06-05-2022
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा
मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही ब्राह्मणांना भगवंताची गोद मिळाली आहे, तुम्हाला नशा राहायला
पाहिजे, पित्याने या ब्रह्मा तना द्वारे आपले बनवले आहे"
प्रश्न:-
शिव पित्याने कोणते दैवी कर्तव्य पार पाडले आहे? ज्यामुळेच त्यांची एवढी महिमा झाली
आहे ?
उत्तर:-
पतितांना पावन
बनवणे. सर्व मानवांना माया रावणाच्या साखळदंडातून मुक्त करण्याचे, दैवी कर्तव्य
फक्त एक शिव पिताच करतात. बेहद्दच्या बाबाकडून तुम्हाला बेहद्द आनंदाचा वारसा
मिळतो, जो नंतर अर्धाकल्प चालू राहतो. सुवर्णयुगात सुवर्णमहोत्सव आणि त्रेता युगात
रौप्यमहोत्सव आहे. ते सतोप्रधान आणि ते सतो, या दोघांना सुखाची भुमी म्हणतात.
बाबाने अशी सुखाची भूमी स्थापन केली आहे, म्हणूनच त्यांची स्तुती केली जाते.
गीत:-
हे न्यायाचे
मंदिर आहे….
ओम शांती।
बाप आणि दादा(पिता आणि आजोबा) मिळून तुम्हा मुलांना समजावून सांगतात. कधी पिता
समजावतात, कधी दादाही समजावतात, कारण हे शरीर दादाचे पण घर आहे. परमपिता परमात्मा
परमधाममध्ये वास करतात, निश्चितच कधीतरी हे भारतच त्यांचे घर होते, म्हणूनच
शिवरात्री साजरी केली जाते. शिवाची अनेक मंदिरेही आहेत. त्यामुळे त्यांना फक्त
भारतभूमीत यायचे आहे, अपवित्रांना शुद्ध करण्यासाठी आणि माया रावणाच्या साखळदंडातून
सर्व मानवांना, मुक्त करण्यासाठीच यायचे आहे, कारण आता रावणाचे राज्य आहे. रावणाचे
दहनही भारतात करतात. शिवरात्री आणि कृष्ण जयंती भारतात साजरी केली जाते. रावणाचे
राज्यही अर्धाकल्प चालू असते. परत पिता येतात, अपवित्रांना पवित्र करायला. ते
तुम्हाला एकदाच शुद्ध करतात आणि ते पुन्हा येत नाहीत. पित्याचे नाव भारतात प्रसिद्ध
आहे. नक्कीच त्यांनी काही दैवी कर्तव्य केले आहे, म्हणून त्यांचे नाव आहे. मनुष्य
मनुष्याला पावन करू शकत नाहीत. पतित पावन एका पित्यालाच म्हणले जाते. स्वर्ग आणि
नरक हे नाव देखील भारतातच दिले गेले आहे. ५००० वर्षांपूर्वी भारत हा स्वर्ग होता
त्याला परिस्तान देखील म्हणतात, तर त्यांना निश्चितपणे पित्याकडून वारसा मिळाला आहे.
पिता अक्षर खूप गोड वाटते. त्यांच्याकडूनच तुम्हाला बेहद्द सुखाचा वारसा मिळतो, जो
अर्धाकल्प चालू राहतो. ज्यांचा सुवर्णमहोत्सव आणि रौप्यमहोत्सव साजरा केला जातो.
सुवर्णयुगाला सुवर्ण महोत्सव आणि त्रेताला रौप्यमहोत्सव म्हणतात. ते सतोप्रधान आणि
ते सतो एकत्रितपणे, सुखाची भूमी म्हणतात. पहिल्या क्रमांकावर सूर्यवंश आणि दुसऱ्या
क्रमांकावर चंद्रवंश आहे. बाबा या भारतभूमीत आल्यावर, भारताला पावन बनवतात आणि परत
भक्ती सुरू झाली की, कला कमी होत जातात. वृक्ष जडजडीभुत, तमोप्रधान होतो. सर्वजण
भक्त बनतात. साधू देखील शिव पित्याची प्राप्ती करण्यासाठी म्हणजेच मुक्ती
जीवनमुक्तीत जाण्यासाठी साधना करतात. पित्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही अर्धाकल्प
भक्ती करतात. जेव्हा ती वेळ पुर्ण झाली की, भक्तांना सुखी करायला बाबा येतात.
सुवर्णकाळात सुख, शांती आणि संपत्ती असते. अकाले मृत्यू कधीच नसतो. कधीही रडत नाहीत,
कधी मारहाण करत नाहीत. हे कोण समजावत आहे ? बेहद्दचे बाबा, त्यांचे नाव पण पाहिजे,
नाही का? कलियुगात अंधार आहे, भक्तिमार्गात अडखळत राहतात. स्वर्गात दु:खाची गोष्टच
नाही, सर्वजण सुखी राहतात, म्हणूनच ईश्वराला हाक मारत नाहीत. सुवर्णकाळाला सुखाची
भूमी, कलियुगाला दु:खाची भूमी म्हणतात. वल्लभाचार्य वैष्णव लोक समजतात की,
सुवर्णयुगात लक्ष्मी आणि नारायण यांचे राज्य होते. यथा राजा, राणी तथा प्रजा सुखी
असल्याने, त्याला सुवर्णयुग म्हणतात. सुवर्ण काळापासून, चक्रात प्रवेश करणाऱ्यांचे
च ८४ जन्म होतील. तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे की, हे झाड आहे. सर्व पाने
एकत्र येणार नाहीत. सुवर्णयुगात एकच मूळ, शाश्वत, देवता धर्म होता, त्यांना हिंदू
म्हणणार नाही. देवी-देवता सर्व सद्गुणांनी परिपूर्ण आहेत, 16 कला पूर्णपणे गायल्या
आहेत, जे त्यांचे उपासक आहेत, ते नक्कीच त्या धर्माचे असावेत. ख्रिश्चन ख्रिस्ताची
आठवण करतात, तर त्याच धर्माचे आहेत, नाही का? मग भारतातील लोकांनी आपल्या देवी
देवतांच्या धर्मीचे नाव का गमावले? आम्ही देवता होतो, हे तुम्हाला माहीत आहे. आपणच
जन्ममरणात येतो. म्हणून आपण देवता आणि क्षत्रिय बनतो. ८४ जन्म घेत घेत अंतकाळात
येऊन शुद्र बनतात. तुम्हाला शुद्रापासून पुन्हा ब्राह्मण बनावे लागले. ब्राह्मण
ब्रह्माची मुलं होतात. सर्व आत्मे ही शिवाची मुलं आहेत. ते बेहद्दचे पिता आहेत.
त्यांना परमपिता, परमात्मा, हे ईश्वरीय पिता किंवा स्वर्गीय ईश्वरीय पिता म्हणतात.
ते स्वर्गाचे निर्माता आहेत. तुम्हा मुलांनी आता बुद्धीने काम करायचे आहे. जेव्हा
पिता स्वर्गाची स्थापना करतात, तेव्हा आपण नवीन दुनियेचे वारस का बनू नये? आता ती
नविन दुनिया, जुनी झाली आहे, परत नवीन दुनिया कशी निर्माण होणार? नवे रामराज्य, नवा
भारत असावा असे गांधीही म्हणत. आता ती स्थापना होत आहे, हे आपल्याला माहीत आहे.
तुम्हा ब्राह्मणांना आता भगवंताची गोद मिळाली आहे आणि त्या बेहद्दच्या पित्याला,
प्रत्यक्षात आपले बनवले आहे. व्यावहारिक दृष्टीने सर्वजण असेच म्हणत राहतात की, हे
ईश्वरीय पिता, दया करा. परंतू यावेळेत बाबांनी येऊन तुम्हाला या देहाच्या
माध्यमातून आपले बनवले आहे. ते कलीयुगी ब्राह्मण, कुखवंशावळ आहेत, आम्ही ब्रह्मा
मुख वंशावळ आहोत. प्रजापिता ब्रह्मा आहेत, म्हणून इतकी मुलं झाली, नाही का? तर ही
मुखवंशावळ आहे. परमपिता, परमात्मानी ब्रह्मा द्वारे दत्तक घेतले आहे, म्हणून ते
माताही झाले. तुम्ही माता पिता. . . हे बाबा, तुम्ही आम्हाला ब्रह्माच्या मुखाद्वारे
आपले बनवले आहे. याही समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. एकच पिता ज्ञानाचे सागर
आहेत. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, म्हणजे दिवस. अज्ञानामुळे रात्र होते. कलियुगाची
रात्र आहे, त्याला भक्तीमार्ग म्हणतात ना? सर्व ग्रंथ भक्तीमार्गाचे आहेत. त्यांना
पित्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग मिळत नाही. शिवरात्री साजरी करतात, म्हणजे
ते नक्कीच येतात. त्यांना स्वतःचे शरीर नाही. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांनाही
देवता म्हणतात. ब्रह्मादेवता नमः, विष्णुदेवता नमः नंतर शिव परमात्मा नमः असे
म्हणतात. ब्रह्मा हे या साकार सीजऱ्यात मोठे आहेत. आता प्रत्यक्षामध्ये आहेत.
संगमयुगात यादव आहेत, कौरवही आहेत आणि पांडव हे योगसामर्थ्य असलेले शक्ती सैन्य आहे.
तर, आता तुम्हा मुलांनी जाणले आहे की, शिवबाबा प्रत्यक्षात ब्रह्मा तनात अवतरीत झाले
आहेत. त्या निराकार शिवाचे मंदिरही आहे. शिवरात्री साजरी केली जाते, मात्र सरकारने
शिवजयंतीची सुट्टीही काढून घेतली आहे. ते इतरांच्या जयंती साजरे करत राहतात. धर्मात
शक्ती राहीली नाही, म्हणूनच तुम्ही अलिखित, बेकायदेशीर, अपवित्र झाले आहात. पवित्रता
नाही, शांतता नाही आणि संपत्ती पण नाही. याच भारतात ५००० वर्षांपूर्वी
सुवर्णमहोत्सव होता, तेव्हा पवित्रता, शांतता आणि समृद्धी होती. अचानक मृत्यू कधीच
होत नव्हता. भारतासारखा श्रीमंत देश दुसरा कोणताच असू शकत नाही. भारत खंड सर्वोच्च
आहे. त्याचा इतिहासही कायम आहे. हा भारतच पावन बनतो आणि हा भारतच पतित बनतो. आदी
सनातन देवी देवता धर्माचे हे चक्र लावून, शूद्र वर्णात आले. देवतापेक्षा ब्राह्मण
वर्ण श्रेष्ठ आहे. सतयुगी देतांची महिमा आहे, ती पित्याच्या महिमा पेक्षा वेगळी आहे.
बाबांना ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर म्हणतात, परत देवतांना सर्व गुणांनी परिपूर्ण
आहेत असे म्हणायचे, तेथे विकारांचा प्रश्नच येत नाही. कृष्णपुरीतही कंस, रावण वगैरे
होते, अशा अनेक गप्पा धर्मग्रंथात मांडल्या आहेत. खरे तर यावेळी कंसपुरी आहे. परत
सुवर्णकाळात कृष्णपुरी असेल. हा संगम आहे, म्हणूनच त्यांनी कंस, जरासंध, रावण
इत्यादी सुवर्णयुगाच्या देवतांमध्ये विलीन केले आहेत. हा आसुरी रावण पंथ आहे. तुम्ही
आता ईश्वरीय संप्रदाय बनले आहात. भगवंताच्या कुशीत येऊन पवित्र बना, परत २१
जन्मांसाठी दैवी कुशीत जाल. ८ जन्म दैवी गोद आणि नंतर १२ जन्म क्षत्रिय गोदीमध्ये
जाता. मुलगी तीच आहे, जी 21 कुळाचा उध्दार करेल, असे भारतातच गायले जाते. तर
तुम्हीच त्या कुमारिका आहात. तुम्ही आता दैवी कुटुंबाचे आहात. आजोबा आहेत शिवबाबा
आणि ब्रह्मा पिता आहेत. तुम्ही ब्रह्माकुमार आणि कुमारी आहात, तुम्हाला वारसा त्या
पित्याकडून मिळत आहे. तो देणारा आहे, तो निराकार आहे. तो राजयोग आता कसा शिकवायचा?
नरापासून नारायणमध्ये बदलण्यासाठी निश्चितपणे शारीरिक शरीराची आवश्यकता आहे. म्हणून
ते ८४ जन्म घेतलेल्या या अपवित्र शरीरात येतात. हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. जिथे
स्वतः ईश्वर बसून तुम्हाला राजयोग शिकवतात, राजांचा राजा बनवण्यासाठी. गीतेचे लेखक
कृष्ण नाहीत. गीता मातेने कृष्णाला जन्म दिला आहे. जे देवता बनले, त्यांना
शिवबाबांपासून जन्म मिळाला. बायबल पासून ख्रिस्ताद्वारे क्रिश्चन ला जन्म मिळाला.
तुम्हाला ब्राह्मणांपासून देवता कोणी बनवले? शिवबाबाने, ब्रह्माच्या मुखाने. हा
तुमचा बेहद्दचा सन्यास आहे. तो सिमित रजोगुणी संन्यास आहे. तो निवृत्तीमार्गाचा
सन्यास आहे. तुम्हाला या जुन्या घाणेरड्या जगातून वैराग्य प्राप्त झाले आहे. हे आता
तुम्हाला माहीत आहे की, ही दुनिया नष्ट होणार आहे. यापेक्षा आम्ही का नाही,
स्वर्गाच्या निर्माते, शिव पित्याचे स्मरण करायचे? बाबा म्हणतात, लाडक्या मुलांनो,
तुम्ही अनेक जन्मानंतर येऊन 84 जन्म पूर्ण केले आहेत. तुम्हाला आत्ता पुन्हा देवता
वर्णात जावे लागेल. यामध्ये खुप पथ्य आहेत, अशुद्ध वस्तू तुम्ही खाऊ शकत नाही. बाबा
म्हणतात, मी नेहमी संगमयुगात, खराब कपडे शुद्ध करायला येतो. आत्ता मृत्यू समोर उभा
आहे. जर यादव, कौरव आणि पांडव असतील तर नक्कीच पांडवपतीही असतील. पांडव पती, पिता
परमात्म्याला म्हणाल. तुम्ही परत पंडे आहात. तुम्ही सुखाच्या भूमीचा आणि शांतीच्या
भूमीचा मार्ग दाखवता, म्हणूनच तुम्हाला पांडव शिवशक्ती सेना म्हणतात. यादव
युरोपीयांनी स्वतःच्या वंशाचा नाश करतात. भारतात पांडव आणि कौरव आहेत -ज्यांच्यासाठी
म्हणतात, आसुर आणि देवांमध्ये युद्ध झाले. तुम्ही तर आत्ता देवता नाहीत, देवता
बनायचे आहे. श्रीमताने तुम्ही स्वर्गाचे स्वामी बनता. बाकी सर्व रावणाचे आसुरी
मतावरती आहेत. रावणाचे मत अर्धाकल्प चालू राहते. आता सर्व जग तमोप्रधान आहे. हा
रुद्र ज्ञान यज्ञ आहे, जिथे पिता बसून तुम्हाला राजयोग शिकवतात. जेव्हा राजाई
स्थापन होते, तेव्हा विनाशाची ज्वाळा प्रज्वलीत होते आणि हे ज्ञान नष्ट होते. परत
नाटकानुसार भक्तीमार्गात जी काही शास्त्रे असतील, तीच प्रकट होतील. संन्यासींचे
अनुयायी बरेच होतील. तुमची सर्व पापे धुण्यासाठी गंगेवर जातात. आता गंगा नदी
कोणालाही पावन करू शकत नाही. ती तर पाण्याच्या महासागरातून निघाली आहे.
ज्ञानसागरातून उगवलेल्या ज्ञानाच्या गंगा तुम्ही आहात. बाकी गंगा काही पतित पावनी
असत नाही. मी पुन्हा एकदा मुलांना भक्तीचे फळ अपार सुखाचा वारसा देण्यासाठी आलो आहे.
जे पित्याकडून येऊन अभ्यास करतील, तेच स्वर्गात जातील, बाकी सगळे आपापल्या विभागात
जातील. या नाट्यचक्राला तुम्हाला समजून घ्यावे लागेल. चक्राला जाणल्यामुळे तुम्ही
चक्रवर्ती राजा बनतात. सरकारने चक्र काढले आहे. तीन सिंह दाखवल्यानंतर, खाली
सत्यमेव जयते लिहितात. आता शिवबाबा येऊन, तुम्हा सर्व पार्वतींना अमर कथा सांगत
आहेत आणि अमरपुरीचे स्वामी बनवत आहेत. यालाच सत्य नारायणाची कथा किंवा अमर कथा
म्हणतात. ही कथा एकदाच ऐकून तुम्ही स्वर्गाचे स्वामी बनता. बाकी सर्व दंतकथा आहेत,
अच्छा.
गोड गोड खुप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) देवता
वर्णामध्ये जाण्यासाठी भोजनाचे खुप पथ्य करायचे आहे. कोणतीही अशुद्ध गोष्ट खायची नका.
(२) ही जुनी घाणेरडी
दुनिया, जी आता संपणार आहे, यापासून बेहद्दचे वैराग्य ठेऊन, स्वर्गाचे निर्माते,
शिव बाबाचे स्मरण करायचे आहे.
वरदान:-
आपल्या शक्ती
किंवा गुंणाद्वारे, निर्बल ला शक्तीवान बनवणारे श्रेष्ठ दानी किंवा सहयोगी भव.
श्रेष्ठ शक्ती
असणाऱ्या सुपात्र मुलांच्या सर्व शक्ती आणि सर्वगुण वेळेप्रमाण नेहमीच सहकारी असतात.
पित्याद्वारे प्राप्त केलेले गुण व शक्ती, अज्ञानी आत्म्यांना दान करणे आणि
ब्राह्मण आत्म्यांना सहकार्य करणे, हे त्यांच्या सेवेचे विशेष स्वरूप आहे.
दुर्बलांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी -हे सर्वोत्तम दान किंवा सहकार्य आहे.
ज्याप्रमाणे तुम्ही वाणीने किंवा मनाने सेवा करता, त्याप्रमाणे तुम्हाला मिळालेल्या
गुणांचा आणि शक्तींचा आधार, इतर आत्म्यांना द्या, त्यांची प्राप्ती करवा.
बोधवाक्य:-
जे दृढ
निश्चयाने नशिबाला निश्चय घेतात, तेच जे सदैव निश्चिंत राहतात.