06-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आत्ता वापस घरी जायचे आहे,म्हणून देहभाना ला विसरून स्वतःला अशरीरी आत्मा समजा,सर्वां मधून ममत्व काढून टाका"

प्रश्न:-
संगम युगामध्ये तुम्ही मुलं बाबा पासून कोणती अक्कल शिकतात?

उत्तर:-
तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे बनायचे,आपले भाग्य उच्च कसे बनेल,ही हुशारी आत्ताच तुम्ही शिकतात.जे जितके योगयुक्त,आणि ज्ञान युक्त बनले आहेत,त्यांची तेवढी प्रगती होत राहते.प्रगती करणारी मुलं कधी लपून राहू शकत नाहीत.बाबा प्रत्येक मुलांच्या कार्य व्यवहाराद्वारे समजतात की,कोणता मुलगा आपले उच्च भाग्य बनवत आहे.

गीत:-

मरना तेरी गली मे...(मरायचे तुझ्या गल्ली मध्ये,जगायचे पण तुझ्या गल्ली मध्ये..)

ओम शांती।
सर्व मुलांनी हे गीत ऐकले.मुलं म्हटल्यानंतर सर्व सेवा केंद्रा मधील मुलं जाणतात की,बाबा आम्हा ब्राह्मणांसाठी सांगतात की, मुलांनो हे गीत ऐकले- जिवंतपणी गळ्यातील हार बनण्यासाठी म्हणजेच मुळवतन मध्ये जाऊन बाबांच्या घरामध्ये राहण्यासाठी.ते शिवबाबा चे घर आहे ना.ज्यामध्ये सर्व शाळीग्राम मुलं राहतात.मुलं ब्राह्मण कुलभूषण स्वदर्शन चक्रधारी जाणतात की,बरोबर तेच बाबा आले आहेत.ते म्हणतात आता तुम्हाला अशरीरी बनायचे आहे म्हणजेच देहभानाला विसरायचे आहे. ही जुनी दुनिया तर नष्ट होईल.या शरीराला तर सोडायचे आहे म्हणजेच सर्वांना सोडायचे आहे कारण ही दुनियाच नष्ट होणार आहे.तर आता परत घरी जायचे आहे.सर्व मुलांना आनंद होतो,कारण आज अर्धा कल्प घरी जाण्यासाठी खूप धक्के खाल्ले आहेत परंतु रस्ता मिळाला नाही, आणखीनच भक्तिमार्गाच्या दिखाव्या मध्ये मनुष्य फसले आहेत.ही भक्तिमार्गाची दलदल आहे,ज्यामध्ये मनुष्यमात्र गळ्यापर्यंत फसले आहेत. आता मुलं म्हणतात,बाबा आम्ही जुनी दुनिया जुन्या शरीराला विसरतो.आता तुमच्या सोबत अशरीरी बनून घरी जायचे आहे.सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे की,परमपिता परमात्मा परमधाम वरून आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत.ते म्हणतात फक्त तुम्ही पवित्र बनून माझी आठवण करा,जिवंतपणी मरायचे आहे. तुम्ही जाणतात, परमधाम घरांमध्ये आत्मे राहतात.ते ही आत्मा बिंदू आहे.निराकारी दुनिये मध्ये सर्व आत्मे चालले जातील.जितके मनुष्य आहेत तेवढे आत्मे तेथे असतील.आत्मे त्या महतत्त्व मध्ये किती जागा घेतात.शरीर तर खूप मोठे आहे,खूप जागा लागते,बाकी आत्म्याला किती जागा पाहिजे.आम्ही आत्मे थोड्याच जागे मध्ये राहतो. मुलांना बाबा द्वारे या सर्व गोष्टी ऐकण्याचे सौभाग्य आत्ताच मिळते.बाबाच स्पष्ट करतात,तुम्ही अशरीरी आले होते,परत शरीर धारण करून भूमिका वठवली.आता परत जिवंतपणी मरून सर्वांना विसरायचे आहे,बाबा मरणे शिकवतात.बाबा म्हणतात,स्वतःच्या पित्याची आणि आपल्या घराची आठवण करा.खूप पुरुषार्थ करा.योगामध्ये राहिल्यामुळे पाप नाश होतील परत आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल. बाबा श्रीमत देतात,कल्पा पूर्वी पण म्हटले होते की,देहाचे सर्व संबंध विसरून माझीच आठवण करा.सर्वांचे एकच पिता आहेत ना.तुम्ही प्रजापिता ब्रह्माची मुख वंशावली मुलं आहात, ज्यामुळे तुम्ही ज्ञान प्राप्त करतात. शिवाची मुलं तर आहेतच.हा तर सर्वांना निश्चय आहे,आम्ही भगवंताची मुलं आहोत परंतु त्यांचे नाव,रूप,देश, काल विसरल्यामुळे भगवंता सोबत कोणाचे इतके प्रेम राहिले नाही.यामध्ये कोणाला दोष देत नाहीत.हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंदलेले आहे.

बाबा समजवतात तुम्ही आत्मा खूप छोटी बिंदी आहात,त्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.किती आश्चर्य आहे.आत्मा कसे शरीर घेऊन भूमिका वठवते.आता तुम्हाला बेहद्द भुमिके बद्दल माहिती झाली आहे.हे ज्ञान दुसऱ्या कोणामध्ये नाही.तुम्ही पण देह अभिमानी होते.आता खूप बदल झाला आहे.ते पण प्रत्येकाच्या भाग्यावर अवलंबून आहे.कल्पापुर्वीच्या भाग्याचा आत्ता साक्षात्कार होत आहे. दुनिया मध्ये अनेक मनुष्य आहेत. प्रत्येकाच्या आपले भाग्य आहे, जसजसे ज्यांनी काम केले, त्यानुसार दुःखी,सुखी, सावकार, गरीब बनतात, आत्माच बनते.आत्माच कशी सुखांमध्ये येते परत दुःखामध्ये येते,हे बाबाच समजवतात.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्याची अक्कल बाबाच शिकवतात, तेही कल्पा पूर्वीसारखेच. जितकी ज्यांनी अक्कल प्राप्त केली तेवढीच आत्ता पण प्राप्त करत आहेत. अंत काळापर्यंत प्रत्येकाचे भाग्य समजून येईल,परत म्हणतील कल्प-कल्प असेच भाग्य राहील.जे चांगले योगयुक्त,ज्ञानयुक्त असतील,ते सेवा पण करत राहतील.शिक्षणामध्ये नेहमी प्रगती होत राहते.काही मुलं लवकर प्रगती करतात,काही तर खूप डोकं खातात,इथे पण असेच आहे. कल्पापूर्वी प्रमाणे जे प्रगती करतात,ते लपून राहू शकत नाहीत.बाबा तर जाणतात ना,सर्वांचा संबंध शिवबाबांशी आहे.हे पण मुलांचा कार्य व्यवहाराद्वारे समजतात,तर ते पण पाहतात. जरी कोणी यांना यांच्यापासून लपवतील परंतु शिवबाबा पासून तर लपवू शकणार नाहीत.भक्ती मार्गामध्ये पण परमात्मा पासून लपवू शकत नाहीत, तर ज्ञान मार्गामध्ये कसे लपवू शकतात. बाबा तर समजावत राहतात. राजयोगाचे शिक्षण तर खूप सहज आहे,कर्म पण करायचे आहेत, मित्र संबंधी सोबत राहायचे पण आहे परंतु या जुन्या दुनिया मध्येच राहायचे आहे. तेथे राहून कष्ट करायचे आहेत.येथे मधुबन मध्ये राहून पुरुषार्थ करणाऱ्या पेक्षा जास्त,घर गृहस्थामध्ये राहून पुरुषार्थ करणारे तीव्र गतीने पुढे जाऊ शकतात,जर चांगल्या प्रकारे लगन, आकर्षण आहे तर.ग्रंथांमध्ये पण अर्जुन आणि भील चे उदाहरण दाखवतात ना.जरी तो बाहेर राहणारा होता परंतु अभ्यासाद्वारे अर्जुना पेक्षा बाण चालवण्यामध्ये हुशार झाला.तर गृहस्थ व्यवहारे मध्ये राहून कमलफुला समान राहायचे आहे.हे पण तुम्ही उदाहरण पाहाल.गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून खूप चांगल्या प्रकारे सेवा करू शकतात,ते जास्त वृद्धीला प्राप्त करत राहतील.येथे मधुबन मध्ये राहणार्‍यांना पण माया सोडत नाही.असे नाही की बाबाच्या जवळ आल्यामुळे सुटून जातील, नाही. प्रत्येकाला आपापला पुरुषार्थ करायचा आहे.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहणारे,मधुबन मध्ये राहणाऱ्या पेक्षा चांगला पुरुषार्थ करू शकतात.खूप चांगली बहादुरी दाखवू शकतात,त्यांनाच महावीर म्हटले जाते. जे गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून कमलफुल समान बनवून दाखवतील. असे म्हणतात,बाबा तुम्ही तर घर गृहस्थ सोडले आहे.मी कुठे सोडले आहे? मलाच सोडून गेले आहेत.बाबा तर कोणाला सोडून आले नाहीत. घरामध्ये तर आणखीच जास्त मुलं आली.बाकी कन्यासाठी तर बाबा समजवतात की,तुम्ही ही ईश्वरीय सेवा करा.हे पण बाबा आहेत,ते पण बाबा आहेत.कुमार पण खूप आले परंतु चालू शकले नाहीत.कन्या तशा चांगल्या आहेत. कन्या शंभर ब्राह्मणां पेक्षा उत्तम गायन केल्या जातात.कन्या तीच आहे,जी २१ कुळाचा उद्धार करेल. ज्ञानाचा बाण मारेल.बाकी जे गृहस्थ व्यवहारांमध्ये राहतात,ते पण ब्रह्मकुमार-ब्रह्मकुमारी झाले,पुढे चालून त्यांचे पण बंधनं नष्ट होतील.सेवा तर करायची आहे ना.काही सेवा करणारी मुलं बापदादाच्या हृदयासीन आहेत,जे हजारों चे कल्याण करत आहेत.तर अशा सेवाधारी मुलावरती आशीर्वाद तर राहतोच ना.ते हृदयावरती राज्य करणारे राहतील.जे हृदयावर चढतात, तेच सिंहासनावर बसतील.बाबा म्हणतात आपसामध्ये भेटून सर्वांना मार्ग दाखवण्याची युक्ती रचत राहा.चित्र पण बनवत राहतात.हे सर्व प्रत्याक्षातील गोष्टी आहेत.आता तुम्ही समजतात, परमपिता परमात्मा निराकार आहेत.ते पण बिंदी आहेत परंतु ज्ञानसंपन्न पतित पावन आहेत. आत्मा पण बिंदू आहे.मुलगा तरीही छोटा असतो.पिता आणि मुलांमध्ये फरक तर असतो ना.आज काल तर पंधरा सोळा वर्षाची मुलं पण पिता बनतात, तर मुलगा त्यांच्यापेक्षा लहानच झाला ना.येथे तर आश्चर्य पहा, पिता आत्मा आणि मुलगा पण आत्मा आहे.ते सर्वोच्च आत्मा ज्ञानसंपन्न आहेत.बाकी सर्व आपल्या अभ्यासानुसार उच्च किंवा कनिष्ठ पद मिळवतात.सर्व अभ्यासावर अवलंबून आहे.चांगले कर्म करणारे उच्च पद घेतात.आता तुम्हा मुलांना सृष्टीच्या आधी मध्य अंतचे ज्ञान आहे.स्वर्गा मध्ये फक्त भारतच असतो,बाकी कोणता खंड नसतो.तर लहान नवीन भारतामध्ये आपला स्वर्ग दाखवावा लागेल.जसे द्वारका नाव नाही, लक्ष्मीनारायणच्या घराण्याचे राज्य लिहायला पाहिजे.असे स्पष्ट होते की, प्रथम दैवी घराण्याचे राज्य होते,त्यांची लहान गावं असतील,लहान प्रदेश असतील.या पण विचार सागर मंथन करायच्या गोष्टी आहेत.या सोबतच शिवबाबांशी बुद्धी योग लावायचा आहे. आम्ही आठवणी द्वारेच बादशाही घेतो, आठवणी द्वारेच गंज उतरेल.यामध्येच सर्व कष्ट आहेत.काही मुलांची बुद्धी बाहेर धक्का खात राहते,येथे बसून संपूर्ण वेळ आठवणी मध्ये राहू शकत नाहीत,बुद्धी दुसरीकडे चालली जाते. भक्तिमार्ग मध्ये पण असे होते, श्रीकृष्णाची भक्ती करत-करत बुद्धी दुसरीकडे चालली जाते.नवविध भक्ति करणारे साक्षात्कार करण्यासाठी खूप कष्ट करतात.अनेक तास बसतात, कृष्णा शिवाय कोणाची आठवण यायला नको,खूप कष्ट घेतात. यामध्ये ८ आणि १६१०८ ची माळ असते. ती तर लाखो ची माळ असते परंतु ज्ञान मार्गाची खूप किमती आहे. भक्तिमार्गाची खूप स्वस्त आहे,कारण यामध्ये आत्मिक कष्ट आहेत.कृष्णाला पाहून खूप आनंदित होतात,रास करतात.भक्ती आणि ज्ञानामध्ये रात्रंदिवसा चा फरक आहे.तुम्हाला हे समजवले जात नाही की,कृष्णाची आठवण केल्यामुळे गंज उतरेल.येथे तर समजवले जाते,जितकी शिवबाबांची आठवण कराल,तेवढी पापं नष्ट होतील.

तुम्ही मुलं आत्ता योगबळाद्वारे विश्वाचे मालक बनतात.हे कोणाच्या स्वप्नांमध्ये, विचारांमध्ये पण नसेल.लक्ष्मी-नारायण ने काही लढाई इत्यादी केली नाही. विश्वाचे मालक परत कसे बनले?हे तर तुम्ही मुलं जाणतात.बाबा म्हणतात योगबळा द्वारे तुम्हाला राजाई मिळेल. परंतु भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ करू शकत नाहीत.सेवाधारी बनत नाहीत.बाबा तर श्रीमत देत राहतात की,अशा प्रकारे प्रदर्शनी करत राहा. कमीत कमी दीडशे दोनशे प्रदर्शनी एका दिवसात व्हायला पाहिजेत. गावागावांमध्ये चक्र लावा.जितके सेवा केंद्र तेवढ्या प्रदर्शनी.एका एका सेवा केंद्रांमध्ये प्रदर्शनी असल्यामुळे समजावून सांगणे सहज होईल.सेवा केंद्र पण दिवसेंदिवस मोठे होत जातील.जे चित्र इत्यादी पण ठेवू शकाल.चित्रांचे पण संशोधन होत राहील.स्वर्गाचे चित्र,सुंदर महल इत्यादी भारताचे बनवायला पाहिजे.पुढे चालून समजावण्यासाठी चांगले चांगले चित्र बनतील.वानप्रस्थ अवस्थामध्ये असणारे फिरत-फिरत पण सेवा करत राहावेत.ज्यांच्या भाग्यात असेल, ते ज्ञान घेतील.काही मुलं कुकर्म, खराब कर्म करून आपली इज्जत घालवतात, तर यज्ञाची पण इज्जत घालवतात. जशी चलन तसे पद.जे अनेकांना सुख देतात, त्यांच्या नावाचे गायन होते ना. आत्ता सर्व गुणांमध्ये संपन्न तर बनले नाहीत ना‌.कोणी कोणी खूप चांगली सेवा करत आहेत,अशा मुलांचे नाव ऐकून बाबा खुश होतात.सेवाधारी मुलांना पाहून बाबा खुश होतील ना. चांगल्या सेवेमध्ये कष्ट करत राहतात. सेवा केंद्र उघडत जातात,याद्वारे हजाराचे कल्याण होईल,त्यांच्याद्वारे परत अनेक निघत जातील.संपूर्ण तर कोणी बनले नाहीत.चुका पण काही ना काही होत राहतात. माया सोडत नाही. जितकी सेवा करून आपली प्रगती करतील,तेवढे हृदयासीन बनतील, तेवढेच उच्चपद मिळवतील.परत कल्प-कल्प असेच पद मिळेल.शिव बाबांपासून तर कोणी लपून राहू शकत नाही.अंत काळामध्ये प्रत्येकाच्या कर्मानुसार साक्षात्कार होईल, परत काय करू शकाल,जार जार रडावे लागेल,म्हणून बाबा समजवत राहतात, असे कोणते कर्म करू नका,ज्याची अंत काळात सजाचे भागीदार बनाल, पश्चाताप करावा लागेल.परंतु कितीही समजावून सांगा, भाग्यामध्ये नाहीतर पुरुषार्थ करू शकत नाहीत.आज कालचे मनुष्य तर त्याला जाणतच नाहीत‌.भगवंताची आठवण करतात परंतु जाणत नाहीत,त्यांच्या श्रीमताला मानत नाहीत.आता त्या बेहद्दच्या बाबा पासून तुम्हाला सतयुगी स्वराज्याचा वारसा सेकंदांमध्ये मिळतो.शिवबाबा हे नाव तर सर्व पसंद करतात ना.मुलं जाणतात,बाबा पासून स्वर्गाचा वारसा मिळत आहे,अच्छा.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपल्या चलनाद्वारे बाबाचे किंवा यज्ञाचे नाव प्रसिद्ध करायचे आहे.असे कोणते कर्म व्हायला नको,ज्यामुळे बाबाची इज्जत जाईल.सेवे द्वारे आपले भाग्य स्वतःच बनवायचे आहे.

(२) बाप समान कल्याणकारी बनून सर्वांचे आशीर्वाद घेण्यामध्ये प्रथम क्रमांक घ्यायचा आहे.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून कमलफुल समान राहण्याची बहादुरी दाखवायची आहे.

वरदान:-
सहयोगाद्वारे स्वतःला सहज योगी बनवणारे, निरंतर योगी भव.

संगमयुगा मध्ये बाबांचे सहयोगी बनणे, हेच सहज योगी बनण्याची विधी आहे. ज्यांचा प्रत्येक संकल्प,शब्द आणि कर्म बाबांचे किंवा आपल्या राज्याच्या स्थापनेच्या कर्तव्य मध्ये सहयोगी राहण्याचे आहे,त्यांना ज्ञानी योगी तू आत्मा,निरंतर खरे सेवाधारी म्हटले जाते. मनापासून नाही तर धनापासून, तना पासून नाही तर धनापासून, धनानाद्वारे नाहीतर ज्यामध्ये सहयोगी बनू शकतात,त्यामध्ये सहयोगी बना तर, हा पण योग आहे. जेव्हा आहातच बाबांचे, तर बाबा आणि मी, तिसरे कोणी नाही- यामुळे निरंतर योगी बनाल.

बोधवाक्य:-
संगम युगामध्ये सहन करणे म्हणजे, मरणेच स्वर्गाचे राज्य घेणे आहे.