05-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , चांगल्या मार्काने पास व्हायचे असेल तर बुद्धी योग थोडा पण कुठे भटकायला नको , एक बाबांची च आठवण राहावी . देहाची आठवण करणारे उच्च पद मिळवू शकत नाहीत .

प्रश्न:-
सर्वात श्रेष्ठ लक्ष कोणते आहे ?

उत्तर:-
आत्मा जिवंतपणी मरुन,(सर्व काही विसरुन) एक बाबांची बणुन,दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.देह अभिमान बिलकुल नष्ट होणे,हेच श्रेष्ठ लक्ष आहे.निरंतर देही अभिमानी अवस्था बनणे हे मोठे लक्ष्य आहे.याद्वारेच कर्मातीत अवस्था बनेल.

गीत:-
तू प्रेमाचा सागर आहे .

ओम शांती।
आता हे गीत पण चुकीचे आहे. प्रेमाच्या सागरा ऐवजी ज्ञाना चे सागर पाहिजे.प्रेमाचा लोटा असू शकत नाही.लोटा तर गंगाजलाचा असतो.तर ही भक्तीमार्गाची महिमा आहे.हे चुकीचे आहे आणि ते बरोबर आहे.बाबा तर प्रथम ज्ञानाचे सागर आहेत.मुलांमध्ये थोडे पण ज्ञान असेल, तर उच्च पद प्राप्त करू शकतात.यावेळी आम्ही बरोबर चैतन्य दिलवाडा मंदिरा सारखे आहोत.ते जड दिलवाडा मंदिर आणि हे आहे चैतन्य दिलवाडा मंदिर.हे पण आश्चर्य आहे ना. जेथे जड यादगार आहे,तेथे तुम्ही चैतन्य मध्ये बसले आहात परंतु मनुष्य काहीच समजत नाहीत.पुढे चालून समजतील बरोबर हे,ईश्वरीय विद्यापीठ आहे,भगवान शिकवत आहेत.यापेक्षा मोठे विद्यापीठ दुसरे कोणते होऊ शकत नाही.हे पण समजतात,बरोबर हे चैतन्य दिलवाडा मंदिर आहे.हे दिलवाडा मंदिर तुमचे अगदी बरोबर यादगार आहे. छता वरती सूर्यवंशी चंद्रवंशी आहेत आणि खाली आदी देवी,आदी देव आणि मुलं बसले आहेत. यांचे नाव ब्रह्मा-सरस्वती आहे,परत सरस्वती ब्रह्मा ची मुलगी आहे.प्रजापिता ब्रह्मा आहेत,तर जरूर गोप गोपी पण असतील ना.हे जड चित्र आहेत,जे भूतकाळात होऊन गेले आहेत,त्यांचे परत चित्र बनवले आहेत.कोणाचा मृत्यू होतं तर त्यांचे लगेच चित्र बनवतात.त्यांचे कर्तव्य,जीवन चरित्राची काहीच माहिती नाही.कर्तव्य लिहू शकत नाहीत तर,त्यांचे चित्र काहीच कामाचे राहत नाहीत.माहिती होते,त्यांनी हे,हे कर्तव्य केले आहेत.आता जे देवतांचे मंदिर आहेत,त्यांचे कर्तव्य जीवन चरित्र कोणालाच माहिती नाहीत. उच्च ते उच्च शिवबाबांना कोणीच जाणत नाही.यावेळेत तुम्ही सर्वांचे जीवन चरित्र जाणतात.मुख्य कोण कोण होऊन गेले आहेत,ज्यांची पूजा करतो.उच्च ते उच्च भगवान आहेत.शिवरात्री पण साजरी करतात,तर जरूर त्यांचे अवतरण झालेले आहे परंतु कधी झाले,त्यांनी येऊन काय केले,हे कोणालाच माहिती नाही.शिवाच्या सोबत ब्रह्मा आहेत.आदी देव आदी देवी कोण आहेत,त्यांना इतक्या भुजा का दाखवल्या आहेत? कारण वृध्दी होते ना. प्रजापिता ब्रह्मा द्वारे खूप वृध्दी होते होते. ब्रह्मा साठी म्हणतात,१००भुजा,हजार भुजा होत्या.विष्णू किंवा शंकरासाठी इतक्या भुजा म्हणत नाहीत.ब्रह्मासाठी का म्हणतात?ही प्रजापिता ब्रह्मा ची सारी वंशावळ आहे ना.ही काही भुजा ची गोष्ट नाही.ते जरी म्हणतात,हजार भुजा असणारे परंतु अर्थ थोडच समजतात.आता तुम्ही प्रत्यक्षात पाहता की,ब्रह्माच्या किती भुजा आहेत.हे बेहदच्या भुजा आहेत.प्रजापिता ब्रह्माला सर्व मानतात,परंतु त्यांच्या कर्तव्याला जाणत नाहीत.आत्म्याला तर भुजा नसतात.इतके करोडो भाऊ आहेत, तर त्यांच्या किती भुजा असतील? परंतु प्रथम जेव्हा कोणी पूर्ण रितीने ज्ञानाला समजतील तेव्हा तर ह्या गोष्टी ऐकतील. प्रथम मुख्य गोष्ट एकच आहे,बाबा म्हणतात तुम्ही माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा.ज्ञानाच्या सागराचे पण गायन आहे.खूप ज्ञानाच्या गोष्टी ऐकवत राहतात. इतके सर्व ज्ञानाचे मुद्दे आठवणीत राहू शकत नाहीत,त्याचे रहस्य बुद्धीमध्ये राहते.अंत काळात फक्त मनमनाभव च राहते. ज्ञानाचे सागर कृष्णाला म्हणत नाहीत.ती रचना आहे,रचनाकार एक बाबाच आहेत.बाबा च सर्वांना वारसा देतात,घरी घेऊन जातात.बाबा आणि आत्म्यांचे घर आहेत शांतीधाम.विष्णुपुरी ला बाबांचे घर म्हणत नाहीत. घर मुळवतन आहे,जिथे आत्मे राहतात.या सर्व गोष्टी समजदार मुलंच धारण करू शकतात.इतके सर्व ज्ञान कोणाच्या बुद्धीमध्ये राहू शकत नाही,न इतके कागदावर लिहू शकतात.या मुरली सर्व एकत्र केल्या तर हा सर्व हॉल भरून जाईल.त्या शिक्षणामध्ये पण पुष्कळ पुस्तकं असतात,परीक्षा पास केली तर त्याचे रहस्य बुद्धीमध्ये बसून जाते. वकिलाची परीक्षा दिली तर एक जन्मासाठी अल्प काळाचे सुख मिळेल.ती तर अविनाशी कमाई आहे.तुम्हाला तर हे बाबा भविष्यासाठी अविनाशी कमाई करवतात. बाकीचे गुरू गोसावी इ.आहेत, ते सर्व विनाशी कमाई करवतात. विनाशाच्या जवळ येतात,तर कमाई कमी होत जाते.तुम्ही म्हणाल कमाई तर वाढत जाते,परंतु नाही.हे सर्व नष्ट होणार आहे. यापूर्वी राजा इत्यादींची कमाई चालत होती.आता तर ते पण नाहीत.तुमची कमाई तर खुप काळ चालते.तुम्ही जाणतात हे पूर्वनियोजित नाटक आहे,ज्याला दुनिये मध्ये कोणी जाणत नाहीत.तुमच्या मध्ये पण नंबरा नुसार आहेत,ज्यांना धारणा होते.काही जण म्हणतात आम्ही मित्र संबंधी इत्यादींना समजवतो,ते पण अल्प काळाचे झाले ना.दुसऱ्यांना प्रदर्शनी इ.का समजावू शकत नाहीत?पूर्ण पणे धारणा नाही.स्वतःला मिया मिठ्ठू तर समजत नाहीत ना.सेवेची आवड आहेत तर,जे चांगल्या रीतीने समजवतात,त्यांच्या कडुन ऐकायला पाहिजे.बाबा उच्चपद देण्यासाठी आले आहेत, तर पुरुषार्थ करायला पाहिजे परंतु भाग्या मध्ये नाहीतर श्रीमत पण मानत नाहीत.परत पद भ्रष्ट होते. पूर्वनियोजित नाटका नुसार राजधानी स्थापन होत आहे.त्यामध्ये सर्व प्रकारचे पाहिजेत ना.मुलं समजतात कोणी चांगली प्रजा बनणारे आहेत,कोणी कमी बनणारे आहेत.बाबा म्हणतात मी तुम्हाला शिकवण्यासाठी आलो आहे.दिलवाडा मंदिरांमध्ये राजांचे चित्र आहेत.परत जे पुज्य बनतात,तेच पुजारी पण बनतात.राजाराणी चे पद तर श्रेठ आहे ना. परत जेव्हा वाममार्ग मध्ये येतात तेव्हा सुध्दा राजे किंवा मोठे मोठे सावकार तर असतात ना.जगन्नाथाच्या मंदिरामध्ये सर्वांना ताज दाखवला आहे.प्रजेला तर ताज नसेल ना.ताज असणारे राजेपण विकारी दाखवतात.सुख संपत्ती तर त्यांना खूप असेल.संपत्ती कमी-जास्त तर होते.हिऱ्यांचे महल आणि चांदीचे महला मध्ये फरक तर असतो ना.तर बाबा मुलांना म्हणतात चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून श्रेष्ठ पद घ्या.राजांना सुख जास्त असते, तेथे तर सर्व सुखी असतात.जसे येथे सर्वांना दुःख आहे,आजार तर सर्वांना होतात.तेथे सुख आहे परत पदांमध्ये पण क्रमानुसार आहेत.बाबा नेहमी म्हणतात पुरुषार्थ करत रहा,आळसी बनू नका.पुरुषार्था द्वारे समजले जाते,यांची सदगती याप्रकारे इतकीच होते.

आपल्या सद्गगती साठी श्रीमता वरती चालायला पाहिजे.शिक्षकांच्या मतावर विद्यार्थी चालले नाही,तर काहीच कामाचे नाहीत.क्रमा नुसार तर सर्व आहेत.जर कोणी म्हणतात, हे मी करू शकणार नाही, तर बाकी काय शिकले,शिकून हुशार बनायला पाहिजे.जे कोणी पण म्हणतील हे तर,चांगल्या प्रकारे समजून सांगतात,परंतु आत्मा जिवंतपणी मरुन एक बाबांची बनेल आणि दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.देह अभिमान नष्ट व्हावा,हे सर्वात श्रेष्ठ लक्ष आहे.सर्व काही विसरायचे आहे,पूर्णपणे देही अभिमानी अवस्था बनेल हे मोठे लक्ष्य आहे.तेथे आत्मा तर अशरीरी असते,परत येथे येऊन देह धारण करते. आता परत येथे देहामध्ये असताना स्वतःला अशरीरी समजायचे आहे,हे फार मोठे कष्ट आहेत.स्वतःला आत्मा समजून कर्मातीत अवस्थां मध्ये राहायचे आहे.सापा ला पण अक्कल आहे,जुनी कात सोडून देतो.तर तुम्हाला पण देहाभिमान नष्ट करायचा आहे. मूळ वतन मध्ये तर तुम्ही देही अभिमानी असता.येथे देहामध्ये राहत स्वतःला आत्म समजायचे आहे,देह अभिमान नष्ट व्हायला पाहिजे.खूपच मोठी परीक्षा आहे.भगवंताला स्वतःहून शिकवावे लागते.असे कोणी दुसरे म्हणू शकत नाहीत की,देहाचे सर्व संबंध सोडून माझे बना, स्वतःला निराकार आत्मा समजा. कोणत्याही गोष्टीचे भान राहायला नको. माया एकदोघांच्या देहामध्ये फसवते म्हणून बाबा म्हणतात या साकार बाबांची पण आठवण करू नका.शिव बाबा म्हणतात तुम्हाला तर स्वतःच्या देहाला पण विसरायचे आहे,आणि एक बाबांची आठवण करायची आहे,यामध्येच कष्ट आहेत.माया चांगल्या-चांगल्या मुलांना पण नावा रुपामध्ये फसवते,ही सवय फार खराब आहे.शरीराची आठवण करणे ही तर भुतांची आठवण झाली.आम्ही म्हणतो एक शिव बाबांची आठवण करा.तुम्ही परत पाच भूतांची आठवण करत राहतात.देहाशी बिल्कुल लगाव राहायला नको.ब्राह्मणी द्वारे पण शिकायचे आहे, ना की,त्यांच्या नावा रुपा मध्ये फसायचे आहे. देही अभिमानी बण्यांमध्ये कष्ट आहेत. बाबांच्या जवळ जरी दिनचर्या पाठवतात परंतु बाबा त्यावर ते विश्वास करत नाहीत. काही जण तर म्हणतात आम्ही शिव बाबा शिवाय कोणाचीच आठवण करत नाहीत परंतु बाबा जाणतात पाई पैशाची पण आठवण करत नाहीत.आठवण करण्या मध्ये तर खूप कष्ट आहेत. कुठे ना कुठे देहधारी मध्ये फसतात,देहधारीची आठवण करणे,ही तर पाच भुतांची आठवण झाली, याला भूत पूजा म्हटले जाते,भुतांची आठवण करतात.येथे तर तुम्हाला एका शिवबाबा ची आठवण करायची आहे.पुजेची तर गोष्ट नाही.भक्तीचे नाव रुप गायब होते,परत चित्रांची काय आठवण करायची.ते पण मातीचेच बनलेले आहेत. बाबा म्हणतात हे सर्व नाटकांमध्ये नोंद आहे.आता परत तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतो.कोणत्याही शरीराची आठवण करायची नाही शिवाय एका बाबांच्या.आत्मा जेव्हा पावन बनेल तर परत शरीर पण पावन मिळेल.आता तर शरीर पावन नाही.प्रथम आत्मा जेव्हा सतो प्रधान पासून सतो,रजो तमो मध्ये येते तर शरीर पण त्यानुसार मिळते.आता तुमची आत्मा पावन बनत जाते परंतु शरीर आता पावन होत नाही.या समजण्याच्या गोष्टी आहेत.या गोष्टी पण कोणाच्या बुद्धी मध्ये असतील तर चांगल्या रीतीने समजून दुसऱ्यांना समजून सांगत राहतील. सतोप्रधान आत्म्याला बनायचे आहे. बाबांची आठवण करण्यामध्ये कष्ट आहेत. काही जण तर जरा पण आठवणी मध्ये राहत नाहीत.चांगल्या मार्काने पास होण्यासाठी बुद्धी योग्य कुठेच भटकायला नको.एका बाबांची आठवण रहावी परंतु मुलांचा बुद्धी भटकत राहते.जितके अनेकांना आपल्यासारखे बनवाल तेवढेच पद पण मिळेल.देहाची आठवण करणारे कधीच उच्चपद प्राप्त करू शकत नाहीत. येथे तर चांगल्या मार्काने पास व्हायचे आहे,कष्टाशिवाय श्रेष्ठ पद कसे मिळेल. देहाची आठवण करणारे पुरुषार्थ करू शकत नाहीत.बाबा म्हणतात पुरुषार्थ करणाऱ्यांचे अनुकरण करा.हा पण पुरुषार्थच आहे ना.

हे फार विचित्र ज्ञान आहे.दुनिये मध्ये कोणालाच माहिती नाही.कोणाच्या बुद्धी मध्ये बसणार नाही की,आत्मा कशी परिवर्तन होते.या सार्या गुप्त गोष्टी आहेत, कष्ट आहेत.बाबा पण गुप्त आहेत.तुम्ही राजाई कशी प्राप्त करतात,लढाई भांडण इत्यादी काहीच नाही.ज्ञान आणि योगाची गोष्ट आहे.आम्ही कोणा बरोबर लढत नाही. हे तर आत्म्याला पवित्र बनवण्यासाठी कष्ट घ्यायचे आहेत.आत्मा जशी जशी पतित बनते, तस तसे शरीर पण पतित मिळते, परत आत्म्यास पावन बनायचे आहे.खूप कष्ट घ्यायचे आहेत.बाबा समजू शकतात कोण कोण पुरुषार्थ करतात.हा शिव बाबा चा भंडारा आहे,शिव बाबा च्या भंडाऱ्या द्वारे तुम्ही सेवा करत राहतात.सेवा करणार नाही तर पाई पैशाचे पद मिळेल.बाबांच्या जवळ सेवा करण्यासाठी आलेले आहात आणि सेवा केली नाही तर काय पद मिळेल. ही राजधानी स्थापन होत आहे, यामध्ये नोकर-चाकर सर्व बनतील ना. आता तुम्ही रावणा वरती विजय प्राप्त करतात,बाकी दुसऱ्याबरोबर कोणती लढाई नाही.हे समजवले जाते,किती गुप्त गोष्टी आहेत.योगबळा द्वारे विश्वाची बादशाही घेतात.तुम्ही जाणता आम्ही आपल्या शांतीधाम मध्ये राहणारे आहोत. तुला मुलांना बेहद घराची आठवण आहे. येथे तुम्ही आपला अभिनय करण्यासाठी आले आहात परत आपल्या घरी जाल. आत्मा कशी जाते हे पण कोणी समजत नाहीत.अविनाशी नाटका नुसार आत्म्याला यायचे आहेच.अच्छा

गोड गोड फार वर्षा नंतर भेटलेल्या मुलां प्रती प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
खऱ्या आणि स्वच्छ मनाच्या आधारे द्वारे नंबर एक घेणारे दिलाराम पसंत भव .

दिलाराम बाबांना खऱ्या मनाची मुलंच पसंत आहेत.दुनियावी बुद्धी नसेल तरी पण स्वच्छ आणि खऱ्या मनाद्वारे नंबर एक घेऊ शकतात.कारण बुद्धी तर बाबा खूप देतात ज्याद्वारे रचनाकाराला जाणून रचनाच्या आदी मध्य अंताचे ज्ञान घेतात.तर खरे आणि स्वच्छ मनाच्या आधारा द्वारेच नंबर बनतात,सेवेच्या आधारा मुळे नाही.खरे मनाच्या सेवेचा प्रभाव हृदयापर्यंत पोहोचतो.बुद्धी वाले नाव कमावतात आणि खऱ्या मनाचे आशीर्वाद.

बोधवाक्य:-
सर्वांच्या प्रती शुभ चिंतन आणि शुभ भावना ठेवणेच खरा परोपकार आहे .