03-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हीच खरे अलौकिक जादूगार आहात, तुम्हाला मनुष्यांना देवता बनवण्याची जादू दाखवयाची आहे"

प्रश्न:-
चांगल्या पुरुषार्थी विद्यार्थ्यांची लक्षणें कोणती असतील?

उत्तर:-
चांगल्या गुणांनी पास होण्याचे म्हणजेच विजय माळेमध्ये येण्याचे लक्ष ठेवतील. त्यांच्या बुद्धीमध्ये एक बाबांची आठवण राहील. देहसहित देहाच्या सर्व संबंधापासून बुद्धी योग काढून, एक बाबांशी जोडतील. असे पुरुषार्थी माळेचा मणी बनतात.

ओम शांती।
आत्मिक मुलांप्रति बाबा सन्मुख समजावत आहेत. आता तुम्ही आत्मिक मुलं जादूगर-जादूगरनी बनले आहात, म्हणून बाबांना जादूगर म्हणतात. असे कोणी जादूगर मनुष्य नसतील, जे मनुष्यांना जादूगर बनवतील. ही जादूगरी आहे ना. मोठी कमाई करण्याचा रास्ता तुम्ही सांगत आहात. शाळेमध्ये शिक्षक पण कमाई करणे शिकवतात. शिक्षण कमाई आहे ना. भक्तिमार्गाच्या कथा, ग्रंथ त्याला शिक्षण म्हणत नाहीत, त्यामध्ये काही कमाई नाही, फक्त पैसे खर्च होतात. बाबा पण समजवतात, भक्तीमार्गात चित्ररथ बनवतात, मंदिर इत्यादी बनवतात, भक्ती करत-करत तुम्ही खूप पैसे खर्च केले आहेत. शिक्षक तरीही कमाई करवतात, त्याद्वारे उपजीविका, उदरनिर्वाह होतो. तुम्हा मुलांचे शिक्षण खूपच उच्च आहे, हे शिक्षण सर्वांना घ्यायचे आहे. तुम्ही मुलं मनुष्यापासून देवता बनणारे आहात. त्या शिक्षणामध्ये तर वकील इत्यादी बनतील, तेही एक जन्मासाठी. रात्रंदिवसा चा फरक आहे म्हणून तुम्हा आत्म्यांना शुद्ध नशा राहायला पाहिजे. हा गुप्त नशा आहे. बेहद बाबांची तर कमाल आहे, कशी आत्मिक जादू आहे. आत्म्याने आठवण करत-करत सतोप्रधान बनायचे आहे. ते संन्यासी लोक म्हणतात ना, तुम्ही समजा मी म्हैस आहे, असे समजून एका खोलीमध्ये बसले आणि समजू लागला मी म्हैस आहे, खोलीच्या बाहेर कसे येऊ? आता बाबा म्हणतात तुम्ही पवित्र आत्मा होते, आता अपवित्र बनले आहात, परत बाबांची आठवण करत करत, तुम्ही पवित्र बना. या ज्ञानाला ऐकून नरापासून नारायण म्हणजे मनुष्यांपासून देवता बनतात. देवतांचे पण सार्वभौमत्व राज्य आहे. तुम्ही मुलं आता श्रीमतावरती भारतामध्ये राज्य स्थापन करत आहात. बाबा म्हणतात आता मी जे तुम्हाला श्रीमत देतो, हे बरोबर आहे की, ग्रंथाचे मत बरोबर आहे? तुम्हीच निर्णय करा. गीता सर्व शास्त्र शिरोमणी भगवद्गीता आहे, त्यामध्ये खास लिहिले आहे. आता भगवान कोणाला म्हटले जाते? जरूर सर्व निराकार शिवालाच भगवान म्हणतील. आम्ही आत्मे भाऊ भाऊ आहोत, एकच पिता आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही सर्व, मज साजनच्या सजनी आहात. मज साजनची आठवण करतात कारण मीच राजयोग शिकवला होता, ज्याद्वारे तुम्ही प्रत्यक्षात नरा पासून नारायण बनतात. ते तर म्हणतात की आम्ही सत्य नारायणाची कथा ऐकत आहोत. हे कोणी थोडेच समजतात की, याद्वारे आम्ही नरापासून नारायण बनू. बाबा तुम्हा आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात, ज्याद्वारे आत्मा जाणू शकते. आत्म्याच्या राहण्याच्या स्थानाला निर्वाणाधाम म्हटले जाते. तुम्हा मुलांना आत्ता शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे. या दुःखधामाला बुद्धीने विसरायचे आहे. आत्म्याला तर समज मिळाली आहे, बरोबर काय आहे? चूक काय आहे? कर्म, अकर्म, विकर्माचे रहस्य पण समजवले आहे. बाबा मुलांनाच समजवतात आणि मुलंच जाणतात. दुसरे मनुष्य तर बाबांना जाणत नाहीत. हे वैश्विक नाटक बनलेले आहे. रावण राज्यामध्ये सर्व कर्म विकर्मच होतात. सतयुगा मध्ये कर्म अकर्म होतात. कोणी विचारतात, तेथे मुले इत्यादी होत नाहीत का? तुम्ही सांगा त्या दुनियेला निर्विकारी दूनिया म्हटले जाते, तर तेथे पाच विकार कुठून आले? ही तर खूप सरळ गोष्ट आहे. हे बाबा सन्मुख समजवतात. जे बरोबर समजतात, ते लगेच सेवा करत राहतात. कोणी समजत पण नाहीत. पुढे चालून समजतील. शमा वरती पतंगे येतात, परत चालले जातात आणि परत येतात. ही पण शमा आहे, सर्व जळून नष्ट होतील. हे पण समजवले जाते, बाकी शमा कोणी नाही. ते तर साधारण आहे. दिव्या वरती पतंग खूप जळत राहतात. दिवाळीमध्ये अनेक लहान लहान मच्छर निघतात आणि नष्ट होतात. जगणे आणि मरणे. बाबा पण समजवतात, अंत काळात जन्म घेतात परत मरतात. ते तर मच्छरा सारखे झाले. बाबा वारसा देण्यासाठी आले आहेत, तर पुरुषार्थ करून चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे. हुशार विद्यार्थी खूप पुरुषार्थ करत राहतात. ही माळ पण चांगल्या मार्काने पास होणाऱ्यांची आहे. जेवढे शक्य आहे तेवढा पुरुषार्थ करत राहा. विनाशकाल विपरीत बुद्धि म्हणतात ना, यावरती पण तुम्ही समजावू शकतात. आमची बाबांच्या सोबत प्रित बुद्धी आहे. एक बाबांच्या शिवाय आम्ही कोणाची आठवण करत नाहीत. बाबा म्हणतात देह सहित देहाचे सर्व संबंध सोडून माझीच आठवण करा. भक्तिमार्गा मध्ये खूप आठवण करत आले आहेत, हे दुखहर्ता सुखकर्ता. तर जरूर बाबा सुख देणारे आहेत ना. स्वर्गाला सुखधाम म्हटले जाते. बाबा समजवतात मी पावन बनवण्यासाठी आलो आहे. जे मुलं काम चितेवरती भस्म झाले आहेत, त्यांच्यावरती ज्ञानाची वर्षा करतो. तुम्हा मुलांना योग शिकवतो- बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही परिस्थानचे मालक बनाल. तुम्ही पण जादूगर आहात ना. मुलांना नशा राहायला पाहिजे, आमची ही खरी-खुरी जादूगरी आहे. कोणी कोणी खूप हुशार जादूगर असतात, काय काय गोष्टी काढत राहतात. ही जादुगरी परत अलौकिक आहे, म्हणजेच एक शिवबाबा शिवाय दुसरे कोणी शिकवू शकत नाही. तुम्ही जाणतात आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत. हे ज्ञान नवीन दुनियेसाठी आहे. सतयुग नवीन दुनिया म्हटले जाते. आता तुम्ही संगमयुगात आहात. या पुरुषोत्तम संगमयुगा बद्दल कोणालाही माहिती नाही. तुम्ही खूप उत्तम पुरुष बनतात. बाबा आत्म्यांनाच समजवतात. मुरलीच्या वर्गामध्ये तुम्ही ब्राह्मणी जेव्हा बसतात, तर तुमचे काम आहे प्रथम सावधान करणे, भावांनो आणि बहिणींनो स्वतःला आत्मा समजून बसा. आम्ही आत्मा कर्मेंद्रिया द्वारे ऐकत आहोत. ८४ जन्माचे रहस्य पण बाबांनी समजवले आहे. काही मनुष्यच ८४ जन्म घेतात, सर्व तर ८४ जन्म घेऊ शकणार नाहीत. या विषयावरती पण कोणाचा विचार चालत नाही. जे ऐकले ते सत्य मनात राहतात, हनुमान पवन पासून निघाला, सत्यच समजतात. दुसऱ्यांना पण अशा गोष्टी ऐकवत राहतात आणि सत्य सत्य करत राहतात.

आता तुम्हाला सत्य-असत्य समजण्यासाठी ज्ञान मिळाले आहे. तर श्रेष्ठ कर्मच करायचे आहेत. तुम्ही समजता आम्ही बेहद पित्यापासून वारसा घेत आहोत. तुम्ही सर्व पुरुषार्थ करा. ते सर्व आत्म्याचे पिता आहेत. तुम्हा सर्वांना बाबा म्हणतात, आता माझी आठवण करा, स्वतःला आत्मा समजा. आत्म्यामध्येच संस्कार आहेत. आत्माच संस्कार घेऊन जाते, तर काहींचे लहानपणीच नाव प्रसिद्ध होते. तर समजले जाते यांनी पूर्वजन्मात श्रेष्ठ कार्य केले असतील. कोणी कॉलेज इत्यादी बनवले तर दुसऱ्या जन्मा मध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात. कर्माचा हिशोब आहे ना. सतयुगामध्ये विकर्माची गोष्टच राहत नाही, कर्म तर जरूर करतात. राज्य करतील, भोजन करतील परंतु उलटे कर्म करणार नाहीत, त्याला राम राज्य म्हटले जाते. येथे रावण राज्य आहे. आता तुम्ही श्रीमतावरती रामराज्याची स्थापना करत आहात. ती नवीन दुनिया आहे. जुन्या दुनियेत देवतांची सावली पण पडत नाही. लक्ष्मीचे जड चित्र ठेवा, तर सावली पडेल, चैतन्याची तर पडू शकत नाही. तुम्ही मुलं जाणतात सर्वांना पुनर्जन्म घ्यावाच लागतो. विहिरीतून राहाट द्वारे पाणी काढतात, तर ते चक्र फिरत राहते. हे पण तुमचे चक्र फिरत राहते, यावरती अनेक उदाहरण देऊन समजावले जाते. पवित्र राहणे तर चांगले आहे, कुमारी पवित्र आहेत तर सर्व तिच्या पाया पडतात. तुम्ही प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी आहात. बहुतांश कुमारी आहेत म्हणून गायन आहे, कुमारी द्वारे बाण मारले गेले, हे ज्ञानाचे बाण आहेत ना. तुम्ही प्रेमाने सन्मुख समजावत राहतात. शिव पिता सद्गुरू तर एकच आहेत. तेच सर्वांचे सदगती दाता आहेत. भगवानुवाच मनमनाभव, हा पण मंत्र आहे ना, यामध्येच कष्ट आहेत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, हे गुप्त कष्ट घ्यायचे आहेत. आत्माच तमोप्रधान बनली आहे, परत सतोप्रधान बनायचे आहे. बाबांनी समजावले आहे, आत्मा आणि परमात्मा वेगळे राहिले बहूकाळ. . . जे प्रथम बाबा पासून दुरावतात, तर तेच प्रथम भेटतात, म्हणून बाबा म्हणतात तुम्ही खूप लाडके, फार फार वर्षांपूर्वी भेटलेले मुलं आहात. बाबा जाणतात भक्ती कधीपासून सुरू झाली, अर्धे-अर्धे आहे ना. अर्धा कल्प ज्ञान, म्हणजे अर्धा कल्प दिवस. दिवस आणि रात्री मध्ये चोवीस घंटे असतात, त्यामध्ये पण १२ तास मध्यांन पुर्व आणि १२ तास मध्यांन नंतर असतात. कल्प पण अर्धे आहे ना. ब्रह्मा चा दिवस आणि ब्रह्माची रात्र, परत कलियुगाचा कालावधी इतका जास्त का दाखवतात. आता तुम्ही बरोबर चुकीचे सांगू शकतात. हे ग्रंथ सर्व भक्तिमार्गाचे आहेत, परत भगवान येऊन भक्तीचे फळ देतात. भक्तांचे रक्षक म्हटले जाते ना. पुढे चालून तुम्ही संन्याशांना खूप प्रेमाने सत्य ज्ञान समजून सांगाल, तुमचे पत्रक(फाॅर्म) तर ते भरुन देणार नाहीत. मात पित्याचे नाव लिहणार नाहीत. कोणी कोणी सांगतात पण. ब्रह्मा बाबा जाऊन विचारत होते, तुम्ही का सन्यास केला? कारण सांगा? विकारांचा संन्यास करतात तर घराचा पण संन्यास करतात. आता तर तुम्ही सर्व जुन्या दुनियेचा संन्यास करतात. नवीन दुनियेचा तुम्हाला साक्षात्कार केला आहे. ती तर निर्विकारी दुनिया आहे. ईश्वरीय स्वर्गीय पिता, स्वर्ग स्थापन करणारे आहेत, फुलांची बाग बनवणारे आहेत. काट्यांना फुला सारखे बनवतात, म्हणजे विकारी मनुष्यांना देवता बनवतात. क्रमांक एकचा काटा आहे काम कटारी चालवणे. काम विकारालाच कटारी म्हणतात, क्रोधाला भूत म्हणतात. देवी-देवता तर दुहेरी म्हणजे डबल अहिंसक होते. निर्विकारी देवतांच्या पुढे विकारी मनुष्य डोके टेकतात, पाया पडतात. आता तुम्ही मुलं जाणतात, आम्ही येथे ज्ञान घेण्यासाठी आलो आहोत. बाकी त्या सत्संग इत्यादीमध्ये जाणे तर साधारण गोष्ट आहे. ते ईश्वराला सर्वव्यापी समजतात. पिता कधी सर्वव्यापी असतात काय? त्यांच्याद्वारे तर तुम्हा मुलांना वारसा मिळतो. बाबाच नवीन दुनिया स्वर्ग बनवतात. काही तर नर्काला पण नर्क मानत नाहीत. सावकार लोक समजतात, स्वर्गामध्ये काय ठेवले आहे? आमच्या जवळ धन, महल, विमान इत्यादी सर्व काही आहे, तर समजतात आमच्यासाठी येथेच स्वर्ग आहे. नर्क त्यांच्यासाठी आहे, जे झोपडपट्टीमध्ये राहतात. भारत खूप गरीब बनला आहे, परत इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. तुम्हाला नशा राहिला पाहिजे, बाबा आम्हाला परत दुहेरी मुकुटधारी बनवत आहेत. भूत- वर्तमान-भविष्याला तुम्ही जाणले आहे. सतयुग त्रेताची गोष्ट बाबांनी सांगितली आहे, परत मध्य काळात विकारत जात राहतात. वाम मार्ग म्हणजे विकारी मार्ग आहे. आता परत बाबा आले आहेत. तुम्ही स्वतःला स्वदर्शन चक्रधारी समजतात. असे नाही की सुदर्शन चक्र फिरते, ज्याद्वारे गळा कापला जातो. कृष्णाला सुदर्शन चक्र दाखवतात, त्याद्वारे राक्षसांना मारले असे म्हणतात. अशा गोष्टी तर होऊ शकत नाहीत. तुम्ही समजतात आम्ही ब्राह्मण स्वदर्शन चक्रधारी आहोत. आम्हाला सृष्टीच्या आधी मध्यं अंतचे ज्ञान आहे. स्वर्गामध्ये तर देवतांना हे ज्ञान राहत नाही. तेथे सद्गती असल्यामुळे त्याला दिवस म्हटले जाते. रात्री मध्येच कष्ट होतात. ईश्वराच्या दर्शनासाठी भक्तीमध्ये खूप हठयोग इत्यादी करतात. नवविध भक्ती करणारे, प्राण देण्यासाठी पण तयार होतात, तेव्हा कुठे साक्षात्कार होतो. अल्पकाळाची इच्छा पूर्ण होते, ते पण वैश्विक नाटकानुसार होते. बाकी ईश्वर काही करत नाहीत. अर्धा कल्प भक्तीची भूमिका चालत राहते, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या आत्मिक नशे मध्ये राहायचे आहे की, बाबा आम्हाला दुहेरी मुकुटधारी बनवत आहेत. आम्ही स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण आहोत. भूत वर्तमान आणि भविष्याची ज्ञान बुद्धीमध्ये ठेवुन चालायचे आहे.

(२) चांगल्या मार्काने पास होण्यासाठी बाबांशी खरेखुरे प्रेम ठेवायचे आहे. बाबांची आठवण करण्यासाठी गुप्त कष्ट घ्यायचे आहेत.

वरदान:-
सर्व गुणांच्या अनुभवाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे अनुभवी मूर्त स्वरूप.

जे बाबांचे गुण गायन करतात, त्या सर्व गुणांचे अनुभवी बना. जसे बाबा आनंदाचे सागर आहेत, तर त्या आनंदाच्या सागरामध्ये मस्त रहा. जे पण संपर्कामध्ये येतील, त्यांना आनंद, प्रेम, सुख, शांती. . . . सर्व गुणांची अनुभती करवत राहा. असेच सर्व गुणांचे अनुभवी मूर्त बना, तर तुमच्या द्वारे बाबांचे कर्म प्रत्यक्ष होतील, कारण तुम्ही महान आत्मेच परमात्म्याला आपल्या अनुभवी मूर्त द्वारे प्रत्यक्ष करू शकतात.

बोधवाक्य:-
कारणला निवारण मध्ये परिवर्तन करून, अशुभ गोष्टींना पण शुभ गोष्टीत परिवर्तन करा.