04-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आपला स्वभाव बाबा सारखा सरळ बनवा, तुमच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अहंकार असायला नको, ज्ञानयुक्त बुद्धी हवी, ज्ञानाचा अभिमान नको"

प्रश्न:-
सेवा करताना काही मुलं अगदीच लहान(बेबी पेक्षा लहान) आहेत कसे?

उत्तर:-
काही मुलं सेवा तर करत राहतात, दुसऱ्याला ज्ञान ऐकवत राहतात परंतु स्वतः बाबांची आठवण करत नाहीत. असे म्हणतात, बाबा आठवण विसरते. तर बाबा त्यांना अगदीच लहान मुलगा म्हणतात, कारण मूलं पण कधी पित्याला विसरत नाहीत. तुम्हाला बाबा राजकुमार राजकुमारी बनवतात, त्यांना तुम्ही का विसरता? जर विसराल तर वारसा कसा मिळेल? तुम्ही हाता द्वारे काम करत बाबांची आठवण करायची आहे.

ओम शांती।
या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट तुमच्या समोर आहे. मुलं हे पण जाणतात की, बाबा साधारण तना मध्ये आहेत, ते पण वृद्ध तन आहे. स्वर्गामध्ये जरी वृध्द तन असेल तरी खुशी राहते, की आम्ही हे शरीर सोडुन परत मुलगा बनू. यांनाही खुशी आहे की आम्ही असे बनणार आहोत. मुलां सारखी चलन होते. मुलं खूप सरळ असतात. अहंकार इत्यादी काहीच नाही. ज्ञानाची बुद्धि आहे. जशी यांची आहे तुमची पण अशीच बुद्धी असायला पाहिजे. बाबा शिकवण्यासाठी आले आहेत, आम्ही असे बनू. तर तुम्हा मुलांनाही मनामध्ये खुशी व्हायला पाहिजे ना, आम्ही हे शरीर सोडून परत असे बनू. राजयोग शिकत आहोत. लहान किंवा मोठे सर्व शरीर सोडतील. सर्वांसाठी एकच शिक्षण आहे. हे पण म्हणतात आम्ही राजयोग शिकत आहोत, परत जाऊन आम्ही राजकुमार बनू. तुम्ही पण म्हणतात, आम्ही राजकुमार राजकुमारी बनू. तुम्ही राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी शिकत आहात. आत्ताच्या पुरुषार्था मुळे अंत काळ पण चांगलाच जाईल. बुद्धीमध्ये निश्चय आहे की आम्ही गरीबा पासून राजकुमार बनत आहोत. ही विकारी दुनियाच नष्ट होईल. मुलांना खूप खुश राहायला पाहिजे. बाबा मुलांना आपल्या सारखे बनवतात. शिव बाबा म्हणतात, मी तर राजकुमार राजकुमारी बनत नाही. हे ब्रह्मा म्हणतात, आम्हाला तर बनवायचे आहे ना. आम्ही असे बनण्यासाठी शिकत आहोत. राजयोग आहे ना. मुलं पण म्हणतात, आम्ही राजकुमार राजकुमारी बनू. बाबा म्हणतात अगदी बरोबर आहे, तुमच्या मुखामध्ये गुलाब. राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी ही परीक्षा आहे. ज्ञान तर खूप सहज आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि भविष्य वारशाची आठवण करायचे आहे. आठवण करण्यामध्ये कष्ट आहेत. आठवणीमध्ये रहाल तर सदगती होईल. सन्याशी उदाहरण देतात, कोणी म्हणतात, मी म्हैस आहे, म्हैस आहे, तर काही दिवसानंतर तो खरोखरच स्वतःला म्हैस समजू लागला, या सर्व फालतू गोष्टी आहेत. येथे तर अध्यात्मिकते ची गोष्ट आहे. तर बाबा मुलांना समजवतात, ज्ञान तर खूप सहज आहे परंतु आठवण करण्यामध्ये कष्ट आहेत. बाबा नेहमी म्हणतात तुम्ही तर बेबी आहात. तर मुलांच्या गोड तक्रारी येतात, आम्ही बेबी आहोत का? बाबा म्हणतात, होय तुम्ही बेबी, म्हणजे लहान आहात. जरी ज्ञानामध्ये खूप चांगले आहात, प्रदर्शनीमध्ये सेवा खूप चांगली करता, रात्रंदिवस सेवेमध्ये व्यस्त राहता, तरीही बाबा बेबीच म्हणतात. बाबा म्हणतात, हे ब्रह्मा पण बेबीच आहेत. हे बाबा म्हणतात, तुम्ही आमच्या पेक्षा मोठे आहात, माझ्यावरती तर खूप जवाबदारी आहे. यांच्या वर खूप जवाबदारी आहे तर खूप विचार चालत राहतात. बाबांकडे अनेक समाचार येतात, म्हणून सकाळी उठून आठवण करण्याचे प्रयत्न करतात. वारसा तर त्यांच्याकडून मिळवायचा आहे, म्हणुन बाबांची आठवण करायची आहे. सर्व मुलांना रोज समजवतो, गोड मुलांनो तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये खूप कमजोर आहात. ज्ञानामध्ये जरी हुशार असले, तरीही प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहे की, मी बाबांच्या आठवणीमध्ये किती वेळ राहतो. अच्छा दिवसभरात खूप काम इत्यादी मध्ये व्यस्त राहता. तसे तर काम करत असताना पण आठवणीत राहू शकता. अशी म्हण पण आहे, हाताने काम करत रहा आणि बुद्धी द्वारे आठवण करा. बुद्धी शिव बाबांकडे असायला हवी. जसे भक्तिमार्ग मध्ये पूजा करताना, बुद्धी दुसरीकडे धंदा इ. इकडे चालली जाते. कोणत्या स्त्रीचा पती परदेशामध्ये असेल तर बुद्धी तिकडे जाते, ज्याच्या बरोबर जास्त संबंध आहेत, तिकडे बुध्दी जाते. जरी चांगली सेवा करतात तरीपण बाबा म्हणतात तुम्ही बेबी बुद्धी आहात. अनेक मुलं लिहतात, आम्ही बाबा ची आठवण विसरतो, तसे तर लहान मुलगा पण पित्याला विसरत नाही, तुम्ही तर लहान मुलां पेक्षा लहान आहात. ज्या बाबा द्वारे तुम्ही राजकुमार राजकुमारी बनतात, जे तुमचे पिता शिक्षक आणि गुरु आहेत, तुम्ही तर त्यांनाच विसरतात. आपली पूर्ण दिनचर्या लिहुन बाबांना पाठवतात, बाबा त्यांना श्रीमत देतात. मुलांनी सांगायला पाहिजे, आम्ही बाबांची कशी आठवण करतो? कधी आठवण करतो? परत बाबा मत देतील. बाबा समजावतील यांची, अशा प्रकारची सेवा आहे. यानुसार त्यांना खूप वेळ मिळू शकतो. सरकारी नौकरदारांना तर खूप वेळ राहतो, काम झाले, बाबा ची आठवण करत राहा. चालता फिरता बाबांची आठवण राहावी. बाबा वेळ पण सांगतात, रात्री नऊ वाजता झोपा, परत दोन तीन वाजता उठून आठवण करा. योगाच्या कक्षा मध्ये जाऊन बसा, परंतु हे बसण्याची सवय पण बाबा लावत नाहीत. तसं तर चालता-फिरता पण आठवण करू शकतात. मधुबन मध्ये तर मुलांना खूप वेळ आहे. पूर्वी तुम्ही एकांत मध्ये डोंगरावरती जाऊन बसत होते. बाबांची आठवण तर करायची आहे, नाहीतर विकर्म कसे नष्ट होतील. बाबांची आठवण करू शकत नाही तर बेबी पेक्षा बेबी झाले ना. सर्व आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे. पतित पावन बाबांची आठवण करण्या मध्येच कष्ट आहेत. ज्ञान तर खूप सहज आहे. हे पण जाणतात, जे येथे येऊन समजतील, तेच कल्पापुर्वी पण आले होते. मुलांना श्रीमत मिळत राहते. आम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे बनू, हेच प्रयत्न करत राहायचे आहेत. पावन बनण्या साठी आठवणी शिवाय दुसरा कोणता उपाय नाही. बाबांना विचारु शकतात, बाबा आमचा हा धंदा असल्यामुळे किंवा हे कार्य असल्यामुळे आम्ही आठवण करू शकत नाहीत. बाबा लगेच मत देतील, असे नाही असे करा. तुमचे सर्व आठवणी वरती अवलंबून आहे. चांगली मुलं ज्ञान तर खूप चांगले देतात, अनेकांना खुश करतात परंतु योग नाही. बाबांची आठवण करायची आहे, हे समजुन परत विसरतात. यामध्येच कष्ट घ्यायचे आहेत. एकदा सवय लागली, परत रेल्वे, बस विमानात बसले असले तरी, आपल्याच धुन मध्ये राहतील. मनामध्ये खुशी असेल आम्ही बाबाकडून भविष्य राजकुमार राजकुमारी बनत आहोत. सकाळी उठून अशाप्रकारे बाबांच्या आठवणीत बसा परत थकून जातात तर ठीक आहे, झोपुन आठवण करा. बाबा तर खूप सांगत राहतात, चालता-फिरता आठवण करू शकत नाहीत, तर बाबा म्हणतील अच्छा रात्री योगामध्ये बसा, तर तुमचे काही जमा होईल. परंतु हे जबरदस्ती एका जागेवर बसुन आठवण करणे, म्हणजे हटयोग होतो. तुमचा तर सहज मार्ग आहे. भोजन करताना बाबांची आठवण करा. आम्ही बाबा द्वारे विश्वाचे मालक बनत आहोत. आपल्याबरोबर गोष्टी करत जा. मी या राजयोगाच्या शिक्षणाद्वारे देवी-देवता बनत आहे. योगा वरती पूर्ण लक्ष द्यायचे आहे. तुमचे विषय पण थोडेच आहेत. बाबा पण खूप थोडंच समजवतात. कोणती गोष्ट समजली नाही तर बाबांना विचारू शकता. स्वतःला आत्मा समजायचे आहे. हे शरीर तर पाच भूतांचे आहे. मी शरीर आहे असे समजणे, म्हणजे स्वतःला भूत समजणे आहे. ही आसुरी दुनिया आहे, ती दैवी दुनिया आहे. येथे सर्व देह अभिमानी आहेत. स्वतःच्या आत्म्याला कोणी जाणत नाहीत. सत्य आणि असत्य तर असते ना. आम्ही आत्मा विनाशी आहोत, हे समजणे सत्य आहे. स्वतःला विनाशी शरीर समजणे चुकीचे होते. देहाचा मोठा अहंकार आहे. आत्ता बाबा म्हणतात, शरीराला विसरा आत्माभिमानी बना. यामध्ये कष्ट आहेत. ८४ जन्म घेतले, आता घरी जायचे आहे. तुम्हालाच सहज वाटते. तुमचेच ८४ जन्म आहेत. सूर्यवंशी देवता धर्मा मध्ये जन्म घेणार्‍यांचे 84 जन्म आहेत. सुधारणा करून लिहायचे आहे. मुलं शिकत राहतात, त्याच्या मध्ये सुधारणा होत राहते. त्या अभ्यासामध्ये पण क्रमानुसार असतात ना. जर कोणी कमी शिकले तर पगार पण कमी मिळतो. आता तुम्ही मुलं बाबांच्या जवळ खरी-खुरी नरापासून नारायण बनण्याची अमर कथा ऐकण्यासाठी आले आहात. हा मृत्युलोक आता नष्ट होणार आहे, आम्हाला अमरलोक जायचे आहे. आता तुम्हा मुलांना चिंता लागली पाहिजे, आम्हाला तमोप्रधान पासून सतीप्रधान, पतिता पासून पावन बनायचे आहे. सर्व मुलांना बाबा एकच युक्ती

सांगतात, फक्त म्हणतात माझी आठवण करा, चार्ट लिहा दिनचर्या तपासा म्हणजे तुम्हाला खूप खुशी होईल. आता तुम्हाला ज्ञान आहे, दुनिया तर अज्ञान अंधकारा मध्ये आहे. तुम्हाला आता ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे. तुम्ही त्रिनेत्री त्रिकालदर्शी बनत आहात. अनेक असे पण मनुष्य आहेत, ते म्हणतात ज्ञान तर जिकडे तिकडे मिळत राहते, ही काही नवीन गोष्ट नाही. अरे हे ज्ञान तर कोणाला मिळत नाही. जर भक्ती मार्गामध्ये ज्ञान मिळते, तरी काहीच करत नाहीत. नरापासून नारायण बनण्यासाठी कोणी पुरुषार्थ करतात का? काहीच नाही. बाबा मुलांना म्हणतात, पहाटेची वेळ खूप चांगली आहे, खूप मजा येते, शांत होतात, वातावरण चांगले असते. सर्वात खराब वायुमंडल असते रात्री दहा ते बारा, म्हणून पहाटेची वेळ चांगली आहे. रात्री लवकर झोपा, परत दोन-तीन वाजता उठा, आरामशीर बसा. बाबांशी गोष्टी करा. विश्वाच्या इतिहास भूगोलाची आठवण करा. शिव बाबा म्हणतात माझ्यामध्ये रचनाकार आणि रचनेचे ज्ञान आहे. मी तुम्हाला शिक्षक बनून शिकवतो. तुम्ही आत्मा, मज पित्याची आठवण करत राहता. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. योग कोणा सोबत आहे? हे पण लिहायचे आहे. आत्म्याचा परमात्म्याच्या सोबत योग म्हणजे आठवण आहे. तुम्ही मुल आत्ता जाणतात, आम्ही सर्वांगीण भूमिका करणारे आहोत, पूर्ण ८४ जन्म घेतो. येथे ब्राह्मण कुळाचे येतील. आम्ही ब्राह्मण आहोत. आता आम्ही देवता बनत आहोत. सरस्वती पण मुलगी आहे ना. ब्रह्मा बाबा म्हणतात, वृद्ध आहे तरी खुशी खूप होते, आता आम्ही हे शरीर सोडून, परत राजाच्या घरी जन्म घेऊ. आम्ही शिकत आहोत, परत सोन्याचा चमचा मुखामध्ये असेल, म्हणजे खुप सुख असेल. तुम्हा सर्वांचा हा मुख्य उद्देश आहे. तर का नाही खुशी व्हायला पाहिजे? मनुष्य जरी काही बोलत राहिले, तरी तुमची खुशी गायब व्हायला नको. बाबांची आठवणच करणार नाही, तर नरापासून नारायण कसे बनू शकतो. उच्च पद मिळवायला पाहिजे ना. असा पुरुषार्थ करून दाखवा, संभ्रमित का होता? नाराज का होतात, की सर्व राजे थोडेच बनतील. असा विचार आला तर नापास व्हाल. काँलेज मध्ये वकील इंजिनिअर बनण्यासाठी शिकतात, असे कोणी म्हणत नाहीत, वकिल, इंजिनियर सर्व थोडेच बनतील. जर शिक्षण घेणार नाही तर नापास व्हाल. १६१०८ची माळ आहे. प्रथम कोण येतील? जितका जे पुरुषार्थ करतील. एक दोघा पेक्षा जास्त पुरुषार्थ करत राहतात ना. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, आम्ही हे जुने शरीर सोडून घरी जायचे आहे, हे पण आठवणीत राहिले तर तीव्र पुरुषार्थ होईल. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये राहायला पाहिजे, सर्वांचे मुक्ती जीवन मुक्तिदाता एकच आहेत. आज दुनिया मध्ये किती करोड मनुष्य आहेत, परत दैवी दुनियेमध्ये नऊ लाखच असतील, अंदाज सांगितला जातो. सतयुगा मध्ये आणखी किती असतील? राजाई मध्ये काही तरी मनुष्य पाहिजेत ना. ही राजाई स्थापन होत आहे. सतयुगा मध्ये खूप छोटे झाड असेल, ते ही सुंदर, असे समजून येते. नावच आहे स्वर्ग. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व चक्र फिरत राहते. हे पण नेहमी फिरत राहिले तर चांगलेच आहे.

हे खोकला इत्यादी येणे पण कर्मभोग आहे, जुनी चप्पल आहे ना, म्हणजे जुने शरीर आहे ना. नवीन तर येथे मिळणार नाही. मी पुनर्जन्म तर घेत नाही. ना कोणत्या गर्भामध्ये जातो. मी तर साधारण तना मध्ये प्रवेश करतो. वानप्रस्थ अवस्था आहे ना, आता वाणी पासून दूर शांतीधाम मध्ये जायचे आहे. रात्री पासून दिवस, दिवसा पासून रात्र तर जरुर होते. तसेच जुन्या दुनियेचा विनाश जरूर होणार आहे. संगम युग जरूर पूर्ण होऊन, परत सतयुग येईल. मुलांना आठवणीच्या यात्रेवर खूप लक्ष द्यायचे आहे, यामध्ये खूप कमजोर आहेत, म्हणून बाबा बेबी बुद्धी म्हणतात. बेबी पणा दाखवतात. बाबांची आठवण करू शकत नाही असे म्हणतात, तर बेबी झाले ना. तुम्ही काय लहान बेबी आहात, जे बाबांना विसरतात? गोड ते गोड, पिता शिक्षक आणि गुरु आहेत, त्यांना तुम्ही विसरतात. अर्धा कल्प तुम्ही, दुःखामध्ये त्यांची आठवण करत आले, हे भगवान. आत्मा शरीराद्वारे म्हणते ना. आता मी आलो आहे, तर चांगल्या रीतीने आठवण करा. अनेकांना रस्ता दाखवा. पुढे चालून खूप वृध्दी होत राहील. धर्माची वृध्दी तर होते ना. अरविंद घोष चे उदाहरण आहे, आज त्यांचे खूप सेवा केंद्र आहेत. आता तुम्ही जाणतात, तो सर्व भक्तिमार्ग आहे. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे. सर्व पुरुषां मध्ये उत्तम पुरुष बनण्यासाठी हे ज्ञान आहे. तुम्ही मनुष्या पासून देवता बनतात. बाबा येऊन सर्व खराब कपड्यांना स्वच्छ करतात, त्यांची महिमा आहे. मुख्य आठवणीची यात्रा आहे, ज्ञान तर खूप सहज आहे. मुरली वाचून परत ऐकवत रहा, आठवण करत राहा. बाबांची आठवण करत करत आत्मा पवित्र बनत जाइल. पेट्रोल भरत जाईल. परत सेवा करण्यासाठी जायचे आहे. ही शिवबाबां ची वरात म्हणा की मुलं म्हणा. बाबा म्हणतात मी आलो आहे, तुम्हाला काम चिते पासून दूर करून, आत्ता योग चितावर बसवण्यासाठी. योगाद्वारे आरोग्य आणि ज्ञानाद्वारे संपत्ती मिळते, अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)मुख्य उद्देश समोर ठेवून खुशी मध्ये राहायचे आहे. कधीच दिलशिकस्त, नाराज व्हायचे नाही. हा विचार कधीच यायला नको की, सर्व थोडेच राजा बनू शकतील. पुरुषार्थ करुन उच्चपद प्राप्त करायचे आहे.

(२) सर्वात प्रेमळ बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे. यामध्ये बेबी बुध्दी बनायचे नाही. आठवणीसाठी पहाटेची वेळ खूप चांगली आहे. आरामशीर शांती मध्ये बसून आठवण करा.

वरदान:-
एकता आणि एकाग्रतेच्या विशेषते द्वारा निरव्यर्थ आणि निर्विकल्प स्थिती बनवणारे सफलता स्वरूप भव.

बापदादांना प्रत्यक्ष करण्याच्या कार्यामध्ये सफलता चे वरदान प्राप्त करण्यासाठी नेहमी एकाचे बणुन एकाला प्रत्यक्ष करायचे आहे. एकताची, करंगळी सहयोगाचे लक्षण दाखवले आहे, आणि एकाग्रता म्हणजेच नेहमी निरव्यर्थ संकल्प आणि निर्विकल्प स्थिती द्वारे सफलता, गळ्याचा हार बनते. परंतु यासाठी नेहमी हाच सुविचार आठवणी मध्ये ठेवा की, न समस्या स्वरूप बनायचे आहे, ना समस्येला पाहून घाबरायचे आहे. नेहमी समाधान स्वरुप राहायचे आहे.

बोधवाक्य:-
बापदादांच्या छत्रछायेत राहा, तर मायेची सावली पडू शकणार नाही.