03-05-2022
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा
मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही बाबांसारखे गोड असले पाहिजे, कोणालाही दुखवू नका, कधीही रागावू नका
प्रश्न:-
कर्माच्या गूढ गतीला जाणून, तुम्ही मुलं कोणते पाप करू शकत नाही?
उत्तर:-
आजपर्यंत दान
करणे, हे पुण्य मानले जायचे, पण आता तुम्हाला हे समजले आहे की, दान करणे देखील अनेक
वेळा पाप होते, कारण जर तुम्ही अशा मनुष्याला दान दिले, ज्या पैशाने त्याने पाप
केले, तर त्याचा तुमच्या स्थितीवर नक्कीच परिणाम होईल, म्हणून दान पण समजुन करा.
गीत:-
या पापाच्या
दुनियेतून कुठे दूर घेऊन चल जिथे सुख चैन असेल…. . .
ओम शांती।
तुम्ही मुलं आत्ता समोर बसले आहात. बाबा म्हणतात, हे जीव आत्म्यांनो, तुम्ही ऐकत
आहात ना. आत्म्यांशी बोलत आहेत. आत्म्यांना माहित आहे की, आमचे बेहद्दचे पिता
आपल्याला घेऊन जात आहेत, जिथे दु:खाचे नाव नाही. गीता मध्येही असे म्हटले आहे की,
या पापाच्या दुनियेतून आम्हाला पावन दुनियेत घेऊन चल. पतित दुनिया कशाला म्हणतात,
हे मनुष्यांना कळत नाही. पाहा, हल्ली माणसांमध्ये काम विकार आणि क्रोध किती तीव्र
आहे. क्रोधाच्या वश होऊन, ते म्हणतात की, आम्ही देशाचा नाश करू. असेही म्हटले जाते
की, हे परमेश्वरा, आम्हाला अज्ञान अंधारातून, प्रकाशाकडे घेऊन चल, कारण हे जुनी
दुनिया आहे. कलियुगाला जुने, सत्ययुगाला नवयुग म्हणले जाते. शिव पित्याशिवाय कोणीही
नवीन युग निर्माण करू शकत नाही. आमचे गोड बाबा, आत्ता आम्हाला दु:खाच्या भूमीतून
सुखाच्या भूमीत घेऊन जात आहेत. बाबा, तुमच्याशिवाय आम्हाला स्वर्गात कोणीही नेऊ शकत
नाही. बाबा खूप छान समजावून सांगतात. तरीही कोणाच्या बुद्धीला बसत नाही. यावेळी
तुम्हाला बाबांचे श्रेष्ठ, भारदस्त मत प्राप्त होत आहे. सर्वोत्तम विचार करून आपण
सर्वोत्तम बनतो. जर तुम्ही येथे उन्नत, श्रेष्ठ बनले, तर तुम्ही श्रेष्ठ जगात उच्च
पद मिळवाल. हे भ्रष्ट रावणाचे जग आहे. स्वतःच्या मताचे पालन करणे यालाच मनमत
म्हणतात. बाबा म्हणतात श्रीमतचे पालन करा, परत वेळोवेळी आसुरी विचार तुम्हाला नरकात
ढकलतात. क्रोध करणे पण राक्षसी गोष्ट आहे. बाबा म्हणतात, एकमेकांवर रागावू नका.
प्रेमाने चाला. प्रत्येकाने स्वतःसाठी मत घ्यावे. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही
पाप का करता, पुण्यपूर्वक काम करा. स्वतः चा खर्च कमी करा. हे सर्व कर्मकांड
करण्यात, तीर्थयात्रा करण्यात, संन्याशाकडे जाण्यात किती खर्च करता? बाबा त्या
सर्वापासून मुक्त करतात. लग्नात लोक किती खर्च करतात, कर्ज घेऊनही लग्न करतात. एक
तर कर्ज घ्यायचे आणि दुसरे अपवित्र बनतात. ज्यांना अपवित्र व्हायचे आहे, त्यांनी
पतित बनावे. जे श्रीमतानुसार पवित्र बनतात, त्यांना का अडवायला पाहिजे? मित्र,
नातेवाईक इत्यादी भांडण करतील, तर तुम्हाला ते सहन करावे लागेल. मीरानेही सगळं सहन
केलं, नाही का? बेहद्दचे पिता येऊन, तुम्हाला राजयोग शिकवून, भगवान भगवतीचा दर्जा
मिळवून देतात. लक्ष्मीला भगवती, नारायणला भगवान म्हणतात. कलियुगाच्या शेवटी सर्व
अपवित्र आहेत, मग त्यांना कोणी बदलले? बाबा येऊन स्वर्गाचे किंवा रामाराज्य कसे
स्थापन करतात, हे आत्ता तुम्हा मुलांना कळले आहे. आम्ही येथे सूर्यवंश किंवा
चंद्रवंशाचे पद मिळवण्यासाठी आलो आहोत. जे सूर्यवंशी सुपुत्र आहेत, ते चांगल्या
प्रकारे अभ्यास करतील.
बाबा सर्वांना
समजावतात की, तुम्ही प्रयत्न करून मातपित्याचे अनुकरण करा. असे प्रयत्न करा की,
तुम्ही त्याचे वारस बनून दाखवा. मम्मा बाबा म्हणतात, तर भविष्य सिंहासनधारी बनून
दाखवा. बाबा म्हणतात, इतका अभ्यास करा की, जे माझ्यापेक्षा उच्च पद मिळेल. अशी अनेक
मुलं आहेत, जी वडिलांपेक्षा उच्च पद मिळवतात. बेहद्दचे पिता म्हणतात: मी तुम्हाला
जगाचा स्वामी बनवतो. मी थोडेच बनतो. किती गोड बाबा आहेत. त्यांची श्रीमत प्रसिद्ध
आहे. तुम्ही श्रेष्ठ देवता बनता, परत ८४ जन्म घेऊन आत्ता अपवित्र झाले आहात. हा
विजय आणि पराभवाचा खेळ आहे. हारणे आणि, जिंकणे हा खेळ आहे. मायेकडून पराजय झाल्यास
हार आहे, मायेला जिंकल्यास जित आहे. मन अक्षर म्हणणे चुकीचे आहे. मन, अमन असू शकत
नाही. मन तर विचार करेल. विचार न करता मन राहील, परंतू किती वेळ? कर्म तर करावंच
लागेल, नाही का? ते समजतात गृहस्थ धर्मात राहणे म्हणजे कर्म करायचे नाही. या हठयोग
संन्यासींचाही आपली भुमिका आहे. त्यांचा पण एक निवृत्ती मार्गाचा धर्म आहे, बाकी
कोणत्याही धर्मात घर-घाट सोडून जंगलात जात नाहीत. जर कोणी सोडले आहे, तर सन्यांशाना
पाहून सोडले आहे. बाबा काही घरापासून वैराग्य देत नाहीत. बाबा म्हणतात, तुम्ही
खुशाल घरी राहा, पण पवित्र राहा. जुन्या दुनियेला विसरा. मी तुमच्यासाठी एक नवीन
दुनिया बनवत आहे. शंकराचार्य संन्याशांना सांगत नाहीत की, मी तुमच्यासाठी नवीन
दुनिया निर्माण करतो, त्यांचा सिमीत संन्यास आहे, ज्याद्वारे अल्पकालीन सुख मिळते.
अपवित्र लोक जाऊन मस्तक टेकतात. पवित्रतेचा पाहा किती मान आहे. आता बघा, किती
मोठ-मोठ्या इमारती वगैरे बनवतात. मनुष्य दान करतात, यामुळे काही पुण्य तर जमा झाले
नाही. मानवाला वाटते की, आम्ही जे काही ईश्वरासाठी करतो म्हणजे पुण्य आहे. बाबा
म्हणतात, माझ्यासाठी तुम्ही कोणत्या कामात लावता? जे पाप करत नाहीत त्यांना दान
द्यायला पाहिजे. जर त्यांनी पाप केले तर, तुमच्यावरती त्याचा परिणाम होईल, कारण
तुम्ही पैसे दिले. पतितांना देत-देत तुम्ही गरीब झाला आहात. पैसे सर्व वाया गेले
आहेत. असे केल्याने अल्पकालीन आनंद मिळतो. हे देखील एक नाटक आहे. बाबाच्या श्रीमताचे
पालन करून तुम्ही आता पावन बनत आहात, पैसेही तुमच्याकडे खुप असतील. तेथे कोणी पतित
नसतात. या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात. तुमच्या
मध्ये खुप श्रेष्ठत्व पाहिजे. गुरूंची निंदा करणाऱ्यांना श्रेष्ठ पद मिळू शकत नाहीत,
असे म्हणतात. पिता, गुरू आणि शिक्षक, हे त्यांच्यात वेगळे आहेत. इथे तर पिता,
शिक्षक आणि सतगुरु एकच आहेत. जर तुम्ही कोणती उल्टी चलन चालले तर, तुम्ही तिघांचेही
निंदक बनाल. सतपिता, सतगुरू आणि सत शिक्षकाच्या मताचे पालन केल्यानेच तुम्ही
श्रेष्ठ बनता. तुम्हाला तुमचे शरीर तर सोडावे लागेल, मग ते ईश्वरीय, अलौकिक सेवेत
घालून, पित्याकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा म्हणतात, हे घेऊन मी काय करू? मी
तुम्हाला स्वर्गाचे राज्य देतो. तिथेही मी राजवाड्यामध्ये राहत नाही, इथेही मी
राजवाड्यांमध्ये राहत नाही. बम बम महादेव. . . माझी झोळी भरा असे म्हणतात. परंतू
त्यांची ते कधी आणि कशी झोळी भरतात, हे कोणालाच माहीत नाही. झोळी भरली असेल, तर ते
चैतन्यमध्ये नक्कीच आले असतील. २१ जन्मांसाठी तुम्ही खूप सुखी आणि सावकार बनतात, अशा
पित्याच्या मतावरती तर पावलो-पावली चालावे लागेल. मोठे लक्ष्य आहे . जर कोणी म्हणेल
की, मी चालू शकत नाही. बाबा म्हणतील, मग बाबा बाबा का म्हणता? श्रीमता वरती चालले
नाही तर अनेक लाठ्या खावा लागतील, म्हणजे सजा खावी लागेल आणि पदही भ्रष्ट होईल. हे
गित पण ऐकले की, मला अशा जगात घेऊन चला, जिथे सुख-चैन असेल. तर ते पिताच देऊ शकतात.
जर तुम्ही पित्याच्या सूचनांचे पालन करत नाहीत, तर तुमचे च नुकसान होईल. इथे खर्च
वगैरेचा प्रश्नच येत नाही. गुरूं समोर नारळ, मिठाई वगैरे आणा किंवा शाळेत फी भरा,
असे म्हणत नाहीत, असे काहीच नाही. पैसे तुमच्या कडेच ठेवा. तुम्ही फक्त ज्ञानाचा
अभ्यास करा. भविष्य सुधारणा करण्यात काहीही नुकसान तर नाही. इथे मस्तक पण
टेकवण्यासाठी शिकवले जात नाही. अर्ध्या कल्पामध्ये पैसे ठेवत, डोकं टेकवत, तुम्ही
कंगाल झाले आहात. आत्ता बाबा तुम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन जात आहेत आणि तिथून
सुखधाम मध्ये पाठवतील. आता नवीन युग, नवीन दुनिया येणार आहे. नव्या युगाला
सुवर्णयुग म्हणतात आणि मग कला कमी होत राहतात. बाबा आता तुम्हाला योग्य बनवत आहे.
नारदांचे उदाहरण आहे, जर कोणते विकार रुपी भूत असेल, तर तुम्ही लक्ष्मीशी स्वयंवर
करु शकणार नाहीत. मुलांनो, तुम्हाला तर आपपले घर सांभाळायचे आहे आणि सेवाही करायची
आहे. प्रथम हे सोडून आले, कारण त्यांना खूप मार खावा लागला. खूप अत्याचार झाले.
त्यांना मार खाण्याचीही पर्वा नव्हती. भट्टीत काही पक्के तर काही कच्चे निघाले.
अशीच नाटकाची भावी होती. जे झाले ते झाले, परत पण होईल. शिव्याही देतील. सर्वात
जास्त निंदा, शिव्या परमपिता परमात्मालाच मिळतात. परमात्मा सर्वव्यापी आहे, कुत्रा,
मांजर, मगर मासे इत्यादी सर्वांमध्ये आहेत, असे म्हणतात. परंतू असे तर होऊ शकत नाही.
बाबा म्हणतात, मी परोपकारी आहे. मी तुम्हाला जगाचा स्वामी, मालक बनवतो. श्रीकृष्ण
स्वर्गाचा राजकुमार आहे ना? त्यांच्यासाठी पुन्हा साप चावला, काळे बनले, असे
म्हणतात. आता तिथे साप कसा चावणार? कृष्णपुरीत कंस कुठून आला? या सर्व दंतकथा आहेत.
हे भक्तीमार्गाचे साहित्य आहे, ज्यामुळे तुम्ही उतरत आले. बाबा तुम्हाला सुंदर
बनवतात. काही फार मोठे काटे असतात. ते म्हणतात, हे ईश्वरीय पिता, पण त्यांना काहीच
समजत नाहीत. पिता आहेत, पण पित्याकडून तुम्हाला कोणता वारसा मिळेल, हे माहीत नाही.
बेहद्दचे पिता म्हणतात, मी तुम्हाला बेहद्दचा वारसा द्यायला आलो आहे. तुमचा एक
लौकिक पिता पण आहे, दुसरा अलौकिक प्रजापिता ब्रह्मा आहे, तिसरा पारलौकिक पिता शिव
आहे. तुम्हाला तिन पिता आहेत. तुम्हाला माहीत आहे की, ब्रह्मा द्वारे तुमचा वारसा
घेत आहात, म्हणून तुम्हाला श्रीमताचे पालन करावे लागेल, तरच तुम्ही श्रेष्ठ बनाल.
सुवर्णयुगात तुम्ही प्रारब्ध सुख भोगतात. तेथे तुम्ही न प्रजापिता ब्रह्माला, ना
शिवाला ओळखतात. तेथे फक्त लौकिक पित्याला जाणतात. सुवर्णकाळात एकच पिता असतो.
भक्तीमध्ये दोन पिता आहेत. लौकिक आणि परलोकिक पिता. या संगम युगात तीन पिता आहेत.
इतर कोणीही, या गोष्टी स्पष्ट करू शकत नाही. त्यामुळे निश्चय व्हायला पाहिजे. असे
नाही की आता तुमचा विश्वास आहे, परत लगेच संशय येतो. आत्ताच जन्म घेतला आणि लगेच
मृत्यू. ज्ञान सोडले तर वारसा नष्ट होतो. अशा पित्याला तर सोडायला नाही पाहिजे.
जितके तुम्ही निरंतर आठवण ठेवता आणि सेवा करता तितकेच तुम्हाला उच्च पद मिळेल. बाबा
तुम्हाला हे सांगतात की, तुम्ही माझ्या सूचनांचे पालन कराल, तर तुमचा उद्धार होईल.
अन्यथा तुम्हाला खूप शिक्षा भोगावी लागेल. सर्व साक्षात्कार करवतील की, हे-हे पाप
केले, श्रीमताचे पालन कले नाही, सूक्ष्म शरीर धारण करुन शिक्षा दिली जाते. ते
गर्भजेल मध्ये पण साक्षात्कार करवतात. हे पापकर्म केले आहेत, आत्ता त्याची शिक्षा
भोगा. वृक्षाची वृध्दी होत राहील. जे या धर्माचे होते आणि इतर धर्मात गेले आहेत, ते
सर्व परत येतील. बाकी सर्व आपापल्या विभागात जातील. वेगवेगळे विभाग आहेत. झाड कसे
वाढते ते पहा. छोट्या छोट्या फांद्या निघतील. तुम्हाला माहित आहे की, गोड बाबा
आम्हाला परत घेऊन जाण्यासाठी आले आहेत आणि म्हणूनच त्यांना मुक्तिदाता म्हणतात.
दु:ख दूर करणारे सुखाचा कर्ता आहेत. मार्गदर्शक बनून सुखधाम मध्ये घेऊन जातील. ५०००
वर्षांपूर्वी तुम्हाला सुखाच्या संबंधात पाठवण्यात आले होते, असेही म्हटले जाते.
तुम्ही 84 जन्म घेतले. आता पित्या कडून वारसा घ्या. श्रीकृष्णावर सर्वांचे प्रेम आहे.
लक्ष्मी आणि नारायण सोबत इतके नाही, जेवढे कृष्णासोबत आहे. हे मनुष्याला माहीत नाही.
राधे आणि कृष्णच लक्ष्मी-नारायण बनतात. हे कोणालाच माहीत नाही. आत्ता तुम्हाला
माहित आहे की, राधे कृष्ण वेगवेगळ्या राज्यांचे होते आणि नंतर स्वयंवरा नंतर लक्ष्मी
आणि नारायण झाले. त्यांनी तर कृष्णाला द्वापर युगात दाखवले आहे. कृष्णाला कोणीही
पतित पावन म्हणू शकत नाही. नियमित अभ्यास केल्याशिवाय कोणीही उच्च पद मिळवू शकत नाही.
अच्छा.
गोड गोड, खुप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) तुमची
वृत्ती खुप श्रेष्ठ ठेवा, खूप कमी आणि गोड बोला. सजा टाळण्यासाठी प्रत्येक पावलावर
बाबाच्या श्रीमताचे पालन करा.
२) अभ्यास खूप
काळजीपूर्वक आणि चांगल्या प्रकारे करा. मात पित्याचे अनुकरण करून तुम्ही राजसिंहासन
अधिकारी आणि वारिस बना. क्रोधाच्या वश होऊन कोणाला दु:ख देऊ नका.
वरदान:-
साधारण कर्म
करताना पण उच्च स्मृती आणि स्थितीची झलक दाखवणारे पुरुषोत्तम सेवाधारी भव.
ज्याप्रमाणे खरा हिरा
कितीही धुळीत लपलेला असेल, पण तो त्याची चमक नक्कीच दाखवेल, त्याचप्रमाणे तुमचे
जीवन हिऱ्यासारखे आहे. तर कोणत्याही वातावरणात, कोणत्याही संगठनमध्ये, तुमची
तेजस्वीता, म्हणजेच ती झलक आणि फलक सर्वांना दिसून येईल. जरी तुम्ही काम साधारण करता,
पण तुमची स्मरणशक्ती आणि तुमचा स्थिती अशी हवी की, तुम्ही सामान्य व्यक्ती नाही, हे
पाहून तुम्हाला जाणवते की, तुम्ही सेवाधारी असूनही तुम्ही पुरुषोत्तम आहात.
बोधवाक्य:-
खरा ऋषी तोच
आहे, ज्याला संकल्प मात्रपण कुठे आसक्ती नाही.