02-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आता या मृत्यू लोकांचा अंत आहे,अमर लोकांची स्थापना होत आहे,म्हणून तुम्ही मृत्यु लोकांची आठवण करु नका"

प्रश्न:-
बाबा आपल्या गरीब मुलांना कोणती स्मृती देतात?

उत्तर:-
मुलांनो जेव्हा तुम्ही निर्विकारी पवित्र होते,तेव्हा खूप सुखी होते,तुमच्यासारखे सावकार दुसरे कोणी नव्हते.तुम्ही अपार सुखी होते,धरती आकाश सर्व तुमच्या हातामध्ये होते.आता बाबा तुम्हाला परत सावकार बनवण्यासाठी आले आहेत.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ प्रभू, पग पग ठोकर खाये हम.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी,आत्म्याने गीत ऐकले.कोणी म्हटले? आत्म्याच्या आत्मिक पित्याने.आत्मिक मुलांनी म्हटले बाबा,त्यांना ईश्वर पण म्हटले जाते,पिता पण म्हटले जाते.कोणते पिता? परमपिता.दोन पिता आहेत. एक दुसरे पारलौकिक पिता.लौकिक पित्याची मुलं पारलौकिक पित्याला बोलवतात.हे बाबा,बाबांचे नाव काय? शिव.निराकारी शिवाला पुजले जाते,त्यांना सर्वोच्च पिता म्हटले जाते.लौकिक पित्याला सर्वोच्च म्हटले जात नाही.उच्च ते उच्च सर्व आत्म्याचे पिता एकच आहेत.सर्व जीवात्मे त्या पित्याची आठवण करतात.आत्मे हे विसरले आहेत की, शआमचे पिता कोण आहेत? बोलवतात हे ईश्वर पिता, आम्ही नेत्रहीन आहोत,आम्हाला ज्ञानाचे नेत्र द्या,ज्यामुळे आम्ही आपल्या पित्याला ओळखू शकू. भक्तिमार्गामध्ये आम्ही अंध बनून ठेचा खात होतो,आता या ठेचा पासून सोडवा.बाबाच कल्प कल्प येऊन,भारताला स्वर्ग बनवत आहेत.आत्ता कलियुग आहे,सतयुग येणार आहे.कलियुग आणि सतयुगाच्या मध्य काळाला,संगम म्हणले जाते.हे पुरुषोत्तम संगमयुग आहे.बेहद्दचे पिता एकच आहेत,जे भ्रष्टाचारी बनले आहेत,त्यांना श्रेष्ठाचारी पुरुषोत्तम बनवत आहेत. लक्ष्मीनारायण पुरुषोत्तम होते. लक्ष्मीनारायण चे राज घराणे होते.ही स्मृती बाबाच येऊन देतात.तुम्ही भारतवंशी आज पासून पाच हजार वर्ष पूर्व स्वर्गवासी होते,आत्ता नर्कवासी आहात.आज पासून पाच हजार वर्ष पूर्व, भारत स्वर्ग होता. भारताची खूप महिमा होती,सोने, हिऱ्यांचे महल होते,आत्ता तर काहीच नाहीत,त्यावेळी दुसरा कोणताही धर्म नव्हता,फक्त सूर्यवंशी होते,चंद्रवंशी नंतर येतात.बाबा समजवतात,तुम्हीच सूर्यवंशी होते. आज पर्यंत लक्ष्मीनारायणाचे मंदिर बनवत राहतात परंतु लक्ष्मीनारायणाचे राज्य कधी होते, कसे राज्य मिळवले? हे कोणालाही माहिती नाही.पूजा करतात परंतु जाणत नाही,तर अंधश्रद्धा झाली ना. शिवाची,लक्ष्मी नारायणाची पूजा करतात,त्यांचे चरित्र कोणी जाणत नाहीत.भारतवासी स्वतः म्हणतात, आम्ही पतित आहोत.हे पतित पावन बाबा या आणि आम्हाला दुःखापासून सोडवा.बाबा येऊन सर्वांना मुक्त करतात.मुलं जाणतात सतयुगामध्ये एकच राज्य होते. काँग्रेसी लोक किंवा बापुजींची पण हीच इच्छा होती की,आम्हाला परत रामराज्य पाहिजे,आम्ही स्वर्गवासी बनू इच्छितो.आता नर्कवासीचे काय हाल झाले आहेत,याला नर्क,आसुरी दुनिया म्हटले जाते.हाच भारत दैवी दुनिया होती.आत्ता आसरी दुनिया बनलेला आहे.

बाबा समजवतात,तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत,ना की,८४ लाख.हे तर ग्रंथांमध्ये थापा मारल्या आहेत. आज पासून पाच हजार वर्षांपूर्वी सद्गतीचा मार्ग होता.तेथे ना भक्ती, ना दुखाचे नाव रूप होते,त्याला सुखधाक्ष म्हटले जाते.बाबा समजवतात,तुम्ही वास्तविक शांत राहणारे आहात.तुम्ही इथे भूमिका वठवण्यासाठी आले आहात.पुनर्जन्म ८४ होतात,ना की ८४ लाख.आत्ता बेहद्दचे बाबा आले आहेत,तुम्हा मुलांना बेहद्दचा वारसा देण्यासाठी.बाबा तुम्हा आत्म्याशी गोष्टी करतात.दुसऱ्या सत्संगामध्ये मनुष्य,मनुष्याला भक्तीच्या गोष्ट ऐकवतात.अर्धाकल्प जेव्हा भारत स्वर्ग होता,एक पण पतित नव्हता. एक पण पावन नाही.ही पतित दुनिया आहे.बाबा समजवतात, गीतेमध्ये कृष्ण भगवानुवाच लिहलेले आहे.कृष्ण भगवान नाहीत,ना त्यांनी गीता ऐकवली आहे.हे लोक आपल्या धर्मशास्त्राला पण जाणत नाहीत.स्वतःच्या धर्माला विसरले आहेत.मुख्य धर्म चार आहेत.प्रथम आदी सनातन देवी देवता धर्म सूर्यवंशी,परत चंद्रवंशी दोघांना मिळून देवी-देवता धर्म म्हणतात.तेथे दुःखाचे नाव नव्हते. एकवीस जन्म तुम्ही सुखधाम मध्ये होते,परत रावण राज्य भक्तिमार्ग सुरू होतो.शिवबाबा कधी येतात,जेव्हा रात्र होते.भारत वासी काळोखा मध्ये म्हणजे अज्ञानात येतात,तेव्हा बाबा येतात.बाहुल्यांची पूजा करत राहतात.एकाचे पण चरित्र जाणत नाहीत.भक्तिमार्गा मध्ये अनेक धक्के खातात,तीर्थ यात्रेला जातात,तरीही काहीच प्राप्त होत नाही.बाबा म्हणतात,मी येऊन तुम्हाला ब्रह्माद्वारे अर्थ सहित ज्ञान ऐकवतो.तुम्हीच बोलवत होते की, आम्हाला सुखधाम आणि शांतीधाम चा रस्ता दाखवा.पाच हजार वर्ष पूर्व,मी तुम्हाला खूप सावकार बनवले होते.इतके धन दिले होते, परत कुठे गेले.तुम्ही खूप सावकार होते,भारत खूप श्रीमंत होता.भारत सर्वात उच्च खंड होता.वास्तव मध्ये सर्वांचे तिर्थ भारत आहे,कारण पतित-पावन बाबांची जन्मभूमी आहे.बाबा येऊन,सर्व धर्माच्या मनुष्यांची सद्गती करतात.आता सर्व सृष्टीवरती रावणाचे राज्य आहे,फक्त लंकेमध्ये नाही.जेव्हा सूर्यवंशी राज्य होते,तेव्हा हे विकार नव्हते.भारत निर्विकारी होता,आत्ता विकारी आहे. सर्व नर्कवासी आहेत.सतयुगा मध्ये देवी-देवता संप्रदाय होते,ते परत ८४ जन्म घेवून आसुरी संप्रदाय बनले आहेत,परत दैवी संप्रदाय बनतील. भारत खूप सावकार होता,आत्ता गरीब बनला आहे म्हणून कर्ज काढत राहतात.बाबा तुम्हा गरीब मुलांना स्मृती देतात की, मुलांनो तुम्ही खूप सुखी होते.तुमच्या सारखे सुख कोणाला मिळू शकत नाही. धरती आकाश सर्व तुमच्या हातामध्ये होते.ग्रंथांमध्ये तर कल्पाचे आयुष्य खूप सांगून,सर्वांना कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपवले आहे.हा भारत शिवबाबांनी स्थापन केलेला शिवालय होता,तेथे पवित्रता होती आणि त्या नविन दुनियेमध्ये देवी देवता राज्य करत होते.मनुष्य हे पण जाणत नाहीत की,राधा कृष्णाचा आपसामध्ये काय संबंध आहे? दोघे वेगवेगळ्या राजधानीचे होते, परत स्वयंवरा नंतर लक्ष्मीनारायण बनले. हे ज्ञान कोणत्याही मनुष्य मात्रामध्ये नाही.हे अध्यात्मिक ज्ञान फक्त एक बाबाच देतात.आत्ता बाबा म्हणतात, आत्म अभिमानी बना.आपल्या परमपिता परमात्माची आठवण करा,आठवणी द्वारेच तमोप्रधान पासून सतोप्रधान बनू शकाल.तुम्ही येथे मनुष्यापासून देवता किंवा पतिता पासून पावन बनण्यासाठी येतात.आता हे रावणाचे राज्य आहे. भक्ती मध्ये रावण राज्य सुरू होते. सर्व भक्ती करणारे,रावणाच्या पंज्या मध्ये आहेत.सर्व दुनिया ५ विकार रुपी रावणाच्या कैदेमध्ये आहे,शोक वाटिका मध्ये आहे.बाबा येऊन सर्वांना मुक्त करून,मार्गदर्शक बनून सोबत घेऊन जातात.त्यासाठी महाभारत लढाई आहे,जी पाच हजार वर्षापूर्वी पण लागली होती. आत्ता बाबा परत स्वर्ग बनवत आहेत.असे पण नाही ज्यांच्याकडे धन खूप आहे,ते स्वर्गा मध्ये आहेत. आत्ता नरकच आहे.पतित पावन बाबांना म्हटलं जाते,ना की नदीला. हा सर्व भक्तिमार्ग आहे.या सर्व गोष्टी बाबाचं समजवतात.आता हे तर जाणतात की, एक लौकिक पिता आहेत,दुसरे पारलौकिक आणि तिसरे आलोकित पिता आहेत.आत्ता पारलौकीक पिता,शिवबाबा ब्रह्मा द्वारे ब्राह्मण धर्माची स्थापना करतात.ब्राह्मणाला देवता बनवण्यासाठी राजयोग शिकवतात. आत्माच पुनर्जन्म घेते,आत्माच म्हणते,मी एक शरीर सोडून दुसरे घेते.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून,मज पित्याची आठवण करा, तर तुम्ही पावन बनाल.कोणत्याही देहधाराची आठवण करू नका. आत्ता मृत्यू लोकांचा अंत आहे, अमर लोकांची स्थापना होत आहे. बाकी सर्व अनेक धर्म नष्ट होतील. सतयुगामध्ये एकच सुर्यवंशी देवी देवता धर्म होता,परत चंद्रावंशी राम सिता त्रेतामध्ये होते.तुम्हा मुलांना सर्व चक्राची आठवण करून देतात. शांतीधाम आणि सुखधामची स्थापना बाबाच करतात.मनुष्य मनुष्याला सदगती देऊ शकत नाहीत,ते सर्व भक्ती मार्गातील गुरु आहेत.

आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात. बाबा पासून राज्य भाग्य घेत आहात. ही राजधानी स्थापन होत आहे. प्रजा तर खूप बनायची आहे.करोडो मधून कोणी राजा बनतात.सतयुगाला फुलांची बाग म्हटले जाते,आत्ता तर काट्याचे जंगल आहे.रावण राज्य बदलत आहे,विनाश होत आहे.हे ज्ञानाचा तुम्हाला आत्ता मिळत आहे. लक्ष्मीनारायण ला आहे ज्ञान मिळत नाही,ते प्रायलोप होते.भक्ती मार्गामध्ये शिव पित्याला कोणी अर्थ सहित जाणत नाहीत.बाबा रचनाकार आहेत.ब्रह्मा विष्णू शंकर पण रचना आहेत.सर्वव्यापी म्हटल्यामुळे वारशाचा हक्क नष्ट होतो.बाबा येऊन सर्वांना वारसा देतात.८४ जन्म तेच घेतात,जे प्रथम सतयुगा मध्ये येतात.ख्रिश्चन लोक जास्त ४० जन्म घेत असतील.एका भगवंताला शोधण्यासाठी अनेक ठिकाणी,मनुष्य धक्के खात राहतात. आता तुम्ही धक्के खाणार नाहीत. एका बाबा ची आठवण करा,तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. ही यात्रा आहे.हे ईश्वरीय पित्याचे विद्यापीठ आहे.तुमची आत्मा शिकत आहे.साधुसंत म्हणतात आत्मा निर्लेप आहे परंतु आत्म्याला आपल्या कर्मा नुसारच दुसरा जन्म मिळतो.आत्माच चांगले किंवा वाईट काम करते.या वेळेत तुमचे कर्म विकर्म बनतात.सतयुगा मध्ये तुमचे कर्मा अकर्म होतात,तेथे विकर्म होत नाहीत.ती पुण्य आत्म्याची दुनिया आहे,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) एका पित्यापासून बेहद्दचा वारसा घ्यायचा आहे.श्रेष्ठ काम करायचे आहेत. जेव्हा बाबा मिळाले आहेत,तर कोणत्या प्रकारचे धक्के खायचे नाहीत.

(२) बाबांनी जी स्मृती दिली आहे, त्या स्मृतीला आठवणीत ठेवून अपार खुशी मध्ये राहायचे आहे.कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही.

वरदान:-
निमित्त पणाच्या स्मृती द्वारे,आपल्या प्रत्येक संकल्प वरती लक्ष देणारे,निवारण स्वरूप भव.

निमित्त बनलेल्या आत्म्यावरती सर्वांची नजर असते म्हणून निमित्त बनणाऱ्यांना विशेष आपल्या प्रत्येक संकल्प वरती लक्ष द्यावे लागेल.जर निमित्त बनलेली मुलं,कोणते कारण ऐकवतात,तर त्यांचे त्यांना अनुकरण करणारे पण,अनेक कारणं ऐकवतात.जर निमित्त बनणाऱ्या मध्ये काही कमी आहेत,तर ते लपून राहू शकत नाहीत,म्हणून विशेष आपला संकल्प आणि कर्मा वरती लक्ष देऊन,निवारण स्वरूप बना.

बोधवाक्य:-
ज्ञानी तू आत्मा तेच आहेत,ज्यांच्यामध्ये आपले गुण आणि विशेषतांचा पण अभिमान नाही.


मातेश्वरीजी चे अनमोल महावाक्य :-
मनुष्याचे मुख्य लक्ष काय आहे ? ते मिळवण्यासाठीचा कोणता उपाय आहे ?

प्रत्येक मनुष्याला हे जरूर विचार करायचा आहे की,आपले चांगले जीवन बनवण्यासाठी काय बरोबर आहे,मनुष्याचे जीवन कशासाठी आहे आणि त्यामध्ये काय करायचे आहे?आता आपल्या मनाला विचारायचे आहे की,माझे जीवन परिवर्तन होत आहे? मनुष्य जीवनामध्ये प्रथमच ज्ञान पाहिजे, परत या जीवनाचे मुख्य लक्ष काय आहे? हे तर जरूर म्हणाल की,या जीवनाला सर्वदा सुख आणि शांती पाहिजे.काय आता ती मिळत आहे. या घोर कलियुगामध्ये तर दुःख अशांती शिवाय बाकी काहीच नाही. आता विचार करायचा आहे,सुख शांती कशी मिळेल? सुख आणि शांती हे दोन शब्द जे निघाले आहेत, ते जरूर या दुनिया मध्ये कधी झाले असतील,तेव्हा तर या गोष्टीची इच्छा करतात.जर कोणी मनुष्य असे म्हणतील की,आम्ही अशी दुनिया पाहिली नाही,परत त्या दुनियेला तुम्ही कसे मानतात? यावरती समजावून सांगितले जाते,हे दिवस आणि रात्र,जे दोन शब्द आहेत,तर जरूर रात्र आणि दिवस चालत असतील ना.असे कोणी म्हणू शकत नाही की,आम्ही रात्रच पाहिली आहे, तर दिवसाला कसे मानू परंतु जेव्हा दोन्ही नावं आहेत,तर त्यांची भूमिका पण असेल.तसेपण आम्ही ऐकले आहे की,या कलयुगा पेक्षा दुसरी कोणती श्रेष्ठ दुनिया होती,ज्याला सतयुग म्हटले जाते.जर अशीच वेळ चालत राहिली,तर त्या वेळेला, सतयुग नाव का दिले.तर ही सृष्टी आपली अवस्था बदलत राहते,जसे किशोर,बाल, युवा, वृद्ध ...बदलत राहतात, तसेच सृष्टी पण बदलत राहते.आजचे जीवन आणि त्या जीवनामध्ये खूप फरक आहे. तर त्या श्रेष्ठ जीवनाला बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

( २ ) निराकारी दुनिया , आकारी दुनिया आणि साकारी दुनिया चा विस्तार :-

या पूर्ण ब्रह्मांडा मध्ये तीन दुनिया आहेत, एक निराकारी दुनिया, दुसरी आकारी, तिसरी साकारी दुनिया आहे.आता हे तर जाणले आहे की, निराकारी सृष्टीमध्ये तर आत्मे निवास करतात आणि साकारी सृष्टीमध्ये साकारी मनुष्य संप्रदाय निवास करतात,बाकी आकारी सूक्ष्म सृष्टी आहे.आता विचार चालतो की,ही आकारी सृष्टी नेहमीच आहे,की काही वेळे तीची भूमिका चालते.दुनियेतील मनुष्य तर असं समजतात की,सूक्ष्म दुनिया वरती आहे,जेथे फरिश्ता राहतात,त्यालाच स्वर्ग म्हणतात.तेथे जाऊन सुख भोगू.आता हे तर स्पष्ट आहे की, स्वर्ग किंवा नर्क या सृष्टीवरतीच असतो.बाकी ही जी सूक्ष्म आकारी सृष्टी आहे, जेथे शुद्ध आत्म्यांचा साक्षात्कार होतो,हे तर द्वापर पासून सुरू होतो.जेव्हा भक्ती मार्ग सुरू होतो, तर याद्वारे सिद्ध आहे की, निराकार सृष्टी आणि साकार सृष्टी नेहमीच आहे.बाकी सूक्ष्म दुनिया नेहमी तर नाही म्हणू शकत,त्यामध्ये पण खास ब्रह्मा विष्णू शंकर चा साक्षात्कार या वेळेतच आम्हाला होतो,कारण या वेळेतच परमात्मा तीन कर्तव्य करण्यासाठी तीन रूप रचतात, अच्छा.