05-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,एकांत मध्ये बसून असा अभ्यास करा,ज्यामुळे अनुभव होईल की,मी शरीरापासून वेगळी आत्मा आहे,यालाच जिवंतपणी मरणे म्हटले जाते"

प्रश्न:-
एकांतचा अर्थ काय आहे? एकांत मध्ये बसून तुम्हाला कोणता अनुभव करायचा आहे?

उत्तर:-
एकांत चा अर्थ आहे, एकाच्या आठवणीमध्ये या शरीराचा अंत व्हावा,म्हणजे एकांत मध्ये बसून असा अनुभव करा की,मी आत्मा या शरीराला सोडून, बाबांजवळ जात आहे.कोणाची पण आठवण यायला नको.बसल्या बसल्या अशरिरी बना.जसे की या शरीरा पासून वेगळे झालो आहोत. बस मी आत्मा आहे,शिव बाबांचा मुलगा आहे.या अभ्यासामुळे शरिराचे भान नष्ट होत जाईल.

ओम शांती।
बाबा मुलांना प्रथम हे समजवतात की,गोड गोड मुलांनो जेव्हापण येते बसतात,स्वत:ला आत्म समजून,बाबांची आठवण करत राहा,बाकी दुसरीकडे बुद्धी योग जायला नको.हे तुम्ही जाणतात आम्ही आत्मा आहोत.मी आत्मा या शरिराद्वारे भूमिका वठवत आहे,अभिनय करत आहे.आत्मा अविनाशी असून शरिर तर विनाशी आहे.तर तुम्हा मुलांना देही अभिमानी बनून,बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.आम्ही आत्मा आहोत,पाहिजे तर या कर्मेंद्रिया द्वारे काम करून घ्या, किंवा घेऊ नका.स्वतःला या शरीरापासून वेगळे समजायचे आहे. बाबा म्हणतात,स्वतःला शरिरा पासून वेगळे समजायचे आहे.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा. देहाला विसरत जावा,मी आत्मा स्वतंत्र आहे.आम्हाला एक बाबा शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करायची नाही.जिवंतपणी मृत अवस्थेत म्हणजे अशरीरी अवस्थेमध्ये राहायचे आहे.मज आत्म्याचा योग एक बाबासोबत राहायला हवा.बाकी तर दुनिये पासून,घरापासून मेलेले आहात. असे म्हणतात तुम्ही मेले तर सर्व दुनिया मेल्या सारखीच आहे.आता तुम्हाला जिवंतपणी मारायचे आहे. आम्ही आत्मा शिवबाबांचे मुलं आहोत,या शरीराचे भान नष्ट करत राहायचे आहे.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, शरिराचे भान सोडून द्या.हे जुने शरीर आहे ना,जुन्या गोष्टींना सोडून दिले जाते.स्वतःला अशरीरी समजा.आता तुम्हाला बाबांची आठवण करत करत बाबांच्या जवळ जायचे आहे.असे करत करत परत तुम्हाला सवय लागेल.आता तुम्हाला घरी जायचे आहे.परत या जुन्या दुनियेची आठवण का करायची?एकांत मध्ये बसून स्वतःसोबत कष्ट घ्यायचे आहेत.भक्ती मार्गामध्ये पण एका खोलीमध्ये बसून,माळ जपत राहतात,पूजा करत राहतात. तुम्हाला पण एकांत मध्ये बसून हे प्रयत्न करायचे आहेत,तर सवय लागेल.तुम्हाला मुखाद्वारे काहीच बोलायचे नाही.यामध्ये बुद्धीची गोष्ट आहे.शिव बाबा शिकवणारे आहेत. त्यांना तर पुरुषार्थ करायचा नाही. हे बाबा(ब्रह्मा)करतात,ते परत तुम्हा मुलांना समजवतात.जितके शक्य आहे,एकांत मध्ये बसून विचार करा, आता आम्हाला घरी जायचे आहे. या शरीराला तर येथेच सोडायचे आहे.बाबांची आठवण केल्यामुळेच विकर्म पण विनाश होतील आणि आयुष्य पण वाढेल.मनामध्ये हे चिंतन चालायला पाहिजे.बाकी काहीच बोलायची आवश्यकता नाही.भक्तिमार्गा मध्ये पण ब्रह्म तत्व किंवा कोणी शिवाची पण आठवण करतात परंतु ती आठवण काही अर्थ सहित नाही.बाबांचा परिचयच नाही,तर अर्थसाहित आठवण कसे करू शकतील.तुम्हाला आत्ता बाबांचा परिचय मिळाला आहे. सकाळी सकाळी उठून एकांत मध्ये बसून स्वत:सोबत ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आहेत.विचार सागर मंथन करा आणि बाबांची आठवण करा.बाबा आम्ही आपल्या खऱ्या गोदीमध्ये आम्ही आलो की आलो. ती आत्मिक आठवण आहे.तर अशा गोष्टी स्वतः सोबत करायला पाहिजेत.बाबा आले आहेत.बाबा कल्प-कल्प येऊन आम्हाला राजयोग शिकवतात.बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा.स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे.बाबामध्ये सर्व चक्राचे ज्ञान आहे ना,ते परत तुम्हाला देतात.तुम्हाला त्रिकालदर्शी बनवत आहेत.तिन्ही काळाला म्हणजेच आदी मध्य अंतला तुम्हीच जाणतात.शिव पिता परमात्मा आहेत.त्यांना शरीर तर नाही.या शरिरा मध्ये बसून,तुम्हाला समजवत आहेत.ही आश्र्चर्यकारक गोष्ट आहे. भागीरथा वरती विराजमान होतात,तर जरूर दुसरी आत्मा आहे.अनेक जन्माच्या शेवटचा जन्म यांचा आहे.क्रमांक एकचे पावन ते आहेत,परत क्रमांक एकचे पतित बनतात.ते स्वतःला भगवान किंवा विष्णू इत्यादी तर म्हणत नाहीत.येथे एक पण आत्मा पावन नाही, सर्व पतित आहेत.तर बाबा मुलांना समजावतात,अशा प्रकारे विचार सागर मंथन करा,तर तुम्हा मुलांना खूप खुशी होईल,यामध्ये एकांत पण जरूर पाहिजे.एकाच्या आठवणीमध्ये शरिराचा अंत होणे, याला एकांत म्हटले जाते.ही शरीररूपी कातडी सुटून जाईल. संन्यासी पण ब्रह्मच्या आठवणीमध्ये किंवा तत्वाच्या आठवणीमध्ये राहतात,त्या आठवणी मध्ये राहत राहत शरीराचे भान नष्ट होते.बस आम्हाला ब्रह्ममध्ये विलीन व्हायचे आहे.असे तपस्या मध्ये बसतात. तपस्या करत करत बसूनच शरीर सोडतात.भक्ती मध्ये मनुष्य तर अनेक धक्के खात राहतात.यामध्ये धक्के खाण्याची गोष्टच नाही. आठवणी मध्येच राहायचे आहे. अंत काळात कोणाची आठवण यायला नको.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहायचे आहे.बाकी वेळ काढायचा आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड असते ना.हे शिक्षण आहे स्वतःला आत्मा न समजल्यामुळे पिता,शिक्षक, गुरु सर्वांना विसरतात.एकांत मध्ये बसून असे विचार करायचे आहेत.गृहस्थीच्या घरामध्ये वातावरण ठीक राहत नाही.जर वेगळा प्रबंध असेल तर एका खोलीमध्ये एकांत मध्ये बसा. मातांना दिवसा पण वेळ मिळतो. मुलं इत्यादी शाळेमध्ये जातात,तर जेवढा वेळ मिळेल,प्रयत्न करत राहा.तुम्हाला तर एकच घर आहे, बाबांना तर अनेक दुकानं आहेत, आणखी वृद्धी होत जाते.मनुष्य कामधंद्याची चिंता करतात,तर झोप पण उडून जाते.हा पण व्यापार आहे ना.किती मोठे सराफ आहेत.किती मोठा मट्टा सट्टा करतात.जुने शरीर घेऊन नवीन देतात,सर्वांना रस्ता दाखवतात. हा पण धंदा करायचा आहे.हा व्यापार तर खूप मोठा आहे.व्यापार्‍यांना, व्यापाराचाच विचार राहतो.बाबा (ब्रह्मा) अशा प्रकारे अभ्यास करत राहतात,परत सांगतात,असे करा. जितके तुम्ही बाबाच्या आठवणीमध्ये राहाल,तर स्वतः झोप उडून जाईल.कमाई करण्यामध्ये आत्म्याला खूप आनंद होईल.कमाई करण्यासाठी मनुष्य रात्री पण जागरण करतात.धंद्याच्या मौसमा मध्ये दुकानदार रात्रभर दुकान उघडून बसतात.तुमची कमाई तर रात्रीला आणि सकाळी पण खूप चांगली होते.स्वदर्शन चक्रधारी बनाल तर,त्रिकालदर्शी पण बनाल.२१ जन्मासाठी धन जमा होते.मनुष्य सावकार बनण्यासाठीच पुरुषार्थ करत राहतात.तुम्ही बाबांची आठवण कराल,विकर्म विनाश होऊन शक्ती मिळेल.आठवणीची यात्रा करणार नाहीत, तर खूप नुकसान होईल, कारण डोक्यावरती पापाचे ओझे खूप आहे.आता जमा करायचे आहे,एकाची आठवण करायची आहे आणि त्रिकालदर्शी बनायचे आहे.हे अविनाशी धन अर्ध्या कल्पा साठी एकत्र करायचे आहेत.हे तर खूप किमती आहेत.विचार सागर मंथन करून रत्न शोधायचे आहेत. बाबा जसे स्वतः करतात,मुलांना पण युक्ती सांगतात. बाबांना मुलं म्हणतात, मायेचे वादळ तर खूप येतात.

बाबा म्हणतात,जेवढे शक्य होईल आपली कमाई करायची आहे,हेच कामांमध्ये येईल.एकांता मध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. वेळ आहे तर मंदिरामध्ये जाऊन खूप सेवा करू शकतात.बैज जरूर लावलेला पाहिजे.तर सर्व समजतील,हे आत्मिक मिलिटरी आहेत.तुम्ही लिहितात पण आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. आदी सनातन देवी-देवता धर्म होता, आता नाही,परत स्थापना करतात. लक्ष्मीनारायणा सारखे बनणे मुख्य उद्देश आहे ना. कधी यांचे ट्रान्सलेट चे चित्र बॅटरी सहित घेऊन,परिक्रम देऊन,सर्वांना सांगा की,यांचे राज्य परत स्थापन होत आहे.हे चित्र सर्वात उत्तम आहे.हे चित्र खूप प्रसिद्ध होईल.लक्ष्मीनारायण एक तर नव्हते,त्यांची राजधानी होती ना.हे स्वराज्य स्थापन करत आहेत. आता बाबा म्हणतात,बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील.ते म्हणतात आम्ही गीतेचा सप्ताह साजरा करू.हे सर्व नियोजन कल्पा पूर्वीप्रमाणेच बनत आहे.परिक्रमा मध्ये चित्र घ्यायला लागेल.यांना पाहुन सर्व खुश होतील. तुम्ही म्हणाल बाबांची आणि वारशाची आठवण करा.हे गीतेचे अक्षर आहेत ना.भगवान शिव बाबा आहेत.ते म्हणतात माझी आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.८४ च्या चक्राची आठवण कराल,तर असे बनाल.ईश्वरी साहित्य पण तुम्ही भेट देत राहा.शिवबाबांचा भंडारा तर नेहमी भरपूर आहे.पुढे चालून खूप सेवा होत राहील.मुख्य उद्देश पण खूप स्पष्ट आहे.एक राज्य,एक धर्म होता.खुप सावकार होते.मनुष्याची इच्छा आहे,एक राज्य ,एक धर्म व्हावा.मनुष्य ज्याची इच्छा करतात,त्याची लक्षणं दिसून येतात,परत समजतील हे तर बरोबर म्हणत आहेत.१०० % पवित्रता, सुख-शांतीचे, राज्य परत स्थापन करत आहेत,परत तुम्हाला खुशी पण राहील.आठवणीमध्ये राहिल्यामुळे ज्ञानाचा बाण लागेल. शांती मध्ये राहून थोडेसे बोलायचे आहे,जास्ती आवाज नको.गीत कविता इत्यादी काहीच बाबा पसंत करत नाहीत.बाहेरच्या मनुष्यांची स्पर्धा करायची नाही.तुमची गोष्टच वेगळी आहे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे,बस.सुविचार पण चांगले हवेत,जे मनुष्य वाचून जागृत होतील.मुलांची वृद्धी होत राहील. खाजना तर भरपूर राहतो ना. मुलांना दिलेले परत मुलांच्या कामांमध्ये येते.बाबा तर पैसे घेऊन येत नाहीत.तुमच्या गोष्टी तुमच्या कामांमध्ये येतात.भारतवासी जाणतात,आम्ही खूप सुधारणा करत आहोत,पाच वर्षांमध्ये एवढे अन्नधान्य होईल,ज्यामुळे अन्नधान्याची टंचाई कधीच होणार नाही आणि तुम्ही जाणतात अशी परिस्थिती येईल,जे खाण्यासाठी अन्न पण मिळणार नाही.असे नाही अन्नधान्य काही स्वस्त होत राहील. तुम्ही मुलं जाणता,आम्ही २१ जन्मासाठी आपले राज्य भाग्य घेत आहोत.थोडे फार कष्ट तर सहन करायचे आहेत.असे म्हटले जाते खुशी सारखा खुराक नाही.अतिंद्रिय सुख गोपींचे गायन केलेले आहे. अनेक मुलं येत राहतील,जे पण कलम लागायचे आहेत,ते लागत राहील.मनुष्य वृक्षाची वृध्दी तर येथेच होणार आहे.स्थापना होत आहे.दुसऱ्या धर्मामध्ये असे होत नाही.ते तर वरून येत राहतात.हे तर जसेकी झाडाची स्थापन झालेली च आहे.यामध्ये क्रमानुसार येत जातील,वृद्धी होत राहिल. काहीच कष्ट नाहीत.त्यांना तर परमधाम वरून येऊन भूमिका वठवायची आहे.यामध्ये महिमाची काय गोष्ट आहे.धर्म स्थापकाच्या नंतर येत राहतात.ते सदगतीचे काय ज्ञान देऊ शकतील? काहीच नाही. येथे तर शिवपिता भविष्य धर्माची स्थापना करत आहेत.संगम युगामध्ये नवीन कलम लावतात ना. प्रथम रोपांना कुंडीमध्ये लावून परत खाली लावतात,वृद्धी होत जाते. तुम्हीपण झाडाचे रोप लावत आहात,परत सतयुगा मध्ये वृद्धी होऊन,राज्य भाग्य मिळवाल.तुम्ही नवीन दुनियाची स्थापना करत आहात.मनुष्य समजतात कलियुग समाप्त होण्यासाठी अनेक वर्ष आहेत, कारण ग्रंथांमध्ये लाखो वर्ष लिहिले आहेत.ते समजतात, कलियुगामध्ये आणखी चाळीस हजार वर्ष आहेत,परत बाबा येऊन नवीन दुनियेची स्थापना करतील. काहीच समजत नाहीत.महाभारत लढाई आहे,भगवान पण जरूर असतील.तुम्ही सांगतात,कृष्ण तर नव्हते.बाबांनी समजवले आहे, कृष्ण तर ८४ जन्म घेतात.एका चे चरित्र दुसऱ्याशी मिळू शकत नाही. येथे परत कृष्ण कसे येतील. कोणीही या गोष्टीवरती विचार करत नाहीत.तुम्ही समजता कृष्ण स्वर्गाचे राजकुमार होते,परत द्वापर मध्ये कसे येतील.या लक्ष्मीनारायणच्या चित्राला पाहिल्या मुळेच समजून येते. शिव बाबा हा वारसा देत आहेत.सतयुगाची स्थापना करणारे बाबाच आहेत.हे सृष्टिचक्र, कल्पवृक्ष इत्यादी चे चित्र खूप अनमोल आहेत.एक दिवस तुमच्याजवळ हे सर्व चित्र ट्रान्स लाईटचे बनतील,परत सर्व मागतील,आम्हाला असे चित्र पाहिजेत.या चित्राद्वारे परत विहंग मार्गाची सेवा होईल.तुमच्याजवळ मुलं इतके येतील,त्यांना ज्ञान देण्यासाठी वेळ मिळणार नाही, खूप खुशीऔ होईल.दिवसेंदिवस तुमची शक्ती वाढत जाईल.वैश्विक नाटका नुसार,जे फुल बनणारे असतील, त्यांना जाणीव होत राहिल.तुम्हा मुलांना असे म्हणावे लागणार नाही की,बाबा यांच्या बुध्दीचे कुलुप उघडा.बाबा बुद्धीचे कुलुप उघडत नाहीत.वेळेनुसार सर्वांच्या बुद्धीमध्ये ज्ञान येईल.बाबा तर रस्ता दाखवतील ना.अनेक मुली,बाबांना लिहितात,आमच्या पतीच्या बुद्धीचे कुलुप उघडा.असे सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडतील,तर सर्वच स्वर्गामध्ये एकत्र येतील. राजयोगाच्या अभ्यासाचे कष्ट घ्यायचे आहेत.तुम्ही ईश्वरीय सेवाधारी आहात ना.खरी-खुरी गोष्ट बाबा अगोदरच सांगतात की,काय करायचे आहे?असे चित्र घेऊन जावे लागतील.शिडीचे चित्र पण घेऊन जावे लागेल.वैश्विक नाटका नुसार स्थापना तर होणारच आहे.बाबा सेवेसाठी सूचना देतात,त्याकडे लक्ष द्यायचे आहे.बाबा म्हणतात बैज पण वेगवेगळ्या प्रकारचे, लाखो बनवत राहा.रेल्वेचे तिकीट घेऊन शंभर मैलापर्यंत सेवा करून या.एका डब्यांमधून, दुसऱ्या-तिसऱ्या,डब्यांमध्ये सहज जाता येते.मुलांना सेवेची आवड असायला पाहिजे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) विचार सागर मंथन करून चांगले चांगले ज्ञानरत्न शोधायचे आहेत. कमाई करायची आहे.खरे-खरे ईश्वरीय सेवाधारी बनून सेवा करायची आहे.

(२) राजयोगाच्या अभ्यासाची खूप आवड ठेवायची आहे.जेव्हापण वेळ मिळेल,तेव्हा एकांतामध्ये जायचे आहे.असा अभ्यास हवा ज्यामुळे,जिवंतपणी या शरीरापासून जसे मृत झाले आहेत.अशरीरी स्थितीचा अनुभवत होत राहावा. देहाचे भान विसरून जावे.

वरदान:-
मतभेद नष्ट करून,एकते मध्ये राहणारे,खरे सेवाधारी भव.

ब्राह्मण परिवाराची विशेषता आहे, अनेक असताना,पण एक.तुमच्या एकते द्वारे सर्व विश्वामध्ये एक धर्म, एक राज्याची स्थापना होत आहे, म्हणून विशेष लक्ष देऊन, मतभेदाला नष्ट करा आणि एकतेची धारणा करा,तेव्हाच खरे सेवाधारी बनाल.सेवाधारी स्वत:प्रति नाही, परंतु सेवेप्रती असतात.स्वतःचे सर्व काही,सेवा प्रति स्वाह करतात.जसे साकार पित्याने सेवेमध्ये हड्डी हड्डी स्वाह केली,तसेच तुमच्या प्रत्येक, कर्मेंद्रिया द्वारे सेवा होत राहावी.

बोधवाक्य:-
परमात्म प्रेमामध्ये बुडून जावा,तर दुःखाची दुनिया विसरून जाल.