04-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो, सर्वांकडून प्रथम आत्म्याचा पाठ पक्का करून करवुन घ्या आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत.

प्रश्न:-
कोणत्या एका गोष्टीमध्ये श्रीमत, मनुष्य मतापेक्षा अगदीच वेगळी आहे?

उत्तर:-
मनुष्य म्हणतात आम्ही मोक्ष मध्ये जाऊ, श्रीमत सांगते, हे नाटक अनादी अविनाश आहे. मोक्ष कोणालाही मिळू शकत नाही. जरी कोणी म्हणेल, आम्हाला ही भूमिका पसंद नाही परंतु यामध्ये कोणी काहीच करू शकत नाही. भूमिका करण्यासाठी यायचेच आहे. श्रीमतच तुम्हाला श्रेष्ठ बनवते, मनुष्य मत तर अनेक प्रकारचे आहेत.

ओम शांती।
आता हे मुलं जाणतात आम्ही बाबांच्या सन्मुख बसलो आहोत. बाबा पण जाणतात मुलं माझ्या समोर बसले आहेत. हे पण तुम्ही मूलंच जाणतात. बाबा आम्हाला जे ज्ञान देतात, ते दुसऱ्यांना पण द्यायचे आहे. प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे, कारण पित्यानी दिलेल्या ज्ञानाला विसरले आहेत. आता जे बाबा शिकवत आहेत ते ज्ञान परत पाच हजार वर्षांनंतरच मिळेल. हे ज्ञान दुसरे कोणीही देऊ शकत नाही.प्रथम पित्याचा परिचय द्यायचा आहे,हेच मुख्य आहे. आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत,साऱ्या दुनियाचे जे पण आत्मे आहेत,ते सर्व आपसामधे भाऊ भाऊ आहेत.सर्वांना आप आपली भूमिका मिळाले आहे, जी शरीरा द्वारे वठवतात . बाबा नवीन दुनिये मध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत. एक पण पावन नाही,सर्व पतीतांना पावन बनवणारे एकच शिव पिता आहेत. ही पतित, विकारी रावणाची दुनिया आहे, रावणाचा अर्थ हाच आहे, पाच विकार स्त्रियांमध्ये,५ विकार पुरुषांमध्ये. बाबा खूपच सहज समजावून सांगतात. तुम्ही पण असेच समजावून सांगू शकता. तर प्रथम हे समजून सांगा की आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत, बाकी सर्व भाऊ भाऊ आहेत. नंतर विचारा, ठीक आहे का? तुम्ही लिहा आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत, आमचे पिता पण एकच आहेत. आम्हा सर्व आत्म्यांचे ते परम आत्मा आहेत, त्यांना पिता पण म्हटले जाते. हे चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये बसवा, तर सर्वव्यापी ची गोष्ट बुद्धीतून निघून जाईल. प्रथम ईश्वराचा परीचय द्यायचा आहे, बोला हे चांगल्या रीतीने लिहा, अगोदर मी ईश्वराला सर्वव्यापी म्हणत होतो, आता मला समजले आहे ईश्वर सर्वव्यापी नाहीत. आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत. सर्व आत्मे म्हणतात, ईश्ववरीय पिता,परमपिता, परमात्मा अल्लाह. प्रथमतः हा निश्चय करायचा आहे की, मी आत्मा आहे, परमात्मा नाही. आमच्यामध्ये परमात्मा सर्वव्यापक नाहीत, सर्वांमध्ये आत्मा व्यापक आहे. आत्मा शरीराच्या आधारे अभिनय करते, हे चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये बसवा. अच्छा परत पिता सृष्टिचक्राच्या आदी मध्य अंतचे, ज्ञान ऐकवत आहेत. शिक्षकांच्या रूपांमध्ये बसून समजावत आहेत. लाखो वर्षाची तर गोष्ट नाही. हे चक्र अनादी पूर्वनियोजित आहे. कसे बरोबर आहे, याला जाणून घ्यायचे आहे.तर सतयुग त्रेता होऊन गेले, याची नोंद घ्या, त्याला स्वर्ग आणि सेमी स्वर्ग म्हणले जाते.तेथे देवी-देवतांचे राज्य चालते. सतयुगा मध्ये १६ कला, त्रेतामध्ये 14 कला आहेत. सतयुगाचे नाव खूपच भारी आहे, नावच आहे स्वर्ग. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते, त्याचीच महिमा करायची आहे.नवीन दुनियेमध्ये एकच आदी सनातन देवी देवता धर्म आहे, चित्र पण तुमच्या जवळ आहेत, निश्चय करण्यासाठी. हे सृष्टीचे चक्र फिरत राहते. या कल्पाचे आयुष्य पाच हजार वर्ष आहे. आता सूर्यवंशी चंद्रवंशी तर बुद्धीमध्ये बसले आहेत ना. विष्णुपुरी बदलून राम-सीता पुरी बनते, त्यांचीही राजाई चालते ना.दोन युग होऊन गेले परत द्वापरयुग येते, रावणाचे राज्य सुरू होते. देवता वाम मार्गा मध्ये जातात, तर विकारांची पद्धत चालू होते. सतयुग त्रेता मध्ये सर्व निर्विकारी आहेत, एकच आदी सनातन देवी देवता धर्म राहतो, चित्र पण दाखवायचे आहेत आणि तोंडी पण समजवायचे आहे.बाबा आम्हाला शिक्षक होऊन शिकवतात. शिव पिता स्वतःचा परिचय, स्वतःहून देतात.स्वतः म्हणतात मी पतितांना पावन बनवण्यासाठी येतो तर, मला शरीर जरूर पाहिजे, नाहीतर मी तुमच्याशी कसा गोष्टी करेल. मी चैतन्य आहे,सत आहे,अमर आहे.सतो रजो-तमो मध्ये आत्मा येते. आत्मच पतित, आत्मच पावन बनते. आत्म्यां मधेच सर्व संस्कार आहेत,भूतकाळातील कर्म किंवा विकर्म, हे संस्कार घेऊन जाते.सतयुगा मध्ये विकर्म होत नाहीत, कर्म करतात, भूमिका करतात परंतु ते कर्म अकर्म बनतात. गीतेमध्ये पण अक्षर आहेत, आता तुम्ही प्रत्यक्षात हे ज्ञान समजत आहात. तुम्ही जाणतात, बाबा जुन्या विकारी दुनियेला परिवर्तन करून नविन दुनिया बनण्यासाठी आले आहेत. जेथे कर्म अकर्म होतात. त्या दुनियेला सतयुग म्हणले जाते, आणि येथे कर्म विर्कम होतात, ज्याला कलियुग म्हटले जाते. तुम्ही आता संगमयुगा मध्ये आहात. बाबा दोन्हीकडील गोष्टी ऐकवत राहतात.एक एक गोष्ट चांगल्या रीतीने समजून घ्यायची आहे,पिता शिक्षकाने काय समजवले. अच्छा, बाकी गुरुचे कर्तव्य आहेत, त्यांना बोलवतात आम्हा पतितांना पावन बनवा. आत्मच पावन बनते, परत शरीर पण पावन बनते.जसे सोने तसेच दागिने बनतात. २४ कॅरेट सोने खरेदी केले त्याच्यात मिलावट नाही केली, तर दागिने पण चांगले बनतात. बनावट केल्याने तमोप्रधान बनतात कारण त्याच्यात बनावट होते ना. प्रथम भारत २४ कॅरेट खऱ्या सोन्याची चिमणी होता, अर्थात सतोप्रधान नवीन दुनिया होता, आत्ता तर तमोप्रधान आहे. प्रथम खऱ्या सोन्या सारखा होता. नवीन दुनिया पवित्र,.जुनी दुनिया अपवित्र. बनावट होत जाते, हे बाबाच समजवतात,दुसरे कोणी मनुष्य, गुरु समजावू शकत नाहींत. बाबांनाच बोलवतात, येऊन पावन बनवा. सद्गुरूंचे काम आहेत वानप्रस्थ अवस्थांमध्ये मनुष्यांना ग्रहस्था पासून सोडवणे. तर हे सर्व ज्ञान पूर्वनियोजित नाटका नुसार बाबाच देतात, ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत.ते सर्व वृक्षाचे ज्ञान समजवतात. शिव बाबांचे नाव तर सदैव शिवच आहे, बाकी आत्मा आपली भूमिका करण्यासाठी येते, वेगवेगळे नाव रूप धारण करते. बाबांना बोलवतात परंतु त्यांना जाणत नाहीत, ते कसे भाग्यशाली रथामध्ये येतात, तुम्हाला पावन दुनियेत घेऊन जाण्यासाठी. तर बाबा समजतात मी त्यांच्या तना मध्ये येतो, जे अंतच्या जन्मांमध्ये आहेत, जे पूर्ण ८४ जन्म घेतात.राजांचा राजा बनवण्यासाठी या भाग्यशाली रथामध्ये प्रवेश करावा लागतो. प्रथम नंबर मध्ये श्रीकृष्ण आहेत ते नवीन दुनियेचे मालक आहेत, परत तेच खाली उतरतात, सूर्यवंशी चंद्रवंशी परत वैश्य, क्षुद्र वंशी परत ब्रह्मा वंशी बनतात.सोन्या पासून चांदी तांबे परत लोखंडापासून सोन्यासारखे बनत आहात. बाबा म्हणतात मज एक पित्याची आठवण करा, ज्यांच्यामध्ये मी प्रवेश केला आहे, त्यांच्या आत्म्या मध्ये तर, हे ज्ञान काहीच नव्हते. त्यांच्यामध्ये मी प्रवेश करतो, म्हणून त्यांना भाग्यशाली रथ म्हणले जाते, स्वतः म्हणतात मी त्यांच्या अंतच्या जन्मांमध्ये येतो गीतेमध्ये अक्षर अगदीच बरोबर आहेत. गीतेलाच सर्व शास्त्रमई शिरोमणी म्हणले जाते. या संगम युगा वरतीच बाबा येऊन ब्राह्मण कुळ आणि देवी-देवता कुळाची स्थापना करतात. बाकी दुसऱ्यांचे तर सर्व माहिती आहे. या बद्दल कोणालाच माहिती नाही.अनेक जन्माच्या अंत मध्ये संगमयुगातच बाबा येतात. बाबा म्हणतात मी बीजरूप आहे.कृष्ण तर सतयुगाचे रहिवासी आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी कोणी पाहू शकत नाही. पुनर्जन्म मध्ये नाव रूप देश काळ सर्व बदलते. प्रथम लहान मुलगा सुंदर असतो, परत मोठा झाल्यानंतर ते शरीर सोडून, परत दुसरे छोटे शरीर घेतो. हा पूर्वनियोजित खेळ आहे.या नाटका मध्ये सर्वकाही फिक्स आहे. दुसऱ्या शरीरामध्ये तर त्यांना कृष्ण म्हणणार नाही. दुसऱ्या वरती नाव इत्यादी दुसरे पडते, वेळ चेहरा तारीख इत्यादी सर्व बदलते .विश्वाच्या इतिहास भूगोलाची हुबेहूब पुनरावृत्ती होते. हे नाटक पुनरावृत्ती होत राहते.सतो रजो तमो मध्ये तर यायचेच आहे. सृष्टीचे नाव, युग सर्व बदलत राहते. आत्ता संगम युग आहे. मी संगम युगामध्ये येतो, हे बुद्धीमध्ये पक्के करायचे आहे. बाबा आमचे पिता, शिक्षक गुरु आहेत. जे परत सतोप्रधान बनण्याची युक्ती खुपच चांगल्या रितीने समजावून सांगतात. गीतेमध्ये पण आहे देह सहित देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्म समजा, परत आपल्या घरी जरूर जायचे आहे.भक्ती मार्गामध्ये भगवंताच्या जवळ जाण्यासाठी खूप कष्ट घेतात. ते मुक्तिधाम आहे.कर्मापासुन मुक्त,आम्ही निराकारी दुनियेमध्ये जाऊन बसतो,कलाकार घरी गेले तर अभिनया पासून मुक्त होतात. सर्वांची इच्छा असते आम्हाला मुक्ती मिळावी परंतु मुक्ती तर कोणालाच मिळू शकत नाही. हे आनादि नाटक बनलेले आहे, पूर्वनियोजित आहे. एकाला पण मुक्ती मिळू शकत नाही.मनुष्यांची तर अनेक प्रकारची मत आहेत. हे आहे श्रीमत, श्रेष्ठ बनण्यासाठी. मनुष्याला श्रेष्ठ म्हणू शकत नाही, देवतांना श्रेष्ठ म्हणले जाते. त्यांच्यापुढे सर्व डोके टेकवतात, तर ते श्रेष्ठ झाले ना, परंतु हे कोणालाही माहिती नाही. आत्ता तुम्ही समजता, ८४ जन्म तर घ्यायचे आहेतच.श्रीकृष्ण देवता आहेत,स्वर्गा मधील प्रथम राजकुमार आहेत, ते येथे कसे येतील.न त्यांनी गीता ऐकवली आहे, फक्त देवता होते, म्हणून सर्व लोक त्यांची पूजा करतात. देवता पावन आहेत म्हणजे, स्वतः पतीत झाले ना.मज निर्गुण हाऱ्या मध्ये काहीच गुण नाहीत. असे म्हणत राहतात,तुम्ही आम्हाला गुणवान बनवा. शिवा च्या पुढे जाऊन म्हणतात आम्हाला मुक्ती द्या. शिवबाबा कधीच जीवनमुक्त जीवनबंद मध्ये येत नाहीत, म्हणून त्यांना पुकारतात, मुक्ती द्या. जीवन मुक्ती पण तेच देतात. आता तुम्ही समजता, बाबा आणि मम्माची आम्ही सर्व मुलं आहोत, त्यांच्याद्वारे आम्हाला खूप ज्ञान धन मिळते. मनुष्य तर अज्ञाना मुळे मागत राहतात. अज्ञानी असल्यामुळे दुःखी तर होणार ना.खूप दुःख भोगावे लागते, तर या सर्व गोष्टी मुलांनी बुद्धीमध्ये ठेवायचे आहेत.एका बेहद पित्याला न सजमल्यामुळे आप आपसात भांडत राहतात.विना धनीचे बनले आहेत. ते असतात अनाथ, हे आहेत बेहदचे अनाथ. बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात. आत्ता पतीत आत्म्यांची पतित दुनिया आहे. पावन दुनिया सतयुगाला म्हणले जाते, जुन्या दुनियेला कलियुग. तर बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत ना. जुन्या दुनियेचा विनाश होईल, परत नवीन दुनिया मध्ये परिवर्तन होऊ.आता आम्ही थोड्या काळासाठी संगम युगामध्ये आहात. जुनी दुनिया बदलून नवीन बनत आहे. नवीन दुनिये ची पण माहिती आहे. तुमची बुद्धी आता नवीन दुनिये मध्ये जायला पाहिजे. उठता बसता हेच बुद्धीमध्ये ठेवा, आम्ही हे ज्ञान घेत आहोत. बाबा आम्हाला शिकवत आहेत.विद्यार्थ्यांना हेच आठवणीत राहिला पाहिजे, तरीही आठवण नंबरानुसार पुरुषार्थ नुसारच राहते. बाबा पण नंबरानुसार प्रेमपूर्वक आठवण देतात. अच्छा शिकवणाऱ्या शिक्षकांना जरूर जास्त प्रेम करणार ना. खूपच आंतर पडते. आता बाबा समजावत राहतात. मुलांना धारणा करायची आहे. एका बाबा शिवाय दूसरी कडे बुद्धी जायला नको. बाबांची आठवण करणार नाहीत, तर पाप कसे भस्म होतील. माया घडीघडी तुमचा बुद्धि योग तोडते. माया खूपच धोका देते. बाबा उदाहरण देतात भक्ती मार्गामध्ये आम्ही लक्ष्मीची खूप पूजा करत होतो, चित्रांमध्ये दाखवले आहे, लक्ष्मी, नारायणचे पाय चोपत आहे, तर बाबांनी लक्ष्मीला त्या चित्रा पासून मुक्त केले. त्यांच्या आठवणीमध्ये बसल्यानंतर जर बुद्धी इकडे तिकडे जात होती, तर आपल्याला चापट मारत होते. बुद्धी दुसरी कडे का जाते? शेवटी बाबांनी विनाश पण पाहिला आणि स्थापना पण पाहिली. साक्षात्काराची इच्छा पण पुर्ण झाली. आता नवीन दुनिया येत आहे,हे समजले.आम्ही असे बनणार आहोत, बाकीही जुनी दुनिया तर विनाश होणार आहे. पक्का निश्चय झाला आपल्या राजधानी चा पण साक्षात्कार झाला,मग या रावणाच्या राज्यात काय करणार? जेव्हा स्वर्गाची राजाई मिळत आहे.ही झाली ईश्वरीय बुद्धी. ईश्वराने प्रवेश करून बुद्धी चालवली. ज्ञानाचा कलष तर मातांना मिळतो, म्हणून मातांना सर्व काही दिले. तुम्ही कारोबार संभाळा, सर्वांना शिकवा, सर्वांना शिकवत शिकवत आज इथपर्यंत पोहोचले आहेत. एक दोघांना ऐकवत ऐकवत, पहा आत्ता किती वाढ झाली आहे.आत्मा पवित्र होत जाते, परत आत्म्याला शरीर पण पवित्र पाहिजे. हे ज्ञान मुलं समजतात,तरी पण माया विसरायला लावते.आम्ही म्हणतो सात दिवस राजयोगाचे शिबिर करा, उद्या येऊ म्हणतात परत माया दुसरी कडे तोंड फिरवते.भगवान शिकवत आहेत तर, भगवंता द्वारे शिकणार नाही का? हो म्हणतात परंतु माया दूर घेऊन जाते, नियमित होऊ देत नाही. ज्यांनी कल्पा पूर्वी पुरुषार्थ केला असेल ते जरूर येतील, कारण सत्य ज्ञानाचे दुसरे कोणते ही दुकान नाही. तुम्ही पुरुषार्थ तर खूप करता, मोठे मोठे संग्रहालय बनवता. मुख्य लक्ष तर आहे ना, मग आठवण का नाही येत. आता आम्ही नविन दुनिये मध्ये जात आहोत,आपल्या पुरुषार्था नुसार. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता, बाप- दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात .आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बुद्धीमध्ये नेहमीच आठवण ठेवा कि, आम्ही थोड्या वेळेपुरते संगम युगामध्ये आहोत.जुनी दुनिया विनाश झाली की परत नवीन दुनियत जाऊ म्हणून, त्यापासून बुद्धी काढून टाकायची आहे.
(२) सर्व आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन कर्म अकर्म, विर्कमाचे रहस्य ऐकावयाचे आहे. प्रथम अल्लाहचा पाठ पक्का करायचा आहे.

वरदान:-
कर्म आणि योगाच्या संतुलन द्वारे कर्मातीत स्थितीचा अनुभव करणारे कर्म बंधन मुक्त भव.

कर्माच्या सोबत योगाचे संतुलन असेल तर प्रत्येक कर्मामध्ये स्वतःच सफलता प्राप्त होते. कर्मयोगी आत्मा कधीच कर्मच्या बंधन मध्ये फसत नाही. कर्माच्या बंधनापासून मुक्त असणाऱ्यांनाच कर्मातीत म्हणतात .कर्मातीतचा हा अर्थ नाही की कर्मा पासून दूर जायचे आहे. कर्मा पासून दूर नाही परंतू कर्माच्या बंधनापासून दूर जायचे आहे.अशी कर्मयोगी आत्मा आपल्या कर्माद्वारे अनेकांचे कर्म श्रेष्ठ बनवणारी असेल.त्यांच्यासाठी प्रत्येक कार्य मनोरंजन वाटेल, मुश्किल चा अनुभव होणार नाही.

बोधवाक्य:-
परमात्म प्रेमच वेळेची घंटी आहे, जी अमृत वेळेला उठवते.