05-09-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.03.88  ओम शान्ति   मधुबन


" नविन दुनियेच्या चित्राचा आधार-वर्तमान श्रेष्ठ ब्राह्मण जीवन"


आज विश्व रचनाकार,विश्वाचे श्रेष्ठ भाग्य बनवणारे बापदादा आपल्या,श्रेष्ठ भाग्याचे चित्र-स्वरुप मुलांना पाहत आहेत.तुम्ही सर्व ब्राह्मण आत्मे विश्वाच्या श्रेष्ठ भाग्याचे चित्र आहात.ब्राह्मण जीवनाच्या चित्राद्वारे,भविष्याचे श्रेष्ठ भाग्य स्पष्ट दिसून येते.ब्राह्मण जीवनाचे प्रत्येक श्रेष्ट कर्म,भविष्य श्रेष्ठ फळाचा अनुभव करवते.ब्राह्मण जीवनाचे श्रेष्ठ संकल्प,भविष्याचे श्रेष्ठ संस्कार स्पष्ट करतात.तर वर्तमान ब्राह्मण जीवन,भविष्य भाग्यवान संसाराचे चित्र आहे.बापदादा भविष्याचे चित्र असणाऱ्या मुलांना पाहून आनंदित होतात.चित्र पण तुम्ही आहात, भविष्याचे भाग्य आधार मुर्त पण तुम्हीच आहात.तुम्ही श्रेष्ठ बनतात, तर दुनिया पण श्रेष्ठ बनते.तुमच्या उडत्या कलेच्या स्थिती द्वारे,विश्वाची पण उडती कला,म्हणजे प्रगती होत राहते.तुम्ही ब्राह्मण आत्मे वेळे प्रमाण जशी स्थिती बनवता,तसेच विश्वाच्या स्थितीचे पण परिवर्तन होत राहते.तुमची सतोप्रधान स्थिती आहे,तर विश्वाची पण सतोप्रधान अवस्था आहे,सुवर्ण युग आहे.तुम्ही बदलतात,तर दुनिया पण बदलते, इतके तुम्ही आधारमुर्त आहात. वर्तमान वेळ बाबांच्या सोबत खूप श्रेष्ठ भूमिका वठवत आहात. सर्व कल्पामध्ये सर्वात मोठी विशेष भूमिका वठवत आहात.बाबांच्या सोबत सहयोगी बनुन,विश्वाच्या प्रत्येक आत्म्याच्या,अनेक जन्माच्या आशा पूर्ण करत आहात.बाबा द्वारे प्रत्येक आत्म्याला मुक्ती किंवा जीवनमुक्तीचा अधिकार मिळवण्याच्या निमित्त बनले आहात. सर्वांची इच्छा पूर्ण करणारे, बापसमान कामधेनु आहात,श्रेष्ठ इच्छा पूर्ण करणारे आहात.असे प्रत्येक आत्म्याला इच्छा मात्र अविद्याच्या स्थितीचा अनुभव करवता,जे अर्धाकल्पा साठी न भक्त आत्म्याला,न जीवनमुक्त अवस्था असणाऱ्या, आत्म्यांना कोणतीही इच्छा राहत नाही.एका जन्माची इच्छा पूर्ण करणारे नाहीत परंतु अनेक जन्मासाठीच्या इच्छा मात्रम अविद्याचा अनुभव करवणारे आहात.जसे बाबांचे सर्व भांडार, सर्व खजाने नेहमी भरपूर आहेत,अप्राप्ती चे नाव रूप नाही.असे बाप समान नेहमी आणि सर्व खजान्या द्वारे भरपूर आहात. ब्राह्मण आत्मा म्हणजे प्राप्ती स्वरूप आत्मा,संपन्न आत्मा.जसे बाबा नेहमी प्रकाश आणि शक्ती स्तंभ आहेत,तसे ब्राह्मण आत्मे पण बाप समान प्रकाश स्तंभ आहात म्हणून प्रत्येक आत्म्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त आहात.जसे बाबांचे प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल,प्रत्येक कर्म, प्रत्येक वेळे मध्ये दाता आहेत,वरदाता आहेत,असेच तुम्ही ब्राह्मण आत्मे पण दाता मास्टर वरदाता आहात. अशा ब्राह्मण जीवनाचे चित्र आहात. कोणतेही चित्र बनवतात तर त्यामध्ये विशेष सर्व विशेषता दाखवतात ना.असेच वर्तमान वेळेत,ब्राह्मण जीवनाच्या चित्राच्या,सर्व विशेषता स्वतःमध्ये भरल्या आहेत? मोठ्यात मोठे चित्रकार तुम्ही आहात,जे आपले चित्र बनवत आहात.आपले चित्र बनवतात तर, विश्वाचे चित्र बनत जाते,असा अनुभव करतात ना. काहीजण विचारतात की नवीन दुनिया मध्ये काय असेल? नवीन दुनियेचे चित्र तुम्ही आहात.आपल्या जीवना द्वारे भविष्य स्पष्ट होते.या वेळेत आपल्या चित्रामध्ये पाहा, नेहमी असेच चित्र बनवले आहे,जे कोणीही पाहतील तर नेहमी साठी प्रसन्नचित्त बनतील.कोणीही अशांत असणारे,तुमचे चित्र पाहून अशांतीला विसरतील आणि शांतीच्या लाटेमध्ये मग्न होतील. अप्राप्ती स्वरूप आत्मे,प्राप्तीचा अनुभव करतील.भिकारी बनून येतील आणि भरपूर बनून जातील.तुमचा हर्षित चेहरा पाहून,मनाचे किंवा डोळ्याचे रडणे विसरतील आणि आनंदी होतील. तुम्ही लोक बाबांना म्हणतात ना, हसण्यासाठी शिकवले,तर तुमचे काम आहे,रडण्यापासून सोडवणे आणि आनंदी बनवणे,हसणे शिकवणे.तर असे चित्र ब्राह्मण जीवनाचे आहे ना.नेहमी हे स्मृतीमध्ये ठेवा,आम्ही आधार मूर्त, पाया आहोत.कल्पवृक्षाच्या चित्रा मध्ये पहा,ब्राह्मण कुठे बसले आहेत? पायांमध्ये,खोडामध्ये बसले आहेत ना.ब्राह्मण जीवनाचा पाया मजबूत आहे,तेव्हाच अर्धाकल्प अचल-अडोल राहतात.साधारण आत्मे नाहीत,आधारमुर्त आहात, पाया आहात.

या वेळेची, तुमची संपूर्ण स्थिती, सतयुगाच्या १६ कला संपूर्ण स्थितीचा आधार आहे.आत्ता तुमचे एकमत तेथील एका राज्याचे आधारमुर्त आहे.येथील सर्व खजाण्याची संपन्नता,ज्ञान,गुण, शक्ती,सर्व खजाने,तेथील संपन्नतेचा आधार आहे.येथील देहाचे आकर्षणा पासून वेगळेपण तेथील निरोगीपणाचा आधार आहे.अशरीरी पणाची स्थिती,निरोगी पणा आणि दीर्घायुष्याचे आधार स्वरूप आहे. येथील बेफिक्र बादशाही पणाचे जीवन,तेथीलं प्रत्येक क्षणाचे, मनाच्या आनंदाचे जीवन,या स्थितीच्या प्राप्तीचे आधार बनते. एक बाबा,दुसरे कोणी नाही,येथील ही अखंड अटल साधना,तेथील अखंड अटल,अखुट,निर्विघ्न साधनांच्या प्राप्तीचा आधार बनते. येथील लहानसा संसार बापदादा आणि मातपिता,भाऊ-बहीण,तेथील लहानशा संसाराचे आधार बनतात. येथील एक मात पिताच्या संबंधाचे संस्कार,तेथे पण एकाच विश्वाचे, विश्व महाराजा,विश्व महाराणीला, मातपित्याच्या रूपामध्ये अनुभव करतात.येथील स्नेहपूर्ण परिवाराचे सबंध,तेथे पण राजा आणि प्रजा बनतात परंतु प्रजा पण स्वत:ला परिवारातील सदस्य समजतात, स्नेहाची जवळीकता परिवारामध्ये राहते.खुशाल वेगवेगळे पद असतात परंतु स्नेहाचे पद आहेत,संकोच आणि भितीचे पद नाहीत.तर भविष्याचे चित्र तुम्ही आहात ना.या सर्व गोष्टी आपल्या चित्रांमध्ये तपासून पहा, किती श्रेष्ठ चित्र बनून तयार झाले आहे.आणखी काही रेषा,काही चित्र तयार करायचे राहीले तर नाही ना? हुशार चित्रकार आहात ना.

बापदादा हेच पाहू इच्छितात की,प्रत्येकाने किती चांगले चित्र तयार केले आहे.दुसऱ्यांची तक्रार तर करू शकत नाही की,यांनी हे ठीक नाही केले म्हणून असे झाले,आपले चित्र स्वतःच बनवायचे आहे.बाकी सर्वगोष्टी तर बापदादा पासून मिळत आहेत,त्यामध्ये तर काहीच कमी नाही.येथे पण खेळ शिकवतात ना, प्रत्येक गोष्ट खरेदी करून परत बनवतात.बनवणाऱ्यांच्या वरती असते,जितके पाहिजे तेवढे घ्या, घेणारे फक्त घेऊ शकतात.बाकी मोकळा बाजार आहे,बापदादा हा हिशोब ठेवत नाहीत की,दोन द्यायचे आहेत की, चार द्यायचे आहेत. सर्वश्रेष्ठ चित्र बनवले आहे ना.नेहमी स्वतःला असे समजा की आम्ही भविष्याच्या भाग्याचे चित्र आहोत, असे समजून प्रत्येक पाऊल टाकत राहा.स्नेह असल्यामुळे सहयोगी पण आहात आणि सहयोगी असल्यामुळे बाबांचा सहयोग प्रत्येक आत्म्याला आहे.असे नाही की,काही आत्म्यांना जास्त सहयोग आहे आणि कोणाला कमी आहे,नाही.बाबांचा सहयोग प्रत्येक आत्म्याला,एकाच्या मोबदल्यात मध्ये पदमगुणा आहे.जे पण सहयोगी आत्मे आहेत,ते सर्व बाबांचा सहयोग नेहमीच प्राप्त करतात आणि जोपर्यंत आहेत,तोपर्यंत सहयोग आहेच.जेव्हा बाबाचा सहयोग आहे, तर प्रत्येक कार्य झालेले आहेच,असा अनुभव करतात पण आणि करत चला. कोणतेही कठीण कार्य नाही, कारण भाग्यविधाता द्वारा भाग्याच्या प्राप्तीचा आधार आहे.जेथे भाग्य असते,वरदान असते,तेथे कठीण काहीच नसते.

ज्यांचे चांगले चित्र असते,त्यांचा जरूर प्रथम क्रमांक येईल.तर सर्व प्रथम विभागामध्ये येणारे आहेत ना, क्रमांक एकच असेल परंतु प्रथम विभाग तर आहे ना,तर कशामध्ये यायचे आहे.प्रथम विभाग सर्वा साठी आहे,काहीतरी करणे,चांगले आहे ना. बाप दादा तर सर्वांना संधी देतात मग ते भारतवासी असतील किंवा दुहेरी परदेशी असतील,कारण आत्ता अधिकृत पणे परिणाम घोषित झालेला नाही.कधी चांगले परिणाम घोषित होण्याच्या अगोदरच सर्वांना समजतात की, हे पद मिळेल, म्हणून जे पण पद घ्यायचे असेल आत्ताच सुवर्णसंधी आहे.परत बोर्ड लावला जाईल,आत्ता जागा नाही.या पदाच्या जागा पूर्ण झाल्या,म्हणून खूप पुरुषार्थ करा.पळू नका उडत राहा,पळणारे तर खाली राहतील, उडणारे तर उडत जातील.उडत चला म्हणजे प्रगती करा आणि दुसऱ्यांची पण प्रगती करत चला,अच्छा.

चहूजूच्या सर्वश्रेष्ठ भाग्याचे श्रेष्ठ चित्र स्वरूप महान आत्म्यांना,नेहमी स्वतःला विश्वाचे आधारमुर्त अनुभव करणार्‍या आत्म्यांना,नेहमी स्वतःला प्राप्ती स्वरूप अनुभूती द्वारा,नेहमीच दुसर्यांना पण प्राप्ती स्वरूप अनुभव करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना,नेहमी बाबांचा स्नेह आणि सहयोगाचे पदम गुण आधिकार प्राप्त करणाऱ्या पुज्य ब्राह्मण,सो देव आत्म्यांना,बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. व्यक्तिगत वार्तालाप:- बाबांचा हात नेहमीच डोक्यावर आहे, असा अनुभव करतात ना? श्रेष्ठ मतच हात आहे.जेथे प्रत्येक मुलामध्ये बाबांचा हात आणि स्पष्ट मत आहे,तेथे श्रेष्ठ मताद्वारे श्रेष्ठ कार्य सतत होत राहते. नेहमी हाताच्या स्मृती द्वारे समर्थ बनून पुढे जात राहा.बाबांचा हात नेहमीच पुढे जाण्याचा अनुभव स्वतः करवतो म्हणून या श्रेष्ठ भाग्याला प्रत्येक कार्यामध्ये स्मृतीमध्ये ठेवून पुढे जात राहा.नेहमी हात आहे, नेहमी विजयी आहात.

(१) प्रश्न:-सहजयोगी नेहमी राहावे, याची सहज विधी कोणती आहे?

उत्तर:- बाबाच संसार आहे,या स्मृतीमध्ये राहा,कारण सर्व दिवस संसारामध्ये बुद्धी जाते.जेव्हा बाबाच संसार आहे,तर बुद्धी कुठे जाईल? संसारा मध्ये जाईल ना,जंगलामध्ये तर नाही जाणार?तर जेव्हा बाबाच संसार झाले तर, सहज योगी बनाल, नाहीतर खूप कष्ट करावे लागतील- येथून बुद्धी योगा दूर करा,तेथे जोडा.

नेहमी बाबाच्या स्नेहा मध्ये सामावून राहा,तर ते विसरणार नाहीत,अच्छा. अव्यक्त बापदादांशी दुहेरी परदेशी,भाऊ-बहिणींचा वार्तालाप:-

दुहेरी परदेशी मध्ये सेवेचा उमंग उत्साह चांगला आहे,म्हणून वृध्दी पण चांगली करत आहेत.परदेशाच्या सेवेमध्ये १४ वर्षांमध्ये वृद्धी चांगली झाली आहे.लौकिक आणि अलौकिक दुहेरी कार्य करत असताना पुढे जात आहात.दुहेरी कार्यामध्ये वेळ पण लावतात आणि बुद्धीची,शरीराची शक्ती पण लावतात.ही पण बुद्धीची कमाल आहे.लौकिक कार्य करत सेवेमध्ये पुढे जाणे,हे पण हिम्मतीचे काम आहे,अशी हिम्मत ठेवणाऱ्या मुलांना बापदादा नेहमी प्रत्येक कार्यामध्ये मदत करत राहतात.जितकी हिम्मत तेवढी पदमगुणा बाबा ची मदत आहेच,परंतु दोन्ही भूमिका वठवत प्रगती करत आहेत,हे पाहून बापदादा नेहमी मुलांना पाहून आनंदीत होतात.माये पासून तर मुक्त आहात ना? जेव्हा योगयुक्त आहात, तर स्वतःच मायेपासून मुक्त आहात.योगयुक्त नाहीत तर माये पासून मुक्त नाहीत.मायेला पण ब्राह्मण प्रिय वाटतात.जे पैलवान असतात,त्यांना पैलवानशी कुस्ती करण्यामध्ये मजा येते.माया पण शक्तिशाली आहे आणि तुम्ही पण सर्वशक्तीमान आहात,तर मायेला सर्वशक्तिमानच्या सोबत खेळ करणे चांगले वाटते.आता तर मायेला चांगल्याप्रकारे जाणले आहे ना,माया कधी- कधी नव-नविन रूपांमध्ये येते. ज्ञानसंपन्नचा अर्थच आहे,बाबाला जाणने,रचनेला पण जाणने आणि मायेला पण जाणने.जर रचनाकार आणि रचनेला जाणले आणि मायेला नाही जाणले तर ज्ञानसंपन्न झाले नाही.

कधी कोणत्या गोष्टींमध्ये तन कमजोर होईल,किंवा कार्याचे ओझे जास्त होईल परंतु मनाने कधी थकायचे नाही.तनाची थकावट मनाच्या खुशीने नष्ट होते,परंतु मनाची थकावट,शरीराच्या थकान वाढवते.तर मन कधी थकू द्यायचे नाही.जेव्हा थकतात,तर फक्त सेकंदामध्ये बाबांच्या वतन मध्ये जावा,तर थकान नष्ट होईल.जर मनाला थकण्याची सवय झाली तर,ब्राह्मण जीवनामध्ये उमंग उत्साहचा जो अनुभव व्हायला पाहिजे,तो होणार नाही.चालत तर आहोत परंतु चालवणारा चालवत आहे,असा अनुभव होणार नाही. कष्टा द्वारे चालत आहोत,तर जेव्हा कष्टाचा अनुभव होईल,परत थकावट पण होईल.नेहमी समजा कर्ता-करविता करवत आहे, चालवणारा चालवत आहे.

वेळ आणि शक्ती दोन्ही प्रमाणे सेवा करत चला.सेवा कधी राहू शकत नाही,आज नाही तर,उद्या होईल.जर खऱ्या मनापासून,खऱ्या प्रेमाने जितकी सेवा करू शकतात,तेवढी करतात,तर बापदादा कधीच तक्रार करणार नाहीत की,इतके काम केले,इतके केले नाही,उलट शाबासकी मिळेल.वेळे प्रमाण,शक्ती प्रमाण,खऱ्या मनापासून सेवा करतात,तर खऱ्या मनावरती साहेब खूष होतात.जर आपले काही कार्य शिल्लक राहील, तर बाबा कुठून ना कुठून ते पूर्ण करतील.जी सेवा ज्या वेळेत व्हायला पाहिजे,ती कोणत्याही प्रकारे होत राहील,सेवा राहू शकत नाही.कोणत्याना कोणत्या,आत्म्याला त्याची जाणीव करून,बुध्दीला स्पर्श करून,बापदादा आपल्या मुलांचे सहयोगी बनतात.योगी मुलांना सर्व प्रकारचा सहयोगा वेळेनुसार मिळतोच परंतु कोणाला मिळेल? खऱ्या मनाच्या,खऱ्या सेवाधारी मुलांना.तर सर्व खरे सेवाधारी आहात ना.साहेब आमच्यावरती खुश आहेत,असा अनुभव करतात ना, अच्छा.

वरदान:-
एक बाबांच्या प्रेमामध्ये मगन राहून नेहमी चढते कलेचा अनुभव करणारे, सफलतामुर्त भव.

सेवेमध्ये किंवा स्वतःच्या चढती कलांमध्ये सफलतेचा मुख्य आधार आहे,एका बाबांशी अटुट प्रेम.बाबांशिवाय काहीच दिसून यायला नको.संकल्पा मध्ये बाबा, बोल मध्ये पण बाबा,कर्मामध्ये पण बाबांची सोबत.अशी प्रेमळ आत्मा आत्मा एक शब्द पण बोलतील,तर त्यांच्या स्नेह्याच्या वचनामुळे दुसऱ्या आत्म्याला पण स्नेहा मध्ये बांधतात. अशा प्रेमळ आत्म्याचा एक बाबा शब्दच जादूचे काम करतो.ते आत्मिक जादूगर बनतात.

सुविचार:-
योगी तू आत्मा तेच आहेत,जे अंतर्मुखी बनून,प्रकाश आणि शक्ती रूपामध्ये स्थिर राहतात.