03-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुमचे हे गीत संजीवनी बुटी आहेत, हे ऐकल्यानंतर आळस निघून जाईल"

प्रश्न:-
अवस्था बिघडण्याचे कारण कोणते आहे? कोणत्या युक्ती द्वारे अवस्था चांगली राहू शकते?

उत्तर:-
ज्ञानाचा डान्स करत नाहीत,व्यर्थ चिंतना मध्ये आपला वेळ वाया घालवतात म्हणून आवस्था बिघडते.(२)- दुसऱ्यांना दुखवले तर त्याचा परिणाम अवस्थे वरती होतो,अवस्था तेव्हाच चांगली राहील जेव्हा गोड बणुन चालतात, आठवणीच्या यात्रे वरती लक्ष ठेवतात.रात्री झोपण्याच्या अगोदर,कमीत कमी अर्धा तास आठवणीमध्ये बसा आणि परत सकाळी उठून आठवण करा,तर अवस्था चांगली राहील.

গীতঃ-
कोण आले माझ्या मनाच्या द्वारे....

ओम शांती।
हे गीत पण बाबांनी,मुलांसाठी बनवले आहेत.याचा अर्थ पण मुलांशिवाय कोणी जाणू शकत नाही.बाबांनी अनेक वेळा समजावले आहे, असे चांगले चांगले गीत घरी पाहिजेत,ज्यामुळे आळस निघून जाईल.तर हे गीत ऐकल्यानंतर बुद्धीमध्ये त्याचा अर्थ येईल आणि आळस निघून जाईल. तर हे गीत पण संजीवनी बुटी आहेत.बाबा सूचना देतात परंतु काही जणच आचरणा मध्ये आणतात.आता हे गीता मध्ये कोण म्हणते की,आपल्या सर्वांच्या मनामध्ये कोण आले आहे,जे येऊन ज्ञानाचा डान्स करतात.गोपिका कृष्णा कडून डान्स करवून घेत होत्या,असे म्हणतात परंतू असे काही नाही.आता बाबा म्हणतात हे शाळीग्राम मुलांनो,सर्वांना म्हणतात.शाळा म्हणजे शाळा,जिथे शिक्षण होते.ही पण शाळा आहे,तुम्ही मुलं जाणता आमच्या मनामध्ये कोणाची आठवण येते.दुसऱ्या कोणत्या ही मनुष्य मात्राच्या बुद्धीमध्ये यागोष्टी नाहीत.ही एकच वेळ आहे,जेव्हा तुम्हा मुलांना त्यांची आठवण राहते आणि दुसऱ्या कोणाची आठवण राहत नाही.बाबा म्हणतात तुम्ही रोज माझी आठवण करा तर धारणा चांगली होईल.जसे मी सूचना देतो तशी तुम्ही आठवण करत नाही,माया तुम्हाला आठवण करू देत नाही.मी सांगितल्या प्रमाणे कमी मुलं चालतात आणि मायेच्या सांगण्यानुसार अनेक जण चालतात.बाबानी अनेक वेळेस सांगितले आहे रात्री झोपण्याच्या अगोदर अर्धा तास बाबांच्या आठवणी मध्ये बसायला पाहिजे.स्त्री-पुरुष आहेत,एकत्र बसा किंवा वेगवेगळे बसा,बुद्धीमध्ये एका बाबांची आठवण हवी परंतु थोडेच अशी आठवण करतात. माया विसरायला लावते,आदेशावर चालत नाहीत तर पद कसे मिळेल.बाबांची खुपआठवण करायची आहे.शिवबाबा आमचे पिता आहेत सर्वांना बाबांकडून वारसा मिळणार आहे.जे पुरुषार्थ करत नाहीत,त्यांना पण वारसा मिळेल.ब्रह्मण्डचे मालक तर सर्व बनतील.सर्व आत्मे निर्वाणधाम मधुन अविनाश नाटका नुसार येतील,जरी काहीच केले नाही.भक्ती करतात परंतु परत कोणी जाऊ शकत नाही,जोपर्यंत मी गाईड बणुन येत नाही.कोणी रस्ता पाहिलाच नाही,जर पाहिला असेल तर त्यांच्या पाठीमागे सर्व मच्छरा सारखे जातील.मूळ वतन काय आहे,हे पण कोणी जाणत नाही.तुम्ही मुलं जाणता हे पूर्वनियोजित नाटक आहे,याची पुनरावृत्ती होत राहते.दिवसांमध्ये तर कर्मयोगी बनवून कामधंदा करायचा आहे,जेवण बनवणे इत्यादी सर्व कर्म करायचे आहेत.वास्तव मध्ये कर्म संन्यास म्हणणे पण चुकीचे आहे,कर्मा शिवाय तर कोणीही राहू शकत नाही.कर्म संन्यास खोटे नाव ठेवले आहे,तर दिवसामध्ये खुशाल कामधंदा इत्यादी करा,रात्री आणि सकाळी बाबांची चांगल्या रितीने आठवण करा.ज्यांना आपले बनवले आहे त्याची आठवण करा, तर मदत पण मिळेल, नाहीतर मिळणार नाही.साहुकारांचे तर बाबांचे बनण्यासाठी हृदय विदीर्ण होते,परत श्रेष्ठ पद पण मिळणार नाही.बाबांची आठवण करणे तर खूपच सहज आहे.तेच पिता शिक्षक गुरु आहेत,आम्हाला सर्व रहस्य सांगत आहेत,जगाचा इतिहास आणि भूगोल कसा पुनरावृत्त होतो.बाबांची आठवण करायची आहे आणि सुदर्शन चक्र फिरवायचे आहे.सर्वांना परत घेऊन जाणारे बाबच आहेत.अशा विचारांमध्ये राहायला पाहिजे.रात्री झोपताना पण हे ज्ञान बुद्धीमध्ये फिरायला पाहिजे,सकाळी उठताच हे ज्ञान आठवणीत राहावे.आम्ही ब्राह्मणच क्षत्रिय वैश्य शूद्र बनू.बाबा परत आम्ही शूद्र पासून ब्राह्मण बनू.बाबा त्रिमूर्ती, त्रिकालदर्शी त्रिनेत्री पण आहेत.आमच्या बुद्धीचे कुलुप उघडतात,तिसरा नेत्र पण ज्ञानाचा मिळतो.असे पिता तर दुसरे कोणी होऊ शकत नाहीत.बाबा रचना करतात तर माता पण झाली.जगत अंबेला निमित्त बनवतात.बाबा या तना मध्ये येऊन, ब्रह्मा रुपा द्वारे खेळतात,फिरायला पण जातात.आम्ही बाबांची आठवण तर करतो ना.तुम्ही जाणतात बाबा या रथामध्ये येतात.तुम्ही म्हणणार बापदादा बरोबर आम्ही खेळत आहोत. खेळामध्ये पण बाबा पुरुषार्थ करवुन घेतात, आठवण करण्याचा.बाबा म्हणतात मी यांच्याद्वारे खेळत आहे,चैतन्य तर आहेत ना.तर असे विचार करायला पाहिजेत.अशा पित्यावर तर बळी जायचे आहे.भक्तिमार्ग मध्ये तुम्हीच गात होते आम्ही बळी जाऊ,कुर्बान जाऊ इत्यादी.आता बाबा म्हणतात आम्हाला एक जन्म आपला वारस बनवा,तर मी २१ जन्मासाठी राज्य भाग्य देईल.बाबा आदेश देतात तर त्यांच्या सूचनेनुसार चालायला पाहिजे.ते पण जसे पाहतील,तशाच सूचना देतील,सूचनेवर चालण्यामुळे ममत्व नष्ट होईल,परंतु काही जण घाबरतात.बाबा म्हणतात तुम्ही बळी जात नाहीत तर मी वारसा कसा देईल.तुमचे पैसे कोणी थोडेच घेऊन जातात.बाबा म्हणतात तुमच्याकडे पैसे आहेत तर हे साहित्य छापा.बाबा तर विश्वस्त आहेत ना.बाबा मत देत राहतात.बाबांचे सर्वकाही मुलांसाठी आहे,मुलांकडून काहीच घेत नाहीत, युक्तीने समजावतात,फक्त ममत्व नष्ट व्हावे.मोह पण खूप कडक आहे,(माकडाचे उदाहरण आहे) बाबा म्हणतात तुम्ही माकडासारखा मोह का ठेवतात?परत घराघरां मध्ये मंदिर कसे बनेल.मी तुम्हाला माकडपणा पासून सोडवून मंदिर लायक बनवतो.तुम्ही या कचरा पट्टी मध्ये ममत्व का ठेवतात?बाबा फक्त मत देतात,कसे सांभाळ करायचे.तरीही बुद्धीमध्ये बसत नाही,हे सर्व बुद्धीचे काम आहे.

बाबा मत देतात अमृतवेले पासून,बाबांशी कशा गोष्टी करायच्या.बाबा तुम्ही पिता,शिक्षक,आणि गुरु पण आहात.तुम्हीच दुनियेचा इतिहास-भूगोल सांगू शकतात.लक्ष्मीनारायण च्या ८४ जन्माची कहानी, दुनिये मध्ये कोणीच जाणत नाही.जगत अंबाला माता पण म्हणतात,ते कोण आहेत?सतयुगा मध्ये तर होऊ शकत नाहीत.तेथे महाराजा महाराणी लक्ष्मी नारायण असतात.त्यांना आपला मुलगा आहे,जो सिंहासनावर बसेल.आम्ही त्यांची मुलं कसे बनायचे,जे राजसिंहासन वरती बसू.रात्री बाबांच्या आठवणी मध्ये बसण्याचा नियम बनवा,हे खूपच चांगले आहे. नियम बनवाल तर तुम्हाला खुशीचा पार चढेल.त्यामध्ये काहीच कष्ट नाहीत.एक पित्याची मुलं आपसामध्ये भाऊ बहिण आहोत,परत विकारी दृष्टी ठेवणे,हा अपराध आहे.नशा पण सतो रजो तमोगुणी असतो ना.तमोगुणी नशा चढला तर विकारा मध्ये जाल. थोडा वेळ बाबांची आठवण करून बाबांच्या सेवा वरती जावा,परत मायचे तुफान पण येणार नाहीत. तो नशा दिवस भर राहील आणि अवस्था पण चांगली राहील.योगाची लाईन पण स्पष्ट होईल.असे काही गीत खूप चांगले आहेत.गीता ऐकताच मनामध्ये डान्स सुरु कराल,ताजेतवाने बनाल.चार पाच गीत खूपच चांगले आहेत.गरीब पण बाबांच्या सेवेमध्ये लागले तर त्यांना महल मिळू शकतो.शिवबाबाच्या भंडाऱ्या द्वारे सर्व काही मिळू शकते.सेवाधारी ला बाबा, देणार नाहीत काय? बाबा चा भंडारा भरपूर आहे.हे गीत म्हणजेच ज्ञानाचा डान्स आहे.बाबा येऊन गोप गोपींना ज्ञान डांस करवतात.तुम्ही कुठेही बसले आहात,तरी बाबांची आठवण करत राहा,तर खूपच चांगली अवस्था राहील.जसे बाबा ज्ञान योगाच्या नशा मध्ये राहतात,तसेच तुम्हा मुलांना पण शिकायचे आहे, तर खुशीचा पारा चढेल.नाही तर व्यर्थ चिंतनामध्ये राहिल्यामुळे अवस्था बिघडून जाईल.पहाटे उठणे तर खूपच चांगले आहे.बाबा च्या आठवणी मध्ये बसून बाबांशी गोड गोष्टी करायला पाहिजेत.भाषण करणाऱ्यांना तर खूपच विचार सागर मंथन करावा लागेल.आज या गोष्टीवर समजुन सांगायचे आहे, असे समजावू.बाबांना अनेक मुलं म्हणतात,आम्ही नोकरी सोडू का?परंतु बाबा म्हणतात प्रथम सेवा करण्याचा पुरावा द्या.बाबांची आठवण करण्याची युक्ती तर खूपच चांगली सांगितली आहे,परंतु करोडो मधून काही निघतात,ज्यांना ही सवय आहे.कोणाला तर खूपच मुश्किल आठवण राहते.तुम्हा कुमारींचे तर नाव प्रसिद्ध आहे.कुमारींच्या पाया तर सर्व पडतात.तुम्ही २१जन्मासाठी भारताला स्वराज्य देतात.तुमचे यादगार मंदिर पण आहेत.ब्रह्माकुमार कुमारीचे नाव तर प्रसिद्ध झाले आहे.कुमारी तीच आहे,जी २१ कुळाचा उद्धार करेल.तर त्याचा अर्थ पण समजून सांगावा लागेल.तुम्ही मुलं जाणता हा पाच हजार वर्षाचा रीळ आहे.जे काही झाले ते नाटक. काही चूक झाली तर नाटकच म्हणणार.परत पुढील गोष्टीसाठी आपले रजिस्टर ठीक करायला पाहीजे. परत रजिस्टर खराब व्हायला नको.यामध्ये खूपच कष्ट आहेत,तेव्हाच उच्च पद मिळू शकेल.बाबा चे बनले तर बाबा वारसा तर देतील ना.सावत्र मुलाला थोडा़च वारसा देतील?मदत देणे बाबांचे कर्तव्य आहे.समजदार तेच आहेत जे प्रत्येक गोष्टींमध्ये मदत करतात.बाबा पहा किती मदत करतात. हिम्मत ते मर्दा मददे खुदा.मायेला जिंकण्यासाठी पण ताकत पाहिजे.एका आत्मिक पित्याची आठवण करायची आहे आणि बाकी सर्व संगत सोडून एक बाबांशी संग जोडायचा आहे.बाबा ज्ञानाचे सागर आहेत.ते म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश करून बोलतो.दुसरे तर कोणी असे म्हणू शकणार नाही,मी पिता शिक्षक आणि गुरु आहे, ब्रह्मा विष्णू शंकर ला रचणारा आहे,या गोष्टीला तुम्ही मुलंच समजतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादा ची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जुन्या कचरा पट्टी मध्ये ममत्व ठेवायचे नाही.बाबांच्या सूचनेनुसार चालून,ममत्व नष्ट करायचे आहे.विश्वस्त बणुन राहयचे आहे.

(२) या अंतिम जन्मांमध्ये भगवंताला आपले वारस बणुन त्यांच्यावरती बळी जायचे आहे.तेव्हाच २१ जन्माचे राज्य भाग्य मिळेल. बाबांची आठवण करून सेवा करायची आहे. नारायणी नशेमध्ये राहायचे आहे.रजिस्टर कधीच खराब व्हायला नको,यावरती लक्ष द्यायचे आहे.

वरदान:-
परमात्मा लगन द्वारे स्वतःला किंवा विश्वाला निर्विघ्न बनवणारे तपस्वी मूर्त भव.

एका परमात्माच्या लगन मध्ये राहणेच तपस्या आहे. या तपस्येचे बळच स्वतःला आणि विश्वाला नेहमीसाठी निर्विघ्न बनवू शकते.निर्विघ्न राहणे आणि निर्विघ्न बनवणेच तुमची खरी सेवा आहे,जी अनेक प्रकारच्या विघ्ना पासून सर्वांना मुक्त करते.असे सेवाधारी मुलं तपस्याच्या आधारावरती,बाबा पासून जीवन मुक्तीचे वरदान घेऊन दुसऱ्यांना देण्याचे निमित्त बनतात.

बोधवाक्य:-
अनेक ठिकाणच्या स्नेहाला समेटून एकाच बाबांशी स्नेह ठेवा,तर कष्टा पासून मुक्त व्हाल.