भाऊ- भाऊ आहोत,आम्ही बाबाकडून ऐकतो.देही अभिमाने होऊन ऐका आणि ऐकवा तर कुलूप उघडत जाईल.

ओम शांती।
बाबा मुलांना समजवतात,जेव्हा इथे बसतात, तर असे पण नाही की,फक्त शिव बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.ती तर फक्त शांती होईल आणि परत सुख पण पाहिजे. तुम्हाला शांती मध्ये राहायचे आहे आणि स्वदर्शन चक्रधारी बनून राजाईची पण आठवण करायची आहे.तुम्ही नरापासून नारायण किंवा मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करतात.येथे जरी किती पण कोणा मध्ये दैवी गुण असतील परंतु त्यांना देवता तर म्हणणार नाहीत.देवता तर स्वर्गामध्ये असतात ना.दुनिये मध्ये मनुष्याला स्वर्गात बद्दल माहितीच नाही.तुम्ही मुलं जाणता नवीन दुनियेला स्वर्ग आणि जुन्या दुनियेला नर्क म्हटले जाते.हे पण भारतवासीच जाणतात,जे देवता सतयुगामध्ये राज्य करत होते, त्यांचे चित्र पण भारतामध्येच आहेत.हा आदी सनातन देवी देवता धर्म आहे,खुशाल त्यांचे चित्र परदेशामध्ये पुजेसाठी घेऊन जातात.परदेशा मध्ये कुठेही जातात,तर जाऊन मंदिर बनवतात. प्रत्येक धर्माचे कुठेही जातात तरी आपल्या ईष्टांची पूजा करतात.ज्या गावावरती विजय मिळतात,तेथे चर्च इत्यादी जाऊन बनवतात. प्रत्येक धर्माचे आपापले चित्र पूजासाठी आहेत.अगोदर तुम्ही पण जाणत नव्हते की आम्हीच देवी-देवता होतो. आपल्याला वेगळे समजून त्यांची पूजा करत होतो. दुसऱ्या धर्माचे पूजा करतात, जाणतात ते आमचे धर्म स्थापक ख्रिस्त आहेत,आम्ही ख्रिश्चन आहोत किंवा बौद्धी आहोत.हे तर हिंदू लोकच स्वतःच्या धर्माला न जाणल्यामुळे स्वतःला हिंदू म्हणतात आणि देवतांची पूजा करतात.हे पण समजत नाहीत की,आम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहोत.आम्ही आपल्या ईष्ठांची पूजा करतो.ख्रिश्चन ख्रिस्ताची पूजा करतात.भारतवासींना हे माहीतच नाही की,आमचा धर्म कोणता आहे?तो कोणी आणि कधी स्थापन केला होता? बाबा म्हणतात हा भारताचा आदी सनातन देवी देवता धर्म जेव्हा प्रायलोप होतो,तेव्हा मी तोच धर्म स्थापन करण्यासाठी परत येतो.हे ज्ञान आत्ताच मुलांच्या बुद्धी मध्ये आहे,यापूर्वी तुम्ही काही जाणत नव्हते.भक्ती मार्गामध्ये बिगर समज,चित्रांची पूजा करत होते. आता तुम्ही जाणता आम्ही भक्ती मार्गामध्ये नाहीत.आता तुम्हा ब्राह्मण कुळभूषण आणि शूद्रकुळा मध्ये रात्रं दिवसांचा फरक आहे. आता तुम्ही जाणता आम्ही भक्तिमार्ग मध्ये नाहीत.हे पण तुम्ही या वेळेतच समजतात.सत्ययुगा मध्ये समजणार नाहीत.यावेळेस तुम्हाला हे ज्ञान मिळते.बाबा आत्म्यांना समजवतात.जुनी दुनिया आणि नवीन दुनियेची तुम्हा ब्राह्मणांला माहिती आहे.जुन्या दुनिये मध्ये अनेक मनुष्य आहेत. येथे तर मनुष्य खूप लढतात, भांडण करतात.हे काट्याचे जंगल आहे.तुम्ही जाणता अगोदर आम्हीपण काटे म्हणजे तमोगुणी होतो.आता बाबा आम्हाला फुलासारखे बनवत आहेत. काट्यासारखे मनुष्य सुगंधित फुलांना नमस्ते करतात.हे रहस्य आत्ताच तुम्ही जाणले आहे. आम्हीच देवता होतो,परत येऊन सुगंधित फूल ब्राह्मण बनलो आहोत.बाबानी समजवले आहे,हे अविनाश नाटक आहे.यापूर्वी नाटक सिनेमा इत्यादी नव्हते.हे पण आत्ताच बनले आहेत,का बनले आहेत?कारण बाबांना उदाहरण देणे सहज होते.मुलं पण समजू शकतात.हे विज्ञान पण तुम्हा मुलांना शिकायचे आहे.बुद्धीमध्ये हे सर्व विज्ञानाचे संस्कार घेऊन जाताल,जे परत स्वर्गामध्ये कामाला येतील.दुनिया काही एकदम नष्ट होत नाही.संस्कार घेऊन परत जन्म घेतात,विमान इत्यादी बनवतात.ज्या कामाच्या गोष्टी आहेत,त्या बनवतात.जहाज बनवणारे पण असतात परंतु जहाज तर स्वर्गामध्ये कामाला येणार नाहीत.जरी कोणी ज्ञान घेतील किंवा घेणार नाहीत परंतु त्यांचे संस्कार कामांमध्ये येणार नाहीत.तेथे जहाज इत्यादीची आवश्यकताच राहत नाही.वैश्विक नाटकांमध्ये नोंद नाही. होय,विमान बनवणारे,विद्युत निर्मिती करणारे,इत्यादीची आवश्‍यकता राहते.ते संशोधन होत राहते.तेथून मुलं शिकून येतात.या सर्व गोष्टी मुलांच्या बुद्धी मध्ये आहेत.तुम्ही जाणता आम्ही नवीन दुनिया साठी हे राज योगाचे शिक्षण घेत आहोत.बाबा आम्हाला भविष्य २१ जन्मासाठी शिकवत आहेत.आम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी पवित्र बनत आहोत. प्रथम नरकवासी होतो.मनुष्य म्हणतात पण अमका स्वर्गवासी झाला परंतु आम्ही नरकामध्ये आहोत,हे समजत नाहीत.बुद्धीचे कुलूप उघडत नाही.तुम्हा मुलांचे आत्ता हळूहळू क्रमानुसार उघडत जाते.क्रमानुसार त्यांचेच उघडेल, जे श्रीमतावरती चालतील आणि पतित-पावन बाबांची आठवण करतील.बाबा ज्ञान पण देतात आणि आठवण पण शिकवतात.शिक्षक आहेत ना तर शिक्षक जरूर शिकवतील. जितके शिक्षक आणि शिक्षणाशी योग राहील,तेवढे उच्चपद प्राप्त कराल.त्या शिक्षणामध्ये पण योग राहतो.विधी महाविद्यालया मध्ये विद्यार्थी जाणतात,वकील कायद्याचा अभ्यास शिकवत आहेत.येथे तर शिवपिता शिकवत आहेत.हे पण विसरून जातात,कारण नवीन गोष्ट आहे ना.देहाची आठवण करणे तर खूप सहज आहे.घडीघडी देहाची आठवण येते.आम्ही आत्मा आहोत, हे विसरतात.आम्हा आत्म्यांना,बाबा समजवतात.आम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहोत.बाबा तर जाणतात,मी परमात्मा आहे,आत्म्याला शिकवतात की, स्वता:ला आत्मा समजून,दुसऱ्या आत्म्यांना शिकवा.आत्मा काना द्वारे ऐकते.परमपिता परमात्मा ऐकवत आहेत,त्यांना सर्वोच्च म्हणतात.तुम्ही जेव्हा कोणाला समजवतात,तर हे बुद्धीमध्ये यायला पाहिजे,आमच्या आत्म्या मध्ये ज्ञान आहे.आत्म्याला हे ज्ञान ऐकवत आहेत.आम्ही बाबांकडून जे ऐकले आहे,ते ऐकवत आहोत.या नवीन गोष्टी आहेत.तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना शिकवतात,तर देही अभिमानी होऊन शिकवत नाहीत,तुम्ही विसरतात.लक्ष आहे ना. बुद्धीमध्ये हे आठवणीत राहिले पाहिजे,मी आत्मा अविनाशी आहे. मी आत्मा या कर्मइद्रिंया द्वारा शिकवत आहे.तुम्ही आत्मा शुद्र कुळामध्ये होते,आता ब्राह्मण कुळांमध्ये आहात,परत देवता कुळामध्ये जाल.तेथे शरीर पण पवित्र मिळते.आम्ही आत्मे भाऊ- भाऊ आहोत.बाबा मुलांना शिकवत आहेत. मुलं परत म्हणतील,आम्ही भाऊ-भाऊ आहोत,भावांना शिकवत आहोत.आत्म्यालाच समजून सांगतात.आत्मा शरीरा द्वारे ऐकते.या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत,स्मृतीमध्ये राहत नाहीत.अर्धा कल्प तुम्ही देही अभिमानामध्ये राहिले.यावेळी तुम्हाला देही अभिमानी बनून राहायचे आहे.स्वतःला आत्मनिष्ठ करायचे आहे,आत्मा निश्चय करून बसा.आत्मा निश्चय करुन ऐका. परमपिता परमात्मा ऐकवतात, तेव्हा तर म्हणतात ना,आत्मा परमात्मा वेगळे राहिले खूपकाळ,स्वर्गात तर शिकवत नाही,येथे येऊन शिकवतो. दुसऱ्या सर्व आत्म्याला स्वतःचे शरीर आहे,हे पिता तर सर्वोच्च आत्मा आहेत,त्यांना शरीर नाही.त्यांच्या आत्म्याचे नाव शिव आहे.तुम्ही जाणता हे शरीर माझे नाही. मी सर्वोच्च आहे,माझी महिमा वेगळी आहे.प्रत्येकाची महिमा वेगवेगळी आहे ना.गायन पण आहे परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करतात.ते ज्ञानाचे सागर,मनुष्य सृष्टीचे बीजरुप आहेत.ते सत्य,चैतन्य, आनंद,सुख शांतीचे सागर पण आहेत.ही बाबांची महिमा आहे. मुलांना पित्याच्या संपत्तीची माहिती राहते,पित्याकडे हा कारखाना आहे,ही मिल इत्यादी आहे,तर तो नशा राहतो ना.मुलगा संपत्तीचा मालक बनतो.ही अविनाश संपत्ती तर एकाच वेळेस मिळते.शिवपित्या कडे कोणती संपत्ती आहे,ते ऐकले. तुम्ही आत्मे अमर आहात,कधी मृत्यू होत नाही.प्रेमाचे सागर पण बनतात.हे लक्ष्मीनारायण प्रेमाचे सागर आहेत ना,कधीच लढत भांडत नाहीत.येथे तर खूप लढत भांडत राहतात.प्रेमामध्ये आणखीच घोटाळा होतो.बाबा येऊन विकारा मध्ये जाणे बंद करतात,तर खूप मार खावा लागतो.बाबा म्हणतात मुलांनो,पावन बना तर,पावन दुनियेचे मालक बनाल.काम महाशत्रू आहे,म्हणून बाबांच्या जवळ येतात.तर बाबा म्हणतात,जे विकर्म केले आहेत ते सांगा,तर हलके व्हाल.यामध्ये पण मुख्य विकाराची गोष्ट आहे.बाबा मुलांच्या कल्याणर्थ विचारतात. बाबांना म्हणतात,हे पतित पावन या, कारण जे विकारा मध्ये जातात,त्यांना पतित म्हटले जाते.ही दुनिया पण पतित आहे.मनुष्य पण पतित आहेत, पाच तत्व पण पतित आहेत. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी तत्व पण पवित्र पाहिजेत.पृथ्वीवरती देवतांची सावली पडू शकत नाही.लक्ष्मीचे आव्हान करतात परंतु ती येथे थोडेच येऊ शकते.हे पाच तत्व बदलायला पाहिजेत.सत्ययुग नवीन दुनीया आहे,ही जुनी दुनिया आहे. दुनिया नष्ट होण्याची ही वेळ आहे. मनुष्य समजतात,आणखी चाळीस हजार वर्षे आहेत.बाबा म्हणतात जेव्हा कल्पच पाच हजार वर्षाचा आहे परत फक्त एक कलियुगच ४०००० वर्षाचे कसे होऊ शकते? खूपच अज्ञानाचा अंधकार आहे.ज्ञान काहीच नाही.भक्ती म्हणजे ब्राह्मणांची रात्र आहे.ज्ञान ब्रह्माचा आणि ब्राह्मणांचा दिवस आहे.जे आत्ता प्रत्यक्षात होत आहे.शिडीच्या चित्रांमध्ये स्पष्ट दाखवले आहे,नवीन आणि जुन्या दुनियेला अर्धे अर्धे म्हणू शकतो.असे नाही की नवीन दुनियेला जास्त वेळ,आणि जुन्या दुनियेला थोडावेळ दिला आहे,नाही.पूर्ण अर्ध अर्धे होईल.तर पाव पण करू शकतो. अर्धे अर्धे नाहीतर पाव पण होऊ शकत नाही.स्वस्तिका मध्ये पण चार भाग असतात.असे समजतात आम्ही गणेशाचे चित्र काढतो.आता मुलं समजतात,या जुन्या दुनियेचा तर विनाश होणार आहे.आम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहोत.आम्ही नविन दुनियेत जाण्यासाठी नरा पासून नारायण बनत आहोत.कृष्ण पण नवीन दुनियाचे आहेत.कृष्णाचे गायन आहे,त्यांना महात्मा म्हणतात, कारण छोटा मुलगा आहे.लहान मुलं खूप प्रिय वाटतात.मोठ्यांना इतके प्रेम करत नाहीत,जितके लहानाला करतात,कारण सतोप्रधान अवस्था आहे.विकाराची दुर्गंध नाही.मोठे झाल्यामुळे विकारांची दुर्गंध येते. लहान मुलांची कधीच विकारी दृष्टी होऊ शकत नाही.हे डोळे धोका देणारे आहेत म्हणून उदाहरण देतात,की सुरदासने आपले डोळेच काढले.अशा प्रकारची कोणती गोष्ट नाही.असे कोणी डोळे काढत नाही. या वेळेत बाबा ज्ञानाच्या गोष्टी समजवतात.तुम्हाला तर आत्ता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. आत्म्याला अध्यात्मिक ज्ञान मिळाले आहे.आत्म्यामध्ये ज्ञान आहे.बाबा म्हणतात मला ज्ञान आहे.आत्म्याला निर्लेप म्हणू शकत नाही.आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते.आत्मा अविनाशी आहे आणि खूप सूक्ष्म आहे.आत्म्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.अशा गोष्टी कोणी म्हणू शकत नाही.ते तर निर्लेप म्हणतात, म्हणुन बाबा म्हणतात प्रथम आत्म्याची जाणीव करा.कोणी म्हणतात जनावरं कुठे जातील?अरे जनावराची गोष्ट सोडा,प्रथम स्वतःला आत्म अनुभूती करा. मी आत्मा कशी आहे? काय आहे? इत्यादी.बाबा म्हणतात जोपर्यंत स्वतःला जाणत नाहीत तोपर्यंत,मला कसे जाणू शकता.या सर्व सूक्ष्म गोष्टी मुलांच्या बुद्धीमध्ये आहेत. आत्म्यामध्ये८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.ती वठवत राहते. कोणी परत म्हणतात पुर्वनियोजीत नाटकांमध्ये नोंद आहे,मग आम्ही पुरुषार्थच का करायचा?अरे पुरुषार्था शिवाय तर पाणी पण मिळू शकत नाही.असे नाही पुर्वनियोजीत नाटका नुसार आपोआप सर्व काही मिळेल. कर्म तर जरूर करायचे आहेत, चांगले किंवा वाईट कर्म होतात.हे बुद्धी द्वारे समजू शकतात.बाबा म्हणतात,हे रावण राज्य आहे, यामध्ये तुमचे कर्म विकर्म बनतात. येथे तुम्हाला कर्म,अकर्म, विकर्माची गती समजावतो.स्वर्गात तुमचे कर्म अकर्म होतात,रावण राज्यामध्ये कर्म विकर्म होतात.गीतापाठी इ कधी याचा अर्थ समजावत नाहीत,ते फक्त वाचून ऐकवतात.संस्कृत मधील श्लोक ऐकवून परत हिंदी मध्ये अर्थ सांगतात.बाबा म्हणतात काही वाक्य ठीक आहेत.भगवानुवाच आहे परंतु भगवान कोणाला म्हटले जाते,हे कोणालाही माहिती नाही,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादा ची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बेहद च्या संपत्तीचा मी आत्मा मालक आहे,जसे शिवपिता शांती पवित्रता आनंदाचे सागर आहेत,असेच मी आत्मा मास्टर सागर आहे.याच नशेमध्ये राहायचे आहे.

(२) हे पूर्वनियोजित नाटक आहे, असे म्हणून पुरुषार्थ सोडायचा नाही, कर्म जरूर करायचे आहेत.कर्म अकर्म विकर्माच्या गतीला समजून नेहमी श्रेष्ठ कर्मच करायचे आहेत.

वरदान:-
नेहमी बाबांच्या अविनाशी आणि निस्वार्थ प्रेमामध्ये मगन राहणारे मायाप्रुप भव.

जी मुलं नेहमी बाबांच्या प्रेमामध्ये मगन राहतात,त्यांना माया आकर्षित करू शकत नाही.जसे वॉटरप्रूफ कपडा असतो,तर पाण्याचा एक थेंब पण त्याच्यावरती थांबू शकत नाही. असे बाबांच्या लगन मध्ये मगन राहतात.ते मायाप्रुफ बनतात.मायेचा कोणताही आघात होऊ शकत नाही कारण बाबाचे प्रेम अविनाशी आणि निस्वार्थ आहे,असे अनुभवी बनले,तर अल्प काळाच्या प्रेमामध्ये फसू शकत नाहीत. एक शिवपिता दुसरा मी,दोघामध्ये तिसरे कोणी येऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
अनासक्त होऊन कर्म करणारेच सेकंदामध्ये पूर्णविराम लावू शकतात.