06-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,नेहमी खुशी मध्ये राहा की आम्हाला कोण शिकवत आहे,हे पण मनमनाभव आहे,तुम्हाला खुशी आहे की,काल आम्ही पत्थर बुद्धी होतो,आज पारस बुधदी बनलो आहोत"

प्रश्न:-
भाग्य जागृत होण्याचा आधार काय आहे?

उत्तर:-
निश्चय.भाग्य जागृत होण्यामध्ये जर उशीर होत असेल, तर लंगडत राहतील.निश्चय बुध्दी चांगल्या रीतीने अभ्यास करून,प्रगती करत राहतील.कोणत्याही गोष्टींमध्ये संशय असेल तर मागे राहतील.जे निश्चय बुद्धी बनून,आपल्या बुद्धीला परमधाम मध्ये बाबा पर्यंत घेऊन जातील,तर ते सतोप्रधान बनतील.

ओम शांती।
सर्व विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेतात,तर त्यांना माहित राहते की,आम्ही शिकून असे बनणार आहोत.गोड गोड आत्मिक मुलांच्या बुद्धीमध्ये यायला पाहिजे की,आम्ही सतयुगी पारसपुरी चे मालक बनत आहोत.या देहाचे सबंध इत्यादी सर्व सोडायचे आहेत.आता आम्हाला पारसपुरीचे मालक पारसनाथ बनायचे आहे,तर सर्व दिवस खुशी मध्ये राहायला पाहिजे.तुम्ही समजता पारसपुरी कशाला म्हटले जाते?तेथे महल इत्यादी सर्व सोन्या-चांदीचे असतात.येथे तर दगड-विटाची घरं बनवतात.आता परत तुम्ही पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी बनत आहात.पत्थर बुद्धीला पारस बुद्धी बनवणारे पारसनाथ बाबा जेव्हा येतील,तेव्हा तर बनवतील ना.तुम्ही इथे बसले आहात,तुम्ही जाणता आपली शाळा,उच्च ते उच्च आहे. यापेक्षा मोठी शाळा दुसरी असू शकत नाही.या शाळेमध्ये तुम्ही करोड पद्मापदम भाग्यशाली,विश्वाचे मालक बनतात,तर तुम्हा मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे.या पत्थरपुरी पासून पारसपुरी मध्ये जाण्यासाठी,हे पुरुषोत्तम संगमयुग आहे.काल पत्थर बुद्धी होतो,आज पारस बुद्धी बनत आहोत.या गोष्टी सदैव बुद्धीमध्ये राहिल्या तर मनमनाभव आहे. शाळेमध्ये शिक्षक शिकवण्यासाठी येतात,तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते की,आता शिक्षक आले की आले.तुम्ही मुलं समजता,आपले शिक्षक तर स्वतः भगवान आहेत.ते आम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात, तर जरूर संगमयुगा मध्ये येतील. आता तुम्ही जाणतात,मनुष्य तर बोलवतच राहतात आणि ते तेथे आले आहेत,कल्पा पूर्वी पण असेच झाले होते तेव्हा तर म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी कारण ते पत्थर बुद्धी आहेत.तुमची विनाशकाले विपरीत बुद्धि आहे. तुम्ही पारस बुद्धी बनत आहात.तर अशी काही युक्ती शोधायला पाहिजे,जेणेकरुन मनुष्य लवकर समजतील.मधुबनला पण तुम्ही अनेकांना घेऊन येतात,तरी म्हणतात शिवबाबा ब्रह्मा तनाद्वारे कसे शिकवत असतील,कसे येत असतील,काहीच समजत नाहीत. इतके सर्व सेवाकेंद्रात येतात,तर निश्चय बुद्धि आहेत ना.सर्वजण म्हणतात शिवभगवानुवाच,शिवच सर्व आत्म्याचे पिता आहेत.कृष्णाला थोडेच सर्वांचे पिता म्हणतील.यामध्ये संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही परंतु भाग्यच उशिरा जागृत व्हायचे असेल तर परत लंगडत राहतील. कमी शिकणाऱ्यांना म्हटले जाते,हे तर लंगडत आहेत.संशय बुद्धी पाठीमागे राहतील.निश्चय बुद्धी, चांगल्या रीतीने शिकणारे,प्रगती करत राहतील. खूप सहज समजवले जाते. जसे पळण्याच्या शर्यती मध्ये एखाद्या लक्षा पर्यंत जाऊन,परत येतात.बाबा पण म्हणतात,बुद्धीला लवकर शिव बाबांजवळ घेऊन जावा,तर तुम्ही सतोप्रधान बनाल.येथे चांगल्या रीतीने समजतात,ज्ञानाचा बाण लागतो, परत बाहेर गेल्यानंतर विसरतात. बाबा ज्ञान इंजेक्शन लावतात,तर त्याचा नशा चढायला पाहिजे ना परंतु चढत नाही.येथे ज्ञानामृताचा पेला पितात,त्याचा परिणाम होतो,बाहेर गेल्यामुळे विसरतात.मुलं जाणतात, ज्ञानाचे सागर,पतितपावन,सद्गती दाता मुक्तिदाता,एकच पिता आहेत. तेच प्रत्येक गोष्टीचा वारसा देतात. बाबा म्हणतात,मुलांनो तुम्ही पण पूर्ण सागर बना.जितके माझ्यामध्ये ज्ञान आहे तेवढे तुम्ही धारण करा. शिवबाबाला तर देहाचा नशा नाही.

बाबा म्हणतात,मुलांनो मी तर सदैव शांत राहतो.तुम्हाला पण जेव्हा देह नव्हता,तर देहाचा नशा नव्हता. शिवबाबा थोडेच म्हणतात,ही माझी वस्तू आहे.हे शरीर पण मी भाड्याने घेतले आहे.भाड्याने घेतलेली गोष्ट आपली थोडीच असते.मी यांच्यामध्ये सेवा करण्यासाठी,थोड्या काळासाठी प्रवेश केला आहे.आता तुम्हा मुलांना परत घरी जायचे आहे.भगवंताला भेटण्यासाठी स्पर्धा करायची आहे. इतके यज्ञ इत्यादी करत राहतात,ते थोडेच समजतात कि,भगवान कसे मिळतील.ते समजतात कोणत्या ना कोणत्या, रूपात मध्ये भगवान येतील.बाबा समजवतात तर खूप सहज, प्रदर्शनीमध्ये तुम्ही पण समजून सांगा.सतयुग त्रेताचे आयुष्य पण लिहिलेले आहे,त्यामध्ये अडीच हजार वर्ष कालावधी अगदीच बिनचूक आहे.सूर्यवंशी च्या नंतर चंद्रवंशी परत रावणाचे राज्य सुरू होते आणि भारत पतित व्हायला सुरू होतो. द्वापर कलियुगा मध्ये रावण राज्य सुरु झाले.तिथी तारीख सर्व आहे, संगमयुग मध्यभागी ठेवा.शिवबाबांना रथ पण जरूर पाहिजे.या ब्रह्माच्या रथामध्ये प्रवेश करून,बाबा राजयोग शिकवतात,त्याद्वारे लक्ष्मीनारायण बनतात.कोणालाही समजून सांगणे तर खूप सहज आहे. लक्ष्मीनारायणची राजाई पण किती वेळ चालते,बाकी सर्वांचे घराने हद्यचे आहेत,हे बेहद्दचे आहे. या बेहद्दच्या इतिहास भूगोलास तर जाणले पाहिजे ना.आता तुम्ही संगम युगामध्ये आहात,परत दैवी राज्य स्थापन होत आहे.या पत्थरपुरी जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. विनाश झाला नाही तर,नवीन दुनिया कशी बनेल.आता म्हणतात नवीन दिल्ली.आता तुम्ही मुलं जाणतात, नवीन दिल्ली कधी होईल?नवीन दुनिये मध्ये नवीन दिल्ली असेल.गायण पण आहे,यमुनेच्या किनाऱ्यावरती महल असतात.जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य असते,तेव्हा म्हणनार नवीन दिल्ली,पारसपुरी. सतयुगामध्ये, लक्ष्मी-नारायणचे राज्य असते.मनुष्य हे विसरले आहेत की,वैश्विक नाटक कसे सुरु होते,कोण कोण मुख्य कलाकार आहेत,हे जाणायला पाहिजे ना.कलाकार तर अनेक आहेत, म्हणून मुख्य कलाकारांना तुम्ही जाणतात.तुम्ही पण मुख्य कलाकार बनत आहात.सर्वात मुख्य भूमिका तुम्ही वठवत आहात.तुम्ही आत्मिक सामाज सेवक आहात. बाकी सर्व शारीरिक समाजसेवक आहात.तुम्ही आत्म्यांना समजवतात,आत्माच शिकते.मनुष्य समजतात,शरीर शिकत आहे.हे कोणालाच माहीत नाही की,आत्मा या कर्मेंद्रिया द्वारा शिकत आहे.मी आत्मा वकील इ.बनते.बाबा आम्हाला शिकवत आहेत.संस्कार आत्म्यामध्येच राहतात.संस्कार घेऊन जातील,परत येऊन नवीन दुनिये मध्ये राज्य करतील.जशी सतयुगा मध्ये राजधानी होती,तशीच सुरू होईल.यामध्ये काहीच विचारण्याची आवश्यकता राहत नाही.मुख्य गोष्ट आहे देह अभिमानामध्ये कधीच येऊ नका.स्वता:ला आत्मा समजा. कोणतेही विकर्म करू नका. आठवणीमध्ये राहा,नाहीतर शंभर पटीने विकर्म होतील.हडगुड एकदम तुटतील.त्यामध्ये पण मुख्य कामविकार आहे.काही जण म्हणतात मुलं तंग करतात,परत मारावे लागते.आता हे काही विचारण्याची आवश्यकता राहत नाही.हे तर छोटे पाई पैशाचे पाप आहे.तुमच्या डोक्यावर तर जन्म-जन्मानंतरचे पाप आहेत. प्रथम त्याला भस्म करा.बाबा पावन होण्यासाठी खुप सहज उपाय सांगतात.तुम्ही एका बाबाच्या आठवणी द्वारे,पावन बनाल.भगवानुवाच मुलांप्रती,तुम्हा आत्म्याशी गोष्टी करतो.दुसरे कोणते मनुष्य असे समजू शकत नाहीत.ते तर आपल्याला शरीरच समजतात. बाबा म्हणतात,मी आत्म्यांना समजावतो,गायन पण आहे आत्मे आणी परमात्माचा मेळा भरतो. यामध्ये आवाज करण्याची आवश्यकता नाही.हे तर शिक्षण आहे.दूर-दूर वरून बाबांच्या जवळ येतात.निश्चिय बुद्धी असतील तर त्यांना खूप आकर्षण होईल.आता एवढे आकर्षण होत नाही,कारण आठवण करत नाहीत.प्रवासाहून जेव्हा परत घरांच्या जवळ येतात तर, घर इत्यादी आठवण येते,मूलंबाळ आठवण येतात.घरी खुशी मध्ये पोहोचतात,खुशी वाढत जाते.प्रथम पत्नीची आठवण येते,परत मुलं आठवणीत येतात.तुम्हाला आठवण आहे की,आता आम्ही घरी जात आहोत,तेथे पिता आणि मुलंच असतात.डबल खुशी होत आहे. शांतीधाम घरी जाऊ,परत राजधानीमध्ये येऊ.बस आठवणच करायची आहे.बाबा म्हणतात,मनमना भव.स्वतःला आत्मा समजून बाबा आणि वारशाची आठवण करा.बाबा तुम्हा मुलांना सुंदर बनवून डोळ्यावरती बसुन सोबत घेऊन जातात,काहीच कष्ट नाहीत.जसे मच्छरांचा झुंड जातो ना.तुम्ही आत्मे पण असेच बाबांच्या सोबत जाल. पावन बनण्यासाठी,तुम्ही बाबांची आठवण करतात,घराची नाही. बाबांची नजर प्रथम गरीब मुलां वरती जाते.बाबा गरीब नवाज आहेत ना. तुम्ही पण गावांमध्ये सेवा करण्यासाठी जातात.बाबा म्हणतात, मी तुमच्या गावाला येऊन पारसपुरी बनवतो.आता ही तर जुनी दुनिया आहे,या दुनियेस जरूर नष्ट करायचे आहे.नवीन दुनिया मध्ये नवीन दिल्ली,ती पण सतयुगामध्ये असेल.तेथे राज्य पण तुमचे असेल.तुम्हाला नशा चढतो,आम्ही परत आपली राजधानी स्थापन करू,जसे पूर्वी केली होती.असे थोडेच म्हणू असे महल बनवू, नाही.तुम्ही तेथे जाल,तर आपोआप तसे महल बनवण्यास सुरू कराल. कारण आत्म्यामध्ये भूमिका भरलेली आहे.येथे फक्त शिकण्याची भूमिका आहे.तेथे तुमच्या बुध्दी मध्ये आपोआप येईल असे महल बनवू.जसे कल्पापुर्वी बनवले होते,तसेच बनवण्यास सुरु कराल. आत्म्यामध्ये पहिल्यापासून नोंद आहे.तुम्ही तेच महल बनवणार,ज्या महला मध्ये तुम्ही कल्पापुर्वी राहत होते.या गोष्टी नवीन कोणी समजू शकणार नाहीत.तुम्ही समजता, आम्ही येतो,नवीन नवीन ज्ञानाच्या गोष्टी ऐकून ताजेतवाने होतो.नवीन नवीन गोष्टी निघतात,ही पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.रथावर नेहमीच सवारी कसे करू,यामध्ये मला सुख भासत नाही.मी तर तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी येतो.असे नाही बैला वरती सवारी करून बसतो.रात्रंदिवस बैलावरती सवारी असते काय? बाबा सेकंदांमध्ये येत जात राहतात.नेहमी बसण्याचा कायदाच नाही.खूप दूरवरून शिकवण्यासाठी येतात.घर तर त्यांचे आहे ना.सर्व दिवस शरीरा मध्ये थोडेच बसतील,त्यांना सुख भासणार नाही,जसे पिंजऱ्यामध्ये पोपट फसतो.मी तर हे शरीर भाड्याने घेतो,तुम्हाला समजून सांगण्यासाठी.तुम्ही म्हणाल ज्ञानाचे सागर बाबा,आम्हाला शिकण्यासाठी येतात. खुशीमध्ये रोमांच उभे राहायला पाहिजेत.ती खुशी परत कमी थोडीच व्हायला पाहिजे.हे धनी तर कायम स्वरुपी बसले आहेत.एका बैला वरती दोन सवारी नेहमीच राहू शकतील काय? बाबा आपल्या धाम मध्ये राहतात,येथे येण्यासाठी उशीर थोडाच लागतो.रॉकेटची गती किती तीव्र असते,आवाजापेक्षा पण जास्त गती असते.आत्मा पण खूप सुक्ष्म रॉकेट आहे.येथून लगेच लंडनमध्ये पण जाऊ शकते.एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती'चे गायन आहे.शिवबाबा पण सूक्ष्म रॉकेट आहेत.ते म्हणतात मी तुम्हाला शिकवण्यासाठी येतो, परत आपल्या घरी जातो.या वेळेत खूप व्यस्त राहतो,दिव्यदृष्टी दाता आहे,भक्तांना खुश करावे लागते, तुम्हाला शिकवतो.भक्तांची इच्छा होते साक्षात्कार व्हावा.येथे काही न काही मागत राहतात.सर्वात जास्त जगदंबा कडून भिख मागतात.तुम्ही जगत अंबा आहात ना.तुम्ही विश्वाची बादशाही भीक मध्ये देतात.गरिबांना भीक मिळते ना.आम्ही पण गरीब आहोत,तर शिवबाबा स्वर्गाची बादशाही भिखमध्ये देतात.दुसरे काही नाही,फक्त म्हणतात बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होऊन,शांतीधाम मध्ये चालले जाल. माझी आठवण करा तर मी खात्री देतो,तुम्ही आयुष्यवान बनाल. सतयुगा मध्ये मृत्यूचे नाव नसते.ते अमरलोक आहे,तेथे फक्त जुने शरीर सोडून दुसरे घेतात,याला मृत्यू म्हणणार काय?ती अमरपुरी आहे, मृत्यूच्या वेळेत साक्षात्कार होतो, आम्हाला मुलगा बनायचे आहे.खुशी ची गोष्ट आहे ना.बाबांची(ब्रह्मा) पण इच्छा होते,जाऊन मुलगा बनावे. बाबा जाणतात सोन्याचा चमचा मुखामध्ये असेल.एकच मी लाडका मुलगा शिवबाबांचा आहे,दत्तक घेतले आहे.मी खूप लाडका आहे,तर शिवबाबा खूप प्रेम करतात.एकदम प्रवेश करतात.हा पण खेळ आहे ना. खेळामध्ये नेहमी खुशी राहते.हे पण जाणतात,जरूर खूप खूप भाग्यशाली रथ असेल.ज्यांच्यासाठी गायन आहे, ज्ञानाचे सागर आहेत.यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला ज्ञान देतात. तुम्हा मुलांसाठी एकच खुशीची गोष्ट आहे कि,भगवान स्वतः शिकवत आहेत.भगवान स्वर्गाची राजाई स्थापन करतात.आम्ही त्यांची मुलं आहोत,परत आम्ही नर्का मध्ये का? हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही.तुम्हीच भाग्यशाली आहात,जे विश्वाचे मालक बनण्यासाठी शिकत आहात.अशा अभ्यासावर खूप लक्ष द्यायला पाहिजे ना. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या डबल खुशीमध्ये राहायचे आहे की, आता प्रवास पूर्ण झाला,प्रथम आम्ही आपल्या शांतीधाम घरी जाऊन,परत आपल्या राजधानीमध्ये येऊ.

(२) डोक्यावरती जन्म-जन्मांतर चे पापाचे ओझे आहे,त्याला भस्म करायचे आहे.देहअभिमान मध्ये येऊन कोणते विकर्म करायचे नाही.

वरदान:-
मनाच्या स्वतंत्रते द्वारे सर्व आत्म्यांना शांती देणारे, मन्सा महादानी भव.

बंधनयुक्त माता असतील परंतु मनाने स्वतंत्र आहेत,तर आपल्या वृत्ती द्वारा, शुद्ध संकल्पा द्वारा विश्वाचे वातावरण बदलण्याची सेवा करू शकतात. आजकल विश्वाला मनाच्या शांतीची खूप आवश्यकता आहे.तर मनापासून स्वतंत्र आत्मा,मन्सा द्वारे शांतीचे प्रकंपन पसरवू शकते.शांतीचे सागर बाबांच्या आठवणी मध्ये राहिल्यामुळे शांतीचे किरणे आपोआप पसरतात. असे शांतीची दान देणारेच मन्सा महादानी आहेत.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- स्नेह रूपाचा अनुभव तर ऐकवतात,आता शक्ती रूपाचे अनुभव ऐकवा.