04-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबांची आठवण करण्याच्या वेग-वेगळ्या युक्त्या शोधा,पुरुषार्थचा चार्ट म्हणजे दिनचर्या ठेवा,थकू नका,समस्या आल्या तरीही अडोल राहा.

प्रश्न:-
मुलानीं कोणता अनुभव आपसात एक दोघांना ऐकावयास पाहिजे?

उत्तर:-
आम्ही बाबांना किती वेळ आणि कसे आठवण करतो,भोजन करते वेळेस बाबा ची आठवण राहते की,अनेक प्रकारचे विचार येतात. बाबा म्हणतात,मुलांनो प्रयत्न करून पाहा,भोजन करताना बाबा शिवाय काही आठवण तर येत नाही,परत एक दोघांना अनुभव ऐकवा. कोणतेही दुःखदायक दृश्य पाहून आमची स्थिती कशी राहते,याचा अनुभव ऐकावयला पाहिजे.

गीत:-
लाख जमाने वाले

ओम शांती।
गोड गोड मुलं आता बेहद बाबांना कसे विसरतील, ज्याद्वारे वारसा मिळतो.ज्यांची अर्ध्या कल्पा पासून आठवण करत होतो.हे तर समजले जाते,मनुष्याला कधी भगवान म्हटले जात नाही.तर आत्ता बेहद्दचे बाबा मिळाले आहेत,तर त्यांच्या आठवणी मध्येच करामत आहे.जितकी पतित-पावन बाबांची आठवण कराल,तेवढे पावन बनत जाल.तुम्ही स्वतःला पावन म्हणू शकत नाही,जोपर्यंत अंत होईल.जेव्हा संपुर्ण पावन बनाल तेव्हा हे शरीर सोडून आत्म्याला संपूर्ण पवित्र शरीर मिळेल.जेव्हा सतयुगामध्ये नवीन शरीर मिळेल, तेव्हा संपूर्ण पावन म्हणू शकाल. परत रावण नष्ट होईल. सतयुगामध्ये रावणाचा पुतळा वगैरे बनवला जात नाही.तर तुम्ही मुलं जेव्हा बसता,चालता-फिरता,तर बुद्धीमध्ये आठवण राहावी की,आता आम्ही ८४ चे चक्र पूर्ण केले,परत नवीन चक्र सुरू होते.ती नवीन पवित्र दुनिया आहे,नवीन भारत, नवीन धरणी होती.मुलं जाणतात अगोदर यमुनेचा किनारा आहे,जेथे परीस्थान बनणार आहे.मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजवले जाते, प्रथमता: बाबाची आठवण करा. भगवान स्वयं शिकवत आहेत,तेच पिता, शिक्षक आणि गुरु आहेत,हे आठवणीत ठेवा.बाबांनी समजवले होते,तुम्ही बाजोली खेळतात.वर्णाचे चित्र पण खूप आवश्यक आहे.सर्वात वरती शिवबाबा,परत चोटी(शेंडी) ब्राह्मण आहेत.हे समजण्यासाठी बाबा म्हणतात.अच्छा,हे तर बुद्धीमध्ये ठेवा की आम्ही,८४ जन्माची बाजोली खेळत आहोत. आता संगम आहे,बाबा जास्त वेळ राहणार नाहीत.तरी शंभर वर्ष लागतात,उथल पुतल पूर्ण होऊन परत नवीन दुनिया सुरू होते.महाभारत लढाई तीच आहे,ज्यामुळे अनेक धर्माचा विनाश आणि आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. तुमची कलाबाजी खूप आश्चर्यकारक आहे.तुम्हाला माहित आहे की, फकीर लोक खूप कलाबाजी खेळतात,तिर्थावरती जातात, मनुष्याची तर श्रद्धा राहते ना.तर त्यांना काही ना काही देत राहतात.पालनपोषण होत राहते कारण असे मनुष्य आपल्या सोबत काय घेऊन जातील.बाबा तर या सर्व गोष्टीचे अनुभवी आहेत ना. बाबांनी रथ अनुभवी घेतला आहे.गुरु पण केले होते,त्यांनी खूप दुनिया पाहिली आहे.तीर्थयात्रा पण केल्या आहेत.आता बाबा म्हणतात, बाजोलीची तर आठवण करू शकता ना.आम्ही आता ब्राह्मण आहोत,परत देवता क्षत्रिय बनू.ही सर्व भारताचीच गोष्ट आहे.बाबांनी असे समजवले आहे, दुसरे धर्म तर जसे शाखा आहेत.बाबांनी तुमच्यासाठी ८४ जन्माची गोष्ट सांगितली आहे,समजदार तेच आहेत जे हिशोब समजू शकतात.इस्लामी येतील,तर त्यांचे किती जन्म होतील,या गोष्टीमध्ये जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.सर्वात जास्त काळजी राहायला पाहिजे की, आम्ही बाबाची आठवण करत आहोत,ही चिंता लागायला पाहिजे. या गोष्टी मध्ये काहीच काळजी नाही.एकाची आठवण करायची आहे,घडीघडी माया दुसरी काळजी करायला लावते.यामध्ये माया खूप काळजी करवते.मुलांनी बाबांची आठवण करायला पाहिजे.आता आम्हाला गोड घरी जायचे आहे. स्वीट होम,गोड घर का आठवणीत येणार नाही.सर्व शांती देवा म्हणत राहतात,भगवंताला म्हणतात आम्हाला शांती द्या.

आता तुम्ही मुलं जाणता,ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.हे पण आमच्या बुद्धीमध्ये आहे,दुसरे मनुष्य अगदी अज्ञान अंधारातच आहेत. शांती सतयुगा मध्ये असते.जिथे एक धर्म,एक भाषा,एकच रितीरिवाज असतो,तेथे शांतीचे राज्य आहे, अद्वैतची गोष्टच नाही.तेथे एक राज्य असते,तेही सतोप्रधान राज्य.रावण राज्यच नाही,ज्यामुळं लढाई होईल.तर तुम्हा मुलांना खुशीचा पारा चढायला पाहिजे.ग्रंथा मध्ये आहे,अतिइंद्रिय सुख गोपीना विचारा,गोपी तर तुम्ही आहात ना. तुम्ही सन्मुख बसले आहात.तुमच्या मध्ये पण क्रमानुसार आहेत, ज्यांना आठवण राहते की,बाबा आमचे पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत आणि गुरु पण आहेत.हे तर आश्चर्य आहे ना.बाबा अंत काळापर्यंत सोबत देतात.बाबा दत्तक घेतात आणि शिकवण्यास सुरू करतात.तर आठवणीत राहिल्यामुळे खुशी पण खूप होईल, परंतु माया हे विसरवते. मनुष्याला हे पण समजावे लागते, मनुष्य विचारतात बाकी थोडा वेळ आहे,याचा काय पुरावा आहे.तुम्ही स्पष्ट करा,पहा भगवानुवाच लिहिलेले आहे.यज्ञ पण स्थापन केला आहे,हा ज्ञान यज्ञ आहे.आत्ता कृष्ण तर यज्ञ स्थापन करू शकत नाहीत.मुलांच्या बुद्धीमध्ये राहायला पाहिजे की,आम्ही ब्राह्मण या यज्ञाचे आहोत,बाबांनी आम्हाला निमित्त बनवले आहे.जेव्हा तुम्ही चांगल्या रीतीने ज्ञान आणि योगाची धारणा कराल,तर आत्म संपूर्ण बनाल, तेव्हाच या विश्वाला आग लागेल. मनुष्याला हे माहीत होते की,हे बेहद्दचे कर्म क्षेत्र आहे,जिथे येऊन सर्व खेळ करतात.हे पूर्वनियोजित नाटक आहे,बाबा म्हणतात,मुलांनो काळजी त्याचीच करा,जे घडणार नाही.जे झाले ते झाले.जे पूर्वनियोजित नाटकामध्ये होते,त्याचे चिंतन का करायचे?मनुष्य नाटक पाहतात,त्या नाटकामध्ये जेव्हा कोणते दुःखदायक दृश्य असते,तर मनुष्य ते पाहून रडतात.आता तर ते झाले हद्दचे नाटक.हे तर खरोखर चे नाटक आहे.खरोखर करत राहतात परंतु तुम्हाला कोणतेही दुःखाचे अश्रू यायला नको.तुम्हाला साक्षी होऊन नाटक पाहायचे आहे.तुम्ही जाणतात हे नाटक आहे,यामध्ये रडण्याची आवश्यकता नाही.जे झाले ते झाले, त्याचा कधीच विचार करायचा नाही पाहिजे.तुम्ही प्रगती करत,बाबाची आठवण करत राहा,सर्वांना रस्ता सांगत राहा.बाबा तर मत देत राहतात,त्रिमूर्तीचे चित्र तुमच्याजवळ आहे,त्याच्या मध्ये लिहलेले आहे, हा शिवबाचा वारसा आहे.मुलांनाही चित्र पाहून खूप खुश व्हायला पाहिजे.बाबा कडून आम्हाला विष्णुपुरीचा वारसा मिळत आहे. जुनी दुनिया नष्ट होणार आहे.बस चित्र समोर ठेवा,यामध्ये काहीच खर्च नाहीत.हे झाड पण खूप चांगले आहे,रोज सकाळी उठून विचार सागर मंथन करा.स्वत:चे शिक्षक स्वतः बना,बुद्धी तर सर्वांना आहे.असे चित्र आपल्या घरी लावून ठेवा.प्रत्येक चित्रांमध्ये खूप चांगले ज्ञान आहे.असे म्हणतात विनाश होईल, तर तुमची बाबांच्या सोबत प्रित आहे ना.सद्गुरू दलालच्या रूपा मध्ये मिळाला आहे.तर तुम्हाला या चांगल्या चांगल्या गोष्टी समजून घ्यायचे आहेत आणि समजून सांगायच्या आहेत.मायेचा खूप देखावा आहे,शंभर वर्षापूर्वी ही लाईट,गॅस इत्यादी थोडेच होते.या पुर्वी व्हाइसरॉय पण चार घोड्याच्या, आठ घोड्याच्या गाडी मध्ये येत होते.पूर्वी सावकार लोक गाडीमध्ये बसत नव्हते.आता तर विमान इत्यादी निघाले आहेत.पूर्वी काहीच नव्हते.शंभर वर्षांमध्ये काय काय शोध लागले आहेत,म्हणून समजतात हाच स्वर्ग आहे.आत्ता तुम्ही जाणतात,स्वर्ग तर स्वर्गच आहे.या सर्व पाई पैशाच्या गोष्टी आहे,याला कृत्रिम देखावा म्हटले जाते.आता तुम्हा मुलांना हीच काळजी राहिली पाहिजे की,आम्ही बाबांची आठवण जास्त कशी करू, यामध्येच माया विघ्न आणते.बाबा आपले उदाहरण पण सांगतात, भोजन खाण्यासाठी बसतो, खूप प्रयत्न करतो,बाबाच्या निरतंर आठवणीमध्ये भोजन खाऊ,परत विसरतो.तर मी समजतो मुलांना किती कष्ट घ्यावे लागत असतील. अच्छा,मुलांनो तुम्ही प्रयत्न करुन पाहा,बाबाच्या आठवणी मध्ये राहून दाखवा.भोजन करते वेळेस,बाबांची आठवण राहते,अनुभव ऐकावयाला पाहिजेत.बाबा भोजन करते वेळेत, सर्व वेळ आठवण राहत नाही. अनेक प्रकारच्या गोष्टी आठवणीत येतात.बाबा स्वतः आपला अनुभव सांगतात.बाबांनी ज्यांच्या मध्ये प्रवेश केला,हे पण पुरुषार्थी आहेत, त्यांच्यावरती तर खुप जवाबदारी आहे. मोठे बनणे म्हणजे अनेक दुःख मिळवणे.खूप समाचार येतात विकारामुळे,अबलांना मारत राहतात,घरातून काढून टाकतात. मुली म्हणतात,ईश्वराच्या शरण मध्ये आले आहे,अनेक विघ्न येत राहतात. कुठेही शांती नाही.तुम्हा मुलांना तर खात्री आहे,आता तुम्ही पुरुषार्थ करून,स्वतः श्रीमतावर चालून,शांती मध्ये राहायचे आहे.या बाबानी येथे काही अशी घरं पाहिली आहेत, आपसामध्ये खूप प्रेमाने राहतात, सर्व मोठ्यांच्या आज्ञा नुसार चालतात,ते म्हणतात आमच्या जवळच तर जसा स्वर्गच आहे. आता बाबा तुम्हाला स्वर्गात घेऊन जातात, तेथे सर्व प्रकारचे सुख आहे. देवतांचे तर ३६ प्रकारच्या भोजनाचे गायन आहे.आता तुम्ही स्वर्गाचा वारसा बाबा कडून घेत आहात.तेथे तर खूप चविष्ट स्वादिष्ट वैभव खात राहतात आणि पवित्र पण राहतात. आता तुम्ही त्या दुनियेचे मालक बनत आहात.राजा-राणी आणि प्रजा मध्ये फरक तर असेल ना.यापूर्वी राजे लोक खूप थाट माठात राहत होते.आत्ता तर पतित आहेत आणि रावण राज्यांमध्ये आहेत, तर विचार करा सतयुगा मध्ये काय काय असेल.समोर लक्ष्मीनारायण चे चित्र ठेवले आहेत.कृष्णासाठी खोट्या गोष्टी लिहून बदनामी केली आहे. खोटे तर खोटे,खर्याचे पान पण नाही.आता तुम्ही समजता, आम्ही स्वर्गाचे मालक होतो,परत ८४ जन्म घेऊन अगदी शुद्र बुद्धी बनलो आहोत,काय हाल झाले आहेत. आता परत पुरुषार्थ करून किती श्रेष्ठ बनत आहोत.बाबा विचारतात ना,तुम्ही काय बनू इच्छिता? सर्व हात उठवतात,सूर्यवंशी बनू,आम्ही तर मात-पित्याचे पूर्ण अनुकरण करु.कमी पुरुषार्थ का करायचा? सर्व कष्ट, आठवण आणि आपल्यासारखे बनवण्यावर आधारित आहेत म्हणून बाबा म्हणतात,जेवढे शक्य होईल सेवा करण्यासाठी शिकत राहा,खूप सहज आहे.हे शिव बाबा,ही विष्णुपुरी, लक्ष्मीनारायणचे राज्य असेल.हे तर खूप अनुभवी आहेत,शिडी वरती तुम्ही चांगल्या रितीने समजावू शकता.तुम्हा मुलांना,झाड, सृष्टिचक्र पाहिल्यामुळे बुद्धीमध्ये सर्व ज्ञान यायला पाहिजे.हे जे लक्ष्मीनारायण आहेत,त्यांची राजधानी कुठे गेली.कोणी लढाई केली.कोणा द्वारे हरले,आता ते राज्य तर नाही.या ईश्वरीय गोष्टीला कोणी जाणत नाहीत.तुम्हा मुलांना हा साक्षात्कार झाला आहे,कसे गुफा मधुन, खाणी इत्यादी मध्ये जाऊन सोने हिरे घेऊन येतात .हे विज्ञान सतयुगा मध्ये तुमच्या सुखासाठी असेल.येथे दुःखासाठी आहे, तेथे विमान इत्यादी चा कधीच अपघात होणार नाही. मुलांनी सुरुवातीला सर्व साक्षात्कार केले आहेत.अंत काळात पण तुम्हाला खूप साक्षात्कार होतील.हे पण तुम्ही साक्षात्कार केले आहेत,चोर इत्यादी लुटण्यासाठी येतात,तुमचे शक्ती शक्ती रूप पाहून पळून जातात.यासर्व अंत काळातील गोष्टी आहेत.चोर लुटण्यासाठी येतील,तुम्ही बाबांच्या आठवणी मध्ये उभे राहाल, तर ते एकदम पळून जातील.

आता बाबा म्हणतात,मुलांनो खूप पुरुषार्थ करा,मुख्य गोष्ट पवित्रतेचे आहे.एक जन्म पवित्र बनायचे आहे, मृत्यू समोर आहे.अनेक नैसर्गिक आपत्ती येतील,ज्यामुळे सर्व नष्ट होईल.शिवबाबा यांच्याद्वारे समजवतात,तर यांची आत्मा पण ऐकते.हे बाबा सर्व सांगतात.शिव बाबांना तर अनुभव नाही.मुलांना अनुभव होतो,मायचे वादळ कसे येतात. प्रथम क्रमांका मध्ये तर हे आहेत,तर यांना सर्व गोष्टीचा अनुभव होतो.यामध्ये घाबरायची आवश्यकता नाही,अचल अडोल राहायचे आहे.बाबाच्या आठवणी मध्ये राहिल्यामुळे शक्ती मिळते. काही मुलं दिनचर्या लिहतात,परत काही दिवसानंतर लिहायचे बंद करतात. बाबा समजतात थकले आहेत,बाबा त्यांच्याद्वारे इतका मोठा वारसा मिळतो. बाबांना पत्र पण लिहीत नाहीत,आठवण करत नाहीत.अशा बाबांची खूप आठवण करायला पाहिजे.शिवबाबा आम्ही आपली खुप आठवण करतो.बाबा तुमच्या आठवण शिवाय आम्ही कसे राहू शकतो.ज्या बाबा द्वारे विश्वाची बादशाही मिळते,अशा बाबांना कसे विसरू शकतो.एक कार्ड लिहले,तेही आठवण केली ना.लौकिक पिता पण मुलांना चिठ्ठी लिहतात,पतीला पत्नी कशी चिठ्ठी लेते.येथे तर दोन्ही संबंध आहेत.ही पण आठवण करण्याची युक्ती आहे.खूप गोड बाबा आहेत, आमच्या द्वारे काय मागतात, काहीच नाही.ते तर दाता आहेत. देणारे आहेत ना,घेणारे नाहीत. गोड मुलांनो मी आलो आहे,भारताला सुगंधीत बाग बनवून घेऊन जाण्यासाठी, अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सुर्यवंशी बनण्यासाठी मात-पित्याचे पूर्णपणे अनुकरण करायचे आहे. आठवणीमध्ये राहण्याचे आणि आपल्यासारखे बनवण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.

(२) पुरुषार्थ करून श्रीमतावर चालत शांत राहायचे आहे.मोठ्यांची आज्ञा मानायची आहे.

वरदान:-
स्वतःला सेवाधारी समजून नम्र बनणारे आणि नम्र बनवणारे निमित्त आणि नम्रचित्त भव.

निमित त्यांनाच म्हटले जाते,जे आपला प्रत्येक संकल्प किंवा प्रत्येक कर्माला,बाबांच्या पुढे अर्पण करतात.निमित्त बनणे म्हणजे अर्पण होणे आणि नम्रचित्त तेच आहेत,जे नम्र होतात,जितके संस्कारांमध्ये, संकल्पामध्ये, नम्र बनणार,तेवढेच विश्व तुमच्यापुढे नम्र होईल.नम्र बनणे म्हणजेच नम्र बनवणे.हा संकल्प यायला नको की,दुसरे ही माझ्या पुढे, थोडेतरी नम्र व्हावेत.जे खरी सेवा देणारे आहेत,ते नेहमीच नम्र असतात.कधी आपला अहंकार दाखवत नाहीत.

बोधवाक्य:-
आता समस्या स्वरूप नाही,तर समाधान स्वरूप बना.