04-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, श्रीमताचे पालन करून पवित्र बना, तर धर्मराजाच्या दंडातून मुक्त व्हाल, हिऱ्यासारखे बनायचे असेल तर, ज्ञानामृत प्या, विकार रुपी विष काढून टाका. "

गीत:-
तुम्हे पाके सब कुछ मिला. . (तुम्ही भेटल्यावर, आम्हाला सर्वकाही मिळाले). .

ओम शांती।
शिव भगवानुवाच आणि इतर कोणालाही भगवान म्हटले जात नाही, फक्त एक निराकार परमपिता परमात्मा, यांनाच शिवबाबा म्हणतात. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्वप्रथम तुम्ही शिवबाबांची मुले आहात, हा निश्चय असायला हवा. दु:खाच्या वेळी म्हणतात, हे ईश्वर मदत करा, दया करा. आपली आत्मा परमात्माची स्मरण करते, हेही त्यांना माहीत नाही. आम्हा आत्म्याचे ते पिता आहेत. यावेळी, संपूर्ण दुनिया पतित आत्म्यांची आहे. आम्ही पापी नीच आहोत, तुम्ही पूर्णपणे निर्विकारी आहात, असे गायन करतात. पण तरीही स्वतःला तसे समजत नाहीत. बाबा समजावतात की, जेव्हा तुम्ही म्हणतात, भगवान पिता एक आहे, तेव्हा तुम्ही सर्वजण आपसात भाऊ भाऊ झाले. परत शारीरिक नात्याने सर्वजण भाऊ-बहिण झाले. शिवबाबांची मुलेही नंतर प्रजापिता ब्रह्माची पण मुले झाली. हे तुमचे बेहद्दचे पिता, गुरू आणि शिक्षक आहेत. ते म्हणतात, मी तुम्हाला अपवित्र बनवत नाही. मी तर तुम्हाला पवित्र बनवण्यासाठी आलो आहे. जर तुम्ही माझ्या सल्ल्याचे पालन कराल. इथे तर सर्व मानव रावणाच्या मतानुसार चालतात. सर्वात ५ विकार आहेत. बाबा म्हणतात मुलांनो, आत्ता निर्विकारी होऊन, श्रीमताचे पालन करा. पण ते दुर्गुण अजिबात सोडत नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वर्गाचे स्वामी बनत नाहीत. सर्वजण अजामिल सारखे पापी झाले आहेत. रावण पंथ आहे, ही शोकवाटिका आहे, त्यामुळे खुप दु:खी आहेत. बाबा येऊन पुन्हा रामाचे राज्य निर्माण करतात. तुम्ही मुलं हे जाणतात की, हीच खरी खुरी रणभूमी आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात की, कामविकार मोठा शत्रू आहे, त्यांच्यावर विजय मिळवा. तरीही पवित्र बनत नाहीत. बाबा सन्मुख समजावतात. तुमची आत्मा या इंद्रियांद्वारे ऐकते आणि नंतर त्याचे कथन करते आणि आत्मा कृती करते. आपण आत्मा आहोत आणि शरीर धारण करून आपली भूमिका बजावतो. परंतु, मनुष्य आत्म अभिमानी होण्याऐवजी देह अभिमानी झाले आहेत. आत्ता बाबा म्हणतात, आत्म अभिमानी बना. सुवर्णयुगात तुम्ही आत्म अभिमानी असतात. परमात्माला ओळखत नाहीत. इथे तुम्ही देह अभिमानी आहात आणि परमात्मालाही ओळखत नाहीत, म्हणूनच तुमची अशी दुर्गती झाली आहे. दुर्गतीलाही ओळखतही नाहीत. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते समजतात की, आम्ही तर स्वर्गातच आहोत. बाबा म्हणतात, आत्ता सर्वजण गरीब बनतात, कारण विनाश होणार आहे. विनाश होणे तर चांगले आहे, नाही का? परत आपण मुक्तीधाम मध्ये जाऊ, यामध्ये तर आपण आनंदी राहायला पाहिजे. तुम्ही मरण्याची तयारी करत आहात. मनुष्याला तर मरणाची भीती वाटते. बाबा तुम्हाला वैकुंठात घेऊन जाण्यासाठी योग्य बनवत आहे. पतित लोक तर पतित दुनियेतच जन्म घेतात. स्वर्गवासी तर कोणी होत नाहीत. मुख्य गोष्ट पिता म्हणतात, पवित्र बना. पवित्र बनल्याशिवाय, पवित्र जगात जाता येणार नाही. पवित्रतेमुळेच अबलांना मारतात, ते कामरुपी विषाला अमृत मानतात. बाबा म्हणतात, ज्ञानाच्या अमृताने, मी तुम्हाला हिर्‍यासारखे बनवतो, परत विष खाऊन तुम्ही कवडी सारखे का बनतात ? अर्धाकल्प तुम्ही काम विकार रुपी विष खाल्ले, आता माझी आज्ञा माना, नाहीतर धर्मराजाच्या लाठ्या खाव्या लागतील. लौकिक पिता असे म्हणतात मुलांनो, घराण्याचे नाव बदनाम होईल असे काम करू नका. बेहद्दचे पिता म्हणतात, श्रीमतचे पालन करा, पवित्र बना. जर काम चितेवर बसले, तर तुमचा चेहरा काळा तर आहेच, परत काळा होईल. आत्ता बाबा परत तुम्हाला, ज्ञानाच्या चितेवर बसवून तुम्हाला गोरा बनवत आहेत. काम चितेवर बसून तुम्हाला स्वर्गाचे तोंडही दिसणार नाही, म्हणूनच पिता म्हणतात, आत्ता श्रीमताचे पालन करा. बाबा तर फक्त मुलांशी बोलतील, नाही का? तुम्हा मुलांनाच माहीत आहे की, बाबा आम्हाला स्वर्गाचा वारसा द्यायला आले आहेत. कलियुग आता पूर्ण होत आहे. जे पित्याच्या श्रीमतावर चालतील, त्यांचीच सदगती होईल. जर तुम्ही पवित्र बनले नाहीत, तर शिक्षा भोगून आपपल्या धर्मात परत जाल. फक्त भारताचे लोकच स्वर्गवासी होते. आत्ता अपवित्र बनले आहेत. स्वर्गा बद्दल माहीतीच नाही, म्हणून बाबा म्हणतात, जर तुम्ही माझ्या श्रीमताचे पालन न करता, इतरांच्या आज्ञेचे पालन करुन, तुम्ही विकारात गेले, तर मेले. जरी तुम्ही अंतकाळी स्वर्गात आले, तरी पद खूप हलके मिळेल. आत्ता जे सावकार आहेत, ते गरीब बनतात. येथे जे गरीब आहेत, ते सावकार बनतील. बाबा गरीब निवाज आहेत. संपूर्ण गोष्ट पवित्रते वरती आधारीत आहे. पित्याशी योग लावल्याने तुम्ही पवित्र बनाल. बाबा तुम्हा मुलांना समजावतात, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. मी घरदार सोडवत नाही. तुम्ही घरीच राहू शकता, पण विकारात जाऊ नका आणि कोणत्या ही देहधारी व्यक्ती ची आठवण करु नका. यावेळेत प्रत्येकजण पतित आहेत. सुवर्णयुगात पावन देवता होते. यावेळी तेही अपवित्र झाले आहेत. पुनर्जन्म घेता-घेता आत्ता अंतिम जन्म पुर्ण झाला आहे. तुम्ही सर्व पार्वती आहात. अमरनाथ पिता तुम्हाला अमरपुरीचे स्वामी बनवण्यासाठी अमर कथा सांगत आहेत. तेव्हा आत्ता अमरनाथ पित्याची आठवण करा. आठवणी द्वारेच तुमचे पाप दूर होतील. बाकी शिवशंकर किंवा पार्वती कोणत्याही डोंगरावर बसलेले नाहीत. हे सर्व भक्तीमार्गातील धक्के आहेत. अर्धाकल्प तुम्ही खूप सहन केले. आत्ता बाबा म्हणतात, मी तुम्हाला स्वर्गात नेईन. सुवर्णकाळात सुखच सुख असते. न धक्के खातात, न विकारात जातात, मुख्य गोष्ट आहेच पवित्र राहणे. जेव्हा येथे खूप अत्याचार होतात, तेव्हा पापाचा घडा भरतो आणि विनाश होतो. आत्ता एका जन्मासाठी पवित्र बना आणि पावन जगाचे स्वामी बनाल. आत्ता जे श्रीमताचे पालन करतील. जर तुम्ही कल्पापुर्वी श्रीमतचे पालन केले नसेल, तर तुम्ही आत्ताही करु शकणार नाहीत, न उच्च पद मिळेल. तुम्ही एका पित्याची मुलं आहात, तुम्ही आपसात भाऊ-बहीण झाले. जर बाबाचे बनून जर विकारात गेले तर आणखीन च रसातळात जाल आणि पापी आत्मा बनाल. हे ईश्वरीय सरकार आहे. जर माझ्या मतानुसार जर पवित्र बनले नाहीत, तर तुम्हाला धर्मराजाकडून कठोर शिक्षा भोगावी लागेल. जन्म-जन्मांतर केलेल्या सर्व पापांची शिक्षा भोगून झाल्यावर, हिशेब चुकता होईल. एक तर योगसामर्थ्याने तुमची पापे जाळून नष्ट करा किंवा तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागेल. अनेक ब्रह्माकुमार आणि कुमारी आहेत, सर्व पवित्र राहतात आणि भारताला स्वर्ग बनवतात. तुम्ही शिवशक्ती आहात, पांडव सेना आहात, गोप आणि गोपी, दोघेही यात येतात. भगवान तुम्हाला शिकवतात. लक्ष्मी नारायण यांना भगवती म्हणतात. त्यांना जरूर भगवंताने वारसा दिला असेल. भगवंतच येतात आणि तुम्हाला देवता बनवतात. सुवर्णयुगात राजे, राणी आणि प्रजा राहतात. सर्व श्रेष्ठाचारी होते, आत्ता रावणाचे राज्य आहे. रामराज्यात जायचे असेल, तर पवित्र बना, रामाच्या आज्ञेचे पालन करा. रावणाच्या सल्ल्याने तू संकटात आहेस. कोणाची संपत्ती मातीत जाईल, कोणाची चोर लुटतील. सफल त्याची होईल जे ईश्वरीय कार्यात लावतील, असेही गायन आहे. जर तुमचा अचानक मृत्यू झाला तर सर्व काही तिथेच राहील. विनाश तर होणारच आहे. भुकंप वगैरे होतात, तेव्हा चोरही खूप लुटून घेऊन जातात. बाबा आत्ता आले आहेत, तुम्हाला आपले बनवायला आणि तुम्हाला जगाचा स्वामी बनवायला. आजकाल निवृत्तीच्या अवस्थेतही विकाराशिवाय राहू शकत नाहीत, पुर्णपणे तमोप्रधान झाले आहेत. बाबांनाही ओळखत नाही. बाबा म्हणतात, मी तुम्हाला पावन बनवायला आलो आहे. जर तुम्ही विकारी बनले तर तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागेल. मी तुम्हाला पवित्र बनवण्यासाठी आणि पावन जगाची स्थापना करण्यासाठी आलो आहे. तुम्ही पुन्हा अपवित्र होऊन विघ्न आणता! जर तुम्ही स्वर्गाच्या निर्मितीमध्ये अडथळा आणलात, तर तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागेल. मी तुम्हाला स्वर्गात नेण्यासाठी आलो आहे. जर विकाराला सोडले नाही तर धर्मराजाकडून खूप मार पडेल. तुम्हाला खूप रडावं लागेल. ही इंद्र सभा आहे. एक कथा आहे ना, ज्ञान परी होती, ती कोणा अपवित्रला स्वर्गात घेऊन आली, त्याचा दुर्गंध येत होता. इथे कोणत्याही अपवित्र व्यक्तीला सभेत बसवलं जात नाही. पवित्रतेची प्रतिज्ञा केल्याशिवाय बसवले जात नाही, अन्यथा घेऊन येणाऱ्यालाही दोष दिला जातो. बाबा जाणतात, तरीही ते तुम्हाला आणतात, म्हणून सजा दिली जाते. शिवबाबांच्या स्मरणाने आत्मा शुध्द होते. वातावरणात शांतता होते. बाबा सन्मुख समजवतात, की मी तुझा पिता आहे. मी ५००० वर्षपुर्व प्रमाणे तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी आलो आहे. बेहद्द पित्याकडून असीम सुखाचा वारसा घ्यायचा आहे. अच्छा.

गोड गोड खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)योगसामर्थ्याने सर्व पापांचे हिशेब साफ केल्यानंतर, आत्म्याला शुद्ध करून, वातावरणाला शांत बनवायचे आहे.

(२)पित्याच्या श्रीमताचे पालन करून पूर्ण पावन होण्याचे वचन द्यायचे आहे. विकारांच्या वश होऊन स्वर्ग निर्मितीमध्ये अडथळा आणायचा नाही.

वरदान:-
मन आणि बुद्धीच्या स्वच्छतेने, अचूक निर्णय घेणारे, सफलता संपन्न भव.

बुद्धीने वेळीच अचूक निर्णय घेतल्यावर कोणत्याही कार्यात यश मिळते, परंतू निर्णय शक्ती तेव्हाच काम करते, जेव्हा मन आणि बुद्धी शुद्ध असते, कोणताही कचरा नसतो. त्यामुळे अग्नीच्या योगाने कचरा नष्ट करून, बुद्धीला शुद्ध करा. कोणत्याही प्रकारची कमजोरी पण घाण आहे. थोडासा फालतू विचारही, कचरा आहे, जेव्हा हा कचरा संपेल तेव्हा तुम्ही निश्चिंत राहाल आणि स्वच्छ बुद्धी असल्यास, प्रत्येक कार्यात यश मिळेल.

बोधवाक्य:-
नेहमी श्रेष्ठ आणि शुद्ध विचार, मनात येत राहतील, तर व्यर्थ विचार आपोआप नष्ट होतील.

मातेश्वरीजी चे मधुर महावाक्य:-

या कलियुगी जगाला, असार संसार का म्हणतात? कारण या जगात कोणतेही सार नाही, म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये ताकत नाही, किंवा सुख, शांती, पवित्रता नाही. या जगात कधीकाळी सुख, शांती आणि पवित्रता होती, ती आत्ता नाही, कारण आता प्रत्येकामध्ये ५ भूतांची प्रवेशता झाली आहे, म्हणूनच या जगाला भयाचा सागर किंवा कर्म बंधनांचा सागर म्हणतात, ज्यामध्ये प्रत्येकजण दु:खी होऊन ईश्वराला बोलवतात, हे परमात्मा आम्हाला भौतिक अस्तित्वाच्या महासागरातून पार करा, यामुळे हे सिद्ध झाले की, नक्कीच निर्भयतेचे जग पण आहे, ज्यामध्ये तुम्हाला जायची इच्छा आहे, म्हणूनच या जगाला पापाचा महासागर म्हणतात, ज्याला ओलांडून तुम्हाला पुण्य आत्म्यांच्या दुनियेत जायचे आहे. तर दोन जग आहेत, एक सुवर्णयुगी सारवाली दुनिया आणि दुसरी कलियुगी असार संसाराची दुनिया. दोन्ही जग या सृष्टीवरतीच आहेत. मनुष्य म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला या महासागरातून पलीकडे घेऊन चल. त्या किनाऱ्याचा अर्थ काय आहे ? ते लोक समजतात, पलीकडील किनाऱ्याचा अर्थ आहे की, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात न येणे, म्हणजेच मुक्त होणे. आत्ता ही तर झाली मनुष्याची कहाणी, परंतू बाबा म्हणतात मुलांनो, खरेच जिथे सुख-शांती आहे, दु:ख अशांती पासून दूर आहे, त्या दुनियेत मी तुम्हाला घेऊन जातो. जेव्हा तुम्ही सुखाची इच्छा करता, तर जरुर याच जीवनात असले पाहिजे. आत्ता ते वैकुंठ सुवर्णयुगातील देवतांचे जग होते, जिथे सदैव आनंदी जीवन होते, त्या देवतांना अमर म्हणत होते. आत्ता अमरचा ही काही अर्थ नाही. असे पण नाही की, देवतांचे आयुष्य इतके मोठे होते की, ते कधीच मरत नव्हते. आत्ता असे म्हणने तर चुकीचे आहे, कारण असे नाही. त्यांचे आयुष्य काही सत्ययुग-त्रेतापर्यंत चालत नाही. परंतु सत्ययुग-त्रेतामध्ये देवतांचे अनेक जन्म झाले आहेत, २१ जन्म तर त्यांनी चांगले राज्य चालवले आणि नंतर 63 जन्म, द्वापार ते कलियुगाच्या समाप्तीपर्यंत, त्यांचे एकूण चढती कला अवस्थेतील २१ जन्म झाले आणि उतरत्या अवस्थेतील ६३ झाले, एकूण मनुष्य ८४ जन्म घेतात. बाकी हे जे मनुष्य 84 लाख योनी भोगतात, असे म्हणणे चूकीचे आहे. जर मनुष्याला सुख आणि दु:ख हे दोन्ही आपल्याच योनीत मिळत असतील, तर त्यांना प्राण्याच्या योनी भोगण्याची काय गरज आहे? बाकी विश्वामध्ये प्राणी, पशू, पक्षी इत्यादींच्या ८४ लाख प्रजाती असू शकतात, कारण अनेक प्रकारची उत्पत्ती आहे. परंतू मनुष्य आपल्या योनीतच पाप-पुण्य भोगत असतो आणि प्राणी आपल्या योनीतच भोगत असतात. न मनुष्य प्राण्याची योनी घेतो, ना प्राणी मनुष्याच्या योनीत जातात. मनुष्याला आपल्याच योनीत दुःख भोगावे लागते, त्यामुळे त्याला मानवी जीवनातच सुख-दु:ख जाणवते. तसेच प्राण्यालाही आपल्या योनीत सुख-दुःख अनुभवावे लागते. पण त्यांना ही बुद्धी नाही की, हे कोणत्या कर्माचे फळ आहे? त्यांचा अनुभव मानवालाही येतो, कारण मानव हा बुध्दीवान आहे, बाकी असे नाही की, मनुष्य ८४ लाख योनीं भोगतात. मानवाला घाबरवण्यासाठी असे म्हणतात की, जर तुम्ही चुकीचे कर्म केले, तर तुम्हाला पशुयोनीत जन्म मिळेल. या संगमाच्या वेळी आपणही, आपले जीवन पलटून पाप आत्म्यापासून पुण्यात्मा आत्म्यांमध्ये बदलत आहोत, अच्छा.