03-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आत्मा रुपी बॅटरी ८४ मोटारी मध्ये गेल्यामुळे,शक्तीहीन झाली आहे,आता बॅटरीला आठवणीच्या यात्रे द्वारे शक्तीशाली बनवा"

प्रश्न:-
बाबा कोणत्या मुलांना खूप खूप भाग्यशाली समजतात?

उत्तर:-
ज्यांच्याजवळ कोणतीही झंझट नाही,जे निर्बंध आहेत,अशा मुलांना बाबा म्हणतात, तुम्ही खुप खुप भाग्यशाली आहात.तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये राहून आपली बॅटरी फुल चार्ज करू शकता.जर योग नाही फक्त ज्ञान ऐकवतात,तर त्यांचा बाण लागू शकत नाही.कोणी कितीही दिखावा करून आपला अनुभव ऐकवतील परंतु स्वतः मध्ये धारणा होत नाही,तर मन खात राहील.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजावत आहेत.आत्मिक पित्याचे नाव काय आहे? शिवबाबा,तेच भगवान आहेत,बेहद्द चे पिता आहेत. मनुष्याला बेहद्द चे पिता, ईश्वर किंवा भगवान म्हटले जात नाही.जरी अनेकांचे नाव शिव आहेत,परंतु ते सर्व देहधारी आहेत,म्हणून त्यांना भगवान म्हणू शकत नाही.हे बाबाच सन्मुख मुलांना समजवतात.मी ज्यांच्या मध्ये प्रवेश केला आहे,त्यांच्या अनेक जन्माच्या अंतचा हा जन्म आहे. तुम्हा मुलांना कोणी विचारतात,तुम्ही यांना भगवान का म्हणतात?बाबा अगोदरच समजवतात,कोणत्याही स्थूल किंवा सूक्ष्म देहधारीला भगवान म्हणू शकत नाही.सूक्ष्म देहधारी तर सूक्ष्मवतन वासी आहेत,त्यांना देवता म्हणू शकतो.उच्च ते उच्च भगवानच आहेत,तेच परमपिता आहेत.त्यांचे उच्च ते उच्च नाव आहे, उच्च ते उच्च गाव आहे.बाबा सर्व आत्म्यासहीत तेथे निवास करतात, त्यांची बैठक पण उंच आहे. वास्तव मध्ये कोणती बसण्याची जागा नाही.जसे तारे कुठे बसले आहेत का? उभे आहेत ना.तुम्ही आत्मे पण आपल्या शक्तीद्वारे तेथे उभे राहतात.शक्ती अशी मिळाले आहे,जे तिथे राहून उभे राहतात.बाबांचे नावच सर्वशक्तीमान आहे,त्यांच्याद्वारे शक्ती मिळते.आत्मा त्यांची आठवण करते.आत्मा आठवण करते,बॅटरी चार्ज होत जाते.जसे मोटारी मध्ये बॅटरी असते ना, त्या शक्तीनेच मोटर चालते.बॅटरी मध्ये करंट भरलेला असेल,परत चालत चालत खाली होत जाते, परत बॅटरी मेन पावर हाऊसशी जोडून, चार्ज करून मोटारी मध्ये घालतात. त्या सर्व हद्दच्या गोष्टी आहेत,या बेहद्दच्या गोष्टी आहेत.तुमची बॅटरी तर पाच हजार वर्षे चालत राहते.चालता चालता परत कमजोर होते.माहिती पडत जाते,एकदम नष्ट होत नाही,काही ना काही शक्ती राहते.जसे टॉर्च,बॅटरी मंद होते ना.आत्मा तर या शरीराची बॅटरी आहे.ही पण डल होत जाते. बॅटरी शरीरा मधून निघते,परत दुसरी,परत तिसऱ्या मोटारीमध्ये जाऊन पडते.८४ मोटारी मध्ये जावे लागते,तर आत्ता बाबा म्हणतात, तुम्ही खूपच बुध्दू बनले आहात. आता परत आपल्या बॅटरीला चार्ज करा.बाबांच्या आठवणी शिवाय आत्मा कधीच पवित्र बनू शकत नाही.एकच सर्वशक्तिमान बाबा आहेत,त्यांच्याशी योग लावायचा आहे.बाबा स्वत: आपला परिचय देतात की,मी कोण आहे? कशामुळे तुमच्या आत्म्याची बॅटरी शक्तीहीन होते.आता तुम्हाला मत देतो की, माझी आठवण करा,तर बॅटरी सतोप्रधान शक्तिशाली बनेल.

पवित्र बनल्यामुळे आत्मा 24 कॅरेट बनते.आत्ता तर शक्ती बिलकुलच नष्ट झाली आहे.ती शोभा राहत नाही.आत्ता बाबा तुम्हा मुलांना समजवतात मुलांनो,मुख्य गोष्ट आहे योगा मध्ये राहणे,पवित्र राहणे.नाहीतर बॅटरी चार्ज कशी होईल.योग लागणार नाही.जरी कुक्कड ज्ञानी खूप आहेत,जरी ज्ञान देतात परंतु ती अवस्था राहत नाही. खूप चांगल्या प्रकारे अनुभव ऐकवतात परंतु मन खात राहते.मी जे वर्णन करतो,तशी अवस्था तर नाही.काही परत योगी तू आत्मा पण आहेत. बाबा तर मुलांची खूप महिमा करतात. बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही खूप भाग्यशाली आहात.तुम्हाला तर एवढी बंधन नाहीत,ज्यांना जास्त मुलं असतात,त्यांना खूप बधंन असतात.बाबांना तर अनेक मुलं आहेत.सर्वांचे पालन पोषण करावे लागते.बाबांची पण आठवण करायची आहे.साजनाची आठवण तर, बिलकुल पक्की असायला हवी.भक्तिमार्गा मध्ये तुम्ही बाबांची किती आठवण करत आले आहात,हे भगवान,पूजा पण प्रथम त्यांची करत आले.प्रथम निराकार भगवान ची पूजा करतात.असे नाही की त्या वेळेत तुम्ही आत्माभिमानी बनतात.आत्म अभिमानी पूजा थोडीच करतील.

बाबा समजवतात प्रथम भक्ती सुरू होते,तर प्रथम एक शिवपित्याची पूजा करतात. राजा-राणी तथा प्रजा सर्व एका शिवाची पूजा करतात.उच्च ते उच्च भगवानच आहेत,त्यांचीच आठवण करायची आहे.दुसरे सर्व खालच्या दर्जाचे आहेत.ब्रह्मा-विष्णू-शंकराची पण आठवण करण्याची आवश्यकता नाही.बाबांची आठवण करायची आहे. हे नाटक कसे आहे,जे तुम्ही खाली उतरण्यासाठी बांधलेले आहात.बाबा समजवतात तुम्ही खाली कसे उतरतात.प्रत्येक गोष्ट आदी पासून अंत पर्यंत बाबा समजवतात.भक्ती पण प्रथम सतोप्रधान परत सतो-रजो-तमो होते.आता तुम्ही परत सतोप्रधान बनत आहात,यामध्येच कष्ट आहेत. पवित्र बनायचे आहे.स्वतःला तपासयाचे आहे? माया कुठे धोका तर देत नाही ना? माझी दृष्टी विकारी तर बनत नाही ना? कोणते पाप कर्माचे विचार तर येत नाहीत ना? गायन पण आहे,प्रजापिता ब्रह्मा तर,त्यांची संतान ब्राह्मण ब्राह्मणी भाऊ-बहीण झाले ना. येथील ब्राह्मण लोक पण स्वतःला ब्रह्माची संतान म्हणतात.तुम्ही पण ब्राह्मण भाऊ-बहीण झाले ना, परत विकारी दृष्टी का ठेवतात? ब्राह्मणाला तुम्ही चांगली दृष्टी देऊ शकता.आता तुम्ही मुलं जाणता, ब्रह्माची संतान ब्राह्मण ब्राह्मणी बणून परत देवता बनतो.असे म्हणतात पण,बाबा येऊन ब्राह्मण, देवी-देवता धर्माची स्थापना करतात.ही समजून घेण्याची गोष्ट आहे.आम्ही ब्रह्माचे संतान भाऊ-बहीण झालो,तर कधीच कुदृष्टी जायला नको.विकारी दृष्टी बदलायची आहे.ही पण आमची बहिण आहे,तो स्नेह राहायला पाहिजे.जसे रक्ताच्या नात्यांमध्ये स्नेह राहतो,ती बदलून आत्मिक दृष्टी बनायला हवी.यामध्येच खूप कष्ट आहेत.आहे पण सहज आठवण.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. विकाराची दृष्टी ठेवू शकत नाही. बाबांनी समजावले आहे,हे डोळे खूप धोका देणारे आहेत,त्यांना बदलायचे आहे.आम्ही आत्मा आहोत.आता तर आम्ही शिव बाबांची मुल आहोत,दत्तक घेतलेले भाऊ-बहीण आहोत.आम्ही स्वतःला ब्रह्मकुमार कुमारी म्हणतो, चलन मध्ये फरक तर राहतो ना. शिक्षकाचे काम आहे वर्गांमध्ये विचारणे,तुम्ही समजता आमची भाऊ-बहिणीची दृष्टी राहते की, काही चंचलता होते.खऱ्या पित्या पुढे खरे सांगितले नाही,खोटे बोलले तर खूप दंड पडतो.कोर्टामध्ये शपथ घेतात ना,खऱ्या ईश्वर पित्यापुढे खरे बोलू.खऱ्या पित्याचा मुलगा पण खरा असेल ना.बाबा सत्य आहेत ना.ते सत्यच सांगतात,बाकी सर्व थापा आहेत.स्वता:ला श्री-श्री १०८ म्हणतात,वास्तव मध्ये ही तर माळ आहे,ज्याचा जप करतात.हे पण जाणत नाहीत की,आम्ही का जप करतो.बौध्दीची माळ, ख्रिश्चनांची पण माळ असते,प्रत्येक जण आपापल्या रिती रिवाजा प्रमाणे जप करतात.तुम्हा मुलांना तर आत्ता ज्ञान मिळाले आहे,तुम्ही सांगा माळेमध्ये वरती फुल निराकार चे आहे. त्यांचीच सर्व आठवण करतात,त्यांच्या आठवणी द्वारे आम्ही स्वर्गाची पटराणी म्हणजे महाराणी बनत आहोत.नरा पासून नारायण,नारी पासून लक्ष्मी बनणे,हे आहे सूर्यवंशी मखमलची राणी बनणे,परत खादीची पण असते.तर अशा ज्ञानाच्या गोष्टी बुद्धीमध्ये ठेवून समजावयाला पाहिजे.परत तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल. ज्ञानाच्या गोष्टी करण्यामध्ये वाघीणी सारखे बना.तुम्ही शिवशक्ती सेना आहात.सेना पण अनेक प्रकारच्या असतात ना.तेथे पण जाऊन तुम्ही पहा,काय शिकवत आहेत.लाखो मनुष्य जातात.बाबानी समजावले आहे, विकारी दृष्टी खूप झोका देणारी आहे.स्वतःच्या अवस्थेचे वर्णन करायला पाहिजे,अनुभव ऐकवायला पाहिजे,आम्ही घरामध्ये कसे राहतो.स्थिती वरती कसा फरक पडतो. तुम्ही नोंद ठेवा,या अवस्थेमध्ये किती वेळ राहतो.बाबा समजवतात,पहिलवानाशी माया पण,पहिलवान होऊन युद्ध करते.हे युद्धाचे मैदान आहे ना.माया खूप बलवान आहे.माया म्हणजे पाच विकार, धनाला संपत्ती म्हटले जाते.ज्यांच्याजवळ जास्त संपत्ती असते,तर अजमिल पण ते जास्त बनतात.

बाबा म्हणतात प्रथम तुम्ही वेश्यांना वाचवा.ते परत आपली संस्था बनवतील.आम्हाला तर बाबा पासून वारसा घ्यायचा आहे.बाबा म्हणतात मी तुम्हाला शिवालयाचे मालक बनवण्यासाठी आलो आहे.हा अंतिम जन्म आहे.वेश्यांना समजावयाचे आहे की,तुमच्या नावामुळे भारताची इतकी इज्जत गेली आहे.आता बाबा शिवालय मध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत.आम्ही श्रीमतानुसार तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलो आहोत. आता तुम्ही पण विश्वाचे मालक बना.भारताचे नाव प्रसिद्ध करा.आम्ही पण बाबांची आठवण केल्यामुळे पवित्र बनत आहोत. तुम्हीपण या एका जन्मांमध्ये हे खराब काम सोडून दया.सेवा तर करायची आहे ना,परत तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल.असे म्हणतील यांच्यामध्ये खूप शक्ती आहे,जे अशा खराब धंद्या पासून सोडवले. सर्वांच्या संस्था असतात ना.तुम्ही आपली संस्था बनवून शासना कडून जी पाहिजे,ती मदत घेऊ शकता.तर असे जे खराब आहेत, ज्यांनी भारताचे नाव बदनाम केले आहे,त्यांची सेवा करा.तुमची पण संस्था पाहिजे,जे दहा-बारा जणांनी मिळून समजवले पाहिजे.माता पण चांगल्या हवेत.कोणी नवीन युगल पण हवेत.तुम्ही सांगा आम्ही पण पवित्र राहतो,पवित्र राहिल्यामुळे विश्वाचे मालक बनतो,तर का नाही पवित्र बनणार.अनेक जणांनी जाऊन समजावयाला हवे.खूप नम्रताने गोष्टी करायच्या आहेत. आम्ही आपल्याला परमपिताचा संदेश देण्यासाठी आलो आहोत. आता विनाश समोर उभा आहे. बाबा म्हणतात,मी सर्वांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे.तुम्ही पण हा एक जन्म,विकारांमध्ये जाऊ नका.तुम्ही समजावू शकता,आम्ही ब्रह्मकुमार कुमारी आपल्याच तन-मन-धनाने द्वारे,सेवा करत आहोत.आम्ही भीक मागत नाही, ईश्वराची मुलं आहोत.असे नियोजन करा,असे नाही की तुम्ही मदत करू शकत नाहीत.असे काम करा ज्यामुळे वाह-वाह होईल.हजारो मदत देणारे पुढे येतील.असे आपले संघटन बनवा. मुख्य आत्म्यांना निवडा,संमेलन करा.मुलांना संभाळणारे तर खूप आहेत,तुम्ही ईश्वरी सेवेमध्ये तत्पर रहा.असे उदारचित्त असायला हवे,जे लगेच सेवा करू शकतील.एकीकडे सेवा आणि दुसरीकडे गीतेच्या भगवंताची गोष्ट,या गोष्टींना तुम्ही स्पष्ट करा.तुम्ही लक्ष्मीनारायण बनण्यासाठी शिकत आहात.तर येथे तुम्हा मुलांचा आपसामध्ये मतभेद व्हायला नको.जर कोणती गोष्ट बाबा पासून लपवतात,खरे सांगत नाहीत,तर आपलेच नुकसान करतात आणि परत शंभर पटीने पाप वाढते.अच्छा.

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांसाठी,मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आम्ही गोड पित्याची मुलं आहोत, आपसामध्ये बहिण-भाऊ बनून राहायचे आहे.कधीच विकाराची दृष्टी ठेवायची नाही.दृष्टी मध्ये कोणतीही चंचलता असेल तर, आत्मिक डॉक्टरला खरे सांगायचे आहे.

(२) कधीच आपसात मतभेदामध्ये यायचे नाही,मोठ्या मनाने सेवा करायची आहे.आपल्याच तन-मन-धनाने खूप नम्रताने सेवा करून,सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे.

वरदान:-
आपल्या श्रेष्ठ जीवना द्वारे परमात्म ज्ञानाचा प्रत्यक्ष पुरावा देणारे माया पासून मुक्त भव.

स्वतःला परमात्म ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रुफ समजण्यासाठी मायामुक्त बना.प्रत्यक्ष प्रमाण तुमचे श्रेष्ठ पवित्र जीवन आहे.सर्वात मोठी गोष्ट,असंभव पासून संभव होणारी गोष्ट,प्रवृत्ती मध्ये राहून पर-वृत्ती मध्ये राहणे आणि देहिक दुनियाच्या संबंधा पासून अनासक्त राहणे. जुन्या शरिराच्या नेत्रा द्वारे जुन्या दुनियाच्या वस्तूला पाहून पण न पाहणे, म्हणजेच संपूर्ण पवित्र जीवनामध्ये चालणे.हेच परमात्म्याला प्रत्यक्ष करणे,किंवा मायाप्रुफ बनण्याचे सहज साधन आहे.

बोधवाक्य:-
लक्ष रुपी चौकीदार ठीक आहे तर,अतींद्रिय सुखाचा खजाना नष्ट होऊ शकत नाही. ओम शांती.