05-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुमच्या मुखाद्वारे कधी पण हे ईश्वर, हे बाबा, शब्द निघायला नको,ही तर भक्ती मार्गाची सवय आहे,

प्रश्न:-
तुम्ही मुलं सफेद कपडे का पसंत करतात?हे कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे?

उत्तर:-
आता तुम्ही या जुन्या दुनिये पासून जिवंतपणी मृत झाले आहात, म्हणून तुम्हाला सफेद कपडे पसंद आहेत.हे सफेद कपडे मृत्यूला सिद्ध करतात.जेव्हा कोणाचा मृत्यू होतो,तर त्याच्या वरती सफेद कपडा घालतात.तुम्ही मुलं पण आता मरजीवा बनले आहात.

ओम शांती।
आत्मिक बाबा,तुम्हा मुलांना सन्मुख समजावत आहेत.आत्मिक अक्षर न म्हणता फक्त बाबा म्हणाल तरीही ठीक आहे.बाबा मुलांना समजवतात,सर्व आपसात भाऊ-भाऊ तर म्हणतात ना.तर बाबा सम्मुख मुलांना समजवतात,सर्वांना तर समजवत नाहीत. सर्व आपसांत भाऊ-भाऊ म्हणतात.गीतेमध्ये पण लिहिले आहे भगवानुवाच,आता भगवानुवाच कोणासाठी? भगवंताची सर्व मुलं आहेत,ते पिता आहेत,तर भगवंताची सर्व मुलं भाऊ-भाऊ आहेत.भगवंतानीच समजवले असेल,राजयोग शिकवला असेल. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे.दुनिया मध्ये आणखी कोणाचे असे विचार चालू शकत नाहीत. ज्यांना ज्यांना संदेश भेटत जाईल, ते या शाळेमध्ये येतील,शिकत जातील.ते समजतील,प्रदर्शनी तर पाहिली,आत्ता सेवाकेंद्रात जाऊन काही सविस्तर ऐकू.प्रथम मुख्य गोष्ट ज्ञानाचे सागर पतित-पावन,गीता ज्ञानदाता शिव भगवानुवाच,प्रथम तर त्यांना हे माहिती होईल की, यांना शिकवणारे किंवा समजवणारे कोण आहेत? ते सर्वोच्च आत्मा, ज्ञानाचे सागर,निराकार आहेत.ते तर सत्यच सांगतील,परत यांच्यामध्ये दुसरा कोणता प्रश्न येऊ शकत नाही.प्रथम तर त्यांना समजावे लागेल,आम्हाला परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा राजयोग शिकवत आहेत.हे राजाईपद आहे,ज्याला हा निश्चय होईल.ते सर्वांचे पिता आहेत,ते पारलौकीक पिता सन्मुख समजवतात.ते सर्वात मोठे अधिकारी आहेत,तर परत दुसरा कोणता प्रश्न करणार नाहीत.ते पतित-पावन आहेत,तर जेव्हा ते येथे येतील,तर जरूर आपल्या वेळेवर येतील ना.तुम्ही पाहतात ही तीच महाभारत लढाई आहे. विनाशाच्या नंतर निर्विकारी दुनिया असेल.ही तर विकारी दुनिया आहे. हे मनुष्य जाणत नाहीत की, भारतच निर्विकारी होता.काहीच बुद्धी चालत नाही.गोदरेजचे कुलूप लागलेले आहे,त्याची चावी एक बाबांकडे च आहे.त्यांनाच ज्ञानदाता म्हटले जाते.ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात.हे कोणालाच माहीत नाही की, तुम्हाला शिकवणारे कोण आहेत? दादा समजवतात तेव्हा तर टिका करतात.काही ना काही बोलतात म्हणून प्रथम ही गोष्ट समजून सांगा,यामध्ये लिहिले आहे की,शिवभगवनुवाच.ते तर सत्य आहेत.

बाबाच समजवतात,मीच पतित पावन शिव आहे.मी परमधाम मधून तुम्हा शाळीग्रामला शिकवण्यासाठी आलो आहे. बाबा तर ज्ञानसंपन्नच आहेत.सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य समजवतात.हे ज्ञान पण तुम्हाला बेहद्दच्या बाबा कडून मिळत आहे,तेच सृष्टीचे रचनाकार आहेत.पतित सृष्टीला पावन बनवणारे आहेत.ते बोलवतात,हे पतित-पावन या,तर प्रथम त्यांचा परिचय द्यायचा आहे.त्या परमपिता परमात्मा च्या सोबत आपला काय संबंध आहे?ते तर सत्य आहेत. नरापासून नारायण बनवण्याचे सत्य ज्ञान देतात.मुलं जाणतात बाबा सत्य आहेत,बाबाच सत्य खंड बनवतात.तुम्ही नरापासून नारायण बनण्यासाठी येथे येतात.विधी महाविद्यालयात जाल, तर समजाल आम्ही वकील बनण्यासाठी आलो आहोत.आता तुम्हाला निश्चय आहे की,आम्हाला भगवान शिकवत आहेत.काही निश्चय करतात तरीही परत संशय बुद्धी बनतात. तर त्यांना सर्व मनुष्य म्हणतील,तुम्ही तर म्हणत होते स्वयम् भगवान शिकवत आहेत,परत भगवंताला सोडून का आले? संशय आल्यामुळेच भागंती होतात.काही ना काही विकर्म करतात. भगवानुवाच काम महाशत्रू आहे, याला जिंकल्यामुळे तुम्ही जगजीत बनाल.जे पावन बनतील तेच पावन दुनिया मध्ये येतील.येथे राजयोगाची गोष्ट आहे.तुम्ही जाऊन तेथे राज्य कराल, बाकी जे पण आत्मे आहेत ते आपला कर्मभोग चुक्तू करून वापस आपल्या घरी जातील.ही तर कयामतची वेळ आहे ना.आता बुद्धी म्हणते की,सतयुगाची स्थापना जरूर होणार आहे.त्यांना परत आपल्या भुमिकेची पुनरावृत्ती करायची आहे.तुम्ही पण आपला पुरुषार्थ करत राहतात,पावन बनून पावन दुनियेचे मालक बनण्यासाठी. मालक तर सर्व स्वतःला समजतील ना.प्रजा पण मालक आहे.आता प्रजा पण म्हणते ना,आमचा भारत. मोठ्यात मोठे मनुष्य संन्यासी इत्यादी पण म्हणतात,आमचा भारत. तुम्ही समजता या वेळेत भारतामध्ये सर्व नर्कवासी आहेत. आता आम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी हा राजयोग शिकत आहोत.सर्व तर स्वर्गवासी बनणार नाहीत.आता हे ज्ञान मिळाले आहे. ते लोक जे ऐकवतात,ग्रंथच ऐकवतात.ते ग्रंथाचे अधिकारी आहेत.बाबा म्हणतात हे भक्तिमार्गाचे वेद ग्रंथ इत्यादी सर्व वाचून तर शिडी उतरतच जातात. हा सर्व भक्ती मार्ग आहे.बाबा म्हणतात जेव्हा भक्तिमार्ग पूर्ण होईल,तेव्हाच मी येईल.मला येऊन सर्व भक्तांना भक्तीचे फळ द्यायचे आहे.बहुतांश तर भक्तच आहेत.ते सर्व बोलवत राहतात ना,हे ईश्वरीय पिता या.भक्ताच्या मुखाद्वारे ईश्वरीय पिता,हे भगवान,जरूर निघते.

आता भक्त आणि ज्ञानामध्ये तर फरक आहे.तुमच्या मुखाद्वारे कधी हे ईश्वर, हे भगवान असे अक्षर निघणार नाहीत.मनुष्यांना तर अर्ध्या कल्पाचा अभ्यास झाला आहे,सवय झाली आहे.तुम्ही जाणतात ते तर आमचे पिता आहेत.तुम्हाला हे बाबा,असे थोडेच म्हणायचे आहे. बाबा कडून वारसा घ्यायचा आहे. प्रथम तर हा निश्चय करायचा आहे,की आम्ही बाबा कडून वारसा घेत आहोत.बाबाच मुलांना वारसा घेण्याचे अधिकारी बनवतात.हे तर खरे पिता आहेत ना.बाबा जाणतात,ही माझी मुलं आहेत,ज्यांना ज्ञान अमृत पाजून, ज्ञान चितेवर बसवून,घोर अज्ञान अंधारातून जागृत करून घेऊन जातो. बाबांनी समजवले आहे, आत्मे तेथे शांतीधामा आणि सुखधाम मध्ये राहतात.सुखधामला निर्विकारी दुनिया म्हटले जाते.संपुर्ण निर्विकारी देवता आहेत ना आणि ते घर आहे. तुम्ही जाणले आहे आमचे ते गोड घर आहे.आम्ही आत्मा त्या शांतीधाम मधून येतो,येथे भूमिका वठवण्यासाठी.आम्ही आत्मा येथील रहिवासी नाहीत,ते कलाकार तर येथील रहिवासी असतात,फक्त घरातून येऊन,कपडे बदलून भूमिका वठतात.तुम्ही तर समजता आमचे ते घर शांतीधाम आहे. आम्ही तेथे परत जातो.जेव्हा सर्व कलाकार रंगमंचावर येतील,तेव्हा तर बाबा येऊन सर्वांना घेऊन जातील,म्हणून त्यांना मुक्तिदाता मार्गदर्शक म्हटले जाते.दु:खहर्ता सुखकर्ता आहेत,तर इतके सर्व मनुष्य कुठे जातील.विचार करा पतित-पावनला बोलवतात कशासाठी? आपल्या मृत्यूसाठी, दुःखाच्या दुनिया मध्ये राहू इच्छित नाहीत,त्यामुळे म्हणतात घरी चला. हे सर्व मुक्तीला मानणारे आहेत. भारताचा प्राचीन राजयोग पण खूप प्रसिद्ध आहे.परदेशात पण जातात, प्राचीन राजयोग शिकवण्यासाठी. वास्तव मध्ये, हठयोगी राजयोग जाणत नाहीत.त्यांचा योग तर चुकीचा आहे,म्हणून तुम्ही जाऊन खरा राजयोग शिकवायचा आहे. मनुष्य,सन्याशांची कपडे पाहून त्यांना खूप मान देतात.बौध्द धर्मामध्ये पण सन्याशांनी कफनी घातलेली पाहून,त्यांना मान देतात. सन्याशी तर नंतर येतात.बौद्ध धर्मामध्ये पण सुरुवातीला कोणी सन्याशी नसतात.जेव्हा पाप वृद्धी होते, तेव्हा बौद्ध धर्मामध्ये संन्यास धर्माची स्थापना होते. सुरुवातीला तर आत्मे वरून येतात.त्यांची संख्या येते.सुरुवातीला संन्यास शिकवून काय करणार?सन्यास तर नंतर असतो.हे पण येथूनच कॉपी करतात.ख्रिश्चनांमध्ये पण असे खूप आहेत,जे सन्याश्यांचा मान ठेवतात. कफनी जे घालतात,ते हठयोगी आहेत.तुम्हाला तर घरदार सोडायचं नाही.न कोणते सफेद कपड्याचे बंधन आहे,परंतु सफेद वस्त्र तर चांगले आहेत.तुम्ही भट्टीमध्ये राहिले तर कपडे पण तेच होते.

आजकाल तर सफेद खूप पसंत करतात.मनुष्य मरतात तर सफेद चादर वरती घालतात.तुम्ही पण आता मरजीवा बनले आहात,तर सफेद कपडे चांगले आहेत.

प्रथम तर कोणालाही शिवपित्याचा परिचय द्यायचा आहे.दोन पीत आहेत, या गोष्टी समजून सांगण्या मध्ये वेळ लागतो.प्रदर्शनीमध्ये इतके समजावू शकत नाहीत.सतयुगा मध्ये एकच पिता असतात, या वेळेस तुम्हाला तीन पिता आहेत,कारण भगवान प्रजापिता ब्रह्माच्या तना मध्ये येतात, तेपण सर्वांचे पिता आहेत. लौकिक पिता पण आहेत.अच्छा तिन्ही पित्यामध्ये वारसा कोणाचा श्रेष्ठ आहे ? निराकार पिता वारसा कसे देतील?ते परत ब्रह्मा द्वारा देतात. या चित्रावर तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजावू शकता.शिव निराकार आहेत आणि ते प्रजापिता ब्रह्मा,आदी देव आजोबा आहेत.शिवबाबा म्हणतात मजशिव पित्याला तुम्ही आजोबा म्हणणार नाहीत.मी तर सर्वांचा पिता आहे.हे प्रजापिता ब्रह्मा आहेत.तुम्ही सर्व भाऊ-बहीण झाले.जरी स्त्री-पुरुष आहेत परंतु बुद्धी द्वारा जाणतात, की आम्ही भाऊ-बहीण आहोत.बाबांपासून वारसा घेतो.भाऊ बहिण आपसामध्ये विकारी बनू शकत नाहीत.जर दोघांची आपसामध्ये विकारी दृष्टी आकर्षित करते,तर विकारी बनतात.परत बाबांना विसरतात.बाबा म्हणतात,तुम्ही माझे बनून परत तोंड काळे करतात.बेहद्दचे बाबा सन्मुख मुलांना समजावतात.तुम्हाला हा नशा चढलेला आहे.तुम्ही जाणता ग्रहस्थ व्यवहारा मध्ये पण राहायचे आहे.लौकिक संबंधीना पण तोंड द्यायचे आहे.लौकिक पित्याला तर तुम्ही पिताच म्हणणार ना,त्यांना तुम्ही भाऊ भाऊ म्हणू शकत नाहीत.साधारण भाषेमध्ये पित्याला पिताच म्हणाल.बुद्धीमध्ये आहे की आमचे लौकिक पिता आहेत.ज्ञान तर आहे ना.हे ज्ञान खूप विचित्र आहे.आजकाल नाव पण घेतात परंतु कोणी बाहेरील मनुष्यांच्या समोर पित्याला भाऊ म्हणाल,तर समजतील,यांचे डोके खराब झाले आहे.यामध्ये खूप युक्ती पाहिजे.तुमचे ज्ञान गुप्त आहे,गुप्त संबंध आहेत.यामध्ये खूप युक्तीने चालायचे आहे परंतु एक दोघांचा आदर पण करायचा आहे.लौकिक नात्यांशी पण तोड निभावयाची आहे.तरीही बुद्धी वरती जायला पाहिजे.आम्ही बाबा पासून वारसा घेत आहोत.बाकी काकाला काका आणि मामाला मामाच म्हणावे लागेल.जे ब्रह्माकुमार-कुमारी बनले नाहीत तर ते समजणार नाहीत. ब्रह्मकुमार कुमारी बनले आहेत तेच या गोष्टीला समजतील.बाहेरचे तर हे ऐकून आश्चर्य चकित होतील. यामध्ये समजण्याची खूप विशाल बुद्धी पाहिजे.बाबा तुम्हा मुलांना विशाल बुद्धी बनवतात.तुम्ही प्रथम हद्दच्या गोष्टींमध्ये होते,आता बुद्धी बेहद्द मध्ये चालली जाते.आमचे ते बेहद्दचे पित आहेत.हे सर्व आमचे भाऊबहीण आहेत,बाकी संबंधांमध्ये तर सुनेला सून आणि सासूला सासू म्हणणार, बहिण थोडेच म्हणनार.जरी दोघी येतात, घरामध्ये राहत खूप युक्तीने चालायचे आहे.लोकसंग्रहाला पण पहावे लागते,नाहीतर ते समजतील हे पतीला भाऊ,सासूला बहीण मानतात.हे काय शिकवत आहेत.या ज्ञानाच्या गोष्टीला तुम्हीच जाणतात, दुसरे कोणी जाणत नाहीत.तुम्ही असे म्हणतात ना,तुमची गत मत तुम्हीच जानणार.आता तुम्ही त्यांची मुलं बनला आहात,तर तुमचे तुम्हीच जानणार.खूप सांभाळून चालावे लागते,कुठे कोणी संभ्रमित व्हायला नको.तर प्रदर्शनीमध्ये तुम्हा मुलांना प्रथम हे समजायचे आहे की, आम्हाला शिकवणारे भगवान आहेत.आता सांगा ते कोण आहेत? निराकार शिव की कृष्ण आहेत. शिवजयंतीच्या नंतर परत कृष्ण जयंती येते, कारण बाबा राजयोग शिकवतात.मुलांच्या बुद्धीमध्ये आले असेल ना,जोपर्यंत शिव परमात्मा येत नाहीत,शिवजयंती साजरी करु शकत नाहीत. जोपर्यंत पिता येऊन कृष्णपुरी ची स्थापना करत नाहीत, तोपर्यंत कृष्ण जयंती पण कशी होईल.कृष्णाचा जन्म साजरा करतात परंतु थोडेच समजतात. कृष्ण तर राजकुमार होते तर जरूर सतयुगाचे राजकुमार असतील ना. देवतांची राजधानी असेल,फक्त एका कृष्णाला बादशाही तर मिळाली नसेल.जरूर कृष्णपुरी असेल ना.असे म्हणतात कृष्णपुरी आणि ही कंसपुरी आहे.कंसपुरी नष्ट झाली परत कृष्णपुरी स्थापन झाली ना.भारतामध्येच होती ना. नवीन दुनिया मध्ये थोडेच हे कंस इत्यादी होऊ शकतात.कंसपुरी तर कलियुगाला म्हटले जाते. येथे तर पहा किती मनुष्य आहेत,सतयुगा मध्ये खूप थोडे असतात. देवतांनी कोणती लढाई इत्यादी केली नाही.कृष्णपुरी म्हणा किंवा विष्णुपुरी म्हणा,दैवी संप्रदाय म्हणा,येथे तर आसुरी संप्रदाय आहेत.बाकी देवता आणि आसुरांची लढाई झाली आहे,ना कौरव आणि पांडवाची लढाई झाली आहे.तुम्ही रावणावर विजय मिळवतात.बाबा म्हणतात या पाच विकारांना जिंका तर,तुम्ही जगजीत बनाल.यामध्ये काही लढाई करायची नाही.लढाईचे नाव घेतले तर हिंसा होते.रावणावर विजय मिळवायचा आहे परंतु अहिंसक पद्धतीने.फक्त शिव पित्याची आठवण केल्यामुळेच विकर्म विनाश होतात.लढाई इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही.बाबा म्हणतात तुम्ही तमोप्रधान बनले आहात परत तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. भारताचा राजयोग प्रसिद्ध आहे. बाबा म्हणतात माझ्यासोबत बुद्धी योग लावल्यामुळे तुमचे पाप नष्ट होतील.बाबा पतित पावन आहेत तर त्यांच्याशी बुद्धी योग लावायचा आहे, तेव्हाच तुम्ही पतिता पासून पावन बनाल.आता प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्यासोबत योग लावत आहात. यामध्ये लढाईची कोणतीच गोष्ट नाही.जे चांगल्या प्रकारे शिकतील आणि बाबांशी योग लावतील तेच बाबांकडून वारसा मिळवतील, अच्छा.

फार फार वर्षांपूर्वी भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) भावा-भावाच्या दृष्टीचा अभ्यास करत,लौकिक बंधनापासून तोड निभावयाची आहे. खूप युक्तीने चालायचे आहे. विकारी दृष्टी बिलकुल जायला नको.कयामतच्या वेळेत संपूर्ण पावन बनायचे आहे.

(२) बाबा पासून पूर्ण वारसा घेण्यासाठी चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे आणि पतित पावन बाबांशी योग लावून पावन बनायचे आहे.

वरदान:-
कमजोरींना पूर्णविराम देऊन आपल्या संपूर्ण स्वरूपाला प्रत्यक्ष करणारे साक्षात्कार मुर्त भव.

विश्व तुमच्या कल्पापूर्वीच्या संपन्न स्वरूप, पज्य स्वरूपाचे स्मरण करत आहे म्हणून आता तुम्ही संपन्न स्वरूपाला प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष करा. झालेल्या कमजोरी ला पूर्णविराम देऊन,दृढ संकल्पाद्वारे जुन्या संस्कार स्वभावाला समाप्त करा. दुसऱ्याच्या कमजोरीची नक्कल करू नका.अवगुण धारण करणाऱ्या बुद्धीचा नाश करा.दिव्य गुण धारण करणारी सतोप्रधान बुद्धीला धारण करा,तेव्हाच साक्षात्कार मुर्त बनाल.

बोधवाक्य:-
आपल्या अनादी आणि आदी गुणांना स्मृतीमध्ये ठेवून, त्यांना स्वरूपामध्ये आणा.