03-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,जे सर्वांचे सद्गती करणारे जीवन मुक्तिदाता आहेत,ते आपले पिता बनले आहेत,तुम्ही त्यांची संतान आहात,तर खूप नशा राहायला पाहिजे"

प्रश्न:-
कोणत्या मुलांच्या बुद्धी मध्ये बाबांची आठवण निरंतर राहू शकत नाही?

उत्तर:-
ज्यांना पूर्णपणे निश्चय नाही, त्यांच्या बुद्धीमध्ये आठवण राहू शकत नाही.आम्हाला कोण शिकवत आहे,हे जाणत नाहीत, तर आठवण कोणाची करतील?जे अर्थसहीत ओळखून आठवण करतात,त्यांचेच विकर्म विनाश होतात.बाबा स्वतःहून आपला आणि आपल्या घराचा अर्थ सहीत परिचय करून देतात.

ओम शांती।
आत्ता ओम शांती चा अर्थ तर नेहमीच मुलांना आठवणीत असेल.आम्ही आत्मा आहोत,आमचे घर निर्माणधाम किंवा मूळवतन आहे. बाकी भक्ति मार्गामध्ये मनुष्य जो पण पुरुषार्थ करतात,त्यांना माहित नाही कोठे जायचे आहे?सुख कशा मधे आहे? दुःख कशामध्ये आहे? काहीच माहिती नाही.यज्ञ दान पुण्य तीर्थ इत्यादी करत शिडी खाली उतरत आले आहेत.आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे,तर भक्ति बंद होते.घंटा इ.वाजवणे सर्व बंद होते.नवीन दुनिया आणि जुन्या दुनिये मध्ये फरक तर आहे ना.नवीन दुनिया पावन दुनिया आहे.मुलांच्या बुद्धीमध्ये सुखधाम आहे.सुखधामला स्वर्ग तर दु:खधामला नर्क म्हणले जाते. मनुष्याची इच्छा असते,शांती मिळावी परंतु तेथे कोणीही जाऊ शकत नाही. बाबा म्हणतात मी जोपर्यंत भारतामध्ये येत नाही तोपर्यंत माझ्याशिवाय तुम्ही मुलं जाऊ शकत नाहीत.भारतामध्ये शिवजयंती साजरी केली जाते.निराकार जरूर साकार मध्ये येतील ना.शरीरा शिवाय आत्मा काहीच करू शकत नाही.शरीरा शिवाय आत्मा भटकत राहते, दुसऱ्या तनामध्ये प्रवेश करते.काही चांगले असतात,तर काही चंचल असतात,एकदम तवाई बनतात. आत्म्याला शरीर जरूर पाहिजे, तसेच परमपिता परमात्मा ला पण शरीर नसेल, तर भारतामध्ये येऊन काय करतील.भारतच अविनाशी खंड आहे.सतयुगामध्ये एकच भारत खंड आहे,बाकी सर्व खंड विनाश होतात.आदी सनातन देवी देवता धर्म होता,असे गायन करतात.ते लोक परत आदी सनातन हिंदू धर्म म्हणतात. वास्तव मध्ये सुरुवातीला हिंदू नव्हते,देवी-देवता होते.युरोप मध्ये राहणारे स्वतःला ख्रिश्चन म्हणतात,युरोपियन धर्म थोडाच म्हणतात.हे हिंदुस्थान मध्ये राहणारेच स्वतःला हिंदू धर्माचे म्हणतात.दैवी धर्म श्रेष्ठ होता,तेच 84 जन्मांमध्ये धर्मभ्रष्ट बनले आहेत.देवता धर्माचे जे असतील,ते येतील.नाहीतर समजा या धर्माचे नाहीत.जरी येथे बसले असतील तरी त्यांच्या बुद्धीमध्ये येणार नाही.स्वर्गा मध्ये मध्ये कमी पद मिळवणारे असतील.सर्वांची सुख शांती ची इच्छा असते,ती तर सुखधाम मध्ये असते.सर्व तर सुखांमध्ये जाऊ शकत नाहीत.सर्व धर्म आपापल्या वेळेनुसार येतात. अनेक धर्म आहेत,मनुष्य सृष्टी चे झाड वृद्धी होत राहते.देवी देवता धर्म, मनुष्य सृष्टीच्या झाडाचे खोड आहे, परत त्याच्या द्वारे तीन धर्मरुपी फांद्यानिघतात.स्वर्गामध्ये तर हे होऊ शकत नाही.द्वापर पासून नवीन धर्म निघतात,याला विविध मानवी झाड म्हटले जाते.विराट रूप वेगळे आहे. हे विविध धर्माचे झाड आहे.अनेक प्रकारचे मनुष्य आहेत.तुम्ही जाणतात किती धर्म आहेत. सतयुगाच्या सुरुवातीला एकच धर्म होता,नवीन दुनिया होती.परदेशा मध्ये पण जाणतात,भारतच प्राचीन स्वर्ग होता,खूप सावकार होता म्हणून भारताला खूप मान मिळतो.कोणी सावकार गरीब बनतात,तर त्यांच्यावरती दया येते.भारताचे काय हाल झाले आहेत?हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.असे म्हणतात सर्वात जास्त दयावान ईश्वर आहेत आणि ते भारतामध्ये येतात.

गरिबावरती जरूर सावकारच दया करतील ना.शिव पिता सावकार आहेत,उच्च ते उच्च बनवणारे आहेत. तुम्ही कोणाचे मुलं बनले आहात.हा पण नशा राहायला पाहिजे. परमपिता परमात्मा शिवाची आम्ही संतान आहोत.ज्याला जीवन मुक्तिदाता, सदगती दाता म्हटले जाते.जीवन मुक्ती प्रथम सतयुगा मध्ये असते.येथे जीवनबंध आहे. भक्ती मार्गामध्ये बोलवतात,बाबा येऊन बंधनापासून सोडवा.आता तुम्ही बोलवणार नाहीत. तुम्ही जाणता बाबाच ज्ञानाचे सागर आहेत.तेच विश्वाच्या इतिहास भूगोलाचे रहस्य समजावत आहेत.ज्ञानाचे सागर आहेत.हे (ब्रह्मा) तर स्वतः म्हणतात,मी भगवान नाही. तुम्हाला देहापासून वेगळे,देही अभिमानी बनायचे आहे.साऱ्या दुनियेला,आपल्या शरीराला पण विसरायचे आहे.हे ब्रह्मा भगवान नाहीत,यांना बाप दादा म्हणतात. शिवपिता उच्च ते उच्च आहेत.हे पतीत जुने तन आहे. महिमा फक्त एकाची आहे,त्यांच्याशी योग लावायचा आहे,तेव्हाच पावन बनाल, नाहीतर कधीच पावन बनू शकणार नाहीत.परत अंत काळामध्ये कर्मभोग चुक्तू करून सजा खाऊन परमधामला जातील.भक्तिमार्ग मध्ये हमसो सो हम,हा मंत्र ऐकत आले आहात.आम्ही आत्मा सो परमपिता परमात्मा,सो आत्मा.हा चुकीचा मंत्र, परमात्मा पासून दूर करणारा आहे. बाबा म्हणतात मुलांनो परमात्मा सो आत्मा,असे म्हणने चुकीचे आहे. आता तुम्हा मुलांना वर्णाचे रहस्य समजवले आहे.आम्ही ब्राह्मण आहोत परत आम्हीच देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. परत आम्ही देवता बनून क्षत्रिय वर्ण मध्ये येऊ.दुसऱ्या कोणालाही थोड़च माहिती आहे?आम्ही कसे ८४ जन्म घेतो?कोणत्या कुळांमध्ये येतो?तुम्ही आता समजता,आम्ही ब्राह्मण आहोत.बाबा तर ब्राह्मण नाहीत. तुम्ही या वर्णांमध्ये येतात.आता ब्राह्मण धर्मामध्ये दत्तक घेतले आहे. शिवबाबा द्वारे प्रजापिता ब्रह्माचे संतान बनले आहात.हे पण जाणतात निराकारी आत्मे,वास्तव मध्ये ईश्वर कुळाचे आहेत.निराकारी दुनिया मध्ये राहणारे आहेत,परत भूमिकावठवण्यासाठी साकारी दुनिया मध्ये यावे लागते.निराकारी दुनिया मधून येऊन,परत आम्ही देवता कुळामध्ये जन्म घेतले,परत आम्ही क्षत्रिय आणि वैश्य कुळामध्ये जातो.बाबा समवतात तुम्ही इतके जन्म दैवी कुळामध्ये घेतले,परत इतके जन्म क्षत्रिय कुळांमध्ये घेतले.हे ८४जन्माचे चक्र आहे.तुमच्याशिवाय हे ज्ञान दुसऱ्या कोणाला मिळू शकत नाही.जे,या धर्माचे असतील,तेच येथे येतील. राजधानी स्थापन होत आहे,कोणी राजा राणी,कोणी प्रजा बनतात. सूर्यवंशी लक्ष्मीनारायण प्रथम, दुसरे-तिसरे अशाप्रकारे आठ गाद्या चालतात,परत क्षत्रिय धर्मामध्ये प्रथम,दुसरे,तिसरे असे चालत राहते. या सर्व गोष्टी बाबाच समजवतात. ज्ञानाचे सागर जेव्हा येतात तेव्हा भक्ती पूर्ण होते.रात्र नष्ट होऊन दिवस सुरू होतो.तेथे कोणत्याही प्रकारचे धक्के खावे लागत नाहीत.आरामच आराम आहे.काही हंगामा नाही.हे पण पूर्वनियोजित नाटक बनलेले आहे.भक्ती पर्वा मध्येच बाबा येतात. सर्वांना परत जरूर जायचे आहे, परत क्रमानुसार येत राहतात.ख्रिस्त येथील तर परत त्यांच्या मागे,त्या धर्मामधील येत राहतात.आता पहा अनेक ख्रिश्चन आहेत. ख्रिस्त झाले ख्रिश्चन धर्माचे बीज.या देवी देवता धर्माचे बीज तर परमात्मा शिव आहेत.परमपिता परमात्मा तुमचा ब्राह्मण धर्म स्थापन करतात.तुम्हाला ब्राह्मण धर्मामध्ये कोणी आणले? बाबाने दत्तक घेतले तर,त्यांच्या पासून लहान धर्म स्थापन झाला. ब्राह्मणांच्या शेंडी चे गायन आहे.ही शेंडी खूण आहे,परत खाली या तर शरीर वृद्धी होत जाते.या सर्व गोष्टीं बाबाच सन्मुख समजवतात.जे बाबा कल्याणकारी आहेत,तेच येऊन भारताचे कल्याण करतात.सर्वात अधिक कल्याण तर तुम्हा मुलांचे करतात.तुम्ही खूपच श्रेष्ठ बनतात. तुम्ही अमरलोकचे मालक बनतात. आत्ता तुम्ही काम विकारावरती विजय मिळवतात.स्वर्गामध्ये कधी अचानक मृत्यू होत नाही,मरण्याची गोष्टच नसते,बाकी फक्त शरीररूपी कपडे बदलतात.जसे साप कात सोडून दुसरी घेतो,तसेच तुम्हीपण ही जुनी चमडी सोडून नवीन चमडी घ्याल.सतयुगाला फुलांचा बगीचा म्हटले जाते.तेथे कोणी कटूनचन बोलत नाहीत.येथे तर कुसंग आहे, मायेचा संग आहे ना,म्हणून याचे नाव रौरव नर्क ठेवले आहे.इमारत जुनी होते,तर नगरपालिकेचे लोक म्हणतात,इमारत खाली करा.बाबा पण म्हणतात,जेव्हा दुनिया जुनी होते तेव्हा मी येतो.

ज्ञानाद्वारे सद्गती होते,राजयोग शिकवला जातो.भक्ती मध्ये तर काहीच नाही.होय,जसे दान पुण्य करतात,तर अल्पकाळासाठी सुख मिळते.राजांना पण संन्यासी वैराग्य देतात.हे तर काग विष्टा समान सुख आहे.आता तुम्हा मुलांना बेहद्दचे वैराग्य शिकवले जाते.ही जुनी दुनिया आहे.आता सुखधामची आठवण करा,परत व्हाया शांतीधाम येथे यायचे आहे.दिलवाडा मंदिरांमध्ये तुमची या वेळेतील यादगार आहे. खाली तपस्यामध्ये बसले आहेत,वरती स्वर्ग दाखवला आहे, नाहीतर कुठे दाखवतील.मनुष्य मरतात तर म्हणतात स्वर्गवासी झाले. स्वर्गाला वरती समजतात परंतु वरती काहीच नाही.भारतच स्वर्ग होता आणि भारतच नर्क बनतो.हे मंदिर पूर्णपणे यादगार आहेत.हे मंदिर इत्यादी सर्व नंतर बनतात.स्वर्गा मध्ये भक्ती नसते,तेथे सुखच सुख आहे. बाबा येऊन सर्व रहस्य समजवतात आणि सर्व आत्म्यांचे नावं बदलतात. शिवाचे नाव बदलत नाही.त्यांना आपले शरीरच नाही.शरीरा शिवाय कसे शिकवतील,प्रेरणाची तर कोणतीच गोष्ट नाही.प्रेरणाचा अर्थ विचार आहे.असे नाही वरून प्रेरणा करतील आणि पोहोचतील,यामध्ये प्रेरणाचे कोणतीच गोष्ट नाही.ज्या मुलांना बाबांची पूर्णपणे ओळख नाही,पूर्ण निश्चय नाही तर त्यांच्या बुद्धीमध्ये आठवण थांबू शकत नाही. आम्हाला कोण शिकवत आहेत,ते जाणत नाही तर आठवण कोणाची करतील?बाबाच्या आठवणी द्वारे तुमचे विकर्म विनाश होतील.जे जन्म जन्मांतर लिंगाची आठवण करत आले,ते समजतात हेच परमात्मा आहेत,हेच त्यांचे चिन्ह आहे.ते निराकार आहेत,साकार नाहीत.बाबा म्हणतात मला पण प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो.नाहीतर तुम्हाला सृष्टीच्या चक्राचे रहस्य कसे समजावून सांगेल?हे आत्मिक ज्ञान आहे.आत्म्याचे ज्ञान मिळते.आत्म्यालाच हे ज्ञान मिळते. बाबाच देऊ शकतात.पुनर्जन्म तर घ्यायचा आहे.सर्व अभिनेत्यांना भूमिका मिळाली आहे.निर्वाणधाम मध्ये कोणी जाऊ शकत नाही.मोक्ष मिळू शकत नाही.जे क्रमांक एक, विश्वाचे मालक बनतात,ते८४ जन्मांमध्ये येतात.चक्र जरूर लावायचे आहे.मनुष्य समजतात मोक्ष मिळतो.अनेक मत-मतांतर आहेत, वृद्धी होत राहते,परत कोणीही जाऊ शकत नाही.बाबाच ८४ जन्माची कहाणी सांगतात.तुम्हा मुलांना राजयोग शिकवून परत शिकवायचा आहे.हे आत्मिक ज्ञान तुमच्या शिवाय दुसरे कोणी देऊ शकत नाही.न शूद्र,ना देवता देऊ शकतात. सतयुगामध्ये दुर्गती होत नाही,जे ज्ञान मिळेल.हे ज्ञान सद्गती साठीच आहे. सदगतीदाता,मुक्तीदाता मार्गदर्शक एकच आहेत.आठवणीच्या यात्रे शिवाय कोणीही पवित्र बनू शकत नाही.सजा जरूर खावी लागेल आणि पद पण भ्रष्ट होईल.सर्वांचा कर्मभोग चुकत होणार आहे.तुम्हाला तुमच्याच गोष्टी समजावल्या जातात,बाकी धर्मामध्ये जायची काय आवश्यकता आहे?भारतवासींनाच हे ज्ञान मिळते. बाबा भारतामध्ये येऊन तीन धर्म स्थापन करतात.आता तुम्हाला शुद्र धर्मा मधून काढून उच्च कुळामध्ये घेऊन जातात.ते नीच पतित कुळ आहे.आता पावन बनवण्यासाठी तुम्ही ब्राह्मण निमित्त बनले आहात.याला रुद्र ज्ञानयज्ञ म्हटले जाते.रुद्र शिवबाबांनी यज्ञ स्थापन केला आहे.यज्ञामध्ये साऱ्या जुन्या दुनियाची आहूती पडणार आहे,परत नवीन दुनिये ची स्थापना होईल.जुनी दुनिया नष्ट होईल.तुम्ही हे ज्ञान नवीन दुनिये मध्ये जाण्यासाठी घेतात. देवतांची सावली पण जुन्या दुनिये मध्ये पडत नाही.तुम्ही मुलं जाणता कल्प पूर्वी,जे आले असतील,तेच हे ज्ञान घेतील.क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे शिक्षण घेत राहतील.मनुष्य येथेच शांतीची इच्छा करतात.आत्मा तर शांतीधाम ची राहणारी आहे,बाकी येथे शांती कशी होऊ शकते.यावेळेत घराघरांमध्ये अशांती आहे. रावणा चे राज्य आहे ना.सतयुगा मध्ये शांतीचे राज्य असते.एक धर्म,एक भाषा असते,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या जुन्या दुनियेपासून बेहद्द चे वैरागी बनून,आपल्या देहाला विसरून, शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे.निश्चय बुद्धी बनून आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे.आम्हीच देवता होतो,आम्ही आत्माच परत देवता बनतो.

(२) हम-सो, सो-हम च्या मंत्राला अर्थसाहित समजून,आता ब्राह्मण पासून देवता बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. सर्वांना खरा अर्थ समजावयाचा आहे.

वरदान:-
तीन सेवेच्या संतुलना द्वारे सर्व गुणांची अनुभूती करणारेगुणमूर्त भव.

जे मुलं संकल्प बोल आणि प्रत्येक कर्मा द्वारे सेवेमध्ये तत्पर राहतात, तेच सफलता मूर्त बनतात.तिघांचे गुण समान आहेत,सर्व दिवसांमध्ये तिन्ही,सेवेचे संतुलन असेल तर, चांगल्या गुणाने पास होऊन गुण मूर्त बनतात.त्यांच्याद्वारे सर्व गुणांचा शृंगार स्पष्ट दिसून येतो.एक दुसऱ्यांना बाबांच्या गुणांचा किंवा स्वतःच्या धारणेच्या गुणांचा सहयोग देणेच गुणमूर्त बनणे आहे,कारण गुणदान सर्वात मोठे दान आहे.

बोधवाक्य:-
निश्चय रूपी पाया पक्का आहे,तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव स्वतः होत राहतो.