03-01-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   05.10.87  ओम शान्ति   मधुबन


ब्राह्मण जीवनाचे सुख - संतुष्टता व प्रसन्नता .


आज बापदादा चहूबाजूच्या आपल्या खूप लाडक्या फार फार वर्षापूर्वी भेटलेल्या,ब्राह्मण मुलांपैकी पण विशेष ब्राह्मण जीवनाच्या विशेषता संम्पन्न मुलांना पाहत आहेत.आज अमृतवेळेला बापदादा सर्व ब्राह्मण कुळातील मुलांपैकी पण त्या विशेष आत्म्यांना निवडत होते,जे नेहमी संतुष्टते द्वारे स्वतःला पण नेहमी संतुष्ठ ठेवतात आणि दुसर्यांना पण संतुष्ठतेची अनुभूती आपल्या दृष्टी वृत्ती आणि कृतीद्वारे नेहमी करत आले आहेत. तर आज अशा संतुष्ठ मण्यांची माळ गुंफत होते,जे नेहमी संकल्पामध्ये वाचेमध्ये,संघटनाच्या सबंध संपर्का मध्ये,कर्मामध्ये संतुष्टता चे सुवर्ण पुष्प बापदादा द्वारे नेहमी स्वता:वरती वर्षाव झाल्याचा अनुभव करतात आणि सर्वांप्रती संतुष्टतेच्या स्वर्ण पुष्पाची वर्षा नेहमी करत राहतात. असे संतुष्ट आत्मे चहूबाजूला काही काही दिसून आले.त्याची माळ मोठी नाही, लहान आहे.बापदादा सारखे-सारखे संतुष्ठमणींची माळ पाहून आनंदित होत आहेत कारण असे संतुष्ठमणीच बापदादाच्या गळ्यातील हार बनतात, राज्याधिकारी बनतात आणि भक्तांची जप करण्याची माळ बनतात.

बापदादा दुसऱ्या मुलांना पण पाहत होते,जे कधी संतुष्ट आणि कधी असंतुष्टतेच्या संकल्प मात्र छाये मध्ये येतात आणि परत निघून येतात,फसत नाहीत. तिसरी मुलं, कधी संकल्पाचे असंतुष्ट,कधी स्वता:च स्वता:शी असंतुष्ट,कधी परिस्थिती द्वारे असंतुष्ट,कधी स्वतःच्या हलचलद्वारे असंतुष्ट आणि कधीही लहान-मोठ्या गोष्टींमध्ये असंतुष्ट, या चक्र मध्ये चालतात, निघतात आणि परत फसत राहतात.अशी माळ पण पाहिली.तर तीन माळा तयार झाल्या.मणी तर सर्व आहेत परंतु संतुष्टमणीची चमक आणि दुसऱ्या दोन प्रकारच्या मण्यांची चमक, काय असेल हे तर तुम्ही पण जाणू शकतात.ब्रह्मा बाबा नेहमी तीन माळांना पाहून आनंदीत होत होते आणि सोबत प्रयत्न करत होते की, दुसऱ्या क्रमांकाच्या माळेमधील, प्रथम क्रमांकाच्या माळे मध्ये कसे येतील.आत्मिक संवाद चालत होते, कारण दुसऱ्या माळेचे काही मणी थोड्या असंतुष्टतेच्या छायेमुळे, प्रथम माळेपासून वंचित राहिले आहेत,यांना कसेही परिवर्तन करून प्रथम क्रमांकाच्या माळेमध्ये घेऊन यावे. एका-एकाचे गुण,विशेषता, सेवा सर्वांना समोर घेऊन येता, सारखे हेच बोलले की,यांना प्रथम क्रमांकाच्या माळेमध्ये घेऊन यावे.असे पंचवीस-तीस मणी होते, ज्यांच्या वरती ब्रह्मा बाबांचे विशेष आत्मिक संवाद चालत होते.ब्रह्मा बाबा म्हटले प्रथम क्रमांकाच्या माळेमध्ये,या मण्यांना पण गुंफायला पाहिजे,परंतु तरी स्वतः हासत हेच बोलतात की,शिवपिता यांना आवश्य प्रथम माळेमध्ये गुंफुन दाखवतील,असे विशेष मणी पण होते.

असे आत्मिक संवाद चालत, एक गोष्ट निघाली की,असंतुष्टतेचे विशेष कारण कोणते आहे?जेव्हा संगम युगाचे विशेष वरदान संतुष्टता आहे, तरीही वरदाता पासून वरदान प्राप्त वरदानी आत्मे, दुसऱ्या क्रमांकाच्या माळेमध्ये का येतात? संतुष्टतेचे बीज सर्व प्राप्ती आहे.असंतुष्टतेचे बीज स्थूल किंवा सूक्ष्म अप्राप्ती आहे.जेव्हा ब्राह्मणांचे गायन आहे अप्राप्त कोणती वस्तू नाही, ब्राह्मणांच्या खजाण्यामध्ये किंवा ब्राह्मणांच्या जीवनामध्ये, परत असंतुष्टता का? काय वरदाताने वरदान देण्यामध्ये अंतर ठेवले आहे?की घेणाऱ्याने अंतर ठेवले आहे? काय झाले? जेव्हा वरदाता,दाताचे भांडार भरपूर आहेत, इतके भरपूर आहेत,जे तुमच्या म्हणजे श्रेष्ठ निमित्त आत्म्यांचे जे अनेक वर्षापासून ब्रह्मकुमार कुमारी बनले आहेत, त्यांच्या २१ जन्माची वंशावळ आणि परत त्यांचे भक्त, भक्तांची पण वंशावळ,ते पण त्या प्राप्तीच्या आधारावर चालत राहतील. इतकी मोठी प्राप्ती तरी असंतुष्टता का? अखुट खजाना सर्वांना मिळाला आहे,एकाच द्वारा, एकसारखा, एकाच वेळेस, एकाच विधीद्वारे परंतु प्राप्त झालेल्या खजाण्याला प्रत्येक वेळेत कार्यामध्ये लावत नाहीत,अर्थात स्मृती मध्ये ठेवत नाहीत. मुखाद्वारे खुश होतात परंतु मनापासून खुश होत नाहीत.बुद्धीची खुशी आहे परंतु मनाची खुशी नाही कारण प्राप्तीच्या खजाण्याला स्मृतीस्वरुप बनून, कार्यामध्ये लावत नाहीत.स्मृती राहते परंतु स्मृती स्वरूप मध्ये येत नाहीत. प्राप्ती बेहद्द आहे परंतु त्यांना कुठेकुठे हदच्या प्राप्ती मध्ये परिवर्तन करतात.यामुळे हद्द म्हणजे अल्पकाळच्या प्राप्तीची इच्छा, बेहद्दच्या प्राप्तीच्या फलस्वरूप,जे नेहमी संतुष्टतेची अनुभती व्हावे,त्याद्वारे वंचित करते. हद्दची प्राप्ती मनामध्ये हद्द घेऊन येते म्हणून असंतुष्टतेची अनुभूती होते. सेवेमध्ये हद्द येते कारण हद्दच्या इच्छाचे फळ किंवा मन इच्छित फळ प्राप्त होत नाही.हद्दच्या इच्छांचे फळ अल्पकाळाची पुर्ती करणारे असते म्हणून आत्ता आत्ता संतुष्ट आणि आत्ता असंतुष्ट होतात.हद्द,बेहद्द चा अनुभव करू देत नाही,म्हणून विशेष तपासून पहा की,मनाची म्हणजे स्वतःची संतुष्टता, सर्वांच्या संतुष्टतेचा अनुभव होत आहे? संतुष्टतेची लक्षणे मनापासून,हृदयापासून, सर्वांपासून, बाबांपासून,अविनाशी नाटकापासून संतुष्टअसतील.त्यांच्या मन आणि तनाद्वारे नेहमी प्रसन्नता ची लाट दिसून येईल.कोणतीही परिस्थिती येईल, कोणतीही आत्मा हिशोब चुकता करणारी समोर येईल,शरीराच्या कर्म भोगाचा सामना करावा लागेल परंतु हद्दच्या इच्छे पासून मुक्त आत्मा, संतुष्टतेमुळे नेहमी प्रसन्न,चमकणारे तारे दिसून येतील.प्रसन्नचित्त कधी कोणत्या गोष्टी मध्ये प्रश्नचित्र बनणार नाहीत.प्रश्न आहेत तर प्रसन्नता नाही.प्रसन्नतेची लक्षणे ते नेहमी निस्वार्थी आणि नेहमी सर्वांना निर्दोष अनुभव करतील, कुणा दुसऱ्या वरती दोष ठेवणार नाहीत,न भाग्यविधाता च्या वरती दोष ठेवतील की माझे भाग्य असे का बनवले?न वैश्विक नाटकामध्ये माझीच भूमिका अशी का आहे? न व्यक्तीवरती की,यांचा स्वभाव संस्कार असा आहे,न प्रकृतीच्या वरती की प्रकृतीचे वातावरण असे आहे, न शरीराचे कर्म भोगा वरती की माझे शरीर असे आहे,असे विचार करणारे नसतील.प्रसन्नचित्त म्हणजे नेहमी निस्वार्थ, निर्दोष वृत्ती, दृष्टी असणारे. तर संगमयुगाची विशेषता संतुष्टता आहे आणि संतुष्टतेची लक्षणं प्रसन्नता आहे.ही ब्राह्मण जीवनाची विशेष प्राप्ती आहे. संतुष्टता नाही प्रसन्नता नाही तर, ब्राह्मण बनण्याचा लाभच घेतला नाही. ब्राह्मण जीवनाचे सुख संतुष्ठता प्रसन्नता आहे.ब्राह्मण जीवन बनले आणि त्याचे सुख घेतले नाही, तर नावधारी ब्राह्मण झाले की, प्राप्ति स्वरूप ब्राह्मण झाले.तर बापदादा सर्व ब्राह्मण मुलांना हीच स्मृती देतात की ब्राह्मण बनले अहोभाग्य परंतु ब्राह्मण जीवनाचा वारसा संपत्ती संतुष्टता आहे आणि ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्नता आहे. या अनुभवापासून कधी वंचित राहू नका,अधिकारी आहात. जेव्हा दाता वरदाता मनापासून सर्व प्राप्तीचा खजाना देत आहेत आणि दिला आहे,तर खूप आपल्या संपत्तीचा आणि व्यक्तिमत्त्वाला अनुभवा मध्ये आणा आणि दुसर्यांना पण अनुभवी बनवा, समजले.प्रत्येकजण स्वतःला विचारा की, मी कोणत्या क्रमांकाच्या माळेमध्ये आहे.माळे मध्ये तर आहेत परंतु कोणत्या क्रमांकाच्या माळेमध्ये आहे.अच्छा.

आज राजस्थान आणि उत्तर प्रदेश चा ग्रुप आहे :-
राजस्थान म्हणजे राजाई संस्कार असणारे, प्रत्येक संकल्पा मध्ये, स्वरूपामध्ये, राजाई संस्कार प्रत्यक्षामध्ये आणणारे,म्हणजेच प्रत्यक्ष दाखवणारे, याला म्हणतात राजस्थान निवासी.असे आत्मा आहात ना? कधी प्रजा तर बनत नाहीत ना? जर वशीभूत झाले तर प्रजा म्हणणार,मालक आहात तर राजा आहात ना. असे नाही कधी राजा, कधी प्रजा,नाही.नेहमी राजांचे संस्कार स्मृती स्वरूपामध्ये हवेत.असे राजस्थान निवासी मुलांचे महत्त्व पण आहे.राजाला नेहमी उच्च दृष्टी ने पाहतात आणि आसन पण राजाला उच्च देतात.राजा नेहमी सिंहासनावरती,तर प्रजा नेहमी खाली बसते.तर राजस्थानचे राजाई संस्कार असणारे आत्मे नेहमी उच्च स्थितीच्या आसनावरती राहणारे आहात.असे बनले आहात, की बनत आहात.बनले आहात आणि संपन्न बनवायचे च आहे. राजस्थानची महिमा कमी नाही, स्थापनेचे मुख्यालय पण राजस्थानच आहे, तर उच्च झाले ना. नावाने पण उच्च आणि कामाद्वारे पण उच्च आहात.असे राजस्थानचे मुलं आपल्या घरी पोहोचले आहेत, समजले.

उत्तर प्रदेशाची भूमी विशेष पावन भूमी आहे.पावन करणारी भक्तीमार्गातील गंगा नदी पण तेथे आहे आणि भक्तीच्या हिशोबामुळे कृष्णाची भूमी पण उत्तर प्रदेशा मध्येच आहे.भूमी ची महिमा खूप आहे.कृष्णलीला,जन्म भूमी पाहीची असेल तर उत्तर प्रदेशामध्ये जातील.तर उत्तर प्रदेशांची विशेषता आहे, नेहमी पावन बनून,पावन बनवण्याच्या विशेषता संपन्न आहेत. जसे बाबांची महिमा आहे पतित पावन, उत्तर प्रदेश निवासींची पण महिमा बाप समान आहे.पतित पावनी आत्मा आहात.भाग्याचा तारा चमकत राहत आहे.असे भाग्यवान स्थान आणि स्थिती दोघांची महिमा आहे.नेहमी पावन,ही स्थितीची महिमा आहे,तर असे भाग्यवान स्वतःला समजतात का? नेहमी स्वतःच्या भाग्याला पाहून आनंदित होऊन,स्वतः पण नेहमी आनंदित आणि दुसर्यांना पण आनंदी बनवत चला,कारण हर्षितमुख स्वता:च आकर्षणमूर्त बनतात.जसे स्थूल नदी आपल्याकडे आकर्षित करते ना, यात्री आकर्षित होऊन येतात. कितीही कष्ट घ्यावे लागले तरीही पावन बनण्याचे आकर्षण घेऊन येते.तर हे पावन बनवण्याच्या कार्याची आठवण पण उत्तर प्रदेशमध्येच आहे.असेच आनंदी आणि आकर्षक मुर्त बनायचे आहे, समजले?

तिसरा ग्रुप दुहेरी परदेशीचा आहे.दुहेरी परदेशी म्हणजे,नेहमी विदेशी पित्याला आकर्षित करणारे, कारण समान आहेत ना.बाबा पण परदेशी आहेत, तुम्ही पण परदेशी आहात. जे समवयस्क मित्र असतात ना,ते मात पित्यापेक्षा पण जास्त प्रिय वाटतात.तर दुहेरी परदेशी बाप समान,नेहमी देहाच्या आकर्षणा पासून दूर परदेशी, अशरीरी,अव्यक्त आहेत. तर बाप आपल्या सारख्या,अव्यक्त स्थिती असणाऱ्या मुलांना पाहून आनंदित होत आहेत.स्पर्धा पण चांगली करत आहेत.सेवेमध्ये वेगवेगळे साधन आणि वेगवेगळ्या विधीद्वारे पुढे जाण्याची स्पर्धा करत आहेत. विधीचा अवलंब करत वृध्दी पण करत आहेत,म्हणून बापदादा चहूबाजूच्या दुहेरी परदेशी मुलांना सेवेच्या शुभेच्छा देत,स्वतःच्या प्रगतीच्या स्मृती पण देतात. स्वता:च्या प्रगतीमध्ये नेहमी उडत्या कले उडत राहा.स्वप्रगती आणि सेवेच्या प्रगतीच्या संतुलना द्वारे नेहमी बाबांच्या आशीर्वादाचे अधिकारी आहेत आणि नेहमी राहाल.

चौथा ग्रुप बाकी मधुबन निवासींचा आहे.ते तर नेहमीच आहेत.जे हृदयावर ते चुलीवर,जे चुलीवर ते हृदयावरती आहेत.सर्वात जास्त विधीपूर्वक ब्रह्मा भोजन पण मधून मध्येच होते.सर्वात प्रिय पण मधुबन निवासीच आहेत.सर्व कार्यक्रम पण मधुबन मध्येच होतात.सर्वात प्रत्यक्ष मुरली पण जास्त मधुबन निवासीच ऐकतात.तर मधुबन निवासी नेहमी श्रेष्ठ भाग्याचे अधिकारी आत्मे आहेत.सेवा पण मनापासून करतात म्हणून मधुबन निवासींना बापदादा आणि सर्व ब्राह्मणांचे मनापासून आशीर्वाद प्राप्त होत राहतात, अच्छा.

चहूबाजूच्या सर्व बापदादाच्या विशेष संतुष्टमणींना बापदादाची विशेष प्रेमपूर्वक आठवण.सोबत सर्व भाग्यशाली ब्राह्मण जीवन प्राप्त करणाऱ्या,करोडो मधून कोणी आणि कोणी मधून कोणी प्रिय आत्म्यांना,बापदादाच्या शुभ संकल्पाला संपन्न करणाऱ्या आत्म्यांना, संगमयुगी ब्राह्मण जीवनाच्या संपत्तीचे संपूर्ण अधिकार प्राप्त करणाऱ्या आत्म्यांना,विधाता बापदादाची खूप खूप प्रेमपूर्वक आठवण स्वीकार करा.

" दादी जानकी जी आणि चंद्रमणी जी सेवेला जाण्यासाठी बापदादा कडून सुट्टी घेत आहेत "
जात आहात की सामावत आहात? जावा किंवा या परंतु नेहमी सामावलेले आहात.बापदादा असाधारण मुलांना कधी वेगळे पाहत नाहीत.ते आकारी असतील किंवा साकारमध्ये सोबत आहेत, परंतु फक्त महावीर मुलंच आहेत, जे वायदा निभावतात की,प्रत्येक वेळेस सोबत राहू, सोबत चालु. खूप थोडेच हा वायदा निभावतात, म्हणून असे महावीर मुल,असाधारण मुलं,जेथे पण जातात बाबाला सोबत घेऊन जातात आणि बापदादा नेहमी वतन मध्ये सोबत ठेवतात.प्रत्येक पावला मध्ये सोबत देतात म्हणून जात आहात,येत आहात,काय म्हणाल? म्हणून म्हटले की जात आहात की, सामावत आहात.असेच सोबत राहत,समान बणून सामवून जाल. घरांमध्ये थोडे दिवस विश्राम कराल, सोबत राहाल,परत आपले राज्य करायचे आणि बाबा वरून पाहतील.परंतु सोबतीचा थोड्या वेळेचा अनुभव करा.

आज बाबा तुम्ही कमालची माळ बनवली आहे.तुम्ही लोक पण माळा बनवतात.माळ आत्ता लहान आहे.आता मोठी बनेल.आत्ता जे कधीकधी बेहोश होतात,त्यांना थोड्या वेळासाठी प्रकृतीचा किंवा वेळेचा आवाज होश मध्ये घेऊन येईल,परत मोठी माळ बनेल.जेथे पण जावा,बाबाचे वरदान तर आहतच.तुमच्या प्रत्येक पावलामध्ये बाबांचे वरदान सर्वांना मिळत राहतील.तुम्ही पाहल तरी पण बाबांचे वरदान दृष्टी द्वारे घेतील. बोलाल तर बोला द्वारे वरदान घेतील.कर्माद्वारे पण वरदानच घेत राहतील.चालता फिरता वरदानाची वर्षा करण्यासाठी जात आहात. आत्ता जे आत्मे येत आहेत,त्यांना वरदान किंवा महादानांची आवश्यकता आहे.तुम्हा लोकांचे जाणे म्हणजेच, हृदयापासून त्यांना बाबाचे वरदान मिळणे,अच्छा.

वरदान:-
बुद्धी रुपी पाया द्वारे, या पाच तत्वाच्या आकर्षणा पासून दूर राहणारे फरिश्ता स्वरूप भव.

फरिश्त्यांना नेहमी प्रकाशाचे शरीर दाखवतात.प्रकाशाचे शरीर असणारे या देहाच्या स्मृती पासून पण दूर राहतात.त्यांचे बुद्धी रुपी पाय पाच तत्वाच्या आकर्षाणा पासून उंच म्हणजे दूर असतात.अशा फरिश्त्यांना माया किंवा कोणतेही मायावी स्पर्श करू शकत नाहीत, परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा कधी कोणाच्या आधीन होणार नाहीत. शरीराचे पण अधिकारी बनून चालणे,मायाचे पण अधिकारी बनणे,लौकिक किंवा अलौकिक संबंधांमध्ये पण अधिनता नको.

सुविचार:-
शरीराला पाहण्याची सवय आहे,तर प्रकाशाचे शरीर पहा, प्रकाश स्वरूपामध्ये स्थिर राहा.