05-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला जुनी दुनिया, जुन्या शरीरापासून जिवंतपणी मरुन घरी जायचे आहे, यामुळे देह अभिमान सोडून देही अभिमानी बना"

प्रश्न:-
चांगल्या पुरुषार्थी मुलांची लक्षणे कोणती असतील?

उत्तर:-
चांगले पुरुषार्थी मुलं,जी आहेत ते सकाळी सकाळी उठुन देही अभिमानी राहण्याचा अभ्यास करतील.ते एक बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करतील.त्यांचे लक्ष राहिल,दुसऱ्या कोणत्याही देहधारीची आठवण यायला नको.निरंतर बाबा आणि ८४ च्या चक्राची आठवण राहावी.हे पण अहो सौभाग्य म्हणाल.

ओम शांती।
आता तुम्ही मुलं जिवंत पणी मेलेले आहात.कसे मेले आहात. देहाच्या अभिमानला सोडून देणे म्हणजे बाकी राहिली आत्मा.शरीर तर नष्ट होते, आत्मा तर कधीच मरत नाही.बाबा म्हणतात जिवंत पणी स्वतःला आत्मा समजा आणि परमपिता परमात्मा च्या सोबत योग लावल्यामुळे आत्मा पवित्र होउन जाईल.जोपर्यंत आत्मा बिलकुल पवित्र बनत नाही तोपर्यंत पवित्र शरीर मिळू शकत नाही.आत्मा पवित्र बनली तर परत हे जुने शरीर आपोआप सुटून जाईल.सापाची कात आपोआप सुटते,तर त्यापासून ममत्व नाहिसे होते.तो जाणतो मला नवीन शरीर मिळणार आहे,जुनी निघून जाईल. प्रत्येकाला आपापली बुद्धी तर असते ना.आता तुम्ही मुलं समजता आम्ही जिवंत पणी,या जुन्या दुनिये पासून, जुन्या शरीरा पासून मेले,परत तुम्ही आत्मा शरीर सोडून कुठे जाणार? आपल्या घरी.प्रथम तर हे चांगल्या प्रकारे आठवण करायची आहे,आम्ही आत्मा आहोत,शरीर नाही.आत्मा म्हणते बाबा आम्ही आपले बनलो,म्हणजेच जिवंतपणी मेलो.आता आत्म्याला असा आदेश मिळाला आहे,मज पित्याची आठवण करा,तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.आठवणीचा अभ्यास पक्का करायला पाहिजे.आत्मा म्हणते बाबा तुम्ही आल्यानंतर आम्ही तुमचे बनू.आत्मा पुरुष आहे,ना की स्त्री.नेहमी म्हणतात आम्ही भाऊ-भाऊ आहोत.असे थोडेच म्हणतात आम्ही सर्व बहिणी बहिणी आहोत.सर्व मुलं आहेत.सर्व मुलांना वारसा मिळणार आहे.मुलगी समजले तर वारसा कसा मिळेल?आत्मे सर्व भाऊ भाऊ आहेत. बाबा सर्वांना म्हणतात,हे आत्मिक मुलांनो माझी आठवण करा.आत्मा खुपच सूक्ष्म आहे.या खुपच समजण्याच्या गोष्टी आहेत.मुलांना निरंतर आठवण राहत नाही.संन्यासी लोक उदाहरण देतात,मी म्हैस आहे, म्हैस आहे,असे म्हटल्यामुळे म्हशी सारखे बनतात.वास्तव मध्ये म्हशीसारखे कोणी पण बनत नाही.बाबा तर म्हणतात स्वतःला आत्मा समजा.हे आत्मा आणि परमात्मा चे ज्ञान तर दुसऱ्या कोणाला नाही म्हणून अशा गोष्टी करत राहतात.आता तुम्हाला देही अभिमानी बनायचे आहे.आम्ही आत्मा आहोत,हे जुने शरीर सोडून आम्हाला नवीन शरीर घ्यायचे आहे.मनुष्य मुखाद्वारे पण म्हणतात,आत्मा तारा आहे,भ्रकुटी च्यामध्ये राहतो,परत म्हणतात अंगठ्या सारखे आहे.आता तारा कुठे,अंगठा कुठे? परत मातीचे शाळीग्राम बसून बनवतात.इतकी मोठी आत्मा तर होऊ शकत नाही.मनुष्य देह अभिमानी आहेत,त्यामुळे आत्म्याला पण मोठे बनवतात.या खूपच सूक्ष्म गोष्टी आहेत.मनुष्य भक्ती पण एकांत मध्ये,कोठरी मध्ये बसून करतात. तुम्हाला तर गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून कामकाज इत्यादी करून,बुद्धी मध्ये हे पक्के करायचे आहे,आम्ही आत्मा आहोत.बाबा म्हणतात मी तुमचा पिता पण खूपच सूक्ष्म ज्योती बिंदू आहे,असे नाही की मी मोठा आहे.माझ्यामध्ये सर्व ज्ञान आहे.आत्मा आणि परमात्मा दोघे एक सारखेच आहेत,फक्त त्यांना सर्वोच्च म्हटले जाते.हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे.बाबा म्हणतात मी तर अमर आहे.मी अमर नसेल तर तुम्हाला पावन कसे बनवू?तुम्हाला गोड मुलं कसे म्हणू?आत्मा सर्व काही करते?बाबा म्हणतात देही अभिमानी बना,यामध्येच कष्ट आहेत.बाबा म्हणतात माझी आठवण करा,दुसऱ्या कुणाची आठवण करू नका.योगी तर दुनिया मध्ये खूप आहेत.कन्न्याचा साखरपुडा होतो तर बुद्धी योग पती बरोबर लागतो,अगोदर नव्हता. पतीला पाहिल्यानंतर त्यांची आठवण येते. आता बाबा म्हणतात तुम्ही माझीच आठवण करा.हा खूप चांगला अभ्यास पाहिजे.जे चांगली चांगली मुलं आहेत,ते सकाळी सकाळी उठून देही अभिमानी राहण्याचा अभ्यास करतील.भक्ती पण सकाळी सकाळी करतात ना.आप आपल्या ईष्ठ देवाची आठवण करतात. हनुमाना ची पण खूप पूजा करतात परंतु जाणत काहीच नाहीत.बाबा येऊन समजवतात,तुमची बुद्धी माकडा सारखी बनली आहे,आता परत तुम्ही देवता बनत आहात.आता ही पतित तमोप्रधान दुनिया आहे.आता तुम्ही बेहद पित्या जवळ आले आहात.मी तर पुनर्जन्म रहित आहे. हे शरीर तर दादाचे आहे.माझ्या कोणत्याही शरीराचे नाव नाही.माझे नावच कल्याणकारी शिव आहे.तुम्ही मुलं जाणता कल्याणकारी शिवबाबा येऊन,नर्काला स्वर्ग बनवतात.खूप कल्याण करतात.नर्काचा एकदम विनाश करतात.प्रजापिता ब्रह्मा द्वारा आता स्थापना होत आहे.ही प्रजापिता ब्रह्मा मुख वंशावळ आहे.चालता फिरता एक दोघाना सावधान करणे म्हणजेच मनमनाभव आहे.बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विर्कम विनाश होतील. पतित-पावन तर बाबा आहेत ना,त्यांना विसरल्यामुळे भगवानुवाच च्या ऐवजी कृष्ण भगवानुवाच लिहिले आहे.भगवंत निराकार आहेत त्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते,त्यांचे नाव शिव आहे.शिवाची पुजा पण खूप होते.शिव -काशी,शिव- काशी म्हणत राहतात. भक्ती मार्गामध्ये अनेक नाव ठेवली आहेत.कमाई करण्यासाठी अनेक मंदिर बनवली आहेत.त्यांचे खरे नाव शिव आहे,परत सोमनाथ पण ठेवले आहे. सोमनाथ म्हणजे सोमरस देतात,म्हणजे ज्ञान धन देतात.जेव्हा पुजारी बनतात तर मंदिर बनवण्यासाठी खुप खर्च करतात.कारण सोमरस दिला आहे ना. सोमनाथ च्या सोबत सोमनाथिनी पण असेल ना.यथा राजा तथा प्रजा सर्व सोमनाथ,सोमनाथिनी आहेत.तुम्ही सोन्याच्या दुनिया मध्ये जातात ना.तेथे सोन्याच्या विटा असतात,नाहीतर भिंती इत्यादी कशा बनतील.खूप सोने असते म्हणून त्या दुनियेला सोन्याची दुनिया म्हटले जाते.ही तर लोखंड,दगडाची दुनिया आहे.स्वर्गाचे नाव ऐकूनच तोंडामध्ये पाणी येते.विष्णूचे दोन रूप लक्ष्मी-नारायण वेगवेगळे बनवतील ना. तुम्ही विष्णुपुरी चे मालक बनतात. आता तुम्ही रावण पुरी मध्ये आहात.तर बाबा म्हणतात फक्त स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा.बाबा पण परमधाम मध्ये राहतात,तुम्ही पण तेथेच राहतात.मी तुम्हाला काय कष्ट देत नाही, खूपच सहज आहे.बाकी रावण दुश्मन तुमच्यासमोर उभा आहे.हाच योगा मध्ये विघ्न घालतो.ज्ञानामध्ये विघ्न पडत नाहीत.आठवण करण्यामध्ये विघ्न पडतात.माया सारखी सारखी आठवण विसरवते.देह अभिमाना मध्ये घेऊन येते.बाबांची आठवण करू देत नाही. हे युद्ध चालत राहते.तुम्ही कर्मयोगी आहात ना.जर दिवसा आठवण करू शकत नाहीत,तर रात्री आठवण करा. रात्रीचा अभ्यास परत दिवसा कामाला येईल. निरंतर स्मृती राहावी.जे बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात,आम्ही त्यांची आठवण करतो.बाबाची आठवण आणि ८४ जन्माच्या चक्राची आठवण राहिली तर आहो सौभाग्य.भावांनो आणि बहिणींनो आता कलियुग पूर्ण होऊन सतयुग येत आहे.बाबा आले आहेत,सतयुगा साठी राजयोग शिकवत आहेत.कलियुगा नंतर सतयुग येणार आहे.एक बाबांच्या शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करायची नाही. वानप्रस्थी जे असतात,ते जाऊन सन्याशांचा संग करतात.वानप्रस्थ म्हणजे जेथे वाणीचे काम नाही.आत्मा शांत राहते,तिचे आस्तित्व नष्ट होत नाही.या विनाशी नाटकांमधून कोणताही कलाकार बाहेर निघू शकत नाही.हे पण बाबांनी समजावले आहे.एका बाबा शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करायची नाही.या दुनियेला पाहून पण न पाहिल्या सारखे करायचे आहे.या जुन्या दुनियेचा तर विनाश होणारच आहे.कब्रस्थान आहे ना.मुडद्यां ची कधी आठवण केली जाते का? सर्व मेले आहेत,मी आलो आहे पतितांना पावन बनवून घेऊन जाण्यासाठी.येथे सर्व नष्ट होतील.आज-काल जे बाँम्बस बनवतात, खूपच शक्तिशाली बनवत राहतात.बाबा म्हणतात येथे बसल्यानंतर ज्यांच्या वरती सोडाल त्यांच्यावरच पडतील.ही सर्व नोंद आहे.भगवान येतातच,स्थापना आणि विनाश करण्यासाठी.चित्र पण स्पष्ट आहे.तुम्ही साक्षात्कार करत आहात,आम्ही हे बनू.येथील अभ्यास परत नष्ट होऊन जाईल.इमारती इत्यादी बनवणारे,जे हुशार असतील ते स्वर्गामध्ये पण येतील.बाजार इत्यादी पण होईल ना,काम तर चालायला पाहिजे.येथील कला घेऊन स्वर्गामध्ये येतील.विज्ञाना मुळे पण चांगली कला शिकतात,हे सर्व तेथे कामाला येईल.प्रजे मध्ये येतील.तुम्हा मुलांना तर प्रजा मध्ये जायचे नाही.तुम्ही आले आहात मम्मा बाबाच्या हृदयासिन बनण्यासाठी.बाबा जे श्रीमत देतात,त्यावरती चालायचे आहे.सर्वात चांगली श्रीमत आहे,तुम्ही माझी आठवण करा.कोणाचे अचानक भाग्य उघडते,कोणते कारण निमित्त बनते.कुमारी साठी तर बाबा म्हणतात लग्न करणे म्हणजे बरबादी करणे होय. या विकार रुपी गटर मध्ये तुम्ही पडू नका.काय तुम्ही बाबाचे मानणार नाही? स्वर्गाची महारानी बनणार नाही? आपल्या सोबत प्रतिज्ञा करायला पाहिजे,आम्ही त्या विकारी दुनिया मध्ये कधीच जाणार नाही.त्या दुनियेची आठवण पण करणार नाही.स्मशानाची कधी आठवण करतात का?येथे तर तुम्हाला म्हणतील,कुठे हे शरीर सुटले तर आम्ही आपल्या स्वर्गामध्ये जाऊ. आता ८४ जन्म पूर्ण झाले,आता आम्ही आपल्या घरी जात आहोत.दुसऱ्यांना पण हे ऐकावयाचे आहे.हे पण समजतात बाबा शिवाय सतयुगाचे राज्य कोणी देऊ शकत नाही. या ब्रह्माच्या रथाला पण कर्मभोग तर होतोच ना.बाप दादाचे पण आपसामध्ये आत्मिक सुसंवाद चालत राहते.बाबा म्हणतात आशीर्वाद करा,खोकल्यासाठी काही औषध द्या किंवा छू मंत्राने खोकल्याला नष्ट करा.शिव बाबा म्हणतात, नाही,हा तर कर्मभोग आहे.तो तर भोगायचा आहे.हा तुमचा रथ घेतो,त्याच्याबद्दल नवीन देतो,बाकी हा सर्व तुमचा कर्मभोग आहे.शेवटपर्यंत काही ना काही होत राहील.तुम्हाला आशीर्वाद केला तर सर्वा वरती करावा लागेल.आज ही मुलगी येथे बसली आहे,उद्या रेल्वेमध्ये अपघात होतो,मृत्यू झाला,तर बाबा म्हणतील ही पण नाटकांमध्ये नोंद होती.असे थोडेच म्हणू शकतो बाबांनी अगोदर का सांगितले नाही?असा कायदा नाही.मी तर पतितांना-पावन बनवण्यासाठी येतो,भविष्य सांगण्यासाठी येत नाही.हा कर्मभोग तर स्वतःला चुक्तू करावा लागतो.त्यामध्ये आर्शिवादा ची गोष्ट नाही,त्यासाठी तुम्ही संन्याशा जवळ जाऊ शकता.बाबा एकच गोष्ट सांगतात, मला बोलवलेच यासाठी आहे की, नरकापासून स्वर्गामध्ये घेऊन चला. गायन पण करतात पतित पावन सिताराम परंतु त्याचा अर्थ उल्टा घेतला आहे.परत रामाची बसून महिमा करतात,रघुपती राघव राजाराम,पतित पावन सिताराम.बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये तुम्ही खूप पैसे गमावले.एक गित पण आहे ना,काय कौतुक पाहिले. देवीची मूर्ती बनवून पूजा करून परत समुद्रामध्ये विसर्जन करतात.आता समज येते की खूप पैसे बरबाद करत होतो परत असेच होईल.सतयुगा मध्ये असे काम होत नाही.सेकंद सेकंद याची नाटकामध्ये नोंद आहे. कल्पा नंतर पण याच गोष्टीची पुनरावृत्ती होईल. अविनाशी नाटकाला चांगल्या रितीने समजायचे आहे.अच्छा कोणी जास्त आठवण करू शकत नाही तर बाबा म्हणतात आणि अल्लाह आणि बादशाह,बाबा आणि बादशही ची आठवण करा.मनामध्ये हीच धुन लागली पाहिजे,आम्ही आत्मा कसे ८४ जन्माचे चक्र लावून आलो आहोत.चित्रा वरती समजून समजून सांगा,हे तर खूपच सहज आहे.हा आत्मिक मुलांशी आत्मिक सुसंवाद आहे.बाबा मुलांशी संवाद करतात ना,दुसऱ्या कोणाशी तर करू शकत नाहीत.बाबा म्हणतात स्वताला आत्मा समजा.आत्माच सर्व काही करते.बाबा आठवण करुन देतात,तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत. मनुष्य मनुष्यच बनतात.जसे बाबा हुकुम काढतात की विकारांमध्ये जाऊ नका.असाच हा पण कायदा आहे की कोणीही रडायचे नाही.सतयुगा मध्ये कोणीही रडत नाही.लहान मुले पण रडत नाहीत.रडण्याचा कायदाच नाही. सतयुग आनंदी राहण्याची दुनिया आहे. त्याचा अभ्यास येथेच करायचा आहे. अच्छा गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांकरीता मात पिता, बाप दादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपला सर्व कर्मभोग नष्ट करायचा आहे.पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.या नाटकाला समजायचे आहे.
(२) या जुन्या दुनियेला पाहून पण त्याची आठवण करायची नाही.कर्मयोगी बनायचे आहे.नेहमी आनंदित राहण्याचा अभ्यास करायचा आहे.कधीच रडायचे नाही.

वरदान:-
सर्वांच्या प्रती शुभ भाव आणि श्रेष्ठ भावना धारण करणारे हंस बुद्धी होली हंस भव.

हंस बुद्धी म्हणजे नेहमी प्रत्येक आत्म्याच्या प्रति श्रेष्ठ आणि शुभ विचार करणारे.प्रथम प्रत्येक आत्म्याच्या भावाला परखणारे आणि परत धारण करणारे.कधीच बुद्धीमध्ये कोणत्याही आत्म्याच्या प्रती अशुभ किंवा साधारण भाव यायला नको.नेहमी शुभ भाव आणि शुभ भावना ठेवणारेच होली हंस आहेत.ते कधीच कोणत्याही आत्म्याच्या अकल्याणाच्या गोष्टी ऐकुन,पाहुन पण अकल्याणाला, कल्याणाच्या वृत्तीमध्ये बदलतात. त्यांची दृष्टी प्रत्येक आत्म्याच्या प्रती श्रेष्ठ शुद्ध स्नेहाची राहते.

बोधवाक्य:-
प्रेमाची भरपूर गंगा बना,ज्या द्वारे प्रेमाचे सागर बाबा दिसून येतील.