02-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही आपले भाग्य भविष्य नवीन दुनियेसाठी बनवत आहात, हा तुमचा राजयोग नवीन दुनियेसाठीच आहे"

प्रश्न:-
भाग्यवान मुलांची मुख्य लक्षणं कोणती आहेत?

उत्तर:-
भाग्यवान मुलं कायदेशीर श्रीमतावर चालतील. कोणतेही कार्य कायद्याच्या विरुद्ध करून स्वतःला किंवा बाबांना फसवणार नाहीत (२) त्यांना ज्ञान योगाची पूर्ण आवड असेल, ज्ञान समजून सांगण्याची आवड असेल. (३) चांगल्या गुणांनी पास होऊन शिष्यवृत्ती घेण्याचा पुरुषार्थ करतील. (४) कधी कोणाला दुःख देणार नाहीत. कधी कोणते उलटे कर्म करून करणार नाहीत.

गीत:-
भाग्य जागृत करून आलो आहे. . . .

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. नवीन मुलांनी पण ऐकले, तर जुन्या मुलांनी पण ऐकले, कुमारींनी पण ऐकले. ही शाळा आहे, शाळेमध्ये काही ना काही भाग्य बनवण्यासाठी जातात. तेथे तर अनेक प्रकारचे भाग्य असते. कोणी डॉक्टर, कोणी वकील बनण्याचे भाग्य बनवतात. भाग्याला मुख्य लक्ष म्हटले जाते. भाग्य बनवण्याशिवाय पाठशाळे मध्ये काय शिकणार? आता येथे मुलं जाणतात, नवीन दुनियेसाठी आपले राज्य भाग्य घेण्यासाठी आलो आहे. हे नवीन दुनिया साठी आहे. ते जुने दुनियेसाठी वकील, अभियंता, डॉक्टर इत्यादी बनतात. ते बनत बनत, आता जुन्या दुनियेत खूप थोडा वेळ राहिला आहे, तो तर नष्ट होईल. ते भाग्य आहे, या मृत्यू लोकांसाठी, या जन्मासाठी. तुम्ही तर नवीन दुनिये साठी शिकत आहात. तुम्ही नवीन दुनियेसाठी भाग्य बनवून आले आहात. नविन दुनियेत तुम्हाला राज्य भाग्य मिळेल. कोण शिकवत आहेत? बेहद्दचे बाबा, यांच्याद्वारेच वारसा मिळणार आहे. जसे डॉक्टर लोकांना, शिक्षणाद्वारे डॉक्टरीचा वारसा मिळतो. अच्छा वृद्ध होतात तेव्हा गुरुच्या जवळ जातात, कोणती इच्छा असते, ते म्हणतात शांतीधाम जाण्याची इच्छा आहे. आम्हाला सद्गती द्या, येथून शांतीधाम मध्ये घेऊन चला. पित्या पासून वारसा मिळतो, या जन्मासाठी. बाकी गुरु पासून तर काहीच मिळत नाही. शिक्षका द्वारे काही ना काही वारसा मिळतो कारण कामधंदा तर पाहिजे ना. पित्याचा वारसा असतानी पण शिकत राहतात की, आपले कमाई करू. गुरुद्वारे काही कमाई होत नाही. होय काही-काही गीता इत्यादी चांगल्या प्रकारे शिकून, परत गितेवरती भाषण इत्यादी करतात. हे सर्व अल्पकाळ सुखासाठी आहे. आता तर या मृत्युलोकाचा अंत आहे. तुम्ही जाणतात आम्ही नवीन दुनियेत, भाग्य बनवण्यासाठी आलो आहे. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आपली किंवा पित्याची मिळकत सर्व नष्ट होईल. तरीही खाली हात जातील. आता तर नवीन दुनियेसाठी कमाई पाहिजे. जुन्या दुनियाचे मनुष्य तर कमाई करू शकत नाहीत. नवीन दुनियेची कमाई करणारे तर शिवबाबाच आहेत. येथे तुम्ही नवीन दुनिया साठी भाग्य बनवण्यासाठी आले आहात. ते तुमचे पिता आहेत, शिक्षक आहेत आणि गुरु पण आहेत, आणि ते भविष्यासाठी कमाई शिकवण्यासाठी या संगमयुगामध्ये येतात. आता जुन्या दुनियेमध्ये थोडे दिवस आहेत. हे दुनियाचे मनुष्य जाणत नाहीत. तुम्ही मुलं जाणतात, नवीन दुनियेसाठी थोडे दिवस आहेत. तुम्ही मुलं जाणतात, नवीन दुनियेसाठी आमचे पिता, शिक्षक, सद्गुरु आहेत. बाबा तर येतात शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. कोणी जर भाग्य बनवत नसतील, तर काहीच समजत नाहीत. एकच घरांमध्ये पत्नी ज्ञान योग शिकते, पती शिकत नाहीत. मुलं शिकतात, तर मात पिता ज्ञान योग करत नाहीत, असे होत राहते. यज्ञाच्या सुरुवातीला अनेक परिवार आले परंतु माया चे वादळ आल्यामुळे परत आश्चर्यवत ऐकून, दुसऱ्याला ज्ञान सांगून परत बाबांना सोडून गेले. असे गायन पण आहे, आश्चर्यवत ज्ञान ऐकतात, दुसऱ्यांना सांगतात, बाबाचे बनतात आणि परत ज्ञान योग सोडून जातात. ही पण पूर्वनियोजित नाटकाची भावी आहे. वैश्विक नाटकाची गोष्ट आहे ना. बाबा स्वतः म्हणतात, ही माया, हे नाटक खूप आश्चर्यकारक आहे, कोणाला सोडचिठ्ठी दिली? पती पत्नी एक-दोघांना सोडचिट्टी देतात. मुलं पित्याला सोडून देतात. येथे तर तसे नाही. येथे तर सोडचिठ्ठी देऊ शकत नाहीत. तर मुलांना खरी कमाई करण्यासाठी शिवबाबा आले आहेत. बाबा थोडेच कोणाला खड्ड्यामध्ये पाडतील. बाबा तर पतित-पावन दयावान आहेत. बाबा दुःखापासून मुक्त करतात आणि मार्गदर्शक बनून सोबत घेऊन जातात. असे कोणी लौकिक गुरु म्हणणार नाहीत की, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो. ग्रंथांमध्ये भगवानुवाच आहे, मी तुम्हा सर्वांना घेऊन जातो. मच्छरा सारखे सर्व जाणार आहेत. तुम्ही मुलं चांगल्या प्रकारे जाणतात, आता आम्हाला घरी जायचे आहे, हे शरीर सोडायचे आहे. तुम्ही मेले, तर सर्व दुनिया मेल्यासारखी आहे, फक्त स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करायची आहे. हे तर जुने शरीर आहे. जसे जुन्या घरांमध्ये बसतात, नवीन घर समोर बनत राहते, तर पिता पण समजतात आमच्यासाठी नविन घर बनत आहे, मुलं पण समजतात आमच्यासाठी बनत आहे. बुद्धी नवीन घराकडे चालली जाते, घरामध्ये हे बनवावे, हे करावे, बुद्धी त्यामध्येच व्यस्त राहते, परत जुने तोडतात. ममत्व सर्व जुन्या पासून नष्ट होऊन नवीन घराशी जुडते. या बेहद्दच्या गोष्टी आहेत. जुन्या दुनिये मधून ममत्व काढून, नवीन दुनियेशी लावायचे आहे. तुम्ही जाणता, जुनी दुनिया नष्ट होणार आहे. नवीन दुनिया स्वर्ग आहे, त्यामध्ये आम्हाला राज्यपद घ्यायचे आहे. जितके योगामध्ये राहाल, धारणा कराल, दुसऱ्यांना ज्ञान समजावून सांगाल, तितका खुशीचा पारा चढलेला राहील. खूप मोठी परीक्षा आहे. आम्ही २१ जन्मासाठी वारसा घेत आहोत. साहूकार बनणे तर चांगले आहे ना. दिर्घ आयुष्य मिळाले तर चांगलंच आहे ना. सृष्टिचक्राची जितकी आठवण कराल, जेवढे आपल्यासारखे बनवाल, तेवढाच फायदा आहे. राजा बनायचे आहे, तर प्रजा पण बनवायची आहे. प्रदर्शनीमध्ये अनेक येतात, ते सर्व प्रजा बनतात, कारण या ज्ञानाचा विनाश होत नाही. बुद्धीमध्ये येते पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनायचे आहे. रामराज्याची स्थापना होत आहे. रावण राज्याचा विनाश होईल. सतयुगा मध्ये तर देवताच असतात. बाबांनी समजावले होते, लक्ष्मीनारायणचे जे चित्र बनवतात, त्या मध्ये लिहायला पाहिजे, पूर्वजन्मा मध्ये, हे तमोप्रधान दुनिया मध्ये होते, परत या पुरुषार्था द्वारे तमोप्रधान पासून सतोप्रधान विश्वाचे मालक बनतात. मालक, राजा, प्रजा सर्व असतात ना. प्रजा पण म्हणेल भारत आमचा सर्वात उच्च आहे. बरोबर भारत सर्वात श्रेष्ठ होता. आत्ता नाही, होता जरुर. आता तर अगदीच गरीब आहे. प्राचीन भारत सर्वात सावकार होता. आम्ही भारतवासी सर्वात उच्च देवता होतो. दुसऱ्या कोणाला देवी देवता म्हटले जात नाही. आता तुम्ही मुलं हे शिकून, परत दुसऱ्यांना समजून सांगायचे आहे. बाबांनी सूचना दिल्या आहेत, कशाप्रकारे प्रदर्शनी इत्यादीमध्ये तार पाठवावी, ते लिहून आणा. तुमच्या जवळ चित्र पण आहे, तुम्ही स्पष्ट करून सांगू शकतात, त्यांनी हे पद कसे मिळवले? आता परत हे पद मिळवत आहेत, शिव बाबांकडून. त्यांचे चित्र पण आहे. शिव परमपिता परमात्मा आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकर ची पण चित्र आहेत. परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत, विष्णुपुरी समोर आहे. विष्णू द्वारा नवीन दुनियेची पालना होते. विष्णू राधे- कृष्णाचे दोन रुपं आहेत. आता गीतेचे भगवान कोण आहेत? प्रथम तर गीतेचे भगवान निराकार शिव आहेत, ना की कृष्ण. ब्रह्माच विष्णू आणि विष्णूच ब्रह्मा कसे बनतात, एकाच चित्रावर समजून, सांगण्यामध्ये किती वेळ लागतो. जेव्हा बुद्धीमध्ये गोष्टी बसतील. प्रथम तर हे समजून परत लिहायला पाहिजे. बाबा समजवतात, ब्रह्मा द्वारे तुम्हाला योगबळाद्वारे २१ जन्माचा अधिकार मिळतो. शिवबाबा ब्रह्मा द्वारे वारसा देत आहेत. प्रथम यांची आत्मा आत्मा धारण करते, मुळ गोष्ट हीच आहे. चित्र तर शिवाचे दाखवतात. हे परमपिता परमात्मा शिव आहेत, परत प्रजापिता ब्रह्मा जरूर पाहिजेत. येथे प्रजापिताचे ब्रह्माकुमार, ब्रह्माकुमारी तर पुष्कळ आहेत. जोपर्यंत ब्रह्माची मुलं बनले नाहीत, ब्राह्मण बनले नाहीत, तोपर्यंत शिवबाबा पासून वारसा कसे घेतील? कुख संतान तर होऊ शकणार नाहीत. हे पण गायन केले जाते, मुख वंशावळ. तुम्ही म्हणाल आम्ही प्रजापिता ब्रह्माचे मुख वंशावळ आहोत. ते गुरुचे शिष्य किंवा अनुयायी असतात. येथे तुम्ही एकालाच पिता, शिक्षक, सद्गुरु म्हणतात, ते पण त्यांनाच म्हणतात, जे निराकार शिव बाबा ज्ञानाचे सागर, ज्ञानवान आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देतात, ते शिक्षक पण आहेत. निराकार येऊन साकार द्वारे ज्ञान देतात. आत्माच बोलते ना. आत्माच म्हणते माझ्या शरीराला तंग करू नका. आत्माच दु:खी होते. या वेळेत पतित आत्मा आहे. पतित-पावन बनवणारे परमपिता परमात्मा आहेत. आत्माच बोलवते, पतित-पावन, ईश्वरीय पिता. आत्ता शिवपिता तर एकच आहेत, परत आठवण कोणाची करतात? आत्मा म्हणते, हे आमच्या आत्म्याचे पिता आहेत, ते शरीराचे पिता असतात. येथे समजवले जाते, आता आत्म्यांचे पिता जे निराकार आहेत, ते मोठे की शरीराचे रचनाकार, साकार पिता मोठे? साकार तर निराकार ची आठवण करतात. सर्वांना समजावून सांगितले जाते, जेव्हा विनाश समोर आहे. पारलौकिक पिता तर येतातच तेव्हा, जेव्हा सर्वांना परत घेऊन जातात. बाकी जे काय आहे, ते सर्व विनाश होणार आहे, याला म्हटले जाते मृत्यू लोक. जेव्हा कोणी मरतात, तर म्हणतात स्वर्गवासी झाला, शांतीधाम गेला. मनुष्याला हे माहित नाही की, परलोक सतयुगाला म्हटले जाते, की शांतीधामला. सतयुग तर येथेच असते. परलोक शांतीधामला म्हणतात. हे ज्ञान समजावून सांगण्यासाठी खूप युक्ती पाहिजे. मंदिरामध्ये जाऊन समजून सांगायला पाहिजे, ही शिवबाबांची स्मृतिस्थळं आहेत, तेच शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. शिव वास्तव मध्ये बिंदू आहेत, परंतु बिंदू ची पूजा कसे करणार? फळं, फूलं इत्यादी कसे अर्पण करणार, यासाठी मोठे रूप बनवले आहे. इतके मोठे रूप तर नसते. गायन पण आहे भ्रकुटीमध्ये अजब सितारा चमकतो. मोठी गोष्ट असेल तर वैज्ञानिक लगेच त्यांना पकडू शकले असते. बाबा समजवतात, त्यांना परमपिता परमात्मा चा पूर्ण परिचय मिळाला नाही. जोपर्यंत भाग्य जागृत होईल, आतापर्यंत भाग्य जागृत झाले नाही. जोपर्यंत बाबाला जाणत नाहीत, हे समजत नाही की, आमची आत्मा बिंदू समान आहे. शिवबाबा पण बिंदी आहेत. आम्ही बिंदूची आठवण करतो, असे समजून आठवण करतील, तेव्हाच विकर्म विनाश होतील. बाकी, हे दिसून येते, ते दिसले, याला मायेचे विघ्न म्हटले जाते. आता आनंद आहे की, आम्हाला परमपिता परमात्मा भेटले आहेत परंतु ज्ञान पण पाहिजे ना. कोणाला कृष्णाचा साक्षात्कार होतो, तर खूप आनंदी होतात. कृष्णाचा साक्षात्कार करून खूप आनंदामध्ये नाचतात परंतु त्याद्वारे काही सद्गती होत नाही. हे साक्षात्कार तर अनायास होत राहतात. जर चांगल्या रितीने शिकले नाहीत, तर प्रजा मध्ये चालले जातील. थोडे पण ऐकले तर कृष्णपुरी मध्ये, साधारण प्रजा इत्यादी बनतील. आता तुम्ही मुलं जाणता, शिवबाबा आम्हाला हे ज्ञान ऐकवत आहेत. तेच ज्ञानाचे सागर आहेत.

बाबाचा आदेश आहे की, पवित्र बनायचे आहे, परंतु काहीजण पवित्र पण राहू शकत नाहीत. कधी-कधी पतित पण येथे लपून येऊन बसतात. ते आपलेच नुकसान करतात, स्वतःलाच फसवतात. बाबांना फसवण्याची तर गोष्टच नाही. बाबाला तर कोणी फसवू शकत नाही, काही पैसे घ्यायचे आहेत काय? शिवबाबांच्या श्रीमतानुसार चालत नाही तर काय हाल होतील? खूप सजा खावी लागेल आणि पद पण भ्रष्ट होईल. कोणतेही कार्य कायद्याच्या विरुद्ध करायला नाही पाहिजे. बाबा तर समजवतील ना, तुमची चलन ठीक नाही. बाबा तर कमाई करण्याचा रस्ता सांगतात, परत कोणी करतील ना करतील, त्यांचे भाग्य. सजा खाऊन परत शांतीधाम मध्येच जायचे आहे, पद भ्रष्ट झाले तर काहीच मिळणार नाही, येथे अनेक येतात परंतु येथे बाबा पासून वारसा घेण्याची गोष्ट आहे. मुलं म्हणतात बाबा पासून आम्ही स्वर्गाचे सूर्यवंशी राज्यपद मिळवू. विद्यार्थी शिष्यवृत्ती घेतात ना, चांगल्या मार्काने पास होणाऱ्यालाच शिष्यवृत्ती मिळते ना. ही माळ त्यांचीच बनली आहे, ज्यांनी शिष्यवृत्ती घेतली आहे. जसे पास होतील, तशी स्कॉलरशिप मिळते. वृद्धी होत हजारो बनतात. राजाई पद मिळवणे, शिष्यवृत्ती घेणे आहे. चांगल्या प्रकारे शिकतात ते गुप्त राहू शकत नाहीत. अनेक नवीन पण, जुन्या पेक्षा पुढे जातात, हिऱ्या सारखे जीवन बनवतात. आपली खरी कमाई करून २१ जन्मासाठी वारसा मिळवतील, खूप खुशी होते. तुम्ही जाणता हा वारसा आत्ता घेतला नाही, तर परत कधीच घेऊ शकणार नाहीत. अभ्यासाची आवड असते ना. काहींना तर जरापण ज्ञान समजावून सांगण्यातची आवड नाही. पूर्वनियोजित नाटकानुसार भाग्या मध्येच नाही, तर भगवान पण काय करतील? अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलं प्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कोणतेही कार्य श्रीमताच्या विरुद्ध करायचे नाही. ज्ञान योग चांगल्या रीतीने शिकून, परंतु उच्च भाग्य बनवायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही.

(२) या जुन्या दुनियेपासून ममत्व नष्ट करायचे आहे. बुद्धी नवीन दुनियेशी लावायची आहे. आनंदात राहण्यासाठी ज्ञानाला धारण करून दुसऱ्यांना पण धारणा करावयाची आहे.

वरदान:-
प्रकाश स्तंभाच्या स्थिती द्वारे, पाप कर्म नष्ट करणारे, पुण्यात्मा भव.

जेथे प्रकाश असतो, तेथे कोणते पाप कर्म होत नाही, तर नेहमी प्रकाश स्तंभाच्या स्थितीमध्ये राहिल्यामुळे माया कोणतेच पाप कर्म करवू शकणार नाही. नेहमी पुण्यात्मा बनाल, पुण्यात्मा संकल्पामध्ये पण कोणते पाप काम करू शकत नाही. जेथे पाप असते, तेथे बाबांची आठवण राहत नाही. तर दृढ संकल्प करा की, मी पुण्यात्मा आहे, तर पाप माझ्या समोर येऊ शकत नाही. स्वप्न किंवा संकल्पा मध्ये पण पापाला येऊ देऊ नका.

बोधवाक्य:-
जे प्रत्येक दृश्याला साक्षी होऊन पाहतात, तेच नेहमी आनंदीत राहतात.