03-10-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.03.88  ओम शान्ति   मधुबन


वाचा आणि कर्मणा दोन्ही शक्तीला जमा करण्यासाठी ईश्वरीय योजना.


आज आत्मिक शमा,आपल्या आत्मिक परवान्याला पाहत आहेत. चहूबाजुच्या परवाने, शमाच्या वरती फिदाता म्हणजे कुर्बान झाले आहेत. कुर्बान किंवा फिदा होणारे अनेक परवाने आहेत परंतु कुर्बान झाल्यानंतर शमाच्या स्नेहा मध्ये समान बनण्यांमध्ये,कुर्बानी करण्यामध्ये क्रमानुसार आहेत. वास्तव मध्ये कुर्बान मनातील स्नेहा मुळे होतात.हृदयापासूनचा स्नेह आणि स्नेह यामध्ये अंतर आहे.स्नेह सर्वांच आहे,स्नेहा मुळेच कुर्बान झाले आहेत.हृदयापासून चे स्नेही, बाबांच्या मनातील गोष्टींना किंवा हृदयातील आशाला जाणतात आणि पुर्ण करतात.ह्रदयापासूनचे स्नेही,ह्रदयाच्या आशा पुर्ण करणारे आहेत.हृदयापासूनचा स्नेह म्हणजे,जे बाबांच्या हृदयाने म्हणले,ते मुलांच्या ह्रदयामध्ये सामावले आणि जे ह्रदयामध्ये सामावले ते कर्मामध्ये जरूर आणतील.जे बुद्धीमध्ये सामावतात, त्यांचा फक्त विचार चालतो की, करू शकू किंवा नाही,करायचे तर आहेच, वेळेवरती होईल.असे विचार चालल्यामुळे विचारा पर्यंतच राहते, कर्मापर्यंत राहत नाही.

आज बापदादा पाहत होतो की, कुर्बान जाणारे तर सर्व आहेत,जर कुर्बानी जाणत नाहीत,तर ब्राह्मण पण म्हणू शकत नाहीत.परंतु बाबांच्या स्नेहा मुळे,जे बाबांनी म्हटले,ते करण्यासाठी कुर्बानी द्यावी लागते,म्हणजेच आपलेपणा,परत त्या आपलेपणा मध्ये अभिमान असेल किंवा कमजोरी,दोघांचा त्याग करावा लागतो,याला म्हणतात कुर्बानी.कुर्बानी करणारे खूप आहेत परंतु कुर्बानी करण्यासाठी हिंमतवान क्रमानुसार आहेत.

आज बाप दादा फक्त एक महिन्याचा परिणाम पाहत होते.या सीझनमध्ये विशेष बापदादाने बाप समान बनण्याचे वेगवेगळ्या प्रकारे,अनेक वेळेस इशारा दिला आहे आणि बाप दादांची विशेष हीच हृदयापासूनची श्रेष्ठ अआशा आहे.इतका खजाना मिळाला आहे,वरदान मिळाले आहेत, वरदानासाठी खूप भागदौड करून आले आहेत.बाबांना खुशी आहे की,मुलं स्नेहाने भेटण्यासाठी येतात,वरदान घेऊन खुश होतात. परंतु बाबाच्या हृदयाच्या आशा पूर्ण करणारे कोण आहेत?जे बाबांनी ऐकवले त्याला कर्मा मध्ये किती आणले? मनसा,वाचा,कर्मना तिघांचा परिणाम कुठे पर्यंत झाला आहे? शक्तिशाली मनसा,सबंध संपर्क मध्ये कुठेपर्यंत आले आहात? फक्त आपण स्वतः बसून मनन केले, ही प्रगती तर खूप चांगले आहे आणि करायची आहे परंतु ज्या श्रेष्ठ आत्म्याची श्रेष्ठ मनसा म्हणजे संकल्प शक्तिशाली आहेत, शुभ-भावना, शुभ-कामना आहेत. मनशक्तीचे दर्पण काय आहे? दर्पण आहे बोल आणि कर्म,परत ते अज्ञानी आत्मे असतील किंवा ज्ञानी आत्मे असतील,दोघांचे संबंध संपर्कामध्ये बोल आणि कर्म दर्पण आहेत.जर बोल आणि कर्म शुभ- भावना,शुभ-कामनाचे नाहीत,तर मनसा शक्ती चे प्रत्यक्ष स्वरूप कसे समजून येईल.ज्याची मनसा शक्तिशाली किंवा शुभ आहे, त्यांची वाचा कर्मना स्वतः शक्तिशाली शुद्ध होतील,शुभ भावना असणारी होतील.मनसा शक्तिशाली म्हणजेच आठवण पण शक्तीची श्रेष्ठ असेल, शक्तिशाली असेल,सहजयोगी असतील.फक्त सहज योगी पण नाही परंतु सहज कर्मयोगी असतील. बापदादाने पाहिले,आठवणीला शक्तिशाली बनवण्यामध्ये बहुतांश मुलांचे लक्ष आहे.आठवणीला सहज आणि निरंतर बनवण्यासाठी उमंग-उत्साह आहे.पुढे पण जात आहेत आणि पुढे जात राहतील, कारण बाबांशी स्नेह खूप चांगला आहे,म्हणून आठवणीचे लक्ष चांगले आहे आणि आठवणीचा आधार स्नेह आहे.बाबांशी आत्मिक संवाद करण्यामध्ये सर्व चांगले आहेत. कधी कधी थोडे डोळे वटारतात,ते पण जेव्हा आपसामध्ये थोडे बिघडतात.परत बाबाला गा-हाणे देतात की,तुम्ही का ठीक करत नाहीत.तरीही ते प्रेमपुर्ण डोळे वटारणे आहेत.परंतु जेव्हा संघटनांमध्ये येतात,कर्मामध्ये येतात, कार्य व्यवहारामध्ये येत,परिवारामध्ये येतात,तर संघटनांमध्ये बोल म्हणजेच वाचवू शकते,यामध्ये व्यर्थ जास्त दिसून येते.

वाणीची शक्ती व्यर्थ गेल्यामुळे, वाणीमध्ये जे बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या शक्तीचा अनुभव करायला पाहिजे, तो कमी होतो. गोष्टी चांगल्या वाटतात,ती दुसरी गोष्ट आहे.बाबांच्या गोष्टीची पुनरावृत्ती करतात,ते पण जरुर चांगले आहे परंतु वाचा ची शक्ती व्यर्थ गेल्यामुळे शक्ती जमा होत नाही, म्हणून बाबांना प्रत्यक्ष करण्याचा आवाज बुलंद होण्यामध्ये आणखी थोडा उशीर आहे.साधारण बोल जास्त आहेत.अलौकिक बोल, फरिश्ताचे बोल पाहिजेत.आत्ता या वर्षात यावरती अधोरेखित करायचे आहे.जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, फरिश्तांचे बोल होते,कमी बोल आणि मधुर बोलत होते.ज्या वचना द्वारे फळं निघतात,ते बोल अर्थसहित आहेत आणि ज्या वचनाचे कोणते फळ नाहीत,ते व्यर्थ बोल आहेत.परत कार्यव्यवहाराचे फळ असेल किंवा कामकाजा साठी बोलावे तर लागते,त्यासाठी पण जास्त बोलू नका.आता शक्तीला जमा करायचे आहे.असे आठवणी द्वारे मनसा शक्ती जमा करत राहतात,शांती मध्ये बसतात,तर संकल्प शक्ती पण जमा करतात. असेच वाणीची शक्ती पण जमा करत रहा.

बाबा एक हसण्याची गोष्ट ऐकवतात, बापदादाच्या वतन मध्ये सर्वांच्या जमा खात्याची भंडारी आहे.तुमच्या सेवा केंद्रा मध्ये पण भंडारी आहे ना. बाबाच्या वतन मध्ये मुलांची भंडारी आहे.प्रत्येक जण संपूर्ण दिवसांमध्ये मनसा, वाचा,कर्मणा तिन्ही शक्ती बचत करून जमा करतात,त्याची भंडारी आहे.मनसा शक्ती किती जमा केली,वाचा शक्ती,कर्मणा शक्ती किती जमा केली,या सर्वांचा हिशोब आहे.तुम्ही पण खर्च आणि बचतचा हिशोब पाठवता ना.तर बापदादानी ही जमाची भंडारी पाहिली.तर काय निघाले,तर जमेचे खाते किती निघाले असेल? प्रत्येकाचा परिणाम आपापला आहे.भंडारी भरलेले तर खूप होती,परंतु चिल्लर जास्त होती. लहान मुला भंडारी मध्ये चिल्लर जमा करतात, तर भंडारी खूप जड होते.तर वाचेच्या परिणाम मध्ये,हे विशेष जास्त पाहिले.आठवणीच्या वरती लक्ष आहे,तसेच वाचे वरती तितके लक्ष नाही.तर यावर्षी वाचा आणि कर्मणा, या दोन्ही शक्तीना जमा करण्याची योजना बनवा. शासन वेगवेगळ्या प्रकारे बचत योजना बनवते ना.असेच यामध्ये मुळ मनसा शक्ती आहे,ते तर सर्वच जाणतात,परंतु मनसाच्या सोबतच विशेष वाचा आणि कर्मणा,हे सबंध संपर्कामध्ये स्पष्ट दिसून येते.मनसा तरीही गुप्त आहे परंतु ही प्रत्यक्ष दिसून येणारी आहे. बोल मध्ये जमा करण्याचे साधन आहे,कमी बोला, गोड बोला,सन्मान युक्त बोला.जसे ब्रह्मा बाबांनी लहान किंवा मोठ्यांना स्वमानच्या बोल द्वारे आपले बनवले, या विधीद्वारे जितके पुढे जाल,तेवढी विजय माळा लवकर तयार होईल. या वर्षी काय करायचे आहे,सेवेच्या सोबतच विशेष,या शक्ती जमा करत सेवा करायची आहे.

सेवेचे नियोजन तर सर्वांनी, चांगल्यातले चांगले केले आहे आणि आजपर्यंत जे पण नियोजन प्रमाण सेवा करत आले आहात,चहूबाजूला मग ती भारता मध्ये असेल किंवा विदेशामध्ये असेल,चांगली सेवा करत आहात आणि करत राहणार.जसे सेवेमध्ये एक दोघांपेक्षा चांगल्यात चांगला परिणाम येण्यासाठी, शुभ भावना द्वारे पुढे जात राहतात,तसेच सेवांमध्ये संघटित रुपामध्ये नेहमी संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करण्याचा विशेष संकल्प राहावा,कारण एकाच वेळी तीन्ही प्रकारची सेवा सोबत होते. एक आहे आपली संतुष्टता,ही स्वतःची सेवा आहे.दुसरे संघटन मध्ये संतुष्टता, ही परिवाराची सेवा आहे.तिसरी भाषा द्वारा किंवा कोणत्या विधीद्वारे विश्वाच्या आत्म्यांची सेवा करणे.एकाच वेळी तिन्ही सेवा होतात.कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करतात,तर त्यामध्ये तिन्ही सेवा सामावलेल्या आहेत.जसे विश्वाच्या सेवेमध्ये परिणाम व विधी लक्षात ठेवतात, असेच दोन्ही सेवा, स्व आणि संघटनांची तिन्ही निर्विघ्न असायला हवेत,तेव्हा सेवांमध्ये क्रमांक एकची सफलता मिळेल.तीन्ही सेवेत सफलता सोबत मिळणेच क्रमांक घेणे आहे.या वर्षामध्ये तिन्ही सेवेमध्ये सफलता सोबत मिळाव्यात.हा नगाडा आवाजाला हवा.जर एका कोपऱ्यामध्ये नगडा वाजत राहिला,तर कुंभकर्णाच्या काना पर्यंत पोहोचत नाही.जेव्हा चहूबाजूला नगाडा वाजेल, तेव्हा सर्व कुंभकरण जागृत होतील.आता एक जागृत होतो तर दुसरा झोपतो दुसरा जागृत होतो,तळ तिसरा झोपतो. थोडा जागृत होतात,तरीही चांगले चांगले म्हणून परत झोपतात.परंतु जागृत झाले आणि मुखाद्वारे किंवा मनाद्वारे 'अहो प्रभू' म्हणून मुक्तीचा वारसा घेतील,तेव्हा समाप्त होईल. जागृत होतील तेव्हा तर मुक्तीचा वारसाचा घेतील.तर समजले काय करायचे आहे.एक दोघांचे सहयोगी बना.दुसऱ्यांचे बचाव मध्ये आपला बचाव म्हणजे बचत होईल.

सेवेचे नियोजनामध्ये जितके संपर्कामध्ये समीप याल,तेवढे सेवेचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील.संदेश देण्याची सेवा तर करत आले आहात,करत राहणार परंतु विशेष या वर्षी फक्त संदेश द्यायचा नाही, परंतु सहयोगी बनवायचे आहे म्हणजेच संपर्कामध्ये जवळ आणायचे आहे,फक्त फॉर्म भरला आहे,हे तर चालत राहते परंतु यावर्षी पुढे प्रगती करत राहा.फॉर्म भरा परंतु फॉर्म भरण्या पर्यंत सोडून देऊ नका, सबंधा मध्ये घेऊन या,जसे व्यक्ती तसेच संपर्कामध्ये घेऊन येण्याचे नियोजन करा.परत ते लहान लहान कार्यक्रम करा परंतु लक्ष हे ठेवा. सहयोगी फक्त एक तासासाठी,फॉर्म भरण्याच्या वेळेपर्यंत बनवायचे नाही,परंतु सहयोगाद्वारे त्यांना जवळ आणायचे आहे.संपर्का मध्ये, संबंधांमध्ये,नंतर पुढे चालून सेवेचे रूप परिवर्तन होईल.तुम्हाला स्वतः बोलावे लागणार नाही.आज तुमच्याकडून संबंधांमध्ये येणारे, बोलतील,तुम्हाला फक्त आशीर्वाद आणि दृष्टी द्यावी लागेल.जसे आजकाल शंकराचार्याला खुर्चीवर बसवतात,तसे तुम्हाला पुज्यच्या खुर्चीवर बसवतील,चांदीच्या नाही. धरती तयार करणारे निमित्त बनतील आणि तुम्ही फक्त दृष्टी द्वारे बीज घालायचे आहे.दोन आशीर्वादाचे वचन बोलायचे आहेत,तेव्हाच प्रत्यक्षता होईल.तुमच्यामध्ये बाबा दिसून येतील,आणि बाबांची दृष्टी, बाबाच्या स्नेहाची अनुभूती घेत, प्रत्यक्षताचा आवाज करायला सुरु करतील.

आता सेवेची सुवर्ण जयंती पूर्ण केली.आता आणखी सेवा कराल आणि तुम्हाला पाहून हर्षित होतील. जसे पोप काय करतात,इतक्या मोठ्या सभेमध्ये दृष्टी देऊन आशीर्वादचे बोल बोलतात,खूप लांबलचक भाषण करणारे दुसरे निमित्त बनतील.तुम्ही म्हणाल, आम्हाला जे बाबांनी ऐकवले आहे, त्याऐवजी दुसरे बोलततील,यांनी जे ऐकवले ते बाबांचे आहे,दुसऱ्या कोणाचे नाही.तर हळूहळू असे सहयोगी तयार होतील.जसे सेवा केंद्र सांभाळण्यासाठी सहयोगी तयार झालेत ना,तसेच स्टेजवरती तुमच्याकडून बोलणारे,अनुभव पण करून बोलणारे निघतील,फक्त महिमा करणारे नाही. ज्ञानाच्या रहस्य युक्त गोष्टींना स्पष्ट करणारे, परमात्माच्या ज्ञानाला स्पष्ट करणारे असे निमित्त बनतील.परंतु त्यासाठी अशा प्रकारच्या लोकांना, स्नेही सहयोगी आणि संपर्का मध्ये आणत, संबंधांमध्ये घेऊन या.सर्व कार्यक्रमाचे लक्ष हेच आहे की,अशा लोकांना सहयोगी बनवा,जे तुम्ही शक्तीशाली बना आणि ते माइक बनतील. यावर्षीच्या सहयोगाच्या सेवेचे लक्ष्य माईक तयार करणे आहे,जे अनुभवाच्या आधारावरती आपल्या किंवा बाबाच्या ज्ञानाला प्रत्यक्ष करतील.ज्यांचा प्रभाव स्वतः दुसऱ्या वरती सहज पडेल,असे माईक तयार करा म्हणजे असे वक्ते तयार करा,समजले सेवेचा उद्देश काय आहे.इतके जे कार्यक्रम बनवले आहेत,त्याचे लोणी काय निघेल, त्याचा सारांश काय निघेल? खूप सेवा करा परंतु या वर्षी संदेशाच्या सोबतच हे पण करा.आपल्या ध्यानात,मनामध्ये ठेवा की कोण कोणते असे पात्र आहेत आणि आणि त्यांना वेळेनुसार वेगवेगळ्या विधीद्वारे संपर्कामध्ये घेऊन या.असे व्हायला नको,एक कार्यक्रम केला, परत दुसरा कार्यक्रम केला, तिसरा केला आणि पहिल्या कार्यक्रमातील व्यक्ती तिथेच राहिले,तिसरे आले.ही पण जमेच्या शक्तीचा प्रयोग करायचा आहे.प्रत्येक कार्यक्रमाद्वारे जमा करत जा,शेवटी अशा प्रकारे संबंध संपर्क मध्ये येणाऱ्यांची माळ बनेल,समजले? बाकी काय राहिले, भेटण्याचा कार्यक्रम.यावर्षी बापदादा सहा महिन्याच्या सेवेचा परिणाम पाहू इच्छितात.सेवेमध्ये जे पण नियोजन केले,ते चहूबाजूला एक दोघांच्या सहयोगी बनून,खूप चक्र लावा.सर्व लहान मोठ्यांना उमंग-उत्साहात घेऊन येत,तीन्ही प्रकारच्या सेवेमध्ये पुढे करत जावा, म्हणून बाप दादाची या पुर्ण वर्षामध्ये,रात्रीला दिवस बनवून सेवा दिली आहे.आता तिन्ही प्रकारच्या सेवेचे फळ खाण्याचे हे वर्ष आहे. यावर्षी येण्याची नोंद नाही.बाबांची सकाश तर नेहमीच सोबत आहेच. जी नाटकाची नोंद आहे,ती गोष्ट सांगितली.पुर्वनियोजीत नाटकाच्या नियोजनाला मंजूर करावेच लागते. सेवा खूप करा,सहा महिन्याच्या परिणाम मध्ये माहिती पडेल. बाबांच्या आशा पूर्ण करणारे नियोजन करा.जिथे पण पाहा, ज्याला पण पण पाहा,प्रत्येक संकल्प,बोल आणि कर्म बाबांच्या आशेचे दीपक जागृत करणारे आहात,जागवणारे आहात.प्रथम मधुबन मध्ये हे उदाहरण बनवून दाखवा.बचतीच्या योजनेचे मॉडेल प्रथम मधुबन मध्ये बनवा.हे प्रथम बँकेमध्ये जमा करा.मधुबन निवासींना तर हे वरदान मिळाले आहे.बाकीचे जे राहिलेले आहेत, त्यांना पण या वर्षी लवकर पूर्ण करायचे आहे,कारण बाबांचा स्नेह तर सर्व मुलांच्या सोबत आहेच.तसे तर प्रत्येक मुलाला,प्रत्येक पावला मध्ये वरदान आहे.जे ह्रदयापासूनचे स्नेही आत्मा आहेत,ते वरदाना द्वारेच चालतात.बाबांचे वरदान फक्त मुखाद्वारे नाही परंतु ह्रदयापासूनचे आहे आणि ह्रदयापासूनचे वरदान नेहमी मनामध्ये खुशी,उमंग-उत्साह चे अनुभव करवते.ही हृदयापासूनच्या वरदानाची लक्षण आहेत.हृदयापासूनचे वरदानाला जे पण आपल्या हृदयामध्ये धारण करतात,त्याची लक्षणे आहेत,ते नेहमी खुश आणि उमंग-उत्साहा द्वारे पुढे जात राहतात. कधीही कोणत्या गोष्टी मध्ये थकणार नाहीत, थांबणार नाहीत,वरदाना द्वारे प्रगती करत राहतील आणि बाकी सर्व गोष्टी खाली राहतील.येणाऱ्या लहान मोठ्या समस्या पण उडणाऱ्या मुलांना थांबवू शकत नाहीत.आज बापदादा सर्व मुलांना ज्यांनी पण हृदयापासून अथक बनून सेवा केली, त्या सर्व सेवाधारींना सीजनच्या सेवेच्या शुभेच्छा देत आहेत.मधुबन मध्ये येऊन मधुबन चे शृंगार बनले आहेत.असेच शृंगार बनणाऱ्या मुलांना बाप दादा शुभेच्छा देत आहेत आणि आणि निमित्त बनलेल्या श्रेष्ठ आत्म्यांना पण नेहमी अथक बनून,बाप समान सेवेमध्ये सर्वांना ताजेतवाने करण्याच्या शुभेच्छा देत आहेत आणि रथाला पण शुभेच्छा आहेत.सर्व बाजूंच्या सेवाधारी मुलांना पण शुभेच्छा देत आहेत,निर्विघ्न बनून प्रगती करत आहात आणि प्रगती करत राहाल. देश-विदेशीच्या सर्व मुलांना येण्याचे पण शुभेच्छा आहेत आणि ताजेतवाने होण्यासाठी पण शुभेच्छा आहेत. परंतु नेहमी ताजेतवाने राहा, सहा महिने पर्यंत राहायचे नाही. ताजेतवाने होण्यासाठी जरुर या परंतु बाबांचा खजाना तर सर्व मुलांचा नेहमीचा अधिकार आहे आणि सोबत आहेत म्हणून नेहमी सोबत राहाल,फक्त अधोरेखित करा की त्यामध्ये विशेष स्वतःला उदाहरण मुर्ती बनून परीक्षांमध्ये जास्त मार्क्स घ्यायचे आहेत. दुसऱ्याला पाहायचे नाही, स्वतः उदाहरण मूर्ती बनायचे आहे,यामध्ये जे करतील ते अर्जुन बनतील म्हणजेच क्रमांक एकचे बनतील. दुसऱ्या वेळेस बापदादा येतील तर फरिश्तांचे कर्म, फरिश्तांचे बोल, फरिश्तांंचे संकल्प धारण करणारे नेहमी प्रत्येक जण दिसून यायला पाहिजेत.असे परिवर्तन संघटना मध्ये दिसून येईल.प्रत्येक जण अनुभव करतील की,हे फरिश्ताचे बोल, फरिश्ताचे कर्म,कर्म किती अलौकिक आहेत.हा परिवर्तन समारोह बापदादा पाहू इच्छितात.जर आपले प्रत्येक दिवसाचे बोल टेप केले,तर खूप चांगल्याप्रकारे माहित होईल. तुम्ही तपासून पाहा तर माहीत होईल की, ते किती व्यर्थ जातात?मनाच्या टेप मध्ये तपासून पाहा,स्थुल त्या टेप मध्ये नाही.साधारण बोल पण व्यर्थ मध्ये जमा होतात.जर ४ वचनच्या ऐवजी २४ वचन बोलले,तर वीस कोठे गेले.शक्ती जमा करा,तर तुमचे आशीर्वादाचे दोन बोल,एका तासाचे भाषणाचे काम करतील.अच्छा.

चहूबाजूनच्या सर्व कुर्बान जाणाऱ्या आत्मिक परवान्याला,सर्व बाप समान बनणाऱ्या सोबतच दृढ संकल्प द्वारे पुढे जाणाऱ्या विशेष आत्म्यांना,नेहमी उडत्या कलेद्वारे कोणत्याही प्रकारचे परिस्थितीला दुर करणाऱ्या डबल लाईट मुलांना, आत्मिक मुलांना,शमा बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
कल्याणच्या भावना द्वारे प्रत्येक आत्म्याच्या संस्काराला परिवर्तन करणारे,निश्चय बुद्धी भव.

बाबा मध्ये शंभर टक्के निश्चय आहे, कोणी कितीही डगमग करण्याचा प्रयत्न करतील परंतु करू शकत नाहीत.असे दैवी परिवार किंवा संसारा द्वारे जरी कोणी कसाही पेपर,परिक्षा घेतली,क्रोधी बनून सामना केला किंवा काही अपमान केला,निंदा केली,त्यामध्ये डगमग होऊ शकत नाहीत.फक्त यामध्ये प्रत्येक आत्म्या प्रती कल्याणाची भावना हवी.ही भावना त्यांच्या संस्काराला परिवर्तन करेल,यामध्ये फक्त अधिर्य व्हायचे नाही.वेळेनुसार फळ आवश्य निघेल,ही पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे.

सुविचार:-
पवित्रतेचा शक्तीद्वारे आपल्या संकल्पाला शुद्ध, ज्ञानस्वरूप बनवून, कमजोरीला समाप्त करा.