04-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,पावला-पावला वरती बाबांच्या श्रीमतावर चालत राहा,एका बाबांकडून च ऐका तर
मायेचा आघात होणार नाही"
प्रश्न:-
उच्च पद
प्राप्त करण्याचा आधार कोणता आहे?
उत्तर:-
उच्च पद प्राप्त करण्यासाठी बाबाच्या प्रत्येक श्रीमतानुसार चालत राहा.बाबांच्या
सूचना मिळाल्या आणि मुलांनी त्या स्वीकारल्या.दुसरे कोणतेही संकल्प यायला नको.या
आत्मिक सेवेमध्ये तत्पर रहा.तुम्हाला दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको. तुम्ही मेले
तर ही दुनिया पण मेल्या सारखीच आहे,तेव्हाच उच्च पद मिळू शकेल.
गीत:-
तुम्ही
मिळाल्यानंतर सर्व काही मिळाले…
ओम शांती।
गोडगोड आत्मिक मुलांनी हे गीत ऐकले.ते तर भक्ती मार्गातील गायन केलेले आहे.या वेळेत
बाबा याचे रहस्य समजवतात. मुलं पण समजतात,आत्ता आम्ही बेहद्दच्या बाबा कडून बेहद्दचा
वारसा घेत आहोत.ते राज्य आमच्याकडून कोई हिरावून घेऊ शकत नाही.भारतावर
मुसलमानांनी,इंग्रजांनी इत्यादीने राज्य केले.वास्तव मध्ये प्रथम तर रावणानी राज्य
केले आहे,तेही आसुरी मतावर.हे जे माकडाचे चित्र बनवले आहे, वाईट ऐकू नका,वाईट पाहू
नका, वाईट बोलू नका, याचे पण कोणते रहस्य असेल ना.बाबा समजवतात हे एकीकडे रावणाचे
आसुरी संप्रदाय आहेत,जे बाबांना जाणत नाहीत,दुसरीकडे तुम्ही मुलं आहात.तुम्ही पण
अगोदर जाणत नव्हते.बाबा यांच्यासाठी पण ऐकवतात की,यांनी खूप भक्ती केली आहे.यांचा
हा अनेक जन्मातील हा अंतीम जन्म आहे. हेच अगोदर पावन होते,आता पतीत बनले
आहेत,त्यांना मी जाणतो. आता तुम्ही दुसर्या कोणाचे ऐकू नका.बाबा म्हणतात मी तुम्हा
मुलांसोबतच गोष्टी करतो.कधी कोणी मित्र संबंधी इत्यादींना घेऊन येतात,तर थोड्या
गोष्टी करतो. प्रथम गोष्ट तर पवित्र बनने आहे, तेव्हाच बुद्धीमध्ये धारणा होईल.
येथील कायदे खूप खडक आहेत. अगोदर म्हणतात सात रोज भट्टीमध्ये राहायचे आहे, म्हणजे
सात दिवसाच राजयोग कोर्स करायचा आहे.दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको,न पत्र इत्यादी
लिहायचे आहे.खुशाल तुम्ही कुठेही राहा,परंतु सर्व दिवस भट्टीमध्ये राहायचे आहे.आता
तुम्ही भट्टीमध्ये राहून परत बाहेर येत आहात. काहीजण तर आश्चर्यवत हे ज्ञान ऐकतात,
सांगतात आणि परत अहो माया परत भागंती होतात.हे खूप मोठे लक्ष आहे.बाबांच्या
ज्ञानाच्या गोष्टी मानत नाहीत.बाबा म्हणतात तुम्ही तर वानप्रस्थी आहात.तुम्ही का
फसले आहात? तुम्ही तर या आत्मिक सेवेमध्ये तत्पर रहा.तुम्हाला दुसऱ्या कोणाची आठवण
यायला नको.तुम्ही मेले तर दुनिया पण मेल्यासारखी आहे. तेव्हाच उच्च पद मिळू शकेल.
तुमचा पुरुषार्थ नरापासून नारायण बनण्याचा आहे. पावला-पावलावरती बाबांच्या श्रीमंत
अनुसार चालावे लागेल परंतु यामध्ये खूप किंमत पाहिजे,फक्त सांगण्याची गोष्ट
नाही.मोहाची रग पण काही कमी नाही,नष्टोमोहा बनायचे आहे.माझे तर एक बाबा दुसरे कोणी
नाही.आम्ही तर बाबांचे शरण घेतो,आम्ही विष कधी देणार नाहीत.तुम्ही ईश्वराकडे आले
आहात,तर माया पण तुम्हाला सोडणार नाही, खूप त्रास देईल. असे वैद्य लोक म्हणतात,
औषधांद्वारे सर्व आजार अगोदर बाहेर निघतील,तुम्ही घाबरू नका. हे पण असेच आहे.माया
खूप त्रास देईल,वानप्रस्थ अवस्थांमध्ये पण विकारी संकल्प घेऊन येईल.मोह उत्पन्न
होईल.बाबा अगोदर संकेत देतात की, हे सर्व होईल.जोपर्यंत जगायचे आहे,तोपर्यंत मायेशी
बॉक्सिंग चालूच राहील.माया पैलवान बनवून तुम्हाला त्रास देईल, हे पण वैश्विक
नाटकांमध्ये नोंद आहे.मी थोडेच मायला म्हणू शकेल की विकल्प घेऊ नको.अनेक जण लिहतात
बाबा कृपा करा.मी थोडेच कोणावरती कृपा करेल.येथे तर तुम्हाला श्री मतावर चालायचे आहे,
जर कृपा केली तर सर्व महाराजा बनतील. हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद नाही.सर्व
धर्माचे येतात.तर जे दुसऱ्या-दुसऱ्या धर्मा मध्ये परिवर्तित झाले आहेत,ते परत निघून
येतील.दैधी धर्माचे कलम लागत आहे,यामध्ये खूप कष्ट आहेत.नवीन जे येतात त्यांना
सांगायचे आहे की,तुम्ही बाबांची आठवण करा.भगवान कोणी कृष्ण नाहीत.ते तर८४जन्मात
येतात.अनेक मतं,अनेक गोष्टी आहेत.ज्ञान बुद्धीमध्ये पुर्ण धारण करायचे आहे.आम्हीच
पतित होतो. आता बाबा म्हणतात, तुम्ही पावन कसे बनू शकता.कल्पापूर्वी पण म्हटले होते,
माझीच आठवण करा. स्वतःला आत्मा समजून देहाचे सर्व धर्म सोडून जिवंतपणी मरा.मज एक
पित्याचीच आठवण करा.मी सर्वांची सद्गती करण्यासाठी आलो आहे. भारतवासी च उच्च
बनतात,परत 84 जन्म घेऊन उतरतात.तुम्ही स्पष्ट करा, भारतवासीच या देवी देवतांची पूजा
करतात,तर हे कोण आहेत?हेच स्वर्गाचे मालक होते ना.आता कुठे आहेत?८४जन्म कोण घेतात?
सतयुगामध्ये हेच देवी देवता होते. आता परत या महाभारत लढाई द्वारे सर्वांचा विनाश
होणार आहे. आता सर्व पतित तमोप्रधान आहेत. मी पण त्यांच्या अनेक जन्माच्या अंत
काळामध्ये येऊन प्रवेश करतो. हे पूर्ण भक्त होते,नारायण ची पूजा करत
होते,यांच्यामध्ये प्रवेश करून परत यांनाच नारायण बनवतो. आता तुम्हाला पण पुरुषार्थ
करायचा आहे.ही दैवी राजधानी स्थापन होत आहे.माळ बनते ना.वरती निराकार फुलं परत मेरु
युगल.शिवबाबांच्या एकदम खाली हे उभा आहेत.जगतपिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती. आता
तुम्ही या पुरुषार्था द्वारे विष्णुपुरी चे मालक बनतात.प्रजा पण म्हणते ना,भारत आमचा
देश आहे.तुम्ही पण समजतात, आम्ही विश्वाचे मालक आहोत,आम्ही राज्य करू, बाकी कोणता
धर्म नसेल.असे नाही म्हणणार की,हे आमचे राज्य आहे,बाकी दुसऱ्या कोणाचे राजाई
नाही.येथे अनेक आहेत,आमचे, तुमचे चालते.स्वर्गामध्ये अशा गोष्टी नसतात.तर आता बाबा
समजवतात मुलांनो,बाकी सर्व गोष्टी सोडून माझीच आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.असे
नाही कोणी समोर बसून योग करवतील,दृष्टी देतील.बाबा तर म्हणतात चालता-फिरता बाबांची
आठवण करायची आहे.आपला चार्ट, दिनचर्या पहा,सर्व दिवसांमध्ये किती आठवण केली?सकाळी
उठून किती वेळ बाबांशी गोष्टी केल्या.आज बाबांच्या आठवणी मध्ये बसलो? असे असे विचार
सागर मंथन करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञान बुद्धीमध्ये आहे परत दुसऱ्यांना पण
समजावयाचे आहे.हे कोणाच्या बुद्धीमध्ये नाही की,काम विकार महाशत्रू आहे.दोन-चार
वर्षे पवित्र राहून परत मायेची चापट जोरात लागल्यामुळे, परत विकारात जातात.परत मुलं
लिहतात,बाबा आम्ही काळे तोंड केले.बाबा म्हणतात, काळे तोंड करणाऱ्यांना म्हणजे
विकारी बनणाऱ्यांना,बारा महिने मधुबन मध्ये येण्याची मना आहे.तुम्ही बाबाची
प्रतिज्ञा करुन परत विकारांमध्ये गेले तर,माझ्याजवळ कधीच येऊ नका.मोठे लक्ष आहे.
बाबा पतितांतपासून पावन बनवण्यासाठी च आले आहेत. अनेक मुलं लग्न करून पवित्र राहतात,
होय,कोणत्या मुलींना मार खावा लागतो, तर त्यांना वाचवण्यासाठी गंधर्व विवाह करून
पवित्र राहतात.त्यामध्ये कोणा-कोणाला तर माया एकदम नाकाला पकडते,तर हार खातात.
स्त्रिया पण खूप हार खातात.बाबा म्हणतात तुम्ही तर जसे शुर्पणखा आहात.ही सर्व नावं
यावेळीतील आहेत.येथे तर बाबा कोणत्या विकारींना बसू पण देत नाहीत.पावला-पावला वरती
बाबांचे मत घ्यावे लागेल.समर्पित झाले तर, परत बाबा म्हणतात आता ट्रस्टी,विश्वस्त
बना,श्रीमतावर चालत राहा.जमाखर्च देतील तर बाबा पण मत देतील.या खूप समजण्याच्या
गोष्टी आहेत.तुम्ही जरी भोग लावत असले, परंतु मी तर खात नाही.मी तर दाता आहे,अच्छा.
गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
रात्री क्लास १५ / ६ / ६८ :- भूतकाळात जे होऊन गेले त्याची पुनरावृत्ती,उजळणी
केल्यामुळे,ज्यांचे हृदय कमजोर आहे,त्यांच्या ह्रदयाच्या कमजोरीची पण पुनरावृत्ती
होते,म्हणून मुलांनी वैश्विक नाटकावर आधारित राहायचे आहे.आठवणी मध्येच मुख्य फायदा
आहे.आठवणी द्वारेच आयुष्य मोठे होईल.या वैश्विक नाटकाला मुलांनी समजले, तर कधी कोणते
विचार येणार नाहीत. वैश्विक नाटकांमध्ये यावेळी ज्ञान शिकणे आणि शिकवण्याचे चालत आहे,
परत भूमिका बंद होईल.न बाबांची,न आमची भूमिका राहील. न देण्याची भूमिका,न आमची
घेण्याची भूमिका राहिल.तर एक होताल ना.आमची भूमिका परत नवीन दुनिया मध्ये
असेल.बाबांची भूमिका शांतीधाम मध्ये राहील.या भूमिकेची पण नाटकांमध्ये नोंद आहे
ना.आपली प्रारब्धची भूमिका आहे आणि बाबाची शांतीधाम ची भूमिका आहे.देणे आणि घेण्याची
भूमिका पूर्ण झाली.नाटक पूर्ण झाले,परत आम्ही राज्य करण्यासाठी येऊ,परत ती भूमिका
बदलेल.ज्ञान देणे बंद होईल.आम्ही देवी देवता बनू.भुमिका पूर्ण झाली तर बाकी फरक
राहणार नाही. मुलं आणि पित्याची भूमिका राहणार नाही. हे पण ज्ञान पूर्ण घेतात ना,
त्यांच्याजवळ काहीच राहत नाही.न देणाऱ्या जवळ राहील,ना घेणारे जवळ कमी राहील,तर
दोन्ही एक सारखे होतील. यामध्ये विचार सागर मंथन करण्यासाठी बुद्धी पाहिजे.आठवणीच्या
यात्रेचा खास पुरुषार्थ करायचा आहे.बाबा सन्मुख समजवतात.ऐकवण्यामध्ये तर मोठी गोष्ट
होते.बुध्दीमध्ये तर सूक्ष्म आहे ना. मनामध्ये जाणतात शिवबाबा चे रूप कोणते आहे?
समजावण्यामध्ये मोठे रूप होते. भक्तिमार्ग मध्ये मोठे लिंग बनवतात.आत्मा तर लहान आहे
ना, हे पण कुदरत आहे.कुठे पर्यंत अंत मिळवू शकाल.परत शेवटी बेअंत म्हणतात.बाबांनी
समजावले आहे,सर्व भूमिका आत्म्यामध्ये भरलेली आहे. ही कुदरत आहे ना. अंत मिळू शकत
नाही.सृष्टिचक्राचे अंत तर मिळू शकतो ना. रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतला
तुम्हीच जाणतात.बाबा ज्ञानसंपन्न आहेत परत आम्हीपण परिपूर्ण होऊ.परत मिळवण्यासाठी
काहीच शिल्लक राहणार नाही.बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून शिकवतात,ते तर बिंदी बिंदू
आहेत. आत्म्याचा किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळे खुशी थोडीच होते. कष्ट
करून बाबांची आठवण करायची आहे,तरच विकर्म विनाश होतील.बाबा म्हणतात, मी ज्ञान देणे
बंद करेल, तर तुमच्यामध्ये पण बंद होईल. ज्ञान घेऊन उच्च बनतात ना.सर्व काही
घेतात,तरीही पिता तर पिताचा आहेत ना.तुम्ही आत्मे तर आत्माच रहाल, तर पिता बनणार
नाहीत.हे तर ज्ञान आहे.पिता तर पिता आहेत,मुलं मुलं आहेत.या सर्व विचार सागर मंथन
करून ज्ञानाच्या खोलीमध्ये जाण्याच्या गोष्टी आहेत. हे पण जाणतात जायचे तर
सर्वांनाच आहे.सर्व चालले जाणार आहेत, बाकी आत्मा जाऊन राहिल. सर्व दुनियाच नष्ट
होईल, यामध्ये बिलकुल घाबरायचे नाही. भयमुक्त राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.शरीर
इत्यादीचे कोणतेही भान यायला नको,त्या अवस्थेमध्ये जायचे आहे.बाबा आपल्या सारखे
बनवतात.तुम्ही मुलं पण आपल्यासारखे बनवत राहतात.एका बाबांची आठवण राहावी,असा
पुरुषार्थ करायचा आहे. आता थोडा वेळ आहे.आता रंगीत तालीम करावी लागेल. अभ्यास नसेल
तर पाय थरथर कापतात आणि हृदयाघात अचानक होत राहील.तमोप्रधान शरीराला हृदयाघात
होण्यामध्ये वेळ थोडाच लागतो? जितकी बाबांची आठवण करत रहाल, तेवढे संपूर्णतेच्या
जवळ येत राहाल.योग असणारे घाबरणार नाहीत. योगा द्वारे शक्ती मिळते,ज्ञानाद्वारे धन
मिळते.मुलांना तर शक्ती पाहिजे. तर शक्ती घेण्यासाठी बाबांची आठवण करत राहा. बाबा
अविनाशी सर्जन आहेत, ते कधी पेशंट बनू शकत नाहीत. आत्ता बाबा म्हणतात तुम्ही आपले
अविनाशी औषध घेत राहा,मी अशी संजीवनी बुटी देतो, त्यामुळे तुम्ही कधी तुम्ही आजारी
पडणार नाहीत,फक्त पतित-पावन बाबांची आठवण करत राहा,तर पवन बनाल.देवी देवता नेहमी
निरोगी पावन असतात ना.मुलांना निश्चय झाला आहे,आम्ही कल्प-कल्प वारसा घेतो.या वेळेत
बाबा आले आहेत.बाबा जे शिकवतात, समजवतात, तोच राजयोग आहे.ते गीता इत्यादी सर्व भक्ती
मार्गातील आहेत. हा ज्ञानमार्ग बाबाच दाखवतात. बाबाच येऊन प्रगती करवतात.जे पक्के
निश्चय बुद्धी आहेत तेच माळेचे मणी बनतात. भक्ती करत करत आम्ही खाली उतरत आलो आहोत.
आता बाबा येऊन खरी कमाई करवतात.लौकिक पिता इतकी कमाई करवत नाहीत, जितकी पारलौकिक
बाबा करवतात.
अच्छा, मुलांना शुभ रात्री आणि नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) माया
पहिलवान बनून समोर येईल, तिला घाबरायचे नाही.मायाजीत बनायचे आहे. पावला पावलावर
श्रीमतावर चालून आपल्यावरती स्वतःच कृपा करायची आहे.
(२) मुलांना आपला हिशोब, दिनचर्या सांगायची आहे.विश्वस्त बनून राहायचे
आहे.चालता-फिरता आठवणीचा अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
आपल्या स्वरुपा
द्वारे भक्तांना प्रकाशाचा साक्षात्कार करवणारे इष्ट देव भव.
ज्यावेळेपासून तुम्ही
शिवपित्याची मुलं बनले,पवित्रतेची प्रतिज्ञा केली, तर त्या मोबदल्यात प्रकाशाचा ताज
मिळाला.या प्रकाशाच्या ताज पुढे रत्नजडित ताज पण काहीच नाही. जितके जितके संकल्प
बोल आणि कर्मामध्ये पवित्रतेची धारणा करत जाल, तेवढा हा प्रकाशाचा ताज स्पष्ट होत
जाईल आणि ईष्ट देवीच्या रूपामध्ये भक्तांच्या पुढे प्रत्यक्ष होत जाल.
बोधवाक्य:-
नेहमी
बापदादाच्या छत्रछाया मध्ये रहा तर विघ्नविनाशक बनाल.