06-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही जे पण कर्म करता,त्याचे आवश्य फळ मिळते, निष्काम सेवा तर एक बाबाच करतात"

प्रश्न:-
हा मुरलीचा वर्ग खूपच आश्चर्यकारक आहे, कसा?येथे मुख्य कष्ट कोणते घ्यायचे आहेत?

उत्तर:-
हा मुरलीचा वर्ग आहे, ज्यामध्ये लहान-मोठे सर्व बसले आहेत,तर वृद्ध पण आहेत.हा मुरलीचा वर्ग खूपच आश्चर्यकारक आहे,ज्यामध्ये अहिल्या,कुब्जा,साधू पण एक दिवस येतील.येथे मुख्य आठवणी ची यात्रा आहे.आठवणी द्वारेच आत्मा आणि शरीराचे निसर्गोपचार होते परंतु आठवणीसाठी पण ज्ञान पाहिजे.

गीत:-
रात के राही थक मत जाना..

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गित ऐकेले.आत्मिक पिता मुलांना याचा अर्थ पण समजून सांगतात.आश्चर्य तर हे आहे की, गीता किंवा ग्रंथ इत्यादी बनवणारे पण,याचा अर्थ जाणत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा अनर्थच काढतात. आत्मिक पिता ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत,ते सन्मुख याचा अर्थ सांगतात.राजयोग पण बाबाच शिकवतात.तुम्ही मुलं जाणतात, आता परत राजांचे राजा बनत आहोत.दुसऱ्या कोणत्या शाळेमध्ये असे थोडेच म्हणतील की आम्ही परत वकील बनत आहोत.'परत' हे अक्षर कोणालाही म्हणता येणार नाही.तुम्ही म्हणतात आम्ही पाच हजार वर्षेपुर्वी सारखेच परत बेहद्दच्या पित्यापासून शिकत आहोत.हा विनाश पण परत होईल.अनेक मोठ-मोठे बॉम्बस बनवत राहतात. खूप शक्तिशाली पण बनवत राहतात.ते ठेवण्यासाठी तर बनवणार नाहीत ना.हा विनाश पण शुभ कार्यासाठीच आहे ना.तुम्हा मुलांना तर घाबरण्याची कोणतीच आवश्यकता नाही.ही कल्याणकारी लढाई आहे.बाबा कल्याण करण्यासाठीच येतात.बाबा म्हणतात मी येऊन ब्रह्मा द्वारे स्थापना, शंकरा द्वारे विनाशाचे कर्तव्य करतो. हे बॉम्बस इत्यादी विनाशासाठीच आहेत.यापेक्षा जास्त तर दुसरी कोणती गोष्ट नाही.या सोबतच नैसर्गिक आपत्ती पण येत राहते.त्याला ईश्वरी आपत्ती म्हणणार नाही.या नैसर्गिक आपत्ती पण वैश्विक नाटकामध्ये नोंदलेल्या आहेत.ही कोणती मोठी गोष्ट नाही.अनेक मोठे बॉम्बस बनवत राहतात.असे म्हणतात आम्ही संपूर्ण शहर नष्ट करू शकतो.आत्ता जे जपानच्या लढाईमध्ये बॉम्बस वापरले,ते तर खूप लहान होते.आता तर खूप मोठे बॉम्स बनवले आहेत.जेव्हा जास्तच संकटे येतात,तर सहन करू शकत नाहीत,परत बॉम्बस वापरायला सुरू करतात,खूप नुकसान होते. त्याची पण रंगित तालीम करून पाहतात.अरबो रुपये खर्च करतात. बाॅम्बस बनवणाऱ्यांचे पगार पण खुप असतात.तर तुम्हा मुलांना खुशी व्हायला पाहिजे.जुनी दुनिया विनाश होणारच आहे.तुम्ही मुलं नवीन दुनियेसाठी पुरुषार्थ करत आहात.विवेक नुसार पण समजते की, जुनी दुनिया नष्ट होणार जरूर आहे.मुलं समजतात कलियुगामध्ये काय होईल,सतयुगामध्ये काय होईल.तुम्ही आत्ता संगम युगामध्ये आहात.तुम्ही जाणता, सतयुगामध्ये इतके मनुष्य नसतील,तर या सर्वांचा विनाश होईल.ह्या नैसर्गिक आपत्ती पण कल्पापूर्वी झाल्या होत्या.जुनी दुनिया नष्ट होणारच आहे.आपत्ती पण खूप येतात.तर तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.आम्हा आत्मिक मुलांना परमपिता परमात्मा सन्मुख समजवत आहेत. हा विनाश पण तुमच्यासाठी होत आहे.हे पण गायन आहे,रुद्र ज्ञान यज्ञाद्वारे विनाश ज्वाला प्रज्वलित झाली.अनेक गोष्टी गीतेमध्ये आहेत,ज्यांचा अर्थ खूप चांगला आहे परंतु कोणी समजत नाहीत.शांती मागत राहतात. तुम्ही म्हणतात लवकर विनाश होईल तर आम्ही जाऊन सुखी दुनिया मध्ये राहू.बाबा म्हणतात सुखी तर तेव्हाच बनू जेव्हा सतोप्रधान बनू. बाबा विविध प्रकारच्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात,परत कोणाच्या बुद्धीमध्ये चांगल्याप्रकारे बसतात, कोणाच्या बुद्धीमध्ये कमी.वृद्ध माता समजतात शिवबाबा ची आठवण करायची आहे,बस.त्यांच्यासाठी समजावले जाते, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. तरीही वारसा तर मिळवतात,सोबत राहतात. प्रदर्शनी इत्यादीमध्ये सर्वांचा उद्धार होणार आहे.मेहतर इत्यादी पण चांगले कपडे घालून येतात. गांधीजींनी त्या अस्पृश्यांचा पण उद्धार केला,सोबत खात होते. बाबा तर मनाई करत नाहीत, त्यांचा पण उध्दार करायचा आहे. कामाचा कोणताही संबंध नाही. यामध्ये बाबांच्या सोबत बुद्धी योग लावायचा आहे.बाबांची आठवण करायची आहे.आत्माच म्हणते मी अस्पृश्य आहे.आत्ता समजतो, आम्हीच सतोप्रधान देवी-देवता होतो,परत पुनर्जन्म घेत-घेत अंत मध्ये येऊन पतित बनलो आहोत. आता परत मज आत्म्याला पावन बनायचे आहे.तुम्हाला माहित आहे, सिंधमध्ये एक भिलनी येत होती,ध्यानामध्ये जात होती.पळत येऊन भेटत होती.समजले जाते यांच्यामध्ये पण आत्मा तर आहे ना. आत्म्याला हक्क आहे,आपल्या पित्याकडून वारसा घेणे.त्यांच्या घरातील लोकांना म्हटले,त्यांना ज्ञान घेण्यासाठी येऊ द्या.ते म्हणाले, आमच्या कुळामध्ये हंगामा होईल. घाबरल्यामुळे त्यांना घेऊन गेले.तर तुमच्या जवळ येतात,तुम्ही कोणाला मनाई करू शकत नाहीत. गायन पण आहे,ईश्वरच अबला, गणिका, साधु इत्यादी सर्वांचा उद्धार करतात. साधुलोका पासून भिलनी पर्यंत, बाबाच सर्वांचा उद्धार करतात.तुम्ही मुलं आत्ता यज्ञाची सेवा करत आहात,तर या सेवेद्वारे खूप प्राप्ती होते.अनेकांचे कल्याण होते.दिवसेंदिवस प्रदर्शनी सेवेची खूप गर्दी होत राहील.बाबा बैजेस पण बनवत राहतात.कुठे पण जावा तर,यावरती समजून सांगा.हे बाबा, हे दादा, हा बाबांचा वारसा. आता बाबा म्हणातात, माझी आठवण करा,तर तुम्ही पावन बनाल.गीतेमध्ये पण आहे माझीच आठवण करा. फक्त माझे नाव काढून कृष्ण, मुलांचे नाव लिहिले आहे.भारतवासींना हे पण माहित नाही की, राधा-कृष्णाचा आपसामध्ये काय संबंध आहे? त्यांचे लग्न इत्यादीचा काहीच इतिहास सांगत नाहीत.दोघांची वेग-वेगळी राजधानी आहे. हे तर बाबाच समजवतात.हे जर समजले, आणि म्हणाले शिवभगवानुवाच,तर सर्व त्यांना पळवून लावतील. परत म्हणतील,हे कोठून शिकले आहेत. ते कोणते गुरु आहेत?ते म्हणतील ब्रह्माकुमार कुमारी आहेत,तर सर्व बिघडतील.या गुरूंचे राज्य नष्ट होईल.असे पण खूप येतात,लिहून पण देतात,परत गायब होतात.

बाबा मुलांना कोणते कष्ट देत नाहीत,खूप सहज युक्ती सांगतात. कोणाला मुलगा नसेल,तर म्हणतात मुलगा होऊद्या,परत त्याचे खूप चांगल्या प्रकारे पालन-पोषण करतात,त्याला शिकवतात.मोठा होतो,तेव्हा म्हणतात कामधंदा कर. पिता मुलांचे पालन-पोषण करुन लायक बनवतात,तर मुलांचे सेवक झाले ना.हे शिवपिता तर मुलांची सेवा करुन सोबत घेऊन जातात.ते लौकिक पिता तर समजतात, मुलगा मोठा होऊन आपल्या धंद्यामध्ये लागेल, परत आम्ही वृद्ध झाल्यानंतर आमची सेवा करेल.हे शिव पिता तर सेवा घेत नाहीत.हे तर निष्काम आहेत.लौकिक पिता समजतात,जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत,मुलांचे कर्तव्य आहे, आमची सांभाळ करणे.ही इच्छा ठेवतात.हे बाबा तर म्हणतात मी निष्काम सेवा करतो.मी राजाई करत नाही.मी खूप निष्काम आहे. बाकीचे जे काही करतात,त्याचे फळ त्यांना जरूर मिळते.हे तर सर्वांचे पिता आहेत.मी तुम्हा मुलांना स्वर्गाची राजाई देतो.तुम्ही खूप उच्चपद प्राप्त करतात.मी तर फक्त ब्रह्मांडाचा मालक आहे, ते तर तुम्ही पण आहात परंतु तुम्ही राज्य करतात आणि गमावतात.मी राजाई करत नाही,न गमावतो.माझी नाटकांमध्ये हीच भूमिका आहे. तुम्ही मुलं सुखाचा वारसा मिळवण्यासाठी पुरुषार्थ करतात. बाकी सर्व फक्त शांती मागतात.ते गुरु लोक म्हणतात,सुख काग विष्टा समान आहे, म्हणून ते शांतीची इच्छा ठेवतात.ते हे ज्ञान घेऊ शकत नाहीत,त्यांना सुखाबद्दल माहितीच नाही.बाबा समजवतात शांती आणि सुखाचा वारसा देणारा मी एकटाच आहे.सतयुग त्रेतामध्ये गुरु नसतो,तेथे रावणाच नाही.ते ईश्‍वरीय राज्य आहे.हे पण वैश्विक नाटक पुर्वनियोजीत आहे.या गोष्टी कुणाच्या बुद्धीमध्ये बसत नाहीत. तर मुलांना खूप चांगल्या प्रकारे धारणा करून उच्चपद घ्यायचे आहे. आता तुम्ही संगम युगात आहात.तुम्ही जाणतात नवीन दुनियेची राजधानी स्थापन होत आहे.तर तुम्ही संगमयुगामध्ये आहात,बाकी सर्व कलियुगामध्ये आहेत.ते तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणतात.खूप अंधारामध्ये आहेत ना.गायन पण आहे कुंभकर्णा सारखे झोपलेले आहेत.विजयी बनणे तर पांडवाचे गायन आहे.

तुम्ही ब्राह्मण आहात.यज्ञ ब्राह्मणच स्थापन करतात.हे तर खूप मोठे बेहद्दचे ईश्वरीय यज्ञ आहे, ते हद्दचे यज्ञ आहेत.अनेक प्रकारचे यज्ञ असतात.हे रुद्र यज्ञ एकाच वेळेस होते.सतयुगामध्ये परत कोणते यज्ञ असत नाही.कारण कोणते संकट इत्यादीची गोष्टच नसते.ते सर्व हद्दचे आहेत आणि हा यज्ञ बेहद्दचा आहे. आता बेहद्द बाबांनी रचलेला हा यज्ञ आहे,ज्यामध्ये बेहद्द ची आहुती द्यायची आहे, परत अर्धाकल्प कोणता यज्ञ नसतो.तेथे रावणराज्यच नाही.रावण राज्य सुरू झाल्यानंतर बाकी सर्व यज्ञ इत्यादी सुरू होतात.बेहद्द यज्ञ तर एकाच वेळेत होतो.यामध्ये सर्व जुनी सृष्टी स्वाह होते.हा तर बेहद्दचे रुद्र ज्ञान आहे.यामध्ये मुख्य ज्ञान आणि योगाची गोष्ट आहे.योग म्हणजे आठवण.हे आठवण अक्षर खूप गोड आहे.योग अक्षर साधारण बनले आहे.योगाचा अर्थ कोणी समजत नाहीत.तुम्ही समजू शकता योग म्हणजे बाबांची आठवण करणे.बाबा तुम्ही तर आम्हाला बेहद्द चा वारसा वारसा देतात. आत्माच गोष्टी करते.बाबा तुम्ही परत आले आहात.आम्ही तर आपल्याला विसरलो होतो. आपणच आम्हाला बादशाही दिली होती.आता परत येऊन भेटले आहात.आपल्या श्रीमतावर आम्ही जरूर चालू. अशा गोष्टी मनामध्ये करत राहायच्या आहेत.बाबा तुम्ही तर खूप चांगला रस्ता दाखवत आहात.आम्ही कल्प-कल्प विसरतो.आता बाबा अभुल बनवतात म्हणून बाबांची आठवण करायची आहे.आठवणी द्वारेच वारसा मिळतो.मी जेव्हा समोर येतो,तेव्हा तुम्हाला समजावतो. तोपर्यंत गायन करत राहतात, तुम्हीच दुखहर्ता सुखकर्ता आहात. महिमा गायन करतात परंतु न आत्म्याला न परमात्म्याला जाणतात.आता तुम्ही समजतात,इतक्या लहान बिंदू मध्ये अविनाशी भुमिका नोंदलेली आहे.हे पण बाबाच स्पष्ट करतात.त्यांनाच परमपिता परमात्मा म्हणजेच परम आत्मा म्हटले जाते.बाकी कोणी हजार सूर्यासारखे नाहीत.मी तर शिक्षका सारखे शिकवत राहतो.अनेक मुलं आहेत.हा मुरलीचा वर्ग तर खूप आश्चर्यकारक आहे.या वर्गात मध्ये कोण-कोण शिकतात.अबला कुब्जा,साधु पण एक दिवस येऊन मुरली ऐकतील. वृध्द माता, लहान मुलं इत्यादी सर्व बसले आहेत.अशी शाळा कधी पाहिली आहे? येथे तर आठवण करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. आठवण करण्यासाठीच वेळ लागतो. आठवणीचा पुरुषार्थ करणे म्हणजेच ज्ञान आहे ना. आठवणीसाठी पण ज्ञान आवश्यक आहे.सृष्टिचक्र समजावण्यासाठी पण ज्ञान आवश्यक आहे. नैसर्गिकपणे खरेखुरे निसर्गोपचार याला म्हटले जाते.तुमची आत्मा पवित्र बनते.ते शरीराचे निसर्गोपचार करतात.हे आत्म्याचे निसर्गोपचार आहे.आत्म्यामध्येच मिलावट होते. खऱ्या सोन्याचे खरे दागिने बनतात. आत्ता हे मुलं जाणतात,शिवबाबा सन्मुख आले आहेत,तर त्यांची जरूर आठवण करायची आहे.आम्हाला परत जायचे आहे.या विषय सागरातून क्षिरसागराकडे जायचे आहे. बाबा, वारसा आणि घराची आठवण करायची आहे.ते गोड शांतीधाम आहे.दु:ख तर अशांती मुळे होते, सुख शांती मुळे होते.सतयुगामध्ये सुख शांती सर्वकाही आहे.तेथे लढाई भांडणे इत्यादीची गोष्टच नाही.मुलांना हीच चिंता राहायला पाहिजे की आम्ही, सतोप्रधान खऱ्या सोन्यासारखे बनायचे आहे, तेव्हाच उच्च पद मिळू शकेल. हे आत्मीक भोजन मिळत आहे, त्याचे रवंथ करत राहायचे आहे.आज कोण कोणत्या ज्ञानाच्या मुख्य गोष्टी ऐकवल्या.हे पण समवजले जाते, यात्रा दोन असतात, एक आत्मिक दुसरी शारीरिक.ही आत्मिक यात्राच कामाला येईल. भगवानुवाच मनामनाभव,म्हणजे तुम्ही माझीच आठवण करा,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) हा विनाशी शुभ कार्यासाठी आहे, म्हणून ह्याला घाबरायचे नाही. कल्याणकारी बनून नेहमी कल्याणाचेच कार्य करत राहायचे आहे, या स्मृतीद्वारे नेहमी खुशीमध्ये राहायचे आहे.

(२) नेहमी एकच काळजी करायची आहे की,संतोप्रधान,खऱ्या सोन्यासारखे बनून उच्च पद मिळवायचे आहे.जे आत्मिक भोजन मिळते,त्याचे रवंथ करत राहायचे आहे.

वरदान:-
सत्संगा द्वारे आत्मिक रंग लावणारे नेहमी आनंदी, दुहेरी प्रकाशमान भव.

जी मुलं बाबांना खरे सोबती बनवतात,त्यांना संगतीचा आत्मिक रंग नेहमी लागेल.शिक्षकांना सद्गुरु चा संग करणे,हाच सत्संग आहे.बुध्दीद्वारे सतपिता,सतशिक्षक आणि सतगुरुंचा संग करणेच सत्संग आहे.जे या सतसंगामध्ये राहतात,ते नेहमीच दुहेरी प्रकाशमय राहतात.त्यांना कोणत्याही प्रकारचे ओझे अनुभव होत नाही.ते असे अनुभव करतात,जसे भरपूर आहेत,आनंदाची खाण माझ्यासोबत आहे.जे पण बाबांचे आहे, ते सर्व आपले झाले.

बोधवाक्य:-
आपल्या मधुर बोल आणि उमंग उत्साहाच्या सहयोगाद्वारे कमजोरला पण शक्तिवान बनवा.