04.07.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,श्रेष्ठ बनायचे आहे तर आपली दिनचर्या रोज तपासा, कोणत्याही कर्मेंद्रिया धोका द्यायला नको,डोळे खूप धोकेबाज आहेत, त्यापासून संभाळ करा"

प्रश्न:-

सर्वात खराब सवय कोणती आहे,त्यापासून वाचण्याचा उपाय कोणता आहे?

उत्तर:-

सर्वात खराब सवय आहे जिभेचा स्वाद.कोणती चांगली गोष्ट पाहिली,तर लपून खातील,लपून खाणे म्हणजे चोरी.माया अनेकांचे कान नाक पकडते.या पासून वाचण्याचे साधन,जेव्हा पण कुठे बुद्धी जाईल,तर स्वतःच स्वतःला सजा द्या.खराब सवयी काढून टाकण्यासाठी स्वतःला सजा द्या.

ओम शांती:- आत्माभिमानी होऊन बसले आहात? प्रत्येक गोष्ट स्वतःला विचारायला पाहिजे,आम्ही

आत्मअभिमानी होऊन बसलो आहोत?बाबांची आठवण करत आहोत? गायन पण आहे शिवशक्ती पांडव सेना.ही शिवबाबाची सेना बसली आहे ना.शारीरिक सेनेमध्ये फक्त जवान असतात,वृद्ध किंवा मुलं नसतात.या सेनेमध्ये तर जवान,वृद्ध, मुलं इत्यादी सर्व बसले आहेत.ही माये वरती विजय मिळवणारी सेना आहे.प्रत्येकाला मायेला जिंकून बाबा पासून बेहद्दचा वारसा घ्यायचा आहे. मुलं जाणतात,माया खूपच प्रबळ आहे.कर्मेंद्रिया सर्वात जास्त धोका देतात,म्हणून दिनचर्या म्हणजे चार्ट लिहा,आज कोणत्या कर्मेंद्रियाने धोका दिला.आज अमक्या स्त्रीला पाहिले,तर मनात आले यांना स्पर्श करावा,असे करावे.डोळे खूप नुकसान करतात.प्रत्येक कर्मेंद्रिया ला पहा,कोणत्या कर्मेंद्रिया खूप नुकसान करतात.सूरदास चे पण उदाहरण आहे.स्वतःला तपासायला पाहिजे, डोळे खूप धोका देणारे आहेत, चांगल्या चांगल्या मुलांना पण माया धोका देते.जरी सेवा चांगली करतात परंतु डोळे धोका देतात,त्यासाठी स्वतःला तपासायचे आहे,कारण माया दुश्मन आहे.आपल्या श्रेष्ठ पदापासून वंचीत करते.जी समजदार मुलं आहेत,त्यांना चांगल्या प्रकारे नोंद करायला पाहिजे.नोंद करण्यासाठी डायरी खिशामध्ये हवी. भक्ती मार्गामध्ये बुद्धी दुसरीकडे जाते,तर स्वतःला चापट मारतात. तुम्हाला पण स्वता:ला सजा द्यायला पाहिजे.खूप खबरदारी घ्यायला पाहिजे,कर्मेंद्रिया धोका तर देत नाहीत.किनारा करायला पाहिजे,उभे राहुन पाहायला पण नाही पाहिजे. स्त्री-पुरुषाचा खूप हंगामा होतो. पाहिल्यानंतर कामुक दृष्टी होते, म्हणून संन्यासी लोक डोळे बंद करून बसतात.काही काही संन्यासी तर स्त्रियांकडे पाठ करून बसतात. त्यांना काय मिळते दहा-वीस लाख किंवा एक दोन कोटी मिळतील,मेले तर सर्व नष्ट होऊन जाते,परत दुसर्‍या जन्मात जमा करावे लागेल.तुम्हा मुलांना तर जे काही मिळते,ते अविनाशी वारसा होतो. स्वर्गामध्ये धनाची लालच नसते.कोणत्या अप्राप्त वस्तू राहत नाहीत,ज्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. कलियुग आणि सतयुगाच्या मध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे.तेथे तर अपार सुख मिळते.येथे तर काहीच नाही.बाबा म्हणतात,संगम अक्षराच्या सोबत, पुरुषोत्तमा अक्षर जरूर लिहा.अगदी स्पष्ट बोलायला पाहिजे,समजवण्या मध्ये सहज होते.मनुष्यापासूनच देवता बनू शकतात,तर बाबा संगम युगामध्येच देवता बनवण्यासाठी, मनुष्याला स्वर्गवासी बनवण्यासाठी येतात. मनुष्य तर खूप अज्ञान अंधकारामध्ये आहेत. स्वर्गामध्ये काय असेल हे माहित नाही.दुसऱ्या धर्माचे तर स्वर्गाला पाहू पण शकत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात तुमचा धर्म खुप सुख देणारा आहे.त्यांना स्वर्ग म्हणतात,परंतु हे थोडेच समजतात की आम्ही पण स्वर्गामध्ये जाऊ शकतो.कोणालाही माहिती नाही,भारत वासी हे विसरले आहेत,स्वर्गाला लाखो वर्ष पूर्व म्हणतात.क्रिश्चन लोक स्वता: म्हणतात तीन हजार वर्षपूर्व स्वर्ग होता.लक्ष्मीनारायण ला भगवान भगवती म्हणतात,जरूर ईश्वरच भगवान भगवती बनवतील.तर कष्ट करायला पाहिजेत,रोज आपली दिनचर्या तपासायला पाहिजे,कोणत्या कर्मेंद्रिया ने धोका तर नाही दिला.जिभेचा स्वाद पण काही कमी नाही,कोणती चांगली गोष्ट पाहिली तर,लपून खातात.ते समजत नाहीत,हे पण पाप आहे. लपून खाणे म्हणजे चोरी झाली ना.तेही शिवबाबाच्या यज्ञामध्ये चोरी करणे तर खूपच खराब आहे.एक रुपयाचा चोर आणि लाख रुपयाचा ही,चोर म्हटले जाते.माया अनेकांना नाकाला पकडते.या सर्व खराब सवयी काढून टाकायच्या आहेत. स्वतःलाच सजा द्यायला पाहिजे.जोपर्यंत खराब सवयी आहेत,तोपर्यंत उच्चपद मिळू शकत नाही. स्वर्गामध्ये जाणे तर मोठी गोष्ट नाही परंतु कुठे राजा राणी कुठे प्रजा.तर बाबा म्हणतात कर्मेंद्रियाची तपासणी करायला पाहिजे.कोणत्या कर्मेन्द्रिया धोका देतात,दिनचर्या तपासायला पाहिजे.हा पण व्यापार आहे ना. बाबा समजवतात,माझ्याशी व्यापार करायचा आहे.उच्च पद मिळवायचे असेल तर,श्रीमता वरतीच चाला. बाबा श्रीमत देतात,त्यामध्ये पण माया विघ्न आणते.श्रेष्ठ कार्य करू देत नाही.बाबा म्हणतात,हे विसरू नका.चुका केल्यामुळे खूप पश्चात्ताप होईल,कधीच उच्चपद मिळू शकणार नाही.आता तर खुशीने म्हणतात,आम्ही तर नरापासून नारायण बनू परंतु स्वतःला विचारत रहा.कोणत्या कर्मइंद्रिया धोका तर देत नाहीत.स्वतःची प्रगती करायची असेल तर बाबा जे श्रीमत देतात ते आचरणामध्ये आणा.साऱ्या दिवसाची दिनचर्या तपासून पहा, चुका तर होत राहतात.डोळे खूप धोका देतात.त्यांना खाऊ घालू, यांना काही वस्तू भेट देऊ,आपला खूप वेळ वाया घालवतात.विजयी माळेचा मणी बनण्या मध्ये खूप कष्ट आहेत.मुख्य आठ रत्न आहेत.नव रत्न म्हणतात ना.एक तर बाबा आहेत,बाकी आठ रत्न आहेत.बाबांची मध्ये खूण पण पाहिजे ना. कोणती ग्रहचारी इत्यादी बसते तर नऊ रत्नाची अंगठी घालतात.इतक्या आत्म्यांमधून पुरुषार्थ करणारे आठच,आदराने म्हणजे चांगल्या मार्काने पास होतात.आठ रत्नाची खूप महिमा आहे.देह अभिमानामध्ये आल्यामुळे कर्मेंद्रिये खूप धोका देतात.भक्तीमध्ये पण चिंता राहते ना, डोक्यावरती पापाचे ओझे खूप आहे.दान पुण्य केले तर पाप नष्ट होतील. सतयुगामध्ये कोणत्या काळजीची गोष्टच नाही,कारण तेथे रावण राज्यच नाही.तेथे पण अशा गोष्टी असतील,तर नर्क आणि स्वर्गामध्ये काहीच फरक राहिला नसता.तुम्हाला उच्च पद देण्यासाठी भगवान शिकवत आहेत.बाबांची आठवण येत नसेल तर, शिकवणाऱ्या शिक्षकांची आठवण करा,अच्छा हे आठवणीत ठेवा कि,आमचे एकच बाबा सद्गुरू आहेत.मनुष्यांनी आसुरी मतावरती बाबांचा खूप तिरस्कार केला आहे. बाबा आत्ता सर्वावरती उपकार करतात.तुम्हा मुलांना पण उपकार करायला पाहिजे.कुणावर ही अपकार नको,कुदृष्टी पण जायला नको,त्यामुळे आपलेच नुकसान होते.असे वातावरण पण दुसऱ्या वरती परिणाम करते.बाबा म्हणतात खूप मोठे लक्ष्य आहे.रोज आपली दिनचर्या तपासा की,कोणते विकर्म तर केले नाही?ही विकर्मी दुनिया,विकर्मी सवंत आहे. विकर्माजीत देवताच्या सवंत बद्दल कोणालाच माहिती नाही.बाबा समजवतात,विकर्माजीत इसवी सनाला ५००० वर्ष झाले,परत विकर्म इसवी सन सुरू होते. राजे पण विकर्मच करत राहतात,तेव्हा बाबा म्हणतात कर्म,अकर्म,विकर्माची गती मी तुम्हाला समजावतो.रावण राज्यांमध्ये तुमचे कर्म,विकर्म बनतात.सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात,विकर्म बनत नाहीत.स्वर्गामध्ये विकाराचे नाव रूप नसते.हा ज्ञानाचा तिसरा नेत्र आता तुम्हाला मिळाला आहे.आता तुम्ही मुलं बाबा द्वारे त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनतात,मनुष्य कोणी बनवू शकत नाही.तुम्हाला बनवणारे बाबा आहेत.प्रथम जेव्हा आस्तिक बनाल,तेव्हा त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनू शकता. साऱ्या वैश्विक नाटकाचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे.मुळवतन सूक्ष्मवतन ८४ चक्राचे सर्व रहस्य बुद्धीमध्ये आहे,परत अनेक धर्माची वृद्धी होत राहते.त्या धर्म संस्थापकाला गुरू पण म्हणणार नाही.सर्वांचे सद्गती करणारे तर सद्गुरु एकच आहेत. बाकी ते काही सद्गती करण्यासाठी थोडेच येतात.ते धर्म संस्थापक आहेत,त्यांची आठवण केल्यामुळे सदगती थोडीच होऊ शकते?काहीच नाही.सर्वांना भक्तीच्या रांगेमध्ये म्हटले जाते. ज्ञानाच्या रांगेमध्ये फक्त तुम्हीच आहात.तुम्ही पंडे आहात.सर्वांना शांतीधाम सुखधामचा रस्ता दाखवतात.बाबा मुक्तिदाता मार्गदर्शक आहेत.त्या बाबांची आठवण केल्यामुळेच विकर्म विनाश होतील.आता तुम्ही मुलं आपले विकर्म विनाश करण्याचा पुरुषार्थ करत आहात.तर तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे की,एकीकडे पुरुषार्थ,तर दुसरीकडे विकर्म व्हायला नको.पुरुषार्था सोबतच विकर्म केले,तर शंभर पटीने सजा मिळेल.जितके शक्य आहे,विकर्म करू नका,नाहीतर आणखीच पापकर्म होतील,नाव पण बदनाम कराल.जेव्हा तुम्ही जाणतात,भगवान आम्हाला शिकवत आहेत,तर परत कोणतेही विकर्म व्हायला नको.ही माझी पत्नी आहे,असे नाही आम्ही तर ब्रह्मकुमार कुमारी आहोत.शिव बाबांचे नातू आहोत.आम्ही बाबांशी प्रतिज्ञा केली आहे,राखी बांधली आहेत,परत डोळे का धोका देतात? आठवणीच्या शक्तीद्वारे कोणत्याही कर्मेंद्रियाच्या धोक्यापासून सुटू शकतात,खूप कष्ट पाहिजेत.बाबाच्या श्रीमतानुसार धारणा करुन दिनचर्या लिहा.स्त्री-पुरुष पण आपसा मध्ये याच गोष्टी करा,आम्ही तर बाबा पासून पूर्ण वारसा घेऊ,शिक्षका पासून पूर्ण रितीने शिकू.असे शिक्षक परत कधीच मिळू शकत नाहीत,जे बेहद्दचे ज्ञान देतील.लक्ष्मीनारायणला जाणत नाहीत,तर त्यांच्यानंतर येणाऱ्यांना कसे जाणतील.बाबा म्हणतात,सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान फक्त तुम्हीच जाणतात,तेही संगम युगामध्ये.बाबा खूप समजवतात हे करा,अशा प्रकारे करा,परत येथून गेल्यानंतर सर्व विस्तृत होते.हे समजत नाहीत, शिवबाबा आम्हाला सांगत आहेत, नेहमी समजा शिवबाबा ज्ञान देत आहेत.यांचा फोटो पण ठेवू नका, ब्रह्माचा रथ तर भाड्याने घेतला आहे. हे पण पुरुषार्थी आहेत.हे पण म्हणतात,मी बाबा पासून वारसा घेत आहे.तुमच्या सारखेच हे पण विद्यार्थी जीवनामध्ये आहेत.पुढे चालून तुमची खूप महिमा होईल.आता तर तुम्ही पूज्य देवता बनण्यासाठी शिकत आहात,परत सतयुगा मध्ये तुम्ही देवता बनाल.या सर्व गोष्टीं बाबा शिवाय कोणी समजावू शकत नाही.भाग्य मध्ये नाहीच तर संशय येतो.शिवबाबा कसें शिकवतील,मी मानत नाही.जर मानत नसाल,परत शिवबाबाची आठवण कसे करू शकाल?विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत.ही सर्व क्रमानुसार राजधानी स्थापन होत आहे,यामध्ये दासदासी पण पाहिजेत ना.राजांना दासी पण हुड्यांमध्ये मिळतात.येथेच किती दास दासी ठेवतात,तर सतयुगा मध्ये किती असतील.असा ढिल्ला पुरुषार्थ व्हायला नको,ज्यामुळे दास दासी बनाल.बाबांना विचारू शकता,आता मृत्यू झाला तर,कोणते पद मिळेल.बाबा लगेच सांगतील, स्वतःची दिनचर्या,स्वतः तपासून पहा.अंतकाळामध्ये क्रमानुसार कर्मातीत अवस्था होईल.ही खरी कमाई आहे.त्या कमाई मध्ये तर रात्रंदिवस व्यस्त राहतात.व्यापारी तर एक हाताने भोजन करतात,दुसऱ्या हाताने फोन वरती कार्याव्यवहार चालू ठेवतात.आता सांगा असे मनुष्य ज्ञानामध्ये चालू शकतील?ते म्हणतात आम्हाला वेळ कुठे आहे? अरे खरी राजाई मिळत आहे,तुम्ही फक्त बाबाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील.ईष्ट देवता, इत्यादींना पण आठवण करतात ना.त्यांच्या आठवणी द्वारे काहीच मिळत नाही.बाबा नेहमीच प्रत्येक गोष्ट समजावत राहतात,परत कोणी असे म्हणू शकणार नाही की, या गोष्टीवर समजावले नाही.तुम्हा मुलांना संदेश पण सर्वांना द्यायचा आहे.विमानातून पत्रके वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.त्यामध्ये लिहा शिवबाबा असे म्हणतात.ब्रह्मा पण शिवबाबाचा मुलगा आहे.प्रजापिता आहेत तर ते पिता पण आहेत आणि शिव पिता पण आहेत.शिवबाबा म्हटल्यामुळे अनेक मुलांना प्रेमाचे आश्रू येतात. कधी पाहिले पण नाही. बाबांनालिहतात,कधी येऊन तुम्हाला भेटू. बाबा या बंधनापासून मुक्त करा. अनेकांना बाबांचा परत राजकुमारा चा साक्षात्कार होतो.पुढे चालून अनेकांना साक्षात्कार होतील,तरीही पुरुषार्थ तर करावा लागेल ना. मनुष्याला मृत्यूची वेळ आल्यानंतर म्हणतात,भगवंताची आठवण करा. तुम्ही पण पहाल,अंत काळात खूप पुरुषार्थ करतील,आठवण करायला लागतील.बाबा मत देतात,मुलांनो जो पण वेळ मिळत आहे,त्यामध्ये पुरुषार्थ करून संपुर्ण बना.

बाबाच्या आठवणीमध्ये राहून विकर्म विनाश करा,तर उशीरा येऊन पण पुढे जाऊ शकाल.जसे रेल्वेला उशीर होतो,तर तीव्र गतीने जाऊन वेळ भरून काढते आणि वेळेवर पोहोचते.आठवणी मध्ये राहण्यासाठी येथे खूप वेळ मिळतो,तर तुम्ही खूप आठवण करायला पाहिजे.येथे येऊन कमाई करा.बाबा मतं देतात,अशा प्रकारे करा,स्वतःचे कल्याण करा. बाबाच्या श्रीमतावरती चाला. विमानांमधून पत्रके वाटा,ज्यामुळे मनुष्य समजतील,हे तर बरोबर संदेश देत आहेत.भारत खूप मोठा आहे,हे सर्वांना माहिती पडायला पाहिजे,जे परत असे म्हणू शकणार नाही,बाबा आम्हाला तर माहिती झाले नाही,अच्छा.

गोडगोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति,मात पिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) समजदार बनून स्वतःला तपासायचे आहे की,डोळे धोका तर देत नाहीत.कोणत्याही कर्मेंद्रियाच्या वश होऊन उलटे कर्म करायचे नाहीत. आठवणीच्या शक्तीद्वारे कर्मेंद्रियाच्या धोक्यापासून सुटायचे आहे.
  2. (२) या खऱ्या कमाई साठी वेळ काढायचा आहे.उशिरा आले आहात,तर पुरुषार्थ करून पुढे जायचे आहे.ही विकर्म विनाश करण्याची वेळ आहे,म्हणून आता कोणतेही विकर्म करायचे नाहीत.

वरदान:-

प्रत्येक परिस्थितीमध्ये सुरक्षित राहणारे वातानुकुलीत तिकिटाचे अधिकारी भव.

वातानुकुलित तिकीट त्या मुलांनाच मिळते,जे प्रत्येक परिस्थितीमध्ये सुरक्षित राहतात.कोणतीही परिस्थिती येईल,कशी पण समस्या असेल परंतु प्रत्येक परिस्थितीला सेकंदामध्ये पार करण्याचे प्रमाणपत्र पाहिजे.जसे त्या तिकीटासाठी पैसे देतात,असेच येथे नेहमी विजयी बनण्याचे पैसे पाहिजेत.याद्वारे वातानुकुलित तिकीट मिळू शकेल.हे पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करण्याची जरुरत नाही,फक्त बाबांच्या सोबत राहा,तर अगणित कमाई जमा होत राहील.

बोधवाक्य:-

कशी पण परिस्थिती असेल,परिस्थिती जात राहते परंतु खुशी जायला नको.

||| ओम शांती |||

ओम शांती.