03-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये तंतोतंत बरोबर राहा,तर तुमचा चेहरा नेहमी चमकणारा आनंदी राहील"

प्रश्न:-
आठवणी मध्ये बसण्याची विधी कोणती आहे आणि त्यापासून लाभ काय काय होतात?

उत्तर:-
जेव्हा आठवणी मध्ये बसतात तर बुद्धीमध्ये सर्व कामकाज इत्यादी पंचायत विसरून स्वतःला आत्मा समजा.देह आणि देहाचे संबंधाचे मोठे जाळं आहे,त्या जाळ्याला हाप करून देह अभिमाना पासून अनासक्त बना,म्हणजे तुम्ही मेले तर दुनिया मेल्यासारखी च आहे. जिवंतपणी सर्वकाही विसरून एका बाबाच्या आठवणीमध्ये राहा,हीच अशरीरी अवस्था आहे.यामुळे आत्म्याचा गंज निघून जाईल.

गीत:-

रात्रीच्या प्रवाशांनो थकू नका....

ओम शांती।
मुलं आठवणीच्या यात्रेमध्ये बसले आहेत,त्यालाच नेष्टा किंवा शांती मध्ये बसणे म्हणतात. फक्त शांती मध्ये बसत नाहीत,तर काही करत आहेत,स्वधर्मामध्ये बसले आहेत परंतु यात्रे वरती आहेत.यात्रा शिकवणारे बाबा,सोबत पण घेऊन जातात.ते जिस्मनी ब्राह्मण असतात,जे सोबत घेऊन जात नाहीत.तुम्ही आता ब्राह्मण आहात, ब्राह्मण वर्ण किंवा कुळ म्हणाल.आता तुम्ही मुलं आठवणीच्या यात्रेमध्ये बसले आहात आणि दुसऱ्या सत्संगामध्ये बसले असाल तर गुरूची आठवण येईल.गुरु येऊन प्रवचन करतील.तो सर्व भक्तिमार्ग आहे.ही आठवणी ची यात्रा आहे,ज्याद्वारे विकर्म विनाश होतील.तुम्ही आठवणी मध्ये बसतात,तर गंज निघण्यासाठी बसतात.बाबांची श्रीमत आहे,आठवणी द्वारेच गंज निघेल,कारण पतित-पावन मीच आहे.मी कोणाच्या आठवणीमुळे येत नाही,माझे येणे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.जेव्हा पतित दुनिया बदलून पावन दुनिया होणार आहे.आदी सनातन देवी देवता धर्म जो प्रायलोप आहे,त्याची स्थापना परत ब्रह्मा द्वारे करत आहेत.ज्या ब्रह्मासाठी समजवले जाते,ब्रह्माच विष्णू सेकंदांमध्ये बनतात परत विष्णूपासून ब्रह्मा बनण्यासाठी पाच हजार वर्ष लागतात.या बुद्धीने समजण्याच्या गोष्टी आहेत.तुम्ही जे शुद्र होते,आता ब्राह्मण वर्णा मध्ये आले आहात.तुम्ही ब्राह्मण बनतात तर शिवबाबा ब्रह्मा द्वारे तुम्हाला आठवणीची यात्रा शिकवतात, ज्याद्वारे गंज निघतो.हे रचनेचे चक्र कसे फिरते,ते तर तुम्ही समजले आहात.यामध्ये काही उशीर लागत नाही.आता बरोबर कलियुग आहे.ते म्हणतात आत्ता तर कलियुगाची सुरुवात आहे आणि बाबा म्हणतात आत्ता तर कलियुगाचा अंत आहे. अज्ञानाचा घोर अंधकार आहे.बाबा म्हणतात तुम्हाला या सर्व वेद, ग्रंथ इत्यादी रहस्य समजावतो.

तुम्ही मुलं सकाळी जेव्हा योगा मध्ये बसतात,तर आठवणीमध्ये बसायचे आहे,नाहीतर मायचे वादळ येतील. कामकाजा कडे बुध्दी योग जाईल.ही सर्व बाहेरची पंचायत आहे ना.जसे कोळी किती कोष्टकं (जाळे) तयार करतात,सर्व हप करतात,तसाच देहाचा पण खूप प्रपंच आहे,काका, मामा, गुरु, गोसावीचे खूप जाळं बनलेले आहे.ते सर्व देहसहीत हप करायचे आहे. एकटे,देही बनायचे आहे.मनुष्य शरीर सोडतात तर सर्वकाही विसरतात.तुम्ही मेले तर दुनिया जशी आम्हाला मेल्या सारखी आहे.हे तर बुद्धीमध्ये ज्ञान आहे की,दुनिया नष्ट होणार आहे.बाबा समजवतात जे ज्ञान सांगू शकत नाही,त्यांनी फक्त आठवण करा.जसे ब्रह्मा शिवबाबाची आठवण करतात.कन्या पतीची आठवण करते,कारण पती परमेश्वर समजतात म्हणून बाबा पासून बुद्धी योग निघून पतीमध्ये चालला जातो. हे तर पतींचे,पती साजन आहेत ना,तुम्ही सर्व सजनी आहात.भगवंताची सर्व भक्ती करतात.सर्व भक्तीन रावणाच्या तुरुंगा मध्ये आहेत,तर पित्याला जरूर दया येईल ना,बाबा दयावान आहेत,त्यांनाच दयावान म्हटले जाते.या वेळेत गुरु तर खूप प्रकारचे आहेत,जे कोणी ज्ञान देतात,तर त्यांना गुरु म्हणतात. येथे तर बाबा वास्तव मध्ये राजयोग शिकवत आहेत.हा राजयोग शिकवणे कोणाला येणार नाही, शिवाय परमात्माच्या.परमात्मानी येऊन राज योग शिकवला होता परत काय झाले? हे कोणालाही माहिती नाही.गीतेचे प्रमाण,उदाहरण तर खूप देतात.लहान कुमारी पण गीता पाठ करतात,तर त्यांची पण काही ना काही महिमा होते.गीता काही गायब झालेली नाही,गीतेची खूप महिमा आहे. गीताद्वारे च बाबा सर्व दुनियेला परिवर्तन करतात,तुमची काया कल्पतरू कल्पवृक्ष समान किंवा अमर बनवतात.

तुम्ही मुलं बाबांच्या आठवणीमध्ये राहतात.बाबांचे आव्हान करत नाहीत.तुम्ही बाबा च्या आठवणी मध्ये राहून स्वतःची प्रगती करत आहात.बाबाच्या श्रीमतानुसार चालण्याची पण आवड असायला हवी.आम्ही शिवबाबाची आठवण करून भोजन खातो,म्हणजे शिव बाबाच्या सोबत खातो. कार्यालयांमध्ये काहीना काही वेळ मिळतो.बाबांना मुलं लिहितात, खुर्चीवर बसतात तर आठवणीमध्ये बसतात,अधिकारी इत्यादी येऊन पाहतात,तर ते बसल्या-बसल्या गायब होतात,म्हणजे डोळे बंद होतात,कोणाचे उघडे पण राहतात. कोणी असे बसतात,जसे काहीच पाहत नाहीत,गायब होतात, असे होत राहते.बाबांनी बुध्दीरुपी दोर ओढला आणि आनंदात बसले. त्यांना विचारलं तुम्हाला काय झाले होते? तर म्हणतील आम्ही तर बाबा च्या आठवणी मध्ये बसलो होतो. बुद्धीमध्ये राहते आम्हाला बाबांच्या जवळ जायचे आहे.बाबा म्हणतात आत्माभिमान बनल्यामुळे तुम्ही माझ्याजवळ याल.तेथे पवित्र झाल्याशिवाय थोडेच जाऊ शकाल. आता पवित्र कसे बनायचे?ते बाबाच सांगू शकतात,मनुष्य तर सांगू शकत नाहीत.तुम्ही काही ना काही समजले आहे,तर दुसऱ्यांचे पण कल्याण करायचे आहे.तुम्हाला कोणाचे कल्याण करण्यासाठी,बाबांचा परिचय देण्यासाठी पुरुषार्थ जरूर करायचा आहे.भक्तिमार्गामध्ये ईश्वर पिता म्हणून आठवण करतात.हे ईश्वर पिता दया करा.ईशवराला बोलवण्याची एक सवय झाली आहे. बाबा तुम्हा मुलांना आपल्यासारखे कल्याणकारी बनवतात.मायेने सर्वांना खूप गैरसमजदार बनवले आहे.लौकिक पिता पण मुलांची चलन ठीक पाहत नाहीत,तर म्हणतात तुम्ही तर गैरसमजदार बनले आहात.एका वर्षामध्ये पित्याची सर्व मिळकत उडवून टाकतात.तर बेहद्दचेचे बाबा पण म्हणतात,तुम्हाला किती श्रेष्ठ बनवले होते,आता तुम्ही स्वतःची चलन तर पाहा.आता तुम्ही मुलं समजतात, कसा आश्चर्यकारक खेळ आहे. भारताची किती अधोगती झाली आहे.भारतवासींची अधोगती झाली आहे.स्वतःला असे समजत नाहीत की,आम्ही तर विकारी आहोत, आम्ही कलयुगी तमोप्रधान बनलो आहोत.भारत स्वर्ग होता म्हणजेच मनुष्य स्वर्गवासी होते,तेच मनुष्य आत्ता नर्कवासी आहेत.हे ज्ञान कोणामध्ये नाही.हे बाबा पण जाणत नव्हते.आता बुद्धी चमत्कारीक झाली आहे.८३ जन्म घेत घेत सिडी जरूर उतरायची आहे.वरती चढण्यासाठी जागा पण नाही.उतरत उतरत पतित बनायचे आहे.या गोष्टी कोणाच्या बुद्धीमध्ये नाहीत.बाबांनी त्या तुम्हा मुलांना समजवल्या आहेत.तुम्ही परत भारतवासींना समजवतात की तुम्हीच स्वर्गवासी होते,आता नर्कवासी बनले आहात.८४जन्म पण तुम्हीच घेतले आहेत.पुनर्जन्म तर मानतात ना,तर जरूर खाली उतरायचे आहे.किती पुनर्जन्म घेतले आहेत,ते पण बाबांनी समजवले आहे.या वेळेत तुम्हाला जाणीव होते की, आम्हीच पावन देवी-देवता होतो, परत रावणाने पतित बनवले आहे. बाबांना येऊन शूद्रापासून देवता बनवण्यासाठी शिकवावे लागते. बाबांना मुक्तिदाता,मार्गदर्शक म्हणतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत.आता ती वेळ लवकर येईल जे सर्वांना माहीत होईल, किती श्रेष्ठ बनले आहेत.हे वैश्विक नाटक कसे बनले आहे.कोणाला स्वप्ना मध्ये पण नव्हते की,आम्ही लक्ष्मीनारायण सारखे बनू शकतो.बाबा खूप स्मृती देतात,आता बाबा पासून वारसा घ्यायचा आहे,तर श्रीमतावर चालायचे आहे.आठवणीच्या यात्रेचा अभ्यास करायचा आहे.तुम्हाला माहित आहे,पादरी लोक ज्यावेळेस फिरायला जातात,तर खूप शांती मध्ये जातात,ते ख्रिस्ताच्या आठवणी मध्ये राहतात,त्यांचे ख्रिस्ता सोबत प्रेम आहे.तुम्हा आत्मिक पंड्याची परमपिता परमात्माच्या सोबत प्रित बुद्धी आहे.तुम्ही मुलं जाणतात, क्रमानुसार पुरुषाप्रमाणे कल्पा पूर्वीसारखीच राजधानी जरूर स्थापन होईल, जितका पुरुषार्थ करून श्रीमतावरती चालाल.बाबा तर खूप चांगले चांगले मत देतात,तरीही गृहचारी अशी बसते जे श्रीमतावरती चालतच नाहीत. तुम्ही जाणतात,श्रीमतावर चालण्यामध्येच विजय आहे.निश्चयामध्येच विजय आहे.बाबा म्हणतात तुम्ही माझ्या मतावरतीच चाला.तुम्ही का समजतात की,ब्रह्मा मत देतात, नेहमी समजा शिवबाबाच मत देतात. ते तर सेवा करण्यासाठीच मत देतील.कोणी म्हणतात,बाबा हा व्यापार किंवा धंदा करू? बाबा काही अशा गोष्टीसाठी मत देत नाहीत,बाबा म्हणतात मी आलो आहे पतिता पासून पावन बनवण्याची युक्ती सांगण्यासाठी,ना की या गोष्टीसाठी.मला बोलवतातच की,हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा,तर मी ती युक्ती सांगतो, खूप सहज आहे.तुमचे नाव आहे गुप्त सेना,त्यांनी परत शस्त्र,बाण इत्यादी दाखवले आहेत परंतु यामध्ये बाण इत्यादीच तर कोणतीच गोष्ट नाही.हा सर्व भक्ती मार्ग आहे.

बाबा येऊन खरा मार्ग सांगतात, ज्याद्वारे तुम्ही सत्य खंडांमध्ये जातात.तेथे दुसरा कोणता खंड नसतो.कोणाला समजावून सांगा तर, मानत नाही की,हे कसे होऊ शकते की,फक्त भारत होता.ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्ष पूर्व भारत स्वर्ग होता, तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता, परत झाड वृद्धि होत राहते.तुम्ही फक्त स्वतःला,आपल्या पित्याला, आपल्या धर्माला,श्रेष्ठ कर्माला विसरले आहात.देवी-देवता धर्माचे स्वतःला समजतील,तर खराब गोष्टी इत्यादी काहीच खाणार नाहीत परंतु तशा गोष्टी खातात,कारण ते दैवी गुण नाहीत,म्हणून स्वतःला हिंदू मानतात.नाही तर लाज वाटायला पाहिजे,आमचे पूर्वज जास्त पवित्र आणि आम्ही असे पतित बनलो आहोत.आपल्या धर्माला विसरले आहेत.आता तुम्ही वैश्विक नाटकाच्या आदी मध्य अंतला चांगल्या रीतीने समजले आहात. कोणती अशी गोष्ट असेल, तर तुम्ही म्हणू शकता की,हे ज्ञानाचे मुद्दे आणखी बाबांनी समजवले नाहीत. नाही तर संशयित होतात,संभ्रमित होतात.तुम्ही सांगा आता आम्ही शिकत आहोत.सर्व काही आत्ताच जाणले तर विनाश होईल परंतु नाही. आता काही वेळ बाकी आहे.आम्ही शिकत आहोत.अंतकाळामध्ये संपूर्ण पवित्र होऊन,क्रमानुसार पुरुषार्थप्रमाणे गंज निघत जाईल, तर सतोप्रधान बनाल.परत या दुनिये चा विनाश होईल.आज-काल म्हणतात पण, परमात्मा जरूर कुठे आले आहेत परंतु ते गुप्त आहेत. वेळ तर बरोबर विनाशाचा आहे ना. बाबाच मुक्तिदाता मार्गदर्शक आहेत,जे परत घेऊन जातील, मच्छरा सदृश्य मरतील.हे पण जाणतात,सर्व एक रस आठवणीमध्ये बसत नाहीत.कोणाचा योग तंतोतंत बरोबर लागतो,कोणाचा अर्धातास, कोणाचा पंधरा मिनिट योग राहतो.कोणीतरी एक मिनिट पण आठवणीत राहत नाहीत.कोणी म्हणतात आम्ही तर सर्व दिवस बाबांच्या आठवणी मध्ये राहतो.तर जरूर त्यांचा चेहरा आनंदाने चमकत राहील.अतींद्रिय सुख अशा मुलांना राहते.कुठेही बुद्धी भटकत नाही.ते सुखाची अनुभुती करतात. बुद्धी पण म्हणते,एक साजन च्या आठवणीमध्ये बसले तर गंज उतरून जाईल परत सवय लागेल. आठवणीच्या यात्रे द्वारे तुम्ही सदा निरोगी, सदा संपत्तीवान बनतात. चक्राची पण आठवण येते, फक्त आठवणी मध्ये राहण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.बुद्धीमध्ये चक्र फिरत राहील. आता तुम्ही मास्टर बीजरूप बनत आहात.आठवणीच्या सोबत स्वदर्शन चक्र पण फिरवायचे आहे.तुम्ही भारतवासी प्रकाश स्तंभ आहात. अध्यात्मिक प्रकाश स्तंभ बनून सर्वांना घराचा रस्ता सांगत आहात. हे पण समजावून सांगावे लागेल. तुम्ही मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता सांगत आहात म्हणून तुम्हीच अध्यात्मिक प्रकाश स्तंभ आहात. तुमचे सुदर्शन चक्र फिरत राहते.नाव लिहायचे आहे,तर समजून सांगावे लागेल.बाबा समजावत राहतात, तुम्ही समोर बसले आहात.जे साजन च्या सोबत आहेत,त्यांच्या सन्मुख ज्ञान वर्षा आहे.सर्वात जास्त सुख सन्मुख ऐकण्यामध्ये आहे,परत दुसऱ्या क्रमांकामध्ये टेप आहे आणि तिसऱ्या क्रमांका मध्ये सेवाकेंद्रात मुरली ऐकणे आहे.शिव बाबा ब्रह्मा द्वारा सर्व काही समजवतात.हे ब्रह्मा पण जाणतात ना.तरी तुम्ही समजून सांगा की,शिव बाबा म्हणतात,हे न समजल्यामुळे खूप आवज्ञा करतात. शिवबाबा जे म्हणतात ते कल्याणकारीच आहेत.अकल्याण झाले तरी ते कल्याणाच्या रूपामध्ये बदलतील,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबाच्या प्रत्येक श्रीमतानुसार चालून स्वतःची प्रगती करायची आहे.एका बाबासोबत खरेखुरे प्रेम करायचे आहे.आठवणी मध्ये राहून भोजन बनवायचे आणि खायचे आहे.

(२) अध्यात्मिक प्रकाशस्तंभ बनून सर्वांना मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता दाखवायचा आहे.बाबा सारखे कल्याणकारी जरूर बनवायचे आहे.

वरदान:-
एका बाबा मध्ये सर्व संसाराचा अनुभव करणारे बेहद्दचे वैरागी भव.

बेहद्दचे वैरागी तेच बनू शकतात जे बाबांनांच आपला संसार समजतात. ज्यांचा बाबाच संसार आहे, ते आपल्या संसारामध्ये राहतील, दुसऱ्या मध्ये जाणार नाही.तर स्वतःच किनारा होईल.संसारामध्ये व्यक्ती आणि वैभव सर्व येते.बाबा ची संपत्ती तीच आपली संपत्ती,या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे बेहद्दचे वैरागी बनतील.कोणाला पाहत असताना पण पाहणार नाहीत, ते दिसून येणार नाहीत.

बोधवाक्य:-
शक्तिशाली स्थितीचा अनुभव करण्यासाठी, एकांत आणि रमणीकता याचे संतुलन ठेवा.