05-05-2022
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा
मधुबन
"गोड
मुलांनो, जर तुम्ही पित्याच्या श्रीमताचे पालन केले, तर तुम्हाला कोणीही दुःख देऊ
शकत नाही, दुःख देणारा रावण आहे, जो तुमच्या राज्यात नसतो "
प्रश्न:-
या ज्ञान यज्ञात तुम्ही मुलं कोणता त्याग करता?
उत्तर:-
या ज्ञान
यज्ञात तुम्ही तीळ जवसाचा त्याग करत नाही, यामध्ये तुम्हाला शरीरासोबत जे काही आहे,
त्या सर्वांचा त्याग करावा लागतो, म्हणजेच बुद्धीने सर्व काही विसरून जावे लागते.
पवित्र राहणारे ब्राह्मणच, या यज्ञाची काळजी घेऊ शकतात. जे पवित्र ब्राह्मण बनतात,
तेच ब्राह्मण नंतर देवता बनतात.
गीत:-
तुम्हे पाके
हमने जहान पा लिया है. . . .
ओम शांती।
मुलं पित्याकडे आली आहेत. मुलं नक्की तेव्हाच येतील, जेव्हा पित्याला ओळखून पिता
म्हणतील. नाही तर तुम्ही येऊ शकत नाही. तुम्हा मुलांना माहित आहे की, आपण निराकार
बेहद्दच्या पित्याकडे जात आहोत, त्यांचे नाव शिवबाबा आहे, त्यांना स्वतःचे शरीर नाही.
कोणीही त्यांचा शत्रू होऊ शकत नाही. इथे शत्रू झाले की, ते राजांना मारतात. गांधींना
शरीर होते म्हणून मारले गेले. शिव पित्याला तर स्वतःचे शरीर नाही, जर मारायचे झाले
तरीही ज्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्याला मारतील. आत्म्याला कोणी मारू शकत
नाही. जे मला नेमके ओळखतात, त्यांनाच मी राज्य भाग्य देतो. त्यांच्या राज्य भाग्याला
कोणीही जाळू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत पाण्यात बुडवू शकत नाही. तुम्ही मुलं
अविनाशी राजधानीचा पित्याकडून वारसा घेण्यासाठी आला आहात. ज्याला कोणी दुःख किंवा
कष्ट देऊ शकत नाही. तेथे दुखावणारे कोणीच नसतात. रावणच त्रास देणारा आहे. रावणाला
१० डोकी देखील दाखवतात, त्याची पत्नी मंदोदरीला दाखवत नाहीत. तर इथे रावणाच्या
राज्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. सतयुग त्रेतामध्ये रावण नसतो. शिवपिता तर निराकार
आहेत, त्यांना कोणी मारू, कापू शकत नाही. ते तुम्हाला पण असे बनवतात, जे तुम्हाला
शरीर असूनही दु:ख मिळू शकत नाही. म्हणून अशा पित्याच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे.
बाबा हे ज्ञानाचे सागर आहेत आणि हे ज्ञान दुसरे कोणी देऊ शकत नाही. ते ब्रह्माद्वारे
सर्व शास्त्रांचे रहस्य समजावून सांगतात. ब्रह्मा हे शिवबाबांचे अपत्य आहे.
विष्णूच्या नाभीतून ब्रह्माचा उदय झाला असे नाही. जर नाभी म्हणाले तर शिवबाबांच्या
नाभी कमळातून बाहेर आले, असे म्हणायला पाहिजे. तुम्ही पण शिवबाबांच्या नाभीतून
बाहेर आला आहात. बाकी सर्व चित्रं तर चुकीचे आहेत. एकच बाबा बरोबर आहेत. रावण
तुम्हाला असत्य, चुकीचे बनवतात. हा खेळ आहे. हा खेळ फक्त तुम्हालाच माहीत आहे.
रावणाचे राज्य केव्हा सुरू झाले, मनुष्याचे कसे अध:पतन होत राहिले, कोणाचीही प्रगती
होऊ शकली नाही. बाबांच्या जवळ जाण्याचा जो मार्ग दाखवतात, ते आणखीनच जंगलात घेऊन
जातात कारण, त्यांना बाबांच्या घराचा आणि स्वर्गाचा रस्ताही माहीत नाही. सर्व गुरु
वगैरे आहेत , ते सर्व हठयोगी आहेत, ते घरदार सोडवतात. बाबा सोडवत नाहीत. ते म्हणतात,
पवित्र बना. कुमार आणि कुमारी पवित्र आहेत. द्रौपदी बोलवते की, बाबा आम्हाला वाचवा,
आम्ही पवित्र बनून कृष्णपुरीला जाऊ इच्छितो. मुलीही बोलवतात, लग्न करा म्हणून,
आई-वडील ही त्रास देतात. कधी मारहाण ही करतात की, लग्न करावेच लागेल. प्रथम आई बाबा,
मुलीच्या पाया पडतात, कारण ते स्वतःला अपवित्र आणि मुलीला पवित्र समजतात. बोलवतात
पण की, हे पतित पावन या. आता बाबा म्हणतात कुमारींनो, अपवित्र बनू नका. नाहीतर परत
बोलवावे लागेल. तुम्हाला स्वतःला वाचवयाचे आहे. बाबा पावन बनवून स्वर्गाचा वारसा
द्यायला आले आहेत, म्हणून पवित्र बनावे लागेल. पतित झाले तर पतित बनून मरावे लागेल.
परत स्वर्गाचे सुख पाहू शकणार नाही. स्वर्गात तर खूप मजा आहे. हिरे मोत्यांचे
राजवाडे आहेत. तेच राधे कृष्ण नंतर लक्ष्मी नारायण बनतात. तर लक्ष्मी आणि नारायणला
पण खूप प्रेम करायला पाहिजे. अच्छा, कृष्णावर प्रेम करता ना, मग राधेला का करत
नाहीत ? कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही कृष्णाला पाळण्यात बसवून झोके देतात. माता,
कृष्णावर खूप प्रेम करतात, राधेवर नाही. आणि परत ब्रह्मा, जे कृष्ण बनवणारे आहेत,
त्यांची तितकी पूजा केली जात नाही. जगत अंबेची खूप पूजा करतात, जी सरस्वती,
ब्रह्माची कन्या आहे. आदिदेव ब्रह्माचे मंदिर फक्त अजमेरमध्ये आहे. आता मम्मा म्हणजे
ज्ञान ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही तर जाणतात, ती ब्राह्मणी आहे. ती स्वर्गाची आदी देवी
नाही, न ८ भुजा आहेत. मंदिरामध्ये आठ हात दाखवले आहेत. बाबा म्हणतात मायेच्या
राज्यात खोटेच खोटे आहे. सत्य सांगणारे एकच पिता आहेत, जे मानवाला देवता बनवतात.
तुम्ही त्या शरीरधारी ब्राह्मणांकडून कथा वगैरे ऐकत-ऐकत या टप्प्यावर पोहोचले आहात.
आता मृत्यू समोर उभा आहे. बाबा म्हणतात, मी कलियुगाच्या शेवटी कल्पाच्या संगमयुगात
येतो, जेव्हा झाडाची जडजडीभुत अवस्था असते. मी युगे-युगे येत नाही. मी कच्छ मच
अवतार, वराह अवतार घेत नाही. मी कणा-कणांत राहत नाही. तुम्ही आत्मेही कणात जन्म घेत
नाहीत, तर मग मी कसे जाऊ? माणसांबद्दल असं म्हटलं जातं की, ते प्राणी पण बनतात. त्या
अनेक प्रजाती आहेत, त्या मोजू शकत नाहीत. बाबा म्हणतात, आत्ता मी तुम्हाला योग्य
गोष्टी समजावून सांगत आहे. आता ८४ लाख जन्म खरे की खोटे हे ठरवा? या खोट्या जगात
सत्य कोठून आले? सत्य तर एकच आहे. बाबाच येतात आणि खरे-खोटे यामधील फरक सांगतात.
मायेने सर्वांना असत्य बनवले आहे. बाबा येतात आणि सर्वांना सत्य बनवतात. आता निर्णय
करा की, कोण बरोबर आहे? गुरु गोसाई बरोबर आहेत, की एक शिवपिता बरोबर आहेत ? एक सत्य
बाबाच सत्य जगाची स्थापना करतात. तेथे कोणतेही बेकायदा काम केले जात नाही. तिथे
कामविकार रुपी विष कोणाला मिळत नाही. आपण भारतीय, बरोबर देवी देवता होतो, हे तुम्ही
जाणतात. तुम्ही आत्ता पतित झाला आहात. तुम्ही आत्ता बोलवतात, हे पतित पावन या. राजा,
राणी, प्रजा हे सर्व पतित असल्यामुळे लक्ष्मी, नारायण इत्यादींची पुजा करतात, नाही
का? भारतात पवित्र राजे होते आणि आता ते अपवित्र आहेत. पवित्रची पुजा करतात. बाबा
आत्ता येऊन तुम्हाला महाराजा आणि महाराणी बनवतात, म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. बाकी
८ भुजांचे कोणीही देवी देवता नसतात. लक्ष्मी नारायणालाही दोन हात आहेत. चित्रांमध्ये,
नारायणला सावळे तर लक्ष्मीला गोरे दाखवले आहे. आता एक पवित्र आणि एक अपवित्र कसे असू
शकतात, म्हणून चित्रे खोटी झाली, नाही का? आता पिता स्पष्ट करतात, राधे कृष्ण,
दोघेही गोरे होते आणि नंतर काम चितेवर बसले, दोघेही सावरे झाले. एक गोरा, एक सावरा
तर असू शकत नाही. कृष्णाला श्याम सुंदर म्हणतात. राधेला श्याम सुंदर का म्हटले जात
नाही? हा फरक का आहे? जोडी सारखीच असावी. आता तुम्ही ज्ञानाच्या चितेवर बसला आहात,
पुन्हा काम चितेवर का बसता? हा प्रयत्न तुम्हा मुलांनाही करायचा आहे. आपण ज्ञानाच्या
चितेवर बसलो आहोत, मग काम चितेवर बसण्याचा प्रयत्न का करता? पतीने ज्ञान घेतले तर,
पत्नी घेत नाही, परत भांडण होते. यज्ञात अनेक अडथळे येतात. हे ज्ञान किती व्यापक आहे.
बाबा आल्यापासून रुद्र यज्ञ सुरू झाला आहे. जोपर्यंत तुम्ही ब्राह्मण बनत नाही,
तोपर्यंत तुम्ही देवता बनू शकत नाही. शुद्र पतितापासून पावन देवता बनण्यासाठी
तुम्हाला ब्रह्मा मुखवंशी ब्राह्मण बनावे लागेल. यज्ञाची काळजी फक्त ब्राह्मणच
घेतात, यात तुम्हाला पवित्र बनावे लागेल. इतर लोकांप्रमाणे तीळ, जवस इत्यादी एकत्र
करुन ठेवायचे नाही, जसे ते लोक करतात. संकटसमयी यज्ञ निर्माण करतात. भगवंताने सुद्धा
असा यज्ञ निर्माण केला होता, असे समजतात. बाबा म्हणतात, हा ज्ञान यज्ञ आहे, ज्यात
तुम्ही विकाराला स्वाह करतात. शरीरासह जे काही आहे, त्याची आहुती द्यायची आहे.
यामध्ये सर्वकाही स्वाह करायचे आहे. त्यांच्यावर एक कथा आहे. दक्ष प्रजापिताने यज्ञ
तयार केला. आता प्रजापिता तर एक आहे. प्रजापिता ब्रह्मा नंतर दक्ष प्रजापिता कोठून
आला? शिवपिता प्रजापिता ब्रह्माच्या माध्यमातून यज्ञ निर्माण करतात. तुम्ही सर्व
ब्राह्मण आहात. तुम्हाला आजोबांचा वारसा मिळतो. तुम्ही ब्रह्मा द्वारे शिवबाबांकडे
आला आहात. हे शिवबाबांचे पोस्ट ऑफिस आहे. तुम्हीही पत्र लिहिता, ब्रह्मा द्वारे
शिवबाबा. बाबांचे वास्तव्य यांच्या मध्ये आहे. हे सर्व ब्राह्मण पावन होण्यासाठी
ज्ञान योग शिकत आहेत. आम्ही पतित नाही, असे तुम्ही म्हणणार नाही. आपण अपवित्र आहोत,
परंतू पावन बनवणारे आपल्याला पावन करत आहेत आणि मनुष्य पतित असेल तरच गंगेत स्नान
करायला जाईल. आत्ता तुम्हाला माहित आहे की, एकच सतगुरु बाबा आपल्याला पावन बनवतात.
त्यांची श्रीमत आहे, मुलांनो तुम्ही तुमचा बुद्धीचा योग माझ्याशी जोडा. निर्णय करा,
तुम्ही त्या गुरूंकडे जावा किंवा माझ्या श्रीमतानुसार चाला. तुमचे तर एकच पिता
शिक्षक आणि सतगुरू आहेत. बेहद्दचे पिता सर्व मानवांना आत्म अभिमानी होण्यास सांगतात.
इथे हे ज्ञान कोणालाच नाही. संन्यासी तर म्हणतात की, आत्माच परमात्मा आहे. आत्मा
ब्रह्म तत्वात विलीन होते. अशा गोष्टी ऐकत-ऐकत तुम्ही खुप दु:खी आणि अपवित्र बनले
आहात. भ्रष्टाचारी त्यांना म्हणले जाते, ज्यांचा जन्म विकाराद्वारे होतो. ते
रावणाच्या राज्यात भ्रष्टाचारी कामच करतात. परत सुंदर बनवण्यासाठी बाबांनाच यावे
लागते आणि भारतामध्येच यावे लागते. बाबा म्हणतात, मी तुम्हाला ज्ञान आणि योग शिकवतो.
५००० वर्षांपूर्वी मी तुम्हाला राजयोग शिकवला होता आणि तुम्हाला पुन्हा स्वर्गाचे
स्वामी बनवले होते. मी प्रत्येक कल्पामध्ये येत राहतो. त्याची न सुरुवात किंवा ना
अंत. चक्र चालत राहते. प्रलयचा तर विषयच नाही. यावेळी तुम्ही मुलं, या अविनाशी
ज्ञानरत्नांनी तुमची झोळी भरतात. शिवबाबांना बम-बम महादेव म्हणतात. बम बम म्हणजे,
शंख वाजवून आमची झोळी भरा. ज्ञान तरं बुद्धीत असते ना? आत्म्यातच संस्कार आहेत.
आत्माच अभ्यास करुन इंजिनियर, बॅरिस्टर वगैरे बनते. आत्ता तुम्ही आत्मे काय बनणार?
बाबांकडून वारसा घेऊन आम्ही लक्ष्मी-नारायण बनू, असे म्हणता. आत्मा निश्चितपणे
पुनर्जन्म जरुर घेते. या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. ही दोन अक्षरे कोणाच्या
कानात बोला, तुम्ही आत्मा आहात आणि शिवबाबांचे स्मरण करा म्हणजे स्वर्गाचे राज्य
मिळेल. किती सहज आहे. एकच पिता सत्य सांगतात आणि सर्वांना सदगती देतात. बाकीचे सगळे
खोटे बोलूनच नुकसान करतात. हे सर्व धर्मग्रंथ वगैरेही नंतर निर्माण झाले आहेत.
भारताचा धर्मग्रंथ फक्त एक गीताच आहे. ते परंपरेतून आलेले आहेत असे म्हणतात. पण
कधीपासून? ते समजते की, सृष्टीला लाखो वर्षे झाली आहेत, अच्छा. तुम्ही मुलं
बाबांसाठी द्राक्षे घेऊन येता. तुम्हीच आणता आणि तुम्हीच खाता, मी खात नाही. मी तर
अभोक्ता आहे. सुवर्णकाळात पण तुमच्यासाठी राजवाडे बांधतात. इथेही मी तुम्हाला नवीन
इमारती मध्ये ठेवतो. मी तर जुन्यात च राहतो. हे एक अद्भुत बाबा आहेत. हे पिता पण
आहेत आणि पाहुणे पण आहेत. मुंबईला गेलात तर पाहुणे म्हणतील. खरे तर हा सर्व जगाचा
खूप मोठा पाहुणा आहे . त्यांना येण्या-जाण्यास वेळ लागत नाही. पाहुणेही अप्रतिम
आहेत. दूरदेशाचे राहणारे परक्या देशात आले आहेत. तर पाहुणे झाले ना. तुम्हाला
फुलांसारखे बनवून, वारसा देण्यासाठी आले आहेत. कवडी पासून हिऱ्यासारखे बनवण्यासाठी
आले आहेत, अच्छा.
गोड गोड खुप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. अविनाशी
ज्ञान रत्नांची धारणा करून, शंख-ध्वनी करायचा आहे. हे ज्ञानाचे रत्न, सर्वांना
द्यायचे आहेत.
2. सत्य आणि
असत्य समजून सत्याचे पालन करायचे आहे. कोणतेही चुकीचे काम करायचे नाही.
वरदान:-
बुद्धीला
व्यस्त ठेवण्याच्या विधीने, व्यर्थ नष्ट करणारे सदैव सामर्थ्यवान भव.
नेहमी समर्थ म्हणजेच
शक्तीशाली तेच बनतात, जे बुद्धीला व्यस्त ठेवण्याची पद्धत अवलंबतात. व्यर्थला नष्ट
करून समर्थ बनण्याचा सोपा मार्ग म्हणजे, सर्व वेळ व्यस्त राहणे. त्यामुळे दररोज
सकाळी शारीरिक दिनचर्याप्रमाणेच आपली बुद्धी व्यस्त ठेवण्यासाठी वेळापत्रक बनवा,
जेणेकरुन अशा वेळी आपल्या बुद्धीमध्ये, या शक्तिशाली विचाराने, व्यर्थला नष्ट कराल.
तुम्ही व्यस्त राहिलात, तर माया दुरून च परत जाईल.
बोधवाक्य:-
दु:खाचा संसार
विसरायचा असेल, तर सदैव भगवंताच्या प्रेमात हरवून जा.