03-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , तुमचे कर्तव्य आहे घरा घरांमध्ये बाबाचा संदेश देणे , कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्ती शोधून , बाबांचा परिचय प्रत्येकाला अवश्य द्या .

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणत्या गोष्टीची आवड पाहीजे?

उत्तर:-
ज्या नव नवीन ज्ञानाच्या गोष्टी बाबा सांगतात,त्यांना वहीमध्ये नोंद करण्याची आवड पाहिजे,कारण इतक्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी आठवणीत राहणे अवघड आहे.वहीमध्ये नोंद करून परत कोणालाही समजावुन सांगू शकतात.असे पण नाही वहीमध्ये लिहून परत,ती वही तशीच पडुन राहील.जी मुलं चांगल्या रीतीने समजतात त्यांना वहीमध्ये ज्ञानाच्या गोष्टी लिहिण्याची आवड असते.

गीत:-
लाख जमाने वाले .

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले.आत्मिक मुलं हे अक्षर बाबाच म्हणू शकतात.आत्मिक पित्या शिवाय कोणीही,कोणाला आत्मिक मुलं म्हणू शकत नाही.मुलं जाणतात सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत,आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत.गायन पण आहे,बंधुत्व भाव.परत मायेची प्रवेशता अशी होती,जे परमात्म्याला सर्वव्यापी म्हणतात,तर पितृत्व भाव झाला ना,म्हणजे सर्व पिताच झाले ना.रावण राज्य जुन्या दुनिया मध्येच असते.नवीन दुनिया मध्ये रामराज्य किंवा ईश्वर राज्य म्हटले जाते.या समजण्याच्या गोष्टी आहेत. दोन राज्य जरूर आहेत,एक ईश्वरीय राज्य दुसरे आसुरी राज्य.नवीन दुनिया आणि जुनी दुनिया.नवीन दुनिया जरूर बाबाच स्थापन करतात.या दुनिया मध्ये मनुष्य नविन दुनिया आणि जुन्या दुनियेला समजत नाहीत,म्हणजे काहीच समजत नाहीत.तुम्ही पण अगोदर जाणत नव्हते, बेसमज होते.तुम्हीपण काहीच जाणत नव्हते.नवीन सुखाची दुनिया कोण स्थापन करतात,परत जुन्या दुनिया मध्ये दुःख का होते?स्वर्गा पासून नर्क कसा बनतो,हे पण कोणालाच माहिती नाही.या गोष्टीला मनुष्यच जाणतील ना.देवतांचे चित्र पण आहेत जरूर,आदी सनातन देवी-देवतांचे राज्य होते.या वेळेत नाही.येथे प्रजाचे प्रजे वरती राज्य आहे.बाबा भारता मध्येच येतात.मनुष्याला हे माहित नाही की शिवबाबा भारता मध्ये येऊन काय करतात?आपल्या धर्माला विसरले आहेत. तुम्हाला आता परिचय द्यायचा आहे,त्रिमूर्ती आणि शिव पित्याचा.ब्रह्मा देवता,विष्णु देवता,शंकर देवता म्हटले जाते,परत म्हणतात, शिव परमात्माए नम: तर तुम्हा मुलांना त्रिमूर्ती शिवाचा परिचय द्यायचा आहे.अशा प्रकारे सेवा करायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबांचा परिचय सर्वांना मिळाला पाहिजे,तर बाबांकडून वारसा पण घेतील.तुम्ही जाणता आत्ता आम्ही वारसा घेत आहोत आणि अनेकांना वारसा घ्यायचा आहे.आपले कर्तव्य आहे घरा घरांमध्ये बाबांचा संदेश देणे.वास्तव मध्ये संदेश वाहक तर एक बाबाच आहेत. बाबा आपला परिचय तुम्हाला देतात. तुम्हाला परत दुसऱ्यांना परिचय द्यायचा आहे.बाबा चे ज्ञान द्यायचे आहे.मुख्य त्रिमूर्ती शिव आहेत,यांचा त्रिमूर्ती स्टॅम्प बनवला आहे.शासन याचा यर्थात अर्थ समजत नाही,त्यांनी चक्र दाखवले आहे, चरख्या सारखे आणि त्यामध्ये लिहिले आहे सत्यमेव जयते.याचा अर्थ पण निघत नाही. हे तर संस्कृत अक्षर आहे.आत्ता बाबा तर सत्य आहेत.ते समजवतात,ज्याद्वारे तुम्ही सार्या विश्वावर विजय प्राप्त करतात. बाबा म्हणतात मी सत्य सांगतो,तुम्ही राजयोगाच्या अभ्यासाद्वारे खरेखुरे नारायण बनू शकतात.ते लोक तर दुसराच अर्थ काढतात,ते पण त्यांना विचारायला पाहिजे.बाबा तर अनेक प्रकारे समजवत राहतात.जिथे जिथे मेळा भरतो तिथे नदी वरती जाऊन समजावयला पाहिजे.पतित पावन तर गंगा होऊ शकत नाही.नद्या सागरा मधुन निघाल्या आहेत.तो पाण्याचा सागर आहे.त्याद्वारे पाण्याच्या नद्या निघतात.ज्ञानसागरा द्वारे ज्ञानाच्या नद्या निघतात.तुम्हा माता मध्ये आत्ता ज्ञान आहे. गोमुखा वरती जातात,त्यांच्या मुखाद्वारे पाणी निघते,समजतात गंगा जल आहे. इतके शिकलेले मनुष्य पण समजत नाहीत, येथे गंगाजल कसे येईल?ग्रंथांमध्ये पण आहे,बाण मारला आणि गंगा निघाली. आता या तर ज्ञानाच्या गोष्टी आहेत.असे नाही की अर्जुनाने बाण मारला आणि गंगा निघाली.खूप दूर दूर तीर्थ वरती जातात, असे म्हणतात शंकराच्या जटा द्वारे गंगा निघाली,ज्यामध्ये स्नान केल्यामुळे मनुष्य परी बनतात.मनुष्यापासून देवता बनतात,हे पण परी सारखेच आहे ना.

आता तुम्हा मुलांना बाबांचा परिचय द्यायचा आहे,म्हणून बाबांनी हे चित्र बनवले आहेत. त्रिमूर्ती शिवाच्या चित्रा मध्ये सर्व ज्ञान आहे. फक्त त्यांनी त्रिमूर्तीच्या चित्रांमध्ये ज्ञान देणारऱ्या शिवा चे चित्र नाही.ज्ञान घेणार्याचे चित्र आहे.आत्ता तुम्ही त्रिमूर्ती शिवाच्या चित्रा वरती समजवतात,वरती ज्ञान देणारे आहेत.ब्रह्मांना पण त्यांच्याद्वारे ज्ञान मिळते,परत ते इतरांना देतात.याला म्हटले जाते,ईश्वरीय धर्माच्या स्थापना ची संस्था.हा देवी देवता धर्म खूपच सुख देणारा आहे.तुम्हा मुलांना आपल्या सत्य धर्माची ओळख मिळाली आहे.तुम्ही जाणतात,स्वयम् भगवान आम्हाला शिकवत आहेत.तर तुम्हाला खूपच खुशी होते.बाबा म्हणतात,तुम्हा मुलांना खुशीचा पारावार राहिला नाही पाहिजे,कारण तुम्हाला शिकवणारे स्वयंम शिव आहेत. भगवान तर शिव आहेत ,ना की श्रीकृष्ण. बाबा सन्मुख समजतात,सर्वांचे सद्गगती दाता एकच आहेत.सद्गगती सतयुगाला म्हटले जाते.दुर्गती कलियुगाला म्हटले जाते.नवीन दुनियेला नविन,तर जुन्या दुनियेला जुनी म्हणनार.मनुष्य समजतात, दुनियेला जुने होण्यासाठी आणखी चाळीस हजार वर्ष पाहिजेत.खूपच संभ्रमित झाले आहेत.बाबा शिवाय या गोष्टी कोणीच समजावू शकत नाहीत. बाबा म्हणतात तुम्हा मुलांना राज्य भाग्य देऊन बाकी सर्वांना घरी घेऊन जातो.जे माझ्या मतानुसार चालतात,ते देवता बनतात.या गोष्टीला तुम्ही मुलंच जाणतात,नवीन कोणी काहीच समजणार नाहीत.

तुम्हा माळ्याचे कर्तव्य आहे बाग बनवणे.बागवान तर सूचना देतात.असे नाही बाबा नवीन मुलांना ज्ञान देतील.हे काम माळ्यांचे आहे.समजा बाबा कलकत्ता मध्ये गेले तर, मुलं समजतील आम्ही आपल्या अधिकाऱ्यांना,मित्र संबंधिताना बाबांच्या जवळ घेऊन जाऊ.बाबा म्हणतात,ते तर काहीच समजणार नाहीत. जसे बुध्दूला समोर बसवले,म्हणून बाबा म्हणतात नवीन मुलांना कधी बाबांच्या समोर घेऊन येऊ नका.हे तर तुम्हा माळ्यांचे चे काम आहे,न की बागवान चे. माळ्यांचे काम आहे बागेची जोपासना करणे.बाबा सूचना देतात अशा प्रकारे सेवा करा,म्हणून बाबा कधी नवीन मुलांना भेटत नाहीत परंतु कुठे पाहुणे घरात येतात तर म्हणतात आम्ही दर्शन करू इच्छितो. तुम्ही आम्हाला का भेटू देत नाही.शंकराचार्य इत्यादी यांच्याकडे अनेक जण जातात. आजकाल तर शंकराचार्यची पदवी खूपच मोठी आहे.ते शिकलेल्या आहेत,तरीही जन्म तर विकारा द्वारेच घेतात ना.विश्वस्त लोक गादीवरती कोणाला पण बसवतात. सर्वांचे आपापले मत आहे.बाबा स्वतःहून मुलांना आपला परिचय देतात की, मी कल्प कल्प या जुन्या तनामध्ये येतो.हे पण आपल्या जन्माला जाणत नाहीत.ग्रंथांमध्ये कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष लिहिले आहे. मनुष्य तर इतके जन्म घेऊ शकत नाहीत. परत जनावर इत्यादी मिळून 84 लाख योनी बनवल्या आहेत.मनुष्य तर जे ऐकतात,ते सत वचन करत राहतात. ग्रंथांमध्ये सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत कलकत्त्या मध्ये देवींची खूप शोभनिक, सुंदर मूर्ती बनवतात.त्याचा शृंगार करतात परत त्यांचे विसर्जन करतात.ही तर बाहुल्यांची पूजा करणारे,लहान मुलं झाले, खूपच निष्पाप आहेत.तुम्ही जाणता हा नर्क आहे.स्वर्गामध्ये तर खुप सुख असतात.आता पण कोणाचा मृत्यू होतो,तर म्हणतात अमका स्वर्गवाशी झाला,तर जरूर कोणत्या वेळेस वर्गात होता,आत्ता नाही.नरकाच्या नंतर जरूर स्वर्ग येईल.या गोष्टींना तुम्हीच जाणता,मनुष्य तर काहीच जाणत नाहीत.तर नवीन कोणी बाबा च्या समोर बसले तर काय करतील,म्हणून माळी पाहिजे,जे पालन पोषण करतील. येथे तर माळी पण अनेक पाहिजेत.जसे मेडिकल कॉलेज मध्ये कोणी नवीन जाऊन बसले,तर काही समजणार नाहीत.हे ज्ञान पण नवीन आहे.बाबा म्हणतात मी सर्वांना पावन बनवण्यासाठी आलो आहे.माझी आठवण करा तर, पावन बनाल.या वेळेत सर्व तमोप्रधान आत्मे आहेत. तेव्हा तर म्हणतात,आत्माच परमात्मा आहे.सर्वा मध्ये परमात्मा आहेत. तर अशां सोबत बाबा थोडेच वाद-विवाद करतील. हे तर तुम्हा माळ्यां चे काम आहे, त्यांना फुलासारखे बनवणे.तुम्ही जाणता भक्ती रात्र आहे,ज्ञान आहे दिन.गायन पण केले जाते ब्रह्माचा दिवस,ब्रह्माची रात्र. प्रजापिता ब्रह्मांची मुलं पण असतील ना. कोणाला एवढी पण अक्कल नाही,जे विचारतील की,इतके ब्रह्मकुमार कुमारी आहेत,तर यांचा ब्रह्मा कोण आहे?अरे प्रजापिता ब्रह्मा तर प्रसिद्ध आहेत, त्यांच्याद्वारे ब्राह्मण धर्म स्थापन होतो.असे म्हणतात ब्रह्मा देवताए नम: बाबा तुम्हा मुलांना ब्राह्मण बणवुन परत देवता बनवतात.

ज्या नव नवीन ज्ञानाच्या गोष्टी निघतात,त्यांना आपल्या जवळ नोंद करायची आवड मुलांमध्ये असला पाहिजे. जे चांगल्या रीतीने समजतात,ते वहीमध्ये ज्ञानाच्या गोष्टी लिहितात,त्यांना ही आवड असते.ज्ञानाच्या गोष्टी लिहिणे चांगलेच आहे,कारण इतके सर्व ज्ञानाचे मुद्दे आठवणीत राहणे अवघड आहे.ज्ञानाचे मुद्दे लिहून परत कोणालाही तुम्ही समजावून सांगू शकता.असे नाही की ज्ञानाचे मुद्दे वहीत लिहून ती वही तशीच पडुन राहील.नव नवीन ज्ञानाच्या गोष्टी मिळत राहतात,तर जुन्या गोष्टी वहीमध्ये तशाच राहतात.शाळेमध्ये पण शिकत जातात तर पहिल्या वर्गातील पुस्तकं तशीच पडून राहतात.जेव्हा तुम्ही ज्ञान समजवता तर,शेवटी मनमनाभव समजुन सांगा.बाबा आणि सृष्टीचक्राची आठवण करा.मुख्य गोष्ट आहे माझी आठवण करा,याला योग्नी म्हटले जाते.भगवान ज्ञानाचे सागर आहेत,मनुष्य ग्रंथाचे सागर आहेत.बाबा कोणत्या ग्रंथाचे ज्ञान देत नाहीत.ते पण ग्रंथ ऐकवतील तर, बाकी भगवान आणि मनुष्यां मध्ये काय फरक? बाबा म्हणतात भक्ती मार्गातील ग्रंथांचे सर्व रहस्य मी तुम्हाला समजावून सांगतो.गारोडी पुंगी वाजवुन साफ इत्यादी पकडतात,त्याचे दात काढून टाकतात. बाबा पण विष पिण्या पासुन सोडवतात. या विषाद्वारेच मनुष्य पतित बनले आहेत.बाबा म्हणतात विकारांना सोडा,तरी सोडत नाहीत.बाबा गोरे बनवतात,परत विकारा मध्ये जाऊन काळे तोंड करतात.बाबा आले आहेत तुम्हा मुलांना ज्ञान चिते वरती बसवण्यासाठी.ज्ञान चिते वरती बसल्या मुळे तुम्ही विश्वाचे मालक बनतात,जगतजीत बनतात.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता,बाप दादाची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
प्रत्येक शक्तीला कार्यामध्ये लावून वृध्दी करणारे श्रेष्ठ धनवान किंवा समजदार भव .

समजदार मुले प्रत्येक शक्तीला कार्यामध्ये लावण्याची विधी जाणतात.जे जितकी शक्ती कार्यामध्ये लावतात,तेवढीच शक्ती वृध्दी होत राहते.तर असे ईश्वरिय बजेट बनवा.विश्वातील प्रत्येक आत्म्याला तुमच्या द्वारे काहीना काही प्राप्ती व्हावी आणि तुमचे गुणगाण करावे.सर्वांना काही ना काही द्यायचेच आहे,मुक्ती द्या किंवा जीवनमुक्ती द्या. ईश्वरीय बजेट बनवून सर्व शक्तींची बचत करा,जमा करा आणि जमा झालेल्या शक्तीद्वारे सर्वांना भिकारी पणा पासून,दुःखा अशांती पासून मुक्त करा.

बोधवाक्य:-
शुद्ध संकल्पाला आपल्या जीवनाचा अनमोल खजाना बनवा , तर मालामाल बनाल .