03-11-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.03.1985   ओम शान्ति   मधुबन


वर्तमानईश्वरीयजन्म- अमूल्यजन्म.
 


आज रत्नगर बाबा आपल्या अमूल्य रत्नांना पाहत आहेत.हा अलौकिक अमूल्य रत्नांचा दरबार आहे. एक एक रत्न अमूल्य आहे. या वर्तमान वेळेत विश्वाची संपूर्ण संपत्ती किंवा विश्वामधील सर्व खजाने एकत्रित करा,त्यांच्यापेक्षा पण एक एक ईश्वरीय रत्न अनेक पटीने अमूल्य आहे. तुम्हा एकेक रत्नांच्या पुढे विश्वामधील सर्व खजाने काहीच नाहीत, इतके अमूल्य रत्न तुम्ही आहात. हे अमूल्य रत्न शिवाय संगम युगाच्या सर्व कल्पामधे मिळू शकत नाहीत. सतयुगातील देवांची भूमिका या संगमयुगी ईश्वरीय अमुल्य रत्नांच्या भूमिके पुढे दुसरा नंबर येतो.आता तुम्ही ईश्ववरी संतान आहात, सतयुगामध्ये दैवी संतन असाल. जसे ईश्वराचे नाव सर्वात श्रेष्ठ आहे, महिमा आहे, जन्म आहे ,कर्म आहे,तसेच ईश्वरीय रत्नांचा किंवा ईश्वरीय मुलांच्या आत्म्याचे, मूल्य सर्वश्रेष्ठ आहे.या श्रेष्ठ महिमाची किंवा श्रेष्ठ मूल्यांची स्मृति, आत्ता पण नऊ रत्नांच्या रूपामध्ये गायन आणि पूजन केली जाते. नऊ रत्नांना वेगवेगळे विघ्नविनाशक रत्न गायन केले जाते. जसे विघ्न तशी विशेषता असणारे रत्न किंवा अगंठी बनवून घालतात किंवा लॉकेटमध्ये घालतात किंवा कोणत्याही रूपांमध्ये त्या रत्नाला घरामध्ये ठेवतात. आत्ता अंतच्या जन्मांमध्ये पण विघ्नविनाशक रुपामध्ये आपले यादगार पाहात आहात,नंबरानुसार जरूर आहेत,परंतु नंबरानुसार असून सुद्धा अमूल्य आणि विघ्नविनाशक आहात. आज पण श्रेष्ठ स्वरूपा द्वारे, तुम्हा रत्नांचे,भक्त मान ठेवतात, खूपच प्रेमाने स्वच्छता द्वारे संभाळ करून ठेवतात, कारण तुम्ही सर्व जे पण आहात स्वतःला इतके योग्य समजत नाहीत परंतु बाबांनी तुम्हाला योग्य समजून, आपले बनवले आहे, स्वीकार केले,आहे. तुम्ही माझे मी तुमचा. ज्या आत्म्यावरती बाबांची नजर पडली,प्रभूच्या दृष्टीमुळे अमुल्य बनतातच. परमात्मा दृष्टीमुळे,ईश्वरी सृष्टीचे ईश्वरीय संसाराचे, श्रेष्ठ बनतातच. पारसनाथ द्वारे संबंधांमध्ये आले तर रंग लागतोच, म्हणून परमात्मा प्रेमाची दृष्टी मिळाल्यामुळे,सर्वकल्प चैतन्य देवतांच्या रूपामध्ये, किंवा अर्धा कल्प जड चित्राच्या रूपामध्ये, वेगवेगळ्या आठवणीच्या रूपामध्ये, जसे रत्नांच्या रूपामध्ये तुमची यादगार आहे,ताऱ्यांच्या रुपामध्ये पण तुमची यादगार आहे. कोणत्याही रूपामध्ये आहे, सर्वकल्प सर्वांचे प्रिय राहिले आहात. अविनाशी प्रेमाच्या सागराची प्रेमाची दृष्टी, साऱ्या कल्पा साठी प्रेमाचे अधिकारी बनवते, म्हणून भक्त लोक आर्धी घडी,एक घडी दृष्टीसाठी तडपतात. दृष्टी द्वारे संतुष्ट होऊ, म्हणून या वेळेत प्रेमाची दृष्टी, अविनाशी प्रेमाच्या योग्य बनवते. अविनाश प्राप्ती स्वतः होते,प्रेमाने आठवण करतात, प्रेमाने पाहतात.

दुसरी गोष्ट स्वच्छता अर्थात पवित्रता. तुम्ही यावेळेस बाबा द्वारे पवित्रतेचा जन्म सिध्द अधिकार प्राप्त करतात.पवित्रता किंवा स्वच्छतेला आपला स्वधर्म जाणता का. पवित्रतेला धारण केल्यामुळे जिथे पण तुमचे यादगार असतील, तिथे पवित्रता किंवा स्वच्छता आत्ता पण यादगार रूपांमध्ये चालत आली आहे. अर्धाकल्प तर पवित्र पालना आहेच,पवित्र दुनिया आहे.तर अर्धाकल्प पवित्रते द्वारे उत्पत्ती होते, पवित्रते द्वारे पालना आणि अर्धाकल्प पवित्रते मुळे पुजन होते.

तिसरी गोष्ट खूपच प्रेमाने ,श्रेष्ठ समजून, अमूल्य समजून, संभाळ करतात कारण यावेळेस भगवान मात पित्याच्या रूपा द्वारे तुम्हा मुलांची संभाळ करतात अर्थात पालना करतात. तर अविनाशी पालना झाल्यामुळे, अविनाश स्नेहामुळे, सर्वकल्प खूपच प्रेमाने रॉयल्टी द्वारे आदराने संभाळ होत जाते. असे प्रिय, स्वच्छता, पवित्रता आणि प्रेमाने संभाळ केल्यामुळे अविनाशी पात्र बनतात. तर समजले किती अमुल्य आहात?प्रत्येक रत्न खूपच अमुल्य आहे. तर आज रत्नागर बाबा, प्रत्येक रत्नाचे मुल्य पाहत होते.साऱ्या दुनियेची अक्षोणी आत्मे एकीकडे परंतु तुम्ही पाच पांडव, अक्षोणी पेक्षा जास्त शक्तिशाली आहात. अक्षोणी तुमच्या एकाच्या पण बरोबर नाहीत. इतके शक्तिशाली आहात. तर खूपच मूल्यवान झाले ना. इतके मुल्य स्वतःचे जाणता का? कधी कधी स्वतःला विसरून जाता.जेव्हा तुम्ही स्वतःला विसरतात, तर कष्टी होतात, म्हणून स्वतःला विसरू नका. नेहमी स्वतःला अमूल्य समजून चला.लहान चूक पण करू नका, अमुल्य आहात परंतु बाबाच्या संगती मुळे अमूल्य आहात. बाबांना विसरून स्वतःला अमुल्य समजतात, तर हे पण चुकीचे होते. अमूल्य बनवणाऱ्याला विसरू नका.अमुल्य बनले परंतु बनवणाऱ्या च्या सोबत बनले,ही समजण्याची विधी आहे. जर विधीला विसरतात तर समज,बेसमजच्या रुपामध्ये बदलते. परत मी पणा येतो.विधीला विसरल्यामुळे सिध्दीचा अनुभव होत नाही, म्हणून विधीपूर्वक स्वतःला मुल्यवान जाणून विश्वाचे पूर्वज बना.मी तर काहीच नाही असे हैराण पण होऊ नका. मी तर काहीच नाही, हा विचार करू नका, किंवा मीच सर्वकाही आहे असे समजणे, दोन्हीही चुकीचे आहे. मी मूल्यवान आहे परंतु बनवणाऱ्यांनी बनवले आहे. बाबांना काढून टाकतात तर पाप होते. बाबा आहेत तर पाप नाही. जिथे बाबांचे नाव आहे, तिथे पापाचे नाव पण नाही आणि जिथे पाप आहे तिथे बाबांचे नाव रूप पण नाही. तर समजले स्वतःच्या मूल्याला? भगवानाच्या दृष्टीचे पात्र बनले, ही साधारण गोष्ट नाही.पालनेचे पात्र बनले आहात.अविनाश पवित्रते च्या जन्मसिद्ध अधिकाराचे,अधिकारी बनले आहात, म्हणून जन्मसिद्ध अधिकार कधीच मुश्कील होत नाही, सहज प्राप्त होतो.असेच स्वतः अनुभवी आहात.जे अधिकारी मुलं आहेत त्यांना पवित्रता अवघड वाटत नाही .ज्यांना पवित्रता अवघड वाटते,ते डगमग जास्त होतात. पवित्रता स्वधर्म आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे .तर नेहमी सहज वाटेल. दुनिया वाले दूर जातात,कारण पवित्रता अवघड वाटते. अधिकारी नाहीत त्यांना अवघड वाटते, अधिकारी आत्मे आल्यानंतर लगेच द्रढ संकल्प करतात की, पवित्रता बाबांचा अधिकार आहे, म्हणून पवित्र बनायचे आहे. मनाला पवित्रता नेहमीच आकर्षित करत राहते. जरी चालता-चालता कुठे माया परीक्षा घेण्यासाठी पण येते,संकल्पाच्या रुपामध्ये,स्वप्नाच्या रूपांमध्ये, तरी अधिकारी आत्मे असल्यामुळे घाबरत नाहीत. परंतु ज्ञानाच्या शक्तीद्वारे संकल्पाला परिवर्तन करतात. एका संकल्पाच्या पाठीमागे अनेक संकल्प उत्पन्न करत नाहीत. अंशाला वंश रूपामध्ये आणणार नाहीत. काय झाले,असे झाले इत्यादी हा वंश आहे. ऐकले होते ना, का कसे याद्वारे प्रश्नांची रांग लागते.हे वंश ऊत्पन्न करतात. माया आली आणि नेहमीसाठी गेली, परीक्षा घेण्यासाठी आली आणि पास झाले. माया का आली, कुठून आली, यांच्याद्वारे आली,माया यायला नको होती,का आली, हा वंश व्हायला नको .अच्छा आली तरी तुम्ही तिला बसवू नका, तिची खात्री करू नका. तिला पळवून लावा.का आली असा विचार केला तर ती बसेल.पुढे जाण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी आली.पुढच्या वर्गात अनुभवी बनवण्यासाठी आली. का आली कशी आली, याचा विचार करू नका. परत विचार करतात,मायेचे असे पण रूप असते का? लाल हिरवे पिवळे रुप आहे. या विस्तारामध्ये चालले जातात,या मध्दे जाऊ नका. तुम्ही घाबरता का? तिला दूर करा.आदराने पास व्हा. ज्ञानाची शक्ती आहे शस्त्र. मास्टर सर्वशक्तिमान आहात, त्रिकालदर्शी आहात, त्रिवेणी आहात. काय कमी आहे, लवकर घाबरून जाऊ नका. मुंगी पण आली तरी घाबरतात. जास्त विचार करू नका. जास्त विचार करणे म्हणजे मायेची खात्री करणे आहे. परत ती आपले घर बनवते.जसे रस्त्यावर चालताना कोणती ही खराब गोष्ट दिसली तर काय करणार? उभे राहून विचार करणार का, कुणी टाकली,का कसे. टाकायला नाही पाहिजे, असा विचार करणार की, किनारा करून चालले जाणार. जास्त व्यर्थ संकल्पाच्या वंशला उत्पन्न करू नका.अंशच्या रूपा मध्देच समाप्त करा. प्रथम सेकंदाची गोष्ट होती,परत त्याला तास, दिवस, महिनाभर तानतात. जर एक महिन्यानंतर विचारले काय झाले, तर गोष्ट सेकंदाची होती, म्हणून घाबरू नका. ज्ञानाच्या रहस्या मध्दे जावा, गोष्टीचा रहस्या मध्ये नाही .बापदादा श्रेष्ठ मूल्यवान रत्नांना मातीत खेळताना पाहतात,तर विचार करतात, हे रत्नां बरोबर खेळणारे माती मध्ये खेळत आहेत. तुम्ही रत्न आहात, रत्ना सोबत खेळा.बापदादांनी खूपच प्रेमाने पालन केले आहे, परत माती बरोबर खेळताना कसे पाहू शकतील, परत खराब होऊन म्हणतात, आता स्वच्छ करा, स्वच्छ करा, घाबरून जातात. आता काय करू, कसे करू, मातीमध्ये खेळतच का, ते मातीचे कण जे धरती मध्ये पडणारे आहेत. तर नेहमी स्वतःला मूल्यवान समजा. अच्छा.

असे साऱ्या कल्पाचे मूल्यवान आत्म्यांना,प्रभू प्रेमाच्या पात्र आत्म्यांना,प्रभू पालनेच्या पात्र आत्म्यांना, पवित्रते च्या जन्मसिद्ध अधिकाराच्या अधिकारी आत्म्यांना, नेहमी बाबा आणि मी या विधीद्वारे सिद्धी ला प्राप्त करणाऱ्या आत्म्यांना, नेहमी अमूल्य रत्न बणुन रत्नां सोबत खेळणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना प्रेम पूवर्क आठवण आणि नमस्ते.

पार्टीसोबतवार्तालाप:-
(१)- नेहमी बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावलेले आत्मा स्वतःला अनुभव करता का? डोळ्यामध्ये कोण सामावते, जे खूप हलके बिंदू आहेत,तर नेहमी बिंदू आहात आणि बिंदू बनवून बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावणारे आहात. बाप दादा तुमच्या डोळ्यांमध्ये सामावले आहेत आणि तुम्ही सर्व बापदादांच्या डोळ्यांमध्ये आहात.जर डोळ्यांमध्ये बापदादा आहेत, तर दुसरे कोणी दिसून येणार नाही. तर नेहमी या स्मृती द्वारे डबल लाईट राहा की, मी आहेच बिंदू,असे समजल्यामुळे कोणतेही ओझे वाटणार नाही, हलके राहाल. तर हीच स्मृति नेहमीच पुढे प्रगती करत राहील. डोळ्यांच्या मध्ये पहा तर बिंदूच आहे. बिंदू नसेल तर डोळे असुन सुध्दा पाहू शकत नाहीत. तर नेहमी या स्वरूपाची स्मृती ठेवून उडत्या कलेचा अनुभव करा. बापदादा मुलांचे वर्तमान आणि भविष्याला पाहून आनंदित होत आहेत. भविष्याचे भाग्य बनवण्यासाठी वर्तमान कलम आहे.वर्तमानला श्रेष्ठ बनवण्याचे साधन आहे, मोठ्यांचा इशारा नेहमी स्वीकार करत, स्वतःला परिवर्तन करा. या विशेष गुणा द्वारे वर्तमान आणि भविष्य भाग्य श्रेष्ठ बनते.

( २ )-सर्वांच्या मस्तकावरती भाग्याचा तारा चमकत आहे ना. नेहमी चमकतो? कधी बंद चालू तर होत नाही ना.अखण्ड ज्योती बाबांच्या सोबत तुम्हीपण अखंड ज्योती, नेहमीच जागृत राहणारे तारे बनले, असा अनुभव करता? कधी वारा हलवत तर नाही, दिपक आहात की तारे आहात. जिथे बाबांची आठवण आहे, तेथे अविनाशी चमकणारा तारा आहे,बंद चालू होणारा नाही. लाईट सुद्धा बंद चालू होते, तर कोणाला ही चांगले वाटत नाही. तर हा पण नेहमी चमकणारा तारा आहे. नेहमी ज्ञानसूर्य बाबांकडू प्रकाश घ्या आणि दुसर्यांना पण प्रकाश देत राहा. सेवेचा उमंग उत्सव कायम राहतो ना . तुम्ही सर्व श्रेष्ठ आत्मा आहात, श्रेष्ठ बाबांचे श्रेष्ठ आत्मे आहात. आठवणीच्या शक्तीद्वारे सफलता सहज प्राप्त होते. जितकी आठवण आणि सेवा सोबत राहते तर आठवण आणि सेवेच्या संतुलना द्वारे नेहमीच सफलतेचा आशीर्वाद प्राप्त होतो,म्हणून सदा शक्तिशाली आठवणीच्या स्वरूपाचे वातावरण बनवल्यामुळे, शक्तिशाली आत्म्यांचे आव्हान होते आणि सफलता मिळते. निमित्त अलौकिक कार्य आहे परंतु लगन बाबा आणि सेवेमध्ये आहे. लौकिक पण सेवेप्रती आहे, आकर्षणामुळे करत नाहीत, तर सुचने प्रमाणे करतात,म्हणून बाबांच्या स्नेहाचा हात अशा मुलांचा सोबत आहे. यामुळे नेहमीच खुशीमध्ये गात रहा नाचत रहा, हेच सेवेचे साधन आहे.तुम्हाला आनंदात पाहुन दुसरे पण आनंदित होतील,तर ही सेवा पण होऊन जाईल. बाप दादा मुलांना नेहमीच म्हणतात, जितके महादानी बनाल तेवढा खजाना वाढत जाईल. महादानी बना आणि खजाण्याला वृद्धी करा. महाज्ञानी बणुन खूप दान करा. हे देणे म्हणजे घेणे आहे. चांगली गोष्ट मिळते तर देण्या शिवाय राहू शकत नाही. नेहमी स्वतःच्या भाग्याला पाहून आनंदित रहा, किती मोठे भाग्य मिळाले आहे. घरी बसून भगवान मिळाले,यापेक्षा मोठे भाग्य, दुसरे कोणते असेल. या भाग्याला स्मृति मध्ये ठेवून आनंदित रहा, तर दुःख आणि अशांती नेहमीसाठी समाप्त होऊन जाईल. सुख स्वरूप, शांत स्वरूप बनाल. ज्यांचे भाग्य स्वतः भगवंतानी बनवले तर ते किती श्रेष्ठ झाले, तर नेहमी आपल्या नवीन उमंग उत्साहाचा अनुभव करत, प्रगती करत चला, कारण संगम युगाचा प्रत्येक दिवस नवीन उमंग नविन उत्साह देणारा आहे. जसे चालत आहात, तसे नाही. नेहमी नवीन उमंग, नवीन उत्साहाने प्रगती होत राहते. प्रत्येक दिवस नवीन आहे. नेहमी स्वतःमध्ये, सेवेमध्ये, कोणती ना कोणती नवीनता जरूर पाहिजे. जितके स्वतःला उमंग उत्साहा मध्दे ठेवाल, तेवढ्या नवीन नवीन गोष्टी बुद्धीमध्ये येतील.स्वतःच जर, दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये व्यस्त राहाल, तर नवीन ज्ञानाच्या गोष्टी बुद्धीमध्ये येणार नाहीत. मनन करा तर नवीन उमंग येत राहील.

बंधनयुक्तमातांनाप्रेमपूर्णआठवणदेताना:- बंधनयुक्त मातांची आठवण तर नेहमीच बाबा जवळ पोहचते आणि बापदादा सर्व बंधन युक्त मातांना हेच म्हणतात की योग म्हणजे आठवणीच्या यात्रेला अग्नी रूप बनवा. जेव्हा यात्रा अग्नी रूप बनेल, तेव्हाच अग्नीमध्ये सर्व भस्म होईल.तर हे बंधन पण आठवणीच्या अग्नीमध्ये समाप्त होईल, आणि स्वतंत्र आत्मा बणुन जे पण संकल्प करतील त्याची सिद्धी होईल.स्नेही आहात, स्नेहाद्वारे केलेली आठवण पोहोचते. स्नेहाच्या प्रतिसादामुळे स्नेह मिळतो, परंतु आत्ता आठवणीला शक्तिशाली अग्नी रूप बनवा.परत तो दिवस पण येईल जे सन्मूख पोहचाल.

वरदान:-
नेहमीआत्मिकस्थितीमध्येराहूनदुसऱ्यांनापणआत्मापाहणारे,आत्मिकगुलाबभव.

आत्मिक गुलाब म्हणजे ज्यांच्यामध्ये नेहमी आत्मिक सुगंध आहे. आत्मिक सुगंध वाले जे पण पाहतील, ज्यांना पण पाहतील तर, आत्म्याला पाहतील शरीराला नाही. तर स्वतः पण नेहमी आत्मिक स्थितीमध्ये रहा आणि दुसर्यांना पण आत्मा पहा.जसे बाबा श्रेष्ठ आहेत, तसेच त्यांची बाग पण सर्वश्रेष्ठ आहे, ज्या बागेचा विशेष शृंगार आत्मिक गुलाब तुम्ही मुलं आहात. तुमचा आत्मिक सुगंध अनेक आत्म्यांचा कल्याण करणारा असेल.

सुविचार:-
मर्यादा तोडून कोणाला पण सुख दिले तर, ते पण दुःखाच्या खात्यामध्ये जमा होईल.