04-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, जेव्हा तुम्ही फुला सारखे बनाल, तेव्हा हा भारत काट्याच्या जंगला पासून संपूर्ण फुलांची बाग बनेल. बाबा तुम्हाला फुलासारखे बनवण्यासाठी आले आहेत"

प्रश्न:-
मंदीर लायक बनण्यासाठी कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यायचे आहे?

उत्तर:-
लायक बनायचे आहे तर, चलन वरती विशेष लक्ष द्या. चलन खूप गोड आणि श्रेष्ठ पाहिजे. इतका गोडवा पाहिजे, जे दुसऱ्यांना त्याची जाणीव होईल. अनेकांना बाबांचा परिचय द्या. आपले कल्याण करण्यासाठी चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून सेवेमध्ये तत्पर राहा.

गीत:-
बदल जाये दुनिया, ना बदलेंगे हम

ओम शांती।
आत्मिक मुलं जाणतात बाबा, ब्रह्मा द्वारे समजावत आहेत. ब्रह्माच्या रथाद्वारेच समजावून सांगतात. आम्ही प्रतिज्ञा करतो की, श्रीमतावरती भारताच्या भुमीला पतिता पासून पावन बनवू. भारत खास आणि बाकी साऱ्या दुनियेला, पतिता पासून पावन बनण्याचा रस्ता दाखवू. असे विचार प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजेत. बाबा म्हणतात, वैश्विक नाटकानुसार, जेव्हा तुम्ही फुलासारखे बनाल आणि जेव्हा वेळ येईल, तर संपूर्ण बाग बनेल. बागवान पण निराकाराला म्हटले जाते, माळी पण निराकार म्हटले जाते, साकारला नाही. माळी पण आत्मा आहे, न की शरीर. बागवान पण आत्मा आहे. बाबा शरीरा द्वारेच समजावतील ना. शरीराच्या सोबतच त्यांना माळी, बागवान म्हटले जाते, जे या विश्वाला फुलांची बाग बनवतात. बाग होती, जिथे हे देवता राज्य करत होते. तेथे कोणते दुःख नव्हते. या काट्याच्या जंगलामध्ये तर दुःखच दुःख आहे, रावणाचे राज्य आहे, काट्याचे जंगल आहे. लगेच कोणी फुलासारखे बनत नाहीत. देवतांच्या पुढे जाऊन गायन करतात, आम्ही जन्म जन्मांतरचे पापी, अजामील आहोत. असे प्रार्थना करतात, की आता येऊन आम्हाला पुण्यात्मा बनवा. आम्ही पापत्मा आहोत, असे समजतात. कधीकाळी पुण्यात्मा होतो. आता या दुनिये मध्ये पुण्य आत्म्याचे फक्त चित्र आहेत. राजधानीचे जे मुख्य आहेत, त्यांचे चित्र आहेत आणि त्यांना असे बनवणारे निराकार शिव आहेत. त्यांचेच चित्र आहे बस, बाकी कोणते चित्र नाहीत. यामध्ये पण शिवाचे मोठे लिंग बनवतात. असे म्हणतात की आत्मा ताऱ्यासारखा आहे, तर जरूर पिता पण असेच असतील, परंतु त्यांची पूर्णपणे ओळख नाही. या लक्ष्मीनारायण चे विश्वामध्ये राज्य होते, त्यांच्या कोणी निंदेच्या गोष्टी लिहीत नाहीत. बाकी कृष्णाला कधी द्वापार मध्ये, कधी कुठे घेऊन जातात. लक्ष्मीनारायण साठी सर्व म्हणतात की, ते स्वर्गाचे मालक होते. हे तुमचे मुख्य लक्ष आहे. राधा-कृष्ण कोण आहेत, मनुष्य बिचारे एकदम संभ्रमित झाले आहेत, काहीच समजत नाहीत. जे बाबा द्वारा समजतात, ते समजवण्याच्या लायक पण बनतात, नाही तर लायक बनू शकत नाही. दैवीगुण धारण करू शकत नाहीत. जरी कितीही समजावले, परंतु वैश्विक नाटकानुसार असे होणारच आहे. तुम्ही आत्ता स्वतःच समजतात, आम्ही सर्व मुलं, बाबांच्या श्रीमतावरती भारताची आत्मिक सेवा, आपल्याच तन-मन-धना द्वारे करत आहोत. प्रदर्शनी किंवा संग्रहालय इत्यादी मध्ये विचारतात की, तुम्ही भारताची काय सेवा करत आहात?तुम्ही जाणतात आम्ही भारताची खूप चांगली सेवा करत आहोत. जंगलापासून बाग बनवत आहोत. सत्ययुग बाग आहे. हे काट्याचे जंगल आहे, येथे एक-दोघांना दुःख देत राहतात. हे तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावू शकता. लक्ष्मीनारायण चे चित्र खूप चांगले बनवायला पाहिजे. मंदिरामध्ये खूप सुंदर चित्र बनवतात. कुठे गोरे, कुठे सावळे चित्र बनवतात, त्यांचे रहस्य काय आहे, हे पण समजत नाहीत. तुम्हा मुलांना हे सर्व ज्ञान आहे. बाबा म्हणतात, मी येऊन सर्वांना मंदिर लायक बनवतो परंतु सर्व मंदिर लायक बनत नाहीत. प्रजेला तर मंदिर लायक म्हणणार नाहीत. प्रजा त्यांचीच असेल, जे पुरुषार्थ करून खूप सेवा करतात. तुम्हा मुलांना आत्मिक सेवा करायची आहे, या सेवेमध्ये आपले जीवन सफल करायचे आहे. चलन पण खूप गोड, सुंदर असायला पाहिजे, जे दुसर्यांना पण खूप गोड भाषेत समजाऊ शकतील. स्वतः काट्यासारखे असतील, तर दुसऱ्यांना फुलासारखे कसे बनवू शकतील? त्यांचा ज्ञानाचा बाण पूर्ण रीतीने लागणार नाही. बाबांची आठवण करत असतील, तर बाण कसा लागेल?आपल्या कल्याणासाठी चांगल्या रीतीने पूर्ण करून सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. बाबा पण सेवा करत आहेत ना. तुम्ही मुलं पण रात्रंदिवस सेवेमध्ये तत्पर रहा. दुसरी गोष्ट बाबा समजवतात, शिवजयंती म्हणजे शिवरात्री, अनेक मुलं तार पाठवतात, त्यामध्ये पण असे लिहायला पाहिजे, जी तार कोणाला दाखवली तर समजून येईल. वृध्दीसाठी साठी काय करायचे आहे, त्याचा पुरुषार्थ केला जातो. संमेलन पण यासाठी करतात की काय काय सेवा करावी, ज्यामुळे बाबांचा परिचय मिळेल. पोस्टाच्या तार विभागा द्वारे पण खुप सेवा होऊ शकते. पत्ता पण लिहतात शिवबाबा, द्वारे ब्रह्मा. प्रजापिता ब्रह्मा पण आहेत, ते आत्मिक पिता, हे शरीराचे. त्यांच्या द्वारे शारीरिक रचना केली जाते. बाबा सृष्टीचे रचनाकार आहेत, कशा प्रकारे रचना करतात, हे दुनिया मध्ये कोणी जाणत नाहीत. बाबा ब्रह्मा द्वारे आता नवीन रचना करत आहेत. ब्राह्मण शेंडी आहेत. प्रथम ब्राह्मण जरूर पाहिजेत. विराट रुपाची शेंडी आहे. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. प्रथम शुद्र तर होऊ शकत नाहीत. बाबा ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांची स्थापना करतात. शुद्र कसे आणि कोणा द्वारे स्थापन करतील. तुम्ही मुलं जाणतात, कशी नवीन रचना करतात, ही बाबांची दत्तक मुलं आहेत. कल्प-कल्प बाबा येऊन क्षत्रिय पासून, ब्राह्मण बनवतात, परत ब्राह्मणापासून देवता बनवतात. ब्राह्मणांची सेवा खूपच उच्च आहे. ते ब्राम्हण लोक स्वतःच पवित्र नाहीत, तर दुसऱ्यांना पवित्र कसे बनवतील. कोणतेही ब्राह्मण संन्याशा ला कधी राखी बांधणार नाहीत. ते म्हणतील आम्ही तर पवित्र आहोत, तुम्ही आपला चेहरा पहा. तुम्ही मुलं पण कोणाकडूनही राखी बांधून घेऊ शकत नाहीत. दुनियेमध्ये तर सर्व बांधतात, बहिण-भावाला बांधते. ही परंपरा आत्ता निघाली आहे. आता तुम्ही शुद्रा पासून ब्राह्मण बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. असे समजावे लागते. स्त्री-पुरुष दोन्ही पवित्रतेची प्रतिज्ञा करतात, दोन्ही सांगू शकतात की, कसे आम्ही बाबाच्या श्रीमताद्वारे पवित्र राहतो. अंतकाळा पर्यंत काम विकारावर विजय मिळवला तर, पवित्र विश्वाचे मालक बनाल. सतयुगाला पवित्र दुनिया म्हटले जाते, त्याची स्थापना होत आहे. तुम्ही सर्व पवित्र आहात. विकारा मध्ये जाणाऱ्यांना पण राखी बांधू शकता. प्रतिज्ञा करून पण पतित बनले, तर म्हणाल तुम्ही राखी बांधण्यासाठी आले होते, परत काय झाले, विकारा द्वारे हार झाली का. हे युद्धाचे मैदान आहे. विकार मोठा दुश्मन आहे, याला जिंकल्यामुळे जगतजीत, राजा-राणी बनायचे आहे. प्रजेला जगतजीत म्हणता येत नाही. कष्ट तर राजा-राणी करतात ना. असे म्हणतात, आम्ही तर लक्ष्मी-नारायण बनू. ते परत राम-सीता पण बनतील. लक्ष्मी नारायणच्या नंतर त्यांची मुलं सिंहासनावरती बसतात. ते लक्ष्मी-नारायण परत दुसऱ्या जन्मांमध्ये खालच्या क्रमांकात जातील. वेगळ्या नाव रुपामध्ये मुलाला सिंहासन मिळते, तर उच्च दर्जा होतो. पुर्नजन्म तर घेतात ना. मुलगा सिंहासनावर बसेल तर, दुसऱ्या दर्जाचे पद होईल. वरती असणारा खाली येईल आणी खालचा वरती येईल. तर आता मुलांना असे, उच्च बनायचे आहे तर, सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. पवित्र बनणे पण खूप आवश्यक आहे. बाबा म्हणतात, मी पवित्र दुनिया बनवतो. चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करणारे थोडेच आहेत, पवित्र तर सारी दुनिया बनते. तुमच्यासाठी तर स्वर्गाची स्थापना करतात. हे वैश्विक नाटकानुसार होणारच आहे, हा खेळ बनलेला आहे. तुम्ही पवित्र बनतात, परत विनाश सुरू होतो. सतयुगाची स्थापना होते. वैश्विक नाटकाला तुम्ही समजू शकतात. सतयुगामध्ये देवतांचे राज्य होते. आता नाही, परत होणार आहे.

तुम्ही आत्मिक सैनिक आहात. तुम्ही पाच विकरावरती विजय मिळवल्यामुळे जगजीत बनाल. जन्मजन्मांतरचे पाप नष्ट करण्यासाठी, बाबा युक्ती सांगत राहतात. जोपर्यंत राजधानी स्थापन होत नाही, तोपर्यंत विनाश होऊ शकत नाही. तुम्ही खूप गुप्त योध्दे आहात. कलयुगाच्या नंतरच सतयुग होणार आहे. परत सतयुगा मध्ये कधी लढाई होत नाही. तुम्ही मुलं जाणतात, सर्व आत्मे जे पण भूमिका वठवतात, त्या सर्वाची नाटकांमध्ये नोंद आहे. जसे कटपुतली असते ना, असे नाचत राहतात. हे पण नाटक आहे, प्रत्येकाची या वैश्विक नाटकांमध्ये भूमिका आहे. भूमिका करत करत तुम्ही तमोप्रधान बनले आहात. परत बाबा वरती घेऊन जातात, सतोप्रधान बनतात. ज्ञान तर सेकंदाचे आहे. सतोप्रधान बनतात, परत खाली उतरत उतरत तमोप्रधान बनतात. परत बाबा वरती घेऊन जातात. वास्तव मध्ये ते मासे तारांमध्ये लटकतात, या तारामध्ये मनुष्याला घालायला पाहिजे. अशी उतरती कला, परत चढती कला होते. तुम्ही पण असे चढतात, परत उतरत उतरत खाली येतात. पाच हजार वर्षे लागतात, वरती जाऊन, परत खाली येण्यासाठी. हे ८४चे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे. उतरती कला आणि चढतीकलाचे रहस्य पण बाबांनी समजावले आहे. तुमच्या मध्ये पण क्रमानुसार जाणतात आणि परत पुरुषार्थ करतात. जे बाबांची आठवण करतात, ते लवकर वरती जातात. हा प्रवृत्ती मार्ग आहे. जसे जोडीला पळवतात, तर जोडीचा एक पाय बांधतात, परत पळतात. ही पण तुमची स्पर्धा आहे. कोणाचा अभ्यास नसेल तर पडतात. यामध्ये पण असेच होते. एक पुढे जातो, तर दुसरा थांबतो, कुठे तर दोन्ही खाली पडतात. बाबांना आश्चर्य वाटते, वृध्दांना पण काम विकाराची आग लागते, तर ते खाली पडतात. असे थोडेच त्यांनी खाली पाडले. काम विकारात जाणे, न जाणे आपल्या हातामध्ये आहे. कोणी धक्का थोडेच देतात, आम्ही विकारांमध्ये का गेलो?काही झाले तरी आम्हाला विकारांमध्ये जायचे नाही. विकारात गेले तर खूप जोरांमध्ये चापट लागेल, परत पश्चाताप करतात. हाडे पण मोडतात. खूप मार लागतो. बाबा वेगवेगळ्या प्रकारे समजावत राहतात. महाशिवरात्रीच्या दिवशी अशी तार यायला पाहिजे, जे मनुष्य वाचल्यानंतर लगेच समजतील. बाबा, विचार सागर मंथन करण्यासाठी वेळ देतात. कोणी पाहतील तर आश्चर्य करतील. अनेक पत्र येत राहतात, सर्व जण लिहतात बापदादा. तुम्ही पण समजावू पण शकता, शिवाला पिता तर ब्रह्माला दादा म्हणतात. एकाला कधी कोणी बापदादा म्हणतात का?या आश्चर्यकारक गोष्टी आहेत, यामध्येच खरेखुरे ज्ञान आहे. आठवणी मध्ये असतील तेव्हाच कोणालाही ज्ञानबाण लागेल. सारखे सारखे देह अभिमानामध्ये येतात. बाबा म्हणतात कोणाचा मृत्यू होतो, तर कोणता विचार यायला नको. आत्म्यामध्ये जी भूमिका आहे, त्याला साक्षी होऊन पाहयचे आहे. आत्म्याला एक शरीर सोडून दुसरे घेऊन, भूमिका करायची आहे. यामध्ये आम्ही काय करू शकतो. हे ज्ञान तर तुमच्या बुद्धी मध्ये आहे, पण क्रमानुसर आहे. काहींच्या बुध्दीमध्ये हे ज्ञान थांबू शकत नाही, म्हणून कोणाला समजावू शकत नाहीत. आत्मा अगदी गरम तव्या सारखी तमोप्रधान पतित आहे. त्याला ज्ञानामृत दिले जाते, तरीही थांबत नाही. ज्यांनी खूप भक्ती केली आहे, त्यांनाच ज्ञानाचा बाण लागेल, लगेच धारणा पण होईल. हिशेबच आश्चर्यकारक आहे. प्रथम क्रमांका मधील पावनच पतित बनतात. या पण खूप समजण्याच्या गोष्टी आहेत. कोणाच्या भाग्या मध्ये नाहीतर, हे ज्ञान सोडून देतात. जर लहानपणा पासूनच ज्ञान घेतील, तर धरणा होत जाईल. असे समजतील, त्यांनी खूप कष्ट केले आहेत, जे खूप हुशार झाले आहेत, कारण कर्मेन्द्रिय मोठे झाल्यामुळे परत समज पण जास्त येते. शारीरिक, आत्मिक दोन्हीकडे लक्ष दिल्यामुळे परत त्याचा परिणाम दिसून येतो. हे ईश्वरीय शिक्षण आहे, फरक तर आहे ना. परंतु जेव्हा ती लगन पण लागेल ना, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांसाठी, मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)आत्मिक मिलटरी बनवून पाच विकाराला जिंकायचे आहे. पवित्र बनायचे आहे. श्रीमता वरती भारताला पावन बनवण्याची सेवा करायची आहे.

(२) या नाटकांमध्ये प्रत्येक भूमिका आत्म-आभिमानी होऊन वठवायची आहे. कधीही देह अभिमानामध्ये यायचे नाही. साक्षी बनून प्रत्येक कलाकाराची भूमिका पाहयची आहे.

वरदान:-
स्वमाना द्वारे देह अभिमानाला समाप्त करणारे नेहमी निर्मान भव.

जी मुलं स्वमान मध्ये राहतात, त्यांना कधीच अभिमान येऊ शकत नाही. जितका मोठा सन्मान तेवढे जास्त आज्ञाधारक बनतात. लहान-मोठे, ज्ञानी-अज्ञानी, मायाजीत किंवा मायावश, गुणवान आहेत किंवा एक दोन अवगुण पण आहेत, मायाजीत पण आहेत, म्हणजेच गुणवान बनण्याचे पुरुषार्थी आहेत, परंतु स्वमान मध्ये राहणारे, सर्वांना मान देणारे दाता असतात, म्हणजे स्वतः संपन्न झाल्यामुळे नेहमी दयावान असतात.

बोधवाक्य:-
स्नेहच सहज आठवणी चे साधन आहे, म्हणून नेहमी स्नेही राहयचे आणि स्नेही बनवायचे आहे.