05-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,भोलेनाथ सर्वात प्रिय बाबा,तुमच्या सन्मुख बसले आहेत तुम्ही प्रेमाने आठवण करा,तर आकर्षण वाढत जाईल,विघ्न नष्ट होतील"

प्रश्न:-
ब्राह्मण मुलांना कोणती गोष्ट नेहमी आठवणीत राहील,तर कधीच विकर्म होणार नाहीत?

उत्तर:-
जे कर्म आम्ही करू, आम्हाला पाहून दुसरे पण करतील- हे आठवणीत राहिल,तर विकर्म होणार नाहीत.जर कोणी लपून पाप करतात,तर धर्मराजापासून लपू शकत नाहीत,लगेच त्याची सजा मिळते.पुढे चालून आणखी कायदे कडक होत जातील.या इंद्रसभे मध्ये कोणी पतित लपून बसू शकत नाही.

गीत:-

भोलेनाथ पेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीत

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलं जाणतात,आता आत्मिक बाबा आम्हाला या सृष्टीच्या आदी,मध्य, अंतचे ज्ञान ऐकवत आहेत.त्यांचे नावच भोळेनाथ आहे.पिता खूप भोळे असतात,खूप कष्ट सहन करून पण मुलांना शिकवतात, पालन पोषन करतात.जेव्हा मोठे होतात तर सर्वकाही त्यांना देऊन स्वतः वानप्रस्थ मध्ये जातात.ते समजतात की,आम्ही कर्तव्याचे पालन केले.आता मुलं काय करायचे ते करतील,तर पिता भोळे झाले ना. हे पण आता तुम्हाला बाबा समजवतात कारण स्वतः भोळेनाथ आहेत.तर हदच्या पित्यासाठी समजतात की,ते खूप भोळे आहेत. ते झाले हदचे भोळे,हे झाले बेहदचे भोळेनाथ बाबा.ते परमधाम वरून येतात,जुन्या दुनिया,जुन्या शरीरांमध्ये,यामुळे मनुष्य समजतात जुन्या पतित शरीरामध्ये कसे येतील. न समजल्यामुळे पावन शरीर असणाऱ्या कृष्णाचे नाव गीतेमध्ये लिहिले आहे.हे गीता वेद ग्रंथ इत्यादी परत बनतील.तुम्ही पाहा बाबा खूप भोळे आहेत.शिवबाबा येतात तर अशी भासना प्रेम देतात, जसे की बाबा सन्मुख बसले आहेत. हे साकार बाबा पण भोळे आहेत, काही दुपट्टा नाही,काही तिलक इत्यादी नाही,खूप साधारण राहतात. बाबा तर बाबाच आहेत.मुलं जाणतात हे सर्व ज्ञान शिवबाबा देतात,दुसऱ्या कोणाची शक्ती नाही, जे देऊ शकतील.दिवसेंदिवस मुलांचे आकर्षण वाढत जाईल,जितकी बाबांची आठवण कराल,तेवढे प्रेम वाढत जाईल.सर्वात प्रिय बाबा आहेत ना.न फक्त आत्ता परंतू भक्ती मार्गामध्ये पण,तुम्ही सर्वात प्रिय समजत होते.तुम्ही म्हणत होते बाबा जेव्हा तुम्ही याल,तर सर्वांपासून प्रेम नष्ट करून,आपल्या सोबतच स्नेह ठेवू.तुम्ही आता जाणत आहात परंतु माया इतके प्रेम करू देत नाही. मायेची इच्छा नसते की,यांनी मला सोडून बाबांची आठवण करावी. तिची इच्छा असते की,देह अभिमानी बनून माझ्याशी प्रेम करावे,ही माया ची इच्छा असते,म्हणून माया खुप विघ्न आणते.तुम्हाला विघ्नाला घाबरायचे नाही.मुलांनी काही तरी कष्ट करायला पाहिजेत ना.पुरुषार्था द्वारे तुम्ही आपले भाग्य प्राप्त करतात.तुम्ही जाणतात उच्च पद मिळवण्यासाठी खूप पुरुषार्थ करायचा आहे.एक तर विकारांचे दान द्यायचे आहे,दुसरे बाबांकडून जे अविनाश ज्ञान रत्नाचे धन मिळते,ते दान करायचे आहेत.अविनाशी ध्यानाद्वारे तुम्हीच धनवान बनतात. ज्ञान तर कमाईचे साधन आहे.ते ग्रंथाचे तत्त्वज्ञान आहे,हे अध्यात्मिक ज्ञान आहे. ग्रंथ इत्यादी वाचून खूप कमाई करत राहतात.एका खोली मध्ये ग्रंथ इत्यादी ठेवतात,थोडे काही ऐकवले, बस कमाई सुरू होते.ते काही अर्थ सहित ज्ञान नाही.अर्थ सहीत ज्ञान तर एका बाबां जवळच आहे.जोपर्यंत कोणालाही अध्यात्मिक ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत ते ग्रंथाचे तत्त्वज्ञानच बुद्धीमध्ये असते.तुमच्या ज्ञानाच्या सत्य गोष्टी ऐकत नाहीत.तुम्ही खूप थोडे आहात.हे तर शंभर टक्के निश्चित आहे की,हे आत्मिक ज्ञान, मुलांना आत्मिक पित्या पासून मिळत आहे.ज्ञानाला कमाईचे साधन म्हटले जाते.खूप ज्ञान मिळत आहे ना.योगाद्वारे आरोग्य मिळते म्हणजे निरोगी काय मिळते. ज्ञानाद्वारे संपत्ती मिळते,हे दोन मुख्य विषय आहेत.परत काही चांगल्या प्रकारे धारण करतात,कोणी कमी धारण करतात,तर संपत्ती पण क्रमानुसार मिळते.सजा इत्यादी खाऊन पद मिळते.पूर्ण प्रकारे आठवण करत नाहीत, तर विकर्म विनाश होत नाहीत,परत सजा खावी लागते,पद पण भ्रष्ट होते.जसे शाळेमध्ये होते.हे बेहदचे ज्ञान आहे. याद्वारे नाव किनार्‍याला लागते.त्या ज्ञानाद्वारे वकील डॉक्टर अभियंते बनतात.हे तर एकच शिक्षण आहे. योग आणि ज्ञानाद्वारे निरोगी, संपत्तीवान बनतात, राजकुमार कुमारी बनतात.स्वर्गा मध्ये कोणी वकील न्यायाधीश इत्यादी नसतात. तेथे धर्मराजाची पण आवश्यकता राहत नाही. न गर्भ जेल मध्ये सजा,न धर्मराज पुरी मध्ये सजा मिळते.गर्भ महला मध्ये खूप सुखी राहतात.येथे तर गर्भ जेलमध्ये सजा खावी लागते.या सर्व गोष्टींना तुम्ही मुलंच आत्ता समजतात,बाकी ग्रंथामध्ये,संस्कृत भाषेमध्ये श्लोक इत्यादी मनुष्यांनी बनवले आहेत.ते विचारतात सतयुगा मध्ये कोणती भाषा असेल.बाबा समजवतात जी देवतांची भाषा असेल,ती चालेल.तेथील जी भाषा असेल,ती कुठे होऊ शकत नाही. असे होऊ शकत नाही की,तेथील भाषा संस्कृत असेल.देवता आणि पतित मनुष्याची एक भाषा होऊ शकत नाही.तेथील जी भाषा असेल, तीच चालेल.हे विचारायचे आवश्यकता नाही.प्रथम बाबा पासून वारसा तर घ्या.जे कल्पा पूर्वी झाले असेल,तेच होईल.प्रथम वारसा तर घ्या,दुसरी कोणती गोष्ट विचारु नका. अच्छा ८४ जन्म नसतील तर ८० असतील किंवा ८२ असतील.या गोष्टींना तुम्ही सोडून द्या.बाबा म्हणतात,अल्फची म्हणजे ईश्वराची आठवण करा.स्वर्गाची बादशाही तुम्हाला बरोबर मिळते ना.अनेक वेळेस तुम्ही स्वर्गाची बादशाही घेतली होती.सतयुगा मधून परत कलियुगामध्ये पण यायचे आहेच. आता तुम्ही मास्टर ज्ञानसागर मास्टर सुखाचे सागर बनवतात.तुम्ही सर्व पुरुषार्थी आहात.बाबा तर संपूर्ण आहेत.बाबा मध्ये जे ज्ञान आहे,ते मुलांमध्ये आहे परंतु तुम्हाला ज्ञानाचे सागर म्हणू शकत नाही.सागर तर एकच असतो,फक्त वेगवेगळी नावं ठेवली आहेत.बाकी तुम्ही ज्ञानसागरा द्वारे निघालेल्या नद्या आहात.तुम्ही मानसरोवर नदी आहात.नदीचे पण नावं खूप आहेत.ब्रह्मपुत्रा खूप मोठी नदी आहे.कलकत्त्यामध्ये नदी आणि सागराचा संगम आहे,त्याचे नाव आहे डायमंड हार्बर.तुम्ही ब्रह्मा मुख वंशावळ हिऱ्यासारखे बनतात.खूप मोठी यात्रा भरते.बाबा या ब्रह्माच्या मनामध्ये येऊन मुलांना भेटतात.या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. तरीही बाबा म्हणतात मनमनाभव. बाबांची आठवण करत राहा.तर ते सर्वात प्रिय बाबा,सर्व संबंधांचा गोडवा आहेत.ते सर्व संबंधी,विकारी आहेत,त्यांच्याद्वारे दुःखच मिळते. बाब तर तुम्हा सर्वांना भक्तीचे फळ देतात,सर्व संबंधाचे प्रेम देतात,खूप सुख देतात.दुसरे कोणी इतके सुख देऊ शकत नाहीत.कोणी देतात तर ते, अल्प काळासाठीच असते. त्याला संन्यासी काग विष्टा समान सुख म्हणतात.दुःखधाम मध्ये तर जरूर दुःखच होईल.तुम्ही मुलं जाणता,आम्ही अनेक वेळेस ही भूमिका वठवली आहे.आम्ही उंच पद कसे मिळवू याची काळजी करायला पाहिजे,खूप पुरुषार्थ करायचा आहे की,आम्ही नापास व्हायला नको.चांगल्या गुणांनी पास झाले तरच उच्चपद मिळेल आणि त्याची खुशी पण होईल.सर्व एकसारखे तर होऊ शकत नाहीत, जितका योगा असेल.अनेक गोपिका आहेत,जे कधी बाबांना भेटले नाहीत,बाबांना भेटण्यासाठी खूप तडपतात.साधू-संन्यांशा जवळ तडपण्याची गोष्टच नसते.बाबांना भेटण्यासाठी येतात. आश्चर्यकारक गोष्ट आहे ना.घरामध्ये बसून आठवण करतात.शिव बाबा आम्ही तुमची मुलं आहोत.बाबा कडून आत्म्याला स्मृती येते.तुम्ही मुलं जाणतात,आम्ही शिवबाबा कडून कल्पकल्प वारसा घेतो.तेच पिता कल्पाच्या नंतर आले आहेत.ते पाहिल्या शिवाय राहू शकत नाहीत. आत्मा जाणते बाबा आले आहेत, शिवजयंती पण साजरी करतात परंतु जाणत काहीच नाहीत.शिवबाबा शिकवतात,हे काहीच जाणत नाहीत.नाममात्र शिवजयंती साजरी करतात, सुट्टी पण देत नाहीत. ज्यांनी वारसा दिला त्यांचे काहीच महत्त्व नाही आणि ज्यांना वारसा दिला त्याचे नाव प्रसिद्ध केले आहे. खास भारतामध्ये येऊन स्वर्ग बनवला आहे बाकी सर्वांना मुक्ती देतात,तशीच सर्वांची इच्छा असते. तुम्ही जाणतात मुक्तीच्या नंतर जीवन मुक्ती मिळेल.बाबा येऊन मायेच्या बंधनापासून मुक्त करतात.बाबांना म्हटले जाते सर्वांचे सद्गती दाता. जीवन मुक्ती मिळते तीही क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे.बाबा म्हणतात ही पतित दुनिया दु:खधाम आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप सुख मिळते, त्याला स्वर्ग म्हटले जाते.अल्लाहा नी स्वर्गाची स्थापना केली,कशासाठी केली? काय फक्त मुसलमानांसाठी स्वर्गाची स्थापना केली?आपापल्या भाषेमध्ये कोणी स्वर्ग म्हणतात, कोणी बहिश्त म्हणतात.तुम्ही जाणतात स्वर्गामध्ये फक्त भारत असतो, या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये क्रमवार पुरुषार्थ नुसार बसल्या आहेत.एक मुसलमान म्हणत होता,आम्ही अल्लाह च्या बागेमध्ये गेलो,हा सर्व साक्षात्कार होतो.या वैश्विक नाटकांमध्ये अगोदरपासूनच नोंद आहे.वैश्विक नाटकं नुसार जे होते,सेकंद पास झाला,तर कल्पा पूर्वी पण असेच झाले होते.उद्या काय होईल हे माहिती नाही.वैश्विक नाटका वरती निश्चय पाहिजे,ज्यामुळे कोणतीच काळजी राहणार नाही.आम्हाला तर बाबांनी आदेश दिला आहे,माझी आठवण करा आणि आपल्या वारशाची आठवण करा,नष्ट तर सर्व होणारच आहेत.कोणी एक दोघांसाठी रडू पण शकणार नाहीत. मृत्यू आला आणि गेले,रडण्यासाठी पण वेळ मिळणार नाही.आवाजच निघू शकणार नाही.आजकाल तर मनुष्य राख घेऊन पण खूप परिक्रमा देतात,भावना बसलेली आहे.हे सर्व वेळ वाया घालवण्याची साधनं आहेत.यामध्ये ठेवलेच काय आहे, माती मातीमध्ये मिसळून जाईल. यामध्ये भारत पवित्र कसा बनेल. पतित दुनिया मध्ये जे काम करतात, पतितच करतात.दानपुण्य इत्यादी करत आले आहेत,त्यामुळे काय भारत पवित्र बनला आहे.सिडी उतरणारच आहेत.सतयुगामध्ये सूर्यवंशी बनले,परत सिडी उतरावी लागेल,हळूहळू उतरत राहतात.जरी कितीहीयज्ञ तप इत्यादी केले तरीही, दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळचे फळ मिळते.कोणी खराब काम करतात, तर त्याचे पण फळ पण मिळते. बाबा मुलांना शिकवण्यासाठी आले आहेत,तन पण साधारण घेतले आहे.काही तिलक इत्यादी लावण्याची आवश्यकता नाही. तिलक तर भक्त लोक खूप मोठ मोठे लावतात परंतु खूप फसवतात. बाबांनी म्हटले आहे,मी साधारण तनामध्ये येतो, येऊन मुलांना शिकवतो.वानप्रस्थ अवस्था झाली ना.कृष्णाचे नाव का लिहिले आहे? येथे निर्णय घेण्याची पण बुद्धी नाही. आत्ता बाबांनी सत्य असत्य निर्णय करण्याची बुद्धी दिली आहे.बाबा म्हणतात,यज्ञ-तप करत,दान पु्ण्य करत,ग्रंथ इत्यादी वाचत आले आहात.त्या ग्रंथामध्ये काय आहे? मी तर तुम्हाला राजयोग शिकवून विश्वाची बादशाही दिली, की श्रीकृष्णाने दिली,तुम्ही निर्णय करा. मुलं म्हणतात,बाबा तुम्हीच ज्ञान ऐकवले होते,कृष्ण तर लहान राजकुमार आहेत,ते कसे ऐकवू शकतील.बाबा आपल्याच राजयोगा मुळे,आम्ही असे श्रेष्ठ बनतो.बाबा म्हणतात शरीरावरती काहीच भरोसा नाही.खूप पुरुषार्थ करायचा आहे. बाबांना समाचार ऐकवतात की, अमका खूप चांगला निश्चय बुद्धी आहे.बाबा म्हणतात काहीच निश्चय नाही.ज्यांना खुप प्रेम केले,ते आज नाहीत.बाबा तर सर्वांच्या सोबत प्रेमाने चालतात.जसे कर्म मी करेल मला पाहून दुसरे करतील.काही तर विकारांमध्ये गेले,परत येऊन लपुन बसतात.बाबा तर लगेच संदेशी ला सांगतात.असे कर्म करणारे खूप नाजूक होतील,पुढे चालू शकणार नाहीत.अंत काळातील नाजूक वेळेत कोणी काही करतात,तर एकदम मार्शल कायदा करतात.पुढे चालून तुम्ही खूप पाहाल,बाबा काय काय करतात.बाबा थोडेच सजा देतील,ते तर धर्मराजाद्वारे देतील.ज्ञानामध्ये प्रेरणा ची गोष्टच नाही.सर्व मनुष्य म्हणतात, हे पतित-पावन या, आम्हाला पावन बनवा.सर्व आत्मे कर्म इंद्रियाद्वारे बोलवतात.बाबा ज्ञानाचे सागर आहेत, त्यांच्याजवळ ज्ञानाचे खूप विविध प्रकारचे सामान आहे.असे ज्ञानाचे सामान कोणाजवळ नसते.कृष्णाची महिमा खूप वेगळी आहे.बाबांच्या ज्ञानाद्वारे हे लक्ष्मीनारायण कसे बनले? बनवणारे तर बाबाच आहेत.आता तुमचा तिसरा नेत्र उघडला आहे. तुम्ही जाणतात,पाच हजार वर्षाची गोष्ट आहे.आता घरी जायचे आहे. भूमिका वठवायची आहे.हे स्वदर्शन चक्र आहे ना.तुमचे नाव स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण कुलभूषण, प्रजापिता ब्रह्माकुमार- कुमारी आहे. लाखोच्या अंदाजा मध्ये स्वदर्शन चक्रधारी बनतील.तुम्ही खूप ज्ञान घेतात,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ही वेळ खूप नाजूक आहे,म्हणून कोणत्याही उलटे कर्म करायचे नाही. कर्म-अकर्म-विकर्माच्या गतीला लक्षात ठेवून नेहमी श्रेष्ठ कर्म करायचे आहेत.

(२) योगाद्वारे नेहमीसाठी आपली निरोगी काया बनवायची आहे. सर्वात प्रिय बाबांची आठवण करायची आहे.बाबा पासून जे अविनाशी ज्ञानाचे धन मिळते,ते दान करायचे आहे.

वरदान:-
स्वमान मध्ये स्थिर राहून विश्वाद्वारे सन्मान प्राप्त करणारे देह अभिमाना पासून मुक्त भव.

राजयोग शिक्षणाचे मुळ लक्ष आहे, देहाभिमाना पासून अनासक्त होऊन, देही अभिमानी बनणे.या देह अभिमाना पासून अनासक्त किंवा मुक्त होण्याची विधी आहे,नेहमी स्वमाना मध्ये स्थिर राहणे.संगमयुगा मध्ये आणि भविष्याचे जे अनेक प्रकारचे स्वमान आहेत,त्यापैकी कोणत्याही एका स्वमान मध्ये स्थिर राहिल्यामुळे देह अभिमान नष्ट होतो. जे स्वमाना मध्ये स्थिर राहतात, त्यांना स्वतः सन्मान प्राप्त होतो. नेहमी स्वमानामध्ये राहिल्यामुळेच विश्व महाराजन बनतात आणि सर्व त्यांना सन्मान देतात.

बोधवाक्य:-
जशी वेळ तसेच स्व:तला परिवर्तन करणे,म्हणजेच खरे सोने बनणे आहे.