02-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,हे पुरुषोत्तम संगमयुग कल्याणकारी युग आहे,यामध्ये परिवर्तन करायचे आहे,तुम्ही कनिष्ठ पासून उत्तम पुरुष बनत आहात"

प्रश्न:-
या ज्ञान मार्गामध्ये कोणती गोष्ट विचार केल्याने किंवा बोलण्यामुळे कधीच प्रगती होऊ शकत नाही?

उत्तर:-
वैश्विक नाटकांमध्ये असेल किंवा भाग्य मध्ये असेल तर पुरुषार्थ करू,वैश्विक नाटक करून घेईल,असा विचार केल्याने किंवा बोलण्यामुळे प्रगती होऊ शकणार नाही,असे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही जाणतात,आत्ता आम्ही जो पुरुषार्थ करत आहोत,हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंदलेले आहे.पुरुषार्थ तर करायचाच आहेच.

गीत:-
ही गोष्ट आहे दिवा आणि वादळाची

ओम शांती।
हे तर मनुष्यांनी बनवलेले गीत आहे परंतु याचा अर्थ ते जाणत नाहीत.हे तर तुम्ही जाणतात.तुम्ही आत्ता पुरुषोत्तम संगमयुगी आहात.संगमयुगाच्या सोबतच पुरुषोत्तम पण लिहायला पाहिजे‌. मुलांना ज्ञानाच्या गोष्टी आठवणीत न राहिल्यामुळे परत महत्त्वाची अक्षरं लिहिण्यास विसरतात.हे मुख्य आहे,याचा अर्थ पण तुम्हीच समजू शकतात.पुरुषोत्तम महिना पण असतो,हे परत पुरुषोत्तम संगमयुग आहे.हे संगमयुग पण एक सण आहे.हा सण सर्वात उच्च आहे.तुम्ही जाणतात आता आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत,उत्तम ते उत्तम पुरुष.उच्च ते उच्च सावकारा पेक्षा सावकार, क्रमांक एकचे, लक्ष्मीनारायण आहेत. ग्रंथांमध्ये फार मोठा प्रलय दाखवतात,परत क्रमांक एकचे श्रीकृष्ण, पिंपळाच्या पानावरती बसून सागरा मधून येतात,असे म्हणतात.आता तुम्ही काय म्हणणार?जे क्रमांक एकचे श्रीकृष्ण आहेत,त्यालाच शामसुंदर पण म्हणतात.असे दाखवतात, अंगठा तोंडामध्ये पकडून आला.मुलगा तर गर्भामध्येच राहतो.तर प्रथम ज्ञानाच्या सागरात द्वारे निघालेले उत्तम ते उत्तम पुरुष,श्रीकृष्ण आहेत.ज्ञानसागरा द्वारे स्वर्गाची स्थापना होते,त्यामध्ये क्रमांक एक पुरुषोत्तम हे श्रीकृष्ण आहेत आणि हे ज्ञानाचे सागर आहेत,पाण्याचे नाहीत.प्रलय पण होत नाही.काही नवीन मुलं येतात,तर बाबांना परत ज्ञानाच्या जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करावी लागते. सत्ययुग,त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग,हे तर चार युग आहेत.पाचवे युग परत पुरुषोत्तम युग आहे.याच युगामध्ये मनुष्य परिवर्तन होतात.कनिष्ठ पासून सर्वोत्तम बनतात.जसे शिवबाबांना पुरुषोत्तम किंवा सर्वोत्तम म्हणतात ना.ते परम आत्मा,परमात्मा आहेत.परत पुरुषांमध्ये उत्तम लक्ष्मीनारायण आहेत.यांना असे श्रेष्ठ कोणी बनवले?हे तुम्ही मुलं च जाणतात. मुलांना पण समजले आहे,या वेळेत आम्ही असे श्रेष्ठ बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत.पुरुषार्थ काही मोठा नाही,खूप सहज आहे. शिकणाऱ्या पण अबला,कुब्जा आहेत,जे काहीच शिकलेले नाहीत. त्यांच्यासाठी पण सहज स्पष्ट केले जाते.अहमदाबाद मध्ये एक साधू म्हणत होता,मी काहीच खात-पित नाही.अच्छा सर्व आयुष्य कोणी खात-पित नसेल तर काय झाले? प्राप्ती तर काहीच झाली नाही. झाडाला पण पाणी,खत इत्यादी नैसर्गिक रित्या मिळत राहते, त्यामुळे झाडाची वाढ होत राहते. त्यांनी पण काही रिद्धी सिद्धी प्राप्त केली असेल.असे अनेक आहेत, अग्नी मधून, पाण्यामधून चालतात, त्यामुळे काय फायदा होईल. तुमच्या सहज राज योगाद्वारे जन्म-जन्मांतराच फायदा आहे.तुम्हाला जन्मजन्मांतर साठी दुःखापासून सुखी बनवतात.बाबा म्हणतात,मुलांनो वैश्विक नाटका नुसार मी तुम्हाला रहस्ययुक्त ज्ञान देतो. जसे बाबांनी समजावले आहे, शिव आणि शंकरला एकच का दाखवले आहे?शंकराची तर या सृष्टी मध्ये भूमिकाच नाही.शिवाची ब्रह्माची आणि विष्णूची भूमिका आहे.ब्रह्माची,विष्णूची,सर्वांगीण भूमिका आहे.शिवबाबांची याच वेळेत भूमिका आहे,जे घेऊन ज्ञान देतात,परत निर्वाण धाममध्ये चालले जातात.मुलांना संपत्ती देऊन स्वतः वानप्रस्थ मध्ये जातात.वानप्रस्थी बनणे म्हणजेच,गुरु द्वारा वाणी पासून दूर जाण्याचा पुरुषार्थ करणे परंतु वापस तर कोणी जाऊ शकत नाहीत,कारण विकारी भ्रष्टाचारी आहेत.विकाराद्वारे तर सर्वांचा जन्म होतो.लक्ष्मीनारायण तर निर्विकारी आहेत,त्यांचा विकाराद्वारे जन्म होत नाही म्हणून श्रेष्ठाचारी म्हटले जाते. कुमारी पण निर्विकारी आहे, म्हणून तिच्या पुढे माथा टेकवतात.तर बाबांनी समजावले आहे,येथे शंकराची कोणतीच भूमिका नाही. बाकी प्रजापिता ब्रह्मा तर जरूर प्रजेचे पिता झाले ना.शिवबाबांना तर आत्म्यांचे पिता म्हणणार ना. ते अविनाशी पिता आहेत.या रहस्ययुक्त गोष्टी चांगल्या प्रकारे धारण करायच्या आहेत.जे मोठ- मोठे तत्वज्ञानी असतात,त्यांना खूप पदव्या मिळत राहतात.श्री श्री १०८ ची पदवी पण विद्वानांना मिळते. बनारसच्या विश्वविद्यालय मधून पदवी घेऊन येतात.बाबांनी गुप्ताजींना यासाठीच बनारसला पाठवले होते की,तेथे जाऊन समजून सांगा की,शिवपित्याची पदवी पण स्वतःला देतात. शिवपित्यालाच श्री श्री १०८ जगद्गुरु म्हटले जाते.माळ पण १०८ची असते ना.आठ रत्न गायन केले जातात,ते चांगल्या मार्काने पास होतात, म्हणून जप करतात. परत त्यांच्यापेक्षा कमी १०८ ची पूजा करतात.यज्ञ स्थापन करतात तर कोणी १००० शाळीग्राम बनवतात,कोणी १०हजार,कोणी ५० हजार,कोणी लाख बनवतात. मातीचे बनवून परत यज्ञ स्थापन करतात.जसे शेठ तसे यज्ञ करतात, मोठे शेठ असतील,तर लाख शाळीग्राम बनवतात.बाबांनी समजवले आहे,माळ तर मोठी आहे ना,१६१०८ ची माळ बनवतात.हे तुम्हा मुलांना बाबा सन्मुख समजवत आहेत.तुम्ही सर्व भारताची सेवा,बाबांच्या सोबत करत आहात.बाबांची पूजा होते, तर मुलांची पण पूजा व्हायला पाहिजे.हे जाणत नाहीत की,रुद्र पूजा का होते? मुलं तर सर्व शिवबाबांचे आहेत.या वेळेत सृष्टीची खूप लोकसंख्या आहे,यामध्ये सर्व शिव बाबांचे मुलं आहेत,परंतु मदतगार सर्व बनत नाहीत.या वेळेत तुम्ही जितकी आठवण कराल, तेवढे उच्च बनतात.असे कोणाची ताकत नाही,जे या गोष्टी समजवतील,म्हणून असे म्हणतात, ईश्वराचा अंत कोणी जाणू शकत नाहीत,असे समजतात.बाबाच येऊन समजवतात.बाबांनाच ज्ञानाचे सागर म्हटले जाते,तर जरूर ज्ञानच देतील ना.प्रेरणाची तर गोष्टच नाही. भगवान काही प्रेरणा द्वारे समजतात का?तुम्ही जाणतात त्यांच्याजवळ सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आहे.ते परत तुम्हा मुलांना ऐकवतात.हा तर निश्चय आहे,निश्चय असताना पण परत त्यांना विसरतात.बाबांची आठवण करणे,हे या शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.आठवणीच्या यात्रे द्वारे कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यामध्ये कष्ट लागतात.यामध्येच मायाचे विघ्न येतात.ज्ञान घेताना इतके विघ्न येत नाहीत.आता शंकरा साठी म्हणतात, तिसरा नेत्र उघडला तर विनाश होतो,असे म्हणणे पण बरोबर नाही.बाबा म्हणतात,न मी विनाश करतो,न ते करतात,हे चुकीचे आहे.देवता थोडेच पाप करतील.आता शिव बाबा,या गोष्टी समजवत आहेत.हा आत्म्याचा रथ आहे.प्रत्येक आत्म्याची आपल्या रथावरती सवारी आहे.बाबा म्हणतात,मी यांचे शरीर भाड्याने घेतो,म्हणून माझा दिव्य जन्म म्हटले जाते.आता तुमच्या बुद्धीमध्ये ८४ चे चक्र आहे.तुम्ही जाणतात, आम्ही घरी जातो,परत स्वर्गामध्ये येऊ.बाबा खूप सहज करून समजावतात, यामध्ये नाराज व्हायचे नाही.काही जण म्हणतात,आम्ही शिकलेले नाहीत.मुखाद्वारे काही निघत नाही परंतु असे होत नाही.मुख तर जरुर चालत राहते.जेवण करतात तर मग मुख तर चालते ना.वाणी निघू शकणार नाही,असे होऊ शकत नाही.बाबांनी खूप सहज समजले आहे.काही मौन मध्ये राहतात,तर इशारा करतात की,त्यांची आठवण करा.सुखकर्ता,दुःखहर्ता तर एकच दाता आहेत.भक्ती मार्गामध्ये पण दाता आहेत,तर या वेळेत पण दाता आहेत,परत वानप्रस्थ मध्ये तर शांतीच आहे. मुलं पण शांतीधाम मध्ये राहतात,त्यांची भूमिका पण नोंदलेली आहे,जे कार्यामध्ये येतात. आता तुमची भूमिका आहे,विश्वाला नवीन बनवणे.त्यांचे नाव तर खूप चांगले आहे,स्वर्गीय ईश्वरीय पिता. बाबा स्वर्गाचे रचनाकार आहेत. बाबा नर्क थोडेच स्थापन करतील.जुनी दुनिया कोणी स्थापना करतात का?घर नेहमी नवीन बनवले जाते.शिवबाबा नवीन दुनिया ची स्थापना,ब्रह्मा द्वारे करतात,त्यांना भूमिका मिळाली आहे.येथे जुन्या दुनिया मध्ये जे पण मनुष्य आहेत,सर्व एक दोघाला दुःख देत राहतात.

तुम्ही जाणतात,आम्ही शिवबाची संतान आहोत.परत शरीर द्वारे प्रजापिता ब्रह्मा ची मुलं झाले,तर दत्तक झाले ना.आम्हाला ज्ञान ऐकवणारे शिवबाबा रचनाकार आहेत.आपल्या रचनेच्या आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवतात.तुमचा मुख्य उद्देश आहे,असे श्रेष्ठ बनणे. मनुष्य पहा किती खर्च करून मार्बल इत्यादींच्या मुर्ती बनवतात.हे ईश्वरीय विश्वविद्यालय,विश्व विद्यापीठ आहे.संपुर्ण विश्वाला परिवर्तन केले जाते.त्यांचे सर्व चरित्र आसूरी आहेत.आदी मध्यं अंत दुःख देणारे आहेत. हे ईश्वरी विद्यापीठ आहे. ईश्वरीय विश्वविद्यालय एकच असते,जे ईश्वर येऊन सुरू करतात, ज्याद्वारे संपूर्ण विश्वाचे कल्याण होते. मुलांना आता सत्य आणि असत्यचे ज्ञान मिळाले आहे,हे दुसरे कोणी मनुष्य समजाऊ शकत नाहीत.तुम्हा मुलांना सत्य-असत्य,ची समज मिळाली आहे,त्याला समजवणारे एकच सत्यम शिवमं आहेत, त्यालाच सत्य म्हटले जाते.बाबाच येऊन प्रत्येकाला सत्यवान बनवतात.सत्यवान बनतील परत मुक्ती मध्ये जाऊन जीवन मुक्ती मध्ये येतील. या विनाशी नाटकाला पण तुम्ही मुलंच जाणतात. सुरुवातीपासून अंत काळापर्यंत भूमिका करण्यासाठी क्रमानुसार येत राहतात.हा खेळ चालत राहतो. वैश्विक नाटका मध्ये नोंद होत जाते. हे नवीन आहे,हे नाटक कधी जुने होत नाही.बाकी सर्व नाटकांचा विनाश होतो,हे अविनाशी नाटक आहे.यामध्ये सर्वांची अविनाशी भूमिका आहे.अविनाशी खेळ किंवा मांडवा किती मोठा आहे.बाबा येऊन सृष्टीला परत नवीन बनवतात.ते सर्व तुम्हाला साक्षात्कार होतील.जितके जवळ याल तेवढी तुम्हाला खुशी राहील,साक्षात्कार कराल.तुम्ही म्हणाल आता भूमिका पूर्ण झाली. वैश्विक नाटकाची पुनरावृत्ती होईल. परत नव्याने भूमिका करायची आहे,जो कल्पापुर्वी केला होता. यामध्ये जरा पण फरक पडू शकत नाही,म्हणून जितके शक्य होईल, तेवढे तुम्हा मुलांना उच्च पद मिळवायचे आहे.पुरुषार्थ करायचा आहे,यामध्ये संभ्रमित व्हायचे नाही. हे नाटक जे करावयचे असेल,ते करून घेईल,असे म्हणणे चुकीचे आहे.आम्हाला तर पुरुषार्थ करायचाच आहे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) राज योगाचे रहस्य बुद्धीमध्ये ठेवून, आठवणीच्या यात्रेद्वारे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. पूजनीय बनण्यासाठी बाबांचे पूर्णपणे मदतगार बनायचे आहे.

(२)सत्य बाबा द्वारा सत्य-असत्यची समज मिळाली आहे,त्याद्वारे सत्यवान बनवून जीवन बंधनापासून मुक्त व्हायचे आहेत.मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वारसा घ्यायचा आहे.

वरदान:-
संगमयुगाच्या सर्व प्राप्ती ला स्मृतीमध्ये ठेवून, चढती कलेचा अनुभव करणारे,श्रेष्ठ प्रारब्धी, भाग्यवान भव.

परमात्मा मिलन किंवा परमात्म ज्ञानाची विशेषता आहे अविनाशी प्राप्ती होणे.असे नाही की संगमयुग पुरुषार्थी जीवन आहे आणि सतयुग प्रारब्धाचे म्हणजे भाग्याचे जीवन आहे.संगम युगाची विशेषता आहे एक पाऊल पुढे टाका आणि हजार पावलाचे भाग्य बनवा.तर फक्त पुरुषार्थी नाहीत परंतु श्रेष्ठ भाग्यवान आहात,या स्वरूपाला नेहमी समोर ठेवा.प्रारब्ध,भाग्याला पाहून सहजच चढती कलेचा अनुभव कराल,जे मिळवायचे होते ते मिळाले,हे गीत गात राहा,तर संशय समाप्त होईल.

बोधवाक्य:-
ब्राह्मणांचा श्र्वास हिंमत आहे,ज्याद्वारे कठीण ते कठीण कार्य पण सोपे होते.


मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य.

मुक्ती आणि मोक्ष:- आजकाल मनुष्य मुक्तीलाच मोक्ष म्हणतात.ते असे समजतात जे मुक्तीला प्राप्त होतात,ते जन्म-मृत्यू पासून सुटतात.ते लोक जन्म मरणा मध्ये न येणे,यालाच उच्चपद समजतात.तेच प्रारब्ध मानतात. जीवनमुक्ती परत त्याला समजले जाते,जे जीवनामध्ये राहून चांगले काम करतात,जसे धर्मात्मा लोग आहेत,त्यांना जीवनमुक्त समजतात. बाकी कर्म बंधनापासून मुक्त होणे, ते तर करोडो मधून काहीच समजतात,आता हे आहे त्यांचे मत, परंतु आम्हाला तर परमात्मा द्वारे ज्ञान मिळाले आहे की,जोपर्यंत मनुष्य विकारी कर्म बंधनापासून मुक्त होत नाही,तोपर्यंत आदी मध्य अंतच्या दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही.तर यापासून मुक्त होणे ही पण एक अवस्था आहे.तरीही जेव्हा प्रथम ईश्वरीय ज्ञानाला धारण करतील, तेव्हाच या स्थितीला धारण करू शकाल आणि त्या स्थितीला प्राप्त करून देणारे स्वतः परमात्मा पाहिजेत, कारण मुक्ती-जीवनमुक्ती तेच देतात.ते पण एकाच वेळेत येऊन सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती देतात. बाकी परमात्मा काही अनेक वेळेत येत नाहीत आणि असे समजू नका की,परमात्माच सर्व अवतार धारण करतात.