03-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आपसामध्ये एक दोघांना बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा इशारा देत, सावधान करत प्रगती करत राहा"

प्रश्न:-
बाप समान ज्ञानसंपन्न बनणाऱ्या मुलांच्या जीवनाची मुख्य लक्षणं कोणती आहेत?

उत्तर:-
ते नेहमी आनंदी राहतील,ते कोणत्याही गोष्टी मध्ये रडणार नाहीत म्हणजे नाराज होणार नाहीत. काही झाले तरीही,हे नविन काहीच नाही.असे जे आत्ता ज्ञानसंपन्न बनतात म्हणजे कधीच रडत नाहीत, ते कधीच कोणत्याही गोष्टीमुळे अशांत होत नाहीत,त्यांनाच स्वर्गाची बादशाही मिळते.जे नेहमीच रडत राहतात, ते आपले उच्च पद गमावून बसतात.

गीत:-
तुम्हे पाके हमने जहां पा लिया है..

ओम शांती।
गोड गोड मलांनी आपलेच गायन केलेले गीत ऐकले.मुलं जाणतात,आम्ही बेहद्द बाबाच्या समोर बसलो आहोत.तर मुलं म्हणतात बाबा,आपल्याकडून जी विश्वाची बादशाही मिळाली होती,तीच परत एकदा मिळवत आहोत.सतयुगा मध्ये गायन करत नाहीत.हे संगम वरतीच तुम्ही गायन करू शकता.घरामध्ये बसून किंवा नोकरी करत तुम्ही जाणू शकता, आम्ही बेहद्दच्या बाबा पासून बेहद्दचा वारसा घेत आहोत.सेवाकेंद्रा वरती पण सावधानी मिळते की, बाबांना आठवण करा आणि आम्ही विश्वाचे मालक बनत आहात, हे आठवणी ठेवा.ही कोणती नवीन गोष्ट नाही, आम्ही कल्प-कल्प बाबा पासून विश्वाची बादशाही घेत आलो आहोत.नवीन कोणी असतील तर समजतील,हे यांना (ब्रह्माला) शिव बाबा म्हणतात.आता ते तर निराकार आत्म्याचे पिता आहेत.आत्मा निराकार आहे,तर परमात्मा पिता पण निराकरण आहेत.आत्म्याला निराकार तेव्हाच म्हणू शकतो,जेव्हा जोपर्यंत साकार रुप घेतले नाही.तर मुलांनी जाणले आहे,आम्ही बेहद्दच्या बाबा कडून हे ज्ञान ऐकत आहोत. आत्मिक शिक्षक एक दोघांना सावधानी देण्यासाठी शिकवत आहेत.प्रथम ही आत्मिक सावधानी मिळते.बेहद्दच्या बाबांची सर्व आठवण करत राहतात आणि इशारा देतात,बाबांच्या आठवणी मध्ये राहा आणि कुठे बुद्धी जायला नको, म्हणून म्हटले जाते आत्म अभिमानी भव आणि पित्याची आठवण करा. ते पतित पावन पिता आहेत.आता ते समोर बसून म्हणतात,माझी आठवण करा,खूप सहज युक्ती आहे.मनमनाभव अक्षर पण आहे, परंतु जेव्हा कोणी समजतील. आठवणीची यात्रा शिकवणारे एकच शिव बाबा आहेत,त्यामुळे मुलं जाणतात आम्ही आत्मिक यात्रेवरती आहोत.ती शारीरिक यात्रा आहे, आत्ता आम्ही शारीरिक यात्री नाहीत. आम्ही आत्मिक यात्री आहोत.या आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील,दुसरा कोणता उपाय नाही, जे तुम्ही विकर्माजीत बनाल.एक आहे विकार्माजीत संवत,दुसरे आहे विकर्म संवत,परत विकर्म सुरू होतात, रावण राज्य सुरू झाले आणि विकर्म सुरू झाले.आता तुम्ही विकर्माजीत बनण्याचा पुरुषार्थ करतात.तेथे कोणतेही विकार नसतात,तेथे रावणच नसतो.हे दुनियेमध्ये कोणी जाणत नाहीत. तुम्ही बाबा द्वारा सर्व काही जाणले आहे.बाबांना ज्ञान संपन्न म्हटले जाते,तर मुलांनाच ज्ञान देतील ना. ईश्वरीय पित्याचे नाव पण पाहिजे,ते नावा रूपापेक्षा वेगळे थोडेच आहेत. पूजा करतात,त्यांचे नाव शिव आहे. ते पतित पावन शिव आहेत.आत्माच आठवण करते,त्या परमपिता परमात्माची,महिमा करतात ते सुख शांतीचे सागर आहेत.बाबा तर जरूर मुलांनाच वारसा देतील.जे होऊन जातात,त्यांचे स्मृतिस्थळ बनवतात. एकच बाबा आहेत,ज्यांचे गायन होते आणि पूजा पण होते,जरूर ते शरीरा द्वारा कर्तव्य करतात,तेव्हा तर त्यांचे गायन आहे.ते सदा पवित्र आहेत, बाबा कधीच पुजारी बनत नाहीत.ते सदैव पुज्य आहेत.बाबा म्हणतात, मी कधी पुजारी बनत नाहीत.मी पुजला जातो.पुजारी लोक माझी पूजा करतात.सतयुगामध्ये तर माझी पूजा करत नाहीत.भक्तिमार्ग मध्ये मज पतितपावन पित्याची आठवण करतात.प्रथम अव्यभिचारी भक्ती एकाची होते, परत व्यभिचारी, अनेकांची भक्ती होते.ब्रह्मा-सरस्वती ला पण बाबा विश्वाचे मालक बनवतात.भक्तीचा खूप विस्तार आहे.बीजाचा काहीच विस्तार नाही. बाबा म्हणतात,माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा बस. जसे झाडाचा विस्तार असतो, तसेच भक्तीचा पण खूप विस्तार आहे. ज्ञान बीज आहे.जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळते,तर सद्गती होते.तुम्हाला काही त्रास होत नाही.ज्ञान आणि भक्ती आहे ना.सतयुग त्रेतामध्ये भक्तीचे झाड नसते.अर्धाकल्प भक्तीचे झाड चालते.सर्व धर्माचे आपापले रिती-रिवाज आहेत.भक्तीचा तर खूप विस्तार आहे.ज्ञानासाठी तर बस मनमनाभव आहे.अल्लाहची आठवण करा.बाबा ची आठवण कराल तर जरूर वारशाची आठवण येईल.वारशाचा विस्तार होतो ना,ती हद्दची मिळकत आहे.येथे तुम्हाला बेहद्दच्या मिळकतीची आठवण येते.बेहद्दचे बाबा,येऊन बेहद्दचा वारसा भारतवासींसाठी देतात.त्यांच्या जन्माचे गायन पण येथेच केले जाते. ही पण या नियोजित नाटकांमध्ये नोंद आहे.जसे भगवान उच्च ते उच्च आहेत,तसेच भारतखंड पण उच्च ते उच्च आहे,जेथे बेहद्दचे पिता येऊन संपूर्ण दुनियाची सद्गती करतात.तर हे सर्वात मोठे तीर्थ झाले ना.असे म्हणतात,हे ईश्वरीय पिता आम्हाला आपल्या घरी घेऊन चला.भारताशी सर्वांचे प्रेम आहे ना.बाबा पण भारतामध्ये येतात.आता तुम्ही कष्ट करत आहात.गोपी वल्लभचे गोप-गोपी तुम्ही आहात.सतयुगामध्ये गोप-गोपी ची गोष्ट नसते.तेथे तर कायद्यानुसार राजाई चालते.चरित्र कृष्णाचे नाहीत,तर चरित्र एका शिव पित्याचे आहेत.त्यांचे चरित्र खूप श्रेष्ठ आहे.सर्व पतित सृष्टीला पावन बनवतात.ही खूप मोठी चतुराई आहे.या वेळेत सर्व मनुष्यमात्र अजामील सारखे पापी आहेत.मनुष्य समजतात,ते साधू, इत्यादी श्रेष्ठाचारी आहेत,परंतू त्यांचा पण उद्धार मलाच करावं लागतो.जसे तुम्ही कलाकार आहात,बाबा पण कलाकार आहेत ना.तुम्ही ८४ जन्म घेऊन भूमिका वठवतात,ते पण मुख्य रचनाकार,निर्माता,मुख्य कलाकार आहेत,कारण कर्ता-करविता आहेत ना.काय करतात? पतितांना पावन बनवतात. बाबा म्हणतात,तुम्ही मला बोलवतात, येऊन आम्हाला पावन बनवा.मी पण या भूमिकेशी बांधलेला आहे.असे कोणी म्हणू शकत नाही की,हे नाटक का बनले? कधी बनले?हे तर पूर्वनियोजित नाटक आहे,याचा आदी मध्य अंत नाही,प्रलय होत नाही.आत्मा अविनाशी आहे, कधी विनाश होऊ शकत नाही.यांना भूमिका पण अविनाशी मिळालेली आहे.हे बेहद्दचे नाटक आहे ना.थोडक्या मध्ये बाबाच समोर बसून हे ज्ञान देतात की,या वैश्विक नाटकाची भूमिका कशी चालते.बाकी असे नाही की परमात्मा मृत व्यक्तीला जिवंत करू शकतात, ही तर अंधश्रद्धा आहे.रिद्धी सिद्धी असणाऱ्या गोष्टी येथे नाहीत.मला बोलवतातच पतित-पावन या,येऊन आम्हाला पतिता पासून पावन बनवा,तर बरोबर येतात.गीता सर्व शास्त्र शिरोमणी आहे. भगवंतानेच गीता ज्ञान ऐकवले आहे.अच्छा, सहज राजयोग कधी शिकवला? हे पण तुम्हीच जाणतात,बाबा कल्पाच्या संगम युगामध्ये येतात, तेव्हा येऊन पावन दुनिया,नवीन राजधानी स्थापन करतात.सतयुगा मध्ये तर स्थापन करणार नाहीत ना. ती तर आहेच पावन दुनिया. कल्पाच्या संगम युगामध्येच कुंभ मेळा भरतो.तो मेळा तर बारा वर्षानंतर भरतो.येथे मोठा कुंभाचा मेळा,प्रत्येक पाच हजार वर्षानंतर भरतो,आत्मा आणि परमात्माचा मेळा.जेव्हा परमपिता परमात्मा येऊन सर्व आत्म्यांना पावन बनवून घेऊन जातात.कल्पाचा कालावधी जास्त दाखवल्यामुळे,मनुष्य गोंधळून गेले आहेत,आता तुम्ही समजता. तुमचे मासिक जे निघते,ते पण तुम्ही मुलंच समजू शकता,दुसरे कोणी समजू शकणार नाहीत.बाबांनी म्हटले होते,तुम्ही लिहा,जे काही झाले ते,५००० वर्षापूर्वी सारखेच झाले,यामध्ये नवीन कोणतीच गोष्ट नाही.जे ५००० वर्षांपूर्वी झाले, त्याचीच पुनरावृत्ती आत्ता होत आहे. कोणालाही समजावून घ्यायचे असेल तर,येऊन समजू शकतात.अशी युक्ति करावी लागेल,आम्ही वर्तमान पेपर मध्ये काय लिहावे,हे तुम्ही विचार सागर मंथन करू शकता.हे पण तुम्ही लिहू शकता की,ही महाभारताची लढाई कशाप्रकारे पावन दुनियेचे गेट उघडते.सतयुगाची स्थापना कल्पा पूर्वीसारखी कशी होत आहे? कसे देवी-देवतांची राजधानी स्थापन होत आहे? येऊन समजून घ्या,ईश्वरीय पित्याकडून जन्मसिद्ध अधिकार घ्यायचा असेल तर येऊन घेऊ शकतात.अशा प्रकारे विचार सागर मंथन करायला पाहिजे.ते लोक नाटकाच्या गोष्टी इत्यादी बनवतात,याची पण पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद आहे,ज्याची भूमिका वठवतात. व्यासने पण पूर्वनियोजित नाटका नुसार ग्रंथ इत्यादी बनवले आहेत.भूमिकाच तशी मिळालेले आहे.आता तुम्ही वैश्विक नाटकाला समजले आहे.परत त्याच नाटकाची पुनरावृत्ती होत राहते.तुम्ही परत ज्ञान ऐकण्यासाठी आले आहात.तुम्ही जाणतात परत लक्ष्मीनारायणचे राज्य असेल.बाकी सर्व धर्म नष्ट होतील.आता तुम्ही ज्ञानसंपन्न बनत आहात.बाबा तुम्हालाआपल्यासारखे ज्ञानसंपन्न बनवत आहेत.तुम्ही जाणता आम्ही अर्धा कल्प शांती मध्ये राहू. कोणत्याही प्रकारची अशांती राहत नाही.तेथे मुलं इत्यादी रडत नाहीत,नेहमी हसत राहतात.येथे तुम्हाला रडायचे नाही. गायन पण आहे मातेचा मृत्यु झाला तरी तुम्ही ज्ञानामृत घेत राहा.रडालं तर आपलेच पद भ्रष्ट होईल.तुम्हाला तर पतिचा पती मिळाला आहे.जे स्वर्गाची बादशाही देतात,ते तर कधीच मरत नाहीत,परत रडण्याची काय आवश्यकता आहे.जे रडत नाहीत तेच बादशाही घेतात,बाकी तर सर्व प्रजा मध्ये चालले जातात. बाबांना जर कोणी विचारतील, या परिस्थितीमध्ये आमचा मृत्यू झाला, तर आम्ही काय बनू?मुलांना अंत काळामध्ये सर्व साक्षात्कार होतील. जसे शाळेमध्ये सर्वांना माहीत होते ना.रुद्र माळ कोणती बनते,ते अंत काळामध्ये तुम्हाला माहिती होईल. जेव्हा अंतकाळाचे दिवस असतात, तर खूप पुरुषार्थ करतात.ते समजतात,आम्ही अमक्या विषयांमध्ये नापास होऊ.तुम्हाला पण माहिती होईल.अनेक जण म्हणतात आमचा मुलांमध्ये मोह आहे, तो काढून टाकावा लागेल.एक शिवबाबा मध्ये मोह ठेवायचा आहे, बाकी विश्वस्त होऊन सांभाळायचे आहे.असे म्हणतात ना हे सर्वकाही ईश्वराने ने दिले आहे,परत विश्वस्त बनून सांभाळ करायचा आहे.ममत्त्व काढून टाका.बाबा स्वतः म्हणतात यांच्या मधून ममत्व काढून टाका. समजा हे सर्व त्यांचे आहे,त्यांच्या मतावर चाला.त्यांच्या कार्यामध्येच तत्पर राहा.अविनाश ज्ञान रत्नाचे दान करत राहा.बाबांना कन्यांसाठी सर्वात जास्त आदर सन्मान आहे. कन्या कर्म बंधनापासून मुक्त असतात.मुलांना तर पित्याच्या वारशाचा नशा राहतो.कन्याला लौकिक पित्याच्या वारसा मिळत नाही.या पित्याजवळ तर स्त्री- पुरुष असा भेदभाव नाही.बाबा आत्म्यांना समोर बसून समजवतात.तुम्ही जाणता आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत.बाबा पासून वारसा घेत आहोत.आत्माच शिकते,बाबा पासून वारसा घेते.जितका जास्ती वारसा घ्याल,तेवढे उच्चपद मिळेल.बाबा येऊन सर्व गोष्टी समजवतात. शिवबाबा निराकार आहेत,त्यांची पूजा करतात.सोमनाथचे मंदिर पण बनवले आहे. हे पण तुम्ही जाणता शिव बाबांनी येऊन काय केले? का त्यांचे स्मृतिस्थळ मंदिर बनवले आहेत? हे पण तुम्ही समजता,कल्प- कल्प असेच होईल.या अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे,त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.बाबांना यायचेच आहे,जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे.कोणत्याही दुःखाची गोष्ट नाही. येथे तर कारण नसताना खून होतात. नाहीतर कोणी कोणाचा खून करतात,तर त्याला फाशीची सजा मिळते.आता कोणाला पकडणार,या नैसर्गिक आपत्ती होणारच आहेत, विनाश होणार आहे.अमरलोक, मृत्युलोकचा अर्थ पण कोणी जाणत नाहीत.तुम्ही जाणतात,आज आम्ही मृत्युलोक मध्ये आहोत,उद्या अमर लोक मध्ये असू,यासाठी आम्ही शिकत आहोत.मनुष्य अगदी अज्ञान अंधारात आहेत.तुम्ही ज्ञानामृत पाजत आहात.होय- होय करून परत अज्ञान निद्रेमध्ये झोपतात. ऐकतात पण,बेहद्दचे बाबा वारसा देत आहेत,ही तीच महाभारत लढाई आहे,ज्याद्वारे स्वर्गाचे गेट उघडते. असा अभिप्राय पण देतात,हे ज्ञान पण खूप चांगले आहे,असे ज्ञान कोणी देऊ शकत नाही.आम्ही मानतो,बस स्वतः काहीच ज्ञान घेत नाहीत परत झोपून जातात,यालाच म्हटले जाते कुंभकर्ण.तुम्ही म्हणू शकता की,अभिप्राय तर दिला,परंतु असे नाही परत घरी गेल्यानंतर अज्ञान निद्रेमध्ये झोपुन जावा. कुंभकर्णाच्या चित्रा पुढे घेऊन जायला पाहिजे,यांच्यासारखे तुम्ही झोपू नका.ज्ञान समजून सांगण्याची खूप युक्ती पाहिजे.बाबा म्हणतात मुलांनो,आपल्या दुकानांमध्ये पण मुख्य मुख्य चित्र लावा,जे कोणी येईल त्यांना समजून सांगा. त्यांच्याशी हा पण सौदा करा,हा खरा सौदा आहे.यामुळे तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकता,यामध्ये लज्जेची कोणतीच गोष्ट नाही.काही जण म्हणतात, ब्रह्माकुमार बनला आहात,बोला अरे प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी तर तुम्ही पण आहात.बाबा नवीन सृष्टी ची स्थापना करत आहेत,जुन्या दुनियेला आग लागणार आहे.तुम्ही जोपर्यंत ब्रह्माकुमार कुमारी बनले नाहीत,तोपर्यंत स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत.अशा प्रकारे दुकानांमध्ये सेवा करा,तर खूप बेहद्दची सेवा होईल.आपसा मध्ये चर्चा करा,दुकान लहान आहे,तर भिंतीवरती चित्र लावू शकतात. स्वतःच्या घरा पासून सुरू करा,प्रथम त्यांचे कल्याण कल्याण करायचे आहे.बाबा म्हणतात,आत्ता कोणत्याही देहधारीची आठवण करू नका.शिवबाबाची आठवण करा, ज्याद्वारे वारसा मिळतो,म्हणून तर बिचारे गोंधळून गेले आहेत,त्यांना सांगा दैवी दुनिया स्थापन होत आहे, नरा पासून नारायण बनायचे असेल तर,येऊन हे ज्ञान घ्या,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) एक बाबा मध्येच शुद्ध मोह ठेवायचा आहे,त्यांचीच आठवण करायची आहे. देहधारीपासून ममत्व काढून टाकायचे आहे.विश्वस्त बनून सांभाळ करायचा आहे.

(२) विकर्माजीत बनायचे आहे, म्हणून कर्मेंद्रिया द्वारे कोणतेही विकर्म व्हायला नको,याचे खूप खूप ध्यान ठेवा.

वरदान:-
साक्षीपणाच्या आसना द्वारे त्रास,दु:ख शब्दाला समाप्त करणारे मास्टर त्रिकालदर्शी भव.

या अविनाशी नाटकामध्ये जे काय होते,त्यामध्ये कल्याण आहे म्हणून का? कसे? हे प्रश्न समजदार मुलांच्या मनामध्ये येऊ शकत नाहीत.नुकसान मध्ये पण कल्याण सामावले आहे.बाबांचा हात आणि सोबत आहे,म्हणून अकल्याण होऊ शकत नाही.असे आनंदाच्या आसनामध्ये स्थिर राहा,तर कधीच दु:खी होणार नाहीत.साक्षी पणाची स्थिती,त्रास,दुःख शब्दाला नष्ट करते म्हणून ते त्रिकालदर्शी बनून प्रतिज्ञा करा की,न दु:खी होऊ,ना दुःखी करू.

बोधवाक्य:-
आपल्या सर्व कर्मेंद्रियांना आदेशाप्रमाणे चालवणे च स्वराज्य अधिकारी बनणे आहे.