02-08-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   01.03.86  ओम शान्ति   मधुबन


पवित्रहंस बुद्धी, दृष्टी आणि मुख


आज बापदादा सर्व पवित्र हंसा ची सभा पाहत आहेत.ही साधारण सभा नाही परंतु आत्मिक पवित्र हंसाची सभा आहे.बापदादा प्रत्येक पवित्र हंसाला पाहत आहेत की,सर्व किती पवित्र हंस बनले आहेत.हंसाची विशेषता चांगल्या प्रकारे जाणता का? सर्वात प्रथम हंस बुद्धी म्हणजे नेहमी प्रत्येक आत्म्या प्रति श्रेष्ठ आणि शुभ विचार करणारे.पवित्र हंस म्हणजे दगड आणि रत्नाला चांगल्या प्रकारे पार करून परत धारण करणारे.प्रथम प्रत्येक आत्म्याचे भाव पारखून परत धारण करणारे. कधीही बुद्धीमध्ये,कोणत्याही आत्म्याच्या प्रति अशुभ किंवा साधारण भाव धारण करणारे नको.नेहमी शुभ भाव आणि शुभ भावना धारण करायच्या आहेत.भाव जाणल्यामुळे कधी पण, कोणत्याही साधारण स्वभाव किंवा व्यर्थ स्वभावाचा प्रभाव पडणार नाही.शुभ भाव,शुभ भावना,ज्याला भाव स्वभाव म्हणतात,जे व्यर्थ आहे त्याला बदलायचे आहे.बापदादा पाहत आहेत,असे पवित्र हंस बुद्धी किती बनले आहेत.असेच हंस वृत्ती म्हणजे प्रत्येक आत्म्या प्रति श्रेष्ठ कल्याणाची वृत्ती असणे.प्रत्येक आत्म्याच्या अकल्याणा च्या गोष्टी ऐकून,पाहून पण,अकल्याणला कल्याणच्या वृत्तीने बदलणे याला म्हणतात पवित्र हंस.आपल्या कल्याणच्या वृत्ती द्वारे,दुसर्यांना पण बदलू शकतात.त्यांच्या अकल्याणाच्या वृत्तीला,आपल्या कल्याणाच्या वृत्तीने बदलणे,हेच पवित्र हंसाचे कर्तव्य आहे.याचप्रमाणे दृष्टीला नेहमी,प्रत्येक आत्म्याच्या प्रति,श्रेष्ठ शुद्ध, स्नेहाची दृष्टी हवी.कसे पण आहेत परंतु आपली सर्वांच्या प्रती,स्नेहा ची दृष्टी धारण करणे, याला म्हणतात पवित्र दृष्टी.याचप्रकारे वचना मध्ये पण पूर्वी ऐकवले होते, वाईट,कडवे बोलणे वेगळी गोष्ट आहे, ते तर ब्राह्मणांनी बदलले आहेत परंतु व्यर्थ बोल असणाऱ्यांना पण पवित्र हंस मुख म्हणणार नाही.मुख पण पवित्र हंस मुख पाहिजे.ज्या मुखाद्वारे कधीच व्यर्थ निघणार नाही,याला म्हणतात हंस मुख स्थिती.तर पवित्र हंस बुद्धी,दृष्टी आणि मुख.जेव्हा हे पवित्र अर्थात श्रेष्ठ बनतात,तर स्वतः पवित्र हंसाच्या स्थितीचा प्रत्यक्ष प्रभाव दिसून येतो.तर सर्व स्वता:ला पहा,किती पवित्र हंस बनून चालतो-फिरतो?कारण स्वतःच्या प्रगती साठीचा वेळ जास्त राहिला नाही, म्हणून स्वता:ला तपासा आणि त्यामध्ये बदल करा.

या वेळेतील परिवर्तन,खूप काळाचे परिवर्तन असणाऱ्या,सुवर्ण दुनियेचे अधिकारी बनवतील.हा इशारा बापदादाने यापूर्वी पण दिला होता की,स्वतःकडे खास लक्ष द्यायला हवे. थोड्या वेळाचे लक्ष आहे आणि फार काळापासूनचे लक्ष्याच्या फळस्वरूप श्रेष्ठ प्राप्तीचे प्रारब्ध आहे,म्हणून हा थोडा वेळ खूपच श्रेष्ठ कल्याणकारी आहे.हे कष्ट पण नाहीत,फक्त बाबांनी जी श्रीमत दिली आहे,त्याचे धारण करायचे आहे.धारणा केल्यामुळे प्रत्यक्ष स्वत:च होईल.पवित्र हंसाचे काम धारण करणे.तर पवित्र हंसाची ही सभा आहे ना.ज्ञानसंपन्न बनले.व्यर्थ आणि समर्थला चांगल्या रीतीने समजले आहात ना.तर समजल्यानंतर कर्मामध्ये स्वतःच येते. तसेपण साधारण भाषांमध्ये हेच म्हणतात ना,आता मला समजले आहे,परत केल्या शिवाय राहू शकत नाहीत.तर तुम्ही तपासा की साधारण किंवा व्यर्थ काय आहे?कधी व्यर्थ किंवा साधारणलाच श्रेष्ठतर समजत नाहीत,म्हणून प्रथम मुख्य आहे,पवित्र हंस बुद्धी. त्यामुळे स्वता:च पारखण्याची शक्ती पण येते,कारण व्यर्थ संकल्प आणि व्यर्थ वेळ तेव्हाच जातो,जेव्हा त्याची पारख होत नाही,की बरोबर आहे की चुकीचे आहे.स्वतःच्या व्यर्थला,चुकीला बरोबर समजतात,तर जास्त वेळ जातो.व्यर्थ आहे परंतु समजता मी समर्थ आहे,बरोबर विचार करत आहे. जे मी म्हटले तेच बरोबर आहे, यामध्येच पारखण्याची शक्ती नसल्यामुळे मनाची शक्ती,वेळेची शक्ती,वाणीची शक्ती सर्व नष्ट होतात आणि दुसऱ्याकडून कष्ट घेण्याचे ओझे वाढत जाते. कारण पवित्र हंस बुध्दी बनले नाहीत.तर बापदादा सर्व पवित्र हंसाला परत इशारा देत आहेत की,उलट ला उलटे करू नका. हा आहेच उलटा,असा विचार करू नका परंतु त्याला सुलटे कसे करायचे,हा विचार करा,याला म्हटले जाते कल्याणाची भावना.श्रेष्ठ भाव,शुभ भावना द्वारे,आपल्या व्यर्थ भाव-स्वभावाला आणि दुसऱ्याच्या व्यर्थ भाव-स्वभावाला परिवर्तन करण्यामध्ये विजय प्राप्त कराल, समजले.प्रथम स्वतःवरती विजय, परत सर्वांवरती विजय,परत प्रकृती वरती विजयी बनाल.हे तिन्ही विजय तुम्हाला विजय माळेचे मणी बनवेल. प्रकृतीमध्ये वातावरण किंवा स्थूल प्रकृतीच्या सर्व समस्या येतात.तर तिन्ही वरती विजय हवा.या आधारा द्वारेच विजय माळे मध्ये आपला क्रमांक मिळवू शकतात,पाहू शकतात,म्हणून नावच विजयंती नाव ठेवले आहे.तर सर्व विजयी आहात.अच्छा.

आज ऑस्ट्रेलियाची भेटण्याची पाळी आहे.ऑस्ट्रेलिया निवासींना मधुबन पेक्षा पण स्वर्ण संधी मिळते कारण सर्वांना पुढे जाण्याची संधी देतात, हीच विशेषता आहे.दुसऱ्यांना पुढे ठेवणे, संधी देणे म्हणजे चान्सलर बनणे आहे.संधी घेणाऱ्यांना,संधी देणाऱ्यांना,दोघांनाही संधीवान म्हणतात.बापदादा नेहमी प्रत्येक मुलांची विशेषता पाहतात आणि वर्णन पण करतात.ऑस्ट्रेलिया मध्ये पांडवांना सेवा करण्याची विशेष संधी मिळाली आहे.जास्त सेवा केंद्र पण पांडवच सांभाळतात.शक्तीने पांडवांना सेवीची संधी दिली आहे.पुढे ठेवणारे नेहमीच पुढे जातात.ही पण शक्तींची विशेषता आहे.परंतु नेहमी निमित्त समजून सेवेमध्ये पुढे जात आहात ना.परंतू पांडव नेहमी सेवांमध्ये निमित्त समजून पुढे जात आहात ना.सेवेमध्ये निमित्त भावच सेवेच्या सफलतेचा आधार आहे.बापदादा तीन शब्द म्हणतात ना,साकार मध्ये पण अंत काळामध्ये उच्चारण केले होते. निराकारी, निर्विकारी,निरहंकारी भव. या तीन विशेषता निमित्त भाव द्वारे सहज येतात.निमित्त भाव नाही तर या तिन्ही विशेषतांचा अनुभव होत नाही.निमित्त भाव अनेक प्रकारचा मी पणा,माझे पणा सहजच नष्ट करतो.न मी आहे,न माझे आहे.स्थिती मध्ये जो गोंधळ होतो,तो याच एका कमीमुळे होतो.सेवे मध्ये कष्ट करावे लागतात आणि आपली उडती कला बनवण्यामध्ये पण कष्ट करावे लागतात.निमित्त आहेत म्हणजेच निमित्त बनवणाऱ्याची आठवण नेहमी राहावी,तर याच विशेषते द्वारे सेवेमध्ये नेहमी वृध्दी करत पुढे जात राहा.सेवेचा विस्तार होणे,हे पण सेवेच्या सफलतेची लक्षणं आहेत. आत्ता अचल अडोल स्थितीचे चांगले अनुभवी झाले आहात,समजले. आँस्ट्रेलिया म्हणजे काहीतरी जास्त आहे,जे दुसऱ्या मध्ये नाही.आँस्ट्रेलिया मध्ये दुसरी विविधता आहे,जी गुजराती इ.मध्ये नाही.स्वत: पासून सुरुवात करुन जास्त सेवा केली आहे.समवयस्कांना जागृत केले आहे.कुमार-कुमारींचे चांगले कल्याण होत आहे.या जीवनामध्ये,आपल्या श्रेष्ठ जीवनाचा निर्णय करायचा असतो.आपले जीवन बनवले तर नेहमीसाठी श्रेष्ठ बनले.उलटी शिडी चढण्या पासून वाचले,म्हणजे विकारी बनण्यापासून वाचले.बापदादा खुश होतात की,एक दोघांना,त्यामुळे अनेक दिपक जागृत होऊन,दिपमाळा बनवत आहेत.उमंग उत्साह पण चांगला आहे.सेवेमध्ये व्यस्त राहिल्यामुळे प्रगती चांगले करत आहात.

एक तर निमित्त भावच्या गोष्टी ऐकवल्या,दुसरे म्हणजे जे सेवेच्या निमित्त बनतात,त्यांच्यासाठी स्वतःची प्रगती किंवा सेवेच्या प्रगतीसाठी एक विशेष घोषवाक्य सुरक्षेचे साधन आहे.आम्ही निमित्त बनलेलो,जे करु त्याला पाहून सर्व करतील,कारण सेवेचे निमित्त बनणे म्हणजेच, रंगमंचावर येणे.जसे कोणी कलाकार जेव्हा रंगमंचावर येतात तर खूप लक्ष ठेवतात.तर सेवेच्या निमित्त बनणे म्हणजेच रंगमंचावर येणे.रंगमंचा कडे सर्वांची नजर असते ना,आणि जितके हिरो कलाकार असतात,त्यांच्यावरती जास्त लक्ष असते. तर हे घोषवाक्य सुरक्षेचे साधन आहे,याद्वारे स्वत:च उडती कलेचा अनुभव कराल.तसे तर सेवाकेंद्रा वरती राहता किंवा कुठे ही राहून सेवा करतात.सेवाधारी तर सर्वच आहेत.काही आपल्या निमित्त स्थानावरती राहून सेवेची संधी घेतात, ते पण सेवेच्या रंगमंचावरच आहेत. सेवेचे शिवाय आपला वेळ कधीच वाया घालवायचा नाही.सेवेचे खाते खूप जमा होते.खऱ्या मनापासून सेवा करणारे,आपले खाते खूप चांगल्या प्रकारे जमा करत आहेत.बापदादांच्या जवळ प्रत्येक मुलांचे सुरवातीपासून अंतकाळापर्यंत सेवेचे खाते आहे आणि त्यामध्ये आपोआप जमा होत राहते. एका एकाचे अकाउंट ठेवावे लागत नाही.अकाउंट ठेवणाऱ्या जवळ खूप फाईली असतात.बाबांजवळ तशा फाईल नाहीत.एका सेकंदामध्ये प्रत्येकाचे सुरुवातीपासुन अंतकाळा पर्यंत रजिस्टर सेकंदामध्ये स्पष्ट होते. आपोआप जमा होत राहते.असे कधीच समजायचे नाही,आम्हाला तर कोणी पाहत नाहीत,समजत नाहीत. बापदादांच्या जवळ तर जे जसे आहेत,जे करतात,जितके करतात,ज्या स्थिती द्वारे करतात,सर्व जमा होते.फाईल नाहीत परंतु स्पष्ट आहे.आँस्ट्रेलिया मध्ये शक्तीनी बाबांचे बनण्याचे,बाबांना ओळखून बाबांशी स्नेह निभावण्यामध्ये,हिंमत खूप चांगली ठेवली आहे.हलचलची चूक होते,ती तर काही स्थानाच्या धरतीच्या किंवा पूर्व जीवनाच्या संस्कारामुळे हलचल होते.त्यांना पार करून स्नेहाच्या बंधनांमध्ये पुढे जात राहतात म्हणून बाप दादा शक्तींच्या हिम्मतीचे अभिनंदन करतात.एक बळ,एक भरोसा पुढे घेऊन जात आहे.तर शक्तींची हिंमत आणि पांडवांचा सेवेचा उमंग दोन्ही पण पंख पक्के झाले आहेत.सेवेच्या क्षेत्रामध्ये पांडव पण महावीर बनून पुढे जात आहेत.हलचल पार करण्यामध्ये हुशार आहेत.सर्वांचे चित्र तेच आहेत.पांडव मोठे,उंच दाखवतात कारण त्यांनी स्थिती पण तशीच उच्च आणि मजबूत बनवली आहे,म्हणून पांडव उंच आणि बहादूर दाखवले आहेत.ऑस्ट्रेलिया निवासी दयाळू पण जास्त आहेत, भटकणाऱ्या आत्म्यावरती दयाळू बनून सेवेमध्ये पुढे जात आहेत.ते कधीच सेवेच्या बिना राहू शकत नाहीत.बाप दादांना मुलांच्या प्रगतीमुळे खास खुशी आहे.विशेष खुशनसीब आहात.प्रत्येक मुलाच्या उमंग उत्साहा वरती बाप दादांना आनंद होतो.कसे प्रत्येक जण श्रेष्ठ लक्षाद्वारे पुढे जात आहेत आणि पुढे जात राहतील.बापदादा नेहमी विशेषतेला पाहतात.प्रत्येक जण एकमेका पेक्षा प्रिय आहे.तुम्ही पण एक-दोघांना याच विधीद्वारे पाहता ना.ज्याला पण पाहता,एक दोघांपेक्षा प्रिय वाटतात,कारण पाच हजार वर्षानंतर भेटलेले आहेत.तर खूप प्रिय वाटतात.बाबांशी प्रेमाची लक्षणं आहेत,सर्व ब्राह्मण आत्मे प्रिय वाटणे.प्रत्येक ब्राह्मण प्रिय वाटणे म्हणजे बाबांशी प्रेम आहे.माळेमध्ये एक दोघाच्या सबंधामध्ये तर ब्राह्मणच येतील.बाबा तर निवृत्त होऊन पाहतील,म्हणून बाबांशी प्रेमाची लक्षणाला नेहमी अनुभव करा.सर्व बाबांचे प्रिय आहेत,तर माझे पण प्रिय आहेत,अच्छा.

पार्टी सोबत वार्तालाप:- सर्व स्वतःला विशेष आत्मा समजता ना? विशेष आत्मे आहात,विशेष कार्याच्या निमित्त आहात आणि विशेषता दाखवायच्य आहेत,अशा स्मृतीमध्ये रहा. विशेष स्मृति,साधारण स्मृतिला पण शक्तिशाली बनवते,व्यर्थला पण समाप्त करते.तर नेहमी हा विशेष शब्द आठवणीत ठेवा.बोलणे पण विशेष,पाहणे पण विशेष,करणे पण विशेष,विचार करणे पण विशेष. प्रत्येक गोष्टीमध्ये हा विशेष वापरल्यामुळे स्वतःच बदलून जाल आणि याच स्मृतिद्वारे स्वपरिवर्तन आणि विश्वपरिवर्तन सहज होईल. प्रत्येक गोष्टींमध्ये विशेष शब्द वापरत चला,याद्वारे जे संपूर्णतेला प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे,मंजिल आहे, त्याला प्राप्त कराल.

२) नेहमी बाबा आणि वारशाच्या स्मृती मध्ये राहता का?श्रेष्ठ स्मृतिद्वारे श्रेष्ठ स्थितीचा अनुभव होतो. स्थितीचा आधार श्रेष्ठ स्मृति आहे.जर स्मृति कमजोर आहे,तर स्थिती पण कमजोर होते.स्मृती नेहमी शक्तिशाली राहावी.ती शक्तीशाली स्मृती आहे,"मी बाबांचा,बाबा माझे".याच स्मृति द्वारे स्थिती शक्तिशाली राहील आणि दुसर्यांना पण शक्तिशाली बनवाल.तर नेहमी स्मृतिच्या वरती विशेष लक्ष रहावे. समर्थ स्मृति,समर्थ स्थिती,तर समर्थ सेवा स्वतःच होत राहील. स्मृति स्थिती आणि सेवा तीन्ही समर्थ हवे. जसे लाईटचे बटण चालू केल्यानंतर, प्रकाश होतो,बटण बंद केले तर अंधार होतो,असेच स्मृती पण एक बटन आहे.स्मृतीचे बटन जर कमजोर आहे,तर स्थिती पण कमजोर बनते.तर नेहमी स्मृती रुपी बटनाकडे लक्ष रहावे.याद्वारे स्वतःचे आणि सर्वांचे कल्याण आहे.नवीन जन्म झाला तर नविन स्मृति हव्यात,जुन्या स्मृति सर्व नष्ट व्हायला पाहिजेत.तर या विधीद्वारे,सर्व सिध्दी प्राप्त करत चला.

३) सर्व स्वतःला भाग्यवान समजता का?वरदान भूमी वरती येणे पण महान भाग्य आहे.हे एक भाग्य वरदान भूमीवर येण्याचे मिळाले,तर याच भाग्याला जितके पाहिजे,तेवढे श्रेष्ठ बनवू शकता.श्रेष्ठ मतच भाग्याची रेषा ओढण्याचे कलम आहे.यामध्ये जितकी पण आपली श्रेष्ठ रेषा वाढवत जाल,तेवढे श्रेष्ठ बनत जाल.साऱ्या कल्पामध्ये हीच श्रेष्ठ वेळ,भाग्याची रेषा बनवण्यासाठी मिळाली आहे.अशा वेळेत आणि अशा स्थानावरती पोहोचले आहात. तर थोड्या मध्ये खूश होणारे नाहीत ना.देणारे देत आहेत,तर घेणाऱ्यांनी का थकावे?बाबांची आठवणच श्रेष्ठ बनवते.बाबांची आठवण करणे म्हणजे पावन बनणे.जन्म जन्मांतराचे संबंध आहेत,तर आठवण करणे कठिण का?फक्त स्नेहा द्वारे आणि संबंधा द्वारे आठवण करा.जिथे स्नेह असतो,त्याची आठवण येणार नाही,असे होऊ शकत नाही.जर विसरण्याचा प्रयत्न केला,तरी आठवण येत राहते.अच्छा.

वरदान:-
मस्तका द्वारे संतुष्टतेच्या चमकची झलक दाखवणारे साक्षात्कार मूर्त भव.

जे नेहमी संतुष्ट राहतात,त्यांच्या मस्तका द्वारे संतुष्टतेची झलक नेहमी चमकत राहते.त्यांना कोणीही उदास आत्मा जर पाहते, तर ते पण खुश होतात,त्यांची उदासी दूर होते. ज्यांच्या जवळ खुशीचा खजाना आहे,त्यांच्याकडे स्वतःच सर्व आकर्षित होतात.त्यांचा खुशीचा चेहरा चैतन्य फलक बनतो,जे अनेक आत्म्यांना बनवणाऱ्यांचा परिचय देतो.तर असे संतुष्ट राहणारे आणि सर्वांना संतुष्ट करणारे संतुष्ट मणी बना,ज्याद्वारे अनेकांना साक्षात्कार होईल.

सुविचार:-
दुःख देणाऱ्यांचे काम आहे दु:ख देणे आणि तुमचे काम आहे स्वतः ला वाचवणे.