04-04-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   06.12.87  ओम शान्ति   मधुबन


*सिध्दी चा आधार - श्रेष्ठ वृत्ती*


आज बापदादा आपल्या चोहूबाजूच्या पवित्र हंसाची सभा पाहत आहेत.प्रत्येक पवित्र हंस आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या आसनावर विराजमान आहे.सर्व आसनधारी पवित्र हंसाची सभा सर्वकल्पामध्ये अलौकिक आणि वेगळी आहे. प्रत्येक पवित्र हंस आपल्या विशेषता द्वारे अतिसुंदर शृंगारीत झालेले आहेत. विशेषता श्रेष्ठ शृंगार आहे. शृंगारीत पवित्र हंस खूप प्रिय वाटतात.बापदादा प्रत्येकाच्या विशेषताचे शृंगार पाहून आनंदित होत आहेत.शृंगारीत सर्व आहेत, कारण बापदादांनी ब्राह्मण जन्म देताच लहानपणापासूनच विशेष आत्मा भवचे वरदान दिले आहे. क्रमानुसार असताना पण शेवटचा क्रमांक पण विशेष आत्मा आहे. ब्राह्मण जीवनामध्ये येणे म्हणजेच विशेष आत्म्या मध्ये येणे.ब्राह्मण परिवारामध्ये जरी शेवटचा क्रमांक असला,तरी विश्वाच्या अनेक

आत्म्यांच्या अंतर मध्ये,त्याचे पण विशेष गायन केले जाते,म्हणून कोटी मधून कोणी,कोणी मधून कोणीचे गायन आहे.तर ब्राह्मणांची सभा म्हणजेच विशेष आत्म्याची सभा आहे.

आज बापदादा पाहत होते की, विशेषतांचा शृंगार बाबांनी सर्वांना, एक सारखाच समान करवला आहे परंतु कोणी त्या शृंगाराला धारण करून वेळे प्रमाण कार्यामध्ये लावतात आणि काही तर धारण करू शकत नाहीत किंवा कोणी वेळे प्रमाण कार्यामध्ये लावू शकत नाहीत.जसे आजकालचे श्रेष्ठ परिवाराचे,वेळे प्रमाण शृंगार करतात,तर किती चांगले वाटतात. जशी वेळ तसा शृंगार,याला म्हटले जाते ज्ञानसंपन्न.आज-काल शृंगाराचे पण वेगवेगळे सेट ठेवतात ना.तर बापदादांनी अनेक विशेषतांचे, अनेक श्रेष्ठ गुणांचे,अनेक विविध प्रकारचे सेट दिले आहेत.कितीही अमुल्य शृंगार असेल परंतु वेळे प्रमाण नसेल तर काय वाटेल?तसेच विशेषतांचे,गुणांचे, शक्तींचे, ज्ञान रत्नाचे,अनेक शृंगार बाबांनी सर्वांना दिले आहेत परंतु वेळेवर कार्यामध्ये लावण्यामध्ये क्रमांक बनतात.जरी हे सर्व शृंगार आहेत परंतु प्रत्येकाची विशेषता किंवा गुणांचे वेळे नुसार महत्त्व असते.या विशेषता असताना पण कार्यामध्ये,वेळे प्रमाण लावत नाहीत,तर अमूल्य असून पण त्याचे मूल्य होत नाही.ज्या वेळेत जी विशेषता धारण करण्याचे कार्य आहे,त्याच विशेषतांचे मूल्य आहे. जसे हंस, दगड आणि रत्न दोन्ही पारखून वेगवेगळे धारण करतात, दगडाला सोडतात बाकी रत्न-मोती धारण करतात.असेच पवित्र हंस म्हणजे वेळे प्रमाण विशेषता किंवा गुणाला पारखून ते वेळे नुसार उपयोग केला तर,त्याला म्हटले जाते पारखण्याची शक्ती,निर्णय करण्याची शक्ती असणारे पवित्र हंस.तर पारखणे आणि निर्णय करणे,या दोन्ही शक्ती,क्रमांक पुढे घेऊन जातात.जेव्हा या दोन्ही शक्ती धारण करतात,तेव्हा वेळेनुसार त्याच विशेषता द्वारे कार्यामध्ये वापर करु शकतात.तर प्रत्येक पवित्र हंस आपल्या या दोन्ही शक्तींना तपासून पहा.दोन्ही शक्ती वेळेवर धोका तर देत नाहीत.वेळ निघून गेल्यानंतर जरी पारखले,निर्णय केला परंतु वेळ तर निघून गेली ना.जे क्रमांक एकचे पवित्र हंस आहेत,त्यांच्या या दोन्ही शक्ती नेहमी वेळेप्रमाणे कार्य करतात.जर वेळेच्या नंतर शक्ती कार्य करतात तर दुसऱ्या क्रमांका मध्ये येतात.तिसऱ्या नंबरची तर गोष्टच सोडा आणि वेळेवर तेच हंस कार्य करू शकतो,ज्याची बुद्धी नेहमी पवित्र आहे.

होळीचा अर्थ ऐकवला ना.एक होळी म्हणजे पवित्र आणि हिंदीमध्ये होली म्हणजे झालेल्या गोष्टींना विसरणे. तर ज्यांची बुद्धी होली म्हणजे पवित्र स्वच्छ आहे आणि नेहमीच जो सेकंद,जी गोष्ट झाली,ती झाली,याचा अभ्यास आहे,असे बुद्धिवान नेहमी पवित्र म्हणजेच,आत्मिक रंगांमध्ये रंगलेले राहतात.नेहमीच बाबाच्या संगतीच्या रंगांमध्ये रंगलेले झाले. तर एकाच होली शब्दचा तीन रूपामध्ये वापर होतो.ज्यामध्ये तिन्ही अर्थाच्या विशेषता आहेत,म्हणजे ज्या हंसाला ही विधी येते,ते प्रत्येक वेळेस सिद्दीला प्राप्त करतात.तर आज बापदादा पवित्र हंसाच्या सभेमध्ये,सर्व पवित्र हंसाच्या या विशेषता पाहत आहेत.परत ते स्थुल कार्य असेल किंवा आत्मिक कार्य असेल परंतु दोन्ही मध्ये सफलतेचा आधार,पारखण्याची आणि निर्णय करण्याची शक्ती आहे.कोणाच्या ही संपर्का मध्ये येतात,जोपर्यंत त्याच्या भाव आणि भावनेला पारखू शकत नाही आणि पारखल्यानंतर निर्णय करू शकत नाहीत,तर दोन्ही कार्यामध्ये सफलता प्राप्त होत नाही. परत ती व्यक्ती असेल किंवा परिस्थिती असेल, कारण व्यक्तीच्या संबंधांमध्ये पण यावे लागते आणि परिस्थितीचा पण सामना करावा लागतो.जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी येतात.तर क्रमांक एकचे पवित्र हंस म्हणजे दोन्ही विशेषता द्वारे संपन्न.हा झाला आजच्या सभेचा समाचार.ही सभा म्हणजे फक्त समोर बसलेले च नाहीत,बापदादाच्या समोर तुमच्या सोबतच,चहूबाजूची मुलंपण स्पष्ट रूपामध्ये आहेत.बेहदच्या परिवारामध्ये बाप दादा भेटतात किंवा आत्मिक संवाद करतात.सर्व ब्राह्मण आत्मे आपल्या आठवणीच्या शक्तीद्वारे,स्व:त पण मधुबन मध्ये हजर होतात आणि बापदादा पण ही विशेष गोष्ट पाहत आहेत की,प्रत्येक मुलांची विधीची रेषा आणि सिद्धीची रेषा दोन्ही रेषा किती स्पष्ट आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत विधि कशी राहिली आणि विधीच्या फलस्वरूप सिद्धी किती प्राप्त झाली,दोन्ही रेषा किती स्पष्ट आहेत आणि किती लांबलचक म्हणजेच विधी आणि सिद्धी चे खाते किती अर्थ सहित जमा झाले आहे. विधीचा आधार श्रेष्ठ वृत्ती आहे.जर श्रेष्ठ वृत्ती आहे,तर अर्थ सहित विधी पण आहे आणि अर्थ सहित विधी आहेत तर सिद्धी श्रेष्ठ आहेच.तर विधी आणि सिद्धीचे बीज वृत्ती आहे.श्रेष्ठ वृत्ती,नेहमी भावा भावाची आत्मिक वृत्ती हवी.ही तर मुख्य गोष्ट आहे परंतु सोबतच संपर्कामध्ये येत प्रत्येक आत्म्याच्या प्रती कल्याणाची, स्नेहाची,सहयोगाची,निस्वार्थ पणाची निर्विकल्प वृत्ती हवी,निरव्यर्थ- संकल्प वृत्ती हवी.अनेक वेळेत कोणत्याही आत्म्याच्या प्रती संकल्प किंवा विकल्पाची वृत्ती होते,तर जशी वृत्ती दृष्टी,तसेच त्या आत्म्याचे कर्तव्य,कर्माची सृष्टी दिसून येईल. कधीकधी मुलांचे ऐकतात आणि पाहतात पण,वृत्तीमुळे वर्णन पण करतात,मग ते कितीही चांगले कार्य करतील परंतु वृत्ती व्यर्थ असल्यामुळे नेहमीच त्या आत्म्याच्या प्रती बोल तसेच निघतील की,हे तर असेच आहेत,असेच करतात.तर ही वृत्ती,त्यांच्या कर्मरूपी सृष्टीचा,तसाच अनुभव करवते.जसे तुम्ही लोक या दुनियेच्या डोळ्यांच्या नजरेचे, चष्म्याचे उदाहरण देतात की,ज्या रंगाचा चष्मा घालाल तसेच दिसून येईल.असेच जशी ही वृत्ती असते, तर वृत्ती दृष्टीला बदलते.दृष्टी सृष्टीला बदलते.जर वृत्तीचे बीज नेहमीच श्रेष्ठ आहे,तर विधी आणि सिद्धी सफलतापूर्वक आहेतच.तर प्रथम वृत्तीच्या पायाला तपासून पहा, त्याला श्रेष्ठ वृत्ती म्हटले जाते.जर कोणाच्या सबंध संपर्कामध्ये श्रेष्ठ वृत्तीच्या,ऐवजी भेसळ आहे,परत कोणत्याही विधी चा अवलंब करा परंतु सिद्धी होणार नाही,कारण बीज वृत्ती आहे आणि वृक्ष विधी आणि फळ सिद्धी आहे.जर बीज कमजोर आहे,तर वृक्ष कितीही मोठे असेल, विस्तार झालेला असेल,परंतु सिद्धी रुपी फळ मिळणार नाही.या वृत्ती आणि विधीच्या वरती,बाप दादा मुलांच्या प्रती एक विशेष आत्मिक संवाद करत होते.स्वप्रगतीच्या प्रती किंवा सेवेच्या सफलतेच्या प्रती,एक रमणीक सुविचार,आत्मिक संवादांमध्ये सांगत होते.तुम्ही सर्व हा सुविचार एक दोघांमध्ये म्हणतात की,प्रत्येक कार्यामध्ये "प्रथम तुम्ही"हा सुविचार आठवणीत आहे ना.एक आहे "प्रथम तुम्ही" दुसरा आहे प्रथम मी. दोन्ही सुविचार प्रथम तुम्ही आणि प्रथम मी दोन्ही आवश्यक आहेत परंतु बाप दादा आत्मिक संवाद करताना हसत होते. जिथे प्रथम मी असायला हवे,तेथे प्रथम तुम्ही करतात.जेथे प्रथम तुम्ही करायला पाहिजे,तेथे प्रथम मी करतात,बदली करतात ना.जेव्हा कोणती स्व परिवर्तनाची गोष्ट येते तर म्हणतात,प्रथम तुम्ही.हे बदलत असतील तर मी पण बदलेल.तर प्रथम तुम्ही झाले ना आणि जेव्हा कोणत्या सेवेचा किंवा कोणत्या अशा परिस्थितीचा सामना करण्याची संधी येते,तर प्रयत्न करतात प्रथम मी.असे समजतात मी पण काहीतरी आहे ना,मला पण काही मिळायला पाहिजे.तर जेथे प्रथम तुम्ही म्हणायला पाहिजे.तेथे मी म्हणतात. नेहमी स्वमाना मध्ये स्थिर राहून दुसऱ्यांना सन्मान देणे म्हणजे प्रथम तुम्ही करणे,फक्त मुखाद्वारे प्रथम तुम्ही आणि कर्मामध्ये अंतर असेल असे नको.स्वमाना मध्ये स्थिर राहून स्वमान द्यायचा आहे.स्वमान देणे किंवा स्वमाना मध्ये स्थिर राहणे त्याची लक्षणे काय असतील? त्यामध्ये दोन गोष्टी नेहमी तपासून पाहा.

एक असते देह अभिमानाची वृत्ती दुसरी आहे अपमानाची वृत्ती.जे स्वमनामध्ये राहतात आणि दुसर्यांना पण स्वमान देणारे दाता असतात, त्यांच्यामध्ये दोन्ही वृत्ती असणार नाहीत,ना अभिमानाची,ना अपमानाची.हे तर करतातच असे,हे तर असेच होते,तर हे पण श्रेष्ठरुपा मध्ये त्याचा अपमान आहे.स्वमाना मध्ये स्थिर होऊन स्वमान देणे,याला म्हणतात प्रथम तुम्ही करणे. समजले?आणि ज्या पण स्व प्रगतीच्या गोष्टी असतील,तेथे नेहमी प्रथम मी चा सुविचार आठवणीत ठेवा,तर परिणाम काय होईल?प्रथम मी म्हणजेच, जो ओटे सो अर्जुन.अर्जुन म्हणजे विशेष आत्मा, अनासक्त आत्मा, अलौकिक आत्मा, अलौकिक विशेष आत्मा.जसे ब्रह्मा बाबा प्रथम मी च्या सुविचाराने अर्जुन बनले ना,म्हणजेच क्रमांक एकचे आत्मा बनले.क्रमांक एक म्हणजे,क्रमांक एक विभाग.तसे तर क्रमांक एक एकच असतील ना.तर दोन्ही सुविचार आवश्यक आहेत, परंतु ऐकवले ना, क्रमांक कोणत्या आधारावर बनतात.जे वेळेप्रमाण कोणत्या विशेषतेला कार्यामध्ये लावत नाहीत,त्यांचा क्रमांक पाठीमागे जातो.वेळेवर जे कार्यामध्ये लावतात तेच विजयी बनतात, म्हणजेच क्रमांक एक बनतात.तर तपासून पहा,कारण यावर्षी स्वतःला तपासण्याच्या गोष्टी ऐकवत आहेत. वेगवेगळ्या गोष्टी तपासून पहा,प्रथम तुम्हीच्या ऐवजी मी आणि मीच्या ऐवजी तुम्ही म्हणत नाहीत ना? याला म्हटले जाते अर्थ सहीत विधी.जेथे अर्थ सहित विधी आहे, तेथे सिध्दी आहेच.तर या वृतीची विधी ऐकवली, दोन्ही गोष्टी तपासणे, - न अभिमानाची वृत्ती हवी,ना अपमाना ची.जेथे दोन्ही ची अप्राप्ती आहे,तेथेच स्वमानाची प्राप्ती आहे. तुम्ही म्हणा किंवा नका म्हणू,विचार करा किंवा नका करू परंतु व्यक्ती,प्रकृती दोन्ही नेहमी स्वतः स्वमान देत राहतील.संकल्प मात्र पण सन्मानाच्या प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना स्वमान मिळणार नाही. निर्मान बनणे म्हणजे,प्रथम तुम्ही म्हणणे.निर्मान स्थिती स्वतः स्वमान देईल.स्वमानाच्या परिस्थितीमध्ये प्रथम आपण म्हणने म्हणजे बाप समान बनणे आहे.जसे ब्रह्मा बाबांनी नेहमीच सन्मान देण्यामध्ये प्रथम जगदंबा सरस्वती,परत ब्रह्मा ठेवले. ब्रह्मा माता असतानी पण स्वमान देण्यामध्ये जगत अंबाला पुढे ठेवले. प्रत्येक कार्यामध्ये मुलांना पुढे ठेवले आणि पुरुषार्थाच्या स्थितीमध्ये नेहमी स्वतःला प्रथम मी,इंजनच्या रूपांमध्ये पाहिले.इंजन पुढे असते ना.नेहमी हे साकार जीवनामध्ये पाहिले की,जे कर्म मी करेल,तर मला पाहून सर्व करतील.तर विधीमध्ये स्वप्रगतीमध्ये किंवा तीव्र पुरुषार्थाच्या लाईन मध्ये प्रथम मी ठेवले.तर आज विधी आणि सिद्धी तपासत होते.समजले तर बदली करू नका,हे बदली करणे म्हणजे भाग्याला बदली करणे.नेहमी पवि‌त्र हंस बनून निर्णयशक्ती पाखण्याच्या शक्तीला,वेळेवर कार्यामध्ये लावणारे विशाल बुद्धी बना आणि नेहमी वृत्ती रुपी बीजाला श्रेष्ठ बनवण्याची विधी आणि सिद्धी,नेहमी श्रेष्ठ अनुभव करत चला.

अगोदर पण ऐकवले होते की,बाप दादांचा मुलांशी स्नेह आहे,स्नेहाची लक्षणं काय असतात?स्नेह असणारा स्नेहीचे कमी कमजोरी पाहू शकत नाही. नेहमी स्वतःला आणि स्नेही आत्म्याला संपन्न समान पाहू इच्छितो,समजले?तर नेहमी ध्यान ठेवत,तपासणी करत,हेच संपन्न बनवण्याचा खरा स्नेह आहे,अच्छा.

आता चहुबाजूंनी जुने मुलं आले आहेत.जुने कोणाला म्हटले जाते, अर्थ तर जाणतात ना.बापदादा जुन्या मुलांना म्हणतात,सर्व गोष्टी मध्ये पक्के आहेत.जुने म्हणजे पक्के.अनुभव पण पक्के बनवतो. असे तर नाही जराशी मांजर आली आणि घाबरले.सर्व जुने पक्के आले आहात ना? भेटण्याची संधी घेण्यासाठी सर्व प्रथम मी केले तरीही,काही हरकत नाही परंतु प्रत्येक कार्यामध्ये कायदा आणि फायदाच आहेच.असे पण नाही कि प्रथम मी,तर याचा अर्थ १००० यावेत.साकार सृष्टीमध्ये कायदा पण आहे फायदा पण आहे.अव्यक्त वतन मध्ये कायद्याची गोष्टच नाही,कायदा बनवावा लागत नाही.अव्यक्त मिलन करण्यासाठी कष्ट लागतात,साकार मिलन सहज वाटते म्हणून भागदौड करून येतात.परंतु वेळेप्रमाणे जितका कायदा तेवढा फायदा होतो. बापदादा थोडा पण इशारा देतात तर समजतात,आता माहित नाही काय होणार आहे.जरी काही होणार असेल तरीही सांगणार नाहीत. साकार पिता अव्यक्त झाले तर सांगून गेले का?जे अचानक होते,ते अलौकिक प्रिय असते म्हणून बापदादा म्हणतात,नेहमी तयार राहा. जे होईल ते चांगल्यात चांगले होईल, समजले,अच्छा.

सर्व पवित्र हंसाना,सर्व विशाल बुद्धी, श्रेष्ठ स्वच्छ बुद्धी धारण करणाऱ्या, बुद्धिवान मुलांना,सर्व शक्तींना,सर्व विशेषतांना,वेळेप्रमाण कार्यामध्ये लावणारे ज्ञानी तू आत्मे,योगी तू आत्मे मुलांना,नेहमी बाप समान संपन्न बनण्याच्या उमंग उत्साहामध्ये राहणाऱ्या संपन्न मुलांना,बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
मालक पणाच्या स्मृती द्वारे सर्वोच्च अधिकाराचा अनुभव करणारे एकत्रित स्वरूप धारी भव.

प्रथम आपले शरीर आणि आत्मा चे एकत्रित रुपाला स्मृती मध्ये ठेवा. शरीर रचना आहे,आत्मा रचनाकार आहे,याद्वारे मालकपणा स्वतःच स्मृतीमध्ये राहील.मालक पणाच्या स्मृति द्वारे स्वताला सर्वोच्च अधिकारी अनुभव कराल.शरीराला चालवणारे असणार.दुसरे म्हणजे बाबा आणि मुलांच्या शिवशक्ती एकत्रित स्वरूपाच्या कृतीद्वारे मायेच्या विघ्नांना अधिकाराने पार करू शकाल.

सुविचार:-
विस्ताराला सेकंदामध्ये सामावून,ज्ञानाच्या रहस्याला अनुभव करा आणि दुसऱ्यांना पण करवा.