04-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आता या ही दुनिया निराशवादी केस आहे,सर्वांचा मृत्यू होईल म्हणून ममत्व काढून टाका, माझीच आठवण करा"

प्रश्न:-
सेवेमध्ये उमंग उत्साह न येण्याचे कारण कोणते आहे?

उत्तर:-
(१) लक्षणं ठीक नाहीत,तर बाबांची आठवण करू शकत नाहीत,यामुळेच सेवेमध्ये उमंग उत्साह येऊ शकत नाही.काही ना काही उलटे कर्म होत राहते म्हणून सेवा करू शकत नाहीत.(२) बाबाचे श्रीमत आहे,तुम्हीच या दुनिये पासून मेले तर ही दुनिया पण मेल्यासारखीच आहे,या मताची धारणा करु शकत नाहीत.बुद्धी देहाच्या संबंधांमध्ये फसलेली आहे. ते सेवा करू शकत नाहीत.

गीत:-
ओम नमः शिवाय

ओम शांती।
आत्ता हे भक्तिमार्गाचे गीत ऐकले.शिवाय नमः म्हणतात. शिवाचे नाव सारखे सारखे घेत राहतात.रोज शिवाच्या मंदिरात जातात आणि जे सण आहेत ते वर्षभर साजरे करतात.पुरुषोत्तम महिना पण असतो आणि पुरुषोत्तम वर्ष पण असते.शिवाय नमःतर रोज म्हणतात.शिवाचे पुजारी तर खूप आहेत. रचनाकार उच्च ते उच्च,तर भगवानच आहेत.असे म्हणतात पतितपावन परमात्मा शिव आहेत, रोज पूजा पण करतात.तुम्ही मुलं जाणता,हे सांगम युग,पुरुषोत्तम बनण्याचे युग आहे.जसे शारीरिक शिक्षणाद्वारे कोणते ना कोणते उच्च पद मिळते ना,या लक्ष्मी नारायण ने, हे पद कसे मिळवले? विश्वाचे मालक कसे बनले? कोणालाही माहिती नाही.शिवाय नम म्हणतात. तुम्हीच मात पिता,आम्ही तुमची मुलं,रोज महिमा गात राहतात परंतु हे जाणत नाहीत की,ते कधी येऊन मात पिता बनून वारसा देतात. तुम्हाला माहित आहे की,दुनियाचे मनुष्य काहीच जाणत नाहीत. भक्तिमार्गामध्ये खूप धक्के खात राहतात.अमरनाथला अनेक मनुष्य जातात.खूप धक्के खातात.कोणाला असे म्हणले तर बिघडतात.तुम्ही थोडी मुलं आहात,ज्यांना मना मध्ये खूप खुशी आहे.मुलं लिहतात बाबा जेव्हापासून तुम्हाला ओळखले आहे, बस,आता तर आमच्या खुशीचा पारावार नाही.काही कष्ट इत्यादी होतात, तरी खुशीमध्ये राहिले पाहिजे.आम्ही बाबाचे बनलो आहोत,हे कधीच विसरायला नाही पाहिजे.तुम्ही मुलं जाणतात की, आम्ही बाबांना जाणले आहे,भेटलो आहे,तर खुशीचा पारावार,ठिकाणा राहिला नाही पाहिजे.माया सारखे सारखे विसरायला लावते.जरी लिहतात आम्हाला निश्चय आहे, बाबांना आम्ही जाणतो,तरीही चालता-चालता थंड पडतात.ज्ञान घेतल्यानंतर सहा आठ महिन्या नंतर,परत दोन-तीन वर्षे येत नाहीत. तर बाबा समजतात,पुर्ण निश्चिय बुद्धी नाहीत.पूर्ण नशा चढलेला नाही.असे बेहदचे पिता ज्याद्वारे २१ जनमांचा वारसा मिळतो.निश्चय झाला तर,खूप खुशी,खूप नशा राहिला पाहिजे.जसे कोणाच्या मुलाला राजा दत्तक घेऊ इच्छितात, त्या मुलाला माहित पडते की, आमच्यासाठीच अशा गोष्टी होत आहेत, राजाची इच्छा आहे,की या मुलाला मी वारस बनवेल,तर मुलाला खूप खुशी होते ना.मी राजाचा मुलगा बनत आहे किंवा गरीबाचा मुलगा जर सावकार दत्तक घेतात,तर खूप खुशी होते ना.ते जाणतात की,मला अमक्याने दत्तक घेतले आहे,तर गरिबीचे दुःख विसरते.ती तर एक जन्माची गोष्ट आहे.येथे मुलांना २१ जन्माचा वारसा मिळण्याची खुशी होते.बेहद्दच्या बाबांची आठवण करायची आहे आणि दुसऱ्याला पण रस्ता दाखवायचा आहे.शिवबाबा पतित पावन आले आहेत.ते समजवतात की,मी तुमचा बेहद्दचा पिता आहे. असे कोणी मनुष्य म्हणू शकत नाही की,मी तुमचा बेहद्दचा पिता आहे.बाबाच समजाऊन सांगतात की,पाच हजार वर्षापूर्वी मी आलो होतो.तुम्हाला हेच ज्ञान दिले होते की,माझी आठवण करा.मज पतित पावन बाबांची आठवण केल्यामुळेच पतिता पासून पावन बनाल,दुसरा कोणता उपाय नाही. पतित-पावन एकच शिव पिता आहेत.कृष्णाला भगवान म्हणू शकत नाही.गितेचे भगवान एकच पतित-पावन पुनर्जन्म रहित आहेत, प्रथम ही गोष्ट लिहुन घ्या.मोठ्या मनुष्यांनी लिहलेला अभिप्राय वाचतील,तर समजतील,हे ठीक आहे.कोण्या साधारण मनुष्यांचा अभिप्राय पाहतात, तर म्हणतात, यांना ब्रह्मकुमारी ने जादू केली आहे, तेव्हा तर अभिप्राय लिहला आहे. मोठ्या मनुष्यासाठी असे म्हणत नाहीत.तुम्ही काही म्हणतात,तर समजतात लहान मुख मोठ्या गोष्टी करतात की,भगवान आले आहेत. असे फक्त म्हणायचे नाही की, भगवान आले आहेत,याद्वारे काहीच समजणार नाहीत आणखीनच हसतील.हे समजून सांगायचे आहे की, दोन पिता आहेत.प्रथमत: म्हणायचे नाही की,भगवान आले आहेत,कारण आज कल दुनियेमध्ये भगवान म्हणवणारे खूप झाले आहेत.सर्व स्वतःला भगवंताचे अवतार समजतात.तर युक्तीने दोन पित्याचे रहस्य समजावयाचे आहे. एक आहेत हद्दचे पिता,दुसरे बेहद्दचे पिता आहेत.पित्याचे नाव शिव आहे. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत,तर जरूर मुलांना वारसा देतील. शिवजयंती पण साजरी करतात,तेच येऊन स्वराज्याची स्थापना करतात, तर जरूर नर्काचा विनाश झाला असेल,त्यांची लक्षणं पण आहेत,ही महाभारताची लढाई आहे,बाकी फक्त भगवान आले आहेत,असे म्हटल्यामुळे कोणी समजणार नाहीत.दवंडी देत राहतात,अशी उलटी सेवा केल्यामुळे आणखीच सेवेमध्ये कमी येते.एकीकडे म्हणतात भगवान आले आहेत,स्वयं भगवान शिकवत आहेत,परत जाऊन लग्न करुन विकारी बनतात.ते लोक म्हणतील,तुम्हाला काय झाले?तुम्ही तर म्हणत होते,स्वयं भगवान शिकवत आहेत.ते म्हणतात,आम्ही जे ऐकले ते बोललो.आपल्या मुलांकडून पण,अनेक विघ्न पडतात,जसे हिंदू धर्माच्या लोकांनी स्वतालाच चापट मारली आहे. वास्तविक देवी-देवता धर्माचे आहात परंतु हिंदू धर्माचे मानतात. स्वत:लाच चापट मारली आहे ना. वास्तव मध्ये देवी-देवता धर्माचे आहेत परंतु स्वतःला हिंदू म्हणतात तर स्वताला चापट मारली आहे ना. आता तुम्ही जाणता आम्हीच पुज्य होतो,तर श्रेष्ठ कर्म,श्रेष्ठ धर्म होता.आसुरी मतावरती चालून धर्मभ्रष्ट कर्म भ्रष्ट बनले आहेत.आसुरी मतावर,स्वत:च आपल्या धर्माची निंदा सुरू केली आहे.बाबा म्हणतात तो आसुरी संप्रदाय आहे,हा दैवी संप्रदाय आहे.ज्यांना मी राजयोग शिकवतो.आता कलियुग आहे.जे ज्ञान घेतात, ते आसुरापासून देवता बनतात.हे ज्ञान देवता बनण्यासाठी आहे.पाच विकाराला जिंकल्यामुळे देवता बनतात.बाकी आसुर आणि देवतांचीची कोणती लढाई लागलेली नाही.ही पण चूक केली आहे,परत दाखवतात जिकडे साक्षात भगवान आहेत,त्यांचा विजय निश्चित आहे, त्यामध्ये नाव कृष्णाचे लिहले आहे.वास्तव मध्ये तुमचे युध्द मायेशी आहे. बाबा खूप गोष्टी समजवतात परंतु तमोप्रधान असे आहेत,जे काहीच समजत नाहीत.ते बाबांची आठवण करू शकत नाहीत. ते समजतात आमची अशी तमोप्रधान बुद्धी आहे, जे आठवण करू शकत नाहीत,म्हणून उल्टे काम करत राहतात.चांगली चांगली मुलं पण आठवण करत नाहीत.लक्षणं सुधारत नाहीत म्हणून सेवेचा उमंग उत्साह येत नाही.बाबा म्हणतात, देहाचे जे पण संबंध आहेत,त्यांना मारा किंवा विसरा.आता मारा,हे अक्षर वास्तव मध्ये नाही.असे म्हणतात तुमचा मृत्यू झाला तर, दुनिया पण मेल्या सारखीच आहे.हे बाबाच समोर बसवून समजवतात. बुद्धीद्वारे विसरायचे आहे,जेव्हा तुम्ही आमचे बनले आहात,तर या सर्वांना विसरा,एक बाबांची आठवण करा.जसे कोणत्या आजारी मनुष्यांच्या जगण्याच्या आशा संपतात,तर त्यापासून ममत्त्व काढून टाकायचे असते,परत त्यांना म्हणतात राम राम म्हणा.बाबा पण म्हणतात,या दुनियेची केस निराशवादी (होपलेस) झालेली आहे. ही नष्ट होणार आहे.सर्वांचा मृत्यू होईल म्हणून यामधून ममत्व काढून टाका.ते तर राम नामाची धुन अशी लावतात.येथे तर एकाची गोष्ट नाही. सर्व दुनियेचा विनाश होणार आहे, म्हणून तुम्हाला एकच मंत्र देतात, माझी आठवण करा.बाबा वेग-वेगळ्या प्रकारे समजून सांगत राहतात.आता पुरुषोत्तम महिना आला आहे,तर पुरुषोत्तम युगा बाबत पण समजाऊन सांगत राहतात.ज्ञान खूप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगायला पाहिजे.धारणा चांगली पाहिजे,कोणते पाप काम कर्म व्हायला नको.न विचारता कोणती गोष्ट खाणे,हे पण गुप्त पाप आहे. कायदे खूप खडक आहेत.पाप करतात आणि सांगत नाहीत,तर परत पापाची वृद्धी होत जाते.येथे तर तुम्हा मुलांना पुण्यात्मा बनायचे आहे.आम्हाला पुण्य आत्म्याशी स्नेह आहे आणि पाप आत्म्याशी विरोध आहे.भक्तिमार्गा मध्ये जाणतात की,चांगले कार्य केल्यामुळे चांगले फळ मिळेल,म्हणून दान पुण्य इत्यादी चांगले काम करत राहतात. हे नाटक आहे,तरी म्हणतात भगवान चांगल्या कर्माचे फळ चांगलेच देतात.बाबा म्हणतात,मी फक्त हा धंदा थोडेच बसून करतो,ही तर अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. पूर्वनियोजित नाटका नुसार बाबांना जरूर यायचे आहे.

बाबा म्हणतात,मला येऊन सर्व आत्म्यांना रस्ता दाखवयाचा आहे. यामध्ये कृपा इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही.काही जण लिहतात,बाबा तुमची कृपा असेल तर,आम्ही आपणास कधी विसरणार नाहीत. बाबा कृपा किंवा आर्शिवाद इत्यादी करत नाहीत,त्या तर भक्तिमार्गाचे गोष्टी आहेत.तुम्हाला तर स्वतःच स्वतः वरती कृपा करायची आहे. बाबाची आठवण कराल तर,विकर्म विनाश होतील.भक्तिमार्गाच्या गोष्टी ज्ञान मार्गामध्ये नसतात.ज्ञानमार्ग आहेच राजयोगाचे शिक्षण.शिक्षक काही कोणावरती कृपा थोडीच करतील.प्रत्येकाला अभ्यास करायचा आहे.बाबा जी श्रीमत देतात,त्यावरती चालले पाहिजे ना. परंतु आपल्या मतावर चालल्यामुळे काहीच सेवा करत नाहीत.मुलांना पुण्य आत्मा बनायचे आहे. जरा पण कोणते पाप कर्म व्हायला नको.काही मुलं स्वतःचे पाप कधी सांगत नाहीत.अशी मुलं उच्चपद मिळवू शकत नाहीत.गायन पण आहे,प्रगती केली तर वैकुंठाचा रस मिळेल.मुलं जाणतात खूप मोठे पद मिळत आहे.विकारात जातात तर ते काहीच कामाचे राहत नाहीत.अशुद्ध अहंकार आहे प्रथम विकार,परत काम, क्रोध, लोभ पण काही कमी नाही.लोभ, मोह पण सत्यानाश करवतो.मुलं इत्यादीमध्ये मोह असेल,तर त्यांची आठवण येत राहील.आत्मा तर म्हणते माझे एकच बाबा,दुसरे कोणी नाहीत.दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको,असा पुरुषार्थ करायचा आहे. हे सर्व तर नष्ट होणार आहे.विनाश समोर आहे,वारसा तर घेऊ शकणार नाहीत.यामध्ये मोह काय ठेवायचा. अशाप्रकारे आपल्या सोबत गोष्टी करायच्या आहेत.सर्व दुनियेला बुद्धीने विसरायचे आहे.हे तर सर्व नष्ट होणार आहे.वादळ असे येतील जे एकदम सर्व नष्ट होईल,कुठे आग लागते आणि हवा जोरात येते तर लगेच सर्व काही नष्ट होते.अर्ध्या तासामध्ये शंभर-दीडशे झोपड्या अग्नीमध्ये भस्म होतात.तुम्ही जाणता या दुनियेला,या सृष्टीला आग लागणार आहे,नाही तर इतके मनुष्य कसे मरतील?जे चांगली मुलं आहेत,लक्षणं पण चांगली आहेत,ते सेवा पण छान करतात.तुम्हा मुलांना नशा राहिला पाहिजे.पूर्ण नशा तर अंत काळात राहील,जेव्हा कर्मातीत अवस्था होईल परत पुरुषार्थ करत राहतात.बनारस मध्ये शिवाच्या मंदिरामध्ये खूप जातात,कारण ते उच्च ते उच्च भगवान आहेत.तेथे शिवाची भक्ती खूप करतात.बाबा तर तर समजाऊन सांगत राहतात की, तेथे जाऊन त्यांना समजाऊन सांगा, शिव भगवान, या लक्ष्मीनारायणला हा वारसा देतात.संगम युगामध्येच हा वारसा,त्यांच्याद्वारे मिळाला आहे.हे समजवल्यामुळे परत ब्रह्मा सरस्वतीचे पण ज्ञान मिळते. चित्रावरती स्पष्ट समजाऊन सांगू शकता.यांना हे राज्य कसे मिळाले. या लक्ष्मीनारायणाच्या राज्यांमध्ये भक्तिमार्ग नव्हता.असे म्हणतात भक्ती तर अनादी आहे.आता तुम्हाला खूप ज्ञान मिळत आहे,तर त्याचा नशा चढायला पाहिजे ना.२१ जन्माचे राज्य भाग्य देण्यासाठी, आम्हाला स्वतः भगवान शिकवत आहेत.तुम्ही विद्यार्थी आहात.ज्यांना निश्चय असेल,या ब्रह्माकुमारी ज्यांच्या द्वारे ऐकून आम्हाला निश्चय बसवतात,ते स्वतः काय असतील.अशा बाबांशी तर प्रथम भेटायला पाहिजे.जोपर्यंत पूर्ण निश्चय नसेल, तोपर्यंत नशा चढणार नाही.निश्चय असणारे तत्पर राहतील.अशा बाबांना आम्ही जाऊन भेटू,सोडणार नाहीत.बस बाबा आम्ही तर आपले बनलो.आम्ही जाणार नाहीत.गीत पण आहे ना तुम्ही मारा किंवा काहीही करा, हा दिवाना तुमचे दार सोडणार नाही. तरीही इथे मधुबन मध्ये बसवून तर घेऊ शकत नाहीत.सेवेवर ती पाठवावेच लागते.ग्रहस्त व्यवहारां मध्ये राहत कमल फूल समान बनायचे आहे.असे लिहून पण देतात,परत बाहेर गेल्यानंतर मायेच्या चक्रा मध्ये येतात.माया खूप प्रबळ आहे.मायेचे खूप विघ्न पडतात. लहानशा दिव्याला मायचे वादळ खूप येतात.या गीतांचे रहस्य पण बाबाच येऊन समजवतात.तुमचे पुरुषोत्तम युग चालत आहे.भक्तांचा पुरुषोत्तम महिना संपला आहे.पतितांना पावन बनवण्यासाठी मी या संगमयुगा मध्ये येतो.बाबा हे ज्ञान खूप चांगल्याप्रकारे समजवतात.

अच्छा,दिवसेंदिवस सेवेची वृद्धीसाठी नवीन नवीन चांगल्या चांगल्या युक्ती निघत जातात.असे म्हणतात,हे शिडी चे चित्र खूप चांगले आहे.या वेळात असे कोणी म्हणू शकत नाही, की आम्ही पावन आहोत.पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते,त्याचे मालक लक्ष्मीनारायण आहेत.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जरा पण,कोणते मोठे किंवा सूक्ष्म पाप व्हायला नको,याचे खूप ध्यान ठेवायचे आहे.कधी कोणती गोष्ट लपून खायची नाही.लोभ, मोहा पासून सावधान राहायचे आहे.

(२) अशुद्ध अहंकार,जो सत्यानाश करणार आहे,त्याचा त्याग करायचा आहे.एका बाबा शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.हा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
सूक्ष्म संकल्पाच्या बंधनापासून मुक्त बनून,उच्च स्थितीचा अनुभव करणारे,निर्बंधन भव.

जी मुलं जितके निर्बंधन आहेत, तेवढेच उच्च स्थितीत स्थिर राहू शकतात,म्हणून तपासून पाहा की मन्सा,वाचा,कर्मणा,सुक्ष्ममध्ये कोणता धागा तर जोडलेला नाही. एका बाबाशिवाय कोणाची आठवण यायला नको.आपल्या देहाची आठवण आली,तर देहाचे सोबत देहाचे संबंध,पदार्थ दुनिया सर्व एका पाठीमागे एक येतील.मी निर्बंध आहे,या वरदानाला स्मृती मध्ये ठेवून सर्व दुनियेला,मायाच्या जाळा पासून मुक्त करण्याची सेवा करा.

बोधवाक्य:-
देही-अभिमानी स्थिती द्वारे, तन आणि मनाची हलचल समाप्त करणारेच अचल राहत राहू शकतात.